साबरकांठा जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-Top 23 places to visit in Sabarkantha District

मित्रांनो भारत भ्रमंतीमध्ये आपण भारत देशातील प्रत्येक राज्यातील, प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे पाहत आहोत. आता आपण पाहणार आहोत साबरकांठा जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे,साबरकांठा जिल्हा हा गुजरात राज्यातील एक निसर्गसंपन्न जिल्हा आहे. या जिल्ह्याचे मुख्यालय हिम्मतनगर येथे असून या जिल्ह्याला राजस्थान, पश्चिमेस बनासकांठा,महेसाणा जिल्हा तर दक्षिणेस खेडा या जिल्ह्यांच्या सीमा लाभल्या आहेत. साबरकांठा जिल्ह्याची स्थापना 1949 मध्ये झाली. या जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत.Top 23 places to visit in Sabarkantha District

या जिल्ह्यातील ‘इडर’ हे ऐतिहासिक ठिकाण पूर्वी ‘इल्वादुर्ग’ नावाने ओळखले जात होते. या जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आदिवासी कला आणि उद्योगधंदे पाहायला मिळतात. हा जिल्हा घनदाट जंगल आणि गर्द हिरव्या डोंगरांनी वेढलेला असून निसर्गरम्य आहे. या जिल्ह्याचा शेती हा एक आर्थिक कणा असून शेती उत्पादनामध्ये या जिल्ह्यात गहू, कापूस, डाळी आणि भुईमूग ही पिके घेतली जातात व या जिल्ह्यातील काही भाग भात शेतीवर अवलंबून आहे.

तसेच येथे शेतीशी निगडित दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, आणि अन्न प्रक्रिया उद्योग केले जातात. याशिवाय या जिल्ह्यात टेक्सटाईल पार्क आहे, जिथे वस्त्रोद्योग संबंधित उद्योग आहेत. तसेच या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धार्मिक, नैसर्गिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटन स्थळे आहेत.

Top 23 places to visit in Sabarkantha District

साबरकांठा जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे

1) Shree Ambika Mataji Mandir, Khedbrahma –

Top 23 places to visit in Sabarkantha District


श्री अंबिका माताजी मंदिर हे गुजरात राज्यातील साबरकांठा जिल्ह्यात खेडब्रह्मा येथील चाचरचौक या ठिकाणी असलेले पवित्र व जागृत धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी अंबिका मातेची मोरावर विराजमान मूर्ती असून येथे सोमवारी पार्वती, मंगळवारी काली, बुधवारी सरस्वती, गुरुवारी महालक्ष्मी, शुक्रवारी वैष्णवी आणि शनिवारी चामुंडा अशा मातेच्या वेगवेगळ्या स्वरूपात पूजा केली जाते.खेडब्रह्मा हा तालुका अरवली पर्वतरांगेच्या सानिध्यात असल्यामुळे ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे.

अंबिका माता ही देवी शक्तीची अवतार आहे व ही माता भक्तांना विशेष शक्ती आणि आशीर्वाद देणारी मानली जाते. येथील मंदिर परिसर शांत व सुंदर आहे.नवरात्रात मोठ्या प्रमाणावर या मंदिरात उत्सव साजरे केले जातात, त्यामध्ये घटस्थापना, गरबा, जागरण व देवीची पूजा होते. त्यावेळी हजारो भाविक येथे दर्शनाला येतात.

2)Shri Sharneshwar Mahadev Mandir-


श्री शरणेश्वर महादेव मंदिर हे गुजरात राज्यातील साबरकांठा जिल्ह्यातील आभापूर गावाजवळ पोलो फॉरेस्टच्या प्रवेशद्वारावर असलेले एक सुंदर महादेव मंदिर आहे. हे मंदिर पंधरावे शतकात बांधले असल्याचे सांगितले जाते.या मंदिराचा काही भाग जीर्णअवस्थेत असून बाहेरील भिंती, शिखर आणि मंडप चांगल्या आहेत. येथील मंदिराच्या भिंतीवरील कोरीव काम उत्तम स्थापत्य शैलीचा नमुना आहे.

