अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे-Top 27 places to visit in Amaravati District

भारतभ्रमंती या वेबसाईटवर पहा भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे. महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे.अमरावती हे महाराष्ट्रातील विदर्भ प्रदेशातील एक शहर असून त्याचे मूळ नाव उमरावती असे आहे. विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून अमरावतीची ओळख आहे. तसेच अमरावतीला शिक्षणाचे माहेरघर ही म्हटले जाते. प्रशासनाने अमरावतीचे दोन भाग केलेले असून एक म्हणजे नागपूर आणि दुसरे अमरावती. Top 27 places to visit in Amaravati District

अमरावती हे महाराष्ट्रातील जास्त लोकसंख्या असलेल्या महानगरक्षेत्रामध्ये सातव्या क्रमांकावर आहे. अमरावती जिल्हा हा प्रशासकीय विभागाचे मुख्यालय आहे. अमरावती शहरात अनेक ऐतिहासिक मंदिरे आहेत.महाराष्ट्राच्या पुर्व भागात अमरावती जिल्हा येतो अमरावती जिल्ह्याची सर्वात जास्त सीमा मध्यप्रदेशला लागून आहे. अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वत हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांचा सीमावरती प्रदेश आहे.

Top 27 places to visit in Amaravati District

अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे

1)Shree Ambadevi Temple-

Top 27 places to visit in Amaravati District

श्री अंबादेवी मंदिर हे मंदिर अमरावती मधील गांधी चौकात असून महाराष्ट्रातील सर्वात जुन्या मंदिरांमध्ये या मंदिराचा समावेश केला जातो. देशाच्या कानाकोपऱ्यातून या मंदिरात भाविक येत असतात. नवरात्रीमध्ये येथे खूप मोठा उत्सव असतो. काही भाविक अनवाणी पायाने देवीच्या दर्शनाला येतात. अमरावती स्थानकापासून हे मंदिर दीड किलोमीटर अंतरावर आहे. देवी ही विदर्भाची कुलदेवता आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील प्राचीन शक्तीपीठापैकी एक आहे. 90 तोळ्यांचा अंबामातेचा सोन्याचा मुलामा असलेला चांदीचा मुखवटा 1905 मध्ये बनवला गेला. आंबा मातेचे मंदिर जागृत देवस्थान मानले जाते.

2) Bhimkund Waterfall-

भीमकुंड धबधबा हा अमरावती शहरातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. मेळघाटातील हा सर्वात उंच व आकर्षक धबधबा असल्यामुळे येथे पर्यटक जास्त आकर्षित होतात. अमरावती जिल्ह्यातील हा धबधबा चिखलदरापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. हा धबधबा 3500 मीटर एवढ्या उंचीवरून दरीत कोसळतो. पावसाळ्यात या धबधब्यावर प्रचंड गर्दी असते. इतरवेळी संथपणे वाहणारा हा धबधबा पावसाळ्यात मात्र रौद्ररूप घेतो. जेथून धबधबा कोसळतो तेथून खालील मागील भागात काळाशार दगडात खोल कुंड आहे.

3) Devi Point-

देवी पॉईंट हे चिखलदऱ्याजवळील अत्यंत निसर्गरम्य ठिकाण आहे. तसेच हे ठिकाण अमरावती शहरापासून साधारणता 84 किलोमीटर अंतरावर आहे. टेकडीवर असलेले हे ठिकाण अत्यंत सुंदर व रमणीय आहे. मेळघाटातील संपूर्ण अभयारण्य येथून पाहता येते. येथील डोंगरातून चंद्रभागा नदी वाहते. ही नदी बिंदू पर्वताजवळ आहे. हे ठिकाण उंच डोंगरावर असल्यामुळे याला देवी पॉईंट हे नाव देण्यात आले आहे. तसेच या मंदिरापासून अमरावतीचा पडका किल्ला दिसतो.

