अहमदाबाद जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे- Top 32 places to visit in Ahmedabad District

भारतभ्रमंती ही अशी वेबसाईट आहे, जिथे तुम्हाला भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळांची माहिती मिळणार आहे. आता तुम्ही पाहणार आहात गुजरात राज्यातील अहमदाबाद जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे. भारतातील प्रत्येक राज्यात काहीतरी वेगळेपण, नाविन्यपूर्ण आणि अद्वितीय गोष्टी आहेत जसे की खाद्य संस्कृती, बोलीभाषा आणि बरेच काही म्हणूनच आपला भारत देश विविधतेतून एकता जपणारा महान देश आहे.अहमदाबाद जिल्हा हा गुजरात राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. Top 32 places to visit in Ahmedabad District

अहमदाबाद हे साबरमती नदीच्या किनारी वसलेले शहर असून या शहराचे मूळ नाव कर्णावती असे होते.अहमदाबाद हे भारतातील महत्त्वाचे आर्थिक आणि औद्योगिक केंद्र आहे. तसेच या ठिकाणी विक्रम साराभाई यांनी आपण केलेली भारतीय प्रबंध संस्था ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट’ ही प्रसिद्ध शिक्षणसंस्था आहे. व या जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके आणि 556 गावे आहेत. या शहराला ‘पूर्वेकडील मँचेस्टर’ म्हणूनही ओळखले जाते.

तसेच अहमदाबाद शहराला युनेस्कोने जागतिक वारसा शहर म्हणून घोषित केलेले भारतातील हे पहिले शहर आहे. अहमदाबाद हा व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रातील एक विकसनशील जिल्हा आहे. या ठिकाणी 14 जानेवारीला पतंग उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Top 32 places to visit in Ahmedabad District

अहमदाबाद जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे

1) Swaminarayan Temple-

 Top 32 places to visit in Ahmedabad District


स्वामीनारायण मंदिर हे अहमदाबाद जिल्ह्यातील कालूपूर परिसरातील प्रसिद्ध धार्मिक मंदिर आहे. हे मंदिर 1822 मध्ये स्वामीनारायण यांच्या इच्छेनुसार बांधण्यात आलेले स्वामीनारायणाचे पहिले मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम अत्यंत कलात्मकतेने केलेले असून यामध्ये प्रादेशिक व ब्रिटिश स्थापत्य शैलीचा वापर केलेला आहे. या मंदिराचे अप्रतिम शिल्पकाम व कोरिवकाम काम पाहिल्यानंतर परी कथेचा भास होतो.

या मंदिरातील प्रवेशद्वारावरील शिल्पकलेमध्ये मराठी आणि राजस्थानी लोक संस्कृती आणि पोशाख स्पष्टपणे दिसतात. हे मंदिर भव्यता आणि लाकडी कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरात बहुमजली अतिथी गृह आहे व मंदिर आवारात एक सुसज्ज वैद्यकीय क्लिनिक आहे. पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात भेट देतात.

2)Sabarmati Ashram –


साबरमती आश्रम हे अहमदाबाद जिल्ह्यातील साबरमती नदीच्या शांत व सुंदर काठावर भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाचे असलेले एक ऐतिहासिक स्थळ आहे. हा आश्रम 1915 मध्ये महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेहून परतल्यानंतर स्थापन केला होता व पूर्वी हा आश्रम गांधी आश्रम म्हणूनही ओळखला जात होता. महात्मा गांधी या आश्रमातून शेती, पशुपालन आणि खादी उद्योगाशी संबंधित कामे करत होते. हा आश्रम गांधी आश्रम, हरिजन आश्रम आणि सत्याग्रह आश्रम म्हणून ही लोकप्रिय आहे.

महात्मा गांधींनी या आश्रमात त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांच्या समवेत 12 वर्षे वास्तव्य केले. गांधीजींनी 1930 मध्ये याच आश्रमातून दांडी यात्रेला सुरुवात केली होती. या आश्रमातील संग्रहालयात गांधीजींच्या जीवनाशी संबंधित वस्तू, त्यांच्या जीवनातील आठवणी, त्यांची कामे ही माहिती पाहायला मिळते. जगभरातून पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात भेट देतात.

3)Sarkhej Roza-


सरखेज रोजा हे अहमदाबाद जिल्ह्यातील मकरबा गावातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक स्थळ आहे. सरखेज रोजा ही एक सूफी मशीद आणि कबरिंचे संकुल आहे. सरखेज रोजा ही मशीद 15 व्या शतकात शेख अहमद गंज बक्श खट्टू यांच्या स्मरणार्थ बांधले गेली. ही मशीद इंडो इस्लामिक वास्तू कलेत, पर्शियन व भारतीय शैलीत बांधलेली असून या ठिकाणी थडगी, आणि तलाव आहेत. सरखेज रोजा हे गुजरात मधील सर्वात आदरणीय स्थळ आहे.

