सातारा जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-Top 35 places to visit in Satara District

मित्रांनो भारतभ्रमंती ही अशी वेबसाईट आहे, जिथे तुम्हाला भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळांची माहिती मिळणार आहे. आता तुम्ही पाहणार आहात महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे.महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा हा सामाजिक ऐतिहासिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी असलेला जिल्हा आहे. सातारा जिल्ह्याला वीरांची भूमी म्हणूनही ओळखले जाते. Top 35 places to visit in Satara District

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सातारा जिल्ह्याचे सर्वात जास्त योगदान आहे. या जिल्ह्यातील अनेक युवक भारतीय सेनेमध्ये भरती होण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात. सातारा जिल्ह्यात 11 तालुके आहेत. आणि कृष्णा आणि भीमा या दोन मुख्य नद्या आहेत. जागतिक स्तरावरील महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ सातारा जिल्ह्यातच आहे.

Top 35 places to visit in Satara District

सातारा जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे

1)Rajwada Palace-

Top 35 places to visit in Satara District

जुना राजवाडा हा सातारा जिल्ह्यातील सातारा शहराच्या मध्यभागी असलेला एका ऐतिहासिक ठिकाण आहे. हा राजवाडा मराठा साम्राज्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. या राजवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहूमहाराज यांचा राज्याभिषेक 1708 मध्ये झाला होता. आणि त्यानंतर मराठा राज्याच्या अखेरपर्यंत सातारा हे मराठ्यांचे राजधानीचे शहर झाले.

या राजवाड्यात अनेक ऐतिहासिक घडामोडी घडल्या आहेत, त्यामध्ये चिमासाहेब महाराजांनी या राजवाड्यातूनच 1857 चा उठाव केला होता आणि त्यासाठी ब्रिटिशांनी त्यांना कराची मध्ये नजर कैदेत ठेवले होते. आणि ब्रिटिशांनी हा उठाव मोडून काढून क्रांतिकारकांना राजवाड्याच्या परिसरात मृत्युदंड दिला होता.

2)Sangam mahuli &Kshetra mahuli-

संगम माहुली आणि क्षेत्र माहुली ही सातारा जिल्ह्यातील कृष्णा व वेण्णा नद्यांच्या संगमावर वसलेली दोन पवित्र गावे आहेत. या संगमाच्या पूर्वेकडील वस्तीला ‘क्षेत्र माहुली’ आणि पश्चिमेकडील वस्तीला ‘संगम माहुली’ ही नावे आहेत. या संगमावर 18 व्या आणि 19 व्या शतकातील अनेक सुंदर मंदिरे आहेत.

त्यामध्ये संगम माहुली येथे छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी ताराबाईंची समाधीस्थळे आहेत, तर क्षेत्र माहुलीमध्ये प्रतिनिधी घराण्याने बांधलेली विविध मंदिरे आहेत. तसेच क्षेत्र माहुली हे ठिकाण पेशवाई काळातील प्रसिद्ध राजकीय सल्लागार रामशास्त्री प्रभुणे यांचे जन्मस्थान आहे. त्यामुळे हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.

3)Yawateshwar temple-

यवतेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील यादवकालीन शिवमंदिर आणि ग्रामदैवत काळभैरवनाथाचे मंदिर असलेले एक प्राचीन धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर सातारा शहराच्या पश्चिमेला यवतेश्वर गावात आहे. या मंदिरात शंकराची मोठी पिंड असून, गाभाऱ्यासमोर दगडात कोरलेले दोन सुंदर नंदी आहेत. हे हेमाडपंती शैलीत बांधलेले मंदिर समुद्रसपाटीपासून 1230 मीटर उंचीवर आहे. व शिव शंकराचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्रावणाच्या सोमवारी देशभरातून अनेक भाविक येथील शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.

4)Dhom Dam-

धोम धरण हे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात, धोम गावाजवळ कृष्णा नदीवरील माती भराव आणि गुरुत्वाकर्षण धरण आहे. धोम धरणाचे बांधकाम 1976 मध्ये सुरू झाले, आणि 1982 पूर्ण झाले. हे धरण सिंचन, जलविद्युत आणि पिण्याच्या पाण्यासाठी बांधले गेले आहे. व शेती, उद्योग आणि धरणाच्या काठावरील वाई , पाचगणी – महाबळेश्वर आणि आसपासच्या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी तयार करण्यात आले होते.

