राजकोट जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे- Top 32 places to visit in Rajkot District

मित्रांनो भारतभ्रमंतीमध्ये, भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळांची माहिती मिळणार आहे. आता तुम्ही पाहणार आहात गुजरात राज्यातील राजकोट जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे.राजकोट जिल्हा हा गुजरातमधील चौथ्या नंबरचे मोठे शहर आणि आजी व न्यारी नद्यांच्या काठावर वसलेला, सौराष्ट्र प्रदेशातील जिल्हा आहे. 1610 मध्ये विभाजी जडेजा आणि राजू सांधी यांनी याची स्थापना केली. तसेच हा जिल्हा औद्योगिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक क्षेत्रात आघाडीवर असून, हे शहर महात्मा गांधीजींचे शालेय शिक्षण याच ठिकाणाहून झाल्यामुळे गांधींची कर्मभूमी म्हणून ओळखले जाते.Top 32 places to visit in Rajkot District

येथे अभियांत्रिकी, ऑटोमोबाईल भाग, शैक्षणिक संस्था, हस्तकला, विणकाम, भरतकाम, कापड, चांदी आणि दागिन्यांचे प्रमुख उद्योग आहेत. सध्याचे हे गजबजलेले शहर पूर्वी सौराष्ट्र, कच्छ आणि उत्तर गुजरातमधील 400 रियासतांचे प्रशासकीय केंद्र होते. आणि नंतर ब्रिटिश राजाचे मुख्यालय होते. राजकोट जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक सांस्कृतिक व सामाजिक पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे हे शहर पर्यटकांना आकर्षित करते.

Top 32 places to visit in Rajkot District

राजकोट जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे

1)BAPS Shri Swaminarayan Mandir-

Top 32 places to visit in Rajkot District

बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिर कालावड रोड आणि गोंडल येथील अक्षर देरी (स्वामीनारायण मंदिर) ही दोन्ही मंदिरे गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील अत्यंत पवित्र व धार्मिक स्वामीनारायण मंदिर आहेत. गोंडल येथील BAPS श्री स्वामीनारायण मंदिर (अक्षर मंदिर), हे राजकोट जिल्ह्यातील एक प्रमुख आध्यात्मिक केंद्र आहे.

या मंदिराची स्थापना 1934 मध्ये शास्त्रीजी महाराज यांनी केली होती. पांढऱ्या संगमरवरी वास्तुकला मध्ये असलेले हे मंदिर गुणीतनानंद स्वामींची स्मृती ‘अक्षरदेरी’ येथे आहे. या मंदिरात भगवान स्वामीनारायणांचे भक्त जगभरातून गोंडल येथे येऊन ‘अक्षरदेरी’ मध्ये दर्शन व प्रार्थना करतात.

तर दुसरे स्वामीनारायण मंदिर हे राजकोटच्या कालावड रोडवर असलेले एक भव्य, शांत, उत्कृष्ट नक्षीकाम आणि संगमरवरी वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना असलेले प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराची स्थापना 1998 मध्ये करण्यात आली. या मंदिरात भगवान स्वामीनारायण आणि हरिकृष्ण महाराजांच्या मूर्ती आहेत, आणि येथे सुंदर बगीचा, शांत व आध्यात्मिक वातावरण आहे.

2)Kaba Gandhi No Delo-

काबा गांधी नो डेलो (काबा गांधींचे निवासस्थान) हे गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील, महात्मा गांधींचे बालपणचे निवासस्थान असून सध्या ते एक प्रमुख संग्रहालय आहे.महात्मा गांधींचे वडील करमचंद गांधी हे काबा गांधी म्हणून प्रसिद्ध होते. 1887 मध्ये करमचंद गांधी राजकोटचे दिवाण असताना ते या घरात राहत होते. या त्यांच्या निवासस्थानी गांधीजींच्या आयुष्यातील अनेक छायाचित्रे ,

गांधींचे फोटो, चित्रे, वस्तू आणि स्मृती जतन केल्या आहेत. महात्मा गांधीनी त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीची वर्ष घालवल्यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्व आहे.या दोन मजली इमारतीचे नाव 8 असे असून ते कडिया नवलाईन. ते लखाजीराज रोडवर आणि घीकांत रोडवर आहे.

3)Rotary Dolls Museum-

रोटरी डॉल्स म्युझियम हे गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील,यग्निक रोडवरील ‘नागरिक बँक बिल्डिंग’च्या दुसऱ्या मजल्यावर असलेले अद्वितीय बाहुल्यांचे संग्रहालय आहे. या संग्रहालयाची संकल्पना रोटेरियन दीपक अग्रवाल यांनी केली होती. रोटरी क्लबने जगभरातील या बाहुल्या राजकोट मिडटाऊनच्या रोटरी क्लबला दान केल्या आहेत. या रोटरी डॉल्स म्युझियमची स्थापना 2004 मध्ये करण्यात आली.

