भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे-Top 19 places to visit in Bhandara District

भारतभ्रमंती या वेबसाईटवर पहा भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांमध्ये, महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे. 1 मे 1999 रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन झाले व गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. पूर्वी भंडारा जिल्ह्याचे नाव भाणारा असे होते.जिल्ह्याचे मुख्यालय भंडारा येथे असून जिल्ह्याचे क्षेत्रफळ3717 चौरस कि.मी.आहे. भंडारा जिल्हा वैनगंगा नदीच्या खोऱ्यात असून या जिल्ह्याची वैनगंगा हे प्रमुख नदी आहे. या नदीचे पात्र उन्हाळ्यात देखील कोरडे पडत नाही. भंडारा जिल्ह्यामध्ये सात तालुके आहेत.Top 19 places to visit in Bhandara District

भंडारा येथे भात संशोधन केंद्र आहे. येथील अर्थव्यवस्था मुख्यत्वे शेती, उद्योग आणि वनस्पतींवर अवलंबून आहे. भंडारा जिल्हा हा तांदळाचे मोठे उत्पादन घेणारा जिल्हा आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर या ठिकाणी तांदळाची मोठी बाजारपेठ आहे.तसेच या जिल्ह्याला “पितळ शहर’ म्हणून देखील ओळखले जाते. कारण या ठिकाणी पितळ उत्पादनाचे वेगवेगळे कारखाने आणि उद्योग चालतात. या जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळे आहेत. हा जिल्हा तलावांसाठी आणि सुगंधी तांदळासाठी प्रसिद्ध आहे.

या जिल्ह्याला तलावाचा जिल्हा म्हणून देखील ओळखले जाते. तसेच या जिल्ह्यात खनिज साठा भरपूर प्रमाणात मिळतो. या जिल्ह्यामध्ये रेशीम उद्योग केला जातो. तसेच सैन्य दलात लागणारा शस्त्रसाठा येथे बनवला जातो. तेच येथील डोंगरामध्ये गोंड व हळबी आदिवासी जमाती आहेत.

Top 19 places to visit in Bhandara

भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे

1)Shiv Mandir Gaimukh Devasthan Tumsar-

Top 19 places to visit in Bhandara District

गायमुख देवस्थान हे भंडारा जिल्ह्यातील ठिकाण सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असून तुमसर तालुक्यात आहे. येथे शंभू महादेवाचे विलोभनीय मंदिर असून डोंगर घळीतून येणारे पाणी वर्षभर गायमुखातून पडत असते म्हणून या मंदिराला गायमुख देवस्थान म्हणून ओळखले जाते. मंदिर परिसरात घनदाट जंगल आहे. महाशिवरात्रीच्या वेळी या ठिकाणी अकरा दिवस मोठी यात्रा भरते. भंडाऱ्यापासून साधारणता 54 किलोमीटर अंतरावर गायमुख हे देवस्थान आहे.

2)Umred Karhandla Wildlife Sanctuary-

भंडारा जिल्ह्यातील उमरेड कऱ्हांडला अभयारण्य हे पैनगंगा नदी व ताडोबा अभयारण्याच्या जवळ आहे. या अभयारण्यामध्ये दुर्मिळ जातीचे वन्यजीव प्राणी आढळतात. भंडारापासून हे अभयारण्य 60 किलोमीटर अंतरावर आहे. हे अभयारण्य 189 किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. इथे येणारे पर्यटक वन्यजीव सफारी व क्षी निरीक्षणाचा आनंद घेऊ शकतात.

3)Pauni fort –

पवनी तालुक्यातील पवनी किल्ला हे ठिकाण पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे. पवनी शहराच्या एका बाजूला वैनगंगा नदी वाहते तर तीन बाजूंना टेकड्या आहेत. यातील एका टेकडीवर पवन राजांचा हा किल्ला बांधलेला आहे. या किल्ल्याचा बराच भाग अजून सुस्थितीत आहे. पवनी शहराचे मुख्य रस्त्याचे प्रवेशद्वार या किल्ल्यातूनच जाते. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला पवणी तलाव येना जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतो. पवनी किल्ल्यावरून या गावाला पवनी हे नाव देण्यात आले. हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारात येत असून भंडारा जिल्हा पासून 47 किलोमीटर अंतरावर आहे.

