भारतभ्रमंती ही अशी वेबसाईट आहे, जिथे तुम्हाला भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळांची माहिती मिळणार आहे. आता तुम्ही पाहणार आहात गुजरात राज्यातील जामनगर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे. जामनगर हे इ.स. 1540 साली स्थापन झालेले असून ते सौराष्ट्राच्या नवानगर ह्या संस्थानाचा भाग होते.जामनगरला पूर्वी नवानगर नावाने ओळखले जात होते. जामनगर जिल्हा गुजरातमधील सर्वात प्रगत व औद्योगिक शहर असून येथे भारतामधील रिलायन्स कंपनीचा जगातील सर्वात मोठा खनिज तेल शुद्धीकरण कारखाना (रिफायनरी) आहे. Top 27 places to visit in Jamnagar District
या जिल्ह्यात दहा तालुके असून गुजरात मधील लोकसंख्येमध्ये हे पाच नंबरचे सर्वात मोठे शहर आहे. हे शहर गुजरातचे मँचेस्टर आणि सौराष्ट्रचे पॅरिस म्हणून ओळखले जाते. 2005 मध्ये या शहरात सगळ्यात मोठा रोटला (64 किलो वजनाचा) बनवल्याबद्दल या जिल्ह्याचे नाव ‘गिनीज बुक रेकॉर्ड’ मध्ये नोंद केले गेले. तसेच या जिल्ह्यात भारतीय सेनादलाची तिन्ही दले कार्यरत आहेत. आणि या जिल्ह्यात भारतातील 70 टक्के पितळ चे उत्खनन केले जाते. तसेच हे शहर बांधणी कपड्यासाठी ही ओळखले जाते.
या जिल्ह्यात सर्वात मोठे आयुर्वेदिक विद्यालय आहे. तसेच येथील बाला हनुमान मंदिरात एक ऑगस्ट 1964 पासून ‘श्रीराम, जय राम,जय जय राम’ नावाचा जप 24 तास अखंड चालू आहे त्यामुळे याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड’ रेकॉर्डमध्ये झाली आहे. तसेच या जिल्ह्यात दुनियेतील सर्वात मोठे सोलर हॉस्पिटल आहे यामध्ये सूर्यकिरणाद्वारे रुग्णांना उपचार केले जातात. या जिल्ह्यात गुजराती लोकांची संख्या जास्त असून येथे प्रामुख्याने गुजराती भाषा बोलली जाते.
Top 27 places to visit in Jamnagar District
जामनगर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे
1)Shri Bala Hanuman Temple-


बाला हनुमान मंदिर हे गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातील रणमल /लखोटा तलावाच्या बाजूला असलेले प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे. या मंदिरात भगवान राम, लक्ष्मण, देवी सीता आणि भगवान हनुमान यांच्या मूर्ती आहेत.
आणि या मंदिरातील वैशिष्ट्य म्हणजे येथे 1 ऑगस्ट 1964 पासून, दिवसरात्र राम नाम जप मंत्र – ‘श्री राम, जय राम, जय जय राम’ असा जप सुरू आहे. त्यामुळे याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये झाली आहे.
भगवान हनुमान हे नैसर्गिक आपत्ती आणि इतर संकटांपासून त्यांचे रक्षण करतात अशी येथील भाविकांची या तीर्थस्थानावर गाढ श्रद्धा आहे. हे मंदिर श्री बालहनुमान संकीर्तन मंदिर म्हणूनही ओळखले जाते. येथील परिसरात लखोटा तलावाच्या आत एका बेटावर किल्ला आणि संग्रहालय आहे. आकर्षक वास्तुकला असलेल्या या मंदिरात, सतत चालू असलेला धार्मिक जप पाहण्यासाठी जगभरातून भाविक येतात.
2)Lakhota Lake Lakhota Palace-

