मित्रांनो भारतभ्रमंती ही अशी वेबसाईट आहे, जिथे तुम्हाला भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळांची माहिती मिळणार आहे. आता तुम्ही पाहणार आहात गुजरात राज्यातील मोरबी जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे. मोरबी जिल्हा हा मच्छू नदीकाठी वसलेला,गुजरातच्या सौराष्ट्र मधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा 15 ऑगस्ट, 2013 रोजी जामनगर, सुरेन्द्रनगर व राजकोट ह्या तीन जिल्ह्यांमधील काही भाग वेगळे करून निर्माण करण्यात आला. मोरबी या जिल्ह्याला मोरवी असेही म्हणतात. Top 23 places to visit in Morbi District
आणि मोरबीचा शब्दशः अर्थ मोरांचे शहर असा होतो. मोरबी हे शहर निसर्गसौंदर्याने रंगीबेरंगी इतिहास आणि समृद्ध सांस्कृतिक वारशामुळे प्रसिद्ध आहे. त्यामुळे मोरबीला अनेकदा ‘पूर्वेचे पॅरिस’ असेही म्हटले जाते. या जिल्ह्यात मोरबी, मालिया, टंकारा, वांकानेर आणि हलवड हे पाच तालुके आहेत. व येथे कच्छी, गुजराती, काठियावाडी आणि हिंदी भाषा बोलल्या जातात.
तसेच या जिल्ह्यात शेती, सिरेमिक टाइल उद्योग, घड्याळ निर्मिती उद्योग, कागद गिरण्यां केंद्र, उत्पादित वस्तूंची निर्यात, पर्यटन, पॅकिंग उद्योग आहेत, आणि सुंदर राजवाडे, ऐतिहासिक स्मारके आहेत. 1979 मध्ये मच्छू नदीवरील धरण फुटल्याने मोरबीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आणि मोरबी हे पूर्वी कच्छ संस्थानाचा भाग होते.
Top 23 places to visit in Morbi District
मोरबी जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे
1)Rafaleshwar Mahadev Temple –


राफलेश्वर महादेव मंदिर हे गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील राफलेश्वर गावातील एक प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर मोरबी संस्थानचे महाराजा लखधीरजी यांनी इ.स. 1946 मध्ये बांधले असून, ते स्वयंभू शिवलिंगावर उभारलेले आहे. या मंदिराच्या खांबांवर आणि छतावर सुंदर पारंपरिक नक्षीकाम व कोरीव काम केलेले आहे. या मंदिरात श्रावण अमावस्येला तीन दिवसांचा राफेलेश्वर मेळा भरतो. तसेच या मंदिर परिसरात जगप्रसिद्ध मोरबी टाईल्स उत्पादकांचे कारखाने आहेत.
2)Mani Mandir –


मणि मंदिर हे गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील, वेलिंगडन सचिवालयच्या आवारात असलेले एक भव्य व सुंदर मंदिर आहे. हे मंदिर राजा सर वाघजी ठाकोर यांनी 1935 मध्ये त्यांची पत्नी मणिबेन यांच्या स्मरणार्थ बांधले आहे. आणि त्यांच्या पत्नी मणिबेन यांच्या प्रति असलेले अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणून बांधले आहे.
या मंदिराची स्थापत्यशैली अत्यंत सुंदर असून हे मंदिर जयपूरच्या दगडापासून बांधले आहे. या मंदिराच्या कमानी, जाळी, घुमट आणि ‘शिखर’ अत्यंत सुंदर पद्धतीने बनवले आहेत. आणि या मंदिरात लक्ष्मी नारायण, काली माता, राम, राधा-कृष्ण आणि भगवान शिव यांच्या प्रतिमा आहेत.
3)Art Deco Palace-