तसेच या धरणामुळे वाई, कोरेगाव , सातारा , जावळी आणि खंडाळा तालुक्यांना शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. या धरणाची लांबी 20 किमी व साठवण क्षमता 14 टीएमसी आहे. आणि या धरणाच्या तळघरातील वीजगृहातून 4 मेगावॅट वीज निर्माण केली जाते.

Visit our website: allindiajourney.com

5)Natraj Mandir-

नटराज मंदिर हे सातारा जिल्ह्यातील दक्षिण भारतातील प्रसिद्ध चिदंबरम येथील नटराज मंदिराच्या धर्तीवर, तामिळ स्थापत्यशैलीत बांधलेले एक सुंदर मंदिर आणि पवित्र धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी भगवान शिवाचे दिव्य नर्तक म्हणून चित्रण असलेले नटराज मंदिर आहे.

हे मंदिर 1980 च्या दशकात परमपूज्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती महास्वामीजींच्या इच्छेनुसार बांधले होते व त्यासाठी नागरिक श्री समन्ना यांनी त्यांची जमीन दान केली होती. नटराज मंदिराची प्रतिकृती असलेल्या या मंदिरात भाविक आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात भगवान नटराजाच्या दर्शनासाठी येतात.

6)Shikhar Shingnapur-

शिखर शिंगणापूर हे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक पवित्र, जागृत धार्मिक स्थळ आहे. हे शिव शंभू महादेवाचे मंदिर महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचे कुलदैवत असून हे ठिकाण ऐतिहासिकदृष्ट्या यादव कुळातील सिंघनराजाशी संबंधित आहे. तसेच या मंदिराची छत्रपती शिवाजी महाराजांचे खाजगी मंदिर म्हणूनही ओळख आहे.

हे मंदिर डोंगराळ भागात एका उंच टेकडीवर असून मंदिराच्या आवारात पाच नंदी आहेत. व मंदिराला दगडी तटबंदी आहे. येथील मंदिर परिसरात अमृतेश्वर बळी मंदिर, हत्तीची सोंड, भागीरथी कुंड, जटा आपटलेले स्थान, गुप्तलिंग मंदिर, शिवतीर्थ तलाव, मुंगी घाट ही प्रेक्षणीय स्थळे आहेत. दरवर्षी गुढीपाडव्यापासून 12 दिवस येथे मोठी यात्रा भरते.

7)Ajinkyatara Fort-

अजिंक्यतारा किल्ला हा सातारा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. हा किल्ला सातारा शहराच्या उत्तरेस बामणोली-घेरादातेगड डोंगररांगेत वसलेला असून सह्याद्री पर्वतरांगातील सात पर्वतांपैकी एक असलेल्या अजिंक्यतारा पर्वतावर 3,300 फूट उंचीवर आहे. हा किल्ल 12 व्या शतकात शिलाहार राजवंशाच्या राजा भोज यांनी बांधला होता. आणि हा किल्ला “सप्त-ऋषींचा किल्ला” व “अभेद्य तारा'” म्हणूनही ओळखला जातो.

1673 मध्ये, मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूर सल्तनतकडून हा किल्ला जिंकला व नंतर हा किल्ला मराठा इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचे स्थळ बनला. या किल्ल्यावर भगवान मारुती, शंकर आणि देवी मंगला यांची मंदिरे आहेत. व ट्रेकिंग, हायकिंग आणि गिर्यारोहणा करणाऱ्यांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

8)Chalkewadi Wind Mill Farm-

चाळकेवाडी पवनचक्की प्रकल्प हा सातारा जिल्ह्यातील वनकुसवडे पठारावर असलेला आशियातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प आहे. हा प्रकल्प 5 किलोमीटरच्या विस्तीर्ण पठारावर असून प्रदूषण न करता स्वच्छ वाऱ्याच्या साहाय्याने ऊर्जा देणारा व ऊर्जानिर्मिती करणाऱ्या प्रकल्पांपैकी एक आहे.

हा परिसर हिरव्यागार टेकड्या, लाल माती आणि अनंत रांगेत उभ्या असलेल्या पवनचक्क्यानी बहरलेला आहे. या पठारावर शेकडो पवनचक्क्या उभारलेल्या असून,निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीसाठी हे एक पर्यटनाचे प्रमुख ठिकाण आहे.पावसाळ्यात येथे धुके आणि वाऱ्यामुळे एक वेगळेच वातावरण होते.

