पोरबंदर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे- Top 29 places to visit in Porbandar District

मित्रांनो भारतभ्रमंतीमध्ये भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळांची माहिती मिळणार आहे. आता तुम्ही पाहणार आहात गुजरात राज्यातील पोरबंदर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे.पोरबंदर जिल्हा हा गुजरातच्या अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील काठियावाड द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात वसलेला एक ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा आहे. हा जिल्हा महात्मा गांधींचे जन्मस्थान व श्रीकृष्णाचे परममित्र सुदामा यांचे जन्मस्थान असल्यामुळे सुदामापुरी म्हणूनही ओळखला जातो. Top 29 places to visit in Porbandar District

या जिल्ह्याचे मुख्यालय पोरबंदर शहर असून येथे शेती, मासेमारी, आणि खाणकाम हे प्रमुख व्यवसाय केले जातात. पोरबंदर जिल्हा जुनागढ जिल्ह्यातून तयार करण्यात आला असून या जिल्ह्यात पोरबंदर-छाया, राणावाव आणि कुतियाना हे तीन तालुके आहेत. या जिल्ह्यात अनेक धार्मिक ऐतिहासिक व सांस्कृतिक पर्यटन स्थळे आहेत.

Top 29 places to visit in Porbandar District

पोरबंदर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे

1)Kirti Mandir-

Top 29 places to visit in Porbandar District

कीर्ती मंदिर हे गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेले एक स्मारक आहे. हे मंदिर गांधीजींच्या जन्मस्थानी, असलेल्या त्यांच्या वडिलोपार्जित,प्राचीन, तीन मजली हवेलीच्या अगदी बाजूला आहे. 2 ऑक्टोबर 1869 रोजी महात्मा गांधींचा जन्म याच घरात झाला होता.

कीर्ती मंदिरात महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी या दोघांचीही जुनी तैलचित्रे आहेत. तसेच गांधीजींच्या जीवनप्रवासाची माहिती देणारे प्रदर्शन आहे. हे स्मारक 1959 मध्ये पूर्ण झाले. हे ठिकाण पोरबंदरमधील मुख्य पर्यटन आकर्षण आहे.

2)Sudama Mandir-

सुदामा मंदिर हे गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील पोरबंदरच्या गजबजलेल्या बाजारपेठेच्या मध्यभागी, भगवान श्रीकृष्णाचे परम मित्र सुदामा यांना समर्पित मंदिर आहे. हे मंदिर 1902 ते 1907 मध्ये बांधण्यात आले. फिकट गुलाबी रंगाचे हे मंदिर संगमरवरी खांबांनी आणि गुंतागुंतीच्या सुंदर कोरीव कामाने सजवलेले आहे.

व भगवान कृष्ण आणि त्यांचे विश्वासू मित्र सुदामा यांच्यातील अतूट मैत्रीचे स्मरण करण्यासाठी हे मंदिर बांधण्यात आले आहे. तसेच या हिरव्यागार मंदिर संकुलात एक लहान पायऱ्यांची विहीर ही आहे. भक्त आजही त्यांच्या मैत्रीला वंदन करण्यासाठी येथे येतात.

3)Madhavpur Beach-

माधवपूर बीच, हा गुजरातच्या पोरबंदरपासून फक्त 58 किलोमीटर अंतरावरील आणि गुजरातमधील सर्वात प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. या किनाऱ्याला नारळाची झाडे, सुंदर वाळू, शांत ठिकाण आणि छान हिरवळ आहे. आख्यायिकेनुसार, या ठिकाणी भगवान कृष्णाने माधवपूर शहरात रुक्मिणीशी लग्न केले होते.

नारळाच्या झाडांनी वेढलेल्या व स्फटिकासारखे शुद्ध असलेल्या या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक जलक्रीडा आणि निसर्गाचा आनंद घेतात. भगवान कृष्णाचा रुक्मिणीशी विवाह झालेल्या या ठिकाणी दरवर्षी मोठी यात्रा भरते.

4)Harsiddhi Mata Mandir –

हरसिद्धी माता मंदिर हे गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील, पोरबंदर–द्वारका महामार्गावर, गांधवी गावाजवळील कोयलो डुंगर टेकडीच्या शिखरावर वसलेले एक अत्यंत प्राचीन, ऐतिहासिक आणि प्रसिद्ध मंदिर आहे. हरसिद्धी माता ही भगवान श्रीकृष्ण आणि यादव वंशाची कुळदेवी मानले जाते. असे सांगितले जाते की, हे मंदिर 13 व्या शतकात जैन व्यापारी जगदू शाह यांनी बांधले होते.

