भारतभ्रमंती या वेबसाईटवर पहा भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांमध्ये, महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे. बुलढाणा जिल्हा हा महाराष्ट्रातील अमरावती विभागामध्ये येतो.या जिल्ह्यामध्ये 13 तालुके आहेत. श्री संत गजानन महाराज यांच्या पद स्पर्शाने पावन झालेली शेगाव नगरी बुलढाणा जिल्ह्यातच आहे.12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला होता.राजमाता जिजाऊंचा जिथे जन्म झाला तो राजवाडा भव्य असून मुंबई नागपूर हायवे ला लागून आहे. Top 21 places to visit in Buldhana District
या जिल्ह्यातील महत्त्वाची पिके कापूस,ज्वारी,सोयाबीन,सूर्यफूल,गहू, बाजरी ही आहेत. या जिल्ह्यातून बऱ्याच नद्या वाहतात. उन्हाळ्यामध्ये या जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे आहे. जिल्ह्यातील नळगंगा नदीवर मोताळा तालुक्यात नळगंगा धरण आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक धार्मिक, नैसर्गिक, ऐतिहासिक पर्यटन स्थळे व अभयारन्ये आहेत. संपूर्ण जगात नाव मिळवलेले लोणार सरोवर हे बुलढाण्यातील खाऱ्या पाण्याचे एक प्रमुख अविश्वासनीय पर्यटन स्थळ आहे. प्रशासकीय कार्यालय बुलढाणा जिल्ह्यात आहे.
तसेच येथे 120 एकर जागेवर आनंद सागर हे पर्यटन स्थळ निर्माण केली आहे. तसेच या जिल्ह्यात अनेक हेमाडपंथी मंदिरे अभयारण्य आहेत. अंबाझरी व भिंगार ही बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेची ठिकाणे आहेत. बुलढाणा येथील सिंदखेड राजा येथे घोंगड्या बनवल्या जातात त्या खूप प्रसिद्ध आहेत. हा जिल्हा मुंबईपासून 500 किलोमीटर अंतरावर आहे.
Top 21 places to visit in Buldhana District
बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
1)Lonar Sarovar-



बुलढाणा जिल्ह्यातील लोणार हे सरोवर खाऱ्या पाण्याचे असून त्याची निर्मिती फार वर्षांपूर्वी उल्कापातामुळे झाली होती. सरोवराचे पाणी अल्कधर्मी आहे. बेसोल्ट खडकातील लोणार हे मोठे आघाती विवर आहे. या सरोवरच्या संवर्धनासाठी याला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या परिसरामध्ये साधारणता बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. या विवरामध्ये 15 मंदिरे असून लोणार सरोवराची निर्मिती 52 ते 60 हजार वर्षांपूर्वी झाली असावी असा अंदाज आहे. देश विदेशातील अनेक संस्थांनी या सरोवरावर संशोधन केले आहे. लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यापासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. प्राचीन ग्रंथांमध्ये देखील लोणार सरोवराचा उल्लेख केलेला आहे. लोणार हे महाराष्ट्रातील सात आश्चर्यांपैकी एक आहे.
2)Ambabarwa Wildlife Sanctuary-






बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील अंबाबरवा हे सातपुडा पर्वतरांगाच्या पायथ्याशी वसलेलेअभयारण्य नैसर्गिक व हिरवळीने नटलेले आहे.127 चौरस किलोमीटर परिसरात हे अभयारण्य विस्तारलेले आहे. या अभयारण्यामध्ये वाघ,बिबट्या , अस्वल, ससा, लांडगा,उदमांजर त्या अनेक जंगली प्राण्यांबरोबर 200 पेक्षा जास्त प्रकारच्या पक्षांच्या जाती आढळून येतात. बुलढाणा शहरापासून हे अभयारण्य 200 किलोमीटर अंतरावर आहे. हे अभयारण्य मेळघाट अभयारण्याचा एक भाग आहे.
3)Shree Gajanan Maharaj Mandir Shegaon-





श्री संत गजानन महाराज हे महाराष्ट्रातील थोर संत होऊन गेले. 23 फेब्रुवारी 1878 रोजी गजानन महाराज अचानक प्रकट झाले. ते मूळ कोणते हे याबद्दल कोणतीही माहिती नाही. भक्ती मार्गाने देवापर्यंत पोहोचता येते असा संदेश गजानन महाराजांनी दिला. त्यांना शेगावचे देव म्हणून ओळखले जाते. गजानन महाराज हे दत्तसंप्रदायाचे गुरु होते. महाराजांच्या प्रकटदिनी शेगाव मध्ये मोठा उत्सव साजरा केला जातो.
visit our website:Allindiajourney.com
4)Shri Balaji Mandir Buldhana | Rajur Ghat