या संग्रहालयात 102 पेक्षा जास्त देशातील, आणि 1600 पेक्षा जास्त पारंपारिक बाहुल्यांचा युनिक संग्रह आहे. हे संग्रहालय 9,000 चौरस फुटांवर पसरलेले असून, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद केले आहे. मुलांसाठी हे एक उत्तम पर्यटन स्थळ असून या संग्रहालयात संस्कृती, वारसा आणि जागतिक मैत्रीचे दर्शन घडते.

4)Prem Mandir-

प्रेम मंदिर हे गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील, कालावाड रोड, बिशप्स हाऊस येथे असलेले प्रसिद्ध सायरो-मलबार कॅथोलिक चर्च आहे. हा चर्च ‘सेक्रेड हार्ट कॅथेड्रल’ म्हणूनही ओळखले जातो. हा चर्च एक अद्वितीय धार्मिक आणि स्थापत्यशास्त्रीय स्मारक असून, येशूच्या सेक्रेड हार्टला समर्पित आहे. या चर्चची रचना कॅथेड्रल अश्विनभाई संघवी यांनी काचेच्या कामाने डिझाइन केले होती,

या ठिकाणी पारंपारिक हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध शैली एकत्र केल्या आहेत. या अद्वितीय वास्तुकला असलेल्या चर्चमध्ये वेगवेगळ्या धर्माचे प्रतीक असलेले पाच घुमट आहेत. व मुख्य घुमटात कमळाच्या फुलावर प्राच्य शैलीतील क्रॉस व कमळ फुलावर बसलेले येशूचे मोजेक आहे. आणि या चर्चमध्ये ‘आरती’ ही भारतीय उपासनेची एक पद्धत आहे.

Visit our website: allindiajourney.com

5)Watson Museum-

वॉटसन संग्रहालय हे गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील, जुबली गार्डनमध्ये असलेले, गुजरातमधील दुसरे व सौराष्ट्रातील सर्वात जुने व महत्त्वाचे संग्रहालय आहे.क्वीन व्हिक्टोरिया मेमोरियल इन्स्टिट्यूटच्या इमारतींमध्ये असलेल्या या संग्रहालयाची स्थापना जडेजा राजपूतांनी केली आहे. या संग्रहालयात अनेक विभाग असून त्यामध्ये राज्यातील मौल्यवान वस्तू, हस्तलिखिते, कापड, शिलालेख, शिल्पे, नाणी, मानववंशशास्त्र, भरतकाम, हस्तकला,

​​संगीत वाद्ये, लाकूडकाम, नैसर्गिक इतिहास,खडक आणि खनिजे, 13 व्या शतकातील मंदिरातील पुतळे, कोरीवकाम, वसाहती शासकांच्या स्मृतिचिन्हे, ग्रंथालयातील चित्रे आणि काही शासकांनी दान केलेली चित्रे आहेत. आणि ब्रिटिश राजकीय एजंट कर्नल जॉन वॉटसन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 1888 मध्ये या संग्रहालयाला वॉटसन संग्रहालय हे नाव देण्यात आले आहे.कर्नल वॉटसन यांना इतिहास आणि पुरातत्वशास्त्राची आवड होती.

6)Shree Ranchhoddasji, Ashram, Rajkot-

श्री रणछोडदासजी बापू, आश्रम, हा गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील कुवावडा रोडवर असलेले दैवी संतांचे पवित्र स्थान आहे. या ट्रस्टची स्थापना श्री रणछोडदासजी बापूंनी 11 मे 1946 रोजी केली होती आणि मानवजातीची सेवा हीच ईश्वराची सेवा हा गुरुमंत्र दिला. तेव्हापासून या आश्रमात गरजू आणि गरीब लोकांना अन्न, कपडे, मोफत नेत्र रुग्णालय,औषध इत्यादी सेवा दिल्या जातात.

याशिवाय या ठिकाणी गौशाळा, गरजूंना टिफिन सेवा, कमी किमतीत वैद्यकीय चाचण्यांसाठी प्रयोगशाळा, होमिओपॅथी केंद्र, औषध दुकान, अखंड राम धुन असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. दररोज अनेक गरजू लोक, भक्त आणि पर्यटक मनशांतीसाठी या आश्रमला भेट देतात.

