भारतभ्रमंती या वेबसाईटवर पहा भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे. महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे.अकोला जिल्हा हा महाराष्ट्राच्या पूर्व विभागात आहे. तसेच हा जिल्हा अमरावतीच्या प्रशासकीय विभागात येतो. 1998 साली अकोला जिल्ह्याचे विभाजन झाले आणि वाशिम जिल्ह्याचे निर्मिती केली गेली. त्यामुळे अकोला आणि वाशिम हे नवीन दोन जिल्हे निर्माण झाले. अकोला जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे 5428 चौरस किलोमीटर आहे. अकोला जिल्ह्यामध्ये सात तालुके आहेत. Top 21 places to visit in Akola District
या जिल्ह्यात काटेपूर्णा आणि वाण हे मोठे सिंचन प्रकल्प आहेत. येथील पारस औष्णिक विद्युत केंद्र बाळापुर तालुक्यात आहे. या जिल्ह्यात तीन संशोधन संस्था आहेत. या जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक किल्ले असून नरनाळा हे अभयारण्य आहे. बार्शी, टाकळी तालुक्यातील काटेपूर्णा धरण आणि काटेपूर्णा अभयारण्य ही पर्यटन स्थळ या जिल्ह्यात आहेत.Top 12 places to visit in Akola
Top 21 places to visit in Akola District
अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
1)Mahadev Cave Temple-

अकोला जिल्ह्याच्या मेळघाट जंगलामध्ये महादेव गुफा हे शिव मंदिर आहे. येथे वर्षभर भाविक येत असतात परंतु श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी येथे खूपच गर्दी असते. येथील निसर्गरम्य परिसर खूप सुंदर आहे. अकोला शहरापासून हे ठिकाण 20 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत किंवा मित्रांबरोबर या ठिकाणाला भेट देऊ शकता.
2)Birla Ram Mandir-


अकोला जिल्ह्यातील बिर्ला राम मंदिर हे एक प्रेक्षणीय ठिकाण आहे. अकोला शहरापासून हे मंदिर दहा मिनिटांच्या अंतरावर आहे. येथील गर्भगृह अतिशय सुंदर असून वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्ती मंदिरात बसविल्या आहेत. ह्या मंदिरात रामनवमीला खूप मोठा उत्सव असतो.हे मंदिर शंभर वर्षे आधी बांधले आहे. बिर्ला फॅमिली ने या मंदिराची स्थापना केली. राम नवमीला या मंदिराला विद्युत रोषणाईने सजवलेले असते. तसेच या दिवशी महाप्रसाद देखील असतो. मंदिर परिसरातील वातावरण शांततामय असून या परिसरात वेगळीच अनुभूती येते.
3)Kapshi Lake-


अकोला जिल्ह्यातील कापशी तलाव हे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. या तलावाची निर्मिती ब्रिटिश राजवटीत झाली असून अकोला शहरवासीयांना पाणी पाणीपुरवठा करण्यासाठी झाली आहे. हा तलाव सातशे एकर मध्ये पसरलेला आहे. या तलावामुळे हजारो एकर शेती सिंचन केली जाते. येथे मासेमारी देखील केली जाते. कापशी तलाव परिसरात ब्रिटिशकालीन रेस्ट हाऊस, बगीचा इत्यादी ठिकाणी आहेत. तसेच या तलावात परदेशी पक्षी येतात.
4)Gandhi Jawahar Park-


गांधी जवाहर पार्क हे उद्यान अकोल्यातील सर्वात प्रसिद्ध उद्यान आहे. हे उद्यान सर्वात जुने असून एमजी रोडवर आहे. व शहराच्या मध्यभागी वसलेले आहे. उद्यानामध्ये विविध प्रकारची वनस्पती फुले आहेत. तसेच येथे लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी आहेत. सकाळी सहा पासून ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत हे उद्यान सर्वांसाठी खुले असते.
Visit our website: allindiajourney.com
5)Nehru Park-

