भारतभ्रमंती या वेबसाईटवर तुम्ही इंग्लिश, हिंदी आणि मराठी भाषेत, भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे पाहू शकता. आता तुम्ही पाहणार आहात महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे.सांगलीला ‘मराठी नाट्यसृष्टीची पंढरी’ मानले जाते. येथे कृष्णा आणि वारणा या मुख्य नद्या असल्यामुळे हा भाग अत्यंत सुपीक आहे.सांगली हा महाराष्ट्र राज्यातील कृष्णा नदीच्या काठावर वसलेला एक प्रमुख जिल्हा आहे, जो हळद, द्राक्षे (द्राक्षांचे पंढरपूर) आणि साखर कारखान्यांसाठी प्रसिद्ध आहे. 1 मे 1949 रोजी सातारा जिल्ह्याचे विभाजन होऊन या जिल्ह्याची निर्मिती झाली. Top 28 places to visit in Sangli District
या जिल्ह्यात 10 तालुके असून सांगली हे आशियातील हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. तसेच येथे द्राक्षे आणि मनुका मोठ्या प्रमाणावर उत्पादित व निर्यात केली जातात. या जिल्ह्यात 30 पेक्षा जास्त साखर कारखाने आहेत. आणि हा जिल्हा कृषी, व्यापार आणि वैद्यकीय शिक्षणाचे मोठे केंद्र आहे. येथे नैसर्गिक आणि सांस्कृतिक पर्यटन स्थळे मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच बॉलीवूड अभिनेत्री भाग्यश्री या सांगलीच्या पटवर्धन राजघराण्यातीलच आहेत.
Top 28 places to visit in Sangli District
सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ
1) Bahubali Temple-



सांगली जिल्ह्यातील उंच डोंगराच्या ठिकाणी वसलेले बाहुबली हिल हे जैन धार्मिक स्थळ आहे. या मंदिरातील बाहुबलीची मूर्ती 28 फूट उंच असून या ठिकाणी पोहोचण्यासाठी साधारणता 400 पायऱ्या चढाव्या लागतात. येथील निसर्गरम्य वातावरणात शांतता आणि पावित्र्याचा अनुभव येतो. या ठिकाणी निसर्ग, अध्यात्म आणि इतिहास याचा त्रिवेणी संगम आहे. येथे बारा महिने भाविकांची वर्दळ असते. पर्यटकांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
2)Sangli Fort, Palace & Museum –




सांगलीचा किल्ला व सांगली राजवाडा हे एक सांगलीचे आकर्षक पर्यटन स्थळ आहे. श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन यांनी 19 व्या शतकात हा किल्ला बांधला. किल्ल्याचे असलेले गोलसर बांधकाम पर्यटकांना मनमोहीत करते. या किल्ल्याला पाहून त्या काळातील स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आपणास पाहावयास मिळतो. सांगली राजवाडा हा महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील, सांगली संस्थानाचे संस्थापक श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन (प्रथम) यांनी 19 व्या शतकाच्या सुरुवातीला बांधला. त्यावेळी सांगलीवर पटवर्धन राजघराण्याचे राज्य होते. हा राजवाडा सांगली किल्ल्याच्या परिसरात असून या किल्ल्याचे प्रवेशद्वार आजही दोन भव्य बुरुजांसह भक्कम स्वरूपात पाहायला मिळते. या राजवाड्याच्या परिसरात एक प्रसिद्ध संग्रहालय असून त्यामध्ये दुर्मिळ चित्रे, कलाकुसरीच्या वस्तू आणि ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचा संग्रह आहे. स्वातंत्र्यानंतर दुसऱ्या चिंतामणराव पटवर्धन यांनी हा राजवाडा भारत सरकारला सुपूर्द केला. सध्या या ठिकाणी सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल कार्यालय आणि जिल्हा न्यायालय कार्यरत आहे.
3)Siddhewadi Lake Waterfalls-


सिद्धेवाडी धबधबा हा सांगली जिल्ह्यातील नैसर्गिक समृद्धीने बहरलेला असा धबधबा आहे. हा धबधबा 50 फूट उंचीवरून कोसळतो तेव्हा बघणाऱ्याच्या डोळ्याचे पारणे फिटते. ट्रेकिंग आणि हॅकिंग साठी हा धबधबा लोकप्रिय आहे. हिरवाईने वेढलेला हा धबधबा पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. पावसाळ्यात येथे भेट देण्याचा आनंद काही औरच असतो.
4)Dandoba Hills Forest –