या मशिदीच्या जवळपास इस्कॉन मंदिर, विक्रम साराभाई अंतराळ प्रदर्शन, आणि अडालज बावडी ही पर्यटन स्थळे आहेत. हे स्थळ धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात भेट देतात.अहमदाबाद पासून हे ठिकाण सात किलोमीटर अंतरावर आहे.

4) Bhadra Fort-


भद्रा किल्ला हा अहमदाबाद जिल्ह्यातील साबरमती नदीच्या काठावर असलेला एक ऐतिहासिक प्रभावी किल्ला आहे. भद्रा किल्ला हा लाल दगडामध्ये, इंडो-सारसेनिक स्थापत्यशैलीत बांधलेले एक भव्य स्मारकच आहे. हा किल्ला 43 एकर मध्ये असून अहमदाबादचे संस्थापक अहमद शाह यांनी 1411 मध्ये तो बांधला. या किल्ल्याच्या जवळच प्रसिद्ध देवी भद्रकाली मातेचे मंदिर आहे. देवीच्या नावावरूनच या किल्ल्याला नाव देण्यात आले आहे. हा किल्ला अहमदाबादच्या तटबंदी परिसरात असून किल्ल्यामध्ये सुंदर व सुशोभित राजवाडा,मशिदी दरवाजे आणि मोकळ्या जागा आहेत. या चित्त थरारक किल्ल्याला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात.

Visit our website: allindiajourney.com

5) Dada Hari Stepwell-


दादा हरीरची विहीर ही अहमदाबाद शहरातील एक प्राचीन व प्रसिद्ध पायरी विहीर आहे. वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना असलेली ही विहीर 1501 मध्ये सुलतान महमूद बेगडा यांच्या राजवटीत बांधली गेली. मलिक सुलतान यांच्या पत्नी दादी हरीर यांनी ही विहीर बांधली.त्यामुळे या विहिरीला ‘दादी हरीरची विहीर’ म्हणूनही ओळखले जाते. ही विहीर म्हणजे इंडो-इस्लामिक वास्तुकलेचा एक उत्तम नमुनाच आहे. विहिरीत पायऱ्या उतरून गेल्यानंतर आपल्याला एक शिलालेख दिसतो त्यामध्ये विहिरी बद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे.

या विहिरीच्या भिंतींवर सुंदर, रेखीव कोरीव काम आणि नक्षीकाम केलेले आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे या विहिरीच्या तळाशी एक हौद आहे. ही विहीर पाच मजली असून भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली आहे. ही विहीर आत मध्ये जाऊन पाहता येते. दादा हरीरची विहीर हे अहमदाबादमधील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात भेट देतात.

6) Jama Masjid-


जामा मशीद ही अहमदाबाद जिल्ह्यातील एक ऐतिहासिक व धार्मिक इमारत आहे.ही मशीद अहमदाबादमधील महात्मा गांधी रोडवर असून 1423 मध्ये सुलतान अहमद शाह यांनी बांधली होती.ही मशीद इंडो-इस्लामिक स्थापत्यशैलीत बांधलेली आहे व या मशिदीत एक मोठा चौक, अनेक घुमट, आणि 260 खांब आहेत.जामा मशीद हे अहमदाबादमधील एक महत्त्वाचे धार्मिक व ऐतिहासिक ठिकाण आहे ज्यामध्ये आजही नमाज पठण केले जाते. ही मशीद अहमदाबादमधील महत्वाच्या ‘तीन दरवाजा’ या ठिकाणाच्या जवळपास आहे. पर्यटक या मशिदीला मोठ्या प्रमाणात भेट देतात.

7) Shah e Alam Dargah-


शाह-ए-आलमचा रोजा हे अहमदाबाद जिल्ह्यातीलशाह आलम परिसरात असलेली एक प्राचीन, प्रसिद्ध दर्गा आणि मशीद संकुल / रोजा आहे. ही कबर 1475 ते 1483 च्या दरम्यान बांधली असल्याचे सांगितले जाते.या मशीदिला रसूलाबाद दर्गा किंवा शाह आलम नो रोजो नावानेही ओळखले जाते.शाह आलम हे 1475पर्यंत अहमदाबादमधील सर्वात आदरणीय मुस्लिम धार्मिक शिक्षकांपैकी एक होते.

या बहु-घुमट असलेल्या मशिदीत दरवाजे, थडगे, मशीद, सभामंडप, एक जलकुंभ आणि काही प्राचीन वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. विशेष म्हणजे शहा आलम यांच्या पाळीव पोपटाची एक लहान कबर या ठिकाणी आहे. या मशिदीच्या दोन्ही टोकांना मिनारांनी मुकुट घातलेला एक उघडा समोरचा भाग आहे, जे एक स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरणच समजले जाते. शाह-ए-आलमचा रोजा हे अहमदाबाद मधील एक धार्मिक पर्यटन स्थळ आहे.