7)Khambhalida Caves –

खांभलिदा लेणी ही गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील,ऐतिहासिक लेण्या आहेत. या प्राचीन लेण्यांमध्ये दगडात कोरलेल्या कथा, सूक्ष्म आणि नाजूक कोरीव काम व शिल्पे आहेत. बौद्ध धर्माचा या लेणी चौथ्या शतकातले असल्याचे सांगितले जाते. या ठिकाणी लेण्यांमध्ये 15 गुहांच्या समूहात लेण्यांचे अवशेष आहेत व मध्यभागी चैत्यगृह आहे.

तसेच येथे प्रवेशद्वारावर बोधिसत्व, अवलोकितेश्वर आणि वज्रपाणी यांच्या गुंतागुंतीच्या शिल्पाकृती व देवालयेही आहेत. या लेण्या पाहताना प्राचीन काळातील कलाकारांचे कौशल्य समजते. बौद्ध भिक्षू त्या काळात या गुहामध्ये एकांतात ध्यान व अध्ययन करीत असत. पुरातत्वशास्त्रज्ञ पी.पी. पंड्या यांनी 1958 मध्ये या लेण्यांचा शोध लावला.

8)Nyari Dam-

न्यारी धरण हे गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील, एक महत्वाचे सिंचन, पाणीपुरवठा धरण व पर्यटन स्थळ आहे. हे सुंदर धरण न्यारी नदीवर बांधलेले आहे. धरण परिसर हिरवाईने वेढलेला असून पर्यटक येथे पिकनिक व बोटिंगचा आनंद घेतात. याशिवाय या धरणावर मासेमारी हे केली जाते.

हे धरण स्थानिक लोकांमध्ये एक लोकप्रिय पिकनिक ठिकाण आहे.तसेच हे शांत व रम्य ठिकाण निसर्गरम्य परिसर,मुलांसाठी खेळण्याचे क्षेत्र, हिवाळ्यात येणारे स्थलांतरित पक्षी, मासेमारी, नौकाविहार आणि सुंदर सूर्यास्तासाठी लोकप्रिय पिकनिक स्पॉट मानले जाते.

9)Lang Library-

लँग लायब्ररी ही गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील,जुबिली गार्डनजवळ जवाहर रोडवर असलेली, शहरातील सर्वात जुन्या ग्रंथालयांपैकी एक असून येथे प्राचीन साहित्याचा मोठा व अमूल्य संग्रह आहे. या ग्रंथालयात काठियावाडी आणि गुजराती साहित्याचा, हस्तलिखिते, आणि इतर ब्रिटिश काळातील दुर्मिळ पुस्तकांचा अतुलनीय संग्रह आहे.

या ग्रंथालयात 3 लाखापेक्षा जास्त पुस्तके आहेत. वाचनाची आवड असणाऱ्या व साहित्यप्रेमी लोकांसाठी हे एक शांत ठिकाण आहे. याशिवाय या ग्रंथालयात लहान मुलांसाठी ही पुस्तके उपलब्ध आहेत. सध्या हे ग्रंथालय राजा राममोहन रॉय लायब्ररी फाउंडेशनच्या मदतीने डिजिटल करण्यात आले आहे.

10)Jagat Mandir-

जगत मंदिर हे गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील, रामकृष्ण आश्रमातील श्री रामकृष्ण परमहंस यांना समर्पित मंदिर व शांत, अध्यात्मिक स्थळ आहे. 1934 मध्ये लाल दगडाने बांधलेले हे मंदिर, ‘युनिव्हर्सल टेंपल’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. या मंदिरातील पांढऱ्या संगमरवरी दगडातून बनवलेली भगवान श्री रामकृष्ण परमहंस यांची मूर्ती ही बेलूर मठातील मूर्तीप्रमाणेच आहे.

तसेच या मंदिराची उंची सुमारे 168 फूट आहे. व मंदिराची रचना आधुनिक शैलीतील असून त्यामध्ये हिंदू, इस्लाम, बौद्ध आणि ख्रिश्चन अशा विविध धर्मांचे एकत्रित दर्शन मिळते. या मंदिराची मूळ संकल्पना स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित आहे व रचना श्री मधुकर ठाकोर यांनी केली आहे.

11)Ranjit Villas Palace-

रणजित विलास पॅलेस हा गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील,वांकानेर येथील एक सुंदर व ऐतिहासिक राजवाडा आहे. हा पॅलेस पूर्वीच्या राजकोट राजघराण्याचे निवासस्थान आहे. आणि हा राजवाडा 1870 मध्ये राजकोटचे तत्कालीन ठाकोर साहिब बावाजीराज मेहरमानसिंहजी यांनी बांधला होता.1847 च्या दुष्काळानंतर लोकांना मदत करण्यासाठी म्हणून या राजवाड्याचे बांधकाम सुरू झाले होते.