शरणेश्वर मंदिर हे पोलो फॉरेस्टच्या जंगलातील एक आश्चर्यकारक शिवमंदिर आहे व हे मंदिर शिव पंचायतन म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी नृत्य करणारे गणपती व कामुक मूर्ती कोरलेल्या आहेत. आजही या मंदिरात पूजा विधी केले जातात.इडरपासून हे मंदिर 44 किलोमीटर अंतरावर आहे.

Visit our website: allindiajourney.com

3)Bhrigu Rishi Ashram & Shivalay-


भृगु ऋषी आश्रम आणि शिवालय हे गुजरात राज्यातीलसाबरकांठा जिल्ह्यातील खेडब्रह्म स्थित एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर अत्यंत पौराणिक असून हे मंदिर हरिणव, भिमानी आणि कौशाम्बी या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमाजवळ आहे. या मंदिराच्या मुख्य गर्भगृहाच्या मागे 12 शिवलिंग असलेली 12 ज्योतिर्लिंग स्थापित केलेली आहेत.

या ठिकाणी ब्रह्मदेवाचे पुत्र ऋषी भृगु यांनी तपश्चर्या केल्याची आख्यायिका सांगितली जाते. श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते त्यावेळी हजारो भाविक उपस्थित राहतात.साबरकांठा जिल्ह्यापासून हे मंदिर 55 किलोमीटर अंतरावर आहे.

4)Bholeshwar Mahadev Mandir-


भोलेश्वर महादेव मंदीर हे गुजरात राज्यातील साबरकांठा जिल्ह्यातील हिमतनगर या ठिकाणी हाथमती नदीच्या काठावर भोलेश्वर महादेवाचे स्वयंभू शिवलिंग असलेले मंदिर आहे. हे मंदिर 10 एकर क्षेत्रात पसरलेले असून या मंदिराचे शिखर व मंडप विशिष्ट दगडात बांधले आहे. तसेच येथील मंडप आणि प्रांगणातील नक्षीकाम, गुंतागुंतीचे स्तंभ आणि सजावट वैविध्यपूर्ण पद्धतीने केलेली आहे. महाशिवरात्रीला या ठिकाणी भाविकांची मोठी प्रमाणात गर्दी होते.

5)Ruthi Rani Mahal-


रुठी राणी महाल हा गुजरात राज्यातील साबरकांठा जिल्ह्यातील इदर या ठिकाणी असलेले एक ऐतिहासिक ठिकाण आहे.रुठी राणी महाल, याला ‘इडर’ किंवा ‘इडरचा किल्ला’ म्हणूनही ओळखले जाते. या किल्ल्याला ‘रुठी राणी’ म्हणजे नाराज राणी हे नाव अशामुळे पडले की येथील राजा भोगाजींच्या पत्नीने आपल्या पतीसोबत झालेल्या भांडणानंतर इथे एकाकी जीवन व्यतीत केले होते.

हा महाल पंधराव्या शतकात राठोड राजघराण्याचे शासक राव भोगाजी यांनी बांधला. या महालात दरवाजा, प्रशस्त दालनं, आणि सुंदर नक्षीकाम केलेले बांधकाम आहे. व येथील किल्ल्यावरून परिसराचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.रुठी राणी महाल हे साबरकांठा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक व महत्त्वाचे ठिकाण आहे.

6) Roda Group of Temples-


रोडा ग्रुप ऑफ टेंपल्स हे गुजरात राज्यातील साबरकांठा जिल्ह्यातील हिम्मतनगर,रायसिंगपुरा आणि खेड चांदराणी गावांच्या दरम्यान असलेली धार्मिक स्थळ आहेत. येथे सात मंदिरांचा समूह आहे. ही मंदिरे राष्ट्रकूट काळात आठव्या-नवव्या शतकात बांधलेली असून हातमती नदीपासून एक किलोमीटर अंतरावर आहेत. आणि त्यामध्ये एक जलाशय आणि एक पायरी विहीर समाविष्ट आहे.

या ठिकाणी शिव मंदिर, पक्षी मंदिर,विष्णू मंदिर, नवग्रहांचे मंदिर,गणेश मंदिर आणि काही उध्वस्त झालेली मंदिरे आहेत. या ठिकाणी मिळालेली शिल्पे सध्या वडोदरा येथील संग्रहालय आणि चित्र गॅलरीमध्ये ठेवण्यात आली आहेत. हिम्मतनगरपासून हे ठिकाण 18 किलोमीटर अंतरावर आहे.

