जुनागढ जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-Top 31 places to visit in Junagadh District

मित्रांनो भारत भ्रमंतीमध्ये आपण भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे पाहत आहोत, आता आपण पाहणार आहोत गुजरात मधील जुनागढ जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे,जुनागढ हा गिरनार पर्वतरांगाच्या पायथ्याशी वसलेला एक सुंदर, ऐतिहासिक, निसर्गरम्य जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या नैऋत्य दिशेला अरबी समुद्र, उत्तरेस पोरबंदर आणि पूर्वेस अमरेली जिल्हा आहे. हा जिल्हा मंदिरांची भूमी आणि किल्ल्यांचे शहर म्हणूनही ओळखला जातो. हा जिल्हा 1948 मध्ये भारतात समाविष्ट झाला. Top 31 places to visit in Junagadh District

या शहरावर अनेक राजवंशांनी राज्य केले आहे व येथे हिंदू, बौद्ध, जैन आणि मुस्लिम या चार धर्मांचा प्रभाव राहिला आहे. या ठिकाणी असलेल्या सुंदर किल्ले, राजवाडे. अनेक प्राचीन वास्तू आणि वारसास्थळे व येथील अनोख्या स्थापत्यकलेमुळे जुनागढ हे समृद्ध संस्कृतीचे शहर मानले जाते. जूनागढ हे मुख्य शहर आणि अपरकोट या दोन भागांत विभागलेले आहे. या जिल्ह्यातील अपरकोट हा प्राचीन किल्ला वैशिष्ट्यपूर्ण स्थानावर व दुर्गम रस्त्यावर अत्यंत मजबूत असल्यामुळे मौर्य व गुप्त शासकांसाठी फायद्याचा ठरला.

कारण गेल्या 1000 वर्षांत सुमारे 16 आक्रमणांचा यशस्वीपणे प्रतिकार या किल्ल्याने केला आहे. जुनागढ जिल्ह्यात 14 तालुके असून येथे प्रामुख्याने गुजराती भाषा जास्त प्रमाणात बोलली जाते. तसेच या जिल्ह्याची ही अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती आणि उद्योगांवर अवलंबून आहे. या जिल्ह्यत शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, रेशीम शेती आणि मधमाशी पालन, केले जाते व सिमेंट, रसायने,मत्स्य प्रक्रिया आणि खनिजांवर आधारित उद्योग केले जातात. या जिल्ह्यात ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक पर्यटन स्थळे मोठ्या प्रमाणात आहेत.

Top 31 places to visit in Junagadh District

जुनागढ जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे

1)Dattatreya Temple-

Top 31 places to visit in Junagadh District


दत्तात्रेय मंदिर हे गुजरात मधील जुनागढ जिल्ह्यातील गिरनार पर्वतावर असलेले एक अत्यंत पवित्र व धार्मिक तीर्थक्षेत्र आहे.हे मंदिर समुद्रसपाटीपासून 3295 फूट उंचीवर असून, या मंदिराच्या अंतिम शिखरावर पोहोचण्यासाठी सुमारे 9,999 पायऱ्या चढून जावे लागते. हे ठिकाण भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेले आहे. आणि बारा हजार वर्षे तपाने सिध्द केलेले आहे. गिरनार पर्वत हा असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा, शिखरांचा आणि सुळके यांचा समूह असलेला परिसर आहे.

हे ठिकाण अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्यप्राणी, जगताने संपन्न विविध औषधी वनस्पतीने बहरलेला आहे.शिवपुराणात गिरनारचा उल्लेख रेवताचल पर्वत तर स्कंद पुराणात रैवत, रेवताचल म्हणून करण्यात आला आहे. या ठिकाणी असलेल्या अन्नछत्रांमध्ये हजारो भाविक दररोज अन्नग्रहण करतात.जुनागड या शहरापासून गिरनार तळ
पाच किलोमीटर अंतरावर आहे.

2)Uparkot Fort-


उपरकोट किल्ला हा गुजरात मधील जुनागढ जिल्ह्यातील एक अत्यंत लोकप्रिय ऐतिहासिक व प्राचीन किल्ला आहे.हा किल्ला मौर्य साम्राज्य चंद्रगुप्ताने इ.स.पूर्व 319 मध्ये बांधला होता. 1500 वर्षापूर्वीचा हा किल्ला जुनागड शहराच्या मध्यभागी, गिरनार पर्वताच्या पायथ्याशी असून या किल्ल्यात रनकदेवी महल आणि दामोदर कुंड अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत.

कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर न करता बांधण्यात आलेला हा भव्य किल्ला म्हणजे वास्तुकलेचे एक अद्भुत उदाहरण आहे. तसेच या किल्ल्यामध्ये भक्कम दगडापासून बनवलेल्या दोन उत्कृष्ट पायऱ्या आहेत. त्याच्या भिंती इतक्या जाड आणि मजबूत आहेत की अजूनही हा किल्ला उभा आहे. जुनागढमधील हा किल्ला एक संरक्षित स्मारक आणि एक महत्त्वाचे सांस्कृतिक स्थळ आहे.

3)Amba Mata Mandir-


अंबा माता मंदिर हे गुजरात मधील जुनागढ जिल्ह्यातील गिरनार टेकडीवर असलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर गिरनार टेकडीवर 600 मीटर उंचीवर असून या मंदिराचा सर्वात जुना उल्लेख हा आठव्या शतकातील आढळतो, सध्याचे मंदिर हे पंधराव्या शतकात बांधलेले आहे.अंबिका मंदिर हे अंबाजी मंदिर म्हणूनही ओळखले जाते. दरवर्षी या मंदिरात नवविवाहित जोडपी आणि लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी व आशीर्वाद मिळवण्यासाठी येतात.असे सांगितले जाते की देवी अंबाच्या आशीर्वादामुळे जोडप्यांचे शाश्वत वैवाहिक जीवन आनंदाचे होते.

4)Gir National Park-

Visit our website: allindiajourney.com


गिर राष्ट्रीय उद्यान हे गुजरात मधील जुनागढ जिल्ह्यातील तलाला तालुक्यातील एक जंगल आणि वन्यजीव अभयारण्य आहे. हे अभयारण्य आशियाई सिंहाचे निवासस्थान, आणि त्यांच्या प्रजातींचे संवर्धन केंद्र आणि आफ्रिकेबाहेरील सिंहांसाठी जगातील एकमेव ठिकाण आहे. तसेच हे अभयारण्य सासण गीर म्हणून ओळखले जाते. हे अभयारण्य 1413 चौरस किलोमीटर क्षेत्रावर विस्तारलेले असून यापैकी 258 चौ. किमी हे मुख्य उद्यान क्षेत्र आहे. येथे विविध प्रकारचे वृक्षांनी बहरलेले वनाच्छादित प्रदेश आहे.

व त्यामध्ये बाभूळ, बरगद ,सागाची झाडे आणि ढाक यांसारख्या वनस्पतींचा समावेश आहे. तसेच हे अभयारण्य विविध प्रकारचे वन्यजीव प्राणी आणि 300 पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजातींचे घर आहे. या जंगलाला 1995 साली अभयारण्याचा दर्जा मिळाला आहे.गिर राष्ट्रीय उद्यान हे आशियाई सिंहांसाठी जगभर प्रसिद्ध असून जुनागढ पासून हे अभयारण्य 65 किलोमीटर अंतरावर आहे.

5)Mahabat Maqbara-


महाबत मकबरा हा गुजरात मधील जुनागड जिल्ह्यातील एक ऐतिहासिक व सांस्कृतिक मकबरा आहे.महाबत मकबरा पॅलेस, हा बहादुद्दीनभाई हसनभाई यांचा मकबरा म्हणूनही ओळखला जातो.हा मकबरा पूर्वी जूनागढच्या मुस्लिम शासक नवाबांचे निवासस्थान होते. या मकबऱ्याची रचना अत्यंत गुंतागुंतीच्या आणि नाजूक कोरीवकाम, चांदीचे दरवाजे व सुंदर सजावट केलेली आहे.

त्यामुळे हा मकबरा सुंदर वास्तुकलेचे उदाहरण असून पर्यटकांचे एक आकर्षणाचे केंद्र आहे. महाबत मकबरा हा ‘द मिनी ताज’ म्हणून ओळखला जात असून या मकबऱ्याचे आग्रा येथील प्रतिष्ठित ताजमहालशी आश्चर्यकारक साम्य आहे. हा मकबरा उपरकोट किल्ल्याजवळ असून जुनागढच्या समृद्ध इतिहासाचा आणि वास्तुकलेचा महत्त्वाचा भाग आहे.

