सुरेंद्रनगर जिल्ह्यातील 25 प्रसिद्ध पर्यटन स्थळे- Top 25 places visit in Surendranagar District

मित्रांनो भारतभ्रमंतीमध्ये तुम्हाला भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळांची माहिती मिळणार आहे. आता तुम्ही पाहणार आहात गुजरात राज्यातील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे. सुरेंद्रनगर जिल्हा हा गुजरात राज्यातील सौराष्ट्र प्रदेशातील एक महत्त्वाचा प्रशासकीय जिल्हा आहे. आणि या जिल्ह्याचे मुख्यालय वाधवण(सुरेंद्रनगर) येथे आहे. पूर्वी वाधवान या शहरात ब्रिटिश राजकीय एजंट राहत होते, त्यामुळे हे ठिकाण वाधवान कॅम्प म्हणून ओळखले जात होते. Top 25 places visit in Surendranagar District

त्यानंतर 1947 मध्ये वाधवान कॅम्पचे नाव, त्या वेळचे शासक सुरेंद्रसिंहजी जोरावरसिंहजी यांच्या सन्मानार्थ या जिल्ह्याचे नाव ‘सुरेंद्रनगर’ ठेवण्यात आले. या जिल्ह्यात चोटीला, चुडा, दसाडा, ध्रांगध्रा, हलवड, लख्तर, लिमडी, मुळी, साळीया आणि वाधवण हे दहा तालुके असून येथे प्रामुख्याने कापड, रसायने, खाद्य प्रक्रिया, वस्त्रोद्योग, कृषी उद्योग, सिरॅमिक्स आणि मीठ उत्पादन हे महत्त्वाचे उद्योग आहेत. या जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक पर्यटन स्थळे आहेत.

Top 25 places visit in Surendranagar District

सुरेंद्रनगर जिल्ह्यातील 25 प्रसिद्ध पर्यटन स्थळे

1)Chamunda Mataji Temple-

Top 25 places visit in Surendranagar District

चामुंडा माताजी मंदिर हे गुजरातमधील सुरेन्द्रनगर जिल्ह्यातील 1250 फूट उंच चोटीला पर्वताच्या माथ्यावर वसलेले एक प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर 700 वर्ष जुने असून देवी चामुंडा ही दुर्गा देवीचे एक रूप आहे आणि तीने चंड व मुंड या राक्षसांचा वध केला, म्हणून तिला चामुंडा नाव मिळाले अशी आख्यायिका आहे.

चामुंडा माता ही गुजरातमधील सौराष्ट्र भागातील अनेक समुदायांची कुलदेवी आहे. नवरात्रीत नऊ दिवस येथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो त्यावेळी भाविक दर्शनासाठी येतात.

2)BAPS Shri Swaminarayan Mandir-

बीएपीएस (BAPS) श्री स्वामीनारायण मंदिर हे गुजरातच्या सुरेन्द्रनगर जिल्ह्यातील रेल्वे जंक्शन जवळील एक महत्त्वाचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. या मंदिराची स्थापत्यकला आधुनिक व पारंपारिकअतिशय सुंदर कोरीव काम आणि वास्तुशिल्पाचा एक उत्तम नमुना आहे.

1996 रोजी या मंदिराचे उद्घाटन ब्रह्मस्वरूप प्रमुखस्वामी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. या मंदिरातील गाभाऱ्यात परब्रह्म भगवान स्वामीनारायण, श्री घनश्याम महाराज, श्री हरिकृष्ण महाराज,राधा-कृष्ण देव आणि अक्षरब्रह्म गुणातीतानंद स्वामी यांच्या मूर्ती स्थापित केले आहेत.

3)Varnindra Dham-

वर्णिंद्र धाम हे गुजरातच्या सुरेन्द्रनगर जिल्ह्यातील,पाटडी येथील एक सुंदर स्वामीनारायण मंदिर आहे. हे मंदिर ‘मिनी पोईचा’ म्हणूनही ओळखले जाते. गुरुकुल ने विकसित केलेल्या या मंदिराची वास्तूकला अत्यंत सुंदर, अद्भुत व आश्चर्यचकित करणारी आहे. हे मंदिर आनंद जिल्ह्यातील प्रसिद्ध पोईचा येथील नीलकंठ धाम मंदिराची प्रतिकृती/ भाग आहे. या ठिकाणी एक प्रकारची शांत, अध्यात्मिक व दैवी ऊर्जा अनुभवता येते.