8) Rani no Hajiro –


राणी नो हाजिरो हे अहमदाबाद जिल्ह्यातील मानेक चौकाजवळ असलेले एक कबर संकुल आहे. या ठिकाणाला ‘मुघलाई बीबीची कबर’ किंवा अहमद शाहच्या राण्यांचे कबर म्हणूनही ओळखले जाते.राणी नो हाजिरो हे 15 व्या शतकात संस्थापक अहमद शाहच्या राण्यांसाठी बांधण्यात आलेला कबरीचा समूह आहे. या संगमरवरी कबरी हिंदू, जैन,इस्लामिक वास्तुकला शैली व इंडो-इस्लामिक वास्तुकला शैलीचे मिश्रण आहे.

या ठिकाणी आठ कबर असून या कबरी भोवती विविध प्रकारचे कपडे, दागिने, हस्तकला यांची एक गजबजलेली बाजारपेठ आहे.अहमदाबाद मधील हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणावर भेट देतात.

9) Vastrapur Lake –


वस्त्रपूर तलाव हे अहमदाबाद जिल्ह्यातील अहमदाबाद शहराच्या मध्यावर शांत व सुंदर परिसरात असलेला तलाव आहे. तलावाच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ आणि सुंदर असल्यामुळे लोकांची नेहमी या ठिकाणी वर्दळ असते. या तलावाजवळ एक सुंदर उद्यान आहे त्यामध्ये जॉगिंग ट्रॅक, ओपन-एअर थिएटर, फिटनेस उपकरणे आणि बसण्याच्या जागा आहेत.

येथील तलावाचा परिसर स्वच्छ आणि सुंदर आहे, त्यामुळे शहरवासीयांचे हे एक महत्त्वाचे मनोरंजन आणि विश्रांतीचे ठिकाण आहे. 2013 मध्ये, वस्त्रापूर तलावाचे नाव बदलून ‘भक्त कवी नरसिंह मेहता सरोवर’ असे ठेवण्यात आले आहे व त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी त्यांचा पुतळा स्थापित करण्यात आला आहे.

10) Iskcon Temple-

इस्कॉन मंदिर हे अहमदाबाद जिल्ह्यातील सॅटेलाइट रोड, सरखेज-गांधीनगर हायवेवर चार एकर परिसरात असलेले प्रसिद्ध धार्मिक मंदिर आहे. हे भव्य वैभवशाली इस्कॉन मंदिर 1997 मध्ये भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद बांधले असून हे मंदिर ‘हरे कृष्ण मंदिर’ व ‘श्री राधा गोविंद धाम’ म्हणून ही प्रसिद्ध आहे. या मंदिरात राधा-गोविंद, गौर-निताई, सीता-राम-लक्ष्मण-हमुमान, श्री नाथजी, जगन्नाथ बलदेव सुभद्राजी, श्रीला प्रभुपाद आणि श्रीला भक्तिसिद्धांत सरस्वती यांच्या मूर्ती आहेत.

या मंदिराचे उद्घाटन माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 1997 मध्ये केले होते. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी 1966 मध्ये इस्कॉनची स्थापना न्यूयॉर्क शहरात केली होती. इस्कॉनचा उद्देश हा कृष्णभक्तीचा प्रसार करणे आहे.हे मंदिर पूजा, शांतता आणि अध्यात्माचे एक महत्त्वाचे केंद्र असून भक्तगणांचे आकर्षणाचे ठिकाण आहे.

11) Kankaria /Kamla Nehru Zoological Garden –


कांकरिया प्राणीसंग्रहालय हे अहमदाबाद जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. हे संग्रहालय कांकरिया तलावाजवळ असून ते 1951 मध्ये स्थापन करण्यात आले आहे. हे प्राणी संग्रहालय 117 एकर मध्ये पसरलेले असून ते कमला नेहरू प्राणीसंग्रहालय म्हणूनही ओळखले जाते.

या प्राणी संग्रहालयात विविध प्रकारचे प्राणी, सुंदर लँडस्केप, सस्तन प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या काही दुर्मिळ प्रजाती पाहायला मिळतात. दरवर्षी या ठिकाणी 20 लाखापेक्षा जास्त पर्यटक भेट देण्यासाठी येतात.


हुथीसिंग जैन मंदिर हे अहमदाबाद जिल्ह्यातील 1848 मध्ये हुथीसिंग कुटुंबाने बांधलेले एक प्रसिद्ध जैन मंदिर आहे. हे मंदिर जुन्या मारू-गुर्जरा स्थापत्य शैली आणि हवेलीच्या स्थापत्य घटकांचे मिश्रण आहे.पांढऱ्या संगमरवरापासून बनवलेल्या या विलक्षण सुंदर मंदिराला त्यावेळी दहा लाख रुपये एवढा खर्च आला होता. जैन कुटुंबीयांचे हे पवित्र मंदिर 15 वे जैन तीर्थंकर श्री धर्मनाथ यांना समर्पित असून श्रीमंत व्यापारी शेठ हुठीसिंग यांनी हे मंदिर बांधले होते.

