नवसारी जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-Top 23 places to visit in Navsari District

मित्रांनो भारतभ्रमंतीमध्ये तुम्हाला भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळांची माहिती मिळणार आहे. आता तुम्ही पाहणार आहात गुजरात राज्यातील नवसारी जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे. नवसारी जिल्हा हा गुजरात राज्यातील समृद्ध इतिहास असलेला, अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला एक प्राचीन, ऐतिहासिक व प्रशासकीय जिल्हा आहे. आणि याचे मुख्यालय नवसारी शहरात आहे. हा जिल्हा 1997 मध्ये, वलसाड जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झाला आहे. Top 23 places to visit in Navsari District

आणि या जिल्ह्यात 6 तालुके असून पूर्वी हा जिल्हा ‘नवसारिका’ म्हणून ओळखला जात होता. या जिल्ह्यात सुंदर नैसर्गिक ठिकाणे , समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक, सांस्कृतिक, व सामाजिक पर्यटन स्थळे आहेत. तसेच हा जिल्हा भारतातील चिकूचा सर्वात मोठा उत्पादक आहे. व या जिल्ह्याच्या उत्तरेला सुरत पूर्वेला डांग आणि पश्चिमेला अरबी समुद्राच्या सीमा आहेत. येथील नवसारी तालुक्यातील कुरेल गावातून पुर्णा नदी वाहते.

आणि या नदीची एकूण लांबी 36 किलोमीटर आहे. हा जिल्हा समुद्रसपाटीपासून 150 फूट उंचीवर असल्यामुळे उन्हाळ्यातही येथील हवामान थंड व आल्हाददायक असते.नवसारी जिल्हा देशातील स्टील उद्योगाचे प्रणेते जमशेदजी टाटा यांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.

Top 23 places to visit in Navsari District

नवसारी जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे

1) Shree Andheshwar Mahadev Temple-

Top 23 places to visit in Navsari District

अंधेश्वर महादेव मंदिर हे गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील अमलसाडमध्ये बिलीमोरा शहराच्या परिसरात,असलेले एक पवित्र, धार्मिक शिवमंदिर आहे. हे मंदिर 900 वर्षे जुने आहे व वास्तुशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत आकर्षक, शांत व आध्यात्मिक आहे. आणि मंदिर परिसरात एक बाग आहे. या मंदिराबद्दल अशी आख्यायिका सांगितले की 800 वर्षांपूर्वी, दाट अरण्याच्या मध्यभागी एका आंधळ्या गुराख्याने,

एका दैवी अनुभूतीमुळे स्वयंभू शिवलिंगाचा शोध लावला. आणि त्या शिवलिंगाची मनापासून प्रार्थना केली, त्यावेळी भगवान शिव प्रकट झाले आणि त्या अंधभक्ताला दृष्टी दिली. या कृतज्ञतेपोटी त्याने त्या ठिकाणी मंदिर बांधले. त्यामुळे हे शिवमंदिर अंतर्गत आणि बाह्य दोन्ही दृष्टी प्रदान करणारे भगवान म्हणून ओळखले जातात.

2)Unai Mata Temple and Hot Water Spring-

उनाई माता मंदिर हे गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील वासदा तालुक्याजवळील उनाई गावातील अत्यंत पवित्र धार्मिक स्थळ आहे. आणि येथील गरम पाण्याची कुंडे फार प्राचीन आहेत. या ठिकाणाबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की भगवान श्रीराम दंडकारण्य जंगलातून जात असताना श्रीरामाचे भक्त शरभंग ऋषींच्या आश्रमात भेट झाली.