बुलढाणा जिल्ह्यातील बालाजी मंदिर हे एक धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर राजुर घाटामध्ये टेकडीवर असलेल्या तिरुपतीच्या धरतीवर बांधले आहे. दाक्षिणात्य पद्धतीने बांधलेले भगवान बालाजीचे हे मंदिर नयनरम्य व खूप भव्य असून मंदिरात बालाजी ची मूर्ती बसवण्यात आली आहे. राजुर घाटातील विलोभनीय निसर्ग सौंदर्य आणि तेथील विविध मंदिरे पर्यटकांना आकर्षित करतात.
5)Sailani Baba Dargah-


बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई गावातील सैलानी बाबा दर्गा आहे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी मानसिक रोग बरे होतात अशी या ठिकाणाची ख्याती आहे. महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माचे लोक येथे दर्शनाला येतात. हा दर्गा बुलढाण्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. विशेष म्हणजे होळी धहणाच्या कार्यक्रमाच्या वेळी येथे कपड्यावर रोशनाई
केल्याने काळी जादू, मानसिक रोग, भूतबाधा यापासून मुक्ती मिळते असे मानले जाते. हा दर्गा म्हणजे सर्वधर्मसमभावतेचे प्रतीक आहे.
6)Gyanganga Wildlife Sanctuary-







ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य हे बुलढाण्यातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. या अभयारण्यातून ज्ञानगंगा नदी वाहत असल्यामुळे या अभयारण्याला ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य हे नाव देण्यात आले आहे. हे अभयारण्य 205 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. या अभयारण्यामध्ये निलगाय, हरीण, बिबट्या, काळवीट, सरपटणारे प्राणी आणि 150 पेक्षा जास्त विविध प्रकारच्या पक्षांच्या जाती आढळून येतात. या अभयारण्याची निर्मिती 9 मे 1997 रोजी झाली. हे अभयारण्य खामगाव, मोताळा आणि चिखली तालुक्यात आहे. बुलढाणा शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य आहे.
7)Renuka Devi Mandir Chikhli –



रेणुका मातेचे हे मंदिर बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे आहे. व चिखली तालुक्याचे हे आराध्य दैवत आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून या रेणुका मातेची ख्याती आहे. हनुमान जयंतीला दरवर्षी येथे यात्रा भरते. हे मंदिर शहराच्या मध्यभागी असून बुलढाणा पासून 23 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिरातील रेणुका मातेचा मुखवटा सुमारे 5 फूट उंच व 4 फूट रुंद आहे. भारतातील 51 शक्तिपीठांपैकी हे एक शक्तिपीठ आहे.
8)Sindkhed Raja-

















सिंदखेड राजा हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्वाचे प्रमुख पर्यटन स्थळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई राजमाता जिजाऊ यांचे हे माहेर असून जन्मगाव आहे. या ठिकाणाला खूप मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. या ठिकाणी जिजाबाईंचे वडील श्रीमंत लखोजीराजे यांचा राजवाडा, काळाकोट,पुतळा बारव, लखोजी राजांची समाधी यापेक्षा अनेक ऐतिहासिक गोष्टी आहेत. येथील राजवाड्यामध्ये राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजींचे मूर्ती आहे. बुलढाणा पासून हे ठिकाण साधारणता 80 किलोमीटर अंतरावर आहे.
9)Nandura Hanuman Murti –

बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे असलेली 105 फूट उंचीची हनुमानाची मूर्ती असून जगातील सर्वात उंच हनुमान मूर्तीपैकी एक आहे. या मूर्तीमुळे नांदुरा शहराला ‘हनुमान नगरी’ म्हणून ओळखले जाते. सन 2000 मध्ये या मूर्तीची स्थापना करण्यात आली. 2003 मध्ये लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या मूर्तीची नोंद करण्यात आली आहे. हनुमान जयंतीला या मूर्तीवर पाच क्विंटल फुलांचा हार चढवला होता. हनुमानाच्या या भव्य मूर्तीच्या बाजूला बालाजीचे मंदिर बांधण्यात आले आहे. जगभरातून ही विशाल काय मूर्ती पाहण्यासाठी पर्यटक दरवर्षी लाखोच्या संख्येने नांदुरा येथे येत असतात
10)Anand Sagar Shegaon-




बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव बाळापुर रोडवर शेगाव पासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेले ‘आनंद सागर’ हे ठिकाण शेगाव संस्थानने निर्माण केले आहे. 350 एकर जागे पैकी 120 एकर जागेवर हे आनंद सागर सर्व सोयी सुविधानी युक्त असलेली इमारत निर्माण केली आहे. त्या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यातून संत महात्मे येतात. तसेच राज्यातील व देशातील अनेक संतांचे पुतळे येथे उभारण्यात आले आहेत.
11)Jatashankar Waterfall-


जटाशंकर धबधबा हे बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगाच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळ आहे. तून्की गावातून पंधरा ते वीस किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी जाता येते. शिवशंकर महादेवावर या धबधब्यातून सतत जल वर्षाव होतो. म्हणून या धबधब्याला जटाशंकर धबधबा असे नाव पडले आहे. संग्रामपूर तालुक्यापासून हे ठिकाण 25 किलोमीटर अंतरावर आहे.
12)Shrinath Mahadev Mandir, Girda-





श्री क्षेत्र गिरडा हे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाचे निसर्गरम्य व धार्मिक पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी श्रीनाथ महादेवाचे मंदिर व स्वयंप्रकाश बाबा यांची समाधी आहे. या स्थळाबद्दल एक अशी अध्यायिका सांगितला जाते कि पांडव वनवासात होते त्यावेळी अर्जुनाने बाण मारून इथे पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. तेच पाणी पाच झऱ्यातून गोमुखातून आजपर्यंत वाहत आहे. म्हणून या ठिकाणाला प्रांचीझरा देखील म्हटले जाते. गजानन महाराज संस्थानाच्या वतीने येथे मोठ्या प्रमाणात विकास केला जात आहे. तसेच इथून जवळच पैनगंगा नदीचे उगम स्थान व व बुधनेश्वर महादेवाचे मंदिर आहे. येथील काळीभिंत ही दरी प्रसिद्ध आहे.
13)Gondhanapur Fort-



गोंधणापूर किल्ला हा खामगाव तालुक्यातील गोधनापूर गावामधील एक भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्यामध्ये अनेक भुयारी खोल्या असून किल्ल्याचे बांधकाम हे दगड व विटांमध्ये आहे. सन 1791 मध्ये लातूरचे रघोजीराव भोसले दुसरे यांनी दिवाण वैद्य यांच्या देखरेखी खाली हा किल्ला बांधला. या किल्ल्यापासून जवळच गराडगाव येथे बुद्ध विहार व किनी येथे महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. खामगाव पासून हा किल्ला आठ किलोमीटर अंतरावर आहे.
14)Hiwra Ashram-




हिवरा आश्रम हे एक तीर्थक्षेत्र असून पर्यटन क्षेत्र देखील आहे. या ठिकाणी विवेकानंद आश्रम संस्थेने शिवमंदिर व बालाजी परिसरात हरिहर क्षेत्र या ठिकाणी सुंदर व रमणीय उद्यानाचे निर्मिती केली आहे. येथे वीस फूट उंचीची स्वामी विवेकानंदाची तेजस्वी मूर्ती आहे. येथील पेढा खूप प्रसिद्ध आहे. तसेच येथे बोटीचाही आनंद घेता येतो. त्यामुळे हे ठिकाण प्रेक्षणीय पर्यटन स्थळ बनले आहे. साखर खर्डा हे ऐतिहासिक गाव येथून जवळच आहे. मेहकर पासून 16 किलोमीटर अंतरावर हिवरा आश्रम हे ठिकाण आहे.
15)Balaji Temple Deulgaon Raja-

बालाजी मंदिर हे बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील ‘महाराष्ट्राचे तिरुपती’ म्हणून प्रसिद्ध असलेले एक प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे. 17 व्या शतकात राजमाता जिजाऊंचे वंशज राजे जगदेवराव जाधव यांनी 1665 मध्ये देऊळगाव राजा येथे ‘बालाजी महाराज संस्थान’ ची स्थापना केली. ‘बालाजी संस्थान’ हे धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक आहे राजे जगदेवराव जाधव यांना ही प्राचीन मूर्ती सापडली होती, त्यानंतर त्यांनी या भव्य मंदिराची उभारणी केली. हे मंदिर 360 वर्षांपेक्षा जास्त जुने आहे. या मंदिरातील मुख्य मूर्ती श्री लक्ष्मी व्यंकटेशाची आहे. येथील मूळ मूर्ती अतिशय छोटी म्हणजे तर्जनी (हाताच्या बोटा) इतकीच लहान असून ती पाच मौल्यवान धातूंनी (पंचधातू) बनलेली आहे. या मंदिराला भाविक अत्यंत श्रद्धेने ‘महाराष्ट्राचे तिरुपती’ किंवा ‘प्रति तिरुपती’ म्हणून ओळखतात.
16)Mailgad Fort-