निसर्ग प्रेमींसाठी साठी फॉरेस्ट प्रीझर्व आणि दंडोबा हिल्स हे ठिकाणी नक्कीच पाहण्यासारखे आहेत. हे जंगल 28 किलोमीटर पर्यंत पसरलेले असून येथील शांतता आणि हिरवळ मनमोहीत करते. येथील विविध प्रकारचे पक्षी, प्राणी पर्यटकांना पाहायला मिळतात. ट्रेकिंगची आवड असणारे आणि निसर्गप्रेमी यांनी या ठिकाणाला अवश्य भेट द्या. येथील मनमोहक वातावरण आणि निसर्गाने बहरलेले डोंगर पाहून तुमच्या मनाला आनंद मिळेल.
5)Shree Shukacharya Temple-




श्री शुक्राचार्य यांचे खानापूर तालुक्यातील खानापूर- जत रस्त्याच्या उत्तर बाजूस दोन किलोमीटर आत मध्ये हे जागृत देवस्थान आहे. या देवस्थानाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते की शुक्राचार्य यांचे तप हरण करण्यासाठी इंद्राने रंभा नावाची अप्सरा पाठवली होती. परंतु शुक्राचार्य हे ब्रह्मचारी असल्याने त्यांनी स्त्रीचे दर्शन नको म्हणून ते या डोंगरावर अदृश्य झाले. तेच हे देवस्थान आहे. याची साक्ष म्हणजे ते ज्या ठिकाणी अदृश्य झाले तेथे त्यांच्या शरीराची मागील बाजू व जटा डोंगरात स्पष्ट दिसतात. विट्यातील हे एक जागृत देवस्थान आहे. येथील गर्द झाडे आणि निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखे आहे.
6)Ramling Bet, Bahe-



सांगली जिल्ह्यातील बोरगाव जवळ असलेल्या बहे( ब्रह्मनाळ) येथील कृष्णा नदीच्या पात्रात रामलिंग बेट तयार झाले असून इस्लामपूर होऊन हे ठिकाण दहा किलोमीटर अंतरावर आहे. संथ वाहणाऱ्या कृष्णामाईच्या निसर्गरम्य परिसरात बोट क्लब उपलब्ध आहे. रामलिंग येथील कृष्णा नदीच्या पूलाच्या उजव्या बाजूला राम लिंगाचे पुरातन मंदिर आहे. तर डाव्या बाजूला कृष्णा नदीचा विस्तीर्ण पात्र आणि शांत डोह आहे. कृष्णा नदी काठावरची हिरवीगार शेती, पुरातन मंदिरे आणि नोका विहार मनमोहन टाकतो. सांगली जिल्ह्यात नौका विहाराची उपलब्धता झाली आहे. हा रम्य परिसर पाहून मनाला चैतन्य मिळते.
7)Gokak waterfalls –


सांगलीपासून अगदी थोड्याच अंतरावर गोकाक हा धबधबा आहे. हा धबधबा म्हणजे निसर्गाचा अद्भुत अविष्कार आहे. 177 मीटर उंचीवरून या धबधब्याचे पाणी पडते. ते पाहून मन प्रफुल्लित झाल्याशिवाय राहत नाही. या धबधब्याचे पाणी पडताना पाहून नायगरा धबधब्याचा फील येतो. पावसाळ्यात तर या धबधब्याच्या पाण्याचा आवाज दूरपर्यंत येतो. या धबधब्याजवळ चालुक्य काळातील स्मारके आहेत. त्यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्व आहे.
Visit Our website:AllIndiajourney.com
8)Chandoli National Park-



चांदोली नॅशनल पार्क हे निसर्ग सौंदर्याने भरलेले परिपूर्ण अभयारण्य आहे. या नॅशनल पार्क मध्ये दक्षिण भागातील सह्याद्री टायगर रिझर्व उत्तरेतील कोयना वन्यजीव अभयारण्य समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच या अभयारण्यात मलबार आणि उत्तर पश्चिम येथील जंगलांचा समावेश आहे. या विस्तृत जंगलात विविध प्रकारच्या वनस्पती आणि असंख्य प्रकारच्या प्राण्यांचा समावेश आहे. या अभयारण्यात 23 प्रकारच्या सस्तन प्राण्यांचे, 122 प्रकारचे पक्ष्यांचे आणि वीस प्रकारच्या सरपटणारे व उभयचर प्राण्यांचे घर आहे.
9)Revansiddha Temple-