लखोटा तलाव हा गुजरातच्या जामनगरच्या मध्यभागी असलेला एक मानवनिर्मित तलाव आहे .या तलावाला लखोटा तलाव किंवा रणमल तलाव म्हणूनही ओळखले जाते. या तलावातील एका लहान बेटावर लखोटा पॅलेस एक किल्ला म्हणून बांधण्यात आला होता. हा ऐतिहासिक शाही पलेस आणि तलाव 18 व्या शतकात राजा जाम रणमल यांनी बांधले होते. सध्या या जलदुर्ग पॅलेसचे रूपांतर संग्रहालयात करण्यात आले असून येथे मातीची भांडी,जुन्या मूर्ती, शस्त्रे आणि जडेजा राजपुतांच्या लढायांची चित्रे प्रदर्शित केली आहेत.
पर्यटकांसाठी संगीतमय कारंजे असलेला हा तलाव एक सुंदर, शांत बोटिंग करण्यासाठी मनोरंजन केंद्र असून, येथे अनेक दुर्मिळ, 75 पक्षांच्या प्रजातींचे निवासस्थान आहे. जामनगर रेल्वे स्टेशन पासून हा तलाव पाच किलोमीटर अंतरावर आहे.
3)Pratap Vilas Palace-

प्रताप विलास पॅलेस हा गुजरातच्या जामनगरमधील एक एक ऐतिहासिक राजवाडा आहे. हा राजवाडा नवानगर राज्याच्या भव्यतेचे एक आश्चर्यकारक स्थापत्य रत्न आहे. हा पॅलेस महाराजा रणजित सिंग यांनी 1915 मध्ये बांधला. हा पॅलेस इंडो-सरॅसिनिक स्थापत्यशैलीत बांधलेला असून त्यावर युरोपीय वास्तुकलेचा आणि भारतीय कोरीव कामांचे सुंदर मिश्रण पाहायला मिळते. हा पॅलेस पाहिल्यानंतर कोलकात्याच्या व्हिक्टोरिया मेमोरियलची आठवण येते.
येथील तीन काचेचे घुमट हे या पॅलेसचे मुख्य आकर्षण आहे. आणि या इमारतीच्या भव्य सभागृहांच्या भिंतींवर त्या काळातील कलाकारांनी रेखाटलेली चित्रं आणि पोर्ट्रेट्स आहेत. व स्तंभांवर फुलं, पानं, वेल, पक्षी आणि प्राण्यांचे नाजूक नक्षीकाम केलेले आहे. या पॅलेसमध्ये कलाकारांची चित्रे, शाही वाहने, शाही फर्निचर, सोने-हिऱ्यांचे तपशील आणि खजिना यांचा समावेश आहे.
4) Shree Swaminarayan Mandir-

Visit our website: allindiajourney.com
बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिर, हे गुजरातच्या जामनगरमधील एक सुंदर व भव्य मंदिर आहे.हे सुंदर तपकिरी संगमरवरी मंदिर बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामिनारायण संस्था (बीएपीएस) यांनी बांधले असून विस्तीर्ण परिसरात विस्तारलेले आहे. हे मंदिर आध्यात्मिकता आणि अप्रतिम शिल्पकलेसाठी ओळखले जाते. या मंदिराची वास्तुकाला आधुनिक आणि आकर्षक पद्धतीची असून येथे एक नयनरम्य बाग आहे.
तसेच या मंदिरातील नाजूक कोरीवकाम, भव्य घुमट आणि सुंदर मूर्ती वास्तुकलेची भव्यता दर्शवतात. हा मंदिर परिसर, अध्यात्मिक, भक्तिमय व शांत वातावरणाने बहरलेला असल्यामुळे देशाच्या विविध भागांतून भाविक येथे भेट देतात.
5)Khijadiya Bird Sanctuary-