4)Gugamal National Park-


गुगामल राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात आहे. वाघांसाठी हे उद्यान आरक्षित करण्यात आले आहे. येथे असणारे हिरवेगार गवत धबधबे तलाव आणि येथील शांत व थंडगार वातावरण यामुळे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. येथील सुमारे 1700 वर्ग कि. मी. चे क्षेत्र वाघांसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये असणाऱ्या या उद्यानापासून मेळघाट,वाण, आंबा बरवा आणि नरनाळा ही अभयारण्य काही किलोमीटर अंतरावर आहेत. गुगामल राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1974 मध्ये झाली. हे उद्यान मेळघाट राखीव जंगलाचा भाग असून येथे वाघाची संख्या खूप आहे. 1987 मध्ये या ठिकाणाला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. हे उद्यान सातपुडा डोंगरात आणि अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा या तालुक्यात पसरलेले आहे.

5)Bamboo Garden-


बांबू गार्डन हे अमरावतीतील जुन्या बायपास रोडवर वडाळी येथे असलेले प्रसिद्ध ठिकाण आहे. बांबू गार्डन ची स्थापना 2017 मध्ये केली. येथील आकर्षण म्हणजे येथे असलेले वेगवेगळे प्रकारचे बांबू. तसेच येथील निसर्ग रम्य वातावरण आणि हिरवळीने दाटलेला परिसर मनमोहून टाकतो.येथे आपल्याला बांबूच्या विविध प्रजाती बघायला भेटतात. तसेच येथे आपल्याला बांबूच्या झोपड्या, बांबूचे पुल पहावयास भेटतात. आणि येथे मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी व रायडस आहेत. बांबू उद्यान हे ठिकाण अमरावती शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे.

6)Chikhaldara Hill Station-


चिखलदरा हिल स्टेशन हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रमुख हिल स्टेशनमध्ये येते. निसर्गाने आणि हिरवाईने नटलेले हे समृद्ध ठिकाण पाहण्यासारखे आहे. सातपुडा पर्वत रांगेतील हे अत्यंत थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणी आपल्याला उंच डोंगर,खोल दऱ्या, थंड हवा आणि हिरवीगार झाडे पहावयास भेटतात.येथील हवामान नेहमी थंड आणि आरोग्यदायी असते. हे ठिकाण 1118 मीटर उंचीवर असून निसर्गाने बहरलेले आहे. तसेच महाराष्ट्रातील चिखलदरा हे कॉफी उत्पादनाचे एकमेव ठिकाण आहे.इथे असणारे धबधबे, सरोवरे पर्यटकांना आकर्षित करतात. येथील विलोभनीय सौंदर्य पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येतात.

7) Shri Bhaktidham Temple-


भक्तीधाम मंदिर हे अमरावती जिल्ह्यातील खूप भव्य असून राधा कृष्णाचे मंदिर आहे. अमरावती जिल्ह्यातील हे एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे. मंदिरामध्ये राधा आणि कृष्णाच्या संगमरवरी दगडामध्ये घडविलेल्या सुंदर मूर्ती आहेत. तसेच या मंदिराच्या पाठीमागे एक पार्क असून लहान मुलांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. या मंदिराला भेट देण्यासाठी हजारो भाविक वर्षभर येत असतात. अमरावती बस स्थानकापासून हे मंदिर 28 किलोमीटर अंतरावर आहे.

8)Ekvira Devi Temple-


एकवीरा देवी मंदिर हे अमरावती मधील अंबादेवी मंदिराजवळ आहे. एकवीरा देवीचे मंदिर खूप जुने असून या देवीला रेणुका मातेचे स्वरूप मानले जाते. 1907 मध्ये परमहंस जनार्दन स्वामी यांच्या मुलाने हे मंदिर बांधले. या देवीचे स्थान शक्ती स्वरूप आहे. बाराही महिने लाखो भाविक येथे श्रद्धेने येतात. अमरावती बस स्थानकापासून हे मंदिर दहा किलोमीटर अंतरावर आहे.

Visit our website: Allindiajourney.com

9) Gavilgad Fort-


गावीलगड किल्ला अमरावती मधील चिखलदरा हिल स्टेशन जवळ असून तो तीनशे वर्ष जुना आहे. तसेच या किल्ल्याच्या भिंतीवर उर्दू, हिंदी, व अरबी भाषेचे कोरीव काम केलेले आहे. तसेच हत्ती, घोडा, उंट या प्राण्यांचे चित्र रेखाटण्यात आलेले आहे. हा किल्ला गिरीदुर्ग म्हणून संबोधला जातो. चिखलदऱ्यापासून हा किल्ला तीन किलोमीटर अंतरावर आहे.