हा राजवाडा मुघल, इटालियन, व्हिक्टोरियन आणि गॉथिक शैलींचे उत्कृष्ट मिश्रण असून, सहा एकरांवर विस्तारलेला आहे.या राजवाड्यामध्ये 7 मजली घड्याळाचा मनोरा, आकर्षक घुमट आणि 100 खोल्या आहेत. तसेच राजवाड्याच्या गॅरेजमध्ये जुन्या शाही गाड्यांचा संग्रह आहे. व राजवाड्याच्या परिसरात आशापुरा मातेचे एक मंदिर आहे.

12)Analgadh Fort & Hill –

अनलगढ किल्ला हा गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील, एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. या टेकडीवर 1800 च्या दशकात बांधलेला एक प्राचीन किल्ला व टेकडीच्या शिखरावर कालिका माताजींचे प्राचीन मंदिर आहे. या किल्ल्याचा परिसर अत्यंत निसर्गरम्य व हिरवाईने नटलेला आहे.

येथून सूर्यास्त आणि सूर्योदयाचे टेकडीवरून दिसणारे दृश्य अत्यंत विलोभनीय व मनोहरी असते. तसेच पर्यटकांसाठी हे ठिकाण ट्रेकिंग, हायकिंग आणि सायकलिंगसाठी प्रसिद्ध आहे.निसर्गाच्या सानिध्यात एक दिवसाच्या पिकनिक साठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

13)Iskcon Temple-

इस्कॉन मंदिर हे गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील, कालावाड रोड, येथील ‘श्री श्री राधा नीलमाधव धाम’ हे एक भव्य मंदिर आहे. हे मंदिर 2003 मध्ये परमपूज्य महाविष्णु गोस्वामी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली, स्थापित करण्यात आले. हे मंदिर शांत, आध्यात्मिक वातावरण आणि भक्ति-योगासाठी प्रसिद्ध आहे.

येथे राधा-कृष्ण, सुभद्रा, भगवान नरसिंह, बलराम आणि राम-सीता यांच्या मूर्ती आहेत. भाविकांसाठी हरे कृष्ण मंदिर हे एक आध्यात्मिक शांततेचे प्रमुख केंद्र व आश्रम आहे. या मंदिराचे उद्घाटन नरेंद्र मोदी आणि आल्फ्रेड फोर्ड यांच्या हस्ते झाले होते.

14)Jalaram Bapa Mandir-

जलाराम बापा मंदिर हे गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील, वीरपूर येथील एक अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. श्री जलाराम बापा हे महान संत होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य गरजू आणि गरिबांची सेवा करण्यात घालवले.जलाराम बापाचा जन्म 1799 मध्ये वीरपूर येथे झाला. वीरपूर येथील जलाराम मंदिरात जलाराम बापांनी वापरलेली कपड्यांची झोळी आणि काठी आहे,

भाविक त्याचे मनोभावे दर्शन घेतात. आणि त्यांनी पूजा केलेल्या राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाच्या देवतांच्या मूर्ती आहेत. हे जगातील असे एकमेव मंदिर आहे जिथे कोणतीही देणगी स्वीकारली जात नाही तरीही दररोज हजारो भाविकांना मोफत भोजन दिले जाते.

15)Naulakha Palace-

नौलखा पॅलेस हा गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील,गोंडली नदीच्या काठावरील एक भव्य, प्राचीन व ऐतिहासिक राजवाडा आहे. हा पॅलेस 17व्या शतकात बांधला. त्या काळात याच्या बांधकामासाठी नऊ लाख रुपये खर्च आला होता, म्हणून याला ‘नवलखा’ पॅलेस असे नाव देण्यात आले. हा राजवाडा गोंडल मधील सर्वात जुन्या राजवाड्यांपैकी एक असून जडेजा राजवंशाने बांधला आहे.

या पॅलेसची स्थापत्यकला अत्यंत सुंदर ‘झरोके’ (गॅलरी), कमानी, राजवाड्याचे दर्शनी गुंतागुंतीचे कोरीवकाम, बाल्कनी, झुंबर आणि दरबार हॉल सोन्याचा मुलामा असलेल्या फर्निचरने सजवले आहे. तसेच येथे जवळ असलेल्या संग्रहालयात शस्त्रे, चांदीचे डबे, जुनी भांडी, कापड, चित्रे, विंटेज कार, ऐतिहासिक वस्तू आणि शाही कलाकृती आहेत.

16)Aji Dam-

अजी धरण हे गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील, आजी नदीवर बांधलेले एक नयनरम्य धरण आहे. हे धरण राजकोट शहराची ‘जीवनवाहिनी’ मानले जाते. हे धरण 1954 मध्ये पूर्ण झाले. धरणाचा उद्देश राजकोट शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, सिंचन आणि औद्योगिक क्षेत्रात पाणीपुरवठ्यासाठी केला जातो. अजी धरणाभोवतीचा परिसर एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.