भाविकांना या मंदिरात पोहोचण्यासाठी कोयलो डुंगर टेकडीवरच्या 300 पायऱ्या चढून जावे लागते. या मंदिराच्या शिखरावरून समुद्र आणि आजूबाजूच्या परिसराचे मनमोहक दृश्य पाहायला मिळते. गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील हे एक प्रमुख आणि प्रसिद्ध तीर्थस्थान आहे.

5)Sri Hari Mandir-

श्री हरि मंदिर हे गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील, भक्ती व भव्य वास्तुकलेचे अद्भुत प्रतीक असलेले भगवान श्रीकृष्णाचे मंदिर आहे. हे मंदिर संदीपनी विद्यानीकेतन मंदिर म्हणूनही ओळखले जाते. श्री हरि मंदिर हे गुजरातच्या सौराष्ट्रातील सर्वात भव्य आणि अद्वितीय मंदिरांपैकी एक म्हणून ओळखले जाते. भाइश्री यांच्या देखरेखीखाली उभे राहिलेल्या या मंदिराची उंची 105 फूट असून, ते 66 भव्य स्तंभांवर उभे आहे.

या मंदिरात लक्ष्मीनारायण, राधाकृष्ण, करूणामयी देवी, श्री गणपती आणि इतर देवतांच्या भव्य मूर्तीं आहेत. तसेच हा मंदिर परिसर हिरव्यागार बागानी सुशोभित केलेला असून मंदिरात विविधरंगी शिल्पे आणि दगडात कोरलेल्या कथा व रंगीत चित्रकला आहेत.

Visit our website: allindiajourney.com

6)Tara Mandir –

तारा मंदिर हे गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तारांगण (Planetarium) आहे. या प्लॅनेटोरियमची स्थापना प्रसिद्ध उदारमतवादी समाजसेवक आणि उद्योगपती दिवंगत जाम रणजीतसिंहजी यांनी केली होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संकल्पनेतून हे तारांगण उभारण्यात आले.

या ठिकाणी विश्व, तारे, सूर्य, चंद्र, ग्रह आणि विविध खगोलीय घटनांची माहिती प्रभावीपणे दाखवली जाते.आणि इतर खगोलीय वस्तूंची माहिती देणारे शो केले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना व लोकांना विश्वाचे ज्ञान मिळते. हे तारा मंदिर शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून वैज्ञानिक शिक्षणाला प्रोत्साहन देते.

7)Bhutnath Mahadev Temple-

भूतनाथ महादेव मंदिर हे गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील पोरबंदर शहराच्या मध्यभागी असलेले प्राचीन शिव मंदिर आहे. हा मंदिर परिसर अत्यंत दिव्य, शांत व आध्यात्मिक असून मंदिराची वास्तुकला सुंदर गुंतागुंतीचे कोरीवकाम आणि पारंपारिक शिल्पकलेने साकारण्यात आली आहे.

या मंदिरात दररोज भाविकांची गर्दी असते परंतु, सोमवार, महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. तसेच या मंदिराजवळ हिंदू देवतांना समर्पित अनेक लहान मंदिरे आहेत. हे मंदिर भक्तांना ध्यान आणि दिव्य आध्यात्मिक जोड मिळवण्यासाठी अत्यंत पवित्र स्थान मानले जाते.

8)Porbandar Bird Sanctuary-

पोरबंदर पक्षी अभयारण्य हे गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील पक्षी अभयारण्य आहे. या अभयारण्याची स्थापना 1988 मध्ये झाली असून ते 9.33 हेक्टरवर विस्तारलेले आहे. गुजरातमधील घरटे बांधणाऱ्या पक्ष्यांना कायदेशीर संरक्षण देणारे हे एकमेव अभयारण्य आहे. या अभयारण्यात एक तलाव आहे.

ज्यामुळे स्थलांतरित पक्षी, फ्लेमिंगो , आयबिस आणि कर्ल्यू यांसारखे अनेक पक्षी आकर्षिले जातात. याशिवाय या निसर्गरम्य अभयारण्यात पेलिकन, बक, बगळे आणि विविध स्थलांतरित जलपक्षी मोठ्या संख्येने आढळतात.
1990 मध्ये हे अभयारण्य गुजरात वन विभागाच्या देखरेखीखाली आले.