4)Chaundeshwari Mata Mandir-

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे असलेले चौंडेश्वरी देवी मंदिर एक जागृत प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. मोहाडी गावातील आणि विदर्भातील भाविकांचे हे आराध्य दैवत आहे. विशेष म्हणजे हे मंदिर गायमुख नदीच्या काठावर वसलेले असून देवीची मूर्ती मोठी आहे. यामध्ये देवीचे फक्त तोंडच दिसते बाकी शरीराचा भाग जमिनीत आहे. हे शारदीय नवरात्र महोत्सवाच्या काळात महाराष्ट्रातूनच नव्हे तर मध्यप्रदेश मधूनही भाविक येऊन (ज्योती कलश)घटस्थापना करतात. चौंडेश्वरी देवीचे मंदिर भंडाऱ्यापासून फक्त वीस किलोमीटर अंतरावर आहे.

5)Koka Wildlife Sanctuary-

भंडारा जिल्ह्यातील कोका वन्यजीव अभयारण्य हे 92.34 एवढ्या चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. 18 जुलै 2013 ला सरकारकडून या वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा मिळाला आहे. हे अभयारण्य नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे. हे अभयारण्य भंडाऱ्यापासून केवळ 20 किलोमीटर अंतरावर आहे. या अभयारण्यामध्ये वाघ, बिबटे,चित्ता, हरीण,सांभार,लांडगा,ससे कोल्हे,गोरस अशा अनेक प्रकारचे वन्यप्राणी आढळून येतात. नागपूर पासून हे अभयारण्य 60 किलोमीटर अंतरावर असून अभयारण्याला भेट देण्यासाठी येथून ट्रेन,बसची सोय आहे.

Visit our website: Allindiajourney.com

6)Gose Khurd Dam 

गोसेखुर्द धरण नागपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले असून पवनी गावाजवळ आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाला इंदिरासागर धरण म्हणून ही ओळखले जाते विदर्भातील हे सर्वात मोठे धरण आहे. भंडारा पासून हे धरण 41 किलोमीटर अंतरावर आहे. चंद्रपूर,नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील शेतीसाठी या धरणातील पाण्याचा सिंचनासाठी उपयोग केला जातो. या धरण परिसरातील परिसर अत्यंत निसर्गरम्य आणि विलोभनीय आहे. तसेच या धरणातून जलविद्युत निर्मिती देखील केली जाते. या धरणाची उंची 74 फूट असून लांबी सुमारे 37,257 फूट एवढी आहे. पावसाळ्यात येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात

7)Rawanwadi Dam-

भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुक्यात रावणवाडी हे गाव असून धारगाव पासून येथे जाण्यासाठी रस्ता आहे. रावण वाडी गावाजवळ रावणवाडी हे धरण आहे. या धरणाच्या आजूबाजूचा परिसर हा जंगलाचा असून हे एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. हे धरण 1960 मध्ये बांधले गेले. या धरणाची लांबी 96 मीटर असून उंची 12.44 एवढी आहे. तसेच या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 6.9 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. भंडार्यापासून हे धरण वीस किलोमीटर अंतरावर आहे.

8)Pingleshwari Devi Temple, Korambhi Devi Mandir-

भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या तीरावर कोरंभी हे गाव वसलेले आहे.कोरंभी टेकडीवर हे कोरंभी मातेचे धार्मिक स्थळ आहे. कोरंभी मंदिर हे 800 वर्षांपूर्वी बांधलेले असून हेमाडपंथी शैलीचे आहे. नवरात्री मध्ये येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. देवीची मूर्ती साडेपाच फूट उंचीची आहे. ही देवी नवसाला पावणारी आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. भंडारा जिल्ह्यापासून कोरंभी मातेचे मंदिर सहा किलोमीटर अंतरावर आहे.

9)Sindpuri Buddha Vihar-

सिंधपुरी बौद्ध विहार हे ठिकाण भंडारा जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेला हा बौद्ध विहार अतिशय रमणीय आणि शांतताप्रिय आहे. इथे आपल्याला बुद्धांच्या अनेक प्रकारच्या मुद्रा पहावयास भेटतात. तसेच येथील परिसरात बुद्धांच्या मुर्त्या पहावयास भेटतात. हा बौद्ध विहार जापानी बांधकाम पद्धतीचा आहे. हा सुंदर बौद्ध विहार भारत आणि जपान या दोन देशांच्या मैत्रीचे प्रतीक मानले जातो. देशातील कानाकोपऱ्यातून विहाराला भेट देण्यासाठी बौद्ध व त्यांचे अनुयायी येतात.
भंडारा शहरापासून हे ठिकाण 44 किलोमीटर अंतरावर आहे.