नेहरू पार्क हे उद्यान अतिशय रोमांचक असून याला बालो ध्यान असे देखील म्हटले जाते. येथे लहान मुलांसाठी रोलर कोस्टर,घोडा गाडी, रेल गाडी, झुला आहेत. तसेच येथील मजेची गोष्ट म्हणजे येथील भुलभुलय्या खूपच छान आहे. भुलभुलय्यातून बाहेर पडता येत नाही तेव्हा येथील कर्मचारी मदत करतात. तुम्ही तुमच्या मुलांसोबत या उद्यानाला एकदा अवश्य भेट द्या.
6)Narnala Fort –


नरनाळा किल्ला हा अकोला जिल्ह्यातील महत्वपूर्ण प्रेक्षणीय स्थळ आहे. देशभरातून घ्या किल्ल्याला भेट देण्यासाठी पर्यटक येत असतात. नरनाळ सिंह स्वामी राजाच्या नावावरून या किल्ल्याला नरनाळा हे नाव देण्यात आले आहे. हा किल्ला गिरीदुर्ग म्हणून ओळखला जातो. किल्ल्याचे क्षेत्र 362 एकर वर पसरलेले आहे. येथील परिसर रमणीय असून पर्यटकांसाठी उत्तम ठिकाण आहे.
7)Katepurna Wildlife Sanctuary-



काटेपूर्णा अभयारण्य हे एक विस्तृत जंगल असून पर्यटकांसाठी येथे नव्यानेच जंगल सफारी बस सुरू करण्यात आली आहे.अकोला शहरातील काटेपूर्णा अभयारण्य हे आकर्षक पर्यटन स्थळ आहे. या अभयारण्यात शंभर पेक्षा जास्त प्रजातीच्या वन्य प्राण्यांचा वावर आहे.तसेच येथील जंगलात वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत. या अभयारण्यात फिरण्यासाठी जिप्सीची ही सोय करण्यात आली आहे. व पौर्णिमेच्या रात्री निरीक्षण करण्यासाठी मचान बसवण्यात आले आहेत.
8)Balapur Fort-



बाळापूर किल्ला हा अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील ऐतिहासिक असून औरंगजेबच्या मुलगा आलम शहा याने हा किल्ला बांधला आहे. हा किल्ला मान आणि महेशी नदीच्या संगमाजवळ एका टेकडीवर आहे. या किल्ल्याचे बांधकाम 1712 मध्ये सुरू झाले होते व 1757 मध्ये ते पूर्ण झाले. किल्ल्याला एकूण तीन दरवाजे आहेत. हा किल्ला अकोला पासून 26 किलोमीटर अंतरावर आहे.
9)Asadgad / Akola Fort-


असदगड किंवा अकोला किल्ला हा अकोला जिल्ह्यातील,मोरणा नदीच्या काठावर वसलेला एक ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे. हा किल्ला अकोला शहराच्या मध्यभागी असून 1698 मध्ये औरंगजेबाचा सरदार असद खान याने बांधला होता. या किल्ल्यावर असद बुरूज, फतेह बुरूज, आणि आगर वेस (दरवाजा) तटबंदी आणि काही ऐतिहासिक अवशेष आजही पाहायला मिळतात. तसेच किल्ल्यावर ‘हवामहाल’ नावाची एक ऐतिहासिक इमारत आहे, जी असद खानचे निवासस्थान असावे असे मानले जाते. 1803 मध्ये दुसऱ्या आंग्ल-मराठा युद्धादरम्यान आर्थर वेलस्लीने येथे तळ ठोकला होता. आणि 1870 च्या सुमारास ब्रिटिश राजवटीत या किल्ल्याचे काही भाग पाडण्यात आले. या किल्ल्याच्या परिसरात भगवान शिवाचे मंदिर आणि एक दर्गा आहे.
10)Shri Raj Rajeshwar Mandir –