आर्ट डेको पॅलेस हे गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील एक आकर्षक आणि कलात्मक अंतर्गत सजावटीसाठी प्रसिद्ध राजवाडा आहे. हा राजवाडा 1931 ते 1942 बांधण्यात आला व ठाकूर महेंद्रसिंह (मोरवीचे शेवटचे महाराजा )यांनी त्या काळातील पारंपारिक राजवाड्याच्या स्थापत्यकलेपेक्षा आमूलाग्र बदल करून त्याला नवीन राजवाडा असे नाव दिले.
हा राजवाडा टेराझो आणि ग्रॅनाइटमधील एक सुंदर दोन मजली, उंचीची इमारत आहे. आणि या इमारतीची रचना अशी आहे ज्यामुळे ती चार्ल्स होल्डन यांच्या लंडन अंडरग्राऊंड स्टेशनसारखी दिसते. हा नेत्रदीपक राजवाडा ब्रिटिश आर्किटेक्चरल फर्म ग्रेगसन, बॅटली अँड किंग यांनी डिझाइन केला होता. आणि शापूरजी पालनजी यांनी बांधला होता.
4)Machchhu dam-

मच्छू धरण हे गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील मच्छू नदीवर बांधलेले धरण आहे. हा धरण परिसर हिरवाईने नटलेले आहे आणि मच्छू धरणावरचा सूर्यास्त पाहणे हे एक सुंदर दृश्य आहे. तसेच मच्छू नदीवर मच्छू-1 आणि मच्छू- 2 अशी दोन धरणे आहेत, त्यापैकी मच्छू-2 हे धरण 11 ऑगस्ट 1979 रोजी सतत होणाऱ्या पावसाने फुठले आणि मोठी दुर्घटना घडली होती. मोरबी शहरातून पाण्याचा एक मोठा प्रवाह वाहिला, आणि यात अंदाजे वीस ते पंचवीस हजार लोकांना जीव गमवावा लागला.
Visit our website: allindiajourney.com
5)Green Chowk-

ग्रीन चौक हे गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील एक नगरचौक आणि शहरातील महत्त्वाचे चिन्ह म्हणून बांधलेआहे. या ठिकाणी तीन दरवाज्यांच्या माध्यमातून प्रवेश करता येतो. आणि या दरवाज्यांची रचना युरोपीय नगररचनापासून घेण्यात आले आहे.
या ठिकाणी दगडातून बनवलेल्या नेहरू गेट हे राजपूत वास्तुकलेचे घटक वापरले आहेत आणि त्याच्या मध्यभागी घड्याळाचा मनोरा आहे. तर दुसरा दरवाजा ऐतिहासिक कास्ट-आयनचा दरवाजा असलेला बाजार आहे. हे ठिकाण ‘ग्रीन टॉवर’ (Green Tower) म्हणूनही ओळखला जातो.
6)Morbi Trimandir-

मोरबी त्रिमंदिर हे गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील जैन, शैव आणि वैष्णव धर्मांतील देव-देवतांच्या मूर्ती समान आदराने एकाच व्यासपीठावर प्रतिष्ठित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे मंदिर सर्व धर्मांच्या देवतांचा सन्मान करणारे एक धर्मनिरपेक्ष मंदिर आहे. या मंदिर संकुलाचे क्षेत्रफळ 13,152 चौरस फूट आहे, तर मंदिराच्या मंचाचे क्षेत्रफळ 5,599 चौरस फूट आहे.
आणि या मंदिराच्या मध्यभागी भगवान श्री सीमंधर स्वामींची 111 इंच उंचीची संगमरवररी मूर्ती आहे. या मंदिराची स्थापत्य कला अत्यंत गुंतागुंतीच्या कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे. आणि या ठिकाणी एक सुंदर बाग, ग्रंथालय आणि अभ्यास केंद्र आहे.
7)Shree jadeshwar mahadev tempal-

श्री जडेश्वर महादेव मंदिर हे गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील रतन टेकरी वांकेनेर येथे असलेले एक पवित्र धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर 500 वर्षा जुने असून या मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू आहे आणि ते ‘जडेश्वर दादा’ रूपात पूजले जाते. या मंदिराबद्दल असे सांगितले जाते की येथे दर्शन घेतल्याने डोकेदुखी थांबते.
तसेच या मंदिराबद्दल एक अद्भुत घटना सांगितली जाते की, सजनपर गावातील एका गायीने रतन टेकरीवर जाऊन दूध सोडण्यास सुरुवात केली, त्यातून शिवलिंग आणि एक बाण प्रकट झाला. त्यानंतर 1813 मध्ये जामनगरच्या राजा जाम रावळ यांनी या मंदिराचे बांधकाम केले.
8)Maa Khodiyar Mandir, Matel-