4)Shree Swaminarayan Mandir Muli-

श्री स्वामीनारायण मंदिर हे गुजरातच्या सुरेन्द्रनगर जिल्ह्यातील,मुली येथील एक प्राचीन आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर भगवान स्वामीनारायणांनी स्वतः स्थापन केलेल्या काही मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराचे बांधकाम 1879 मध्ये ब्रह्मानंद स्वामी यांनी भगवान श्री स्वामीनारायणांच्या सांगण्यावरून केले.

या मंदिराचे वास्तुकला अत्यंत सुंदर असून मंदिरात श्री राधा-कृष्ण देव आणि श्री हरी-कृष्ण देव यांच्या मूर्तीं आहेत. तसेच येथे स्वामीनारायण यांनी वापरलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आहे. त्यामध्ये कपडे, शस्त्रे, गाड्या, पालखी, पादत्राणे आणि त्यांच्या नखांचे व केसांचे अवशेष आजही भक्तांसाठी श्रद्धेचे व पूज्य मानले जातात.

Visit our website: allindiajourney.com

5)BAPS Shri Swaminarayan Mandir, Limbdi-

BAPS श्री स्वामीनारायण मंदिर हे गुजरातच्या सुरेन्द्रनगर जिल्ह्यातील, ग्रीन चौक, लिंबडी येथील एक शांत, आध्यात्मिक, धार्मिक आणि सुंदर ठिकाण आहे. या मंदिरात भगवान स्वामीनारायण, अक्षरब्रह्म श्री गुणातितानंद स्वामी आणि इतर अनेक देवतांच्या मूर्ती आहेत. येथील परिसर शांत व आध्यात्मिक असल्यामुळे भाविक येथे नेहमी दर्शनासाठी येतात.

6)Hawa Mahal –

हवा महाल हा गुजरातच्या सुरेन्द्रनगर जिल्ह्यातील, वाधवण येथील 19 व्या शतकातील एक अपूर्ण राजवाडा आहे. हा महाल वाधवणचे राजे दाजीराजजी यांनी 1880 मध्ये बांधायला घेतला होता. परंतु 1885 मध्ये त्यांच्या अकाली निधनामुळे हे काम पूर्ण होऊ शकले नाही. हा महाल प्रत्यक्षात ‘लेक पॅलेस’ म्हणून नियोजित होता. दाजीराजजींच्या निधनानंतर,

त्यांच्या वारसांनी या महालाचे बांधकाम पुढे 1930 मध्ये जोरावरसिंहजी यांनी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचेही निधन झाल्याने हा महाल आजही अपूर्णच आहे. आजही हा महाल छताशिवाय उभा असून या महालाच्या भिंतींवरील कोरीव काम आणि नक्षीकाम, उत्कृष्ट सौंदर्य, कलाकुसर, रोमनस्क आणि इंडो-सारासेनिक स्थापत्यशैली, तसेच भव्य घड्याळ टॉवर पर्यटकांना आकर्षित करतात.

7) Trimandir-

त्रिमंदिर हे गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील, एक आध्यात्मिक केंद्र आहे. हे मंदिर परम पूज्य दादा भगवान यांच्या संकल्पनेतून उभारले आहे. हे मंदिर कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे नसून, या मंदिरात जैन धर्म, शैव धर्म आणि वैष्णव धर्मातील देवता, व इतर धर्मांतील देव-देवतांना एकाच मंचावर स्थापित करण्यात आले आहे.

आणि मंदिराच्या मध्यभागी 111 इंच उंच भगवान श्री सिमंधर स्वामींची संगमरवरी मूर्ती स्थापित केली आहे. लोकांमधील धार्मिक मतभेद दूर करून त्यांना आत्मज्ञानाकडे नेणे आणि सर्वांमध्ये सुसंवाद निर्माण करणे हा या मंदिराचा मुख्य उद्देश आहे.

8)Dholidhaja Dam-

धोलीधजा धरण हे गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील, एक महत्त्वाचे जलसाठा आणि पर्यटन स्थळ आहे. हे धरण भोगवो नदीवर बांधले असून या धरणातून सुरेंद्रनगर, वाधवान, जोरावार्नगर आणि रतनपार या शहरांना पिण्याचे पाण्याचा पुरवठा केला जातो.