खिजाडिया पक्षी अभयारण्य हे गुजरातमधील जामनगर जिल्ह्यामध्ये असलेले एक महत्त्वपूर्ण पाणथळ क्षेत्र व पक्षीप्रेमींसाठी लोकप्रिय ठिकाण आहे. हे अभयारण्य खार आणि गोड्या पाण्याच्या मिश्रणाने बनलेले असून 605 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर विस्तारलेले आहे. हे ठिकाण रूपारेल आणि कालिंदी नद्यांच्या काठी आहे. व येथे 220 पेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी आणि इराण, अफगाणिस्तान,पाकिस्तान आणि विविध ठिकाणाहून येणारे हजारो स्थलांतरित व निवासी पक्षी आहेत.
पर्यटकांसाठी येथे पक्षी निरीक्षण, इंटरप्रिटेशन सेंटर, पॅडल्ड बोटिंग, वॉचटावर,तटबंदी, वनस्पती आणि प्राण्यांच्या शिक्षणासाठी, निसर्गरम्य अनुभव आणि इको-टूरिझमसाठी एक महत्वाचे लोकप्रिय ठिकाण आहे. 2022 मध्ये, खिजाडियाला रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत आंतरराष्ट्रीय पाणथळ जागेचा दर्जा देण्यात आला असून , हा दिवस जागतिक पाणथळ जागा दिन म्हणून साजरा केला जातो.
6)Marine National Park-

मरीन नॅशनल पार्क हे गुजरातमधील जामनगर जिल्ह्यातील कच्छच्या आखातात असलेले भारताचे पहिले सागरी राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य आहे. आणि येथील विदेशी सागरी आणि पक्ष्यांच्या प्रजातींचे एक अभयारण्य आहे. हे नॅशनल पार्क जामनगरच्या किनारपट्टीवरील इंटर-टायडल झोनमध्ये असून,1980 मध्ये मरीन सॅंक्च्युरी तर जुलै 1982 मध्ये मरीन नॅशनल पार्क म्हणून घोषित करण्यात आले.
या ठिकाणी मॅंग्रोव्ह्स, प्रवाळभित्ती, इंटर-टायडल, क्रीक, वाळूचे किनारे, खारफुटीची जंगले, दलदलीचे क्षेत्र व खडकाळ बेटे असल्यामुळे येथे सागरी जीवसृष्टी मोठ्या प्रमाणात आढळते. आणि येथे बोट राइडने जाऊन पिराेटान बेटांवरील सागरी जीवन अनुभवता येते. या राष्ट्रीय उद्यानात खारफुटीची सहा प्रजाती, 120 प्रकारच्या शैवाळा आणि 42 पेक्षा जास्त बेटे असून पिराेटान हे प्रसिद्ध बेट आहे.
7)Adinath Jain Temple –

आदिनाथ जैन मंदिर हे गुजरातमधील जामनगर जिल्ह्यातील जैन धर्माचे पहिले तीर्थंकर भगवान आदिनाथ यांचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेले महत्त्वाचे तीर्थस्थळ आहे. सोळाव्या शतकात बांधलेल्या या मंदिरात भगवान आदिनाथ यांची मूर्ती आहे. व या मंदिरातील वातावरण अत्यंत शांत व अध्यात्मिक स्वरूपाचे आहे. या भव्य मंदिराचे बांधकाम उत्कृष्ट संगमरवरी,गुंतागुंतीच्या कोरीवकामासाठी
आणि भिंतींना सजवणाऱ्या सुंदर भित्तीचित्रांसाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरात जैन तत्वज्ञानाचे विविध पैलू आणि भगवान आदिनाथांच्या जीवनातील कथा दाखवल्या आहेत. हे मंदिर जामनगर शहराच्या मध्यभागी वसलेले असून येथे अनेक मंदिरे असल्यामुळे हे ठिकाण छोटी काशी म्हणूनही ओळखले जाते.
8)Pirotan Island-

पिरोटन बेट हे गुजरात राज्यातील जामनगर जिल्ह्यातील अरबी समुद्रातील मरीन नॅशनल पार्कमधील एक सुंदर बेट आहे. 3 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेले हे बेट उद्यानातील 42 बेटांपैकी सर्वात लोकप्रिय असून येथे खारफुटी आणि कमी भरती-ओहोटीचे समुद्रकिनारे आहेत. पिरोटन बेटाचे नाव पाटण या प्राचीन शहरावरून पडले आहे.
1982 मध्ये या बेटाला मरीन नॅशनल पार्क म्हणून घोषित करण्यात आले. हे बेट सागरी जीवनाचा अनुभव घेण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. या बेटाच्या टोकावर नेव्हिगेशनला मदत करण्यासाठी सुमारे 24 मीटर उंच दीपगृह, टॉवर आहे. जामनगर जिल्ह्यातील हे बेट त्याच्या आकर्षक सौंदर्यासाठी ओळखले जाते.
9)Aradhana Dham-