हे मंदिर दुष्काळ परिस्थितीत बांधल्यामुळे दगडांवर काम करणारे पारंपारिक कारागीराना दोन वर्ष हातभार लागला होता. हे कारागीर सोनपुरा आणि सलाट समुदायाचे होते. हे मंदिर एका विस्तीर्ण अंगणात पसरलेले असून, त्याच्याभोवती एक मोठा कड्यांचा घुमट आहे. तसेच या ठिकाणी विविध तीर्थकारांना समर्पित 52 लहान मंदिरे आहेत. जगभरातुन पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात भेट देतात.

13) Jhulta Minar-


झुलता मिनार हे भारतातील अहमदाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध मीनारापैकी एक आहे. यातील एका मिनाराला हलकेच ढकलले तर दुसरा मीनार आपोआप हलतो, त्यामुळे या मीनाराला थरथरणारा मिनार असेही म्हणतात. हा ऐतिहासिक मिनार अहमदाबाद शहराच्या मध्यावर असून स्थापत्यशास्त्राचा एक चमत्कारच आहे.
हा मिनार सिदी बशीर मशीद संकुलाचा एक भाग आहे. आणि हा मिनार दोन गुंतागुंतीच्या कोरीव काम केलेल्या मिनारांना जोडून बनवलेला आहे. हा मिनार 500 वर्ष जुना असून येथील एक मिनार सारंगपूर दरवाजाच्या समोर आहे, तर दुसरा कालूपूर रेल्वे स्थानकाजवळ आहे. या ठिकाणाला पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देतात.

14) The ‘Pols’ of Ahamdabad –


द पोल्स हे गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरामध्ये जुन्या भागांमध्ये ‘पोल्स’ नावाने ओळखले जाणारे एक खास पारंपरिक निवासी वस्ती आहेत.या पोल्स मध्ये एकाच गेट्समधून प्रवेश असलेले, अरुंद रस्ते आणि सामायिक जागा असलेले बंदिस्त निवासी भाग आहेत. येथील घरांच्या भिंती सामायिक आहेत. आणि घराच्या मधोमध लहान अंगण आहेत. येथील पोल्समध्ये प्राचीन गुजराती घरांची वास्तुकला आहे. आणि त्यामध्ये लाकडी कोरीव काम केलेले दरवाजे आणि खिडक्या आहेत. प्राचीन काळी समुदायाच्या सुरक्षिततेसाठी पोल्सची रचना करण्यात आली होती.

पोल्समध्ये सामायिक अंगण असल्यामुळे लोक एकत्रित वेळ घालवतात. काही ठिकाणी या पोल्समध्ये एकाच जातीचे किंवा व्यवसायाचे लोक राहतात त्यामुळे एक मजबूत समुदाय भावना तयार होते. हे ‘पोल’ घरांच्या समूहांनी वेढलेले असून त्यांचे मुख्य प्रवेशद्वार ‘पोल गेट’ नावाचे असते. पोल्स हे अहमदाबादच्या इतिहासाचा आणि संस्कृतीच्या वारशाचा महत्वाचा भाग आहे.या पोल्सना एकदा तरी भेट दिली पाहिजे.

15) Gujarat Science City-


गुजरात सायन्स सिटी हे गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील विज्ञान,शिक्षण आणि मनोरंजनाचे केंद्र आहे. या ठिकाणी भारतातील पहिले आयमॅक्स 3D थिएटर, 2002 मध्ये उघडण्यात आले. 2021 मध्ये याचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला. त्यामध्येएक पक्षीगृह आणि एक फुलपाखरू पार्क,निसर्ग आणि रोबोटिक्सवरील प्रदर्शने,विज्ञान, ग्रह पृथ्वी,अवकाश, ऊर्जा पार्क, जीवन विज्ञान पार्क, थ्रिल राईड,विज्ञान सभागृह, संगीत कारंजे, वनस्पती आणि एक मत्स्यालय याचा समावेश आहे.

तसेच येथे नंतर एनर्जी एज्युकेशन पार्क,अँफीथिएटर आणि म्युझिकल फाउंटन, लाईफ सायन्स पार्क, प्लॅनेट अर्थ,मुलांचे अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर, थ्रिल राइड्स, या विविध प्रदर्शनांचे बांधकाम करण्यात आले आहे. गुजरातच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने गुजरात कौन्सिल ऑफ सायन्स सिटी ही संस्था स्थापन केली आहे.

16) Sidi Saiyyed Masjid-


सिदी सय्यद मशीद ही अहमदाबाद जिल्ह्यातील एक सुन्नी मशीद व महत्त्वाचे राष्ट्रीय स्मारक आहे. ही मशीद ‘सिदी सैय्यद नी जाली’ म्हणूनही ओळखली जाते.ही मशीद सिदी सय्यद या हब्शी कुलीन व्यक्तीने AH 980 मध्ये बांधली होती. सय्यद मशीद ही उत्कृष्ट जाळीदार खिडक्या आणि कोळ्याच्या जाळ्यासाठी प्रसिद्ध आहे. या मशिदीच्या मागील कमानींवर दहा गुंतागुंतीच्या दगडी जाळीच्या खिडक्या आहेत. त्यामध्ये एकमेकांशी जोडलेली झाडे आणि पानांची रचना पाहायला मिळते. व या ठिकाणी आकृतिबंध कोरलेले जाळीदार दगडी स्लॅब आहेत. अहमदाबाद मधील हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.