येथील परिसर अत्यंत शांत व निसर्गरम्य असल्यामुळे सध्या हे एक विकसित पिकनिक स्पॉट आहे. या धरणाजवळ 60,000 झाडे लावण्यात आली आहेत. व पर्यटकांसाठी येथे बोटिंग, ट्रेकिंगची सोय आहे.

9)Zariya Mahadev Temple-

जरिया महादेव मंदिर हे गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील, एक प्राचीन आणि आध्यात्मिक शिव मंदिर आहे. हे चमत्कारिक मंदिर सुरेंद्रनगरच्या चोटीला तालुक्यात (तारकिया गावाजवळ), डोंगरांच्या कुशीत आणि निसर्गरम्य वातावरणात वसलेले आहे. या मंदिरातील सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे येथील शिवलिंगावर डोंगरावरील खडकांमधून सतत पाणी पडते.

म्हणजे निसर्गाकडूनच वर्षभर या शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो. हा भाग डोंगराळ असल्यामुळे ते विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी निसर्गसौंदर्य व धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात.श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला येथे भाविकांची मोठी गर्दी असते.

10)Ajramar Tower-

अजरामर टॉवर हा गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील,टागोर बाग परिसरातील एक उल्लेखनीय, प्रसिद्ध स्थळ आहे. हा टॉवर सुरेंद्रनगरच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचा एक भाग असून, या परिसरात विविध धार्मिक स्थळे आणि उद्याने आहेत. स्थानिक लोक आणि पर्यटकांसाठी एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.

11)Raj Mahal-

राज महाल हा गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील, वाधवान येथील एक ऐतिहासिक राजवाडा आहे. हा महाल 19 व्या शतकात झाला राजपूत घराण्याचे राजे एच. एच. बालसिंहजी यांनी बांधला होता. पूर्वी या महालाला ‘बाल विलास पॅलेस’ असे म्हटले जात असे. हा महाल 14 एकर परिसरात पसरलेला असून येथे सुंदर बगीचे, कारंजे, कमळाचे तलाव, क्रिकेटचे मैदान, जुन्या काळातील (vintage) गाड्यांचा संग्रह आणि ऑटोमोबाईल पुस्तकांचे ग्रंथालय व टेनिस कोर्ट आहे.

तसेच महालाच्या मध्यभागी संगमरवरी पुतळ्यांनी सजलेले खांबांचे अंगण आहे. व दरबार हॉलमध्ये छतावर केलेली नक्षीकाम केलेली चित्रे, राजांची मोठी तैलचित्रे आणि एक भव्य सिंहासन आहे. सध्या हा राजवाडा एक हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतरित केला असून पर्यटकांना येथे राजेशाही थाटाचा अनुभव घेता येतो.

12)Madhav vav-

माधव वाव ही गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील, वाधवान शहरातील, वास्तूशिल्पाचा एक उत्कृष्ट नमुना असलेली ऐतिहासिक पायऱ्यांची विहीर आहे. ही विहीर 13 व्या शतकात बांधली होती. ही विहीर सुमारे 55 मीटर लांब असून विहिरीला सहा मजली पॅव्हेलियन टॉवर्स आहेत. विहिरीची स्थापत्य कला अप्रतिम, जटिल कोरीवकाम आणि या विहिरीला पिरॅमिड आकाराची छत असून त्यावर दगडी कळस आहेत.

तसेच या विहिरी बद्दल स्थानिक दंतकथा सांगतात की अनेक वर्षे या विहिरीत पाणी नव्हते. एका ज्योतिषाने सांगितले की, एका जोडप्याने स्वतःचे बलिदान दिल्यावरच पाणी येईल. एका तरुण जोडप्याने हे धाडस दाखवले आणि ते सातव्या पायरीवर पोहोचताच विहिरीत पाणी भरले, अशी आख्यायिका आहे. माधव वाव ही गुजरातच्या जलसंधारण पद्धतीचे उत्तम उदाहरण आहे.