आराधना धाम हे गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातील जामखांभलिया तालुक्यातील वडालिया सिंहन नदीच्या काठावर असलेले एक प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र आहे.भगवान महावीर आणि पार्श्वनाथ यांना समर्पित असलेले हे जैन तीर्थक्षेत्र जामनगर-द्वारका महामार्गावर असून 40 एकरमध्ये पसरलेले आहे. हे ठिकाण निसर्गरम्य परिसर, हिरव्यागार सुंदर बागा आणि पश्चिम समुद्राच्या विस्तीर्ण किनाऱ्यावर वसलेले आहे.
या संकुलात, शांत आणि पवित्र वातावरण, सुंदर जैन वास्तुकला आणि स्थापत्यकला सजलेली आहे.आराधना धाम, हे हालर तीर्थ म्हणूनही ओळखले जाते. येथे श्री हालार तीर्थ ट्रस्टद्वारे जीव-दया पशुवैद्यकीय कल्याण, आरोग्य सेवा, शिक्षण, सामाजिक आणि आध्यात्मिक उपक्रम राबविले जातात. हे तीर्थक्षेत्र जगभरातील जैन भाविकांसाठी महत्त्वाचे केंद्र आहे.
10)Ranjit Sagar Dam –

रणजित सागर धरण हे गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातील आजी नदीवर, निसर्गरम्य ठिकाणी असलेले एक ग्रॅव्हिटी धरण आहे. जामनगर शहराला पाणीपुरवठा करणारे हे सर्वात मोठे धरण असून पिकनिक आणि पक्षी निरीक्षणासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. या धरणाचे बांधकाम 1938 मध्ये पूर्ण झाले व या धरणात पाणीसाठा मुबलक प्रमाणात आहे.
शांत,नयनरम्य वातावरण असलेले हे गुरुत्वाकर्षण धरण पर्यटकांसाठी पिकनिक व फोटोसाठी एक आकर्षक ठिकाण असून येथे सुंदर बाग, आणि अनेक प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. हिरव्यागार जंगलांनी वेढलेल्या या धरणाखालील परिसरात जाम रणजीतसिंह गार्डन आणि एक पूल आहे.
11)Bhidbhanjan Temple-

भिडभंजन मंदिर हे गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातील भगवान शिवाचे प्राचीन आणि पवित्र मंदिर आहे.हे सुंदर मंदिर बेदी गेटजवळ, टाऊन हॉलच्या पश्चिम बाजूस असून जामनगरचे संस्थापक जाम रावळ यांच्या राज्यकाळात बांधले आहे. या मंदिराचे वास्तूकला अप्रतिम आहे. त्यामध्ये हिंदू-राजपूत स्थापत्यशैलीचा आणि शिखरावर दक्षिण भारतीय स्थापत्यशैलीचा प्रभाव मंदिराच्या प्रत्येक भागात दिसून येतो.
या मंदिराच्या भिंतींवर व खांबांवर नाजूक कोरीव काम केलेले आहे. आणि मंदिराच्या राजेशाही दरवाजांवरील चांदीचे काम अत्यंत सुंदर आहे. श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला येथे स्थानिक भक्त, पर्यटक मोठ्या संख्येने भक्त दर्शनासाठी येतात.या मंदिराच्या परिसरात अंबामाता आणि गणपती ही मंदिरे आहेत.
12) Shree Kashi Vishwanath Mandir –