विटा-खानापूर रस्त्यालगत रेनावी गावाच्या आसपास श्री रेवणसिद्ध देवाचे स्वयंभू स्थान आहे. मंदिराच्या पूर्व बाजूला उसळसिद्ध व पश्चिमेस विहारात विश्वाराध्य आहे. देवापुढे नंदी आहे व नंदीच्या मागे पंचकलशाप्रमाणे प्राचार्य आहे. येथील लोकांची अशी अख्यायिका आहे की हा रेनावी डोंगर पूर्वी पंचधातूचा होता.येथील डोंगरावर पांढरे खडे मिळतात. त्याचा उपयोग भस्मासाठी करतात. तसेच तालमीसाठी लागणाऱ्या तांबड्या मातीच्या खाणीही या डोंगरावर आहेत. इथे वेगवेगळ्या रंगाची माती सापडते. त्यामुळे येथे संशोधन होणे गरजेचे आहे असे सर्वानुमत आहे. या डोंगरावर 84 तीर्थ होती असा उल्लेख मिळतो.
10)Warna Dam –



हे धरण चांदोली जवळील वारणा नदीवर ‘वारणा प्रकल्प’ या नावाने बांधले गेले आहे. या धरणाची टी एम सी क्षमता34.20 असून या धरणाला वसंत सागर जलाशय म्हणून पण ओळखले जाते. या धरणाचा बांध मातीचा असून धरणाची लांबी 1580 मीटर आहे. या धरणाचा सांगली,कोल्हापूर आणि चांदोली येथील अनेक जिल्ह्यातील जमिनीच्या सिंचनासाठी उपयोग होतो. हे धरण नव्यानेच बांधले गेले आहे. पर्यटकांसाठी हे एक आकर्षक ठिकाण आहे. धरण क्षेत्रामध्ये चांदोली अभयारण्य असून ते सांगली -कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर आहे.
11)Shree Ganpati Mandir Sangli-


सांगली गणपती मंदिर हे सांगली शहराचे आराध्य दैवत आहे. हे मंदिर सांगली शहराच्या मध्यभागी, कृष्णा नदीच्या काठावर ‘गणपती पेठ’ भागात आहे. 1814 मध्ये थोरले चिंतामणराव पटवर्धन यांनी या मंदिराचे काम सुरू केले आणि 1843 मध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. या मंदिरात रिद्धी सिद्धीसह गणपतीची संगमरवरी मूर्ती आहे. हे ‘पंचायतन’ प्रकारचे मंदिर असून येथे मुख्य गणेश मंदिराभोवती चिंतामणेश्वर (शिव), चिंतामणेश्वरी (देवी), सूर्यनारायण आणि लक्ष्मीनारायण अशी चार उप-मंदिरे आहे.
12)Sagareshwar Wildlife Sanctuary –



सागरेश्वर अभयारण्य हे सांगली जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण सागरेश्वर डोंगरावर आहे. अलीकडेच या डोंगरावर असंख्य प्रकारची झाडे लावण्यात आले आहेत. या अभयारण्यात विविध प्रकारच्या हरणांच्या जाती पाहावयास मिळतात तसेच अन्य वन्यजीव मोठ्या प्रमाणात आढळून येतात. या अभयारण्यात असंख्य प्रकारच्या जातीचे वृक्ष आढळतात निसर्गाने समृद्ध असे हे ठिकाण खूपच आकर्षक आहे.
13)Haripur –


सांगली शहरातील हरिपूर या ठिकाणाला धार्मिक महत्त्व आहे. हरिपूर हे छोटेसे गाव असून सांगली पासून ते तीन किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी कृष्णा आणि वारणा नद्यांचा संगम झालेला असून येथे संगमेश्वर महादेवाचे पवित्र स्थान आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी येथे भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. येथील नद्यांचे संगमाचे विहंगम दृश्य पाहण्याजोगे आहे. तसेच नाट्यचार्य गोविंद बल्लाळ देवल त्यांनी याच ठिकाणी असलेल्या पारावर बसून ‘संगीत शारदा’ हे नाटक लिहिले तो पार आजही आपणास पहावयास मिळतो.
14)Khwaja Shamshoddin Mira Saheb Dargah-