6)Sakkarbaug Zoological Garden-


सक्करबाग प्राणीसंग्रहालय हे गुजरात मधील जुनागढ जिल्ह्यातील प्राणीसंग्रहालय आहे.या प्राणीसंग्रहालयाची स्थापना 1863 मध्ये जुनागड राज्यातील मोहबत खांजी बाबी यांनी केली होती . हे प्राणीसंग्रहालय 490 एकर वर विस्तारलेले असून भारतातील सर्वात जुने व चौथे सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय आहे. हे प्राणीसंग्रहालय आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध आहे. या संग्रहालयात दोन आशियाई सिंहांचे सांगाडे, तसेच पँथर, हरण, रानडुक्कर,काळवीट, निळा बैल आणि ठिपकेदार हरण यांचे सांगाडे ठेवण्यात आले आहेत.

आणि विविध पक्ष्यांची अंडी, चोच व पंख प्रदर्शित करण्यात आले आहेत. या प्राणी संग्रहालयात गिर राष्ट्रीय उद्यानातील काही दुर्मिळ प्रजाती,आफ्रिकन चित्ते पहायला मिळतात.जुनागढ शहरापासून हे ठिकाण दोन किलोमीटर अंतरावर आहे.

7)Durbar Hall Museum-


दरबार हॉल संग्रहालय हे गुजरात मधील जुनागड जिल्ह्यातील जुन्या मोती बाग पॅलेसमध्ये असलेले एक आकर्षक व गुजरातमधील सर्वोत्तम संग्रहालयांपैकी एक आहे. हे संग्रहालय नवाबांचा पूर्वीचा राजवाडा आता संग्रहालयात बदलला आहे. या भव्य संग्रहालयात नवाबच्या काळातील 2900 कलाकृती प्रदर्शित करणाऱ्या गॅलरी आहेत.

या ठिकाणी चांदीच्या वस्तू, दागिने,चमकणारे झुंबर,शस्त्रे,हिऱ्याने विणलेले कार्पेट आणि नवाबाच्या कुत्र्यांसह छायाचित्रे व फोटो आहेत.हे संग्रहालय इतिहासप्रेमींसाठी एक खजिना असून, येथे त्या काळातील जुनागढच्या राजेशाही भूतकाळाची झलक पाहायला मिळते.

8)Bhavnath Mahadev Temple-


भवनाथ महादेव मंदिर हे गुजरात मधील जुनागढ जिल्ह्यातील भवनाथ गावातील गिरनार टेकडीच्या पायथ्याशी असलेले एक पवित्र व प्राचीन तीर्थक्षेत्र आहे.येथील शिवलिंग स्वयंभू आहे या व या मंदिराबद्दल अनेक दंतकथा सांगितल्या जातात त्या म्हणजे, जेव्हा शिव आणि पार्वती गिरनार टेकड्यांवरून प्रवास करत होते तेव्हा त्यांचे दैवी वस्त्र सध्याच्या मृगी कुंडावर पडले होते.

त्यामुळे हे ठिकाण भगवान शिवभक्तांसाठी एक पवित्र तीर्थस्थळ बनले.महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते त्यावेळी भाविक आणि नाग बाव येथील पवित्र मृगी कुंडात स्नान करतात.

9)Girnar Hill-

10)Girnar Jain temples-


गिरनार जैन मंदिरे ही गुजरात मधील जुनागड जिल्ह्यातील गिरनार पर्वतावर असलेले जैन धर्मासाठी एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी अनेक प्राचीन जैन मंदिरांचा समूह आहे, जो गिरनार जैन मंदिरे म्हणून ओळखला जातो. हे ठिकाण श्वेतांबर आणि दिगंबर या दोन्ही पंथांसाठी महत्त्वाची आहे. येथे 16 संगमरवरी कोरीवकाम असलेली जैन मंदिरे एकत्रित केलेली आहेत व ती सर्व बंदिस्त आहेत. तसेच येथे भगवान नेमिनाथांची (22 वे तीर्थंकर) जगातील सर्वात प्राचीन मूर्ती आहे.

व हे स्थळ मोक्षप्राप्तीसाठी महत्त्वाचे मानले जाते. येथील सर्वोच्च शिखरावर पोहोचण्यासाठी 9999 पायऱ्या चढून जावे लागते. नेमिनाथ मंदिराची उभारणी 1128 ते 1159 या काळात झाली होती.या मंदिरांच्या समूहात चौकोनी अंगणे, कॉरिडॉर आणि जैन तीर्थंकरांच्या कोरीवकाम असलेले खांब आहेत.


गिरनार टेकडी ही गुजरात मधील जुनागढ जिल्ह्यातील रेवतक पर्वत म्हणून ओळखला जाणारा पवित्र पर्वत आहे. हा पर्वत जैन आणि हिंदू मंदिरांनी व्यापलेला आहे. व येथे लाखो भाविक 10,000 दगडी पायऱ्या चढून देश आणि विदेशातून येत असतात. या गिरनार पर्वताच्या शिखरावर अंबा मातेचे मंदिर, गोरखनाथचे मंदिर, दत्तात्रेय मंदिर व कालिका मातेचे मंदिर आहे.