हे ऋषी आजाराने ग्रस्त होते, तेव्हा भगवान श्रीरामांनी जमिनीवर बाण सोडला आणि गरम पाणी बाहेर आले, ऋषी शरभंग यांनी या गरम पाण्याच्या झऱ्यात स्नान केले आणि त्यांचे आजार पूर्ण बरे झाले.तेव्हापासून असे मानले जाते की या झऱ्याचे पाणी त्वचारोग आणि इतर आजारासाठी औषधी आहे. दररोज हजारो लोक येथे झऱ्याच्या पाण्यात स्नान करतात. आणि देवी सीतामाईची या ठिकाणी उष्ण अंबाजीचे शक्तिरूपात पूजा केली जाते.

3)Dandi Beach-

दांडी बीच हे गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील, जलालपूर तालुक्यात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेले एक ऐतिहासिक ठिकाण आहे. या ठिकाणी 1930 मध्ये महात्मा गांधींनी ब्रिटिश राजवटीने मिठावर कर लादल्याच्या निषेधार्थ, गांधीजींनी त्यांच्या अनुयायांसह साबरमती ते दांडी ( नवसारी ) असा मोर्चा काढला होता.

त्यावेळी हजारो लोक या मोर्चात सहभागी झाले होते, आणि अहमदाबाद ते दांडी असा 24 दिवस पायी प्रवास केला होता. या घटनेमुळे या ठिकाणाला जागतिक स्तरावर ओळख मिळाली. 2019 मध्ये येथे स्वातंत्र्य चळवळीच्या मीठ मोहिमेच्या स्मरणार्थ राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारक उघडण्यात आले आहे.

4)Vansda National Park-

वांसदा राष्ट्रीय उद्यान हे गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील अंबिका नदीच्या काठावर वसलेले एक संरक्षित क्षेत्र आहे. हे उद्यान उष्णकटिबंधीय आर्द्र पर्णपाती आणि सदाहरित जंगलांनी वेढलेले आहे. घनदाट जंगलांचे हे राष्ट्रीय उद्यान 24 किमी क्षेत्रफळावर विस्तारलेली आहे. हे उद्यान 1979 मध्ये स्थापित झाले असून,

वांसदा शहरावरून या उद्यानाचे नाव पडले आहे. या ठिकाणी घनदाट जंगले, नैसर्गिक सौंदर्य आणि विविध प्रकारचे प्राणी व पक्षी आहेत.आणि पर्यटक या उद्यानात जीप सफारी आणि निसर्ग भ्रमंतीचा आनंद घेऊ शकतात.

Visit our website: allindiajourney.com

5)National Salt Satyagraha (Dandi) Memorial-

राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारक किंवा दांडी स्मारक हे गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील दांडी येथील एक ऐतिहासिक स्मारक आहे. हे दांडी स्मारक महात्मा गांधींच्या 1930 च्या ऐतिहासिक मीठ सत्याग्रहाची आठवण म्हणून बांधलेले एक महत्त्वपूर्ण स्मारक असून 15 एकर क्षेत्रावर पसरलेले आहे.

हा प्रकल्प बांधण्यासाठी अंदाजे 89 कोटी ₹ एवढा खर्च आला आहे. त्यावेळी महात्मा गांधींनी मीठ कराबाबत ब्रिटीश सरकारच्या भूमिकेला विरोध केला आणि असहकाराचा मार्गाने, त्यांनी 80 मोर्चेकऱ्यांच्या मदतीने ब्रिटिश मीठ मक्तेदारी मोडून काढली. आणि भारताच्या स्वातंत्र्याचा संदेश जगभर दिला.

6)Jamshed Baug Navsari-

जमशेद बाग ही गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील आगियारी, डेपो रोड येथील शांत आणि सुरक्षित परिसर आहे. व पारशी विवाह समारंभ आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. ही इमारत 1849 मध्ये बांधलेली, एक छान आणि सुंदर अंगण व उत्तम वास्तुकलेचे उदाहरण आहे. येथे जवळच पारशी आगियारी असल्यामुळे हे ठिकाण धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचे आहे.