ख्वाजा शमशोद्दिन मिरासाहेब दर्गा हा मिरज स्टेशन जवळ असून हिंदू मुस्लिम एकतेचे उपासना केंद्र आहे. हजरत मीरा साहेब आणि त्यांचा मुलगा शमासुदिन हुसेन त्यांचा आशीर्वाद मिळवण्या साठी हजारोच्या संख्येने गुरुवारी सकाळी लोक येत असतात. मिरासाहेब हे त्या काळातील एक सुफी संत होते.त्यांच्याबद्दल असे सांगितले जाते की ते मक्काहूनभारतात आले व इस्लाम धर्माचा प्रचार केला. दरवर्षी येथे होणाऱ्या सणांमध्ये लाखो लोक भेट देतात.
15) Irwin Bridge Sangli –

आयर्विन पूल हा महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील, कृष्णा नदीवरील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक पूल आहे. हा पूल सांगली संस्थानाचे अधिपती चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन दुसरे यांनी इ.स. 1927 ते 1929 मध्ये बांधला. आणि या पुलाचे उद्घाटन तत्कालीन ब्रिटिश अधिकारी व्हाईसराय आयर्विन यांच्या हस्ते झाले. त्यांच्या नावावरूनच या पुलाला आयर्विन पूल हे नाव देण्यात आले. दगडांपासून बनवलेला हा पूल त्याच्या मजबूत बांधकामासाठी आणि नदीच्या विहंगम दृश्यांसाठी व सांगलीच्या समृद्धीचे प्रतीक आहे. आज 90 पेक्षा जास्त वर्षांनंतरही हा पूल मजबूत स्थितीत आहे. या पुलावरून कृष्णा नदीचे आणि परिसरातील गणपती मंदिराचे विहंगम दृश्य दिसते.
16)Ganpati Temple, Tasgaon-


तासगाव गणपती मंदिर हे सांगली जिल्ह्यातील अत्यंत प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराची स्थापना पेशव्यांचे सरसेनापती थोरले परशुरामभाऊ पटवर्धन यांनी 1779 या काळात केली होती. येथील मूर्ती उजव्या सोंडेची (सिद्धिविनायक) असून ती ‘जागृत’ देवस्थान आहे. आणि ही मूर्ती सुमारे 125 किलो सोन्याने सुशोभित केलेली आहे. तासगाव गणपती मंदिराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे दक्षिणेकडील शैलीतील भव्य गोपूर आहे. हे गोपूर सुमारे 96 फूट उंच असून त्याला 7 मजले आहेत. आणि त्यावर विविध देवी-देवतांच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. तसेच येथील 240 वर्षांहून अधिक जुनी ‘रथयात्रा’ उत्सव खूप प्रसिद्ध आहे.
17)Shri Datta Mandir, Audumbar-



श्री क्षेत्र औदुंबर हे महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्ह्यातील,कृष्णा नदीच्या काठावर निसर्गरम्य परिसरात वसलेले भगवान दत्तात्रेयांच्या जागृत स्थानांपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. हे ठिकाण दत्त अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामींची कर्मभूमी म्हणून ओळखले जाते. श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी या ठिकाणी चार महिने वास्तव्य केले होते. या मंदिरामध्ये श्री दत्तात्रेयांच्या पवित्र ‘विमल पादुका’ स्थापित आहेत ज्यांचे दर्शन घेण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने येतात. तसेच मंदिर परिसरातच महान दत्तभक्त योगी श्री ब्रह्मानंद स्वामी यांचा मठ आणि समाधी स्थान आहे. आणि येथील कृष्णा नदीच्या पलीकडील तीरावर प्राचीन श्री भुवनेश्वरी देवीचे मंदिर आहे.
18)32 Shirala-