13)Vateshwar Van-

वटेश्वर-वन हे गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील, दुधरेज येथील एक सुंदर, शांत, धार्मिक आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. हे वन ‘वटेश्वर महादेव मंदिर वन’ म्हणूनही ओळखले जाते. या ठिकाणी प्राचीन शिवमंदिर, दाट वन, सुंदर हिरवळ, फुलांची बाग, हिरवीगार झाडी, सुंदर फुले, शांत वातावरण आणि फिरण्यासाठी निसर्गरम्य रस्ते आहेत. तसेच येथे हायकिंग, मुलांसाठी खेळाचे मैदान आहे. निसर्गप्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

14)Shree Vadwala Mandir Dudhrej-

श्री वडवाळा मंदिर दुधरेज धाम हे गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील, दुधरेज गावातील प्रसिद्ध व प्राचीन धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर 545 वर्षे जुने असून रबारी समाजाचे प्रमुख आस्था केंद्र आहे. या मंदिराच्या नावामागे एक चमत्कारिक कथा आहे, एका गरजू भक्ताला हनुमानजींनी ‘दूध’ दिले, अशी लोकश्रद्धा आहे, आणि त्यावरूनच या ठिकाणाला श्री दुधरेज हनुमानजी मंदिर म्हणून ओळखले जाते.

हे मंदिर रामायण काळातील असून या मंदिरात भगवान हनुमानांची स्वयंभू मूर्ती आहे. या ठिकाणी पु. वैष्णवचरणदासजी यांनी लावलेले वडाचे झाड आजही आहे. या मंदिरात सिंह द्वार, नंदी द्वार, आणि हस्ती द्वार अशी तीन मुख्य द्वारे असून येथे एक गोशाळा आहे.

15)Ranak Devi Temple-

राणाक देवी मंदिर हे गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील,वढवाण शहरात भोगावो नदीच्या काठावर, ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेले ठिकाण आहे. लोककथांनुसार, अल्लाउद्दीन खिल्जीच्या सैन्याने राणी राणाक देवीला पकडले, तेव्हा राणी राणाकने भोगावो नदीत सती (आत्मदहन) केले.

त्यामुळे हे मंदिर राणीच्या त्याग, शौर्य आणि अढळ भक्तीची व सन्मानाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. हे मंदिर 10 व्या शतकातील असून राणी रणकादेवीच्या त्यागाच्या स्मरणार्थ उभारलेले स्मारक असल्याचे मानले जाते.

16)Shree Trinetreshwar Temple-

त्रिनेतेश्वर मंदिर हे गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील, तरणेतर गावातील प्रसिद्ध, धार्मिक शिव मंदिर आहे. हे मंदिर तरणेतर मंदिर म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराची वास्तुकला मारू-गुर्जरा शैलीची आहे, व हे मंदिर आठव्या शतकात राजा मिहिरा भोजाने बांधले होते. या मंदिराचा संबंध महाभारतातील द्रौपदीच्या स्वयंवर कथेशी आहे. त्याबद्दल असे सांगितले जाते की,या ठिकाणीच अर्जुनाने फिरणाऱ्या माशाच्या डोळ्यात पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये पाहून बाण मारला होता आणि द्रौपदीला स्वयंवरात जिंकले होते.

तसेच या मंदिराच्या परिसरात विष्णू कुंड, ब्रह्म कुंड आणि शिव कुंड हे तीन पवित्र पाण्याचे कुंड आहेत. हे मंदिर वार्षिक तीन दिवसीय तरणेतर मेळ्यासाठी जगप्रसिद्ध असून या मेळाव्यात आदिवासी तरुण ‘स्वयंवर’ किंवा जीवनसाथी निवडतात. आणि या मेळाव्यात लोकसंगीत, हस्तकला प्रदर्शन आणि विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.

17)Shri Mandavrayji Dada Temple (Sun Temple)-

मांडवरायजी दादा (सूर्य) मंदिर हे गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील, मूळी येथील ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्त्व असलेले सोढा परमार वंशाचे मुख्य देवस्थान आणि कुलदैवत आहे. हे मंदिर सूर्यदेवाला समर्पित असून येथे ‘सिंहाचे दान’ आणि मोर दिसण्याची विशेष मान्यता आहे.

