बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे-Top 22 places to visit in Beed district

भारतभ्रमंती या वेबसाईटवर पहा भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांमध्ये, महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे. बीड जिल्हा महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी एक असून अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आहे. हा जिल्हा मराठवाडा विभागात असून महाराष्ट्राच्या मध्यभागावर आहे. या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बीड आहे. या जिल्ह्याला ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ही ओळखले जाते.

आणि या जिल्ह्याचा बालाघाट पासून सुरू झालेला काही भाग दुर्गम आणि मागासलेला आहे. या जिल्ह्यामध्ये मराठी, हिंदी, उर्दू, तेलगू या भाषा बोलणारे लोक आढळतात. या जिल्ह्यामध्ये अनेक प्राचीन व ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत. पूर्वी या जिल्ह्याला चंपावती नगर नावाने ओळखले जायचे. या जिल्ह्यात अकरा तालुके असून बारा ज्योतिर्लिंगा मध्ये असलेले परळी वैद्यनाथ हे ज्योतिर्लिंग बीड जिल्ह्यात आहे. Top 22 places to visit in Beed district

या शेतीप्रधान जिल्ह्यात खूप साखर कारखाने आहेत. आणि येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे मुख्यत्वे ज्वारी, गहू, बाजरी, मका, उडीद, मटकी, चवळी, कापूस, भुईमूग, तेलबिया व भाजीपाला ही पिके घेतली जातात. या जिल्ह्यातील प्रसिद्ध कंकालेश्वर मंदिराचा इतिहास दीडशेच्या दशकातील ग्रंथांमध्ये आढळून येतो.बीड जिल्हा महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा मराठवाडा विभागात असून महाराष्ट्राच्या मध्यभागावर आहे. हा जिल्हा अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आहे.तसेच या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बीड असून या जिल्ह्याला ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ही ओळखले जाते. या जिल्ह्याचा बालाघाट पासून सुरू झालेला काही भाग दुर्गम आणि मागासलेला आहे.Top 12 places visit to in Beed district

Top 22 places to visit in Beed district

बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे



1)Shri Vaijnath Temple Parli-

Top 22 places to visit in Beed district

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले परळी वैजनाथ ज्योतीलिंग हे बीड जिल्ह्यात आहे. 1700 च्या शतकात या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला होता. बारमाही येथे भाविकांची गर्दी असते. बीड शहरापासून हे मंदिर 93 किलोमीटर अंतरावर आहे. बालाघाट पर्वताच्या पायथ्याशी हे मंदिर वसलेले आहे. शिवशंभु चे हे जागृत देवस्थान असून हे मंदिर चिरेबंदी स्वरूपात आहे.

2)Nayagaon Mayur Wildlife Sanctuary-

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात नायगाव मयूर अभयारण्य आहे. हे अभयारण्य मोरांसाठी प्रसिद्ध असून येथील मोरांची संख्या दहा ते बारा हजारांपेक्षा जास्त आहे. तसेच या अभयारण्यात वाघ, मुंगूस,हरिण, काळवीट, लांडगे, रानससे,कोल्हे असे विविध प्रकारचे जंगली प्राणी आहेत. महाराष्ट्र शासनाने 1994 मध्ये या अभयारण्याला मान्यता दिली. बीड शहरापासून हे अभयारण्य 25 किलोमीटर अंतरावर आहे. हे अभयारण्य हिरवीगार वनराई आणि डोंगराने वेढलेले आहे. तसेच येथे 100 पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती आहेत.

3)Kapildhara Waterfall –

बीड जिल्ह्यातील कपिलधारा या ठिकाणाला महाबळेश्वर म्हणून ही ओळखले जाते. या ठिकाणी श्री संत मन्मथ स्वामी यांची संजीवन समाधी आहे. श्री क्षेत्र कपिलधारा हे ठिकाण निसर्गरम्य वातावरणात असून येथे एक धबधबा आहे. या ठिकाणाला ऐतिहासिक वारसा असल्यामुळे महाराष्ट्रातूनच नव्हे तर पूर्ण भारततुन लाखो पर्यटक येथे भेट देतात. तुलसी विवाहाच्या वेळी येथे मोठी यात्रा भरते. हे ठिकाण वीरशैव समाजासाठी महत्त्वाचे मानले जाते. बीड पासून दक्षिणेकडे 19 कि. मी. अंतरावर आहे.