9)Bara motichi Vihir-

बारामोटेची विहीर ही सातारा जिल्ह्यातील लिंब गावात असलेली एक ऐतिहासिक पायऱ्यांची विहीर आहे. ही दगडी विहीर 300 वर्ष जुनी असून छत्रपती शाहू महाराजांच्या दुसऱ्या पत्नी विरुबाई भोसले यांनी 1719 ते 1724 या काळात बांधली. ही विहीर 110 फूट खोल आणि 50 फूट रुंद आहे. ही विहीर, महाराष्ट्रातील स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.

आणि ही विहीर बांधताना 3300 आंब्याची कलमे लावण्यात आले होती. व शेती व आजूबाजूच्या आंब्याच्या बागांना पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आली होती. तसेच या विहिरीच्या मध्यभागी एक भूमिगत राजवाडा व दगडात कोरलेली वेगवेगळी सुंदर शिल्पे आहेत.

10)Dategad Fort-

दातेगड किल्ला हा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेला एक गिरीदुर्ग आहे. हा किल्ला नैसर्गिक काळ्या कातळांच्या तटबंदीमध्ये बांधलेला असून एका उंच पठारावर 3 एकर क्षेत्रात वसलेला आहे. या किल्ल्याच्या सर्व बाजूंनी कोरीव काम आहे. व हा किल्ला सुमारे 30 फूट उंच आहे. आणि येथील टेबललँडमध्ये प्रवेश करण्यासाठी एक प्रवेशद्वार आहे. या किल्ल्यावर भगवान हनुमान आणि गणपतीच्या 10 फूट उंच मूर्ती व दगडात कोरलेले एक शिवलिंगआहे.

तसेच या ठिकाणी एक तलवारीच्या आकाराची, लॅटराइट खडकात कोरलेली 100 फूट खोल विहीर आहे. व किल्ल्यावर दोन मोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत. या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या टोलेवाडी गावातून 45 मिनिटांचा सोपा ट्रेक किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जातो. पर्यटकांना दातेगड, गुणवंतगड आणि वसंतगड हे तिन्ही किल्ले खाजगी वहानाने एका दिवसात पाहाता येतात.

11)Nana Fadanvis wada Menavali-

नाना फडणवीस वाडा हा सातारा जिल्ह्यातील वाईजवळ मेणवली येथे असलेला एक पेशवेकालीन, ऐतिहासिक वाडा आहे. हा वाडा 1768 मध्ये नाना फडणवीस यांनी बांधला. हा वाडा आजही चांगल्या स्थितीत असून दुमजली आणि चौसोपी पद्धतीचा आहे. व वाड्यातील खोल्या, नानांचा पलंग आणि शयनकक्ष, महिलांसाठी खास हळदी – कुंकू कार्यक्रम करण्यासाठी चौक,

खलबतखाना, पंगतीचा चौक, कचेरी, विहिरी, कारंजे अशी या वाड्याची रचना आहे. तसेच या वाड्यापासून कृष्णा नदीकडे जाणारा सुंदर घाट आणि विष्णू व शिव (मेनेश्वर) मंदिर आहेत. आणि या वाड्यात 1707 सालची घंटा व वाड्याबाहेर प्राचीन, आफ्रिकन बाओबाब वृक्ष आहे. या वाड्यात अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.

12)Dholya Ganpati/ Mahaganpati Vai-

ढोल्या गणपती मंदिर हे सातारा जिल्ह्यातील वाई येथील कृष्णा नदीच्या काठी वसलेले एक प्राचीन आणि भव्य गणपती मंदिर आहे. हे मंदिर 1762 मध्ये सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी बांधले होते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे की येथे एकाच दगडात कोरलेली गणपतीची विशाल मूर्ती आहे. ही श्री गणेशाची प्रसन्न, आनंददायी भव्य मूर्ती सुमारे 10 फूट उंच आणि 8 फूट रुंद असून बसलेल्या स्थितीत आहे.

या भव्यतेमुळे त्याला महागणपती असेही म्हटले जाते. वाई हे ठिकाण श्री तीर्थक्षेत्र आणि दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. या गणपती मंदिरा व्यतिरिक्त या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण घाट, श्री सिद्धनाथांची संजीवन समाधी असलेले सिद्धेश्वर मंदिर, गंगा रामेश्वर, काशी विश्वनाथ, लक्ष्मी नारायण आणि समर्थ रामदासांनी स्थापन केलेले रोकडोबा हनुमान मंदिर आहेत.