अजी धरणावरील आकर्षण म्हणजे या ठिकाणी हिरवाईने नटलेली, सुव्यवस्थित बाग, फूड कोर्ट, पक्षी संग्रहालय, हिवाळ्यात येणारे स्थलांतरित पक्षी, विविध प्रकारचे प्राणी असलेले प्राणी संग्रहालय आणि अनेक राईड्स आणि गेम्स उपलब्ध असलेले अ‍ॅम्युझमेंट पार्क आहे. त्यामुळे तरुणाई व पर्यटकांमध्ये हे ठिकाण अत्यंत लोकप्रिय आहे.

17)Jubilee Garden-

ज्युबली गार्डन हे गुजरातच्या राजकोट शहराच्या मध्यावर, नदीकाठचे एक हिरवेगार ठिकाण आणि सर्वात जुने व सुंदर उद्यान आहे. हे गार्डन राणी व्हिक्टोरियाच्या सुवर्णमहोत्सवाच्या स्मरणार्थ 1887 मध्ये स्थापन करण्यात आले. या बागेतून फिरताना लंडनमधील आय आणि बिग बेनचे दृश्य असल्याचे भासते. येथील परिसर शांत व रमणीय असल्यामुळे पिकनिक साठी हे एक उत्तम विश्रांतीसाठीचे ठिकाण,

आणि सांस्कृतिक केंद्र मानले जाते. या बागेत कॅनॉट हॉल (वसाहतवादी इमारत), मुलांचे खेळाचे मैदान, कारंजे आणि प्रशस्त हिरव्यागार लँडस्केपमध्ये पदपथ आहे. येथील परिसरात ब्रिटिश काळातील वास्तू, वॉटसन संग्रहालय, लँग लायब्ररी ही पर्यटन स्थळे आहेत.

18)Lal Pari Lake-

लाल परी तलाव हा गुजरातच्या राजकोटमधील एक प्रसिद्ध आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. हा तलाव 1895 मध्ये बांधण्यात आला. या ठिकाणी लाल परी आणि रांदेरडा हे दोन्ही तलाव लोकप्रिय पिकनिक स्पॉट आहेत. हिवाळ्यात येथे रोझी पास्टर,ब्लॅक टेल्ड, गॉडविट, फेजंट टेल्ड जकाना, पर्पल मूरहेन, विजियन, कॉमन टील, पेलिकन आणि स्पूनबिल यांसारखे अनेक स्थलांतरित पक्षी येतात.

तसेच पर्यटकांसाठी येथे बोट्सची सुविधा देखील आहेत. तसेच या तलावाच्या जवळच ‘प्रद्युम्न प्राणीसंग्रहालय’ हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. लाल परी आणि रांदेरडा तलाव हे निसर्ग प्रेमी आणि पक्षी निरीक्षणाची आवड असणाऱ्यांसाठी एक उत्तम ठिकाण आहे.

19)Ramakrishna Ashram-

रामकृष्ण आश्रम हे गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील,डॉ. याज्ञिक रोडवर असलेले एक प्रमुख आध्यात्मिक केंद्र आहे. हा आश्रम रामकृष्ण परमहंसांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांच्या अनुयायांनी अस्तित्वात आणलेली एक मठ संस्था असून येथे स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या प्रतिमा असलेले भव्य मंदिर आहे. या आश्रमात अद्वैत वेदांत तत्त्वज्ञानाचा प्रसार केला जातो.

येथे स्वामी विवेकानंदांचे जीवन आणि शिकवणी प्रदर्शित करणारे संग्रहालय आहे व येथे गरीब आणि गरजू लोकांची सेवा केली जाते. तसेच या आश्रमात ग्रंथालय आणि रुग्णालयाचीही सुविधा उपलब्ध आहे. या आश्रमात, अध्यात्मिक प्रवचने आणि विविध प्रकारचे समाजकल्याणकारी उपक्रम राबवले जातात.

20)Mahatma Gandhi Museum-

महात्मा गांधी संग्रहालय हे गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील, जुबली चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित एक जागतिक दर्जाचे संग्रहालय आहे. हे संग्रहालय गांधीजींच्या जीवनावर आधारित असून 1887 मध्ये गांधीजींनी दहावीपर्यंत शालेय शिक्षण घेतलेल्या अल्फ्रेड हायस्कूल ( पूर्वीचे काठियावाड हायस्कूल)मध्ये आहे. 30 सप्टेंबर 2018 रोजी, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, आणि यांनी गांधीजींच्या 150 व्या जयंती स

मारंभात या संग्रहालयाचे उद्घाटन केले. या संग्रहालयात महात्मा गांधीचा जीवन प्रवास 39 गॅलरींद्वारे (दालनांद्वारे) मांडला आहे. आणि, 3D मॅपिंग प्रोजेक्शन शो,ऑडिओ-व्हिज्युअल आणि इंटरएक्टिव्ह डिस्प्लेचा वापरातुन गांधीजींचे जीवन आणि विचार मांडले आहेत.