श्री काशी विश्वनाथ मंदिर, हे गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातील के. व्ही. रोडवरील एक महत्त्वाचे धार्मिक तीर्थस्थळ आहे. हे मंदिर शांतीनाथ मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे जामनगर मधील असे एकमेव मंदिर आहे की जिथे तुम्ही महादेवाचे चारी दिशांनी दर्शन घेऊ शकता. हे मंदिर बेदी गेटच्या नैऋत्येस आहे.
या मंदिराची वास्तुकाला अत्यंत गुंतागुंतीच्या पद्धतीने कोरीव काम व नक्षीकाम केलेले आहे. आणि येथील संगमरवरी फरशीवर पिवळा, काळा, पांढरा आणि लाल रंगांमध्ये अद्वितीय जैन नमुने आहेत. तसेच या मंदिराच्या भिंती जैन संतांच्या जीवनाचे वर्णन करणाऱ्या उत्कृष्ट चित्रांनी सजवल्या आहेत.
13)Siddhnath Temple-

सिद्धनाथ महादेव मंदिर हे गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातील नागेश्वर कॉलनीमध्ये असलेले सर्वात प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर 13 व्या शतकातील असून येथे भगवान महादेव शिवलिंगाच्या रूपात विराजमान आहेत. या मंदिरातील शिवलिंगाची स्थापना सतयुग काळात चार सिद्ध ऋषींनी केली होती ,
त्यामुळे या मंदिराला ‘सिद्धनाथ मंदिर’ असे नाव मिळाले आहे. येथील शिवलिंगाचे दर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा लोकांचा विश्वास आहे. दरवर्षी या मंदिरात शिवलिंगाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात.
14)Darbargadh Palace-


दरबार गढ पॅलेस गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि गजबजलेले ठिकाण आहे.
18 व्या शतकात स्थापन झालेला हा ऐतिहासिक पॅलेस, राजपूत व युरोपियन शैलींत बांधलेला असून, पूर्वी राजेशाही जाम श्री रावलजी यांचे निवासस्थान होते. या राजवाड्यात नक्षीकाम केलेले स्तंभ,भिंतीवरील चित्रकला, सजवलेले आरसे, सुंदर शिल्पे, दगडी कोरीव जाळीदार काम केलेले आहे.
आणि या राजवाड्याचा परिसर अर्धवर्तुळाकार आहे. या इमारतीचा एक भाग, ‘तिलामेदी’ म्हणून ओळखला जातो. पूर्वी तेथे राजांच्या राज्याभिषेक समारंभांचे आयोजन केले जात असे. 2001 च्या भूकंपात या राजवाड्याचा काही भाग नुकसानग्रस्त झाला आहे. या राजवाड्यात जुने राजेशाही सिंहासने, तलवारी, खंजीर आणि भाले जतन करून ठेवले आहेत.
15)Ayurved university jamnagar-

आयुर्वेद विद्यापीठ हे गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातील आयुर्वेद क्षेत्रातील एक अग्रणी वैधानिक विद्यापीठ आहे.
हे देशातील पहिले आयुर्वेद विद्यापीठ आहे व 1965 मध्ये गुजरात राज्य सरकारच्या कायद्याने स्थापन झाले होते. या विद्यापीठात विस्तीर्ण कॅम्पस आणि सुंदर पायाभूत सुविधा बरोबर येथे आयुर्वेदिक फार्मसी, योग आणि निसर्गोपचार या विषयांचे शिक्षण दिले जाते. व येथे बीएएमएस पदवीपूर्व विभाग आहे.
तसेच येथे आयुर्वेद, फार्मसी आणि औषधी वनस्पती विज्ञानात पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यास देणारा पदव्युत्तर विभाग,औषधशास्त्रात डिप्लोमा आणि पदवी देणारा फार्मसी कॉलेज आणि येथील कॅम्पसमध्ये संपूर्ण राज्यातील रुग्णांवर उपचार केले जातात. या विद्यापीठात आशिया, आफ्रिका, युरोप,लॅटिन अमेरिका, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, मालदीव, मॉरिशसमधील परदेशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
16)Nilkanth Mahadev Shiva Temple-