हे ठिकाण अत्यंत शांत आणि आध्यात्मिक असून या मंदिराचे एक अद्वितीय वैशिष्ट्य म्हणजे, दररोज संध्याकाळी आरतीच्या वेळी सुंदर मोर या मंदिराच्या ध्वजावर बसतात, आणि त्यानंतरच आरती सुरू होते. हे मंदिर एक धार्मिक स्थळ नाही तर परमार राजवंशाच्या इतिहासाचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहे.

18)Ajit Niwas Palace –

अजित विलास पॅलेस हा गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील, धांगध्रा शहरातील एक ऐतिहासिक राजवाडा आहे. हा राजवाडा धांगध्राच्या ‘झाला’ राजघराण्याच्या मालकीचा असून धांगध्रा हे बॉम्बे प्रेसिडेन्सीतील काठियावाड एजन्सीमधील आठ पहिल्या दर्जाच्या संस्थानांपैकी एक होते आणि त्याला 13 तोफांची सलामी मिळत होती. या ऐतिहासिक व भव्य राजवाड्याची वास्तू कला अत्यंत सुंदर नक्षीकाम व कोरीव कामासह केली आहे.

19)Ambika Nivas Palace-

अंबिका निवास पॅलेस हा गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील, मुळी येथील एक ऐतिहासिक राजवाडा आहे. हा राजवाडा 1930 मध्ये मुलीचे 22 वे ठाकोर हरिश्चंद्रसिंहजी यांनी बांधला होता आणि 1936 मध्ये याचे काम पूर्ण झाले. सध्या या राजवाड्याचे रूपांतर हेरिटेज हॉटेल’मध्ये करण्यात आले असून, येथे पाहुण्यांना राजेशाही थाटात राहण्याचा अनुभव घेता येतो. तसेच राजघराण्याची 24 वी पिढी अजूनही येथे वास्तव्यास आहे .

व ते स्वतः येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतात. या भव्य राजवाड्याची वास्तू कला अत्यंत सुंदर, उंच छताच्या खोल्या, भव्य व्हरांडे आणि काठियावाडी शैलीतील आहे. येथे 10 पॅलेस रूम 4 रॉयल सुइट्स असून येथे शाही भोजनाबरोबरच लग्नसमारंभ, चित्रपट शूटिंग आणि कॉर्पोरेट कार्यक्रमांसाठी 40 एकरचे खाजगी क्षेत्र आहे.

20)Bell Guest House-

बेल गेस्ट हाऊस हे गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील,सायला येथील एक ऐतिहासिक हेरिटेज होमस्टे आहे.
हे गेस्ट हाऊस 1870 मध्ये सायला संस्थानाच्या महाराजांनी ब्रिटीश अधिकार्‍यांच्या मुक्कामासाठी बांधले होते. हे गेस्ट हाऊस वास्तू इंडो-युरोपियन शैलीतील बांधलेले असून 24 एकर मध्ये पसरलेले आहे.

येथे निसर्गरम्य बागा,शांत वातावरण, वातानुकूलित खोल्या, टीव्ही, संलग्न बाथरूम, रेस्टॉरंट, वायफाय, स्विमिंग पूल या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. सध्या हे गेस्ट हाऊस हेरिटेज होमस्टे म्हणून चालवले जाते.

21) Munsar Lake-

मुनसर तलाव हा गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्याच्या सीमेजवळ विरमगाम येथील एक भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) अंतर्गत एक संरक्षित ऐतिहासिक स्थळ आहे. या तलावाचे बांधकाम 11 व्या शतकात सोलंकी वंशाचे राजे सिद्धराज जयसिंह यांच्या मातोश्री राजमाता मीनलदेवी यांनी केले होते. हा तलाव पूर्वी ‘मान सरोवर’ म्हणून ओळखला जात होता. हा तलाव शंखाच्या आकाराचा असून 220 यार्डांच्या परिघात पसरलेला आहे.

तसेच या तलावाच्या काठावर मराठा काळात बांधलेले मुनसरी माता यांचे मंदिर व 300 मंदिरे आहेत. ही मंदिरे प्रामुख्याने भगवान शिव आणि कृष्णाला समर्पित आहेत. या तलावामध्ये पाणी येण्यापूर्वी ते एका अष्टकोनी कुंडात जमा होते, व नंतर गाळ खाली बसल्यावर शुद्ध पाणी तीन नळ्यांच्या बोगद्याद्वारे मुख्य तलावात सोडले जाते.