मैलगड किल्ला हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात सातपुडा पर्वतरांगेत वसलेला एक ऐतिहासिक डोंगरी किल्ला (गिरीदुर्ग) आहे. हा डोंगरी किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 1,750 फूट उंचीवर असून किल्ल्याच्या पायथ्याचे गाव रायपूर आहे. या किल्ल्याचे बांधकाम अचलपूरच्या नवाबाने 1757 च्या काळात केले होते. या किल्ल्यावर प्राचीन लेण्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी खडकात कोरलेली पाण्याची टाकी आहेत. व दगडात कोरलेली किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती पाहायला मिळते. हा संपूर्ण किल्ला डोंगरातील काळ्या पाषाणात कोरून तयार करण्यात आला आहे. आणि दगडामध्ये विविध ठिकाणी मोठ्या खोल्या (तळघरे) बनवल्या आहेत. या गडावरून सातपुडा पर्वतरांगांचे आणि मध्यप्रदेशच्या सीमेचे विहंगम दृश्य दिसते.
17)Sharangdhar Balaji Temple, Mehkar-




शारंगधर बालाजी मंदिर हे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील अत्यंत प्राचीन मंदिर आहे. येथील भगवान विष्णूंची मूर्ती 11.2 फूट उंच, 4 फूट रुंद आणि 2.5 फूट जाड आहे. आणि ही मूर्ती एकाच अखंड काळ्या गंडकी (शालिग्राम) पाषाणात घडवलेली आहे. येथे मुख्य मूर्तीभोवती असलेल्या प्रभावळीवर भगवान विष्णूंचे 10 अवतार अत्यंत सुबकपणे कोरलेले आहेत. व पायापाशी डाव्या बाजूला श्रीलक्ष्मी आणि उजव्या बाजूला भूलक्ष्मी विराजमान आहेत. ही मूर्ती डिसेंबर 1888 मध्ये पोलीस पाटील रामभाऊ भिते यांच्या गढीमध्ये खोदकाम करताना जमिनीखाली सुमारे 20 फूट लांब लोखंडी पेटीत सापडली होती.
ब्रिटिश अधिकारी रिचर्ड टेम्पल यांना या मूर्तीच्या सौंदर्याची माहिती मिळताच ते ही मूर्ती लंडनच्या संग्रहालयात नेणार होते,परंतु, मेहकरच्या गावकऱ्यांनी इंग्रजांना विरोध केला आणि रातोरात मूर्तीची तिथेच प्राणप्रतिष्ठा केली. ब्रिटिश सरकारने मूर्तीसोबत सापडलेले ताम्रपट व दागिने लंडनला घेऊन गेले, जे आज ब्रिटनच्या संग्रहालयात आहेत. तिरुपतीमध्ये जसा ‘गोविंदा गोविंदा’ जयघोष होतो, तसा मेहकरमध्ये “लक्ष्मीरमण शारंगधर गोविंद गोविंद!” असा जयघोष केला जातो.
18)Mahabodhi Buddha Vihar, Dhammagiri –


महाबोधी बुद्धविहार, धम्मगिरी हा बुलढाणा जिल्ह्यातील, राजूरघाटाच्या निसर्गरम्य परिसरात टेकडीवर वसलेले सुंदर ठिकाण आहे. या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांची एक भव्य आणि देखणी मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. आणि येथील भव्य प्रवेशद्वार आणि आजूबाजूचा परिसर अत्यंत शांत आणि मन प्रफुल्लित करणारा आहे. या बुद्धविहारात बुद्ध पौर्णिमा, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि इतर बौद्ध सणांच्या दिवशी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच येथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील बौद्ध धम्मगुरूंची प्रवचने आयोजित केली जातात. तसेच बुलढाणा शहरापासून 12 किमी अंतरावर पांगरी परिसरात ‘धम्म किरण’ नावाचे विपश्यना ध्यान केंद्र आहे, जिथे 10 दिवसीय ध्यान शिबिरे घेतली जातात.
19)Gomukh Dhar Temple, Lonar-


