मुंबई उपनगर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे- Top 25 places to visit in Mumbai Suburban District

मंडळी भारत भ्रमंती मध्ये आज आपण पाहणार आहोत मुंबई उपनगर जिल्हा येथील संपूर्ण पर्यटन स्थळे मुंबई हे महाराष्ट्राची राजधानी असलेले मोठे धनाड्य शहर आहे.
मुंबई उपनगर जिल्हा हा महाराष्ट्रातील दुसऱ्या नंबरचा लहान जिल्हा असून या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 369 चौ.किमी आहे. तसेच या जिल्ह्यात मिठी नदी ही मुंबई उपनगर जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. या जिल्ह्यात बोरीवली, अंधेरी आणि कुर्ला हे तीन तालुके असून 87 गावे आहेत.मुंबई शहराला मुंबादेवीच्या नावावरून मुंबई हे नाव पडले आहे. मुंबईला सात बेटांचे शहर म्हणून ही ओळखले जाते. Top 25 places to visit in Mumbai Suburban District

हा जिल्हा भारताचा आर्थिक कणा आहे. या जिल्ह्याची राज्यभाषा मराठी आहे. याशिवाय या ठिकाणी गुजराती,मारवाडी, हिंदी,उर्दू या ही भाषा बोलल्या जातात. हा जिल्हा अरबी समुद्राच्या काठावर असून 2008 मध्ये मुंबईला अल्फा जागतिक शहर म्हणून संबोधले गेले. ब्रिटिश राजवटीत या ठिकाणी व्यापाराची मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ब्रिटिश राजवटीत मुंबई हा एकच जिल्हा होता परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे 1990 या जिल्ह्याचे विभाजन करून मुंबई शहर व मुंबई उपनगर असे दोन जिल्हे निर्माण करण्यात आले. ब्रिटिश राजवटीमध्ये या शहराचे नाव बॉम्बे होते परंतु 1995 मध्ये ते बदलले गेले व मुंबई असे करण्यात आले.

या ठिकाणी भारतातील आरबीआय, शेअर बाजार, अनेक बँका, मोठमोठ्या कंपन्या, आणि कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. 1854 मध्ये भारतातील पहिली सूतगिरणी मुंबईमध्ये सुरू करण्यात आली. तसेच 1853 मध्ये मुंबई ते ठाणे धावणारी रेल्वे मुंबई मध्ये सुरू झाली. मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव आहेत. आणि येथील हवामान उष्ण व दमट आहे. तसेच मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबईचा कारभार हा बृहन्मुंबई महापालिकेतर्फे चालवला जातो. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे या ठिकाणी आहे.

Table of Contents

Top 25 places to visit in Mumbai Suburban District

मुंबई उपनगर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-

1) इस्कॉन मंदिर खारघर-

Top 25 places to visit in Mumbai Suburban District


ISKCON temple हे मुंबईतील खारघर या ठिकाणी आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे असलेले इस्कॉन मंदिर आहे. हे मंदिर नऊ एकर मध्ये पसरलेले असून या मंदिराला बांधण्यासाठी बारा वर्षाचा कालावधी लागला आहे.या भगवान श्रीकृष्णाच्या भव्य मंदिराचे नाव श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिर असे आहे. हे मंदिर खारघरच्या सेक्टर 23 मध्ये असून या भव्य मंदिराचे बांधकाम पांढऱ्या आणि तपकिरी संगमरवराच्या खास दगडांनी केलेले आहे. तसेच या मंदिराच्या बांधकामासाठी आजपर्यंत 200 कोटी खर्च झाला आहे.