तसेच या पवित्र पर्वतावर जैन धर्मियांची सोळा मंदिरे आहेत व 22 वे तीर्थंकर भगवान नेमिनाथ यांची ही निर्वाणभूमी मानली जाते. येथील तीर्थंकराचे स्मरण करणारे मंदिर 11 व्या शतकात बांधले गेले .

11)Narsinh Mehta Lake-


नरसिंह मेहता तलाव हा गुजरात मधील जुनागढ जिल्ह्यातील एक पवित्र व प्रसिद्ध कृत्रिम तलाव आहे. हा तलाव शांत, निसर्गरम्य वातावरणात व हिरवळीने वेढलेला असून पर्यटक येथे बोट राईडचा आनंद घेऊ शकतात. हा पवित्र तलाव म्हणजे नरसिंह मेहतांच्या भक्तीचे आणि त्यांच्या जीवनातील प्रसंगांचे स्मरण करून देणारे ठिकाण आहे. हा तलाव ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा असून संत नरसिंह मेहता यांच्या जीवनाशी जोडलेला आहे.

नरसिंह मेहता हे कृष्णभक्त होते व त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग या तलावाशी निगडित आहेत. संत नरसिंह मेहतांच्या भक्तीपर रचनेतील’वैष्णव जन तो तेणे कहिए’ या प्रसिद्ध ओळींमुळे ते गुजरातमध्ये खूप लोकप्रिय आहेत.संत नरसिंह मेहतांच्या महान भक्तीचे आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतीक असलेल्या या तलावाला अनेक भाविक व पर्यटक भेट देतात.

12)Damodar Kund-


दामोदर कुंड हे गुजरात मधील जुनागड जिल्ह्यातील गिरनार टेकड्यांच्या पायथ्याशी, लोकांची श्रद्धा असलेले पौराणिक व पवित्र कुंड आहे. हा तलाव चांगल्या घाटाने बांधलेला असून 257 फूट लांब आणि 50 फूट रुंद आणि 5 फूट खोल आहे. गिरनार पर्वतावर जाण्यासाठी या तलावापासूनच पायऱ्या सुरू होतात. या तलावात मृतदेहांच्या अंत्यसंस्कारानंतर शिल्लक राहिलेल्या राख आणि अस्थींचे विसर्जन केले जाते.

कारण येथे मृत आत्म्यांना मोक्ष मिळतो अशी लोकांची श्रद्धा आहे. आणि या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील तलावाच्या पाण्यात हाडे विरघळण्याचे गुणधर्म आहेत.दामोदर कुंड हे हिंदू धर्मानुसार एक पवित्र तलाव आहे.

13)Ashok Shilalekh –


अशोक शिलालेख हा गुजरात मधील जुनागढ जिल्ह्यातील सम्राट अशोकाच्या काळातील गिरनार पर्वताच्या मार्गावर एक पुरातत्वीय महत्व असलेला शिलालेख आहे. या ठिकाणी इ. स. 250 पूर्वी सम्राट अशोकाने स्वतःच्या राज्यात घालून दिलेली ,ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेली 14 आज्ञापत्रे आहेत. अशोकाच्या कारकिर्दीत कोरलेल्या या शिलालेखावर त्याच्या शासन, श्रद्धा आणि बौद्ध धर्माचा प्रसार आणि लोकांचे कल्याणाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळते.

हा शिलालेख एक मोठा दगड असून येथे सम्राट अशोकाच्या काळातील एक महत्त्वाचा पुरातत्वीय ठेवा आहे. येथे सम्राट अशोक, राजा रुद्रदामन प्रथम आणि गुप्त सम्राट स्कंदगुप्त यांचे शिलालेख आहेत.

14)Radha Damodar Temple-


राधा दामोदर मंदिर हे गुजरात मधील जुनागढ जिल्ह्यातील कृष्णाचे दुसरे नाव असलेल्या दामोदर हरीचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर गिरनार तलेटीला जाणाऱ्या रस्त्यावर, सोनारख नदीच्या काठावर असून या मंदिरात दामोदरांची पूजा ही त्यांच्या चार भुजा असलेल्या विष्णू स्वरूपात केली जाते. आणि या मंदिरातील मध्यवर्ती गाभाऱ्यात त्यांच्या शेजारी यांची पत्नी देवी राधा आहेत.