7)Dowlat Villas Palace-


दौलत व्हिला पॅलेस हा गुजरात राज्यातील साबरकांठा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक ठिकाण आहे. हा पॅलेस शंभर वर्ष जुना असून 1920 मध्ये महाराज दौलत सिंहजी यांचे दुसरे पुत्र महाराज मानसिंगजी यांनी राजपूत वास्तुकलेमध्ये हा पॅलेस बांधला आहे. या पॅलेसचा काही भाग हेरिटेज होमस्टेमध्ये रूपांतरित केला आहे. या पॅलेसचे वैशिष्ट्य म्हणजे हा पॅलेस विंचूच्या आकाराचा एक अद्वितीय किल्लेवजा राजवाडा आहे ज्यामध्ये विंचवाचे डोके, शरीर, नखे आणि डंक पाहायला मिळतो.

आणि आतील भागात फर्निचर, कलाकृती व चित्रे आहेत. तर बाहेरील भागात गॅलरी, प्रचंड मोठे खांब, मॅनिक्युअर केलेले लॉन, पार्किंग आणि खेळांसाठी मैदाने आहेत. व इतर खोल्यांमध्ये सर्व आधुनिक सुविधांसह प्राचीन फर्निचर आहे. तसेच मनोरंजन कक्ष, स्विमिंग पूल, हंगामी सेंद्रिय स्वयंपाकघर बाग, इडर-रत्न आंबा ऑर्किड, एक पेन इत्यादींचा समावेश आहे. हिम्मतनगर पासून हे ठिकाण 20 किलोमीटर अंतरावर आहे.

8)Tirupati Rushivan, Sabarkantha


तिरुपती रुशीवन अ‍ॅडव्हेंचर पार्क हे गुजरात राज्यातील साबरकांठा जिल्ह्यातील साबरमती नदीच्या काठी हिम्मतनगर मध्ये असलेले पर्यावरणपूरक पर्यटनस्थळ आहे. हे पार्क 100 एकर मध्ये पसरलेले असून या ठिकाणी अनेक थरारक राईड्स, वन्यजीवांचा शोध, सांस्कृतिक अनुभव, उच्च-उत्साही क्रिया, आल्हाददायक बागा,यांचा अद्वितीय संगम पाहायला मिळतो.

तसेच येथील आकर्षणांमध्ये प्रसिद्ध वास्तूंच्या लघुप्रतीकृती, घसरगुंडी आणि जलतळ्यांनी सजलेले मजेदार जलपार्क, मॉन्स्टर कार, वंडर कार, वंडर व्हील आणि फ्लाइंग फॉक्स सारख्या साहसी राइड्स समाविष्ट आहेत. तसेच या ठिकाणी राहण्याच्या सुविधा आणि हॉटेल्स उपलब्ध आहेत.

9)Darbargadh Poshina-


दरबारगढ हा गुजरात राज्यातील साबरकांठा जिल्ह्यातील पोशीना गावाच्या कडेला असलेला एक पारंपारिक, ऐतिहासिक व सुंदर पॅलेस आहे. सध्या या पॅलेसचे हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. या पॅलेसचे राजघराण्याचे मालक ‘हनू’ यांच्या देखरेखी खाली येथील कामकाज पाहिले जाते. या राजवाड्यात अनेक द्वार, मोठी आंगणे, सुंदर स्तंभ व अरावली पर्वताचे दृश्य असलेल्या गॅलऱ्या व छत आहेत. तसेच येथे प्राचीन तटबंदीच्या भिंती आणि तुरुंग आजही पाहायला मिळतात.

तसेच आजूबाजूच्या आदिवासी गावे जैन मंदिरे पाहिला भेटतात. हे भव्य हेरिटेज हॉटेल पांढऱ्या संगमरवरामध्ये बांधलेले असून राजेशाही वस्तूंनी आणि चित्रांनी सजलेले आहे.या ठिकाणी पाहुण्यांसाठी 25 प्रशस्त खोल्या,लॉन्ड्री सेवा, डॉक्टर, भारतीय व विदेशी खाद्यपदार्थ, 24 तास रूम सर्व्हिस, स्विमिंग पूल, ट्रायबल विलेज सफारी, फॅक्स, इंटरनेट, कार,हस्तकला दुकान, कॅमल राईड्स इ. सुविधा आहेत.