या मंदिराचा मुख्य भाग श्रीकृष्णाच्या थ्रीडी पेंटिंगने सजवण्यात आला आहे. व येथील दशावतार मंदिराचे दरवाजे चांदीचे आहेत. आणि त्यावर गदा, शंख, चक्र आणि ध्वजाच्या सुवर्ण प्रतिमा कोरलेल्या आहेत. या मंदिराचा नऊ एकरा पैकी पाच-सहा एकर परिसर निसर्गसंपदेने नटलेला आहे. तसेच या मंदिरात तीन हजार भाविकांना एकत्र बसण्याची व्यवस्था आहे. शिवाय या मंदिरात रविवारी भाविकांना मोफत प्रसाद दिला जातो. इस्कॉनची जगभरात सुमारे 800 मंदिरे आहेत. जातो. या श्री कृष्णाच्या अप्रतिम मंदिराला एकदा तरी भेट नक्कीच दिली पाहिजे.

2) मुंबा देवी मंदिर-


Mumba Devi Temple हे मुंबईतील देवी पार्वती चा अवतार असलेले मुंबादेवीचे प्राचीन हिंदू मंदिर आहे. मुंबादेवी ही मुंबई शहराची ग्रामदेवता आहे.मुंबईचे नाव मुंबादेवीच्या नावावरून पडले असल्याचे सांगितले जाते. कोळी लोकांची या देवीवर खूप श्रद्धा आहे त्यामुळे ही कोळी लोकांचे देवता आहे असेही समजले जाते. हे मंदिर काळबादेवी-भुलेश्वर भागात आहे. मुंबादेवी ही मुंबईची एक प्रतिष्ठित देवता असून देवीची मूर्ती चांदीच्या वस्त्रांनी परिधान केलेली आहे आणि नाक अलंकारित आहे. याशिवाय मुंबादेवी मंदिरात, गणेश इंद्र आणि हनुमानाच्या मूर्ती आहेत. भाविक या मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येतात.

3) वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान –


Virmata Jijabai Bhosle Park पूर्वीचे राणीची बाग ही मुंबईतील सर्वात जुनी व मोठी बाग आहे. ही बाग भायखळा या ठिकाणी असून 53 एकर जागेत पसरलेली आहे. या बागेचे मूळ नाव क्वीन व्हिक्टोरिया गार्डन्स असे होते. या बागेचे उद्घाटन 1862 रोजी लेडी कॅथरीन फ्रेअर यांनी केले होते.या जिजामाता उद्यानामध्ये जिजामाता व बाल शिवाजींचा पुतळा आहे.

तसेच या बागेमध्ये शंभरी पार केलेले वृक्ष,झाडे, झुडपे, लता यांचा अनमोल खजिना असून या बागेत 286 प्रजातींचे 3213 वृक्ष आणि 853 जातीच्या वनस्पती आहेत. याशिवाय या उद्यानात अनेक सस्तन प्राणी, पक्षी आणि कीटक आढळून येतात. ही बाग दीडशे वर्षापेक्षा जुनी असून मुंबईत या उद्याना एवढे दुसरे कोणतेच मोठे उद्यान नाही.

4)महाकाली लेणी-


Mahakali Cave ही मुंबईमधील अंधेरी पासून जवळच लहान टेकडीवर कोरलेली लेणी आहेत. या लेण्या बुद्ध काळातील इ. स.पूर्व पहिल्या शतकापासून ते इ. स. सहाव्या शतकापर्यंत बांधलेल्या स्मारकांचा समूह आहे. येथील गुहेत 19 दगडी विहारांचा समावेश आहे. तसेच या ठिकाणी शिव अनुयायांनी नंतर शिवालंगमची शिल्पं स्थापीत केली आहे. या लेण्यांना कोंडीवटी बौद्ध लेणी म्हणून ही ओळखले जाते.महाकाली लेणीच्या टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या महाकाली देवीच्या मंदिरावरून या लेण्यांना महाकाली हे नाव पडले आहे. अंधेरी रेल्वे स्थानकापासून या लेण्या सहा किलोमीटर अंतरावर आहेत.