नीलकंठ महादेव मंदिर हे गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातील खंभलिया रस्त्यावर असलेले एक प्राचीन शिवमंदिर आहे. मंदिर परिसरात खूप झाडे, अत्यंत शांत व आध्यात्मिक वातावरण आहे. या मंदिराची वास्तुकला प्राचीन पद्धतीची आहे. या मंदिरात प्रत्येक सोमवारी आणि महाशिवरात्रीला व श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी असते.खंभलिया पासून हे मंदिर दोन किलोमीटर अंतरावर आहे.
17)Lakhota Fort-

लखोटा किल्ला हा गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातील नयनरम्य,रणमल तलावाच्या मध्यभागी असलेल्या बेटावरील एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला 1836 मध्ये जाम श्री रणमलजी यांनी बांधला. हा किल्ला दुष्काळात पाणी साठवण्यासाठी आणि नंतर राजवाडा म्हणून वापरण्यात आला. या किल्लात अर्धवर्तुळाकार बुरुज, संरक्षक खोल्या आणि एक मंडप आहे.
सध्या या किल्ल्यामध्ये एक संग्रहालय आहे असून त्यामध्ये निळ्या व्हेलचा सांगाडा, जुनी नाणी, शस्त्रे, शिल्पे 9 व्या ते 18 व्या शतकातील जुन्या सौराष्ट्र काळातील वस्तूंचा मौल्यवान शिल्पांचा मोठा संग्रह आहे. हा किल्ला सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेला असल्यामुळे, परकीय आक्रमण करणाऱ्या सैन्याला सहजा सहजी जिंकता येत नव्हता.
18)Mota Ashapura Ma Temple-

मोटा आशापुरा माता मंदिर हे गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातील जुन्या शहर परिसरातील दरबारगडजवळ असलेले धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर प्राचीन राजघराण्याचे, प्रसिद्ध जडेजा वंशाचे, अत्यंत पूजनीय स्थान आहे. जडेजा राजवंशाची आशापुरा माता ‘कुळदेवी’ आहे.
या मातेवर येथील लोकांचा एवढा विश्वास आहे की ते सांगतात आशापुरा माता शहराचे रक्षण करते, आणि सर्व वाईट शक्ती आणि शत्रूंना शहराच्या सीमेबाहेर ठेवते. हे मंदिर जामनगर मधील प्रमुख मंदिरांपैकी एक असून त्याच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे पर्यटक आणि भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनाला येतात.
19)Parsi Agiyari-

पारसी अगियारी हे हे गुजरातच्या जामनगरच्या मध्यभागी पारशी, इराणी, झोरास्ट्रियन समुदायाचे, प्रार्थनास्थळ आणि जुने अग्नी मंदिर आहे.हे मंदिर 1931 मध्ये बांधले असून, येथील प्रार्थना कक्ष 48000 चौरस फूट जागेवर पसरलेले आहे. या मंदिरात भित्तिचित्रे, कोरलेले खांब आणि छतावर मेणापासून बनवलेली सुव्यवस्थित चित्रे, सुंदर डिझाइन आणि प्रार्थनेसाठी हे अद्भुत शांततापूर्ण ठिकाण आहे.
या मंदिरात फक्त झोराष्ट्रीयन लोकांनाच प्रवेश मिळतो, पारशी समुदाय कमी असल्याने, हे मंदिर फारसे गजबजलेले नसते. तसेच येथे इतर ठिकाणच्या भाविकांच्या सोयीसाठी अगियारीच्या परिसरात धर्मशाळा बांधल्या आहेत.पारसी अगियारी, हे भिड भंजन महादेव मंदिराजवळ असून ते मिर्झा अगियारी म्हणूनही ओळखले जाते.
20)Solarium-