4)Dharur Fort-

बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील जमिनीवर बांधलेला हा भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्याचे नाव महादुर्ग असे होते. या किल्ल्याच्या तिन्ही बाजूंच्या भाग खोल दऱ्यांनी वेढलेला आहे. बीड शहरापासून साधारणता 58 कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांमध्ये या किल्ल्याचा समावेश केला जातो. इतिहास प्रेमी आणि पर्यटक या किल्ल्याला आवर्जून भेट देत असतात.

5)Kankaleshwar Temple-

कंकालेश्वर मंदिर बीड जिल्ह्यामध्ये असून हे मंदिर शिवाला समर्पित आहे. 84 मीटर चौरसाकृती तलावाच्या मध्यभागी हे मंदिर बांधले आहे. हे मंदिर बिंदुसरा नदीच्या तीरावर आहे. हे मंदिर एक हजार वर्षे जुने असून मंदिराची रचना हेमाडपंती शैलीमध्ये केलेली आहे. कंकालेश्वर मंदिर धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ असल्यामुळे येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. या मंदिरातील कोरलेल्या शिल्पांमध्ये नक्षीकाम, कोरीव काम अत्यंत सुबकतेने केलेले आहे. हे मंदिर पश्चिमाभिमुख असून मंदिराच्या छतावर कमळ आणि फुलांची नक्षी कोरलेली आहे.

Visit our website: allindiajourney.com

6)Shri Yogeshwari Devi Mandir-


माता योगेश्वरी देवी मंदिर हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई या ठिकाणी आहे. हे जागृत देवस्थान असून शक्ती पीठ आहे. ही देवी कोकणस्थ ब्राह्मण लोकांची कुलदेवता म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक लोकांची ही कुलदेवता आहे. येथे भाविक देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. परळी वैजनाथ पासून हे मंदिर 25 किलोमीटर अंतरावर आहे

7)Shree Mukundraj Swami Samadhi-

मुकुंदराज महाराज यांची समाधी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर जयंती नदीच्या काठावर असलेल्या काड्यांमध्ये आहे. मुकुंदराज महाराज हे मराठी भाषेचे आद्य कवी होते. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माच्या अगोदर 75 वर्ष त्यांना समाधी घेऊन झाले होते.त्यांनी वेदांताचे तत्त्वज्ञान मराठी भाषेत मांडण्यासाठी ‘विवेकसिंधू’ हा मराठी भाषेतील आद्य ग्रंथ 1110 मध्ये लिहिला.

8)Sautada waterfall & Rameshwar Temple- 

सौताडा धबधबा हा बीड मधील पाटोदा तालुक्यातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. पाटोद्याच्या डोंगरातून उगम पावणारी विंचरणा नदी वाहत जाऊन पुढे या नदीचा प्रवाह सौताडा येथे 70 मीटर उंचीवरून कोसळतो तोच हा सौताडा धबधबा. तसेच या धबधब्याच्या दरीमध्ये भगवान राम आणि सीता व महादेवाचे एक मंदिर आहे. या मंदिराला रामेश्वरम म्हणून ओळखले जाते. पावसाळ्यामध्ये येथील धबधब्याचे दृश्य अवर्णनीय असते. येथील हिरवागार परिसर,रामेश्वरम मंदिर, खोल दऱ्या मन मोहून टाकतात. श्री क्षेत्र रामेश्वर हे बीड पासून 55 किलोमीटर अंतरावर आहे.

9)Hazrat Shehanshah Wali Baba Dargah –

हजरत शेहंशावली दर्गा हे बीड मधील एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे. सूफी संत हजरत शहेनशाह वली यांच्या चौदाव्या शतकातील समाधीचे येथे स्थान आहे. ते चिस्ती या संप्रदायाचे सुफी संत होते. हे ठिकाण बीडच्या पूर्वेकडे असून येथे दरवर्षी उर्स भरतो. येथील समाधी परिसर आणि दर्ग्याची बांधणी 1385 ते 1840 या दरम्यान झाली. बीड पासून हे ठिकाण थोड्या अंतरावर आहे.

10)Khandoba Mandir-

बीड मधील खंडोबा मंदिर हे एक प्राचीन धार्मिक स्थळ आहे. या देवाची नवसाला पावणारा खंडोबा म्हणून ओळख आहे. रविवारी येथे भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी करतात. नीजामशाहीच्या काळात या मंदिराची बरीच तोडफोड झाली होती. नंतरच्या काळात अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तसेच या मंदिरापासून बीडच्या बलभीम चौकापर्यंत एक बोगदा आहे. परंतु सध्या तो बंद आहे. बीड जिल्ह्यापासून साधारणता चार किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे.

