भंडारा जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे-Top 11 places to visit in Bhandara

भंडारा जिल्हा हा महाराष्ट्रातील प्रशासकीय जिल्हा म्हणून ओळखला जातो. हा जिल्हा मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहे.1 मे 1999 रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन झाले व गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. पूर्वी भंडारा जिल्ह्याचे नाव भाणारा असे होते.जिल्ह्याचे मुख्यालय भंडारा येथे असून जिल्ह्याचे क्षेत्रफळ3717 चौरस कि.मी.आहे.Top 11 places to visit in Bhandara

भंडारा जिल्हा वैनगंगा नदीच्या खोऱ्यात असून या जिल्ह्याची वैनगंगा हे प्रमुख नदी आहे. या नदीचे पात्र उन्हाळ्यात देखील कोरडे पडत नाही. भंडारा जिल्ह्यामध्ये सात तालुके आहेत. भंडारा येथे भात संशोधन केंद्र आहे.
येथील अर्थव्यवस्था मुख्यत्वे शेती, उद्योग आणि वनस्पतींवर अवलंबून आहे. भंडारा जिल्हा हा तांदळाचे मोठे उत्पादन घेणारा जिल्हा आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर या ठिकाणी तांदळाची मोठी बाजारपेठ आहे.

तसेच या जिल्ह्याला “पितळ शहर’ म्हणून देखील ओळखले जाते. कारण या ठिकाणी पितळ उत्पादनाचे वेगवेगळे कारखाने आणि उद्योग चालतात. या जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळे आहेत. हा जिल्हा तलावांसाठी आणि सुगंधी तांदळासाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्याला तलावाचा जिल्हा म्हणून देखील ओळखले जाते. तसेच या जिल्ह्यात खनिज साठा भरपूर प्रमाणात मिळतो. या जिल्ह्यामध्ये रेशीम उद्योग केला जातो. तसेच सैन्य दलात लागणारा शस्त्रसाठा येथे बनवला जातो. तेच येथील डोंगरामध्ये गोंड व हळबी आदिवासी जमाती आहेत.Top 11 places to visit in Bhandara

Top 11 places to visit in Bhandara

भंडारा जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे-


1) गायमुख देवस्थान-


Top 11 places to visit in Bhandara

भंडारा जिल्ह्यातील Gaymukh devsthan ठिकाण सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असून तुमसर तालुक्यात आहे. येथे शंभू महादेवाचे विलोभनीय मंदिर असून डोंगर घळीतून येणारे पाणी वर्षभर गायमुखातून पडत असते म्हणून या मंदिराला गायमुख देवस्थान म्हणून ओळखले जाते. मंदिर परिसरात घनदाट जंगल आहे. महाशिवरात्रीच्या वेळी या ठिकाणी अकरा दिवस मोठी यात्रा भरते. भंडाऱ्यापासून साधारणता 54 किलोमीटर अंतरावर गायमुख हे देवस्थान आहे.

2) उमरेड कऱ्हांडला अभयारण्य-


भंडारा जिल्ह्यातील Umred karhandla Sanctuary पैनगंगा नदी व ताडोबा अभयारण्याच्या जवळ आहे.
या अभयारण्यामध्ये दुर्मिळ जातीचे वन्यजीव प्राणी आढळतात. भंडारापासून हे अभयारण्य 60 किलोमीटर अंतरावर आहे. हे अभयारण्य 189 किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. इथे येणारे पर्यटक वन्यजीव सफारी व क्षी निरीक्षणाचा आनंद घेऊ शकतात.

3) पवनी किल्ला-


पवनी तालुक्यातील Pavani fort हे ठिकाण पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे. पवनी शहराच्या एका बाजूला वैनगंगा नदी वाहते तर तीन बाजूंना टेकड्या आहेत. यातील एका टेकडीवर पवन राजांचा हा किल्ला बांधलेला आहे. या किल्ल्याचा बराच भाग अजून सुस्थितीत आहे. पवनी शहराचे मुख्य रस्त्याचे प्रवेशद्वार या किल्ल्यातूनच जाते. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला पवणी तलाव येना जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतो. पवनी किल्ल्यावरून या गावाला पवनी हे नाव देण्यात आले. हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारात येत असून भंडारा जिल्हा पासून 47 किलोमीटर अंतरावर आहे.

4) चौंडेश्वरी देवी मंदिर-


भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे असलेले Choundeshwari devi temple एक जागृत प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. मोहाडी गावातील आणि विदर्भातील भाविकांचे हे आराध्य दैवत आहे. विशेष म्हणजे हे मंदिर गायमुख नदीच्या काठावर वसलेले असून देवीची मूर्ती मोठी आहे. यामध्ये देवीचे फक्त तोंडच दिसते बाकी शरीराचा भाग जमिनीत आहे. हे शारदीय नवरात्र महोत्सवाच्या काळात महाराष्ट्रातूनच नव्हे तर मध्यप्रदेश मधूनही भाविक येऊन (ज्योती कलश)घटस्थापना करतात. चौंडेश्वरी देवीचे मंदिर भंडाऱ्यापासून फक्त वीस किलोमीटर अंतरावर आहे.

5) कोका वन्यजीव अभयारण्य-


भंडारा जिल्ह्यातील Koka vanyajiv Sanctuary 92.34 एवढ्या चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. 18 जुलै 2013 ला सरकारकडून या वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा मिळाला आहे. हे अभयारण्य नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे. हे अभयारण्य भंडाऱ्यापासून केवळ 20 किलोमीटर अंतरावर आहे. या अभयारण्यामध्ये वाघ, बिबटे,चित्ता, हरीण,सांभार,लांडगा,ससे कोल्हे,गोरस अशा अनेक प्रकारचे वन्यप्राणी आढळून येतात. नागपूर पासून हे अभयारण्य 60 किलोमीटर अंतरावर असून अभयारण्याला भेट देण्यासाठी येथून ट्रेन,बसची सोय आहे.

