डांग जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-Top 25 places to visit in Dang District

भारतभ्रमंती ही अशी वेबसाईट आहे, जिथे तुम्हाला भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळांची माहिती मिळणार आहे. आता तुम्ही पाहणार आहात गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे. डांग जिल्हा हा दक्षिण गुजरातमधील सापुतारा पर्वतरांगांमध्ये वसलेला गुजरात राज्याचा सर्वात लहान व लोकप्रिय जिल्हा आहे.आणि हा जिल्हा एक हिल स्टेशन आहे. या जिल्ह्याचे अहवा हे जिल्हा मुख्यालय आहे. हा जिल्हा महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्याला लागून असल्याने इथे डांगी मराठी बोली भाषा बोलली जाते. Top 25 places to visit in Dang District

हा एक आदिवासी जिल्हा असून येथे 72 टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. इ.स. 1949 मध्ये या जिल्ह्याचे मुंबई राज्यात विलीनीकरण झाले आणि गुजरात राज्य निर्माण झाल्यावर हे त्यात समाविष्ट झाले.हा जिल्हा अत्यंत निसर्गरम्य,डोंगर दऱ्या आणि गर्द जंगलांनी परिपूर्ण आहे. तसेच येथील जंगलांमध्ये विविध प्रकारचे वृक्ष, पक्षी,सरपटणारे प्राणी आणि वन्यजीव प्राणी आढळून येतात. या ठिकाणी पर्वतीय प्रदेश असल्यामुळे बाजरी आणि भाताचे उत्पादन होते. डांग जिल्ह्यात तीन तालुके असून येथे अनेक नैसर्गिक, सांस्कृतिक, सामाजिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत.

Top 25 places to visit in Dang District

डांग जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे

1)Shabri Dham-

Top 25 places to visit in Dang District


शबरी धाम हे गुजरातच्या डांग जिल्ह्यात, सुबीर गावाजवळ एका टेकडीवर मोठ्या परिसरात बांधलेले एक पवित्र धार्मिक ठिकाण आहे. हे ठिकाण दंडकारण्यमध्ये,घनदाट जंगलात व निसर्गरम्य परिसरात आहे. याच ठिकाणी भगवान श्रीरामांनी शबरी मातेकडून बोर खाल्ले होते. शरदपौर्णिमेला शबरी मातेचा जन्म झाला होता त्यामुळे या दिवशी दरवर्षी शबरीधाम येथे मोठी यात्रा भरते.

आणि वसंत पंचमीच्या (माघ शु. 5) या शुभ दिनी प्रभु रामचंद्र शबरी मातेला या ठिकाणी भेटायला आले होते.शबरी धामच्या जवळ असलेल्या पम्पा सरोवरात शबरी मातेने स्नान केले होते असे मानले जाते. शबरी माता भगवान श्रीरामांची महान भक्त होती, आणि तिने तिच्या गुरूंच्या सल्ल्यानुसार अनेक वर्ष श्रीरामाची वाट पाहिली होती.सापुतारापासून हे ठिकाण 70 किलोमीटर अंतरावर आहे.

2) Waghai Botanical Garden-


वाघई बोटॅनिकल गार्डन हे गुजरातच्या डांग जिल्ह्यातील वाघई शहरात सापुताराजवळ हिल स्टेशन जवळ असलेले एक मोठे उद्यान आहे. ही बाग 24 हेक्टर परिसरात विस्तारलेली असून, या उद्यानातील जैव-विविधता संवर्धन केंद्रात, देशी आणि विदेशी 1400 पेक्षा जास्त वनस्पतींच्या विविध प्रजाती पाहायला मिळतात. या उद्यानाची स्थापना 1966 मध्ये झाली झाली आहे. व इथे ऑर्किड, बांबू, आणि कॅक्टसच्या विविध प्रजाती आहेत.