17) The Calico Museum of Textiles-

कॅलिको म्युझियम ऑफ टेक्सटाईल्स हे गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील प्रमुख टेक्सटाईल म्युझियम आहे. 1949 मध्ये या संग्रहालयाची स्थापना गौतम साराभाई आणि त्यांची बहीण गिरा साराभाई या दोन उद्योजक बहिण-भावांनी केली होती. हे संग्रहालय आधी कॅलिको मिल्स या ठिकाणी होते परंतु संग्रह वाढल्यानंतर 1983 मध्ये शाहीबागमधील साराभाई हाऊसमध्ये हलवण्यात आले. या संग्रहालयातील प्रदर्शनात 15 व्या ते 19 व्या शतकात मुघल आणि प्रांतीय शासकांनी दरबारात वापरलेले कापड आहे.

तसेच येथे 19 व्या शतकातील भरतकाम, बांधलेले कापड आणि धार्मिक कापड प्रदर्शित केले आहे. आणि येथील गॅलरीमध्ये धार्मिक कला आणि शिल्पकला,फर्निचर, हस्तकला,मंदिरातील टांगणी, लघुचित्रे, दक्षिण भारतीय कांस्य, जैन कला यांचे प्रदर्शन आहे. व एक कापड तंत्र गॅलरी आणि ग्रंथालय आहे.

18) Auto World Vintage Car Museum –


ऑटो वर्ल्ड व्हिंटेज कार म्युझियम काठवाडा हे अहमदाबाद जिल्ह्यातील काठवडा या ठिकाणी असलेले सुप्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपन्यांनी बनवलेल्या विंटेज कार, मोटारसायकली आणि गाड्यांचे एक अद्भुत कार संग्रहालय आहे. हे संग्रहालय प्राणलाल भोगीलाल यांनी 1927 मध्ये त्यांच्या 2200 एकर खाजगी जागेवर सुरू केले. या संग्रहालयात व्हिंटेज कार,बेंटले, लगोंडा, रोल्स रॉयस, जग्वार, मर्सिडीज आणि ऑबर्न, कॅडिलॅक, ऑस्टिन मार्टिन आणि इतर अनेक ब्रँडच्या कारचा /प्राचीन व दुर्मिळ वाहनांचा संग्रह आहे.

भोगीलाल हे विंटेज कारचे खूप शौकीन होते.प्राणलाल भोगीलाल पटेल यांच्या विंटेज वाहनांच्या अविश्वसनीय संग्रहासाठी त्यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे.

19)Kankaria Lake-


कांकरिया तलाव हे गुजरात राज्यातील अहमदाबाद जिल्ह्यातील मणिनगर परिसरात असलेला सर्वात मोठा तलाव आहे. हा तलाव 1451 मध्ये सुलतान कुतुबुद्दीनने बांधला होता. या तलावाला कर्णसागर तलाव म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी प्राणीसंग्रहालय, टॉय ट्रेन, किड्स सिटी, टेथर्ड बलून राईड, वॉटर राईड्स, वॉटर पार्क, फूड स्टॉल्स अशा अनेक मनोरंजन सुविधा आहेत. येथील प्रमुख आकर्षण म्हणजे कांकरिया तलावाच्या मध्यभागी असलेले नगीनावाडी येथे पायवाटेने सहज पोचता येते.

या ठिकाणी हिरवळ, संगीतमय कारंजे आणि शांततापूर्ण वातावरण आहे.या ठिकाणी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कांकरिया कार्निव्हल हा आठवडाभर चालणारा उत्सव साजरा केला जातो.

20) Vechaar – Metal Utensils Museum-

वेचार भांडी संग्रहालय हे अहमदाबाद जिल्ह्यातील एक प्रसिद्ध, अद्वितीय भांडी संग्रहालय आहे.श्री. सुरेंद्र पटेल यांचे हे वैयक्तिक संग्रहालय असून बांबू, चिखल आणि शेणापासून बनवलेल्या झोपडीतील या संग्रहालयात विविध प्रकारची जुनी व पारंपरिक भांडी आहेत. त्यामध्ये पितळ, तांबेची आणि कांस्यची भांडी आहेत. या संग्रहालयात सुमारे 3,500 भांडी, 90 गरताळे आणि 600 हून अधिक सुडी आहेत. या संग्रहालयात सुरेंद्र पाटील यांनी अनेक वर्षांमध्ये जमा केलेल्या विविध प्रकारच्या भांड्यांचा समावेश आहे.