गोमुख धार मंदिर/ धार तीर्थ हे बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध जागतिक वारसा असलेल्या लोणार सरोवराच्या (विवराच्या) काठावरील धार्मिक तीर्थस्थळ आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील कुंडात वर्षभर 12 ही महिने अखंड पाण्याचा प्रवाह (झरा) वाहत असतो. हा पाण्याचा प्रवाह कडक उन्हाळ्यातही कधीच आटत नाही. कड्याच्या खडकातून येणारा हा नैसर्गिक पाण्याचा झरा काळ्या पाषाणात कोरलेल्या गाईच्या मुखासारख्या (गोमुख) शिल्पातून खाली पडतो. म्हणूनच याला ‘गोमुख मंदिर’ म्हणतात. हे पाणी ज्या दगडी कुंडात पडते, त्याला ‘धार कुंड’ म्हटले जाते. येथे येणारे भाविक या पवित्र कुंडात स्नान करतात. हे मंदिर 12 व्या शतकातील असून, याची बांधणी प्राचीन चालुक्य आणि हेमाडपंती वास्तुशैलीत करण्यात आली आहे. या परिसरात शिव, विष्णू, गणपती आणि जगदंबा देवी अशा विविध देवतांच्या मंदिरांचा समूह आहे.
20)Kamalja Devi temple-


कमळजा देवी मंदिर हे बुलढाणा जिल्ह्यातील, लोणार सरोवराच्या घनदाट वनराईत वसलेले एक ऐतिहासिक आणि अध्यात्मिक केंद्र आहे. हे मंदिर चालुक्य-यादव काळात 12 व्या शतकात, हेमाडपंती शैलीत बांधलेले असून लोणारची ग्रामदेवता आहे. येथे कमळजा देवीला श्रीलक्ष्मीचा अवतार मानले जाते. हे मंदिर लोणार सरोवराच्या तलावाच्या काठावर आहे. या सरोवराचे पाणी खारट असतानाही मंदिराच्या जवळ असलेल्या ‘सासू-सुनेच्या विहिरीत’ गोड्या पाण्याचा प्रवाह आहे. तसेच या मंदिराच्या परिसरात दिशादर्शक सुई दिशाहीन होते. येथील कमळजा देवीची मूर्ती एकाच काळ्या पाषाणाची असून, तिचा मुखवटा तांदळासारखा आहे आणि तो माहूरच्या देवीसारखा भासतो. प्रभू रामचंद्र वनवासात असताना त्यांनी या देवीचे दर्शन घेतले होते, अशी अख्यायिका आहे. शारदीय नवरात्रोत्सवामध्ये येथे खूप मोठी जत्रा भरते.
21)Daityasudan Temple, Lonar –

श्री दैत्यसुदन मंदिर हे बुलढाणा जिल्ह्यातील, लोणार येथील भगवान विष्णूंच्या ‘दैत्यसुदन’ अवताराला समर्पित आहे. या भागात ‘लोणासूर’ (किंवा लवणासूर) नावाच्या राक्षसाने उच्छाद मांडला होता. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याचा वध केला. या मंदिराच्या गर्भगृहात भगवान विष्णूने ‘लोणासूर’ (लवणासूर) राक्षसाचा वध करतानाची मूर्ती आहे, ज्यामध्ये विष्णूच्या पायाखाली असुर दाबलेला दिसतो. 13 व्या शतकातील हे मंदिर चालुक्य आणि हेमाडपंती शैलीचे एक ऐतिहासिक आणि स्थापत्यकलेचे अद्भुत उदाहरण आहे. येथील अप्रतिम कोरीव शिल्पकला पर्यटकांना मंत्रमुग्ध करते. दरवर्षी मे महिन्यात या मंदिरात होणारा सूर्यकिरणांचा अभिषेक हा पर्यटक व भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा विषय असतो. मंदिराच्या स्थापत्य रचनेमुळे विशिष्ट दिवसांमध्ये सकाळचे सूर्यकिरण थेट गाभाऱ्यात प्रवेश करून भगवान विष्णूच्या मूर्तीवर पडतात. हा दिव्य सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक लोणारमध्ये येतात
1)गोंधनापूर किल्ला कोणत्या तालुक्यात आहे ?
गोंधनापूर किल्ला खामगाव तालुक्यात आहे .
2)जटाशंकर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे?
जटाशंकर धबधबा बुलढाणा जिल्ह्यात आहे.
3)लोणार सरोवराची निर्मिती कशी झाली आहे?
लोणार सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झाली आहे.