तसेच येथे स्वच्छ खोल्या उपलब्ध आहेत, ज्यामध्ये गरम पाणी, रूम सर्व्हिस या सुविधा आहेत. आणि शाकाहारी व मांसाहारी जेवणासाठी स्वतंत्र स्वयंपाकघर कार्यक्रमांसाठी स्टेज, संगीत विभाग आणि भोजन विभागही आहेत.

7)Desai / Bhagarsath Atash Bahram-

देसाई आतश बहराम हे गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील अत्यंत पवित्र आणि प्राचीन झोरोस्ट्रियन (पारशी) अग्नी मंदिर आहे. या ठिकाणी धार्मिक अग्नी सतत जळत असतो. हे ठिकाण 18 व्या शतकाच्या सुरुवातीला स्थापित झाले असून भारतातील आठ आतश बेहरामांपैकी एक मानले जाते.

नवसारीतील आतश बेहराम हे झोरोस्ट्रियन लोकांमध्ये खूप आदरणीय आहे. व जगातील सर्वात जुन्या अग्नी मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात अनेक प्रकारच्या अग्नी असून प्रत्येकाचे विशिष्ट धार्मिक महत्त्व आहे. पारसी समुदायाचे हे अत्यंत महत्वाचे धार्मिक स्थळ आहे. आणि या ठिकाणाला जगभरातील पर्यटक भेट देतात.

8)Meherjirana Library-

मेहरीजिराना लायब्ररी ही गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील, जगातील झोराष्ट्रियन (पारशी) धर्माशी संबंधित पुस्तके आणि हस्तलिखितांच्या सर्वात मोठ्या संग्रहांपैकी एक आहे. ही लायब्ररी सन 1872 मध्ये सेठ बुरजोर बामनजी पदम यांनी बांधली असून,

या लायब्ररीला 16व्या शतकातील झोराष्ट्रियन उच्चपुरोहित दस्तूर मेहरजीराना यांच्या नावावरून ओळखले जाते. या लायब्ररीत वाचनालय, परिषद सभागृह, अभ्यासकांसाठी निवास व्यवस्था आणि 600 पेक्षा जास्त हस्तलिखितांच्या प्रयोगशाळा व 50,000 विविध भाषांमध्ये मुद्रित पुस्तके आहेत.

9)Sayaji Vaibhav Library-

सयाजी वैभव सार्वजनिक ग्रंथालय हे गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील, गुजरातमधील सर्वात मोठ्या ग्रंथालयांपैकी एक आहे. या ग्रंथालयांची स्थापना 1898 मध्ये वडोदराचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी केली होती. या ग्रंथालयात इंग्रजी , उर्दू , गुजराती , संस्कृत , सिंधी , मराठी आणि हिंदी भाषांमध्ये, ज्योतिष ,

राजकारण, धर्म , तत्वज्ञान , सामान्य ज्ञान, पर्यावरण, शिल्पकला आणि वाणिज्य या विषयांमध्ये सुमारे 88,000 पुस्तके आहेत. हे गुजरात राज्यातील असे एकमेव ग्रंथालय ज्याला गुजरात सरकारने पाच वेळा स्वर्गीय मोतीभाई अमीन ग्रंथालय पुरस्काराने सन्मानित केले आहे.

10)Baba Swami Dham-

श्री बाबा स्वामी धाम हे गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील,एक शांत आणि आध्यात्मिक ठिकाण आहे.
विशाल परिसर असलेले हे ठिकाण श्री शिवकृपानंद स्वामींचे निवासस्थान आहे आणि गणेश चतुर्थीच्या काळात हे संपूर्ण ठिकाण रंगांनी आणि लाईटने उजळून निघते. साधक लोकांना ध्यानधारणा करण्यासाठी व शांततेत वेळ घालवण्यासाठी हे एक अत्यंत सकारात्मक आणि शांत वातावरण असलेले उत्तम ठिकाण आहे.