10)Polo Forest-


पोलो फॉरेस्ट हे गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातील, विजय नगर तालुक्यातील आभापूर गावाजवळील एक मनमोहक जंगल आहे. हे जंगल अरावली पर्वताच्या पायथ्याशी असून हरनव नदीच्या काठावर वसलेले आहे. हे जंगल 400 चौरस किलोमीटर (99,000 ) एकर क्षेत्रात विस्तारलेले असून या जंगलाला विजयनगर वन असेही म्हणतात.पोलो वन हे उष्णकटिबंधीय कोरड्या पानगळीच्या प्रकारातले जंगल आहे व या ठिकाणी एक तलाव आहे.

या जंगलात 450पेक्षा अधिक औषधी वनस्पतींच्या प्रजाती,सस्तन प्राण्यांच्या 30 प्रजाती,माशांच्या आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजाती आढळून आल्या आहेत. तसेच विविध प्रकारची झाडे, गवत, बांबू हे झाडे पाहायला मिळतात तसेच येथे अस्वल, बिबट्या, पँथर, लांडगा, जलपक्षी, सिव्हेट मांजर, वन्य मांजरी,शिकारी पक्षी, पैसेरीन, चार शिंगांचा हरिण आणि उडणाऱ्या खार हे वन्यजीव प्राणी आढळतात.

11)Idar Fort-


इडर किल्ला हा गुजरात राज्यातील साबरकांठा जिल्ह्यातील निसर्गरम्य अरावली पर्वत रांगेत असलेला एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचा किल्ला आहे. हा किल्ला इल्वा दुर्गा म्हणूनही ओळखला जातो. मध्ययुगीन काळात हा किल्ला भिल्ल राजाने बांधला होता. या किल्ल्यावर अनेक युद्ध व लढाया झाले आहेत,व पूर्वी हा किल्ला एक मोठी रियासत होता.

या किल्ल्याचा उल्लेख महाभारतात देखील आहे. या किल्ला परिसरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. ट्रेकिंग प्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी हा किल्ला म्हणजे एक अद्भुत ठिकाण आहे. विजयनगरपासून हा किल्ला 38 किलोमीटर अंतरावर आहे.

12) Brahma Temple, Khedbrahma-


ब्रह्मा मंदिर हे गुजरात राज्यातील साबरकांठा जिल्ह्यातील खेडब्रह्मा या ठिकाणी असलेले अत्यंत धार्मिक मंदिर आहे. भारतातील काही मोजक्याच ब्रह्मा मंदिरापैकी हे एक मंदिर आहे. हे मंदिर खेडब्रह्मा शहराच्या मध्यभागी असून हरनाव नदीच्या काठावर आहे. या मंदिराची स्थापत्य कला मारू-गुर्जरा शैलीत असून हे मंदिर अकराव्या शतकात बांधल्याचे सांगितले जाते.

या मंदिरात ब्रह्माजींची 1.8 मीटर उंच, चार-मुखी आणि चार-हातांची मूर्ती आहे.व मूर्तीच्या दोन्ही बाजूंना हंस आहेत.साबरकांठा जिल्ह्यातील हे अत्यंत पवित्र धार्मिक स्थळ आहे, जिथे ब्रह्माची पूजा केली जाते.

13)Sapteshwar Mahadev Temple-


सप्तेश्वर महादेव मंदिर हे गुजरात राज्यातील साबरकांठा जिल्ह्यातील हिम्मतनगर जवळ सुंदर अरावली पर्वतांनी वेढलेल्या ठिकाणी असलेले भगवान शिवाचे अत्यंत प्राचीन आणि पूजनीय मंदिर आहे. हे मंदिर सप्तेश्वर नदी/साबरमती नदीजवळ असून या मंदिराला सप्तनाथ महादेव असेही म्हणतात. हे मंदिर आठव्या ते नवव्या शतकात बांधते असून या मंदिराचे नाव सात महान ऋषी (सप्तऋषी) यांच्या नावावरून पडले आहे.

त्यामुळे या मंदिराला सप्तेश्वर महादेव, सप्तऋषींचे देवता म्हणूनही ओळखले जाते. जन्माष्टमी आणि महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो त्यावेळी हजारोच्या संख्येने भावीक उपस्थित राहतात.