9)Bharat Mandir-

भारत मंदिर हे गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील एकता आणि देशभक्तीचे प्रतीक आहे. या मंदिरात कोणत्याही देवतेची पूजा केली जात नाही तर, संपूर्ण भारताचा गौरव, संस्कृती आणि इतिहास असलेले एक अद्वितीय ठिकाण आहे. या मंदिरात भारत देशाची विविधता, नकाशे, विविध राज्यांतील कलाकृती, शिल्पे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या मूर्तीं आहेत. हे मंदिर भारत मातेला समर्पित असून, देवीच्या रूपात भारताचे प्रतिनिधित्व करते.

व भारताच्या समृद्ध वारशाबद्दल जागरूकता निर्माण करते. हे मंदिर 20 व्या शतकात स्थापन झाले आहे. आणि या मंदिराच्या भिंती भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील वीरांच्या चित्रांनी व अविभाजित राष्ट्राच्या नकाशांनी सजवलेल्या आहेत. त्यामुळे हे मंदिर देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे व विविधतेचे दर्शन घडवणारे एक महत्त्वाचे ठिकाण आहे.

10)Shree Satyanarayan Mandir-

श्री सत्यनारायण मंदिर हे गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील भगवान विष्णूच्या सत्यनारायण स्वरूपाला समर्पित असलेले एक प्रसिद्ध आणि शांत धार्मिक स्थळ आहे. या मंदिरात सकाळ -संध्याकाळ भगवान विष्णू व कृष्णाचे शांत स्तोत्रे आणि भजन गायले जातात. याशिवाय हे सत्यनारायण मंदिर शैक्षणिक सेवेचे केंद्र म्हणूनही कार्य करते.

या मंदिरात गरीब व गरजू मुलांसाठी मोफत शैक्षणिक साधने आणि पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. त्यामुळे हे मंदिर समाजसेवेचे एक केंद्र आहे. या मंदिराची वास्तुकला सुंदर नक्षीकाम केलेली असून, मंदिर परिसर अध्यात्मिक व शांत आहे.

11)Jambuvan Cave-

जांबुवन गुहा या गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील रानवाव तालुक्यात, सौराष्ट्र सिमेंट कारखान्याजवळ असलेले एक महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ आहे. असे सांगितले जाते की, रामायण काळातील प्रसिद्ध योद्धा जांबुवन येथे राहात होता. व येथे एक खोल गुहा आणि सूर्यप्रकाशासाठी एक छोटासा प्रकाश स्रोत आहे.

गुहेच्या आत पाण्याचे थेंब पडतात, आणि त्या वाळूने तयार झालेला शिवलिंग येथे आहे. तसेच या लेण्या भगवान श्रीकृष्ण आणि जांबुवनशी जोडलेले एक शांत आणि ऐतिहासिक ठिकाण आहे.या लेण्यामध्ये उन्हाळ्यातही थंड वातावरण असते.

12)Bileshwar Mahadev Temple-

बिलेश्वर महादेव मंदिर हे गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील बिलेश्वर गावात असलेले प्राचीन शिवमंदिर आहे. इतिहास आणि पौराणिक कथांनी भरलेले हे प्राचीन मंदिर बिलेश्वर नदीच्या निसर्गरम्य काठावर वसलेले आहे. या मंदिरातील शिवलिंग “स्वयंभू” असून मंदिरात देवी पार्वती, गंगा आणि नंदी यांच्या मूर्ती आहेत.

तसेच या मंदिराची स्थापत्य शैली ही अद्वितीय व गुंतागुंतीच्या आणि कोरीव कामासाठी प्रसिद्ध असून बहुमजली पिरॅमिड-आकाराची रचना आहे. दरवर्षी या मंदिरात महाशिवरात्री आणि श्रावण अमावस्येला होणाऱ्या वार्षिक मेळाव्यात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

13)Barda Wildlife Sanctuary-

बार्डा वन्यजीव अभयारण्य गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यात, पोरबंदर शहरापासून सुमारे 15 किमी अंतरावर आहे. हे अभयारण्य 1979 मध्ये स्थापित झाले असून, हे आशियाई सिंहांसाठी ‘गिर-बार्डा प्रकल्प’ अंतर्गत संरक्षित आहे. हे अभयारण्य 282 चौरस किलोमीटरवर विस्तारलेले आहे व समुद्रसपाटीपासून 79.2–617.8 मीटर उंचीवर आहे.