21)Ishwariya Temple-

ईश्वरीय मंदिर हे गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील,माधापर गावातील एक प्राचीन,पवित्र, शिवमंदिर व धार्मिक स्थळ आहे. येथील परिसर निसर्गरम्य व आध्यात्मिक वातावरणाने बहरलेला असून या मंदिरातील शिवलिंग स्वयंभू आहे.महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

या मंदिर परिसरात राजकोट नगरपालिकेने विकसित केलेले सुंदर ईश्वरीय पार्क नावाचा थीम पार्क आहे. त्यामध्ये मुलांना खेळण्यासाठी जागा, खेळाचे मैदान, चालण्याचे मार्ग, विशाल बाग, संध्याकाळी असणारा आकर्षक लाईट अँड साउंड शो, तसेच येथे असलेल्या तलावात बोटिंगची सुविधा, गोल्फ कोर्स, फूड कोर्ट इत्यादी सुविधा आहेत.

22)Pradyuman Zoological Park-

प्रद्युम्न प्राणी उद्यान हे गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील प्रमुख आकर्षण आहे. हे प्राणीसंग्रहालय राजकोट महानगरपालिकेने उघडले असून प्रद्युम्न पार्क 137 एकर क्षेत्रात पसरलेले आहे. या प्राणीसंग्रहालयात विविध प्रकारचे प्राणी, आशियाई सिंह, पांढरे वाघ, बिबट्या आणि विविध स्थलांतरित पक्षी आणि सरपटणारे प्राणी आहेत.

प्रद्युम्न प्राणी उद्यान हे राजकोट शहराच्या बाहेरील भागात, लालपरी आणि रंदारडा तलावांच्या नैसर्गिक परिसरात वसलेले असून आजी डॅमजवळील ‘मिनी झू’ हे उद्यान, 2010 मध्ये नाव बदलून, प्रद्युम्न प्राणी उद्यान’ म्हणून सुरू करण्यात आले निसर्ग प्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी एक आदर्श ठिकाण आहे

23)Hingolgadh Nature Education Sanctuary-

हिंगोलगढ निसर्ग शिक्षण अभयारण्य हे गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील,जसदान तालुक्यातील एक संरक्षित क्षेत्र आहे. हे अभयारण्य 654 चौ. कि.मी. क्षेत्रफळावर पसरलेले असून हे अभयारण्य 1980 मध्ये अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. या ठिकाणी वन्यजीवांच्या संवर्धनासाठी गुजरात इकोलॉजिकल एज्युकेशन अँड रिसर्च (GEER) फाउंडेशनद्वारे व्यवस्थापण केले जाते.

आणि हे एक पर्यावरण शिक्षणाचे केंद्र आहे. येथे विद्यार्थी, शिक्षक आणि निसर्गप्रेमींसाठी कार्यशाळा, निसर्ग शिबिरे आणि कार्यक्रम आयोजित केले जातात. या अभयारण्यात विविध प्रकारच्या वनस्पती, 230 पेक्षा जास्त पक्षांच्या प्रजाती, आणि प्राण्यांमध्ये चिंकारा, नीलगाय, कोल्हा, हरिण, वाघ, सिंह यासह अनेक प्रकारचे वन्यजीव प्राणी आढळून येतात.

24)Ramnath Mahadev Temple-

श्री रामनाथ महादेव मंदिर हे गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील,रामनाथ पारा परिसरात, आजी नदीच्या काठावरील एक धार्मिक व जागृत शिव मंदिर आहे. हे प्राचीन मंदिर 500 वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. या मंदिरातील शिवलिंग स्वयंभू असून,

येथील शिवलिंगावर केलेली कमळाच्या आकाराच्या वैशिष्ट्यपूर्ण सजावटीसाठी प्रसिद्ध आहे. हे भव्य मंदिर अध्यात्मिक आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते. महाशिवरात्री आणि श्रावणात या ठिकाणी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

25)Shree Khodaldham Mandir, Kagvad-

श्री खोडलधाम मंदिर हे गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील,कागवड येथील खोडीयार मातेचे एक भव्य आणि आधुनिक मंदिर आहे. हे मंदिर 2017 मध्ये स्थापन करण्यात आले. हे मंदिर लेउवा पटेल समाजाचे आध्यात्मिक व सांस्कृतिक केंद्र असून, या भव्य मंदिरची स्थापत्य कला अत्यंत सुंदर व चमत्कारी आहे.