10)Ambagad Fort –

आंबागड किल्ला हा भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात आहे. तुमसर तालुक्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर सातपुडा पर्वतरांगेमध्ये एका डोंगरावर हा किल्ला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवर्षी या गडावर यात्रा भरते. हा किल्ला जवळजवळ चार एकर परिसरात आहे. हा किल्ला गिरीदुर्ग असून अंबागड गावाच्या पायथ्या पासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची 1490 मिटर एवढी आहे.

11)chandpur Hanuman Mandir-

चांदपूर येथे असलेले भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील हनुमान मंदिर हे प्रसिद्ध ठिकाण आहे. येथील मंदिर परिसर निसर्गरम्य असून हे एक मोठा जलाशय आहे. मंदिरात देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक भेट देतात. महानायकअमिताभ बच्चन ने देखील या मंदिराला भेट दिली आहे. चांदपूर चे हे ग्रामदैवत आहे.येथील हनुमानाची मूर्ती आठ फूटी असून गरुड मुखीआहे. या मंदिराचा चारशे वर्षाचा इतिहास सांगितला जातो. शनिवारी आणि मंगळवारी भाविक येथे मोठ्या प्रमाणात येतात. सातपुडा पर्वतरांगाच्या पायथ्याशी हे देवस्थान असून घनदाट जंगलात आहे. हनुमान जन्मोत्सव इथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

12)Buddhist Stupa, Pauni-

पवनी बौद्ध स्तूप हे महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या उजव्या तीरावर वसलेल्या पवनी गावातील प्राचीन ऐतिहासिक, पुरातत्त्वीय आणि बौद्ध वारसा स्थळ आहे. पवनी येथील पुरावशेषांचा शोध 1879 मध्ये हेन्री कझिन्स यांनी लावला. त्यानंतर 1970 मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) आणि नागपूर विद्यापीठ यांनी संयुक्तपणे येथे मोठे उत्खनन केले. येथे तीन प्रमुख टेकड्या आहेत, त्यामध्ये जगन्नाथ टेकडी चांडकापूर (सुलेमान) टेकडी आणि हरदोलाला टेकडी स्तूप.

या प्राचीन स्तूपाच्या अवशेषांवरच नंतरच्या काळात ‘जगन्नाथ मंदिर’ बांधले गेले. पवनी परिसरात प्राचीन किल्ल्याचे अवशेष आणि 150 पेक्षा जास्त मंदिरे असल्यामुळे याला ‘विदर्भाची काशी’ असेही म्हणतात. पवनी उत्खननात सापडलेली मौल्यवान शिल्पे, नाणी, आणि लेख सध्या नॅशनल म्युझियम (नवी दिल्ली), मुंबई आणि नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आली आहेत.

13) Hanuman Temple, Charbhatti –

हनुमान मंदिर हे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील चारभट्टी (पुयार) येथील संपूर्ण विदर्भ प्रांतात प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान आहे. हे ठिकाण निसर्गरम्य वातावरणात असून येथे भाविकांची मोठी गर्दी असते. या मंदिरातील हनुमान जी अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे मानले जातात. या मंदिराचे वाढते महत्त्व आणि भाविकांची गर्दी लक्षात घेता, स्थानिक लोकप्रतिनिधींकडून या क्षेत्राचा राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागामध्ये समावेश करण्याची मागणी केली जात आहे. हे मंदिर आजूबाजूला हिरवेगार निसर्ग, झाडे आणि शांत वातावरणाने वेढलेले आहे, ज्यामुळे येथे येणाऱ्या भक्तांना मानसिक शांतता मिळते. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी येथे खूप मोठा उत्सव साजरा केला जातो.

14)Pande Mahal-

पांडे महाल हा महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यातील, संताजी नगर येथील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक राजवाडा आहे. या भव्य महालाची पायाभरणी नागपूरकर भोसल्यांचे सावकार कमिशनर रायबहादूर यादोराव (यादवराव) पांडे यांनी केली होती. हा महाल पूर्ण होण्यासाठी तब्बल 20 वर्षे लागली इ.स. 1896 मध्ये याचे बांधकाम पूर्ण झाले. पांडे महाल हा ‘डेक्कनी वाडा’शैलीतील स्थापत्यकलेचा एक अनोखा चमत्कार आहे. हा महाल सुमारे 60,000 चौरस फूट परिसरात पसरलेला असून या राजवाड्यात 200 पेक्षा जास्त खोल्या, भव्य दिवाणखाने, एक सुंदर नृत्य सभागृह आणि एक भव्य देवघर आहे.