13)Koyna Wildlife Sanctuary-

कोयना वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक वन्यजीव अभयारण्य आणि नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ आहे. या ठिकाणी घनदाट वनराई आणि जैवविविधतेने समृद्ध वनक्षेत्र आहे. पश्चिम घाटात वसलेले हे अभयारण्य 423.55 किमी क्षेत्रावर विस्तारलेले आहे व 600 ते 1,100 मीटर उंचीवर आहे. या अभयारण्यात विविध प्रकारचे वन्यजीव, महत्त्वाचे पक्षी क्षेत्र, निसर्गरम्य दृश्ये आणि जैवविविधता आढळून येते.

या अभयारण्यात माकडे,तरस, कोल्हे, खोकड, अस्वल, ऊदमांजरे,बिबटे, गवा, सांबर, साळिंदर आणि रानससे मोठ्या प्रमाणावर आहेत. हे अभयारण्य शिवसागर जलाशयाच्या काठी वसलेले असून, येथील परिसरात अनेक निसर्गरम्य पर्यटन स्थळे आहेत. 1985 मध्ये भारत सरकारने याला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले.

14)Chandoli National Park-

चांदोली राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्र राज्याच्या सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेजवळ असलेले एक राष्ट्रीय उद्यान आहे. चांदोली उद्यान हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा व कोयना वन्यजीव अभयारण्याचा भाग आहे. या ठिकाणी बारमाही वाहणाऱ्या नद्या, पाण्याचे विहिरी आणि वसंत सागर जलाशय आहे. या अभयारण्यात विविध प्रकारच्या वनस्पती, पक्षी आणि प्राणी आढळतात.

त्यामध्ये वाघ, तरस, काळवीट, शेकरू हरियाल पक्षी आणि इतर अनेक प्राणी व 35 पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. हे उद्यान 2004 मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. व 2007 रोजी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने संपूर्ण चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्य व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले.

15)Shri Bramha Chaitanya Gondavalekar Maharaj Samadhi Temple-

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज समाधी मंदिर हे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा जन्म, वास्तव्य व देहावसान गोंदवले येथे झाले. या ठिकाणी त्यांची समाधी, निवासस्थान, त्यांनी स्थापन केलेले थोरले व धाकटे राममंदिर, दत्तमंदिर, शनिमंदिर या वास्तू आहेत.

तसेच श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे 19व्या शतकातील महान संत होते, आणि ते भक्तीच्या आणि ‘राम’ नावाच्या सामर्थ्याच्या शिकवणीसाठी ओळखले जातात. त्यांनी भक्तांना ‘श्रीराम,जय राम,जय जय राम” हा मंत्र दिला आहे. देशभरातून भाविक या ठिकाणी महाराजांचे मंदिर व त्यांचे कार्य पाहण्यासाठी येतात.

16)Shri Sevagiri Maharaj Temple-

संत श्री सेवागिरी महाराज मंदिर हे सातारा जिल्ह्यातील, खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे वेदावती नदीच्या किनाऱ्यावर असलेले अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी सेवागिरी महाराजांनी 10 जानेवारी 1948 रोजी संजीवन समाधी घेतली होती. त्यांचे कार्य खूप महान आहे त्याबद्दल अशा आख्यायिका सांगितल्या जातात की, ते दररोज भिक्षा मागत परंतु एके दिवशी त्यांना कोणीही भिक्षा दिली नाही,

तेव्हा ते या मंदिरात असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली बसले आणि पिंपळाच्या झाडातून आपोआप पीठ पडले, अशा अनेक सत्य घटना पुसेगाव नगरीतील लोकांनी पाहिले आहेत. दरवर्षी डिसेंबर महिन्यात या ठिकाणी दहा दिवसाची मोठी यात्रा भरते. त्यावेळी देशभरातून भाविक सेवागिरी महाराजांच्या दर्शनासाठी येतात.

17)Siddhanath Temple, Mhaswad-

श्री सिद्धनाथ मंदिर हे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात, म्हसवड येथील मानगंगा नदीच्या काठी वसलेले प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर भगवान शंकराचा अवतार असलेल्या सिद्धनाथांचे असून बदामी चालुक्यांनी बांधले आहे. हे मंदिर सुमारे 450 वर्षांपूर्वीचे प्राचीन मंदिर आहे व दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला येथे सिद्धनाथाची भव्य रथयात्रा असते. त्यावेळी येथे मोठी जत्रा भरते.

हे मंदिर लाखो भाविकांचे कुलदैवत असून भगवान शंकराचा अवतार ‘सिद्धनाथ’ किंवा ‘नाथबाबा’ म्हणून ओळखले जातात. या मंदिरात सिद्धनाथांच्या मूर्तीवर त्रिशूळ, डमरू, शिंगी, रुद्राक्ष माळ आहेत. या जागृत देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.