11)Bindusara dam & Bindusara River-

बिंदुसरा धरण आणि बिंदुसरा नदी हे बीड जिल्ह्यातील, मुख्य जलस्रोत आहे. बिंदुसरा नदीचा उगम बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील वाघिरा गावाजवळील बालाघाटच्या डोंगरात होतो. या नदीची एकूण लांबी सुमारे 40 किलोमीटर आहे. ही नदी बीड शहरातून वाहत जाऊन पुढे सिंदफणा नदीला मिळते. बिंदुसरा नदीवर 1955 मध्ये बिंदुसरा धरण बांधण्यात आले. या धरणाची एकूण क्षमता 7.90 दशलक्ष घनमीटर आहे.

हे धरण बीड शहराच्या आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागाच्या पाणीपुरवठ्याचा आणि परिसरातील शेतीला सिंचनाची सोय आहे. या धरणाचा परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे व येथून बालाघाट पर्वत रांगांचे विहंगम दृश्य दिसते. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी नदीचा किनारा आणि धरण परिसर पाहण्यासाठी स्थानिक पर्यटक मोठी गर्दी करतात. या धरणाजवळच प्रसिद्ध कपिलधार धबधबा आहे.

12)Narayan Gad-

बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पौडुळ गावात नारायण गड हे धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर विठ्ठलाचे असून या मंदिराला ‘धाकली पंढरी’ म्हणून ओळखले जाते. भाविकांचे तीर्थस्थान असलेल्या या मंदिराची स्थापना संत नारायण बाबा यांनी केली. नारायण महाराज हे संत एकनाथ महाराजांच्या शिष्यामधले एक महत्वाचे व्यक्तिमत्व होते. येथील विशेष गोष्ट म्हणजे दर बारा वर्षांनी येथे आपोआप शिवलिंगाची निर्मिती होते. दरवर्षी भावीक या मंदिराला मोठ्या संख्येने येत असतात.

13)Dharmapuri Fort-

धर्मापुरी किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याच्या परळी वैजनाथ तालुक्यात धर्मापुरी गावात वसलेला एक ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे. हा किल्ला एका छोट्या टेकडीवजा भागावर बांधलेला भुईकोट (किंवा गढी) प्रकारचा किल्ला असून गडाची बाहेरील तटबंदी आणि बुरुज आजही सुस्थितीत उभे आहेत. किल्ल्याच्या अंतर्गत भागात पिण्याच्या पाण्यासाठी जुन्या बारव (विहिरी) आणि पाण्याचे तलाव आहेत. काही लोकांच्या मते, येथून काही गुप्त भुयारी मार्गही होते.

या गडाच्या परिसरात आणि संपूर्ण गावात जागोजागी प्राचीन कोरीव मूर्ती, व वीरगळ पाहायला मिळतात. या किल्ल्याच्या जवळच 12 व्या शतकात चालुक्य राजा सहावा विक्रमादित्य याच्या काळात बांधलेले केदारेश्वर मंदिर आहे. हे संपूर्ण मंदिर दगडी कोरीव काम आणि हेमाडपंती स्थापत्यशैलीचा एक उत्कृष्ट नमुना आहे.

14)Jama Masjid –

जामा मशीद ही बीड जिल्ह्यातील, मुघल काळातील एक भव्य ऐतिहासिक वास्तू आहे. ही मशीद मुघल सम्राट जहांगीर यांच्या कारकिर्दीत जान सिपर खान यांच्या देखरेखीखाली बांधली गेली. आणि इ.स. 1627 मध्ये या मशिदीचे बांधकाम पूर्ण झाले. ही मशीद संपूर्णपणे काळ्या दगडांपासून बनवलेली असून त्यावर अतिशय सुंदर कोरीव काम केले आहे. व मशिदीला 3 मोठे मुख्य घुमट आणि 4 उंच मीनार आहेत.

या मशिदीची अंतर्गत रचना आणि खांबांची ठेवण स्पेनमधील प्रसिद्ध ‘मस्जिद-ए-कुर्तबा’ शी काहीशी मिळतीजुळती आहे. बीड शहरातील सर्वात मोठ्या मशिदींपैकी ही एक असून, यामध्ये नमाजसाठी मोठा मुख्य हॉल आणि एक विस्तीर्ण अंगण आहे.

15)Khazana Bavdi-

खजाना बावडी किंवा विहीर ही बीड जिल्ह्यातील एक ऐतिहासिक व आश्चर्यकारक जलरचना आहे. या विहिरीचे बांधकाम प्राचीन खगोलशास्त्र, भूमिती आणि उत्कृष्ट जलव्यवस्थापनाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. या विहिरीची निर्मिती इ.स. 1583 मध्ये बीडचे जहागीरदार सलाबत खान यांनी केली होती. जमिनीपासून सुमारे 77 फूट खोल असलेल्या या विहिरीचा व्यास 50 फूट इतका आहे. ही चौकोनी विहीर दगड आणि चुन्याचा वापर करून बांधण्यात आली आहे. या वास्तूला प्राचीन ‘स्पेस सेंटर’ असेही म्हटले जाते.