श्री राज राजेश्वर मंदिर हे अकोल्यातील शिवाला समर्पित असून ते अकोला किल्ल्यापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर अकोल्यातील प्रसिद्ध मंदिरापैकी एक आहे या मंदिराची वास्तूकला खूप सुंदर आहे. मराठी राजवटीत बांधला गेलेल्या या मंदिराला ऐतिहासिक वारसा आहे. मंदिरातील शांत वातावरण आपल्या मनाला प्रफुल्ल करते. या मंदिरातील कोरीव काम व नक्षीकाम अतुलनीय आहे. प्रत्येक वर्षी येथील महाशिवरात्रि उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथे भेट देतात. हे अकोल्याचे ग्रामदैवत आहे..
11)Sundarabai Khandelwal Tower-

सुंदराबाई खंडेलवाल टावर हा अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे. 12 फेब्रुवारी 1962 साली त्या वेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या टॉवरचे उद्घाटन झाले होते. खंडेलवाल टॉवरच्या बांधकामासाठी एका दानशूर व्यक्तीने मदत केली होती. स्वर्गीय श्री हिरालालजी खंडेलवाल यांनी त्यांच्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ वीस हजार रुपयांची देणगी त्यावेळेस दिली होती. हा टॉवर पाच मजली असून त्याची उंची 87 फूट आहे. तसेच या टॉवरमध्ये पाच फूट व्यासाचे घड्याळ बसवले आहे. परंतु सध्या हे घड्याळ बंद आहे. स्थापत्य शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेला हा टॉवर दगडी बांधकामात आहे.
12)Kalanka Devi Temple –


अकोला जिल्ह्यात बार्शीटाकळी या तालुक्यात येणारे कालंका मातेचे मंदिर जागृत देवस्थान आहे. हे मंदिर जवळजवळ 400 ते 500 वर्षे जुने असून बार्शी टाकळीचे ग्रामदैवत आहे. हे मंदिर हेमाडपंती शैलीत व स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिरातील नक्षीकाम तसेच दगडावर काढलेली चित्र मंदिराच्या प्राचीन वैभवाची साक्ष देतात. वर्षभर येथे भाविक येत असतात परंतु मंगळवारी मंदिरात खूप गर्दी असते.नवरात्रीमध्ये नऊ दिवस मंदिरामध्ये देवीचा वास असतो अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. कालंकादेवीने राक्षसांबरोबर युद्ध केल्यानंतर विश्रांतीसाठी हे ठिकाण निवडलं. आणि तिथेच देवी विराजमान झाली अशी आख्यायिका गावकरी सांगतात.
13)Patur Caves-

पातूर लेणी हे अकोला जिल्ह्यातील, ऐतिहासिक आणि पुरातत्वीय ठिकाण आहे. या लेण्यांना ‘बौद्ध लेणी’ किंवा ‘पांडव लेणी’ असेही म्हटले जाते. या लेण्यांची निर्मिती इसवी सन पूर्व 3 रे शतक या कालखंडात (सातवाहन काळ) झाल्याचे मानले जाते. या लेण्या अखंड बसाल्ट खडकात कोरलेल्या आहेत. व यामध्ये दोन ते तीन विहार आहेत. आणि मुख्य विहाराच्या दर्शनी भागात व्हरांडा असून आतमध्ये खोल्या आहेत. या लेण्यांमध्ये पाली भाषेतील दोन शिलालेख आहेत.तसेच पूर्वी येथे बुद्ध मूर्ती आणि काही जैन संतांच्या मूर्तींचे अवशेष असल्याचेही उल्लेख आढळतो. या लेण्यांच्या जवळच रेणुका माता मंदिर, शाहबाबू दर्गा, दुधानी धबधबा, मोरना नदी धरण, आणि सिदाजी महाराज संस्थान आहे.
14)Salasar Balaji Temple-