या वनस्पतींचा उपयोग अन्न आणि औषधांसाठी वापर कसा केला जातो, याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. या उद्यानातून वंसदा राष्ट्रीय उद्यानकडे पायवाट जाते. वाघई बोटॅनिकल गार्डन हे महत्वाचे वनस्पती उद्यान वनस्पतिशास्त्र आणि निसर्गाची आवड असणाऱ्यांसाठी एक उत्तम ठिकाण आहे.

3)Gira Waterfalls-


गिरा धबधबा हा गुजरात मधील डांग जिल्ह्यातील एक सुंदर,निसर्गरम्य व नयनरम्य धबधबा आहे.हा धबधबा अंबिका नदीत 30 मीटर उंचीवरून नैसर्गिकरित्या कोसळतो. धबधबा परिसर अत्यंत शांत व निसर्गरम्य ठिकाण आहे. आणि हा धबधबा म्हणजे डांग जिल्ह्यातील एक आश्चर्य व लपलेले रत्नच आहे. पावसाळ्यात या धबधब्याचे अद्भुत सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक आणि निसर्गप्रेमी मोठ्या प्रमाणात भेट देत असतात. वाघाई शहरापासून हा धबधबा तीन किलोमीटर अंतरावर आहे.

4)Pampa Sarovar-


पंपा सरोवर हे गुजरात मधील डांग जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थस्थान आहे. हे ठिकाण पर्णा नदीच्या किनारी, सुबीर ब्लॉकमध्ये वसलेले असून, येथील वातावरण निसर्गरम्य आणि शांत आहे.असे मानले जाते की प्रभू श्रीरामांनी वनवासाच्या प्रवासादरम्यान त्यांची खूप मोठी भक्त शबरीची येथे भेट घेतली होती. या ठिकाणी एक मोठे मंदिर आहे. शबरीधाम जवळ असलेले हे पंपा सरोवर एक सुंदर ठिकाण नाही, तर ते शबरी आणि श्री रामाच्या भेटीचे व धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व एक पवित्र स्थळही आहे.

Visit our website: allindiajourney.com

5)Don Hill Station-


डॉन हिल स्टेशन हे गुजरात मधील डांग जिल्ह्यात सापुताराच्या जवळ, सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले एक सुंदर, नयनरम्य हिल स्टेशन आहे. हे ठिकाण 1000 मीटर पेक्षा जास्त उंचीवर असून हे गुजरातचे दुसरे सुंदर हिल स्टेशन मानले जाते. येथे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक जैवविविधता आणि आदिवासी संस्कृती पाहायला मिळते. या गावाचे नाव गुरु द्रोणाचार्य यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे.

या ऐतिहासिक,वर्षभर थंड व अल्हाददायक वातावरण असलेल्या ठिकाणी द्रोणाचार्य डोंगर आणि पांडव गावाजवळ गुहा आणि धबधबे ही पर्यटन स्थळे आहेत. तसेच येथे व्हल्चर पॉइंट (गिधाड )हे एक उल्लेखनीय ठिकाण आहे. व येथून जवळच महाराष्ट्रातील साल्हेर किल्ला आहे.

6)Purna Wildlife Sanctuary-


पूर्णा वन्यजीव अभयारण्य हे गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यामध्ये अहवा येथे वसलेले एक महत्त्वाचे वन्यजीव अभयारण्य आहे.1990 मध्ये हे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. या अभयारण्यातून पूर्णा नदी वाहत असल्याने त्याचे हे नाव पडले आहे. या अभयारण्यास वनस्पती आणि झाडांच्या सुमारे 700 प्रजाती असून हे साग आणि बांबूचे घनदाट जंगल आहे. तसेच येथे भुंकणारा

हरण , सांबर , चितळ बिबट्या , रीसस मकाक , मुंगूस , भारतीय सिव्हेट मांजर , भारतीय साळू , काळवीट , भुंकणारा हरण , सांबर , चितळ , तरस आणि जंगली मांजर हे वन्यजीव प्राणी आढळतात. याशिवाय येथे राखाडी हॉर्नबिल, बार्बेट्स , सुतार पक्षी, श्राइक्स , लीफबर्ड्स , यासारख्या 139 प्रजातीच्या पक्षांची नोंद 2003 मध्ये झाली आहे. हे जंगल भिल्ल, वारली, डबडा या आदिवासी समाजाचे घर आहे.