32 शिराळा हे गाव महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्ह्यातील, वारणा नदीच्या काठावर वसलेले, निसर्गरम्य, आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे तालुक्याचे ठिकाण आहे. हे गाव अंबाबाईच्या मंदिरासाठी व नागपंचमीच्या सणाला जिवंत नागांची पूजा करण्याच्या अनोख्या परंपरेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. शिराळ्यातील नागपंचमीला 1000 वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे. आणि नवनाथांपैकी गोरक्षनाथ यांनी या उत्सवाची सुरुवात केली होती असे सांगण्यात येते. पूर्वी येथे जिवंत नाग पकडून त्यांची पूजा आणि मिरवणूक काढली जात असे, मात्र 2002 पासून न्यायालयाच्या आदेशानुसार जिवंत नाग पकडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हा सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातून हजारो पर्यटक आणि भाविक शिराळ्यात येतात.
19)Kharsundi Shri Siddhanatha Temple-


श्री सिद्धनाथ (काळभैरव) मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्ह्यातील,आटपाडी तालुक्यातील जागृत देवस्थान आहे.श्री सिद्धनाथ हे भगवान शंकराचे अवतार (काळभैरव) मानले जातात. त्यांना प्रेमाने ‘नाथबाबा’ असेही म्हटले जाते. हे मंदिर सुमारे 1100 वर्षांपूर्वीचे असून हेमाडपंथी स्थापत्यशैलीत बांधलेले आहे.खरसुंडीची सर्वात मोठी यात्रा असून ती चैत्र शुद्ध नवमी (रामनवमी) पासून सुरू होते. या यात्रेत सासनकाठी आणि पालखी सोहळा अत्यंत उत्साहात पार पडतो. तसेच यात्रेच्या वेळी खिल्लारी जातीच्या बैलांच्या खरेदी-विक्रीसाठी हे महत्त्वाचे केंद्र आहे. खरसुंडी हे महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्रप्रदेशातील असंख्य भाविकांचे कुलदैवत व श्रध्दास्थान आहे.
20)kalavantin kodyach maal, Tasgaon –

कलावंतीणीचे कोडे किंवा कोड्याचं माळ हे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील योगेवाडी गावाच्या हद्दीमध्ये व मणेराजुरी येथील एक रहस्यमयी आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. एका सुंदर नर्तकीने (कलावंतीण/कुलवंतीण) येथे दगडांची रचना करुन एक कोडं तयार केलेलं आहे. हे एक रहस्यमयी कोडं असून 400 वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. या कोड्यात एकदा प्रवेश केला की माणूस आतच फिरत राहतो, असा अनुभव अनेकजण सांगतात. असं म्हणतात की हे कोडं आतापर्यंत कोणालाही सुटलेलं नाही. हे कोडे एक भुलभुलैय्या आहे. ड्रोनने पाहिल्यास ही रचना महाभारतातील चक्रव्युहासारखी दिसते. या कोड्याच्या बाबतीत अनेक अंधश्रद्धा आहेत, त्यामुळे अमावस्येच्या रात्री या भागातून जाण्यास काही लोकं घाबरतात. पूर्वी इचलकरंजी संस्थानाचा भाग असलेली ही जमीन ब्रिटिशांच्या काळात सरकारजमा झाली होती.
21)Sagareshwar Mandir-



सागरेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्ह्यातील, कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे गावाजवळ सह्याद्रीच्या कुशीत वसलेले एक अत्यंत प्राचीन आणि धार्मिक स्थळ आहे. भगवान शंकराचे (सागरेश्वर) हे मंदिर सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या मध्यभागी वसलेले असून ‘दक्षिण काशी’ म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर साधारणपणे 900 वर्षे जुने असून, येथील शिलालेख 12 व्या शतकातील आहेत व त्यात कलचुरी राजांचा उल्लेख आढळतो.या मंदिर समूहात एकूण 51 मंदिरे आणि 108 शिवलिंगे आहेत. हा मंदिर परिसर अत्यंत निसर्गरम्य असून येथे कधीही न आटणारे गोड्या पाण्याचे कुंड आहे. आणि या कुंडातील पाण्यात स्नान केल्याने त्वचेचे रोग बरे होतात. अशी भाविकांची श्रद्धा आहे. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते.
22)Mallikarjuna Temple / Vilasgad Fort-