अकोला जिल्ह्यातील सालासर बालाजी मंदिराची स्थापना 2014 मध्ये गंगानगर येथे झाली. येथे श्रीराम दरबार, हनुमानजी, शिव परिवार आणि राधाकृष्ण यांच्या मुर्त्या स्थापित केल्या आहेत. मंदिर परिसर खूप मोठा असून त्याच्यामध्ये बगीचा आहे मंदिर परिसरातील वातावरण शांतता व प्रसन्नतेने भरलेले आहे.
15)Mahan Dam-


महान धरण (काटेपूर्णा धरण) हे महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी जवळ, महान गावात काटेपूर्णा नदीवर बांधलेले एक प्रमुख मातीचे धरण आहे. हे धरण अकोला शहर,मुर्तिजापूर शहर, बोरगाव मंजू, अकोला एमआयडीसी आणि 60 पेक्षा जास्त गावांची पाण्याची गरज भागवणारा पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे, तसेच हे धरण एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. या धरणावर 10 वक्रद्वारे असून हे धरण दरवर्षी पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरते. या धरणाचा परिसर निसर्गरम्य असून जवळच काटेपूर्णा अभयारण्य आणि जुने करुनेश्वर मंदिर आहे.
16)Shree Renuka Mata Temple-




रेणुका माता मंदिर हे महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील पातूर येथील एक जागृत देवस्थान आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर पातूर शहराजवळील डोंगरावर निसर्गरम्य वातावरणात सुवर्णा (बोर्डी) नदीच्या काठावर वसलेले आहे. आणि रेणुका माता अनेक भाविकांची कुलस्वामिनी आहे. हे मंदिर विदर्भातील प्रमुख शक्तीपीठ असून भाविकांचे जागृत श्रद्धास्थान आहे. या मंदिराला ‘प्रतिमाहूर’ म्हणूनही ओळखले जाते, कारण जे भाविक माहूरगडावर जाऊ शकत नाहीत, ते येथे येऊन देवीचे दर्शन घेतात. पातूर हे गाव ‘नानासाहेबांचे पातूर’ म्हणूनही ओळखले जाते. कारण येथे संत नानासाहेबांची समाधी आहे. हा वाडा टेकडीवरील प्रसिद्ध रेणुका देवी मंदिराच्या पाठीमागे स्थित आहे. रेणुका देवी मंदिरासमोरच्या डोंगरात प्रसिद्ध पातुरची प्राचीन लेणी आणि भुयारं आहेत. दरवर्षी नवरात्रोत्सव येथे मोठ्या उत्सवात साजरा होतो.
17)Om Shri Baara Jyotirlinga Shiv Mandir-

ओम श्री बारा ज्योतिर्लिंग शिव मंदिर हे अकोला जिल्ह्यातील अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे भारताच्या विविध भागातील सर्व 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती एकाच ठिकाणी प्रतिष्ठापित करण्यात आल्या आहेत. हे मंदिर अकोला शहरातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक स्थळ असून, येथे महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवारी भाविकांची मोठी गर्दी असते. मंदिराचा परिसर अत्यंत शांत आणि भक्तीपूर्ण आहे. हे मंदिर अकोल्यातील गणेश नगर आणि रणपिसे नगर मुख्य रस्त्याजवळ आहे.
18)Narnala Wildlife Sanctuary-




नरनाळा वन्यजीव अभयारण्य हे अकोला जिल्ह्यातील, अकोट तालुक्यात, सातपुडा पर्वतरांगेत वसलेले निसर्गप्रेमीसाठी एक उत्तम ठिकाण आहे. हे निसर्गरम्य अभयारण्य सुमारे 12.35 चौ. किमी क्षेत्रावर पसरलेले एक निसर्गरम्य ठिकाण आहे. नरनाळा अभयारण्य हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग असून मेळघाटचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार मानले जाते. या अभयारण्याच्या परिसरात 10 व्या शतकात बांधलेला, 362 एकरांचा विस्तार असलेला, प्रसिद्ध ‘नरनाळा किल्ला’ आहे आणि या किल्ल्याला 6 मोठे आणि 21 छोटे दरवाजे आहेत.व गडावर ‘कडक बिजली’ नावाची प्रसिद्ध तोफ आहे. या अभयारण्यात वाघ, बिबट्या, सांबर, चितळ, रानडुक्कर, अस्वले, भुंकणारे हरिण आणि माकडे यांसारखे प्राणी आढळतात. आणि विविध प्रकारचे स्थानिक व स्थलांतरित पक्षी व येथील घनदाट जंगलात अनेक प्रकारच्या वनस्पती आढळून येतात.
19)Avnish Agro Tourism Centre-