14)Brahma Vav(stepwell)-


ब्रह्मा वाव मी गुजरात राज्यातील साबरकांठा जिल्ह्यातील खेडब्रह्मा या ठिकाणी ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्वाची असलेली प्राचीन व पायऱ्यांची विहीर आहे. ही विहीर येथे असलेल्या ब्रह्मा मंदिरासमोर असून ती 14 व्या शतकात बांधल्याची सांगितले जाते. तसेच ही विहीर ‘ब्रह्मा का कुवा’ म्हणूनही ओळखली जाते.

या विहिरीचे बांधकाम उत्कृष्ट कोरीवकाम आणि कलाकुसरीने केलेले आहे.जे त्यावेळच्या स्थापत्यशास्त्राचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. या विहिरीमध्ये मूर्ती नसलेले 27 कोणाकडे आहेत. पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात भेट देतात.

15) Shri 1008 Shantinath Digamber Jain Mandir, Prantij-


श्री 1008 शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर हे गुजरात राज्यातील साबरकांठा जिल्ह्यातील प्रांतिज या ठिकाणी असलेले धार्मिक व अति-प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर 1000 वर्षांपूर्वीची असून या मंदिरातील सर्व मूर्ती या खुदाईद्वारे शोधून काढण्यात आल्या आहेत, त्यामुळे या मंदिराचे ऐतिहासिक, धार्मिक आणि पुरातन महत्व खूप आहे.

16)Tower, Idar-


इडर टॉवर (जुना घड्याळ टॉवर) हे गुजरात राज्यातील साबरकांठा जिल्ह्यातील इडर या ठिकाणी असलेले एक प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण आहे. हा टॉवर ब्रिटिशकालीन असून उत्तम स्थापत्य कलेचा नमुना आहे. या टॉवर मध्ये एक मोठे घड्याळ आहे जे पूर्वी शहराच्या मध्यभागी वेळ कळवण्यासाठी व स्थानिकांना दिशा दर्शवण्यासाठी वापरले जात होते.

हा टॉवर दगडी बांधकामात बांधलेला असून त्यावर सुंदर नक्षीकाम कोरलेले आहे.इडरच्या ओळखीचे हे एक लँडमार्कच आहे. सध्या हा टॉवर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.

17)Shrimad Rajchandra Vihar bhavan-


श्रीमद् राजचंद्र विहार हे गुजरात राज्यातील साबरकांठा जिल्ह्यातील इदर या ठिकाणी घंटिया पहाड या हिलटॉपवर असलेले प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण आहे.या ठिकाणी श्रीमद् राजचंद्रजींनी बैठकीत धर्म प्रवचन दिले होते आणि त्याच चट्टानी स्थानावर धार्मिक भवन उभारण्यात आले आहे. या विहारांमध्ये एकस्मारक मंदिर आणि प्रार्थना सभागृह आहे. हे ठिकाण निसर्गाच्या सानिध्यात व अत्यंत पवित्र असून येथे अध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव मिळतो.

18)Gorthiya Mahadev Temple-


गोरठिया महादेव मंदिर हे गुजरात राज्यातील साबरकांठा जिल्ह्यातील प्रांतिज तालुक्यामधील रानसनपासून सुमारे 8 किमी अंतरावर टाकार शहरात असलेले धार्मिक शिवमंदिर आहे. हे मंदिर सतराव्या शतकात बांधल्याचे सांगितले जाते. व या मंदिरातील गर्भगृहात एक शिवलिंग आहे. तसेच या मंदिराचे वास्तुकाला पगोडा शैलीतील असून मंदिराच्या अंतर्भाह्य भागात सुंदर नक्षीकाम केलेले आहे. महाशिवरात्री आणि गुरुपौर्णिमेला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो त्यावेळी भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येतात.

19)Vijay Villas Vijaynagar-


विजय व्हिलास हे गुजरात राज्यातील साबरकांठा जिल्ह्यातील विजयनगर तालुक्यात अरावली पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेले एक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. ही हवेली सध्या हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतरीत करण्यात आली आहे. विजयनगरला पूर्वी गोधदर पोलो म्हणून ओळखले जात होते. परंतु सन 1864 मध्ये पोलोहून सध्याच्या विजयनगर येथे असलेल्या राजघराण्याचे स्थलांतर झाले.