Visit our website: allindiajourney.com

5) दादासाहेब फाळके चित्रनगरी-


Dadasaheb Falke Filmcity हे मुंबईतील गोरेगाव या ठिकाणी आहे.दादासाहेब फाळके, ज्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाते.त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतला ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला मुक चित्रपट 1993 साली बनविला. व त्यांच्या 19 वर्षांच्या कारकिर्दीत 95 चित्रपट आणि 26 लघुपट बनवले. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ या चित्रनगरीला दादासाहेब फाळके यांचे नाव देण्यात आले आहे.

हा जगातील सर्वात मोठा चित्रपट उद्योग असून भारतात होणाऱ्या चित्रपटांमध्ये या चित्रनगरीचा 60 टक्के वाटा आहे. गोरेगाव येथे कलागारे संकुल उभारण्यात आली आहेत. त्यामध्ये ध्वनिमुद्न कक्ष, बागबगीचे, तलाव, चित्रपटगृह, मैदान इ. समावेश आहे. बॉलीवूड मधील अनेक चित्रपट निर्मितीसाठी याचा उपयोग केला जातो. या चित्रनगरीची स्थापना महाराष्ट्र राज्याने चित्रपट उद्योगास पायाभूत सुविधा व सवलती देण्यासाठी केली आहे.

6) बाणगंगा तलाव-


Banganga Lake हा मुंबईतील चर्नी रोड पासून जवळ असलेले एक प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण मलबार हिलच्या वाळकेश्वर परिसरात आहे. हा तलाव बाराव्या शतकात बांधलेला असून 33 फूट खोल आहे. या तलावाला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. या तलावा बाबत अशी अख्यायिका सांगितली जाते की राम सीतेच्या शोधात असताना जवळपास गोडे पाणी उपलब्ध नसल्याने त्यांनी जमिनीवर एक बाण मारला व त्यामधून गोड्या पाण्याचा झरा निर्माण झाला तोच बाणगंगा म्हणून ओळखला जाऊ लागला.

हा तलाव अरबी समुद्राच्या जवळ असूनही या ठिकाणी वर्षभर गोडे पाणी असते. हे आयताकृती टाकी आजही अस्तित्वात असून काळ्या दगडांनी बांधलेले आहे. दरवर्षी देवदिवाळीला येथे दिपोत्सव साजरा केला या टाकी परिसरात अनेक मंदिरे आणि घाट आहेत.

7) आरबीआय मॉनेटरी म्युझियम-


RBI Monetary Museum हे मुंबईमधील अमर बिल्डिंग, सर फिरोजशाह मेहता रोड फोर्ट, या ठिकाणी असलेले संग्रहालय आहे. या संग्रहालयाचे स्थापना 2004 मध्ये झाली.या ठिकाणी सुरुवातीपासून भारतातील पैशाच्या गायीच्या वापरापासून ते कागदी चलन, नाणी, नाणेशास्त्र , आर्थिक इतिहाससंग्रह प्राचीन कौड्या , नाणी, कागदी चलन, आर्थिक साधने,संग्रह आकार शेअर बाजार आणि आधुनिक काळातील इलेक्ट्रॉनिक व्यवहारांपर्यंतचे माहिती मिळते.

हे संग्रहालय सहा विभागांमध्ये विभागले असून या संग्रहालयात सुमारे 1500 वस्तू आहेत. हे संग्रहालय आर्थिक इतिहास आणि मुद्राशास्त्राचे देशातील पहिले संग्रहालय होते. या संग्रहालयात विनामूल्य प्रवेश आहे.

8) माउंट मेरी चर्च-


Mount Mary Church हे वांद्रे येथील बस स्टॅडच्या समुद्रसपाटीपासून अर्धा किलोमीटरवर आणि 80 मीटर उंच टेकडीवर एक धार्मिक चर्च आहे. या चर्चला बॅसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ द माउंट म्हणूनही ओळखले जाते. हा चर्च सोळाव्या शतकात बांधला असून तो व्हर्जिन मेरीचा आहे. हा चर्च टेकडीवर असल्याने त्याला माउंट हे नाव मिळाले आहे.दरवर्षी सप्टेंबर महिन्यात या ठिकाणी ‘वांद्रे-फेरी’ नावाची मोठी जत्रा भरते.