तसेच या मंदिर परिसरात प्राचीन व पवित्र दामोदर कुंड,रेवती कुंड,रेवती – बलदेवजी मंदिर आणि चिंतामणी गणपती मंदिर आहे. असे सांगितले जाते की हे मंदिर भगवान श्रीकृष्णाचे नातू वृजनाभ यांनी बांधले होते.

15)junagadh Buddhist caves-


जुनागढ बौद्ध गुहा हे गुजरात मधील जुनागढ जिल्ह्यातील प्राचीन दगडात कोरलेल्या गुहांचे समूह आहेत. बौद्ध उत्पत्तीच्या या लेण्या 2 ते 3 व्या शतकात कोरलेल्या असून ऐतिहासिक, सांस्कृतिक व प्राचीन दगडी बौद्ध स्मारक आहेत. या लेण्या’बावा प्यारा लेणी’ म्हणूनही ओळखल्या जातात. या लेण्यांमध्ये गुंतागुंतीचे कोरीवकाम, पुतळे आणि शिलालेख आहेत.

व या लेण्या गांधारमधील ग्रीको-बौद्ध कला व पर्शियन वास्तुशैलीत बांधलेल्या आहेत. त्यामुळे प्राचीन बौद्ध वारशाची माहिती मिळते. या गुहा एक महत्त्वाचे पुरातत्वीय स्थळ आहे,आणि जुनागढच्या समृद्ध सांस्कृतिक भूतकाळाची माहिती देणारे ठिकाण आहे. इतिहासप्रेमी आणि पर्यटकांचे हे आकर्षणाचे ठिकाण आहे.

16)Shri Swaminarayan Mandir-


श्री स्वामीनारायण मंदिर हे गुजरात मधील जुनागढ जिल्ह्यातील धार्मिक व आश्चर्यकारक तीर्थस्थळ आहे. राधा कृष्णाचे हे मंदिर जुनागड शहराच्या मध्यावर व गिरनार पर्वताच्या कुशीत वसलेले आहे. हे मंदिर राजस्थानी गुलाबी दगडापासून बनवले असून या स्वामीनारायण मंदिरात 278 फूट वर्तुळ आणि आश्चर्यकारक वास्तुकला आहे. या मंदिराला पाच शिखरे व असंख्य शिल्पे आहेत. हा मंदिर परिसर निसर्गरम्य,शांत आणि हिरव्यागार टेकड्या आणि झाड वेलींनी बहरलेला आहे.

या मंदिरात सोन्याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला असून येथील तिन्ही घुमट सोन्याच्या मुलामाने मढवलेले आहेत.या मंदिरासाठी राजा हेमंतसिंह यांनी जमीन दान केली होती. या मंदिरात प्रवेश केल्यावर एक वेगळीच अनुभूती मिळते. हे मंदिर आध्यात्मिक लोकांसाठी स्वर्गीय आनंद देणारे ठिकाण आहे.

17)Khapra Kodiya Caves-


खापरा कोडिया लेणी ही गुजरात मधील जुनागढ जिल्ह्यातील बौद्ध लेणी समूहाचा भाग आहे. उपरकोट किल्ल्याच्या पायथ्याशी, आणि प्राचीन सुदर्शन तलावाच्या काठावर असलेल्या या लेण्या 3-4 शतकातील असून, भिंतीवरील लिखाण आणि लहान अक्षरांच्या आधारे, या लेण्या सम्राट अशोकाच्या राजवटीत असल्याचे सांगितले जाते.

या लेण्या बौद्ध भिक्षूंनी कोरलेल्या चुनखडीच्या लेण्या असून त्यामध्ये पाणी साठवण्याची टाकी, स्वयंपाकघर आणि ध्यान कक्ष आहे. तत्कालीन बौद्ध भिक्षूंच्या जीवनशैलीची माहिती मिळते. इतिहास प्रेमी आणि पर्यटकांसाठी हे एक उत्तम ठिकाण असून या लेण्यांना भेट देण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण तर्फे शुल्क आकारले जाते.

18) Navghan Kuvo-


नवघन कुवो ही गुजरात मधील जुनागढ जिल्ह्यातील गिरनार पर्वताच्या पायथ्याशी, उपरकोट किल्ल्यात असलेली एक प्राचीन विहीर आहे. ही विहीर जुनागढ शहराच्या मध्यभागी असलेल्या उपरकोट किल्ल्याच्या आवारात असून 1000 पेक्षा जास्त वर्ष जुनी व 52 मीटर खोल आहे. ही विहीर एकाच दगडातून कोरलेली आहे.