21) Vaishno Devi Temple-


वैष्णोदेवी मंदिर हे अहमदाबाद जिल्ह्यातीलसरखेज गांधीनगर महामार्गावरील वैयक्तिक ट्रस्टने बांधलेले एका प्रसिद्ध धार्मिक मंदिर आहे. या पवित्र मंदिरात जम्मू काश्मीरमधील कटरा येथील मूळ वैष्णोदेवी मंदिराची खरी प्रतिकृती आहे.हे मंदिर 50 फूट व्यासाचे असून पर्वताच्या आवारात बांधले आहे. मूळ वैष्णोदेवी मंदिराची अनुभूती देण्यासाठी हे मंदिर पिवळ्या वाळूच्या दगडापासून बनवलेल्या मानवनिर्मित बनावट दगडी टेकडीवर बांधण्यात आले आहे.

या मंदिरात लक्ष्मी, काली आणि सरस्वती यांच्या मूर्ती, शिव मंदिर,सुंदर कोरीव काम आणि अनेक देव-देवतांचे शिल्पे आहेत. येथील टेकडीच्या माथ्यावर असलेल्या मुख्य मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी यात्रेकरूंना मानवनिर्मित टेकडीवरून जावे लागते.


22)Rani Rupamati’s Mosque-


राणी रूपमती मशीद ही गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यातील मिर्झापूर येथील एका ऐतिहासिक सूफी मशीद आणि दर्गा संकुल आहे. ही मशीद 1440 मध्ये सुलतान मेहमूद बेघारा यांनी स्थापन केली होती. राणी रूपमती मशीद ही राणी रूपवतीची मशीद किंवा मिर्झापूर राणीची मशीद म्हणूनही ओळखली जाते. ही मशीद एक महत्त्वाचे राष्ट्रीय स्मारक असून या मशिदीची लांबी 32 मिटर, रुंदी 14 मीटर व उंची 9.8 मीटर एवढे आहे.

या मशिदीची वास्तुकाला ही इंडो-इस्लामिक शैलीचे मिश्रण आणि हिंदू व मुस्लिम वास्तूकलेत केलेली आहे. तसेच या मशिदीत एक उंच मध्यवर्ती कमान, तीन भव्य घुमट, बारीक मिनार, कोरीव गॅलरी,दोन थडग्या असलेला गुंबददार मकबरा आणि एक उत्कृष्ट मिहरब आहे.

23)Adalaj Step Well-


अदालाज वाव ही गुजरात राज्यातील अहमदाबाद जिल्ह्यातील पाच मजली, ऐतिहासिक सुंदर आणि कलात्मक पायऱ्यांची विहीर आहे. ही वीहिर राणी रुद्राबाई यांनी 15 व्या शतकात बांधली होती. ही वाव पाच मजली इमारत असून, गुजरातमधील सर्वोत्तम स्टेपवेलपैकी एक आहे. या विहिरीच्या भिंती आणि खांबांवर देवतांच्या आणि पौराणिक कथांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.

ही विहीर सुंदर, गुंतागुंतीच्या कोरीवकाम आणि नक्षीकाम असलेले एक उत्कृष्ट स्थापत्यशास्त्र आहे. राणी रुद्राबाई या वाघेला सरदार वीर सिंग यांची पत्नी होती.राणा वीरसिंहाच्या निधनानंतर असे सांगितले जाते की, सुलतान महमूद बेगडा यांच्याशी विवाह करण्याऐवजी त्यांनी या वावेत आपला जीव दिला.अहमदाबादपासून ही विहीर 18 किलोमीटर अंतरावर असून जगभरातील पर्यटक या विहिरीला भेट देतात.

24)Nalsarovar Bird Sanctuary-


नल सरोवर पक्षी अभयारण्य हे गुजरात राज्यातील अहमदाबाद जिल्ह्यातील सानंद गावाजवळ असलेले भारतातील सर्वात मोठे पाणथळ पक्षी अभयारण्य आहे. हे अभयारण्य 120.82 -चौरस किलोमीटर क्षेत्रात विस्तारलेले असून येथील परिसर दलदलीचा आहे. एप्रिल 1969 मध्ये हे ठिकाण पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. येथे वसंत ऋतूमध्ये स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांचे लाखोंच्या संख्येने मोठे कळप आढळतात. हिवाळ्यात या सरोवरात 210 पेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी येतात.

येथील तलावात गुलाबी पेलिकन , पर्पल मूरहेन , लेसर फ्लेमिंगो आणि ग्रेटर फ्लेमिंगो , पांढरे करकोचे , बिटरनच्या चार प्रजाती , क्रेक , ग्रेब , ब्राह्मणी बदके आणि बगळे हे स्थलांतरित पक्षी येतात. याशिवाय येथे जंगली गाढवे, मुंगूस, लांडगे आणि कोल्हे हे वन्यजीव प्राणी आढळतात. या अभयारण्यात बोटिंगची सोय आहे. व येथील अभिरुख केंद्रात पक्ष्यांच्या प्रजाती आणि स्थलांतराबद्दल माहिती दिली जाते.