या अभयारण्यात बिलेश्‍वरी नदी आणि जोघरी नदी या दोन नद्या आणि खंबाळा व फोडारा ही दोन धरणे आहेत. तसेच येथे विविध औषधी वनस्पती, 650 फुलांचा प्रजाती त्यामध्ये गोराड, बाबुल, धव, रायण, बेर, जामुन, आमली इ.आणि विविध प्रकारचे पक्षी व प्राण्यांमध्ये बिबट्या, तरस, लांडगा, कोल्हा, नीलगाय, चिंकारा इ. आढळून येतात.

14)Ramdhun Temple-

रामधुन मंदिर हे गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील, भगवान राम, सीता, लक्ष्मण, आणि हनुमान समर्पित एक शांत आणि आध्यात्मिक व धार्मिक मंदिर आहे. या मंदिरात 24 तास ‘रामधुन’ (भजन) सुरू असते, त्यामुळे मंदिरातील वातावरण अत्यंत शांत व सकारात्मक आहे.

हे मंदिर सुमारे 50 वर्षापूर्वी रामभक्त प्रेम भिक्षुजी महाराजांनी बांधले होते. या मंदिराची वास्तुरचना सुंदर कोरीव काम व आकर्षक मूर्तींनी सजलेली आहे. भाविक या भक्तीमय मंदिरात धार्मिक प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

15)Barda Hills & Waterfall-

बरडा टेकड्यांमधील धबधबा हा गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील, हिरवळीने नटलेल्या डोंगररांगांमध्ये लपलेला एक अद्भुत आणि नैसर्गिक सौंदर्याने भरलेले पर्यटनस्थळ आहे. हा परिसर घनदाट जंगलाने वेढलेला आहे व शांत वातावरणाने बहरलेला आहे. या धबधब्याचा रस्ता दाट हिरव्या जंगलातून जात असल्यामुळे,

या ठिकाणी अनेक प्रकारचे प्राणी व पक्षांचा किलबिलाट पाहायला मिळतो. हा धबधबा गुजरातमधील अत्यंत नयनरम्य धबधब्यांपैकी एक आहे व पर्यटक, निसर्गप्रेमी व ट्रेकिंगसाठी हे एक अप्रतिम ठिकाण आहे.

16)Jadeshwar Mahadev Mandir-

जडेश्वर मंदिर हे गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील, शहरातील सर्वात जुन्या शिव मंदिरांपैकी एक धार्मिक व पवित्र ठिकाण आहे. हे मंदिर शांततेचे व आध्यात्मिकतेने परिपूर्ण ठिकाण असून, येथे भाविक आणि पर्यटकांना शांत व निवांत वातावरणाचा अनुभव मिळतो.

येथील मंदिर परिसर अत्यंत शांत असून मंदिराच्या भिंतींवर कोरलेले अर्थपूर्ण सुविचार आहेत. तसेच येथील वैशिष्ट्य म्हणजे येथे शिवलिंगाऐवजी भगवान शिवाची मूर्ती आहे.हे मंदिर शांत आणि प्रसन्नतेसाठी ओळखले जाते.

17)Rokadia Hanuman Temple-

रोकडिया हनुमान मंदिर हे गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील,एक पवित्र, जागृत तीर्थस्थान आहे. या मंदिरात, गंधमादन पर्वत उचललेले आणि हातात गदा धारण केलेली भगवान हनुमानाची भव्य मूर्ती आहे.आणि त्यांच्या पायाशी शनीदेव विराजमान आहेत. याशिवाय मुख्य मंदिराच्या पहिल्या मजल्यावर,

भगवान राम, लक्ष्मण आणि सीतेच्याही मूर्ती आहेत. उंच टेकडीवर वसलेल्या या मंदिरातून आजूबाजूच्या शहराचे मनमोहक विहंगम दृश्य पाहायला मिळते. भाविक या मंदिरात दूरदूरून येत असतात. तसेच येथे लहान मुलांसाठी खेळण्याचा स्लाइड्स आहेत.