त्यामध्ये गुंतागुंतीचे कोरीव काम केलेले हे मंदिर ‘महामेरू’ शैलीत बांधलेले आहे. या मंदिराची उंची 160 फुटांपेक्षा जास्त असून त्यामध्ये भव्य रचना आहेत. येथे अनेक प्रकारचे धार्मिक आणि सामुदायिक कार्यक्रम केले जातात.

26) Bhutnath Mahadev Temple-

भूतनाथ महादेव मंदिर हे गुजरातच्या राजकोट शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर, हिरवळ आणि डोंगरांनी वेढलेल्या निसर्गरम्य परिसरातील धार्मिक शिव मंदिर आहे. या मंदिराची वास्तुकला भिंतींवर असलेले सुंदर गुंतागुंतीचे कोरीवकाम आणि शिल्पे यांनी सजलेली आहे. हा मंदिर परिसर डोंगर भागात असल्यामुळे येथे जोरदार वारे वाहते.

त्यामुळे येथील आजूबाजूच्या भागात अनेक पवनचक्क्या दिसून येतात. पर्यटक येथील डोंगरांमध्ये गिर्यारोहण आणि ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकतात. तसेच येथे मोर, माकडे यासारखे प्राणी पाहायला भेटतात. हे मंदिर मनःशांती आणि अध्यात्मिक आनंद देण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.

27)Rampara Wildlife Sanctuary-

रामपारा वन्यजीव अभयारण्य हे गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील,वांकानेर जवळील एक महत्त्वाचे घनदाट जंगल आणि अभयारण्य आहे. हे अभयारण्य 1988 मध्ये स्थापित झाले असून, 15 चौ. किमी क्षेत्रात पसरलेले एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी आणि पक्षी आहेत.

प्राण्यांमध्ये नीलगाय, काळवीट, लांडगे, तरस, कोल्हा, हरिण, वाघ आणि आशियाई सिंहाचे प्रजनन केंद्र आहे. तसेच या अभयारण्यात 130 पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती व 290 पेक्षा जास्त वनस्पती पाहायला मिळतात. येथील परिसरात असलेल्या वॉच-टॉवरवरून पर्यटकांना संपूर्ण अभयारण्याचे एक विलक्षण विहंगम दृश्य पाहता येते.

28)Riverside Palace-

रिव्हरसाईड पॅलेस हा गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील,भारतीय आणि युरोपियन शैलीत बांधलेली सुंदर हवेली आहे. हा राजवाडा नदीकाठी असलेल्या बागेमध्ये असून, 1885 मध्ये गोंडलच्या युवराजांचे निवासस्थान,युवराज बंगला (क्राउन प्रिन्सचा राजवाडा) म्हणून बांधला होता. या राजवाड्यात प्राचीन वस्तू, कापड, पगडी, खेळणी, चांदीच्या वस्तू, राजेशाही फर्निचर आणि इतर स्मृतिचिन्हांचे संग्रह आहे.

याशिवाय येथे 1910 च्या दशकातील विविध प्रकारच्या रॉयल कार आहेत. हे ठिकाण ऐतिहासिक वास्तुकला, राजेशाही फर्निचर, नदीचे दृश्य आणि पक्षीनिरीक्षणासाठी प्रसिद्ध आहे. सध्या हा पॅलेस एक लक्झरी हेरिटेज हॉटेल मध्ये रूपांतरित केला आहे.

29)Orchard Palace-

ऑर्चर्ड पॅलेस हे गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील,गोंडल येथील 19 व्या शतकातील एक भव्य ऐतिहासिक राजवाडा आहे. हा पॅलेस महाराजांच्या वैयक्तिक पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी हुजूर पॅलेस, कुटुंब निवासस्थानाचा एक भाग म्हणून ऑर्चर्ड पॅलेस बांधण्यात आला होता. या राजवाड्याच्या मागील बाजूस लिंबू, चिकू आणि आंब्याच्या मोठ्या बागा(Orchards) असल्यामुळे याला ‘ऑर्चर्ड पॅलेस’ असे नाव पडले आहे.

आणि या बागांमध्ये विविध प्रकारचे पक्षी व मोर आहेत. या पॅलेस मध्ये 1930 च्या दशकातील आर्ट डेको फर्निचर आणि पुरातन वस्तू आहेत. याशिवाय या राजमहालात रॉयल गॅरेज मध्ये 30 पेक्षा जास्त विंटेज आणि क्लासिक कारचा संग्रह आहे.आणि 1907 मधील, न्यू इंजिन’ कार, मर्सिडीज, पॅकार्ड आणि कॅडिलॅक या दुर्मिळ कार आहेत. सध्या हा पॅलेस हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतरित झाला आहे.