त्यावेळी अनेक भाविक त्यांची श्रद्धा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी या चर्चमध्ये येतात. या प्राचीन चर्चला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. या चर्चचे विशेष आकर्षण म्हणजे चर्चची सुंदर वास्तुकला, समुद्राचे विहंगम दृश्य आणि येथील जत्रा यामुळे मुंबईतील हे एक धार्मिक,लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.

9) हँगिंग गार्डन्स-


Hanging Garden हे मुंबईतील कमला नेहरू परिसरात मलबार हिलच्या टेकडीवर असलेले एक सुंदर टेरेस गार्डन आहे. हे उद्यान फिरोज शहा मेहता उद्यान म्हणूनही ओळखले जाते.येथून अरबी समुद्राचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. या उद्यानाचा आराखडा उल्हास घापोकर यांनी तयार केला होता. हे उद्यान एका जलाशयावर असून ते 1880 मध्ये बांधण्यात आले.

या उद्यानामध्ये प्राण्यांच्या आकाराची गुंतागुंतीचे कुंपण आणि हिरवीगार वनस्पती आहेत जे वरून पाहिल्यावर त्यावर PMG ही अक्षरे लिहिली जातात. तसेच या उद्यानातील सुंदर फुलांचे घड्याळ बागेच्या सौंदर्यात भर घालते.हँगिंग गार्डन्स हे जॉगिंग, योगा आणि ध्यानधारणा करणाऱ्यांसाठी एक उत्तम ठिकाण आहे.

10) पांडवकडा धबधबा-


Pandavkada Waterfall हा मुंबईच्या उपनगरातील खारघर या ठिकाणी असलेला सुंदर धबधबा आहे. हा धबधबा म्हणजे निसर्गातील ‘प्लंज’ धबधबा प्रकार आहे. हा धबधबा 107 मीटर उंचीवरून खालील खडकाळ पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात कोसळतो. तसेच या धबधब्याला ‘पांडू धबधबा’ आणि ‘खारघर धबधबा’ असेही म्हटले जाते. या धबधब्याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी की पांडवांनी जंगलातून फिरत असताना या धबधब्याखाली स्नान केले होते.

त्यामुळे या ठिकाणाला पांडवकडा हे नाव मिळाले. तसेच या धबधब्याजवळ एक मोठा बोगदा आहे जिथून पांडव आले होते. पांडव कडा धबधबा म्हणजे खारघर चा स्वर्गच आहे असे म्हटले जाते. मुंबईपासून हा धबधबा 54 किलोमीटर अंतरावर आहे.

11) कमला नेहरू पार्क-


Kamla Nehru Park हे मुंबईतील मलबार हिल परिसरात शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी असलेले सार्वजनिक उद्यान आहे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू यांच्या नावावरून या उद्यानाचे हे नाव आहे. हे उद्यान मलबार हिलच्या टेकडीवर चार एकर मध्ये पसरलेले आहे. या उद्यानातील म्हातारीचा बूट हा नीरी संचालक यांनी डिझाईन केला होता.

याशिवाय या उद्यानात मुलांसाठी खेळण्याचे मैदान विशाल बूट हाऊस,चालण्याचे मार्ग आणि हिरवळ पाहायला मिळते. या उद्यानाच्या जवळपास हँगिंग गार्डन, बाणगंगा टाकी, मलबार हिल व्ह्यूपॉईंट, मणिभवन गांधी संग्रहालय, बाबुलनाथ मंदिर ही ठिकाणे आहेत. चर्नी रोड पासून हे ठिकाण तीन किलोमीटर अंतरावर आहे.