या विहिरीत पाणी आणण्यासाठी अडीच किलोमीटर अंतरावरून भूगर्भातील बोगदे तयार करण्यात आले आहेत. दुष्काळातही या विहिरीच्या पाण्याची पातळी कधीही पूर्णपणे आटत नाही. या विहिरीच्या पाण्यामुळे बलगुजार भागातील 500 एकर शेती आजही कोणतीही मोटार वा यंत्र न वापरता, गुरुत्वाकर्षण प्रणालीवर (कालव्यातून) सिंचनाखाली आहे. आणि या विहिरीच्या आतील बाजूस उर्दू भाषेत कोरलेला शिलालेख आढळतो.

16)Shri Kshetra Panchaleshwar, Mahanubhav Panth Pith, Atmatirth-

श्री क्षेत्र पांचाळेश्वर महानुभाव पंथ आत्मतीर्थ हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील एक अत्यंत पवित्र, आणि प्राचीन धार्मिक स्थळ आहे. गोदावरी नदीच्या पात्रात वसलेले हे स्थान श्री दत्तात्रय प्रभूंचे नित्य भोजन स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. महानुभाव पंथात या स्थानाला अत्यंत पवित्र ‘पीठ स्थान’ मानले जाते. पौराणिक कथेनुसार, पांचाळ राजाने येथे दत्तप्रभूंची आराधना केली होती. दत्तप्रभूंनी प्रसन्न होऊन राजाला वर दिला की, “जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत मी येथे भोजनासाठी रोज सूक्ष्म रूपाने येईल.

श्रीदत्तात्रय प्रभू रोज दुपारी प्रत्यक्ष भोजन स्वीकारण्यासाठी येथे येत असतात. तसेच हे स्थान महानुभाव पंथाचे एक अत्यंत पवित्र व श्रेष्ठ तीर्थक्षेत्र मानले जाते. येथे चक्रधर स्वामी आणि गोविंदप्रभू महाराज यांनी तपश्चर्या केली होती. मंदिराच्या परिसरात ‘दत्त गुंफा’ असून, दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंतीला देशभरातून लाखो भाविक आणि महानुभाव पंथाचे अनुयायी दर्शनासाठी येतात.

17)Shree Gahininath Maharaj Samadhi Mandir-

श्री क्षेत्र गहिनीनाथगड हे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील नाथ चिंचोली येथील अत्यंत पवित्र आणि जागृत तीर्थक्षेत्र आहे. येथे नवनाथांपैकी एक श्री गहिनीनाथ महाराज यांची संजीवन समाधी असून या धार्मिक स्थळाचा वारकरी आणि नाथ संप्रदायात मोठा मान आहे. गहिनीनाथ महाराज हे गुरु गोरखनाथांचे शिष्य होते. त्यांनीच संत निवृत्तीनाथ यांना उपदेश देऊन पुढे वारकरी संप्रदायाचा पाया मजबूत केला.

तसेच या गडाचा विकास आणि वारकरी संप्रदायाचा प्रसार करण्यात वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ महाराज यांचे योगदान अफाट आहे. गडाच्या परिसरात त्यांचेही भव्य समाधी मंदिर आहे. या पवित्र गडाच्या परिसरातच प्रसिद्ध सिंदफणा नदीचा उगम होतो, त्यामुळे हे ठिकाण धार्मिक व निसर्गरम्य आहे. गहिनीनाथ गडावर दरवर्षी ‘नारळी सप्ताह’ साजरा केला जातो.

18)Shivleni Caves Ambajogai-

शिवलेणी (जोगाई मंडप किंवा हत्तीखाना) ही बीड जिल्ह्यातील, अंबाजोगाई येथील 11 व्या शतकातील प्राचीन गुफांचा आणि दगडी स्थापत्यकलेचा एक अप्रतिम नमुना आहे. परमार वंशीय राजा उदयादित्य याच्या काळात ही लेणी खोदली गेली. ही लेणी एका टेकडीत खोलवर कोरलेली असून तिचे प्रवेशद्वार दक्षिणेकडे आहे. आणि या गुंफेच्या मध्यभागी एक भव्य नंदी मंडप आहे, आणि आतील बाजूस 32 खांबांवर आधारलेला एक मोठा सभामंडप आहे. येथे भगवान शिव, गणेशाची शिल्पे आणि सप्तमातृकांच्या मूर्ती आहेत.