मल्लिकार्जुन मंदिर, हे सांगली जिल्ह्यातील वाळवा (इस्लामपूर) तालुक्यात येडेनिपाणी गावाजवळील विलासगड किल्ल्यावर असलेले प्राचीन मंदिर आहे. या मंदिराला ‘मल्लिकार्जुन डोंगर’ असेही संबोधले जाते. हे मंदिर यादवकालीन 13 व्या शतकातील असून हेमाडपंती स्थापत्यशैलीत बांधलेले आहे. येथे भगवान शंकराचे प्राचीन शिवलिंग आहे. व अशी आख्यायिका आहे की अगस्त्य ऋषींनी येथे तपश्चर्या केली होती. आणि येथील नंदीची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण असून तिची मान थोडी तिरकी आहे. हे मंदिर विलासगड किल्ल्याच्या डोंगरावर आहे. हा किल्ला पूर्वी ‘वॉचफोर्ट’ म्हणून वापरला जात असे. याशिवाय या डोंगरावर हजरत चाँद बुखारी बाबांचा दर्गा आहे. निसर्गरम्य डोंगररांगांनी वेढलेल्या या मंदिरात पोहोचण्यासाठी भाविकांना 700 ते 800 पायऱ्या चढाव्या लागतात.
23)Shri Lakshmi Narasimha Temple / Shri Kshetra Jwala Narasimha Teerth –



श्री ज्वाला नरसिंह मंदिर हे सांगली जिल्ह्यातील कोळे नरसिंहपूर (तालुका वाळवा) येथील एक अत्यंत प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे. हे भुयारी मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले असून येथील नरसिंहाची मूर्ती जगातील सर्वात मोठी शाळीग्राम मूर्ती असल्याचे सांगितले जाते. येथे भगवान नरसिंहाची 16 हातांची अत्यंत उग्र आणि भव्य मूर्ती आहे. ही मूर्ती अखंड शाळीग्राम पाषाणातून घडवलेली असून तिची उंची सुमारे 5 फूट आहे. हे मंदिर 14 ते 20 फूट खाली एका भुयारात असून सुमारे 2000 वर्षापूर्वीचे आहे. आणि हे मंदिर देवगिरीच्या यादव राजांच्या काळात बांधल्याचा उल्लेख आढळतो. आणि येथील आकर्षण म्हणजे या मंदिराच्या बाहेरील बाजूस असलेल्या खिडकीतून नाणे टाकल्यास ते थेट मुख्य मंदिरात देवाच्या चरणांपाशी पडते.
24)Sri Sri Radha Gopal temple-


श्री श्री राधा गोपाळ मंदिर (इस्कॉन) हे महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्ह्यातील,आरवडे येथील अत्यंत शांत आणि आध्यात्मिक मंदिर आहे. हे मंदिर प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. निसर्गरम्य परिसर असलेल्या या मंदिरात राधा-गोपाळांच्या देखण्या मूर्ती, श्री चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभू, श्री श्री रुक्मिणी-विठ्ठल, सीता-राम-लक्ष्मण-हनुमान यांच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. हे मंदिर टेकड्या आणि शेतांच्या मध्यभागी असून,मंदिराच्या आवारात सुशोभित वृंदावन गार्डन, धार्मिक पुस्तकांचे दुकान, कृष्णलीला दर्शवणारे म्युझियम आणि गोशाळा आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात होणाऱ्या भव्य ‘हरे कृष्ण उत्सव’ ला महाराष्ट्रातून हजारो भाविक या मंदिरात येतात.
25) Shri datta Kshetra Nrusinhwadi-



श्री क्षेत्र नृसिंहवाडी किंवा नरसोबावाडी हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे आहे. परंतु हे ठिकाण सांगलीच्या खूप जवळ आहे. हे निसर्गरम्य परिसरातील अत्यंत पवित्र व जागृत दत्तक्षेत्र कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसले आहे. भगवान दत्तात्रेयांना समर्पित या मंदिरात त्यांच्या पवित्र पादुकांची पूजा केली जाते. येथे श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती यांनी या ठिकाणी 12 वर्षे वास्तव्य केले होते. तसेच येथे कृष्णा नदीचे पाणी वाढते आणि मंदिराच्या उत्तर दरवाजातून शिरून दक्षिण दरवाजातून बाहेर पडते, तेव्हा त्याला ‘दक्षिण द्वार सोहळा’ म्हणतात, हा सोहळा अत्यंत पवित्र मानला जातो. या मंदिरात देशभरातून वर्षभर भाविक दर्शनासाठी येत असतात.
26)Chouranginath Hill Station-