18)Ghumli-

घुमली हे गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील,पोरबंदर शहरापासून 42 किलोमीटर अंतरावर वसलेले घुमली हे गाव व एक महत्त्वाचे आणि संरक्षित पुरातत्त्वीय स्थळ आहे. पूर्वी 10-12 व्या शतकात हे ठिकाण प्रथम सैंधव व नंतर जेठवा राजवंशाची राजधानी होते. या ऐतिहासिक स्थळाच्या अद्वितीय पुरातत्त्वीय अवशेषांतून फेरफटका मारताना, आपल्याला गूढ कथा आणि रहस्ये व वैभवशाली भूतकाळाची माहिती मिळते.

बर्दा टेकड्यांच्या पायथ्याशी वसलेल्या या गावात सूर्यदेवाला समर्पित नवलखा मंदिर, आशापुरा मंदिर, पायऱ्यांची विहीर,आकर्षक मंदिरे, ऐतिहासिक दरवाजे आणि प्राचीन काळात बांधलेल्या सुंदर वास्तू पाहायला मिळतात. प्राचीन काळी हे ठिकाण ‘भूमिलिका’ किंवा ‘भुभुतापल्ली’ म्हणून ओळखले जात होते.

19)Huzoor Palace, Porbandar-

हुजूर पॅलेस हा गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील,अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर, समुद्राकडे तोंड करून, विस्तीर्ण जमिनीवर पसरलेला एक भव्य युरोपियन शैलीतील राजवाडा आहे. हा पॅलेस मरीन ड्राइव्हच्या टर्मिनल भागात असून 20 व्या शतकाच्या सुरुवातीला , राणा नटवरसिंहजी यांनी बांधला होता. या राजवाड्यात अनेक पंख, घुमट, बाल्कनी, तिरके छप्पर आणि खूप मोठ्या खिडक्या आहेत.

बागा आणि कारंज्यांनी वेढलेले या राजवाड्यात निसर्गरम्य वातावरण आहे. आणि पुढील भागात शोभेचे पोर्टिको अर्धवर्तुळाकार नवशास्त्रीय स्तंभांनी बांधलेले आहेत. सध्या ओसाड अवस्थेत असलेला हा राजवाडा खाजगी मालमत्ता आहे आणि लंडनमध्ये राहणारे महाराजांच्या कुटुंबाचे उत्तराधिकारी वापरतात. पर्यटकांसाठी हा राजवाडा बाहेरून पाहण्यापुरता मर्यादित आहे.

20)Sartanji Choro-

सरतानजी चोरो हे गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील,एक प्राचीन तीन मजली उन्हाळी मंडप आहे. हे ठिकाण 18 व्या शतकात जेठवा राजघराण्यातील ठाकूर सरतानजी यांनी बांधले होते. हा मंडप हिरव्यागार बागांमध्ये वसलेला असून गुंतागुंतीच्या राजपूत स्थापत्यशास्त्राचे वैशिष्ट्य आहे. या मंडपाची रचना अत्यंत सुंदरपणे केलेली आहे. त्यामध्ये, उत्कृष्ट कोरीवकाम केलेले खांब, कमानी,

वादकांच्या प्रतिमा असलेले स्तंभ, घुमट, बाल्कनी आणि सजावटीच्या कमानींचा समावेश आहे. तसेच या वास्तूचा खालचा भाग संगीत मैफिलींसाठी वापरला जात होता. राणा सरतांजी या पॅव्हेलियनखाली बसून कविता रचत असत. सरतांजी चोरो ही ‘ग्रीष्मभवन’ म्हणूनही ओळखले जाते.ही वास्तू प्रसिद्ध कृष्ण–सुदामा मंदिराच्या मागील बाजूस असून पोरबंदरमधील महत्वाचे वारसा स्थळ आहे.

21)Rana Bapu’s Mahal-

राणा बापूंचा महाल हा गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील कीर्ती मंदिराचा भाग असलेला महात्मा गांधींचा 3 मजली पैतृक वाडा आहे. या ऐतिहासिक ठिकाणी 2 ऑक्टोबर 1869 रोजी गांधीजींचा जन्म झाला. या इमारतीत अनेक लहान खोल्या आणि अरुंद जिने आहेत. व या घरामध्ये गांधीजींच्या जन्मस्थानाची नेमकी जागा ‘स्वस्तिक’ या चिन्हाने दर्शविण्यात आली आहे.