22)Taranga Vihar Dham-

तरंगा विहार धाम हे गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील ध्रांगध्रा-हळवद महामार्गावर,चुली गावाजवळ वसलेले प्राचीन जैन तीर्थ आहे.येथे भगवान अजितनाथ स्वामींची प्रतिमा असून, श्वेतांबर आणि दिगंबर या दोन्ही पंथांची मंदिरे आहेत. हे मंदिर 4 थ्या शतकात, चालुक्य राजवंशाच्या काळात बांधल्याचे सांगितले जाते.

या मंदिराची स्थापत्यशैली पांढऱ्या संगमरवरी दगडात कोरलेले असून अत्यंत सुंदर व बारीक कोरीव कामसाठी प्रसिद्ध आहे.या ठिकाणी श्वेतांबर पंथासाठी 14 मंदिरे आणि दिगंबर पंथासाठी 5 मंदिरे आहेत. हे मंदिर तरंगा विहार धाम, चुली जैन तीर्थ आणि ‘मिनी तरंगा धाम’ म्हणूनही ओळखले जाते.

23)Baba Ramdevpir Temple, Piplidham-

पिपळी धाम हे गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील,एक महत्त्वाचे धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे. हे धाम ‘भक्त बाबा रामदेवपीर’ यांच्या भव्य मंदिरासाठी प्रसिद्ध असून याला “संत सवाराम बापाची जागा” या नावानेही ओळखले जाते. हे ठिकाण भाविकांसाठी शांतता आणि भक्तीचे केंद्र मानले जाते. येथील वातावरण अत्यंत अध्यात्मिक असून दरवर्षी हजारो लोक येथे दर्शनासाठी येतात. तसेच येथे भाविकांसाठी श्री रामदेवपीर बापा अन्नक्षेत्र चालवले जाते.

24)Bhimora Caves-

भीमोरा लेण्या या गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील,चोटीला तालुक्यातील भीमोरा गावात असलेल्या एक ऐतिहासिक आणि प्राचीन लेण्या आहेत. या लेण्या भीमोरा गावातील डोंगराळ आणि निसर्गरम्य भागात वसलेले आहेत. येथे पाषाणात कोरलेली एक मोठी गुहा आहे, परंतु सध्या ही गुहा विटांच्या भिंतीने बंद करण्यात आले आहे.

गुहेच्या भिंतींवर काही जुनी चित्रे आणि कोरीव काम पाहायला मिळते. तसेच येथे एक जुना किल्ला आणि भीमोरा आश्रम आहे. या लेण्या 3 र्‍या ते 4 थ्या शतकातील असल्याचे सांगितले जाते.पौराणिक कथेनुसार, पांडव वनवासाच्या काळात या ठिकाणी राहिले होते.

25)Shakti Mata Temple, Patdi-

शक्ती माता मंदिर हे गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील,पाटडी येथील, झालावाड परिसरातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर झाडा राजपूत वंशाच्या लोकांची कुलदेवी असून या परिसराला ‘झालावाड’ म्हणून हे ओळखले जाते. या मंदिराबद्दल अनेक ऐतिहासिक कथा सांगितल्या जातात. शक्ती माता मंदिर हे एक जागृत देवस्थान असून येथे अनेक भक्त दर्शनासाठी येतात.

Visit the travel blog

1)गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील, शक्ती माता मंदिर कोणत्या राजवंशाचे कुलदैवत आहे?

गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील, शक्ती माता मंदिर हे ‘झाडा’ राजपूत वंशाच्या लोकांची कुलदेवी आहे.


2)सुरेंद्रनगर जिल्ह्यातील,अंबिका निवास पॅलेस हा कोणी बांधला?

सुरेंद्रनगर जिल्ह्यातील,अंबिका निवास पॅलेस हा 1930 मध्ये मुलीचे 22 वे ठाकोर हरिश्चंद्रसिंहजी यांनी बांधला होता.


3)गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील त्रिनेतेश्वर मंदिर कोणत्या ठिकाणी आहे?

गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील त्रिनेतेश्वर मंदिर हे तरणेतर गावातील प्रसिद्ध, धार्मिक शिव मंदिर आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top