Please visit our website: Allindiajourney.com

6) गोसेखुर्द धरण-

Gosekhurd Dam नागपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले असून पवनी गावाजवळ आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाला इंदिरासागर धरण म्हणून ही ओळखले जाते विदर्भातील हे सर्वात मोठे धरण आहे. भंडारा पासून हे धरण 41 किलोमीटर अंतरावर आहे.

चंद्रपूर,नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील शेतीसाठी या धरणातील पाण्याचा सिंचनासाठी उपयोग केला जातो. या धरण परिसरातील परिसर अत्यंत निसर्गरम्य आणि विलोभनीय आहे. तसेच या धरणातून जलविद्युत निर्मिती देखील केली जाते. या धरणाची उंची 74 फूट असून लांबी सुमारे 37,257 फूट एवढी आहे. पावसाळ्यात येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात

7) रावणवाडी धरण-


भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुक्यात रावणवाडी हे गाव असून धारगाव पासून येथे जाण्यासाठी रस्ता आहे.
रावण वाडी गावाजवळRavanvadi Dam हे धरण आहे. या धरणाच्या आजूबाजूचा परिसर हा जंगलाचा असून हे एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. हे धरण 1960 मध्ये बांधले गेले. या धरणाची लांबी 96 मीटर असून उंची 12.44 एवढी आहे. तसेच या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 6.9 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. भंडार्यापासून हे धरण वीस किलोमीटर अंतरावर आहे.

8) कोरंभी मंदिर-


भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या तीरावर कोरंभी हे गाव वसलेले आहे.कोरंभी टेकडीवर हे कोरंभी मातेचे धार्मिक स्थळ आहे. Korambhi mata templeहे मंदिर 800 वर्षांपूर्वी बांधलेले असून हेमाडपंथी शैलीचे आहे. नवरात्री मध्ये येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. देवीची मूर्ती साडेपाच फूट उंचीची आहे. ही देवी नवसाला पावणारी आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. भंडारा जिल्ह्यापासून कोरंभी मातेचे मंदिर सहा किलोमीटर अंतरावर आहे.

9) सिंधपुरी बौद्ध विहार-


Sindhpuri buddha vihar ठिकाण भंडारा जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेला हा बौद्ध विहार अतिशय रमणीय आणि शांतताप्रिय आहे. इथे आपल्याला बुद्धांच्या अनेक प्रकारच्या मुद्रा पहावयास भेटतात. तसेच येथील परिसरात बुद्धांच्या मुर्त्या पहावयास भेटतात. हा बौद्ध विहार जापानी बांधकाम पद्धतीचा आहे. हा सुंदर बौद्ध विहार भारत आणि जपान या दोन देशांच्या मैत्रीचे प्रतीक मानले जातो. देशातील कानाकोपऱ्यातून विहाराला भेट देण्यासाठी बौद्ध व त्यांचे अनुयायी येतात.
भंडारा शहरापासून हे ठिकाण 44 किलोमीटर अंतरावर आहे.

10) आंबागड किल्ला-


Ambagadh fort हा भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात आहे. तुमसर तालुक्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर सातपुडा पर्वतरांगेमध्ये एका डोंगरावर हा किल्ला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवर्षी या गडावर यात्रा भरते. हा किल्ला जवळजवळ चार एकर परिसरात आहे. हा किल्ला गिरीदुर्ग असून अंबागड गावाच्या पायथ्या पासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची 1490 मिटर एवढी आहे.

11) चांदपूर हनुमान मंदिर-


Chandpur येथे असलेले भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील हनुमानमंदिर हे प्रसिद्ध ठिकाण आहे. येथील मंदिर परिसर निसर्गरम्य असून हे एक मोठा जलाशय आहे. मंदिरात देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक भेट देतात. महानायकअमिताभ बच्चन ने देखील या मंदिराला भेट दिली आहे. चांदपूर चे हे ग्रामदैवत आहे.

येथील हनुमानाची मूर्ती आठ फूटी असून गरुड मुखीआहे. या मंदिराचा चारशे वर्षाचा इतिहास सांगितला जातो. शनिवारी आणि मंगळवारी भाविक येथे मोठ्या प्रमाणात येतात. सातपुडा पर्वतरांगाच्या पायथ्याशी हे देवस्थान असून घनदाट जंगलात आहे. हनुमान जन्मोत्सव इथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

1)चांदपूर हनुमान मंदिर भंडारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?

चांदपूर हनुमान मंदिर भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात आहे ?

2)गोसेखुर्द धरण भंडाऱ्यापासून किती किलोमीटर अंतरावर आहे ?

गोसेखुर्द धरण भंडाऱ्यापासून 41 किलोमीटर अंतरावर आहे ?

3)कोका वन्यजीव अभयारण्य किती क्षेत्रात पसरले आहे ?

कोका वन्यजीव अभयारण्य 92.34 क्षेत्रात पसरले आहे ?

1 thought on “भंडारा जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे-Top 11 places to visit in Bhandara”

  1. I know this if off topic but I’m looking into starting my own blog and was wondering
    what all is required to get set up? I’m assuming having a blog like
    yours would cost a pretty penny? I’m not very web savvy so I’m not 100% sure.
    Any recommendations or advice would be greatly appreciated.
    Thanks

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top