11)Shree Somnath Mahadev Temple, Billimora-

श्री सोमनाथ महादेव मंदिर हे गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील,बिलीमोरा येथील दीप लक्ष्मी सोसायटी येथे असलेले एक प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर 1600 वर्षापूर्वीचे असून मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू आहे.तसेच दक्षिण गुजरातमधील हे सर्वात उंच मंदिर आहे.अरबी समुद्रातून या मंदिराच्या शिखर दिसते.

श्रावण महिन्यात या मंदिरात मोठी यात्रा भरते त्यावेळी लाखोंच्या संख्येने भाविक या यात्रेत सहभागी होतात.या अध्यात्मिक व ऐतिहासिक मंदिर कॅम्पसमध्ये हनुमान मंदिर, गायत्री माता मंदिर आणि जलाराम बापाचे मंदिर आहेत.

12)Shri Chintamani Parshvnath Digambar Jain Mandir-

श्री चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर हे गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील रानकुवा येथील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. या मंदिराचे संपूर्ण बांधकाम मार्बल मध्ये सुंदर नक्षीकाम आणि कोरीवकाम पद्धतीने केलेले आहे.या ठिकाणी राजेशाही छत्राखाली, सात नागफण्यांच्या खाली,

33 मीटर उंचीची श्री चिंतामणी पार्श्वनाथ यांची पद्मासन स्थितीत मूर्ती आहे. तसेच येथील मंदिर परिसर अत्यंत शांत व अध्यात्मिक आहे. या मंदिरातील मूर्ती उत्पत्ति राजाच्या काळातील असल्याचे सांगितले जाते. तसेच भगवान पार्श्वनाथची ही मूर्ती प्रभाव आणि चमत्कारासाठी प्रसिद्ध आहे.

13)Mallikarjun Mahadev Temple-

मल्लिकार्जुन महादेव मंदिर हे गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील चिखलीपासून दीड किमी अंतरावर असलेल्या माजिगम गावातील, एका हंगामी तलावाच्या काठावर असलेले भगवान शिवाचे एक धार्मिक व प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर 500 वर्षांपूर्वी बांधले असून येथील स्वयंभू शिवलिंग जमिनीत खोदलेले आहे. स्थानिक लोक सांगतात की,

हे मंदिर बंजारा समुदायाने उभारले होते आणि जेव्हा त्यांनी शिवलिंग दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न केला तेव्हा चमत्कारिकरित्या हे शिवलिंग जमिनीत खोलवर गेले. तसेच हे ठिकाण सुनील दत्त , राज कुमार आणि नर्गिस यांच्या ‘मदर इंडिया’ या प्रसिद्ध चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी प्रसिद्ध आहे, जो बॉलीवूडमधील पहिल्या भारतीय चित्रपटांपैकी एक म्हणून ऑस्करसाठी नामांकित झाला होता.

14)Ashapura Mata Mandir-

आशापुरी माता मंदिर हे गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील दुधीया तलावाजवळ असलेले एक धार्मिक तीर्थस्थळ आहे. या मंदिराच्या मुख्य गर्भगृहात आशापुरी माता ची सुंदर मूर्ती आहे.आशापुरी माता ही सर्व भक्तांची मनोकामना पूर्ण करते त्यामुळे या मंदिरात गुजरातच्या कानाकोपऱ्यातून भक्त मातेच्या दर्शनासाठी येतात.

या मंदिरात गायत्री माता, भगवान गणेश यांच्या मूर्ती व शिवलिंग आहे. तसेच या मंदिरा बाहेर अनेक फुलाची ची आणि प्रसादाचे दुकाने आहेत. नवरात्रीमध्ये या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते.

15)BAPS Shri Swaminarayan Mandir-

BAPS श्री स्वामीनारायण मंदिर हे गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील नवसारीजवळ असलेले भगवान स्वामीनारायण यांचे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. या मंदिराची वास्तुकला अत्यंत अद्भुत व सुंदर आहे आणि पांढऱ्या संगमरवरामध्ये बांधली आहे.BAPS स्वामीनारायण संस्था ही अध्यात्मिक आणि स्वयंसेवक-आधारित संस्था आहे.