12) तुळशी तलाव –


Tulsi Lake हा मुंबई मधील एक गोड्या पाण्याचा तलाव आहे. हा तलाव मुंबईतील दुसरा क्रमांकाचा मोठा तलाव असून मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा महत्त्वाचा तलाव आहे.तुळशी तलाव हा सालसेट बेटावर आहे व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात आहे.हा तलाव तासो नदीला लागून जवळच्या विहार तलावाजवळ बांधण्यात आला आहे. या तलावात कान्हेरी पर्वतरांगांच्या 676 हेक्टर क्षेत्रफळाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचे पाणी या तलावात वाहते. पावसाळ्यात हा तलाव पूर्ण भरल्यानंतर या तलावातील पाणी पवई तलावात आणि पुढे मिठी नदीत वाहतो . तुळशी तलाव म्हणजे मुंबईसाठी एक महत्त्वाचे जलस्त्रोत आहे.

13) भाभा अणुसंशोधन केंद्र –

Bhabha Atomic Research Centre हे मुंबईतील ट्रॉम्बे या ठिकाणी असलेले एक महत्वाचे प्रमुख संशोधन केंद्र आहे. या अनुसंशोधन केंद्रात अणुऊर्जेचा शांततापूर्ण उपयोग आणि अणुविज्ञान, व अभियांत्रिकीवर आधारित संशोधन व विकास केला जातो. तसेच या ठिकाणी अणुऊर्जा निर्मिती, किरणोत्सर्गी समस्थानिकांचा वापर, आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांमध्ये संशोधन केले जाते. येथील अटल इन्क्युबेशन सेंटर हे सामाजिक आणि औद्योगिक अनुप्रयोगांसाठी,तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी हे केंद्र कार्यरत आहे.

तसेच सध्या श्री विवेक भसीन हे भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक आहेत. या अनुसंशोधन केंद्राचे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 20 जानेवारी 1957 मध्ये उद्घाटन केले होते.तर 1967 मध्ये या केंद्राचे नाव ‘भाभा अणुसंशोधन केंद्र’ असे ठेवण्यात आले. भाभा अनुसंशोधन केंद्र हे भारतातील एक महत्त्वाचे आणि संशोधन केंद्र आहे.

14) मानोरी बीच-


Manori Beach हा मुंबईतील एक शांत, समृद्ध व निसर्ग संपन्न समुद्रकिनारा आहे. हा बीच मुंबई शहराच्या गजबजाटातून एक शांत स्थळ असून हे ठिकाण पर्यटक आणि स्थानिक लोकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे.मानोरी बीचला ‘मिनी गोवा’ म्हणूनही ओळखले जाते. तसेच येथील समुद्रकिनारी असलेल्या झोपड्यांमध्ये तुम्ही फास्ट फूड आणि सी-फूडचा आनंद घेऊ शकता. या मानोरी बीचजवळ गोराई बीच आणि ग्लोबल विपासना पॅगोडा ही ठिकाणे आहेत.मानोरी बीच मुंबईतील एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ असून हा बीच मलाड किंवा बोरवली पासून थोड्या अंतरावर आहे.

15) जोगेश्वरी लेणी-


Jogeshwari Cave ही मुंबई उपनगरात जोगेश्वरी या ठिकाणी असलेल्या भारतातील सर्वात जुन्या हिंदू आणि बौद्ध गुंफांचे मंदिर आहे. या लेणी इ.स. 520 ते 550 च्या काळात बांधले असल्याचे सांगितले जाते. या लेण्या म्हणजे महायान बौद्ध वास्तुकलेतील शेवटचा टप्पा आहे.इतिहासतज्ञ व विद्वान वॉल्टर स्पिंक यांच्या मतानुसार जोगेश्वरी ही भारतातील सर्वात जुनी व सर्वात मोठी हिंदू लेणी आहेत. या लेण्यांमध्ये खूप खांब आहेत आणि एक लिंगम आहे. तसेच येथे दत्तात्रेय, हनुमान मूर्ती, गणेश रांग आणि द्वारपालाचे अवशेष असून या गुहेत देवी जोगेश्वरीची मूर्ती आहे. या लेण्या वेस्टर्न एक्सप्रेस महामार्गाजवळ असून या ठिकाणाला पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देतात.