30)Jam Tower-

जाम टॉवर हा गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील, प्रसिद्ध आणि ऐतिहासिक क्लॉक टॉवर आहे. हा टॉवर शहराच्या मध्यभागी असून, जुन्या राजकोटचे ऐतिहासिक वारसा स्थळ आहे. हा टॉवर 1880 मध्ये नवानगर संस्थानाचे शासक जाम विभाजी यांनी राजकोटमधील ब्रिटिश एजन्सी आणि जनतेला भेट म्हणून दिला होता. आणि या टॉवरच्या चारही बाजूंनी घड्याळे असून त्यामध्ये 1887 मध्ये 250 किलो वजनाची पितळी घंटा बसवण्यात आली होती.

तसेच दगडातून बांधलेल्या या टॉवरच्या वरच्या बाजूला वाऱ्याची दिशा दर्शवणारे यंत्र (Anemometer) आहे. 1892 मध्ये हा टॉवर दुरुस्त करण्यात आला. राजकोटच्या इतिहासाची माहिती देणारा हा टॉवर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.

31)Regional Science Centre-

प्रादेशिक विज्ञान केंद्र हे गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रसार करणारे एक अत्याधुनिक केंद्र आहे. हे विज्ञान केंद्र विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी गुजरात सरकारने स्थापन केले आहे. या विज्ञान केंद्रात सहा प्रमुख गॅलरीज आहेत. त्यामध्ये, मशीन इंजिनीअरिंग गॅलरी, रोबोटिक्स गॅलरी, नोबेल प्राइज गॅलरी, लाईफ सायन्स गॅलरी,

ग्लास आणि सिरॅमिक गॅलरी यांचा समावेश आहे. याशिवाय येथे हाऊ स्टफ वर्क्स, 3D थिएटरमध्ये विज्ञानाशी संबंधित चित्रपट पाहण्यासाठी अत्याधुनिक व्यवस्था, VR आणि AR झोन (आभासी वास्तव ) फ्लाइट सिम्युलेटरमध्ये विमान चालवण्याचा आभासी अनुभव, म्युझिकल फाउंटन आणि साऊंड पार्कमध्ये ध्वनी आणि संगीताशी संबंधित खेळ आहेत.

32)Race Course Ground & Niranjan Shah Stadium(Saurastra Cricket Stadium)-

रेस कोर्स मैदान हे गुजरातच्या राजकोट शहराच्या मध्यभागी असलेले एक विस्तीर्ण सार्वजनिक मैदान आहे. ब्रिटीश काळात हे मैदान घोडेस्वारीसाठी वापरले जात असल्याने याला ‘रेस कोर्स’ मैदान हे नाव पडले आहे. या मैदानात क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉलची मैदाने असून या परिसरात जॉगिंग ट्रॅक, ओपन-एअर जिम, जलतरण तलाव, मुलांसाठी ‘फन वर्ल्ड’ आणि ‘बाल भवन’ आहे.

निरंजन शाह मैदान हे राजकोटमधील (पूर्वीचे सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान) आधुनिक,सुसज्ज आणि मुख्य आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहे. हे स्टेडियम राजकोट-जामनगर हायवेवर ‘खंडेरी’ येथे असून हे गुजरातचे पहिले सौरऊर्जेवर चालणारे स्टेडियम आहे. येथे लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडच्या धर्तीवर मीडिया बॉक्स डिझाइन केलेले आहे. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता अंदाजे 28,000 इतकी आहे. 2013 पासून येथे कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसोबतच आयपीएल (IPL) सामनेही खेळले जातात.

Visit the travel blog

1) राजकोट जिल्ह्यातील ज्युबली गार्डनची स्थापना कोणत्या साली झाली?

राजकोट जिल्ह्यातील ज्युबली गार्डनची स्थापना राणी व्हिक्टोरियाच्या सुवर्णमहोत्सवाच्या स्मरणार्थ 1887 मध्ये करण्यात आली.


2) राजकोट जिल्ह्यातील, रणजित विलास पॅलेस कोणत्या शहरात आहे?

राजकोट जिल्ह्यातील, रणजित विलास पॅलेस हा वांकानेर येथील एक सुंदर व ऐतिहासिक राजवाडा आहे.


3) गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील, वॉटसन संग्रहालय हे कशासाठी प्रसिद्ध आहे?

गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील, वॉटसन संग्रहालय हे जुबली गार्डनमध्ये स्थित,गुजरातमधील दुसरे व सौराष्ट्रातील सर्वात जुने व मौल्यवान वस्तूंचा खजिना असलेले महत्त्वाचे संग्रहालय आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top