सोलारियम हे गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातील एक अद्वितीय वैद्यकीय स्मारक आहे. हे स्मारक 1934 मध्ये
महाराज रणजितसिंह यांनी सुरू केले. आधी या इमारतीचं नाव ‘जाम रणजित इन्स्टिट्यूट ऑफ पॉली रेडियो थेरपी’ असं ठेवलं गेलं होत, पुढे ‘सोलॅरियम हाऊस’ म्हणून प्रसिद्ध झाल. या दोन मजली इमारतीतील एक मजला काचेचा बनवलेला,फिरणारा होता, दिवसभर सूर्यकिरणांचा पुरेपूर लाभ मिळावा म्हणून हा टॉवर 360 अंशात फिरत असे.
या सूर्यऊर्जेचा वापर त्वचेचे आजार, क्षयरोग आणि संधिवात व इतर आजारांसाठी केला जात असे. या वैद्यकीय स्मारकाची डिझाईन अभियंता डॉ. जीन सैडम यांनी केली होती. आणि काचांच्या टॉवरसाठी बेल्जियमच्या काचांचा वापर केला होता. 1996 मध्ये वैद्यकीय प्रगतीमुळे सोलॅरियमचे कार्य बंद करण्यात आले. सध्या जगात उरलेले हे एकमेव सोलारियम ऐतिहासिक स्मारक म्हणून ओळखले जाते.
21)Sasoi Dam –

सासोई धरण हे गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातील एक सुंदर जलाशय आहे. हे धरण ससोई नदीवर बांधलेले आहे आणि धरण परिसर निसर्गरम्य असून हिरवळीने वेढलेले आहे. पर्यटकांसाठी हे ठिकाण निसर्गाच्या सानिध्यात मनोरंजनासाठी एक शांत ठिकाण आहे. तसेच या धरणामुळे शेतीचे सिंचन आणि आजूबाजूच्या गावांना आणि शहरांना पाणी पुरवठा होतो.
सासोई धरणाला भेट देणाऱ्या पर्यटकांना बोटिंग, मासेमारी आणि पिकनिकसह विविध उपक्रमांचा आनंद घेता येतो. या धरणाचे शांत पाणी, रमणीय परिसर आणि पर्यटक येथे आरामदायी बोटी भाड्याने घेऊ शकतात. या धरणाजवळ भिडभंजन मंदिर हे लोकप्रिय तीर्थस्थळ आहे.
22)Bhujiyo Kotho-

भुजिया कोठा हे गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातील राज्यातील संरक्षित स्मारकांपैकी सर्वात उंच स्मारक आहे.हे स्मारक जाम रणमल-द्वितीय यांच्या राज्यकाळात 1902 मध्ये दुष्काळ पडल्यामुळे लोकांना रोजगार देण्यासाठी बांधण्यात आले होते. 125 वर्षे जुना असलेला हा कोठा पाच मजली असून सहाव्या मजल्यावर एक छोटा मनोरा आहे. परंतु 2001 साली गुजरातमध्ये आलेल्या भूकंपात या कोठ्याचे नुकसान झाले.
या कोठ्यात राजेशाही काळातील ऐतिहासिक शस्त्रागार आहेत. हा विशाल आणि भव्य भुजिया कोठा लाखोटा तलावाच्या दक्षिण किनाऱ्यावर असून या कोठ्यावरून जामनगर शहराचे मनोहारी दृश्य पाहता येते.संरक्षित स्मारकांमध्ये समाविष्ट असलेला भुजिया कोठ्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.
23)Khijada temple-

खिजाडा मंदिर हे गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातील प्रणामी पंथाचे एक महत्त्वाचे पवित्र मंदिर आहे. हे मंदिर श्री 5 नवतनपुरी धाम म्हणूनही ओळखले जाते.हे मंदिर 400 वर्षे दोन जुन्या पवित्र वृक्षांवर बांधलेले आहे.आणि या मंदिरात सर्व धर्मांच्या एकतेचा संदेश दिला जातो.
त्यामुळे या संप्रदायाचे नाव ‘प्रणाम’ या शब्दावरून पडले आहे.व प्रत्येक मानवामध्ये असलेल्या दैवीत्वाची मान्यता देते. या मंदिराची वास्तुकला अत्यंत आकर्षक असून, हे मंदिर जामनगरच्या खंभालीया गेटजवळ आहे.
24)Pancheshwar Tower-