10) Melghat Tiger Reserve-


मेळघाट अभयारण्य महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पामधील एक महत्त्वाचे अभयारण्य आहे. हे अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध असून इथे भरपूर प्रमाणात सागाची झाडे आहेत. 1974 मध्ये या अभयारण्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. मेळघाटच्या या अभयारण्यामध्ये बिबटे, पट्टेवाले वाघ, गवे, रानडुक्कर, सांबर, अस्वल,कोल्हे, लांडगे असे अनेक प्रकारचे जंगली प्राणी पाहावयास भेटतात. हे अभयारण्य 788 किलोमीटर एवढ्या विस्तृत प्रमाणात पसरलेले आहे. अमरावती शहरापासून हे ठिकाण शंभर किलोमीटर अंतरावर आहे.

11) Panchbol Point –

पंचबोल पॉईंट हे सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेला एक अद्भुत गोष्ट म्हणावी लागेल. कारण या पॉइंटवर आपण मोठ्याने आवाज दिला तर तो आपल्याला पाच वेळा प्रतिध्वनी ऐकायला येतो. त्यामुळे या पॉईंटला पंचगोल पॉईंट असे नाव दिले आहे. तसेच या पॉईंटला इको पॉइंट देखील म्हणतात. येथील निसर्ग अक्षरशः डोळ्याचे पारणे फेडणार आहे. या ठिकाणी आपल्याला कॉफीचे मळे आणि दूरवर पसरलेले जंगल पहायला मिळते.

12) Chatri talao-

छत्री तलाव हा अमरावती शहराजवळ मालखेड रोडवर ब्रिटिशकालीन तलाव आजही अस्तित्वात आहे. येथील लोक या तलावाला शहराचे जलदेवता असे म्हणतात. या तलावामुळे आजूबाजूच्या परिसरातील पाण्याचे पातळी व्यवस्थित राखली गेली आहे. व लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. इ.सन 1888 पर्यंत अमरावती शहराला खाजगी आणि विहिरीतून पाणीपुरवठा होत होता. 1888 साली दोन लाख 36 हजार रुपये खर्च करून हा तलाव बांधण्यात आला. या तलावाला पूर्वी लोक कालापाणी तलाव असे देखील म्हणत. तलाव बांधल्यानंतर काही वर्षांनी येथे छत्रीही बांधण्यात आली त्यामुळे या तलावाला छत्रीतलाव असे म्हटले जाऊ लागले. या तलावामध्ये अनेक जलचर प्राणी असून येथे विविध प्रकारचे पक्षीही पहावयास भेटतात. अमरावती मधील हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.

13)Shree Anandeshwar Temple-

श्री आनंदेश्वर मंदिर हे अमरावती जिल्ह्यातील, दर्यापूर तालुक्यात लासूर गावी पूर्णा नदीच्या काठावर वसलेले हेमाडपंथी शिवमंदिर आहे. 13 व्या शतकातील हे मंदिर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असून ‘स्वर्ग मंडप’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, बारा खांबांच्या उघड्या सभामंडपासाठी प्रसिद्ध आहे. आणि मंडपावर छत नाही, ज्यामुळे आकाशाचे दृश्य दिसते. या मंदिराची रचना त्रिकुटाचाल पद्धतीची आहे, ज्यामध्ये उत्तर, दक्षिण आणि पश्चिमेला प्रत्येकी एक अशी तीन देवस्थाने आहेत. हे मंदिर देवगिरीच्या यादवांचा राजा रामचंद्र यांच्या काळात बांधले असल्याचे सांगितले जाते. मंदिराचा आकार अष्टकोनी असून ते एका उंच चौथऱ्यावर बांधलेले आहे. तसेच मंदिराच्या भिंतींवर यक्ष, अप्सरा, ऋषी आणि हिंदू देवतांची सुंदर शिल्पे आहेत.

14)Wadali Lake-

वडाळी तलाव हा अमरावती जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि जलाशय आहे. हा तलाव इंग्रज शासकांनी 1889 मध्ये बांधला होता. हा तलाव बांधण्याचा मुख्य उद्देश म्हणजे दक्षिण टेकड्यांवरून वाहणारे पावसाचे पाणी अडवण्यासाठी आणि शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे हा होता. पर्यटकांसाठी येथे पेडल बोट आणि मोटर बोटची सुविधा आहे. तसेच तलावाला लागूनच एक सुंदर बाग आणि देशातील विविध प्रजाती असलेल्या बांबू गार्डनचा परिसर आहे. याशिवाय येथे पार्कमध्ये मुलांसाठी टॉय ट्रेन 3-डी चित्रपट गृह आणि विविध राईड्स आहेत. तलावाजवळ एक छोटे प्राणीसंग्रहालय आहे, जे पर्यटकांचे आकर्षण आहे.