16) शिवमंदिर अंबरनाथ-


Shivmandir हे मुंबईजवळील अंबरनाथ मध्ये निसर्गरम्य ठिकाणी असलेले एक प्राचीन, ऐतिहासिक व धार्मिक शिवमंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम म्हणजे उत्कृष्ट कलाकृतीचा नमुनाच आहे. कारण ते वेसर शैली, द्रविड आणि नागरशैलीचे मिश्रण असलेले एक उत्तम उदाहरण आहे. हे मंदिर 11 व्या शतकात बांधले असून या मंदिराला अंबरेश्वर शिव मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर 1060 मध्ये शिलाहार राजा छित्तराजाने बांधले असे सांगितले जाते. हे मंदिर वालधुनी नदीच्या काठाजवळ असून येथील मंदिर परिसर शांत व नयनरम्य आहे. हे मंदिर अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे.

17) बेब्रान स्टेडियम-


Brabourne Stadium हे मुंबईतील चर्चगेट या ठिकाणी असलेले एक प्रसिद्ध क्रिकेटचे मैदान आहे. हे मैदान 1937 मध्ये बांधले असून ते क्रिकेट क्लब ऑफ इंडिया च्या मालकीचे आहे.भारतातील हे पहिले कायमस्वरूपी क्रीडा मैदान आहे. या क्रिकेट मैदानात सुमारे 20 हजार लोक बसण्याची क्षमता आहे. आज पर्यंत या ऐतिहासिक मैदानात अनेक महत्त्वाच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजनात करण्यात आले आहे.

या क्रिकेट मैदानात सचिन तेंडुलकरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक केले होते. तसेच या मैदानात पहिला कसोटी सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 1948 मध्ये खेळला गेला होता.बेब्रान स्टेडियम हे मुंबईतील एक महत्त्वाचे क्रीडास्थळ असून क्रिकेट प्रेमींचे एक महत्त्वाचे ठिकाण आहे.

18) राजाबाई टॉवर-


Rajabai Tower हे मुंबई येथील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. या टॉवरची इमारत मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक स्वर्गीय प्रेमचंद रायचंद यांनी दिलेल्या निधीतून बांधण्यात आली आहे. परंतु हा निधी देताना त्यांनी त्यांची आई राजाबाई यांच्या नावेच ही वास्तू बांधली जावी अशी अट घातली होती. म्हणून ही वास्तू ‘राजाबाई टॉवर’ या नावाने ओळखली जाते. या टॉवरची पायाभरणी 1869 मध्ये झाली होती व या वास्तूचे बांधकाम 1879 मध्ये पूर्ण झाले.

त्यावेळी या बांधकामाचा खर्च दोन लाख रुपये एवढा झाला होता. राजाबाई टॉवरच्या बांधकामात वेनेटियन आणि गॉथिक या वास्तुकलेचा मिलाफ असून या बांधकामासाठी कुर्ला मधील खाणीतील फिक्या पिवळ्या रंगाच्या दगडांचा वापर केला आहे. तसेच या वास्तूच्या खिडक्यांसाठी रंगीत काचांचा वापर केला आहे.

19) बाबुलनाथ मंदिर मुंबई-


Babulnath Temple हे मुंबईतील गिरगाव चौपाटीजवळील एका लहान टेकडीवर असलेले एक धार्मिक व ऐतिहासिक शिव मंदिर आहे. हे मंदिर मलबार हिल परिसरात एका टेकडीवर बांधलेले असून या मंदिरातील मुख्य देवता बाबुल वृक्षाच्या रूपातील शिव आहे. या मंदिराची उत्पत्ती बाराव्या शतकात झालेली असून हे मंदिर 200 वर्षांपूर्वी बांधले आहे. या मंदिराची भव्यता पाहून साक्षात कैलास पर्वताचा भ्रम होतो. या मंदिरात लिफ्टणे ही देवाचे दर्शन घेता येते. महाशिवरात्रीला लाखो भाविक या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो.