7)Pandava Gufa-


पांडव गुफा हे गुजरातमधील डांग जिल्ह्यातील सापुतारा या निसर्गरम्य हिल स्टेशन जवळ असलेले एक महत्त्वाचे ऐतिहासिक आणि पौराणिक स्थळ आहे. या गुहा घनदाट जंगलात आणि खडकाळ भूप्रदेशात वसलेल्या आहेत, व या ठिकाणी पांडवांनी त्यांच्या वनवासाचा काळ येथे घालवला होता असे मानले जाते. या गुहेजवळ एक सुंदर व नयनरम्य धबधबा व गुफांमध्ये विविध चेंबर्स आहेत.

या गुहा अरवलेम गुहा या नावानेही ओळखल्या जातात. ट्रेकर्स आणि निसर्ग प्रेमींना गुफाच्या प्रवासात या प्रदेशातील समृद्ध वनस्पती आणि प्राणी पाहता येतात. तसेच येथील गुफेत एक शिविलंग असून , त्याची पांडवांनी पूजा केली होती, असे मानले जाते.

8)Vansda National Park-


वांसदा राष्ट्रीय उद्यान हे गुजरातमधील डांग जिल्ह्यातीलअंबिका नदीच्या काठावर वसलेले, घनदाट जंगलांचे एक संरक्षित क्षेत्र आहे. 24 किमी क्षेत्रफळ असलेले हे उद्यान 1979 मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून स्थापित झाले. निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक आदर्श ठिकाण असून,येथे तुम्हाला विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि अनेक प्रजातींची झाडे व औषधी वनस्पती पाहायला मिळतात.

तसेच या राष्ट्रीय उद्यानात बिबट्या,भुंकणारे हरण, जंगली मांजर, रानडुक्कर, ढोले, रीसस मकाक, पॅंगोलिन, रसेल साप आणि क्रेट्स हे प्राणी आढळतात.वांसदा राष्ट्रीय उद्यान हे नाव वांसदा शहरावरून पडले आहे. या ठिकाणी आदिवासी लोकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. हे राष्ट्रीय उद्यान एक संरक्षित क्षेत्र असून ते डांग आणि दक्षिण गुजरातच्या घनदाट जंगलांचा भाग आहे.

9)Saputara Lake-


सापुतारा तलाव हा गुजरातमधील डांग जिल्ह्यातील सापुतारा खोऱ्यातील एक मानवनिर्मित तलाव आहे. हा तलाव हिरव्यागार झाडी आणि डोंगरांनी वेढलेले आहे, व येथे तुम्ही बोटींगचा आनंद घेऊ शकता. या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळण्याची उद्याने अनेक बोटिंग क्लब तुम्हाला रोबोट्स, सायकलिंग,पॅडल आणि सेलबोट्ससह उपलब्ध आहेत.

आणि येथील तलावाच्या काठावर पर्यटकांसाठी भरपूर फूड झोन उपलब्ध आहेत. तसेच येथे सनराईज आणि सनसेट पॉइंट ही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. हा तलाव परिसर हिरवीगार झाडे,बाग,डोंगर आणि शांत व सुंदर वातावरणाने परिपूर्ण आहे.

10)Girmal Waterfalls-


गिरमल धबधबा हा गुजरात मधील डांग जिल्ह्यात निसर्गरम्य परिसरात व घनदाट जंगलात असलेला नयनरम्या,सुंदर धबधबा आहे. गुजरात मधील पूर्णा अभयारण्यात असलेला हा धबधबा सर्वात उंच असून तो 100 फूट पेक्षा जास्त उंचीवरून कोसळतो. या धबधब्या परिसरात घनदाट जंगल,भरपूर हिरवळ आणि चित्तथरारक दृश्ये आहेत.