हे ठिकाण पोरबंदर येथील कीर्ती मंदिराचा एक भाग असून, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या जीवन कार्याला समर्पित आहे. आणि पर्यकांसाठी हे एक महत्त्वाचे ऐतिहासिक स्मारक आहे.

22) Khimeshwar Mahadev Temple-

खिमेश्वर महादेव मंदिर हे गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील,कच्छडी गावातील समुद्रकिनाऱ्यावर वसलेले 1600 वर्षापेक्षा जास्त जुने ऐतिहासिक शिवमंदिर आहे. हे मंदिर दुर्मिळ वल्लभी शैलीतील स्थापत्यकलेत असून,मैत्रक काळातील, 5 वे ते 7वे शतकातील आहे. या ठिकाणी पांडवांनी वनवासाच्या काळात वास्तव्य केले होते.

व मंदिराच्या गर्भगृहातील शिवलिंग प्रत्यक्षात भीमाने वाळूपासून बनवल्याचे मानले जाते. हे स्थळ एएसआय (ASI) संरक्षित स्मारक असून एक प्राचीन धार्मिक संकुल आहे. दरवर्षी जून-जुलै महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरते.

23)Daria Rajmahal-

दरिया राजमहल हे गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील, 19 व्या शतकात महाराजा भावसिंहजींनी अरबी समुद्राच्या काठी बांधलेला एक भव्य, ऐतिहासिक राजवाडा आहे. हा राजवाडा राजपूत आणि युरोपियन या दोन भिन्न वास्तुकलेचे उत्कृष्ट मिश्रण असून, सध्या येथे एक शैक्षणिक संस्था (महाविद्यालय) कार्यरत आहे.

हा राजमहल हुजूर पॅलेसच्या जवळ असून या राजवाड्याचे बांधकाम त्या काळातील कुशल वास्तुविशारद फुलचंद पारेख यांनी केले होते. तसेच या राजमहलाच्या परिसरात युरोपीय शैलीतील फर्निचर, लटकवलेले सजावटीचे दिवे, चित्रकला आणि कलाकृतींचा समावेश आहे. दारिया राजमहल हा पोरबंदरमधील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.

24)Darbargadh Fort-

दरबारगड हा गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील तटबंदी असलेला एक भव्य किल्ला आहे. हा किल्ला राणा सरतनजींनी बांधलेला एक ऐतिहासिक आणि भव्य राजवाडा आहे. या किल्ल्याची राजपूत-युरोपियन स्थापत्यशैली व उत्कृष्ट वास्तुकला आहे. या किल्ल्याचे दगडी प्रवेशद्वार असून मजबूत लाकडी दरवाजे आहेत. हा किल्ला शहराच्या उंच टोकावर वसलेला आहे आणि किल्ल्याला 3 लहान दरवाजे आणि 4 मोठे दरवाजे आहेत.

हे एक भव्य राजवाडा संकुल आहे व पूर्वी हे ठिकाण जेठवा राजघराण्याचे राजेशाही निवासस्थान होते. येथील सुंदर प्रवेशद्वारावर चार हत्तींच्या पुतळ्यांच्या शिल्पांनी सजवलेले आहेत. गुंतागुंतीचे कोरीवकाम असलेल्या या राजवाडा संकुलात हुजूर पॅलेस, राणा बापूंचा महाल आणि सरतानजी चोरो यासह अनेक राजवाडे, अंगण आणि विस्तीर्ण बागा आहेत.

25)Rani Baug Park-

राणीबाग पार्क, हे गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील पोरबंदर शहराच्या मध्यभागी वसलेले एक शांत व रमणीय ठिकाण आहे. या उद्यानाचे क्षेत्रफळ 50 एकर पेक्षा जास्त असून उद्यानाच्या विविध भागात 840 प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पतीच्या प्रजाती आहेत. हे उद्यान पोरबंदरच्या महाराजांनी त्यांच्या महाराणींसाठी बांधले होते.

त्यामुळे याला राणीबाग म्हणून ओळखले जाते. या बागेत दाट हिरवीगार झाडे, रंगीबेरंगी फुलांची ताटवे, शुद्ध ऑक्सिजन, पक्ष्यांचा किलबिलाट, फुलपाखरे आणि सावलीदार नयनरम्य चालण्याचे मार्ग आहेत. त्यामुळे पर्यटकांना या बागेत मनाला शांती देणारे वातावरण अनुभवायला मिळते.