18)Kalika Mata Temple-

श्री कालिका माता मंदिर हे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील धारपुडी गावामध्ये असलेले एक जागृत देवस्थान आहे. हे मंदिर धारपुडी गावचे ग्रामदैवत आहे व स्थानिक लोकांसाठी पूजनीय असून कालिका माता ही काळुबाई नावाने प्रसिद्ध आहे. दरवर्षी मार्च महिन्यात या ठिकाणी देवीची मोठी यात्रा भरते. त्यावेळी गावातील सर्व लोक देवीच्या रथाच्या दर्शनासाठी उपस्थित राहतात.

यात्रेच्या वेळी येथे संपूर्ण पुरणपोळीच्या जेवणाचा महाप्रसाद सर्वांसाठी केला जातो. त्यावेळी गावातील सर्व माता भगिनी देवीच्या मंदिर परिसरात रात्रीच्या तीन वाजल्यापासून पुरणपोळी बनवण्यासाठी येतात. तसेच इथे वर्षभर मंगळवार आणि शुक्रवार देवीची सवाष्ण घालण्याची परंपरा आहे.

19)Shree Nagnatha Temple-

श्री नागनाथ मंदिर हे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात, ललगुण जवळील नागनाथवाडी येथील एक प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे. हे मंदिर येरळा नदीच्या काठावर असून या मंदिरातील शिवलिंग जमिनीपासून 31 फूट खोल पाण्यात आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात येथे नागनाथाची मोठी यात्रा भरते.

तसेच नवसाला पावणारा नागनाथ म्हणून या मंदिराची ओळख आहे. श्रावण महिन्यात येथील शिव पिंडीवर प्रत्यक्षात नाग व नागाची पिल्ले असतात. आणि हे नाग कोणालाही इजा करत नाहीत. त्यामुळे भाविकांचे हे एक अत्यंत श्रद्धेचे ठिकाण आहे.

20)Yamai Devi Temple-

यमाई देवी मंदिर हे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध गावामध्ये आणि गावाजवळील टेकडीवर यमाई देवीची दोन धार्मिक मंदिरे आहेत. गावातील पूर्वाभिमुख मंदिर भगवानराव पंतप्रतिनिधी बांधले असून त्यांच्या राजवाड्याजवळ आहे. तर डोंगरावर असणाऱ्या मंदिराला बाजूनी तटबंदी आहे व तेथे जाण्यासाठी एक पायरी मार्ग आहे व दुसरे आपण वाहनाने मंदिरापर्यंत जाऊ शकतो.

हे मंदिर अनेक मराठी कुटुंबाचे कुलदैवत असून,मंदिर संकुलात राक्षस औंधासुराचे डोके, एक नंदी आणि एक शिवलिंग व काळ्या दगडात बनवलेली यमाई देवीची दोन मीटर उंच मूर्ती आहे. सध्या प्रमुख गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी टेकडीवरील यमाई मंदिराच्या शिखरावर 7 किलोग्राम सोन्याचा कलश स्थापित केला आहे. आणि टेकडीच्या मधल्या भागात औंधच्या महाराजांनी स्थापन केलेले अत्यंत सुंदर ‘श्री भवानी संग्रहालय’ आहे.

21) Kas Pathar-

कास पठार हे साताऱ्यातील सुंदर ठिकाण आहे. येथे ज्वालामुखी युक्त लालसर माती आहे. साताऱ्यातील महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये हे एक ठिकाण येते. पाचगणी आणि महाबळेश्वर पासून हे ठिकाण खूप जवळ आहे. तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल तर हे ठिकाण पाहणे अजिबात चुकू नका.

साधारण सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये हे ठिकाण वेगवेगळ्या प्रजातीच्या फुलांनी बहरलेले असते. जगातील सर्व कानाकोपऱ्यातील लोक या ठिकाणाला भेट देत असतात. अशा या सुंदर कास पठाराला एकदा तरी अवश्य भेट द्या.

22)Pratapgad Fort-

महाबळेश्वर हिल स्टेशन पासून जवळ असलेला सातारा जिल्ह्यातील प्रतापगड हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. जमिनीपासून साधारण 3500 मीटर उंचीवर हा किल्ला आहे. येथील तटबंदी सुस्थितीत असल्यामुळे खूप पर्यटक येथे येत असतात.येथे असलेल्या चार तलावा पैकी काही तलाव पावसाळ्यात पाण्याखाली जातात. मोटारीने गेल्यानंतर रस्त्याच्या शेवटी मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक टेहळणी बुरुज आहे.