पावसाळ्यात तर या धबधब्याचे सौंदर्य अत्यंत विलोभनीय असते. फॉरेस्ट डिपार्टमेंटने या ठिकाणी पर्यटकांसाठी काही सुविधा दिलेल्या आहेत.अहवा शहरापासून हा धबधबा 50 किलोमीटर अंतरावर आहे.

11)Sunset point-


सनसेट पॉइंट हे डांग जिल्ह्यातील सापुतारा हिल स्टेशनमध्ये असलेले एक सुंदर नयनरम्य ठिकाण आहे. सापुतारा हिल मधील ‘सनसेट पॉइंट’ हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे, ही जागा उंचावर असल्याने येथे पायी चालत जावे लागते परंतु सध्या टेबल पॉईंटवरून रोप-वे ची सुविधा आहे. या पॉईंटवरून दिसणारा निसर्गाचा नयनरम्य नजारा अतिशय सुंदर व मनमोहीत करणारा आहे.पर्यटक येथे सूर्यास्त पाहण्यासाठी येतात. इथून तलाव, शहर आणि सूर्य मावळतानाचे विहंगम दृश्य दिसते. मुलांसाठी येथे आरसी कार आणि घोड्यावर बसण्याच्या सुविधा आहेत.

12)Rose Garden-


रोज गार्डन हे गुजरातमधील डांग जिल्ह्यातील सापुतारा या नयनरम्य हिल स्टेशनमध्ये वसलेले,विविध रंगांचे, आकारांचे आणि प्रजातींचे गुलाब पाहण्यासाठी एक सुंदर ठिकाण आहे. वसंत ऋतूमध्ये येथे विविध प्रजातीचे गुलाब व मोठ्या प्रमाणात फुललेले असतात.हे उद्यान सापुतारा म्युझियमजवळ असल्यामुळे पर्यटकांची येथे नेहमी गर्दी असते.

सापुतारा येथील गुलाब बाग ही केवळ एक बाग नाही तर त्याच्या आकर्षक रंगांचा आणि सुगंधांचा एक संग्रह आहे. हे रोज गार्डन 20 व्या शतकाच्या उत्तरार्धात पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले आहे.

13)Saputara Tribal Museum-


सापुतारा आदिवासी संग्रहालय हे गुजरातमधील डांग जिल्ह्यात असलेले आदिवासी जीवन, संस्कृती आणि वारसा दर्शवणारे एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र आहे.या संग्रहालयाची स्थापना 1970 मध्ये झाली असून येथे, भिल्ल, कुणबी आणि वारली यांसारख्या विविध आदिवासी समाजाचे जीवन, वेशभूषा, कलाकुसर आणि पारंपरिक वस्तू जतन केलेले आहेत. आणि येथे पारंपरिक दागिने, मुखवटे, बांबू आणि मातीच्या वस्तू, शिकारीची साधने,

संगीत वाद्ये, स्थानिक चित्रे, आणि मातीच्या वस्तूंचा संग्रह आहे, तसेच या ठिकाणी आदिवासींनी बनवलेल्या हस्तकला आहेत, त्यामध्ये लाकूडकाम, मातीची भांडी आणि दागिने. पारंपरिक वेशभूषा व घास-दगडांचे दागिने आहेत.सापुतारा संग्रहालय सुरत नाशिक महामार्गावर असून येथे आदिवासी समुदायांची वस्ती असलेली 300 पेक्षा जास्त गावे आहेत.

14)Saputara Hill Station-


सापुतारा हिल स्टेशन हे गुजरातच्या डांग जिल्ह्यातील एक सुंदर हिल स्टेशन आहे. सापुतारा हे गुजरात मधील एकमेव हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी हिरवीगार जंगले आणि मनमोहक धबधबे, सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्त व सतत आल्हाददायक हवामान आहे.
समुद्रसपाटीपासून हे ठिकाण सह्याद्री पर्वतरांगेत सुमारे 1000 मीटर उंचीवर आहे.