20) वाळकेश्वर मंदिर-


Walkeshwar Temple हे मुंबईतील मलबार हिल परिसरात वाळकेश्वर या ठिकाणी असलेले प्रसिद्ध व जागृत शिवमंदिर आहे. या मंदिराला बाण गंगा मंदिर म्हणून ही ओळखले जाते. हे मंदिर मुंबई शहराच्या उंच ठिकाणी असून या मंदिराजवळ बाणगंगा तलाव आहे. या मंदिराबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की रावणाने सितेचे अपहरण केले होते त्यावेळी श्रीराम रावणाचा पाठलाग करत असताना या ठिकाणी थांबले होते, तेव्हा रामाने या ठिकाणी वाळूचे शिवलिंग स्थापन करून पूजा केली होती. वाळूपासून बनवलेल्या मूर्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या संस्कृत शब्दापासून वालुका ईश्वर, जो शिवाचा अवतार आहे. तेच हे वाळकेश्वर मंदिर आहे. भाविक मोठ्या श्रद्धेने या शिवमंदिरात दर्शनासाठी येतात.

21) जिवदानी देवी मंदिर-


Jivdani Devi Temple हे मुंबईतील विरार या ठिकाणी असलेले जीवदानी मातेचे प्रसिद्ध व जागृत देवस्थान आहे. हे मंदिर विरार मधील एका डोंगरावर असून हा डोंगर विरारच्या चंदनसार, नारिंगी या गावांच्या परिसरात आहे. या जीवदानी मातेची पूजा म्हणजे एका शक्ती पिठाची पूजा आहे. कारण दक्षाने केलेल्या यज्ञात आत्माहुती केलेल्या सतीच्या कलेवराचे श्री विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने 51 तुकडे केले होते.ज्या ठिकाणी हे तुकडे पडले तेथे देवीची शक्तिपीठे तयार झाली.

त्यापैकीच जीवदानी मातेचे हे एक शक्तीपीठ आहे. अशी शक्तीपीठे भारताबाहेर नेपाळ व बलुचिस्तान मध्येही ही आहेत. महाराष्ट्रात असलेल्या 18 शक्तिपीठांपैकी जिवदानी हे एक शक्तिपीठ आहे. विरार रेल्वे स्थानकापासून हे मंदिर थोड्या अंतरावर आहे.

22) तुंगारेश्वर महादेव मंदिर-


Tungareshwar Temple हे मुंबईतील पालघर जिल्ह्यातील वसई या ठिकाणी असलेले एक प्राचीन व धार्मिक हिंदू शिवमंदिर आहे. हे मंदिर जमिनीपासून 2177 फूट उंचीवर तुंगारेश्वर या ठिकाणी आहे. या मंदिराच्या मागील बाजूस एक मानवी निर्मित रामकुंड( जलकुंड) आहे. तसेच येथील तुंगारेश्वर मंदिराशेजारी,”खोडियार माताजी’ देवीचे एक छोटे मंदिर आहे. या देवीचे वाहन मगर आहे. दरवर्षी महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो त्यावेळी भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. यावेळी भाविक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणावर भेट देतात.

23) डॉ.भाऊ दाजी लाड संग्रहालय-

Dr. Bhau Daji Lad Museaum हे मुंबईतील भायखळा भागात असलेले प्रसिद्ध संग्रहालय आहे. या संग्रहालयाचे पूर्वीचे नाव ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’ असे होते. हे संग्रहालय भायखळा जवळ असून या संग्रहालयाची स्थापना डॉ. रामचंद्र विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड यांनी 1855 मध्ये केली. हे मुंबईतील पहिले संग्रहालय आहे.भाऊ दाजी लाड हे संस्कृत पंडित व निष्णात डॉक्टर होते.