या महालाचे मुख्य प्रवेशद्वार विस्तीर्ण आणि उंच असल्यामुळे त्यातून अंबाडी ठेवलेला हत्ती सहज आत जाऊ शकत होता. महालाच्या आत काचेचे भव्य आरसे, विलोभनीय झुंबर, इटालियन संगमरवरी (मार्बल) टाईल्स आणि सुंदर नक्षीकाम केलेले फवारे वापरण्यात आले होते. हा महाल राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आला होता, परंतु पुढे काही तांत्रिक कारणांमुळे आणि वारसांच्या दुर्लक्षामुळे 2017 मध्ये या या महालाची विक्री झाली.

15)Sangadi / Sahangad Fort-

सानगडी किंवा सहानगड किल्ला हा भंडारा जिल्ह्यातील, साकोली तालुक्यातील ऐतिहासिक किल्ला आहे. नागपूरचे राजे रघूजी भोसले यांनी इ.स. 1734 मध्ये या किल्ल्याची उभारणी केली होती. हा किल्ला सानगडी गावाबाहेर एका तलावाच्या काठावर, लहान उंचवट्यावर असून ‘सान’ म्हणजे लहान आणि ‘गडी’ म्हणजे किल्ला. या लहान गढीवजा किल्ल्यावरूनच गावाला ‘सानगडी’ हे नाव मिळाले आहे. हा किल्ला अडीच एकर परिसरात पसरलेला आहे. आणि या गडावर 11 फूट लांबीची एक प्राचीन तोफ आहे.

येथील नागरिक या तोफेची ‘तोफेश्वरी देवी’ म्हणून पूजा करतात. तसेच मुख्य प्रवेशद्वाराच्या काही अंतरावर एक वास्तू आहे, ज्याला ‘रंगमहाल’ असे म्हटले जाते. या किल्ल्याच्या परिसरात दगडी बांधकामाच्या बाहुली विहिरी (पायऱ्यांच्या विहिरी) आहेत. ज्यामध्ये राहण्यासाठी आणि गुप्त खलबते करण्यासाठी खोल्यांची सोय केलेली होती. या किल्ल्यासोबतच सानगडी गावात 21 हनुमान मंदिरे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर आणि समर्थ रामदास स्वामींचा प्राचीन मठ आहे.

16)Shree Bhrishund Ganesh Temple-

श्री भृशुंड गणेश मंदिर हे भंडारा जिल्ह्यातील प्राचीन, भव्य आणि जागृत देवस्थान आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीत बांधलेल्या या मंदिराला विदर्भातील अष्टविनायकांमध्ये महत्त्वाचे स्थान असून हे मंदिर भंडारा शहरात वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या ‘मेंढा’ या भागात आहे. स्थानिक लोक या गणपतीला ‘मेंढ्याचा गणपती’ म्हणूनही ओळखतात. येथील गणेशाची मूर्ती लाल रंगाच्या शिळेवर कोरलेली असून 8 फूट उंच आणि 4 फूट रुंद आहे. ही मूर्ती सिंदूरचर्चित असून चतुर्भुज आहे. त्यांच्या हातांमध्ये पाश, अंकुश, मोदक आहेत आणि एक हात वरदहस्त आहे. व गणेशाच्या शिरोभागावर पंचमुखी शेषफणा कोरलेला आहे.

आणि ही मूर्ती मूषकराज (उंदीर) वर विराजमान आहे. श्री चक्रधर स्वामी यांनी इ.स. 1144 मध्ये या ठिकाणाला भेट दिली होती, असा उल्लेख आढळतो. मंदिराच्या गाभाऱ्यात एक प्राचीन शिवलिंग आणि नंदी आहे. हे विदर्भातील एक ‘जागृत देवस्थान’ असून या गणेशाच्या दर्शनाने भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. दर महिन्याला संकष्टी चतुर्थी आणि विनायकी चतुर्थीला येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात.