15)Semadoh-

सेमाडोह हे महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याच्या चिखलदरा तालुक्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील एक प्रमुख पर्यटन केंद्र आणि निसर्गरम्य गाव आहे. हे गाव सिपना नदीच्या काठावर आणि दाट जंगलात वसलेले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे हे एक महत्त्वाचे केंद्र असून, येथे पर्यकांसाठी जंगल सफारीची सुविधा उपलब्ध आहे. या परिसरात वाघ, बिबट्या, अस्वल, सांबर आणि विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. वन विभागाचे येथे ‘सेमाडोह टुरिस्ट कॉम्प्लेक्स’ आहे. त्यामध्ये पर्यटकांना राहण्याची सोय आहे. तसेच येथे एक संग्रहालय आणि निसर्ग निर्वाचन केंद्र आहे. पर्यटक येथे ट्रेकिंग आणि हत्ती सफारीचा आनंद घेऊ शकतात. हिवाळ्यात या भागातील तापमान 4 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येते, ज्यामुळे गवतावर दवबिंदू गोठलेले दिसतात.

16)Satidham Mandir-

सतीधाम मंदिर हे अमरावती जिल्ह्यातील, रॅलीज प्लॉटवर (जयस्तंभ चौक जवळ) असलेले एक अत्यंत सुंदर आणि पवित्र धार्मिक स्थळ आहे. या मंदिराची स्थापना 10 जुलै 1975 रोजी मधुसूदन शिवचंद्राय झुनझुनवाला यांनी केली होती. या मंदिराची वास्तुकला पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या रथांप्रमाणे आहे व त्यावर तीन स्वतंत्र घुमट आहेत. तसेच मंदिराच्या भिंतींवर रामायण, महाभारत आणि पुराणांमधील कथांची रंगीबेरंगी चित्रे कोरलेली आहेत.

या मंदिराची प्रमुख देवता राणी सती दादीजी असून त्यांची मूर्ती मौल्यवान धातूने बनवलेली आहे. व मंदिर संकुलात राधा-कृष्ण, राम दरबार, गणेश, शिव परिवार, हनुमान, खातू श्याम बाबा आणि पितरेश्वर यांच्याही सुंदर मूर्ती आहेत. श्री राणीसती बसंत महोत्सव हा या मंदिरातील सर्वात मोठा उत्सव आहे. तसेच भादवा बडी महोत्सव, महाशिवरात्री, फागण महोत्सव हे उत्सव साजरे होतात.

17)Dharkhora Waterfall-

धारखोरा धबधबा हा अमरावती जिल्ह्यातील, मेळघाट (चिखलदरा) परिसरातील एक उंच आणि निसर्गरम्य भव्य धबधबा आहे. मेळघाटातील हा सर्वात उंच धबधबा असून याची उंची सुमारे 200 ते 300 फूट आहे. हा धबधबा तीन टप्प्यांत खाली कोसळतो.बिछन नदीचा उगम याच धबधब्यातून होतो, जी पुढे चंद्रभागा नदीला जाऊन मिळते. हा धबधबा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेवर आहे. प्रशासकीयदृष्ट्या याचा काही भाग मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात येतो. परतवाड्यापासून सुमारे 15-20 किमी अंतरावर असलेला हा धबधबा ट्रेकिंग आणि पिकनिकसाठी प्रसिद्ध आहे.

18)kolkas & Sipna River-

कोलकास हे अमरावती जिल्ह्यातील, चिखलदरा परिसरातील, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील एक प्रमुख निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले हे ठिकाण वन्यजीव प्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी नंदनवन मानले जाते. कोलकास हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सिपना नदीच्या काठी वसलेले असून सेमाडोहपासून हे सुमारे 13 किमी अंतरावर आहे. येथे सिपना नदीचा अत्यंत निसर्गरम्य विलोभनीय परिसर, दाट जंगल आणि सातपुड्याच्या डोंगररांगानी बहरलेला आहे. येथे वाघ, बिबट्या, अस्वल, रानगवा सांबर आणि विविध प्रकारचे पक्षी आणि सरपटणारे प्राणी पाहायला भेटतात. येथे वनविभागाचे ऐतिहासिक ‘कोलकाज विश्रामगृह’ हे सिपना नदीच्या काठावर एका उंच टेकडीवर असून तिथून जंगलाचा विलोभनीय देखावा दिसतो.