पंचेश्वर टॉवर हा गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा इमारतींपैकी एक आहे. हा टॉवर जामनगरच्या महाराजांनी बांधला होता परंतु तो जीर्ण झाल्यामुळे सरकारकडून त्याची पुनर्बांधणी केली जात आहे. या टॉवरमध्ये असलेले घड्याळ योग्य वेळ दाखवते .
आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जर दुपारी 4 वाजताची वेळ असेल तर टॉवरमधील घंटा चार वेळा वाजते.हा टॉवर जामनगर मधील एक वारसा चिन्ह असून येथील परिसरात गौरी शंकर महादेव, भोतनाथ महादेव आणि इतर अनेक शिवमंदिरे आहेत.
25)Bohra Hajira-

बोहरा हाजिरा हे गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातील नागेश्वर परिसरात असलेला एक सुंदर मकबरा आहे.जामनगरचे संस्थानिक जम रावल यांनी 1540 दाऊदी बोहरा समुदायाचा हा दर्गा बांधला. हा सुंदर,अद्भुत रचना असलेला मकबरा (समाधीस्थळ) सारासेनिक शैलीत बांधले असून पांढऱ्या संगमरवरी रंगाने बनलेले आहे, आणि त्यावर विस्तृत कोरीवकाम केलेले आहे.
हा ऐतिहासिक दर्गा (मस्जिद) रंगमती आणि नागमती नद्यांच्या काठावर आहे.हा मकबरा ‘मजार ए बद्री’ म्हणूनही ओळखले जातो. या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रावर जगभरातील दाऊदी बोहरा लोक श्रद्धांजली वाहण्यासाठी, आणि नवस करण्यासाठी येतात.
26)Jumma Masjid-

जुम्मा मशीद ही गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातील बर्दन चौक येथे असलेली,औरंगजेबाच्या कारकिर्दीत बांधलेली जामनगरमधील पहिली मशीद आहे.ही मशीद 1664 मध्ये कुतुबुद्दीन आणि त्याच्या सैनिकांनी हल्ला करून जामनगर लुटले होते. त्यावेळी या हल्ल्यात जाम साहेब रायसिंहजींचा मृत्यू झाला. कुतुबुद्दीनच्या विजयाचे प्रतीक म्हणून ही मशीद बांधण्यात आली.
नंतर या मशीदीचे नूतनीकरण आणि विस्तारीकरण जाम साहेब विभाजी यांच्या मुस्लिम पत्नी धनबाई यांनी केला. आणि या मशिदीचे नाव जुम्मा मशीद असे ठेवले गेले. जुम्मा मशीद ही एक प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित धर्मादाय संस्था म्हणून ओळखली जाते.
27)Khambaliya Gate-

खंभलिया गेट हे गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक संरक्षित स्मारक आहे. पूर्वी हे गेट नवानगर संस्थानाच्या प्रवेशद्वार होते. जामनगर मधील हे वास्तुशिल्पाचे उत्कृष्ट नमुना असलेले द्वार,शहराच्या जुन्या आणि नवीन भागांच्या ऐक्याचे प्रतीक मानले असून, 17 व्या शतकात वजीर मेरामन ख्वा यांनी डिझाइन केले होते.
या ऐतिहासिक गेटला दोन विशाल लोखंडी दरवाजे आहेत व हे ठिकाण राज्य सरकारच्या संरक्षणाखाली आहे. हे संरक्षित स्मारक उरलेल्या दरवाज्यांपैकी, पूर्वीच्या काळातील शेवटचे दरवाजे आहे.
1)जामनगरमधील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणते आहे?
जामनगर मधील ‘रामधून’ च्या सतत जपासाठी बाळा हनुमान मंदिर हे प्रसिद्ध ठिकाण आहे.
2) जामनगरमधील खिजाडा मंदिर हे कोणत्या नावाने ओळखले जाते ?
जामनगरमधील खिजाडा मंदिर हे श्री 5 नवतनपुरी धाम म्हणून ओळखले जाते.
3) जामनगर मधील जुम्मा मशीद कधी बांधली होती?
जामनगर मधील जुम्मा मशीद ही औरंगजेबाच्या कारकिर्दीत बांधलेली जामनगरमधील पहिली मशीद आहे.