ही विहीर म्हणजे त्या काळातील अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना आहे. या विहिरीत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण पायऱ्यांमुळे पाण्याच्या पातळीपर्यंत पोहोचता येते.नवघन कुवो हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात भेट देतात.

19)Willingdon Dam-


विलिंग्डन धरण हे गुजरात मधील जुनागढ जिल्ह्यातील दातार टेकड्यांच्या पायथ्याशी कळवा नदीवर बांधलेले एक महत्त्वाचे ऐतिहासिक धरण आहे.या धरणाचे नाव त्यावेळच्या भारताच्या राज्यपाल मार्क्वेस विलिंग्डन यांच्या नावावरून ठेवण्यात आले. या धरणाचे बांधकाम गिरनार काळ्या दगडांचा वापर करून केलेले आहे.

या धरणाचे बांधकाम 1929 मध्ये सुरू करण्यात आले व ते 1936 मध्ये पूर्ण झाले. हे धरण 44 फूट उंचीवर असून या धरणाची पाणी साठवण क्षमता एक अब्ज गॅलन एवढी आहे. 9 नोव्हेंबर 2008 रोजी या धरणाचे नाव सरदार पटेल धरण असे ठेवण्यात आले. सध्या हे धरण जुनागढ महानगरपालिकेच्या मालकीचे आहे.

20) Datar Hills-


दातार टेकड्या ह्या गुजरात मधील जुनागढ जिल्ह्यातील गिरनार पर्वताच्या पाच मुख्य शिखरांपैकी एक आहेत. या अद्भुत दातार टेकड्या नयनरम्य,हिरवळीने वेढलेले आणि आश्चर्यकारक दृश्ये असलेले एक पवित्र धार्मिक स्थळ आहे. हे ठिकाण हिंदू व जैन धर्माचे पवित्र तीर्थस्थळ असून येथे अनेक प्राचीन मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे आहेत. तसेच या टेकड्यांवर अनेक नैसर्गिक गुहा, हिरव्यागार दऱ्या आणि निसर्गसौंदर्याने बहरलेले नयनरम्य धबधबे आहेत.

व हे ठिकाण हिंदू व मुस्लिम दोन्ही धर्मांच्या लोकांचे पवित्र ठिकाण आहे. या ठिकाणी जमियल शाह दातार यांची दरगाह, दातार पर्वत (उपला दातार) दर्शन, निचला दातार दर्शन ही प्रसिद्ध तीर्थस्थळे असून या पर्वतावरील नगारिया दगड हे असे आहेत की त्यांना ठोकर मारल्यास नगाऱ्याच्या आवाजासारखी ध्वनी निर्माण होतो. हे एक आश्चर्यच आहे. ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमी या ठिकाणी येथील चित्तथरारक दृश्यांचा अनुभव घेण्यासाठी येत असतात.

21)Adi Kadi Vav-


आदि कडी वाव ही गुजरात मधील जुनागड जिल्ह्यातील उपरकोट किल्ल्यातील पंधराव्या शतकात बांधलेली एक पायऱ्यांची विहीर आहे. ही विहीर इतर विहिरीपेक्षा पूर्णपणे वेगळी असून ती दगडात कोरलेली आहे. या विहिरीच्या तळापर्यंत पोहोचण्यासाठी 166 पायऱ्या खाली उतरून जावे लागते.

आदि कडी वाव ही नंदा प्रकारची गोल आकाराची 123 पायऱ्यांची खोल विहीर असून ती बांधलेली नाही तर नैसर्गिक खडकापासून कोरलेली आहे. या विहिरीत दोन कुमारी मुलींचा बळी दिल्यानंतर या विहिरीला पाणी मिळाले अशी आख्यायिका सांगितली जाते.

22)Shree Gayatri Shakti Peeth – Mandir-


श्री गायत्री शक्तीपीठ – मंदिर हे गुजरात मधील जुनागड जिल्ह्यातील गिरनार तलेटी रस्त्यावर वाघेश्वरी माँ मंदिराजवळ असलेले पवित्र व प्राचीन गायत्री मातेचे मंदिर आहे. या मंदिरातील वातावरण शांततापूर्ण असून हे मंदिर 1981 मध्ये बांधले आहे. या मंदिरात सावित्री, दुर्गा माता, महालक्ष्मी, सरस्वती, वेद माता, विश्व माता या विविध देवतांच्या मूर्ती व नवग्रह मंदिर आणि महादेव मंदिर आहे.