19)Shree Kondeshwar Mandir –

श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिर हे अमरावती जिल्ह्यातील गोविंदपूर येथील पोहरा जंगल आणि नयनरम्य टेकड्यांच्या कुशीत वसलेले अत्यंत प्राचीन आणि जागृत शिव मंदिर आहे. हे शिवमंदिर 5000 वर्षांपेक्षा जास्त जुने असून अत्यंत सुंदर प्राचीन हेमाडपंथी शैलीत, कोरीव काळ्या दगडांचा वापर करून बांधलेले आहे. आणि मंदिराच्या बाहेरील भिंतींवर हत्तींचे अत्यंत कलात्मक कोरीव काम केलेले आहे. माता पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी येथे सोमवार व्रताचे उद्यापन केले होते अशी आख्यायिका आहे. तसेच विदर्भ राजाने कौंडिण्य मुनींच्या आग्रहावरून येथे शिवलिंगाची स्थापना केल्याचे सांगितले जाते. या मंदिर परिसरात श्री खटेश्वर महाराजांची समाधी आणि पुरातन गणपती, हनुमान व गणेश मंदिरे आहेत. व मंदिराजवळ एक सुंदर तलाव आणि पावसाळ्यात वाहणारा धबधबा आहे.महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते.

20)Muktagiri-

मुक्तागिरी हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर, सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेले एक अतिशय नयनरम्य आणि पवित्र जैन तीर्थक्षेत्र आहे. हे क्षेत्र मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील भैंसदेही तालुक्यात येत असले, तरी अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरापासून ते फक्त 15 किमी अंतरावर आहे. या डोंगररांगांमध्ये एकूण 52 पांढरी शुभ्र संगमरवरी जैन मंदिरे आहेत. येथील 10 व्या क्रमांकाचे मंदिर हे सर्वात जुने आणि गुहेत वसलेले आहे. पावसाळ्यात येथील 10 व्या आणि 11 व्या मंदिराच्या मधून भव्य धबधबा कोसळतो. हे ठिकाण ‘मेंढागिरी’ नावानेही ओळखले जाते. असे सांगितले जाते की, या ठिकाणी साडेतीन कोटी मुनींना मोक्ष (मुक्ती) प्राप्त झाली, म्हणून याला ‘मुक्तागिरी’ हे नाव पडले आहे.

21)Ethnobotanical Notes from Pohara-Malkhed Reserve-

पोहरा-मालखेड राखीव वन क्षेत्र हे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पानंतर जिल्ह्यातील दुसरे महत्त्वाचे आणि जैवविविधतेने नटलेले मोठे वन क्षेत्र आहे. याला ‘अमरावती शहराचे फुफ्फुस’ असेही म्हटले जाते, कारण हे जंगल शहराच्या अगदी जवळ असून ऑक्सिजनचा मोठा पुरवठा करते. येथे पक्ष्यांच्या 290 पेक्षा जास्त प्रजातींची नोंद झाल्यामुळे याला ‘पक्ष्यांचे नंदनवन’ म्हटले जाते. तसेच या जंगलात बिबट्या, अस्वल, लांडगा, तरस, कोल्हा, रानगवा, हरिण, चितळ, काळवीट आणि नीलगाय यांसारखे प्राणी आढळतात. याशिवाय येथे वनस्पतींच्या 200 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. या जंगलात छत्री तलाव, वडाळी तलाव, पोहरा तलाव आणि मालखेड जलाशय यांसारखे महत्त्वाचे पाण्याचे स्रोत आहेत. आणि प्राचीन कोंडेश्वर शिव मंदिर पोहरा-मालखेड जंगलाच्या पायथ्याशी वसलेले आहे. हे जंगल अमरावती-चांदूर रेल्वे, कोंडेश्वर ते मार्डी मार्गावर विस्तारलेले असून यात वडाळी, पोहरा, मालखेड, चिरोडी, कोंडेश्वर, हातला या भागांचा समावेश आहे.