व श्रद्धा, एकता आणि निःस्वार्थ सेवेद्वारे समाज उन्नतीचे कार्य करते. या मंदिराचे संगमरवरी कोरीवकाम खूपच अप्रतिम आहे. आणि मंदिरात भगवान स्वामीनारायण यांची मन मोहून टाकणारी मूर्ती आहे. ही मूर्ती पाहून असे वाटते की स्वामीनारायण प्रत्यक्षात समोरच उभे आहेत.

16)Shri Shukleshwar Mahadev Temple-

शुक्लेश्वर महादेव मंदिर हे गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील अनावल येथील प्राचीन शिव मंदिर आहे. हे भव्य मंदिर कावेरी नदीच्या काठावर असून मंदिराच्या गर्भग्रहात एक शिवलिंग आहे. मंदिर परिसर अत्यंत शांत व आध्यात्मिक असल्यामुळे भक्तांना या ठिकाणी शांतीचा अनुभव मिळतो.

तसेच या मंदिराच्या बाजूला असलेली नदीचे सुंदर दृश्य,आणि मंदिर परिसरातील एक स्वच्छ पाण्याचे कुंड आहे. महाशिवरात्री आणि इतर वेळी हे या मंदिरात भक्तांची मोठी गर्दी असते.

17)vangan waterfall,vansda-

वांगन वॉटरफॉल हे गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील वंसदा तहसील येथे असलेला एक निसर्गरम्य सुंदर धबधबा आहे. हा धबधबा घनदाट जंगलात आहे. आणि या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्ही बाईक किंवा कारने जाऊ शकता.

हा धबधबा घनदाट जंगलात असल्यामुळे येथील परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे. आणि धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक किलोमीटर पायी चालत जावे लागते. हा धबधबा उंच कड्यावरून कोसळत असल्यामुळे पर्यटक येथे स्नानाचा आनंद घेऊ शकतात.

18)Ajmalgadh Hill –

अजमलगड हे गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील वंसदा तालुक्यातील घोडमळ गावाजवळ सह्याद्री पर्वतरांगांवरील एक ऐतिहासिक किल्ला आहे. किल्ल्यावरील गुफा आणि ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे.तसेच येथे झोरोस्ट्रियन/पारशी लोक सुमारे 350 वर्षे त्यांच्या पवित्र अग्निकुंडाचे संरक्षण करण्यासाठी अजमलगडच्या जंगलात आणि गुहेत फिरत होते. सध्या स्थानिक प्रशासनाने अजमलगडच्या टेकडीवर एक स्तंभ बांधला आहे.

आणि अग्निकुंडाचे रक्षण करण्यासाठी वापरण्यात येणारी गुहा बंद केली आहे. आणि या किल्ल्यावर असलेल्या सोमेश्वर महादेव शिवलिंगाची स्थापना शिवाजी महाराजांनी केले होती असे मानले जाते. या किल्ल्यावर शिवकालीन इतिहासाचे अवशेष, हिरव्यागार निसर्गरम्य परिसराने वेढलेले, निसर्गरम्य दृश्ये आणि भव्य पर्वतरांगा असल्यामुळे निसर्गप्रेमी आणि इतिहासप्रेमींचे आवडते ठिकाण आहे.

19)Ambika River Dam-

गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील अंबिका नदीवर गणदेव येथे बांधलेले एक धरण आहे. या धरणामुळे, या भागातील सिंचन आणि इतर पाणीपुरवठा गरजा पूर्ण झाले आहेत. आणि येथील नदी परिसर अत्यंत निसर्गरम्य असल्यामुळे हे एक पर्यटनाचे ठिकाण बनले आहे. पर्यटक आणि निसर्ग प्रेमींसाठी हे ठिकाण म्हणजे एक नंदनवनच आहे.