17)Shri Mahadev Temple & Ziri Waterfall-

झिरी धबधबा हा महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यातील नांदोरा येथील कवाडशी गावाजवळ निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण आहे. हा धबधबा झिरी येथील महादेवाच्या पहाडीवर (टेकडीवर) निसर्गरम्य वातावरणात तयार होतो आणि हा वर्षभर वाहणारा धबधबा नसून, पावसाळ्यात मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतरच हा धबधबा प्रवाहित होतो. धबधब्याच्या जवळच महादेवाचे एक अतिशय शांत आणि सुंदर मंदिर आहे. धबधबा पाहण्यासोबतच लोक येथे दर्शनासाठी येतात. हा नयनरम्य धबधबा भंडारा शहरापासून जवळच एका डोंगराळ भागात वसलेला आहे.

18)Shree Chaitanyeshwar Temple, Ambhora-

श्री क्षेत्र चैतन्येश्वर महादेव मंदिर आंभोरा हे विदर्भातील एक अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे. आंभोरा हे देवस्थान वैनगंगा, कन्हान, आम, कोलारी आणि मुर्जा या पाच नद्यांच्या विहंगम संगमावर वसलेले असून नागपूर व भंडारा जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. या नद्यांच्या विस्तीर्ण पात्राशेजारीच ब्रह्मगिरी पर्वत आहे. पौराणिक कथेनुसार, श्री हरीनाथ महाराजांनी येथे 12 वर्षे तपश्चर्या केली होती. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिव स्वयंभू यज्ञकुंडातून प्रकट झाले, जे आज ‘श्री चैतन्येश्वर महादेव’ म्हणून पूजले जातात. या पवित्र परिसरात श्री हरीनाथ महाराज आणि त्यांचे शिष्य श्रीरामचंद्र महाराज यांच्या संजीवन समाधी आहेत.

तसेच नेपाळच्या राजाच्या पुत्राची आणि स्वामी रंगलालजी नागदा यांचीही समाधी येथे पाहायला मिळते. सध्या येथे आंभोरा केबल-स्टेड ब्रिज पूल वैनगंगा नदीवर बांधण्यात आला आहे. येथून पाच नद्यांचा संगम, आजूबाजूची दाट झाडी आणि विहंगम सूर्यास्त अतिशय सुंदर दिसतो. आणि नदी पात्रातून होडीने प्रवास करणे हा पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरतो.श्रावण महिन्यात येथे शिवभक्तांची अलोट गर्दी असते.

19)Chandpur Dam-

चांदपूर धरण हे महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील, तुमसर तालुक्यात, सिहोरा गावाजवळ सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. हे धरण दोन डोंगरांच्या रांगांमध्ये एक मोठी भिंत बांधून हा विस्तीर्ण जलाशय तयार करण्यात आला आहे. हा धरण परिसर घनदाट जंगलाने आणि हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेला असल्यामुळे याला ‘ग्रीन व्हॅली चांदपूर’ किंवा भंडारा जिल्ह्याचे ‘नंदनवन’ म्हणून ओळखले जाते. हे एक सिंचन धरण असून, याच्या पाण्याचा वापर तुमसर तालुक्यातील शेतकरी भातशेतीसाठी आणि पिण्याचे पाणीसाठी करतात. या जलाशयाचा पाणी सोडण्याचा मुख्य दरवाजा ब्रिटीशकालीन असून धरणाच्या भिंतीवरून सभोवतालच्या डोंगरांचे आणि पाण्याचे विहंगम दृश्य दिसते. धरणाजवळच सातपुडा पर्वताच्या टेकडीवर प्रसिद्ध आणि भव्य हनुमानजींचे मंदिर आहे, जिथे दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात.

Visit the travel blog

1)चांदपूर हनुमान मंदिर भंडारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?

चांदपूर हनुमान मंदिर भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात आहे ?

2)गोसेखुर्द धरण भंडाऱ्यापासून किती किलोमीटर अंतरावर आहे ?

गोसेखुर्द धरण भंडाऱ्यापासून 41 किलोमीटर अंतरावर आहे ?

3)कोका वन्यजीव अभयारण्य किती क्षेत्रात पसरले आहे ?

कोका वन्यजीव अभयारण्य 92.34 क्षेत्रात पसरले आहे ?

1 thought on “भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे-Top 19 places to visit in Bhandara District”

  1. I know this if off topic but I’m looking into starting my own blog and was wondering
    what all is required to get set up? I’m assuming having a blog like
    yours would cost a pretty penny? I’m not very web savvy so I’m not 100% sure.
    Any recommendations or advice would be greatly appreciated.
    Thanks

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top