व डांग वनक्षेत्रातील एका पठारावर वसलेले आहे. तसेच येथून सर्पगंगा नदी वाहत असल्यामुळे येथील परिसर अत्यंत निसर्गरम्य व वनश्रीने बहरलेला आहे. येथील परिसरात सापुतारा तलाव, सनसेट पॉइंट, गिरा धबधबे आणि वांसदा राष्ट्रीय उद्यान ही निसर्गरम्य स्थळे आहेत.

15)Mahal Eco Campsite-


महाल इको कॅम्पसाईट हे गुजरातच्या डांग जिल्ह्यातील पूर्णा वन्यजीव अभयारण्याच्या मध्यभागी व पूर्णा नदीच्या काठावर वसलेले एक इको-टुरिझम स्थळ आहे. येथे पूर्णा आणि गिरा नद्यांनी वेढलेले विस्तीर्ण आणि समृद्ध जंगल आहे. या ठिकाणी वनविभागाद्वारे व्यवस्थापित केलेली झाडांवरची घरे, तंबू आणि झोपड्यांची सोय उपलब्ध आहे.

याशिवाय येथे डॉन हिल्स, पक्षी निरीक्षण, बोटिंग आणि केबल कार,नदी आणि बांबूचे नयनरम्य देखावे पाहायला मिळतात.वन विभागाने हे ठिकाण संरक्षित वन म्हणून घोषित केले असून पर्यटक येथील झाडांवर असलेल्या आश्चर्यकारक घरामध्ये राहू शकतात.

16)Dang Darbar Hall-


डांग दरबार हा गुजरातच्या डांग जिल्ह्यातील एक प्रमुख व ऐतिहासिक महत्त्व असलेला आदिवासी उत्सव आहे. हा मेळा दरवर्षी गुजरातमधील आहवा येथे होळीच्या आधी साजरा केला जातो. या मेळ्यात आदिवासींच्या जीवनशैलीचे आणि सांस्कृतिक जीवनाचे दर्शन घडते. दरबाराच्या काळात सुमारे 300 आदिवासी गावे येथील आहवा येथे एकत्र जमतात व येथील पाच राजांचा मान राखतात.

डांग दरबार हा तीन दिवसांचा सांस्कृतिक महोत्सव असून या उत्सवात संगीत आणि नृत्यप्रदर्शन तसेच जादूचे कार्यक्रम, डायऱा आणि कराओके हे कार्यक्रम केले जातात.या उत्सवाला ‘वेशभूषांचा उत्सव’ असेही म्हटले जाते. डांग दरबाराच्या दिवशी, आदिवासी नाग देवतेची ( सापांची ) पूजा गंगेवर जाऊन करतात. या मेळ्यात देश-विदेशातील पर्यटक आदिवासी संस्कृतीचा आनंद घेण्यासाठी येतात.

17)Nageshwar Mahadev Temple –


नागेश्वर महादेव मंदिर हे गुजरातमधील डांग जिल्ह्यात सापुतारा या निसर्गरम्य हिल स्टेशनमध्ये भगवान शिवाचे एक शांत मंदिर आहे. या मंदिराची वास्तुकला अत्यंत सुंदर आहे. व येथील मंदिर परिसर हिरवळने वेढलेला व निसर्गरम्य आहे. हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे पर्यटक या ठिकाणी शांततेचा अनुभव घेण्यासाठी येत असतात. येथील परिसरात उंच डोंगर, विस्तीर्ण बागा आणि शांत तलाव यांनी समृद्ध आहे. त्यामुळे हे ठिकाण पर्यटकांचे हे आकर्षणाचे केंद्र आहे.