25)Sabarmati Riverfront-


साबरमती रिव्हरफ्रंट हा गुजरात राज्यातील अहमदाबाद जिल्ह्यातील साबरमती नदीच्या काठावर विकसित केलेला एक वॉटरफ्रंट आहे. हे ठिकाण एक नयनरम्य शहरी विकास प्रकल्प साबरमती नदीच्या दोन्ही काठांवर विकसित केले आहे. या प्रकल्पाची प्रस्तावित रचना 1960 च्या दशकात झाली होती आणि 2005 मध्ये बांधकाम सुरू झाले. हा एक नयनरम्य शहरी विकास प्रकल्प असून

या प्रकल्पाचे उद्दिष्ट नदीकाठाचे चैतन्यशील आणि मनोरंजनाच्या जागेत रूपांतर करने. येथे 10 किमी पेक्षा जास्त लांबीचा सुंदर लँडस्केप असलेला विहार आहे. रुंद पदपथ, हिरवीगार उद्याने, रिव्हरफ्रंट फ्लॉवर पार्क, मुलांचे उद्यान, सायकल चालवणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक अँफीथिएटर अशी विविध आकर्षणे आहेत.

26)Lothal-


लोथल हे गुजरात राज्यातील अहमदाबाद जिल्ह्यातील ढोलका तालुक्यातील सरगवाला गावाजवळ वसलेले सिंधू संस्कृतीचे एक महत्त्वाचे बंदर शहर आहे. या ठिकाणी हडप्पा संस्कृतीतील प्राचीन शहराचे अवशेष पाहायला मिळतात. हे ठिकाण 4,500 वर्षांपूर्वीचे असून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याने 1954 मध्ये या ठिकाणाचा शोध लावला. येथे एक टाउनशिप, एक मोठे डॉकयार्ड, एक बाजारपेठ आणि जगातील सर्वात जुनी ‘गोदी’ यांचा समावेश आहे.

तसेच येथे केलेल्या उत्खननात अनेक पुरातत्त्वीय वस्तू, ज्यामध्ये दागिने, मातीची भांडी, मुद्रा, धार्मिक वस्तू आणि दैनंदिन वापराच्या वस्तू सापडल्या आहेत. व उत्खनन केलेल्या क्षेत्रांजवळ पुरातत्व संग्रहालय आहे,जेथे या वस्तूंचे प्रदर्शन केले जाते.लोथल स्थळाला 2014 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकन देण्यात आले आहे.

27)Dada Bhagwan Temple-


दादा भगवान मंदिर हे गुजरातमधील अहमदाबाद येथे अडालज गावाजवळील एक लोकप्रिय जैन त्रिमंदिर आहे. हे मंदिर एक अद्वितीय संकल्पनेतून दादा भगवान फाउंडेशनने बांधले आहे. या मंदिरात जैन, शैव आणि वैष्णव देवता व सर्व धर्मांच्या मूर्ती एकाच व्यासपीठावर पुजल्या जातात. त्यामुळे लोकांना एकोपा आणि धार्मिक एकतेचा संदेश मिळतो. हा मंदिर परिसरात अत्यंत शांत असून या मंदिराची वास्तुकला अत्यंत सुंदर आहे.

येथील मंदिराच्या भिंती आणि छतावरील सुंदर रंगीत काचेचे,कोरीवकाम, गुंतागुंतीचे नक्षीकाम केलेले आहे.या मंदिरात दादा भगवान व जैन संतांच्या अनेक मूर्ती आहेत. त्यामुळे जैन यात्रेकरूंचे हे श्रद्धेचे ठिकाण आहे. तसेच या मंदिराच्या आवारात हिरवीगार बाग, संग्रहालय, मिनी थिएटर आणि पुस्तकांचे दुकान आहे.

28)Amdavad ni Gufa-


अमदावाद नी गुफा हे गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यातील एक अद्वितीय भूमिगत कला दालन आहे. ही गुफा प्रसिद्ध वास्तुतज्ञ बालकृष्ण दोषी आणि कलाकार एम.एफ. हुसेन यांनी 1994 मध्ये चित्रे प्रदर्शित करण्यासाठी बांधली आहे. ही गुफा हुसेन-दोशी नी गुफा म्हणूनही ओळखले जाते. या गुहेची भूमिगत रचना, वास्तुकला प्राचीन आणि नैसर्गिक थीमवर आधारित आहे. व एकमेकांशी जोडलेल्या घुमटांनी बनवलेल्या गुहेसारखी आहे.

येथे खांबासारख्या झाडांच्या खोडांचा एक चक्रव्यूह आहे. ही गुफा नैसर्गिक गुहेसारखी दिसते व येथे एम.एफ. हुसेन यांनी भिंतींवर काढलेली चित्रे आणि कलाकृती प्रदर्शित केल्या आहेत. ही गुफा एवढी अद्वितीय आहे की तिचे शब्दात वर्णन करता येत नाही, त्यामुळे प्रत्यक्ष अनुभवण्याची गरज आहे.