22)mahimapur, seven stories well-

सातमजली पायविहीर ही अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील महिमापूर गावातील 800 वर्षे जुनी व स्थापत्यकलेतील अत्यंत सुंदर अप्रतिम वास्तू आहे. या भव्य विहिरीची रचना एखाद्या भूमिगत राजवाड्यासारखी असून ही विहीर 14 व्या शतकातील यादवकालीन असल्याचे सांगितले जाते. या सातमजली विहिरीची जमिनीखालील खोली सुमारे 80 ते 100 फूट आहे. व विहिरीत उतरण्यासाठी 85 ते 88 प्रशस्त पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या मार्गावर किल्ल्यासारख्या भव्य दगडी कमानी आणि विश्रांतीसाठी टप्पे आहेत. विहिरीच्या आत तीन खोल्या आणि दालने आहेत, जिथे पूर्वी वास्तव्याची सोय होती.

या विहिरीच्या बांधकामात मध्यप्रदेशातून आणलेल्या तांबूस दगडाचा आणि स्थानिक काळ्या दगडाचा वापर करण्यात आला आहे. विहिरीच्या खालच्या बाजूला महिमामाई देवीचे एक छोटे मंदिर आहे, ज्यावरून गावाला ‘महिमापूर’ हे नाव पडल्याचे मानले जाते. पूर्वी या विहिरीत ‘बाबर’ नावाची वनस्पती होती, ज्यामुळे हे पाणी औषधी मानले जायचे. भारतीय टपाल विभागाने महाराष्ट्रातील 8 ऐतिहासिक पायविहिरींवर प्रसिद्ध केलेल्या पोस्टकार्डवर महिमापूरच्या या विहिरीचा समावेश आहे.

23)Salbardi-

सालबर्डी हे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात वसलेले एक प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेवर, सातपुडा पर्वत रांगांच्या कुशीत मदू नदीच्या काठी वसलेले आहे. येथे सातपुडा पर्वताच्या उंच टोकावर एक नैसर्गिक प्राचीन महादेव गुफा आहे, व या गुफेत सुमारे 1500 वर्षांपेक्षा जास्त जुने प्राचीन शिवलिंग आहे. आणि गुफेमध्ये सुमारे 100 फूट आत गेल्यानंतर हे शिवलिंग दिसते. तसेच येथील आश्चर्य म्हणजे येथे दोन नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत; ज्यातील एक झरा अतिशय थंड तर दुसरा कोमट पाण्याचा आहे. येथे बौद्ध धर्मातील हिनयान पंथातील प्राचीन बुद्ध लेणी आणि पाषाणयुगीन चित्रकारी आढळते, जी आदिम संस्कृतीचे दर्शन घडवते. दरवर्षी येथे महाशिवरात्रीला आठवडाभर चालणाऱ्या यात्रेत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. येथे मोठ्या प्रमाणात ‘साल’ वृक्षांची झाडे असल्याने या ठिकाणाला ‘सालबर्डी’ हे नाव पडले आहे. हे ठिकाण घनदाट जंगलाने वेढलेले असून ट्रेकिंगसाठी उत्तम आहे.

24)Shree Kshetra Ridhpur-

श्री क्षेत्र रिद्धपूर हे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील महानुभाव पंथाचेच नव्हे, तर मराठी वाङमयाची सुद्धा काशी आहे. मराठीतील पहिला हस्तलिखित आद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ याच भूमीत म्हाइंभट्ट यांनी सुमारे 800 वर्षांपूर्वी लिहिला. व लीळाचरित्रासह स्मृतिस्थळ, गोविंदप्रभू चरित्र, दृष्टांतपाठ, सिद्धांतसूत्रपाठ, मूर्तीप्रकारासारखे ग्रंथ याच भूमीत लिहिले गेले. त्यामुळे मराठी सरितेचा उगम झालेली ही पावनभूमी मराठी वाङमयाची पंढरी आहे. हे गाव श्री गोविंदप्रभू श्री नागदेवाचार्य आणि श्री चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले असून श्री चक्रधर स्वामींनी येथे मठाची स्थापना केली होती. या गावात सुमारे 200 मंदिरे आणि 9 ऐतिहासिक विहिरी आहेत. यातील ‘सासू-सुनेची विहीर’ ही अनोखी रचना आणि ताऱ्यासारख्या आकारामुळे प्रसिद्ध आहे. तसेच मराठीतील आद्य कवयित्री महदंबा (महदाईसा) यांनी याच ठिकाणी ‘धवळे’ रचले होते. महाराष्ट्र सरकारने येथे राज्यातील पहिले ‘मराठी भाषा विद्यापीठ’ स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