18)Maya Devi Temple-


माया देवी गुंफा आणि मंदिर हे गुजरातच्या डांग जिल्ह्यात वसलेले एक अद्वितीय, ऐतिहासिक आणि आकर्षक ठिकाण आहे.हे मंदिर देवी पार्वती यांचे माया देवी म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर पावसाळ्यात पुरणा नदीच्या पाणीपातळीमुळे पाण्याखाली जाते. त्यामुळे पर्यटक या ठिकाणाला पाणी ओसरल्यानंतर म्हणजे ऑक्टोबर ते मे महिन्यात भेट देतात.

येथील मंदिर परिसर निसर्गरम्य, हिरवेगार जंगल,पुरणा नदी व दाट जंगलासह समृद्ध आहे. शिवपुराणात या मंदिराचा उल्लेख आहे. आदिवासी लोक मोठ्या भक्ती भावाने या मंदिरात माया देवीची पूजा करतात.

19)Padam Dungari-


पदम डूंगरी हे गुजरातमधील डांग जिल्ह्यातील वघई येथे व सह्याद्री पर्वतरांगेच्या जंगलांमध्ये वसलेले एक सुंदर इको-टुरिझम स्थळ आहे. हे ठिकाण अंबिका नदीच्या काठावर असून डांग जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथील परिसर वनराईने नटलेले घनदाट जंगल, धबधबे,पक्षी, प्राणी आणि निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. पदम डूंगरी हे महत्वाचे इको-टुरिझम स्थळ आहे व निसर्गाची अप्रतिम सुंदरता अनुभवण्यासाठी एक अप्रतिम ठिकाण आहे.

20)Anjan Kund-


अंजनी कुंड केव्हा अंजनी पर्वत हे गुजरातमधील डांग जिल्ह्यातील अहवापासून 35 किमी अंतरावर असलेले एक लहान गाव आहे. हे ठिकाण भगवान हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते. व या पर्वतावर माता अंजनींनी तपश्चर्या केली आणि गुहेत हनुमानाला जन्म दिला, अशी अख्यायिका सांगितली जाते. या ठिकाणी भगवान हनुमानाचे पवित्र मंदिर आहे.

हे असे एकमेव मंदिर आहे जिथे बाल हनुमानाची पूजा केली जाते. तसेच येथे अंजनी कुंड, अंजनी गुंफा, आणि अंजनी धबधबा हे मुख्य आकर्षणाची ठिकाणे आहेत. भगवान हनुमानाचे आई अंजनीच्या नावावरून या ठिकाणाला अंजनी पर्वत हे नाव पडले आहे.

21)Table Point –


टेबल पॉईंट हे गुजरात मधील डांग जिल्ह्यातील सापुतारा हिल स्टेशन येथील गव्हर्नर’स हिल वर वसलेले एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.या ठिकाणी पर्यटकांना निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेता येतो, तसेच येथे सनसेट पॉईंट आहे आणि रोप वे यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. पर्यटक येथे हॉर्स रायडिंग, जिप लाईन, झॉर्बिंग, कॅमल रायडिंग, फोटोशूट आणि इतर अनेक मनोरंजक गोष्टींचा आनंद घेऊ शकतात. समुद्रसपाटीपासून हे ठिकाण 1000 मीटर उंचीवर आहे व येथून आसपासच्या डोंगररांगा आणि दाट जंगलांचे विहंगम दृश्य दिसते.

22)Honey Bees Centre-


हनी बीज सेंटर, हे गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यातील सापूतारा हिल स्टेशन मध्ये वसलेले एक आकर्षक पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी पर्यटकांना मधमाश्यांचे महत्त्व आणि मध निर्मिती प्रक्रियेबद्दल माहिती दिली जाते. तसेच या केंद्रात मधमाश्या रस गोळा करणे, पोळे बांधणे आणि मध काढणे याची प्रक्रिया जवळून पाहण्याची संधी मिळते.

व प्रत्यक्ष मधमाशी पालन व मध संकलनाचे प्रात्यक्षिक दाखवले जाते, त्यामुळे आपल्याला पर्यावरणात मधमाश्यांचे योगदान किती महत्त्वाचे आहे हे समजते.हे हनी बीज सेंटर एक शैक्षणिक व्यासपीठ व किरकोळ विक्री केंद्र असल्यामुळे पर्यटक येथे शुद्ध व नैसर्गिक मध घेऊ शकतात.