तसेच प्रवेशद्वारावर दगडी हत्तींची चार शिल्पे होती, ज्यावरून या जागेला ‘हत्तीखाना’ असेही म्हणतात. सध्या यातील तीन शिल्पे अस्तित्त्वात आहेत. आख्यायिकेनुसार ही जागा देवी योगेश्वरीचा विवाह मंडप मानली जाते. विवाहादरम्यान काही दैवी संकटामुळे सर्व काही दगडात रूपांतरित झाले आणि म्हणून या जागेला ‘जोगाई मंडप’ असेही म्हणतात. ही लेणी प्राचीन व ऐतिहासिक संरक्षित स्मारक असून योगेश्वरी देवी मंदिरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर जयंती नदीच्या काठावर आहेत.

19)Mahanubhav Panth Ramdara Sthan-

महानुभाव पंथ रामदरा स्थान हे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील महानुभाव संप्रदायाचे एक अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे ठिकाण निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे. आणि महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या पवित्र चरणस्पर्शाने हे स्थान पावन झालेले आहे. या ठिकाणी स्वामींच्या वास्तव्याच्या स्मृती जपणारे पवित्र ओटे आणि चरण विहीर (पाण्याचे कुंड) असून भाविक मोठ्या श्रद्धेने तिथे नतमस्तक होतात.

महानुभाव पंथाच्या परंपरेनुसार येथे भगवान श्रीकृष्णाची मुख्य उपासना केली जाते. ‘रामदरा’ येथे हे मंदिर एका सुंदर दरीमध्ये आहे. आणि मंदिराकडे जाण्यासाठी भाविकांना सुमारे 300 पायऱ्या उतरून खाली जावे लागते. हे स्थान प्रसिद्ध सौतडा धबधब्याजवळ असल्याने पावसाळ्यात येथील सौंदर्य अधिकच खुलते.

21)Shri Nagnath Mandir / Jahagirdar Math-

श्री क्षेत्र नागनाथ मंदिर / जहागीरदार मठ हे बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील मानूर गावातील एक अत्यंत प्राचीन, ऐतिहासिक आणि धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. मानूर गावाला ऐतिहासिक काळामध्ये “700 आड आणि 700 माड (मंदिरे) असलेले गाव” म्हणून ओळखले जात असे. येथील विहिरी (आड) सुमारे 700 वर्षे जुन्या यादवकालीन इतिहासाची साक्ष देतात. या गावामध्ये त्रिकोनी, चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी आणि विशेष मातीपासून बनवलेले ‘खापरी आड’ पाहायला मिळतात. या मंदिराच्या परिसरात ऐतिहासिक ‘जहागीरदार मठ’ आहे. जे वीरशैव लिंगायत पंथाचे एक मोठे आणि प्रमुख श्रद्धास्थान आहे. नागनाथ मंदिराबद्दल भाविकांची अशी श्रद्धा आहे की, या ठिकाणी श्रद्धेने मागितलेला नवस पूर्ण होतो.

22)Hanumangad patoda-

हनुमानगड हे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील नायगाव मयूर अभयारण्य परिसरातील प्रसिद्ध आणि पवित्र धार्मिक स्थळ आहे. हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि येथील 41 फूट उंच मारुतीरायाच्या मूर्तीसाठी संपूर्ण मराठवाड्यात ओळखले जाते. येथे मराठवाड्यातील सर्वात उंच 41 फूट हनुमान मूर्ती आहे. आणि या मूर्तीची ख्याती ‘नवसाला पावणारा हनुमान’ म्हणून आहे. या गडाजवळच प्रसिद्ध नायगाव मयूर अभयारण्य आहे. त्यामुळे निसर्गप्रेमी आणि भाविकांसाठी हे एक उत्तम पर्यटन केंद्र मानले जाते. या गडावर वर्षभर भाविकांची गर्दी असते, व पौर्णिमा आणि शनिवारी अनेक भाविक या ठिकाणी व्यसनमुक्तीसाठी येतात.

Visit the travel blog

1)नारायण गड हे धार्मिक स्थळ कोणत्या गावात आहे?

नारायण गड हे धार्मिक स्थळ शिरूर तालुक्यातील पौडुळ गावात आहे?

2)सौताडा धबधबा किती मीटर उंचीवरून कोसळतो?

सौताडा धबधबा 70 मीटर उंचीवरून कोसळतो.

3)नायगाव मयूर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे ?

नायगाव मयूर अभयारण्य मोरांसाठी प्रसिद्ध आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top