25)Shree Kshetra Bahiram Baba –

श्री क्षेत्र बहिरम बाबा हे तीर्थक्षेत्र अमरावती जिल्ह्यातील, चांदूर बाजार तालुक्यात, विदर्भातील एक अत्यंत प्रसिद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक ठिकाण आहे. हे ठिकाण सातपुड्याच्या पायथ्याशी असून, येथील बहिरम बाबांची यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. हे मंदिर भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या भैरवनाथांना समर्पित आहे. 1800 च्या दशकाच्या सुरुवातीला तुळशीराम माधगे नावाच्या शेतकऱ्याने हे मंदिर बांधले. दरवर्षी येथे हिवाळ्यात, डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान बहिरम यात्रा ही विदर्भातील सर्वात मोठी म्हणजे सुमारे 40 ते 50 दिवस चालणारी यात्रा भरते. यात्रेतील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मातीच्या हंडीत शिजवलेले मटण/भाजी आणि रोडगे. दूरदूरवरून लोक केवळ या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी येथे येतात. ही यात्रा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर भरत असल्याने येथे दोन्ही राज्यांतील भाविक येतात.

26)Pandit Nehru Botanical Gardens-

पंडित नेहरू बॉटनिकल गार्डन हे अमरावती जिल्ह्यातील,चिखलदरा येथे निसर्गप्रेमी आणि पर्यकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. हे उद्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत येते आणि वन विभागाद्वारे संवर्धित केले जाते.या बागेत विविध प्रकारच्या वनस्पती आणि फुलांचा मोठा संग्रह आहे, त्यामध्ये गुलाबाच्या विविध जाती पाहायला मिळतात. तसेच पर्यकांसाठी येथे लहान प्राणीसंग्रहालय, चिल्ड्रन पार्क, मिनी ट्रेन, स्विमिंग पूल आणि चालण्यासाठी निसर्गरम्य वाटा आहेत. तसेच वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी हे एक उत्तम अभ्यासाचे ठिकाण मानले जाते. हे उद्यान अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे असून या बागेच्या जवळ श्री धाम मंदिर आहे.

27)Tribal Museum-

आदिवासी संग्रहालय हे अमरावती जिल्ह्यातील, चिखलदरा येथील, सातपुडा पर्वत रांगांमधील आदिवासी संस्कृतीचे जतन आणि दर्शन घडवण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या या संग्रहालयात मेळघाट आणि सातपुडा पट्ट्यातील आदिवासी जमातींची जीवनशैली, परंपरा आणि कलाकुसर मांडण्यात आली आहे. या संग्रहालयात आदिवासींच्या दैनंदिन जीवनातील अनेक दुर्मिळ वस्तू आहेत, त्यामध्ये मातीची भांडी, बांबूच्या टोपल्या आणि लाकडी उपकरणे, हत्यारे व शेतीची जुनी अवजारे, शिकारीसाठी वापरली जाणारी धनुष्यबाण आणि आदिवासी महिलांचे पारंपरिक दागिने, मुखवटे, हस्तकला यांचा समावेश आहे. याशिवाय सण-उत्सवांमध्ये वापरली जाणारी पारंपरिक ढोल आणि इतर वाद्ये आहेत. तसेच येथे आदिवासींच्या घरांच्या हुबेहूब प्रतिकृती उभारल्या आहेत.

Visit the travel blog

1)छत्री तलावाला कोणत्या नावाने संबोधले जाते ?

छत्री तलावाला जलदेवता या नावाने संबोधले जाते.

2)मेळघाट अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे ?

मेळघाट अभयारण्य पट्टेरी वाघांसाठी प्रसिद्ध आहे.

3)एकविरा देवी मंदिर कोणी बांधले ?

1907 मध्ये परमहंस जनार्दन स्वामी यांच्या मुलाने एकविरा देवी मंदिर बांधले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top