23)Artist village-


आर्टिस्ट व्हिलेज हे गुजरात मधील डांग जिल्ह्यामध्ये, सापुतारा हिल स्टेशनमध्ये असलेले हे आदिवासी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी एक केंद्र आहे. या गावात भूमिया, वारली आणि कुणबी या आदिवासी जमातींच्या कलेचे प्रदर्शन पाहायला मिळते. या ठिकाणी तुम्ही आदिवासी कलाकारांनी बांबूपासून बनवलेल्या वस्तू, मातीच्या मूर्ती, पेंटिंग्ज आणि इतर हस्तनिर्मित वस्तू पाहू आणि खरेदी करू शकता.

आणि येथे बांबूचे दागिने, की-चेन, लाकडी खेळणी, मातीची भांडी, पेंटिंग्ज व विविध वस्तू उपलब्ध आहेत. याशिवाय तुम्ही येथील कारागिरांकडून विविध कला शिकण्यासाठी कार्यशाळांमध्ये भाग घेऊ शकता. व येथील संस्कृती, जीवनशैली आणि परंपरा जवळून अनुभवू शकता.

24)Koshmal Waterfalls –


कोशमाळ धबधबा हा गुजरात मधील डांग जिल्ह्यातील मंडोवी नदीवरील निसर्गरम्य परिसरात असलेल्या सर्वोत्तम धबधब्यांपैकी एक आहे. हा धबधबा 310 मीटर उंचीवरून कोसळतो. आणि हा धबधबा कोसळताना दुधाचा समुद्र वाहत असल्याचा भास होतो.पावसाळ्यात तर या धबधब्याचे सौंदर्य अत्यंत विलोभनीय असते. येथील परिसर निसर्गरम्य व हिरवळीने नटलेला आहे. निसर्ग प्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

25)Rupgadh Fort-


रूपगड किल्ला हा गुजरातमधील डांग जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. पूर्वी हा किल्ला भिल्ल राजांचा ताब्यात होता परंतु नंतर गायकवाडांनी ताब्यात घेतला. 17 व्या शतकातील हा किल्ला डांगी पर्वतीय वास्तुकलेचे एक उत्तम उदाहरण आहे. 1721 मध्ये पिलाजीराव गायकवाड यांनी हा किल्ला बांधला आणि सोनगडला त्यांच्या राज्याची राजधानी बनवली.

समुद्रसपाटीपासून हा किल्ला 1670 फूट उंचीवर असून या किल्ल्यात पाणी साठवण्याची सुविधा आणि दारूगोळा आणि अन्न साठवण्याची जागा आहे. तसेच या किल्ल्याच्या उत्तरेला पाण्याचा झरा व हनुमानाचे छोटे मंदिर आहे.

Visit the travel blog

1) डांग जिल्ह्यातील भगवान राम शबरीला पहिल्यांदा भेटले त्या ठिकाणाचे नाव काय होते?

डांग जिल्ह्यातील भगवान राम शबरीला पहिल्यांदा भेटले त्या ठिकाणाचे नाव शबरीधाम आणि पंपा सरोवर होते.


2) गुजरातच्या डांग जिल्ह्यातील डांग दरबार उत्सव कधी साजरा केला जातो ?

गुजरातच्या डांग जिल्ह्यातील डांग दरबार उत्सव दरवर्षी होळी पौर्णिमेच्या आधी साजरा केला जातो.

3)डांग जिल्ह्यातील महाल इको कॅम्पसाईट हे कोणत्या ठिकाणी आहे ?

डांग जिल्ह्यातील महाल इको कॅम्पसाईट हे पूर्णा वन्यजीव अभयारण्याच्या मध्यभागी व पूर्णा नदीच्या काठावर आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top