ही हवेली घनदाट जंगलाने वेढलेल्या गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवर वसलेले असून येथे अनेक प्राचीन जैन मंदिरे आणि शिव मंदिरे आहेत. ही हवेली सन 1900 मध्ये महाराणा पृथ्वीसिंहजी यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आली.या हवेलीच्या आजूबाजूला घनदाट जंगल आहे व येथून पोलो फॉरेस्ट, हरनव नदी व अरावलीच्या टेकड्यांचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

20)Mamrechi Weir Dam, Bandhana-


मॅमरेची धरण हे गुजरात राज्यातील साबरकांठा जिल्ह्यातील पोलो फॉरेस्ट परिसरात निसर्गरम्य ठिकाणी असलेले सुंदर धरण आहे. हे धरण म्हणजे साबरकांठा जिल्ह्यातील गुजरातमधील एक खाजगी, लपलेला जलाशय आहे. या धरणाला स्थानिक स्तरावर “Gujarat’s hidden secret” म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी सुंदर निसर्गरम्य परिसर व शांत वातावरण आहे.पोलो फॉरेस्ट या रिसॉर्ट पासून हे ठिकाण पाच किलोमीटर अंतरावर आहे.

21)Rani Talav-


रानी तलाव हे गुजरात राज्यातील साबरकांठा जिल्ह्यातील इडर या ठिकाणी एक निसर्गरम्य धरणासारखा ऐतिहासिक तलाव आहे. या तलावा जवळून इडर शहराचे सुंदर दृश्य व जैन मंदिरे पाहता येतात. स्थानिकांसाठी तर हे ठिकाण प्रसिद्ध पिकनिक व्हेन्यू म्हणून ओळखले जाते.निसर्गरम्य परिसरात असलेल्या या तलावाला पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात.

22) Mini Pavagadh Temple –


मिनी पवागढ़ हे गुजरात राज्यातील साबरकांठा जिल्ह्यातील वाक्तापुर-हिम्मतनगर या रोडवर महाकाली मातेचे धार्मिक मंदिर आहे. येथील स्थानिक लोक हे ठिकाण ‘मिनी पवागढ़’ नावाने ओळखतात. ‘Mini Pavagadh Temple’ हे नाव 1994 साली या मंदिराच्या स्थापनेनंतर चिन्हांकित करण्यात आले. या मंदिराची स्थापना भोगीभाई महाराज आणि दांडीपुर येथील कौशिक पटेल यांच्या कुटुंबाने केली आहे. व या मंदिराचे पूजन व यज्ञ जयेंद्र व्यास यांनी केले. हिम्मतनगरपासून हे ठिकाण आठ किलोमीटर अंतरावर आहे.

23) Mahakali Mandir, Sabli-


महाकाली मंदिर हे गुजरात राज्यातील साबरकांठा जिल्ह्यातील साबली गावाजवळील पहाडावर असलेले एक जागृत देवस्थान आहे. हे मंदिर निसर्गरम्य परिसरात आहे. व या मंदिरातील अभूतपूर्व वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी असलेल्या दगडातून घंटेचा आवाज येतो, त्यामुळे हे एक आश्चर्य समजले जाते. येथील मंदिर परिसर अत्यंत शांत व निसर्ग संपन्न आहे. भाविक येथे मोठ्या श्रद्धेने नवस करण्यासाठी आणि फेडण्यासाठी येत असतात. हिम्मतनगर शहरापासून हे मंदिर 25 किलोमीटर अंतरावर आहे.

Visit the travel blog

1) साबरकांठा जिल्ह्यातील विजय व्हिलास हे ठिकाण कोठे आहे ?

साबरकांठा जिल्ह्यातील विजय व्हिलास हे ठिकाण अरावली पर्वतरांगांच्या पायथ्याशी आहे .


2) साबरकांठा जिल्ह्यातील घंटिया पहाड या हिलटॉपवर कोणते धार्मिक ठिकाण आहे?

साबरकांठा जिल्ह्यातील घंटिया पहाड या हिलटॉपवर श्रीमद् राजचंद्र विहार हे धार्मिक ठिकाण आहे.


3) साबरकांठा जिल्ह्यातील रानी तलाव कोणत्या ठिकाणी आहे ?

साबरकांठा जिल्ह्यातील रानी तलाव इडर ठिकाणी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top