20)Janki van-

जानकी वन हे गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील वांसदा तहसीलमधील भिनार गावात असलेले एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. हे वन गुजरात वनीकरण विभागाने विकसित केलेले वनीकरण उद्यान आहे. वन विभागाकडून जानकी वनात पर्यावरण संरक्षण, वनसंवर्धनाचे संगोपन, पर्यटन स्थळ आणि वन्य औषधी वनस्पतींचे संगोपन केले जाते. या उद्यानातील वृक्षारोपण क्षेत्रांना अशोक वन, पंचवती वन,

अमरावन, सिंदूरी वन, चंदन वन, राशी-नक्षत्र वन, नवग्रह वन, दशमूल वन, बिली वन आणि औषादी वन अशी नावे देण्यात आली आहेत. आणि पर्यटकांना येथील व्याख्यान केंद्रात प्रत्येक झाडाबद्दल माहिती मिळते. या वनाबद्दल असे सांगितले जाते की जानकी माता (सीता माता) एकेकाळी या ठिकाणी राहत होती.

21)Clock Tower-

क्लॉक टॉवर हे गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचे ठिकाण आहे. हा क्लॉक टॉवर नवसारी शहराच्या मध्यभागी असून जुन्या काळातील वास्तुकलेचे सुंदर दर्शन घडवते. या टॉवरभोवती बाजारपेठ आणि इतर महत्त्वाची कार्यालये असल्याने हे एक पर्यटनाचे मुख्य केंद्र बनले आहे. पूर्वीच्या काळी हा टॉवर राजघराण्यांनी बांधला होता. हा प्राचीन ऐतिहासिक टॉवर पाहण्यासाठी लोक दूरवरून येत असतात.

22)Dandakvan Ashram-

दंडकवन आश्रम हा गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील कावेरी नदीच्या काठावर, घनदाट जंगलात असलेले एक आध्यात्मिक केंद्र आहे. या ठिकाणी विहंगम योग हे साधना आणि अध्यात्म अनुभवण्यासाठी एक शांत, पवित्र ठिकाण आहे. या आश्रमातील वातावरण अत्यंत दिव्य, अध्यात्मिक असून, येथील सुंदर निसर्ग, उद्यान आणि कारंज्यांच्या सान्निध्यात मनाला प्रसन्नता मिळते.

तसेच या आश्रमात पूर्णतः सेंद्रिय (ऑरगॅनिक) सात्विक (शाकाहारी) भोजन दिले जाते. येथे येणारे भाविक सत्संग, ध्यान, योग आणि प्रवचने अशा विविध उपक्रमांमध्ये सहभागी होतात. आणि या आश्रमात भक्तांसाठी राहण्याची सुविधा आहे.

23)Shree Gayatri Mataji Temple-

श्री गायत्री माता मंदिर हे गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील, रायचंद रोडवर असलेले प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. मंदिर परिसर अत्यंत शांत व अध्यात्मिक असल्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात गायत्री मातेच्या दर्शनासाठी येत असतात. या मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात, त्यामुळे ते भक्ती आणि सांस्कृतिक उपक्रमांचे एक उत्साही केंद्र आहे.

Visit the travel blog


1) नवसारी जिल्ह्यातील दंडकवन आश्रम कोणत्या नदीच्या काठावर आहे ?

नवसारी जिल्ह्यातील दंडकवन आश्रम कावेरी नदीच्या काठावर आहे.

2)नवसारी जिल्ह्यातील गरम पाण्याची कुंडे कोणत्या ठिकाणी आहेत ?

नवसारी जिल्ह्यातील गरम पाण्याची कुंडे उनाई माता मंदिर जवळ आहेत.


3)नवसारी जिल्ह्यातील जानकी वन कोणत्या ठिकाणी आहे ?

नवसारी जिल्ह्यातील जानकी वन हे वांसदा तहसीलमधील भिनार गावात असलेले एक सुंदर पर्यटन स्थळ आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top