तसेच या मंदिरात भाविकांसाठी यज्ञशाळा आणि सत्संग हॉल बांधण्यात आला असून दर महिन्याच्या पहिल्या दिवशी आणि तिसऱ्या रविवारी या मंदिरात मोफत औषधोपचार दिले जातात.व आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि दंत उपचार देणारे मोफत वैद्यकीय शिबिरे भरविण्यात येतात. या मंदिर परिसरात उपला दातार मोनी बापू आश्रम आणि लक्ष्मण टेकडी ही पर्यटन स्थळे आहेत.

23)Moti Baug-


मोती बाग, हे गुजरात मधील जुनागड जिल्ह्यातील गिरनार पर्वतरांगांच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात वसलेले एक सुंदर उद्यान आहे. ही बाग 2485 हेक्टर क्षेत्रफळावर विस्तारलेली असून यामध्ये जुनागढ कृषी विद्यापीठ आणि बोटॅनिकल गार्डनचा 754.62 हेक्टर परिसर समाविष्ट आहे. मोती बाग, ही पर्ल गार्डन म्हणूनही ओळखले जाते.

विस्तीर्ण परिसरात विस्तारलेल्या या बागेत हिरवळ आणि विविध प्रकारच्या वनस्पती आणि झाडे आहेत. ही बाग गिरनार टेकड्यांच्या जवळ असल्याने पर्यटकांचे हे लोकप्रिय मनोरंजक स्थळ आहे.

24)Science Museum (Planetarium)-


साइन्स म्यूज़ीयम (तारा-घर) हे गुजरात मधील जुनागड जिल्ह्यातील ‘गार्डन कॅफे रेस्टॉरंट’ जवळ, व गिरनार रोडवर असलेले एक विज्ञान संग्रहालय आणि तारामंडळ आहे. या संग्रहालयाची स्थापना 1928 मध्ये करण्यात आली. या संग्रहालयात ग्रामीण भागातील विद्यार्थी व लोकांसाठी मनोरंजनाद्वारे शिक्षण व माहिती दिली जाते. तसेच या ठिकाणी विज्ञान आणि खगोलशास्त्राची अनेक मॉडेल्स प्रदर्शनात ठेवलेली आहेत.

25)Jama Masjid-


जामा मशीद ही गुजरात मधील जुनागढ जिल्ह्यातील एक महत्त्वाची ऐतिहासिक मशिद आहे.ही मशिद मुहम्मद शाह प्रथम यांनी पंधराव्या शतकात 1423 मध्ये बांधली.व ही मशीद उपरकोट किल्ल्याच्या आत असून जुन्या राजवाड्याच्या जागेवर बांधण्यात आली होती. तसेच या मशिदीतअनेक हिंदू वास्तुकाला आहेत. या मशिदीत इंडो-इस्लामिक वास्तुकलेचा अद्वितीय नमुना पाहायला मिळतो.

येथील मशीदीतील अंगणात तीन अष्टकोनी उघड्या जागा आहेत. ज्यामध्ये पूर्वी घुमट होते. या मशिदीच्या छतावरून संपूर्ण शहराचे दृश्य अप्रतिम दिसते. जामा मशीद ही शहरातील सर्वात महत्वाच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांपैकी एक आहे.

26)Muchkunda Gufa-


मुचकुंद गुफा ही गुजरात मधील जुनागढ जिल्ह्यातील एक ऐतिहासिक गुहा आहे. ही गुहा रेवती कुंडाजवळ असून हे एक प्राचीन ठिकाण आहे. ही गुहा राजा मुचकुंदाच्या कथेशी संबंधित आहे. राजा मुचकुंद हे एक अध्यात्मिक राजा होते व त्यांनी भगवान श्रीकृष्णाचे शत्रू कल्यवन याला आपल्या विशेष शक्तीने भस्म केले होते.

या ठिकाणी ऋषि मुचकुंदांनी स्थापन केलेले शिवलिंग असून ते मुचकुंद महादेव म्हणून ओळखले जाते. तसेच येथील गुहेत श्रीकृष्णाचे मंदिर आहे व श्रीकृष्णांनी स्वतः स्थापन केलेले एक शिवलिंग आहे.

27)Tulsi Shyam Springs-


तुलसीश्याम मंदिर हे गुजरात मधील जुनागढ जिल्ह्यातील गिर राष्ट्रीय उद्यानात असलेले एक प्राचीन मंदिर आहे.असे सांगितले जाते की भगवान कृष्णाने येथे तुल नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या ठिकाणाला ‘तुलसीश्याम’ हे नाव मिळाले आहे.या मंदिरातील तुलसीश्याम यांची मूर्ती सुमारे 3,000 वर्षे जुनी असून ही मूर्ती काळ्या दगडात कोरलेली आहे.व या मंदिराजवळ तीन गरम गंधकाचे झरे आहेत. आणि या झऱ्याच्या पाण्यात औषधी व उपचाराचे गुण आहेत. असे सांगितले जाते की या झऱ्याच्या पाण्याने अंघोळ केल्यानंतर त्वचेचे सर्व रोग बरे होतात.