अवनिश कृषी पर्यटन केंद्र हे अकोला जिल्ह्यातील, बाळापूर तालुक्यातील लोकप्रिय कृषी पर्यटन केंद्र आणि वॉटर पार्क आहे. हे केंद्र मुख्यत्वे शेती, वॉटर स्पोर्ट्स आणि साहसी खेळांसाठी ओळखले जाते. येथे पर्यटकांसाठी शेती, स्थानिक वनस्पती आणि प्राणीसृष्टी पाहण्याचा अनुभव व आधुनिक वॉटर पार्कमध्ये वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता. आणि साहसी खेळांसाठी येथे विविध ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आहेत. याशिवाय येथे ग्रामीण जीवनशैली, स्थानिक वनस्पती आणि शेतीशी संबंधित माहिती पर्यटकांना मिळते. तसेच शेतातून आलेल्या ताज्या साहित्यापासून बनवलेल्या पारंपारिक महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घेता येतो. हे ठिकाण शालेय सहलींसाठी अत्यंत लोकप्रिय आहे.
20)Dudhani Waterfall-


दुधानी धबधबा हा अकोला जिल्ह्यातील, पातूर तालुक्यातील गोंधळवाडी गावाजवळील, मालराजुरा परिसरातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हा धबधबा घनदाट झाडी आणि डोंगराळ भागात असल्याने येथे ट्रेकिंगचा आनंद घेता येतो. पावसाळ्यात कोसळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र पाण्यामुळे याला ‘दूधसागर’ प्रमाणेच ‘दुधानी’ असे नाव पडले आहे. हा धबधबा सातपुडा पर्वतरांगांच्या परिसरात असल्यामुळे येथील वातावरण अत्यंत थंड व अल्हाददायक आहे. पावसाळ्यात तर या धबधब्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. निसर्गप्रेमी आणि पिकनिकसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
21)Swayambhu Mahadev Temple, Antri-


स्वयंभू महादेव मंदिर हे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर येथील अत्यंत प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे. हे मंदिर 200 वर्षे जुने असून येथील शिवलिंग स्वयंभू आहे. 1997 मध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात खोदकाम करताना मूळ पूर्ण शिवलिंगाचे दर्शन झाले होते.
या मंदिराच्या परिसरातच राधाकुंज निसर्ग केंद्र हे कृषी पर्यटन केंद्र विकसित करण्यात आले आहे, ज्यामुळे हे ठिकाण कौटुंबिक सहलीसाठी उत्तम आहे. महाशिवरात्रीला आणि श्रावण महिन्यात येथे मोठी जत्रा भरते त्यावेळी हजारो भाविक दर्शनासाठी येतात.
नरनाळा किल्ल्याचे क्षेत्र किती एकरवर पसरले आहे ?
नरनाळा किल्ल्याचे क्षेत्र 362 एकरवर पसरले आहे.
बाळापूरचा किल्ला कोणी बांधला ?
बाळापूरचा किल्ला औरंगजेबाचा मुलगा आलम शहाने बांधला.
अकोला जिल्ह्यातील कालन्का मातेचे मंदिर कोणत्या तालुक्यात आहे ?
अकोला जिल्ह्यातील कालन्का मातेचे मंदिर बार्शी टाकळी तालुक्यात आहे.