26)Gop Temple-

गोप हे गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील पोरबंदर आणि जामनगर यांना जोडणाऱ्या रस्त्यावर, टेकडीवर वसलेले एक निसर्गरम्य गाव आहे. गोप गाव हे हिंदू मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. हे प्राचीन सूर्यमंदिर मंदिर इसवी सन 550 ते 600 च्या दरम्यान, मैत्रक काळात बांधलेले एक प्राचीन मंदिर आहे.

गोप टेकडी ही जमिनीपासून सुमारे 350 मीटर उंचीवर असून या मंदिराला पिरॅमिडल शिखर असून त्याच्या टोकावर अमलका (गोलाकार दगडी चक्र) आहे. या मंदिराची वास्तुकला द्राविड, नागर आणि काश्मिरी शैलीमध्ये असून ती अत्यंत दुर्मिळ नमुना मानली जाते. सध्या हे दगडी मंदिर खूपच जीर्ण आणि भग्न अवस्थेत गेले आहे.

27)Kamla Nehru Park-

कमला नेहरू पार्क हे गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील,सुंदर समुद्रकिनारा आणि मरीन ड्राइव्ह परिसरात असलेले मनोहारी व भव्य उद्यान आहे.भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू यांच्या नावावरून या उद्यानाला नाव देण्यात आले आहे. पोरबंदरमधील हे एक जुने आणि लोकप्रिय उद्यान असून,

येथे समुद्राचे सुंदर दृश्य, जॉगिंग, मुलांसाठी खेळणी, राइड्स, झुले,चालण्याचे मार्ग आणि संध्याकाळी स्थानिक लोकांसाठी हँगआउट स्पॉट आहेत. तसेच पर्यटकांना या उद्यानाबाहेर मिळणाऱ्या प्रसिद्ध स्ट्रीट फूडच्या चवींचा आस्वाद घेता येतो.

28)Mul Dwarka-

मूळ द्वारका हे गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील, कोडीनार भागात वसलेले आहे. हे ठिकाण श्रीकृष्णाच्या प्राचीन द्वारका नगरीचे पहिले निवासस्थान व धार्मिक स्थळ मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार येथे कृष्ण मुख्य द्वारकेच्या नगरीत जाण्यापूर्वी येथे वास्तव्यास होते.

मूळ द्वारकेला एका छोट्या टेकाडावर भग्नावस्थेतील एक श्रीकृष्ण मंदिर असून ते इ. स. दहाव्या शतकानंतरचे असल्याचे सांगितले जाते. हे ठिकाण आजही अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असून प्रभासपासून सुमारे 36 किमी अंतरावर आहे.

29)Modpar Fort-

मोडपर किल्ला हा गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील, सौराष्ट्र प्रदेशात वसलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे.
या किल्ल्याची स्थापत्यकला प्राचीन असून येथील परिसर निसर्गरम्य व डोंगरदऱ्यांनी वेढलेला आहे. सध्या या किल्ल्याची अवस्था थोडीफार जीर्ण झालेली असून किल्ल्याकडे जाणारा रस्ता अवघड आहे.

या किल्ल्यावरून पर्यटकांना सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळीचा मनोहर दृश्याचा आनंद घेता येऊ शकतो. या किल्ल्यावर ट्रेकिंग साठी व लग्नाच्या फोटोसाठी अनेक पर्यटक येत असतात.

Visit the travel blog

1) गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील तारा मंदिर म्हणजे काय आहे?

तारा मंदिर हे गुजरातमधील पोरबंदर या किनारी शहरात खगोलशास्त्र आणि अवकाश विज्ञानात आवड असलेल्यांसाठी एक तारांगण आहे.


2) पोरबंदर जिल्ह्यातील रामधुन मंदिर कशासाठी प्रसिद्ध आहे?

पोरबंदर जिल्ह्यातील रामधुन मंदिर हे 24 तास चालणाऱ्या ‘रामधून’ भजनासाठी प्रसिद्ध आहे.


3) गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील भारत मंदिर हे कशाचे प्रतीक आहे?

गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील भारत मंदिर हे एकता आणि देशभक्तीचे प्रतीक असून संपूर्ण भारताचा गौरव, संस्कृती आणि इतिहास असलेले एक अद्वितीय ठिकाण आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top