28)Jatashankar Mahadev Mandir-


जटाशंकर महादेव मंदिर हे गुजरात मधील जुनागढ जिल्ह्यातील हे गिरनार टेकड्यांच्या मागील बाजूस, घनदाट जंगलात,हिरव्यागार परिसरात वसलेले एक प्राचीन शिवालय आहे. या मंदिरातील शिवलिंगावर नैसर्गिकरित्या अखंड पाण्याचा प्रवाह थेट शिवलिंगावर जलस्नान म्हणून पडतो.त्यामुळे हे एक आश्चर्यच समजले जाते. तसेच येथून सोनरेख नदी येथून उगम पावते व या नदीवर असलेला धबधबा 20 फूट उंचीवरून खाली कोसळतो.हे मंदिर घनदाट जंगलात असल्यामुळे पर्यटकांना येथे शांत व सुंदर वातावरण अनुभवायला मिळते.

29)Jamil Shah Datar Dargah-


जमील शाह दातार दरगाह ही गुजरात मधील जुनागड जिल्ह्यातील,श्रीनाथ नगर तेथे असलेले एक धार्मिक स्थळ आहे.हा दर्गा 15 व्या शतकातील हजरत सखी जमील शाह यांचा प्राचीन दर्गा आहे. हा पवित्र दर्गा गुजरातच्या जुनागढच्या दातार टेकड्यांच्या माथ्यावर असून हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे. हा दर्गा निसर्गरम्य आणि शांत वातावरणात आहे.

या ठिकाणी दरवर्षी उर्स मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच येथील दातार टेकड्यांवरून शहराचे विहंगम आणि नयनरम्य दृश्य पाहायला मिळते. जुनागड मधील हे एक सर्वोत्तम पर्यटन स्थळ असून पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात भेट देतात.

30)Sarkhadiya Hanuman Temple-


सरखडिया हनुमान मंदिर हे गुजरात मधील जुनागड जिल्ह्यातील गिरच्या घनदाट जंगलात, गिरनार परिक्रमेच्या सुरुवातीला आहे. हे मंदिर निसर्गरम्य वातावरण आणि खळखळणारे झरे याच्या सानिध्यात असल्यामुळे भक्तांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. हे मंदिर तीनशे वर्ष जुने असून या ठिकाणी हनुमानाची स्वयंभू मूर्ती आहे.तसेच हनुमान मंदिराशेजारी खूप जुने शिवमंदिर आणि कालभैरव मंदिर आहे.

त्यामुळे हे ठिकाण आध्यात्मिक भक्तांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. प्रत्येक शनिवारी या मंदिरात भाविकांची गर्दी असते. दरवर्षी हनुमान जयंतीला येते मोठा उत्सव साजरा केला जातो.

31)Satadhar Temple-


सताधार हे गुजरात मधील जुनागड जिल्ह्यातील अंबाजार नदीच्या काठी निसर्गरम्य परिसरात असलेले एक नयनरम्य धार्मिक स्थळ आहे. हे ठिकाण विसावदर शहरापासून 7 किमी अंतरावर असून ते सासनगीरच्या रस्त्यावर आहे. हे ठिकाण संत आपा गीगांनी स्थापलेले एक रमणीय, नयनरम्य धार्मिक स्थळ आहे. या परिसरात आजूबाजूला असलेले हिरवे डोंगर, शांत वातावरण आणि नैसर्गिक झरे पर्यटकांना आकर्षित करतात. जुनागड जिल्ह्यातील हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून पर्यटन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेट देतात.

Visit the travel blog

1) जुनागढ जिल्ह्यातील दत्तात्रय मंदिर कोणत्या पर्वतावर आहे ?

जुनागढ जिल्ह्यातील दत्तात्रय मंदिर गिरनार पर्वतावर आहे .


2) जुनागढ जिल्ह्यातील महाभत मकबरा कोणत्या नावाने ओळखला जातो ?

जुनागढ जिल्ह्यातील महाभत मकबरा ‘द मिनि ताज’ नावाने ओळखला जातो .


3) जुनागढ जिल्ह्यातील दरबार हॉल संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे

जुनागढ जिल्ह्यातील दरबार हॉल संग्रहालय मोतीबाग पॅलेस मध्ये आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top