येथे साधारण 60 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित करण्यात आला होता. किल्ल्याच्या शिखर भागी भवानी मातेचे मंदिर असून किल्ल्याच्या इतिहासाचे वर्णन करणारे सांस्कृतिक ग्रंथालय आहे. तसेच किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावातून प्रतापगडकडे जातानाहस्तकला केंद्र आहे. पर्यटक तिथे आवर्जून भेट देतात.

23) Tapola

तापोळा हे उपग्रह गाव असून महाबळेश्वर मध्ये ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी तुम्ही निसर्गातील सुंदर दृश्य अनुभवू शकता. तापोळा येथे एक तलाव असून बाजूला घनदाट जंगल आहे. येथेच वासोटा आणि जयगड सारखे अज्ञात किल्ले आहेत. जंगल ट्रेक करणाऱ्या लोकांना वासोटा किल्ला हे एक उत्तम ठिकाण आहे.

विशेष म्हणजे वासोटा किल्ल्यावरील हाय किंग. या 90 किलोमीटर लांबीच्या जलाशयात विविध अज्ञात बेटे पसरलेली आहेत. तसेच येथे असलेल्या शिवसागर तलावात बोटिंग करता येते. येथे असलेल्या अभूतपूर्व गोष्टींमुळे सहलीचा अप्रतिम आनंद आपल्याला मिळतो.

24) Mahabaleshwar Temple-

महाबळेश्वर हे शिवाचे प्राचीन मंदिर आहे. जे सर्वांच्या भक्तीचे श्रद्धास्थान आहे. महाबली म्हणून प्रसिद्ध असलेले हे मंदिर शिवाचे जागृत देवस्थान आहे. चित्त थरारक परिसरात वसलेल्या या सुंदर मंदिरात सोळाव्या शतकातील मराठा साम्राज्याच्या स्मृती आहेत. हे उल्लेखनीय मंदिर पाच फूट उंच भिंतीत बंद असून आतील आणि बाहेरील कक्षांनी बनलेले आहे.गर्भगृहाच्या आत मध्ये शिवाचे वास्तव्य आहे. मंदिरा आवारात शिव पलंग, ढोल, डमरू,त्रिशूल,नंदी आणि कालभैरव यांच्या कोरीव काम केलेल्या मूर्ती आहेत.

या मंदिरातील आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे येथील मंदिरातील शिवलिंग सहा फूट लांबीचे आहे. महाबळेश्वर मंदिर हे एक पवित्र स्थान असून बाराही महिने भाविक दर्शनासाठी येत असतात.या ठिकाणी अजून दोन मंदिरे आहेत ती म्हणजे अतीबलेश्वर मंदिर आणि पंचगंगा मंदिर. महाबळेश्वर मंदिर हे दक्षिण भारतातील हेमदंत कलेचा उत्तम नमुना आहे.

25) Kamalgad Fort-

कमळगड हा एक चौकोनी आकार असलेला डोंगरी किल्ला आहे. साताऱ्यातील महत्त्वाच्या किल्ल्यांमध्ये हा एक किल्ला आहे. आपण जेव्हा किल्ल्यावर जातो तेव्हा खालील नयनरम्य दृश्य आपल्याला पाहायला मिळते. या किल्ल्यापासून दूरवर असलेले धुम धरण आणि हिरवागार परिसर आपल्या मनाला आनंद देतो. मात्र हा किल्ला कोणी बांधला किंवा चालवला याबद्दलचे कोणतेही तपशील भेटत नाहीत.

हा किल्ला विजापूरच्या अधिपत्याखाली आलेला होता. कमल गड किल्ला 1818 मध्ये ब्रिटिश सैन्यांनी ताब्यात घेतला होता. आणि त्याचे रूपांतर तुरुंगात केले होते. गुन्हेगारांना या ठिकाणी फाशी दिली जायची. वाई तालुक्यातील नांदगणे या ठिकाणी हा किल्ला आहे. या किल्ल्यावर प्रवेश शुल्क नाही. साताऱ्यापासून हा किल्ला 64.5 किमी अंतरावर आहे.