चौरंगीनाथ हिल स्टेशन हे महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात सोनसळ गावाजवळील निसर्ग सौंदर्याने नटलेले धार्मिक पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये असून पावसाळ्यात येथील परिसर अतिशय हिरवागार आणि नयनरम्य दिसतो. आणि याला ‘चौरोबा डोंगर’ किंवा ‘सोनसळ घाट’ म्हणूनही ओळखले जाते. येथील डोंगराच्या माथ्यावर नवनाथांपैकी एक असलेल्या श्री चौरंगीनाथांचे प्राचीन व जागृत मंदिर आहे. येथे चौरंगीनाथांनी तपश्चर्या केली होती असे सांगितले जाते. तसेच येथे डोंगराई देवीचे मंदिर ही आहे. येथे एक वॉच टॉवर असून पर्यटकांना या डोंगर माथ्यावरून कृष्णा नदीचे पात्र, सागरेश्वर अभयारण्य आणि मच्छिंद्रगड किल्ला यांचे विहंगम दृश्य दिसते. दरवर्षी श्रावण महिन्यात येथे मोठी यात्रा भरते.
27)Shir Dongarai devi tempal, kadepur-



श्री डोंगराई देवी मंदिर हे सांगली जिल्ह्यातील, कडेगाव तालुक्यातील कडेपूर गावातील डोंगराई देवी हे एक प्राचीन शक्तिपीठ, सुंदर हिल स्टेशन आणि आध्यात्मिक पर्यटन स्थळ आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेले हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि भाविकांसाठी एक उत्तम आकर्षण आहे. या डोंगराच्या शिखरावर डोंगराई देवीचे अतिप्राचीन मंदिर आहे. देवीची मूर्ती सुमारे 4 फूट उंचीची असून ती सिंहावर आरूढ आहे. पौराणिक कथेनुसार येथे देवीने कडासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, ज्यावरून ‘कडेपूर’ हे नाव पडले. 12 व्या शतकात राजा भोज यांच्या काळात हेमाद्रिपंतांनी या मंदिराच्या उभारणीत सहकार्य केल्याचे उल्लेख आढळतो. या मंदिराच्या आवारात महादेव, तुकाई देवी आणि बागूबाई यांची छोटी मंदिरे आहेत.
28)Machindragad Fort-


मच्छिंद्रगड किल्ला हा महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक ऐतिहासिक टेहळणीचा किल्ला आहे. या किल्ल्याचे बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांनी 1676 मध्ये स्वराज्याच्या संरक्षणासाठी केले होते. शिवरायांनी बांधलेल्या दुर्गशृंखलेतील हा शेवटचा किल्ला मानला जातो. या किल्ल्यावर नाथ संप्रदायातील मच्छिंद्रनाथ यांचे प्राचीन आणि जागृत मंदिर आहे, ज्यामुळे या किल्ल्याला ‘मच्छिंद्रगड’ हे नाव पडले. येथील मच्छिंद्रनाथांच्या मंदिरामागे मागे एक मोठी खडक कापून तयार केलेली विहीर आहे. व गडावर असलेल्या बुरुजांवरून सभोवतालच्या निसर्गाचे विलोभनीय दृश्य दिसते. तसेच या गडावर काही जुने शिलालेख आणि तोफांचे अवशेष पाहायला मिळतात. हा किल्ला स्थानिक स्तरावर ‘सोन्याचा डोंगर’ म्हणून ओळखला जातो.
FAQ
1)सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
सागरेश्वर अभयारण्य सांगली जिल्ह्यात आहे.
2)सांगलीतील गणपती मंदिर कोणत्या साली बांधले गेले ?
सांगलीतील गणपती मंदिर 1843 मध्ये अप्पासाहेब पटवर्धन यांनी बांधले.
1) सांगली जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे?
सांगली जिल्हा हा हळद, ऊस उत्पादनात आघाडीवर आहे व तासगाव आणि मिरज तालुक्यात द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.