29)Kamala Nehru Zoo-


कमला नेहरू प्राणीसंग्रहालय हे गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यातील कांकरिया तलावाच्या जवळ वसलेले लोकप्रिय वन्यजीव उद्यान आहे. या उद्यानात दुर्मिळ वनस्पती व प्राणी आहेत. कमला नेहरू प्राणीसंग्रहालय, 117 एकर जागेत विस्तारलेले असून 1951 मध्ये रुबेन डेव्हिड यांनी त्याची स्थापना केली. यासाठी त्यांना 1974 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे प्राणी संग्रहालय 1974 मध्ये हे आशियातील सर्वोत्तम प्राणीसंग्रहालय म्हणून ओळखले गेले.

या प्राणीसंग्रहालयात 450 सस्तन प्राणी, 2000 पक्षी, 140 सरपटणारे प्राणी आहेत.येथे सिंह, अजगर, साप, हत्ती, अल्बिनो , रीसस माकड, ठिपकेदार हरण, चिंकारा, हत्ती, इमू, जंगली बबलर, बुश-क्वेल आणि कॉमन पाम सिव्हेट हे वन्यजीव प्राणी आहेत. दरवर्षी 20 लाखांपेक्षा जास्त पर्यटक या ठिकाणाला भेट देतात.

30)Sardar Vallabhbhai Patel National Museum-


सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय संग्रहालय हे गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय स्मारक आहे. हे संग्रहालय 1622 मध्ये दरम्यान मुघल सम्राट शाहजहानने बांधलेल्या मोती शाही महल या ऐतिहासिक इमारतीमध्ये आहे.पूर्वी या महलाचा वापर गुजरातच्या राज्यपालांच्या निवासस्थानासाठीही केला जात होता.1980 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शताब्दी जयंतीवेळी हे ठिकाण त्यांचे स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.

या संग्रहालयात सरदार पटेलांचे छायाचित्र, त्यांच्या वैयक्तिक वस्तू, आणि त्यांचे राष्ट्रीय चळवळीतील योगदान दर्शवणारी प्रदर्शने आहेत.व सरदार पटेलांच्या युरोपातील वकील जीवनापासून ते खादीचे कपडे घालण्यापर्यंतचा बदल दाखवण्यात आला आहे. तसेच येथे महात्मा गांधी आणि सरदार सरोवर प्रकल्प याची माहिती देणारा विभागही आहे.

31)Lalbhai Dalpatbhai Museum-


लालभाई दलपतभाई संग्रहालय हे गुजरातच्या अहमदाबादमधील कला आणि पुरातत्वशास्त्राचे संग्रहालय आहे. या संग्रहालयाची स्थापना प्रसिद्ध उद्योगपती श्री कस्तुरभाई लालभाई आणि जैन आचार्य मुनी पुण्यविजयजी यांनी 1956 मध्ये लालभाई दलपतभाई इंडोलॉजी इन्स्टिट्यूट म्हणून संयुक्तपणे केली. या संग्रहालयात ताडाच्या पानांवर काढलेली दुर्मिळ हस्तलिखिते,

तिसऱ्या ते अकराव्या शतकातील शिल्पे आणि मुघलपूर्व काळातील लघु चित्रे आहेत. तसेच येथे शिल्प, कांस्य, हस्तलिखिते, रेखाचित्रे, लघुचित्रे, लाकूडकाम, दगड, संगमरवरी,मण्यांची कामे, 75,000 जैन हस्तलिखिते आणि भारतातील प्राचीन आणि समकालीन नाणी यांचे संग्रहालय आहे.

32)Boot Bhavani temple-


बुट भवानी मंदिर हे गुजरात मधील अहमदाबाद जिल्ह्यातील ढोलका तालुक्यात,अर्नेज गावात दुर्गा मातेच्या बूट भवानी रूपाला समर्पित प्राचीन मंदिर आहे.हे मंदिर 51 शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. व ही माता विविध जातींच्या लोकांची कुलदेवी आहे.या मंदिराची स्थापत्य शैली आणि रचना अत्यंत मनमोहक असून येथील मंदिराचा प्रत्येक इंच बारीक, गुंतागुंतीच्या नक्षीकाम व कोरीवकामांनी सजवलेला आहे. येथील मंदिराच्या आवारात एक सुंदर बाग असून भक्तांसाठी येथे अतिथिगृह, प्रार्थनास्थळ आणि राहण्याची व जेवणाची सुविधा आहे.

Visit the travel blog

1)गुजरात राज्यातील कांकरिया तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?

गुजरात राज्यातील कांकरिया तलाव अहमदाबाद जिल्ह्यात आहे .

2) हुथीसिंग जैन मंदिर कोणत्या साली बांधले ?

2) हुथीसिंग जैन मंदिर 1848 साली बांधले .

3) अहमदाबाद जिल्ह्यातील ‘द पोल्स’ म्हणजे काय?

‘द पोल्स’ म्हणजे एकाच गेट्समधून प्रवेश असलेले, अरुंद रस्ते आणि सामायिक जागा असलेले बंदिस्त निवासी भाग होय.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top