26)Dhobi Waterfall-

धोबी धबधबा हा एका साईटने लोडविक एलफिस्टन पॉईंटला जोडलेला आहे. आणि नंतर लहान रस्त्याने जुन्या महाबळेश्वर रोडला जोडतो. निसर्गप्रेमींसाठी हे एक खूप छान ठिकाण आहे. येथे भरपूर खडक आणि हिरवळ कोयना नदीवरील धुके येथून पाहाव्यास मिळते.महाबळेश्वर पासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. पिकनिक साठी हे एक उत्तम ठिकाण असून पावसाळ्यात येथे खूप गर्दी असते.

सातारा पासुन या धबधब्याचे अंतर 58.8 किमी आहे.आहे. या धबधब्यावरून कोसळणारे पाणी इंद्रधनुष्यासारखे भासते. कोयना नदीवरील धुके येथून पाहाव्यास मिळते.महाबळेश्वर पासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. पिकनिक साठी हे एक उत्तम ठिकाण असून पावसाळ्यात येथे खूप गर्दी असते.

27)Panchgani-

महाबळेश्वर मधील पाचगणी हे एक सुंदर हिल स्टेशन आहे. समुद्रसपाटीपासून 1334 मीटर उंचीवर हे ठिकाण आहे. या ठिकाणी पाच टेकड्यांपासून सह्याद्रीच्या पर्वत रांगा बनलेल्या आहेत म्हणून या ठिकाणाला पाचगणी असे नाव पडले आहे. याशिवाय येथे असलेल्या टेकड्या आणि किनारी मैदानी यांच्यामध्ये चित्तथरारक दृश्य पाहायला मिळतात. ब्रिटिश काळात उन्हाळ्यामध्ये हे ठिकाण अल्हाददायक मानले जात होते. आणि आजही तसेच मानले जाते. पाचगणी ला महाबळेश्वर चे जुळे स्थान म्हणून पण ओळखले जाते.

आजूबाजूला असलेल्या हिरव्या गार दऱ्या आणि रसाळ स्ट्रॉबेरी चे असंख्य मळे यामुळे हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. खरे तर पाचगणी ला “भारताचे स्ट्रॉबेरी गार्डन” म्हणून पण ओळखले जाते. फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान येथील स्ट्रॉबेरी चे उत्पादन मुबलक प्रमाणात मिळते. येथील स्ट्रॉबेरी खाऊन मन तृप्त होते. सातारा पासुन हे ठिकाण 48.8 किलोमीटर अंतरावर आहे.

28)Chandan-Vandan Fort –

चंदन वंदन किल्ला हा सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये असलेला किल्ला डोंगराच्या माथ्यावर आहे. बारा शतका शेवटी ख्रिस्त पूर्व शिलाहार राजवंशातील भोज राजा दुसरा यांनी हा किल्ला बांधला. हा किल्ला धार्मिक लोक आणि गिर्यारोहकांना आकर्षित करतो. चंदन वंदन हे दोन शेजारी शेजारी किल्ले आहेत.हे दोन्ही किल्ले भव्य असून याचा उल्लेख राज वंशापासून दुसऱ्या राज वंशात आणि मराठ्यांपासून मोगलापर्यंत केलेला आहे.

किल्ल्याभोवती सोडून दिलेले दरवाजे आणि बुरुज आहेत. या बुरुजांमध्ये शिवमंदिर, मशीद आणि अनेक खोल्या आहेत. या किल्ल्याला तुम्ही अवश्य भेट देऊ शकता. येथे प्रवेश शुल्क आकारले जात नाही. सातारा पासुन हा किल्ला 26 किमी अंतरावर आहे.

29)Char Bhinti-

सातारा जिल्ह्यातील प्रेक्षणीय ठिकाण म्हणजे चार भिंती. राजा छत्रपती प्रताप सिंह यांनी 1850 मध्ये हे ठिकाण बांधले होते. शत्रु वर लक्ष ठेवण्यासाठी या ठिकाणाची निर्मिती करण्यात आली होती. संपूर्ण सातारा शहर पाहण्याची क्षमता असलेले हे ठिकाण आहे.काही इतिहासकार असे सांगतात की 1850 च्या दशकात ,

आपल्या देशावर राज्य करणारे राजे आणि राणी चार भिंती या ठिकाणाचा वापर करत असत. 2001 मध्ये या ठिकाणाचे पुनर्वसन करण्यात आले. चार भिंती पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. सातार पासून हे ठिकाण फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे. येथे कोणतेही प्रवेश शुल्क नाही.