या संग्रहालयात आपल्याला प्राचीन नकाशे, मातीचे लघु देखावे, कथानकं दर्शवणारे देखावे, लिथोग्राफ्स /पाषाणावरिल छापील चित्रे, छायाचित्रे, दुर्मिळ पुस्तके आणि जुने कपडे व इतर वस्तू पाहायला मिळतात. या दुर्मिळ संग्रहातून मुंबईचा सांस्कृतिक वारसा आणि इतिहास पाहिला भेटतो.

24) एस्सेल वर्ल्ड-


EsselWorld हे मुंबईतील धारावी बेटावरील गोराई येथे 65 एकर क्षेत्रावर असलेले एक प्रसिद्ध व मनोरंजन उद्यान आहे. हे वॉटर पार्क 1989 मध्ये सर्वांसाठी खुले केले. या ठिकाणी 14 फॅमिली स्विंग्स, 11 एड्रेनालाईन-पंपिंग थ्रिल राइड्स आणि 15 मुलांचे स्विंग्स आहेत.एस्सेल वर्ल्डमध्ये सर्व वयोगटातील लोक आनंद घेऊ शकतात. तसेच या ठिकाणी वॉटर किंगडम, रोलरकोस्टर आणि राइड्स सारख्या थीम आहे. व येथे 3,400 स्क्वेअर फूट पसरलेली मुंबईची पहिली आइस स्केटिंग रिंक आहे.

आणि या रिंकचे तापमान 4 डिग्री सेल्सियस स्थिर ठेवणे हे या उद्यानाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. तसेच या ठिकाणी रंगीबेरंगी दिवे, उच्च शक्तीचा ऑडिओ आणि काचेचा डान्स फ्लोर असल्यामुळे पर्यटक येथे पार्ट्या आयोजित करतात.एस्सेल वर्ल्ड हे मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.

25) इस्कॉन मंदिर जुहू-


ISKCON Temple हे मुंबईतील जुहू बीच पासून थोड्याच अंतरावर असलेले प्रसिद्ध धार्मिक मंदिर आहे.हे मंदिर श्री श्री राधा‑रासबिहारी मंदिर यांचे असून या मंदिराला ISKCON जुहू किंवा हरे कृष्ण मंदिर म्हणूनही ओळखले जाते. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी येथे जमिनीची खरेदी व देवतेंची स्थापना केली आहे. हे मंदिर जवळपास चार एकर मध्ये असून 1978 मध्ये या मंदिराची स्थापना झाली आहे.

हे मंदिर पांढऱ्या संगमरवरीने सुशोभित केले असून या मंदिरातील मुख्य देवता राधा‑रासबिहारी, सिता‑राम‑लक्ष्मण‑हनुमान आणि गौरा‑निताई यांच्या मूर्ती आहेत. तसेच येथील मंदिरात जन्माष्टमी, राधाष्टमी, राम नवमी, रथयात्रा, मकरसंक्रांति, गौरी पूर्णिमा, नरसिंहा जयंती, कार्तिक मास यावेळी मोठे उत्सव साजरे केले जातात. मंदिरात पुस्तक व उपहार स्टॉल आहेत. भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दर्शनाला येतात.

Visit the travel blog

1) मुंबईतील एस्सेल वर्ल्ड हे किती एकर क्षेत्रावर पसरलेले आहे ?

मुंबईतील एस्सेल वर्ल्ड हे 65 एकर क्षेत्रावर पसरलेले आहे .


2) पालघर जिल्ह्यातील तुंगारेश्वर महादेव मंदिर कोणत्या ठिकाणी आहे ?

पालघर जिल्ह्यातील तुंगारेश्वर महादेव मंदिर वसई ठिकाणी आहे .


3) मुंबईतील वाळकेश्वर मंदिर कोणत्या परिसरात आहे ?

मुंबईतील वाळकेश्वर मंदिर मलबार हिल परिसरात आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top