30)Arthur Seat Point 

आर्थर सीट पॉईंट मध्ये तुम्ही जर हलकी वस्तू फेकली तर हवेच्या दाबामुळे ती परत वरती तरंगते. मालेट की पत्नी आणि मुलगी सावित्री नदीमध्ये बुडाली होती. त्यावेळी आर्थर येथे बसून धबधब्याकडे पहात असे. व्हूपॉईंट वर पोहोचण्यासाठी पार्किंग मधून 30 मिनिटे लागतात. येथे प्रवेश शुल्क नाही. साताऱ्यापासून हे अंतर 68.1 किमी आहे.

31)Wilson Point (Sunrise Point)-

विल्सन पॉईंट हे महाबळेश्वर मधील ठिकाण सर लेस्लि विल्सन यांच्या नावाने ओळखले जाते. या विस्तीर्ण पठारावरील निसर्ग अत्यंत मंत्रमुग्ध करणारा आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातील लोक येथील सूर्योदय पाहण्यासाठी येत असतात. येथील परिसरात पसरलेल्या सूर्याचे रंग अतिशय सुंदर दिसतात. येथील सूर्यास्ताचे दृश्य ही विहंगम असते

32) Thoseghar waterfalls-

साताऱ्यातील नयन रम्य ठिकाण म्हणजे ठोसेघर धबधबा.हा धबधबा सातारा जिल्ह्यातील तारळी नदीवर आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंचीवर हा धबधबा आहे. आणि भारतातील उंच धबधब्यांच्या यादीत याचा दुसरा क्रमांक आहे.

सातारा पासून 26 किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. हा धबधबा ठोसेघर गावामध्ये असून गावाच्या नावावरून या धबधब्याला ठोसेघर नाव देण्यात आले आहे. येथील निसर्गाचे दृश्य अद्भुत आहे

33) Koyna Dam-

कोयना धरण हे कोयना नदीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. 1956 मध्ये महाराष्ट्र शासनाने हे धरण बांधले. कोयना धरण जलाशयाला शिवसागर नावाने ओळखले जाते. या धरणाची क्षमता 1,960 मेगावॅट इतकी आहे. या धरणाचा स्लिप वे मध्यभागी असून दुसऱ्या टोकाला तापोळा हे गाव आहे.

येथील जलविद्युत प्रकल्प भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पूर्ण झालेला जलविद्युत प्रकल्प आहे.सातारा जिल्ह्यातील कोयना नगर मध्ये हे धरण आहे.या धरणामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतीला पाणी मिळते. तसेच या धरणावर मोठ्या जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती केली आहे.कोयना धरणाचा जलाशय शिवसागर या नावाने ओळखला जातो.

34) Sajjangad-

सातारा जिल्ह्यातील सज्जनगड हे एक महत्त्वाचे स्थान आहे. समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ठिकाणाला अवश्य भेट दिली पाहिजे. साताऱ्यापासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर सज्जनगड हे ठिकाण आहे. परळी गावातून पायी मार्गाने सज्जनगड वर जाता येते.

तसेच सातार मधून बसेसची सोय पण आहे. सज्जनगड च्या उत्तरेला महाबळेश्वर, रायगड, प्रतापगड किल्ले आहेत. तर दक्षिणेला कळंब पश्चिमेला खेड व चिपळूण शहर आणि ईशान्येला सातारा शहर व अजिंक्यतारा किल्ला आहे.

35) Mumbai point Sunset Point-

मुंबई पॉईंट म्हणजेच सनसेट पॉईंट. महाबळेश्वर पासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. येथील सूर्यास्ताचे अभूतपूर्व दृश्य बघण्यासाठी लोक खूप गर्दी करतात. परंतु तुम्हाला येथे 5:30 च्या अगोदर पोहोचले पाहिजे. तरच तुम्ही सनसेटचा आनंद घेऊ शकता.

Visit the travel blog

FAQ

Q-1)सातारमधील चार भिंती कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत ?

Ans-सातारमधील चार भिंती या हुतात्मा स्मारक नावाने प्रसिद्ध आहेत.

Q -2)सातारमधील कोयना धारण कोणत्या साली बांधले गेले ?

Ans-१९५६ मध्ये महाराष्ट्र शासनाने कोयना धारण बांधले.

Q-3)चंदन वंदन किल्ला कोणी बांधला ?

Ans-शिलाहार राजवंशातील राजा भोज दुसरा यांनी हा किल्ला बांधला.

Q-4)मुंबई पॉईंट सातारा जिल्यातील कोणत्या शहरात आहे ?

Ans-मुंबई पॉईंट महाबळेश्वर शहरात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top