खोडियार माता मंदिर हे गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील माटेल गावात वसलेले अत्यंत प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. या मंदिराचा इतिहास सुमारे 1100 वर्षांपूर्वीचा आहे. हे मंदिर एका उंच खडकावर वसलेले असून, येथे जुन्या स्थानावरील देवीची मूर्ती आहे, आणि चार मूर्तींची स्थापना करण्यात आलेली आहे.
या मंदिरासमोर नदीत खोल पाण्याचे पात्र आहे, ते ‘माटेलिया’ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी माता खोडियारजींची भक्त प्रसाद आणि निद्रावस्था पूजा करतात. हे मंदिर वांकानेरपासून सुमारे 17 किलोमीटर अंतरावर आहे.
9)Wellington Secretariat-


वेलिंग्टन सचिवालय हे गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि कलात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण इमारत आहे. ही इमारत 1931 मध्ये बांधली असून त्यात राजस्थानी आणि औपनिवेशिक शैलीचे मिश्रण आहे. मोरबीचे माजी शासक सर वाघजी यांनी हे भव्य स्मारक औपनिवेशिक प्रभावाखाली तांत्रिक नियोजनाने व बहुउपयोगी रचनेसह डिझाइन केले होते.ही इमारत सध्या पुनर्बांधणीच्या प्रक्रियेत असून, ती हॅंगिंग ब्रिज जवळ आहे.वेलिंग्टन सचिवालय, हे वाघ पॅलेस म्हणूनही ओळखले जाते.
10)Ranjit Villas Palace-

रणजित विलास पॅलेस हा गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील गढिओ टेकड्यांवरील मच्छू नदीच्या काठी असलेला एक ऐतिहासिक राजवाडा आहे. हा पॅलेस व्हेनेशियन गॉथिक, मुघल आणि राजपूत स्थापत्य शैलीमध्ये 225 एकरांवर बांधलेला एक सुंदर पॅलेस आहे.
व या पॅलेसला सुंदर घुमट, कमानी, रंगीत काचेच्या खिडक्या आहेत. हा पॅलेस वांकानेर राजघराण्याचे शासक महाराणा राजे श्री अमर सिंहजी यांनी बांधला होता. आज त्याचा काही भाग ‘द रॉयल ओएसिस’ या हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतरित करण्यात आला आहे. येथून शहराचे विस्तीर्ण दृश्य दिसते.
11)Rampara Wildlife Sanctuary-


रामपारा वन्यजीव अभयारण्य हे गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील एक दुर्मिळ जंगली क्षेत्र आहे. हे ठिकाण
झुडुपे, गवत, विविध वनस्पती, जंगली गाढव, प्राणी समृद्ध जैवविविधता आणि वैविध्यपूर्ण पक्षीजीवन याने परिपूर्ण आहे. हे अभयारण्य 1988 मध्ये स्थापन झाले असून 15 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे.
या ठिकाणी 280 पेक्षा जास्त प्रजातींच्या वनस्पती, 130 प्रजातींचे पक्षी, सस्तन प्राणी आणि अनेक सरपटणारे प्राणी आहेत. आणि अभयारण्याच्या मध्यभागी असलेल्या वॉचटॉवरवरून पर्यटकांना अभयारण्याचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. रामपारा वन्यजीव अभयारण्य हे निसर्गप्रेमी आणि पक्षीनिरीक्षकांसाठी एक उत्तम ठिकाण आहे.
12)Darbargadh Palace-

दरबारगढ पॅलेस हे गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील मच्छू नदीच्या काठावर वसलेला, सुंदर पॅलेस आहे. हा पॅलेस मोरबीच्या राजघराण्याचे मूळ निवासस्थान होते. या पॅलेसचे श्रेय हे श्री वाघजी रावजी ठाकोर यांना दिले कारण हा राजवाडा 17 व्या शतकापासून मोरबीवर राज्य करणाऱ्या जाडेजा घराण्याचा एक भाग आहे.
परंतु 19 व्या शतकात श्री वाघजी रावाजी ठाकोर यांनी या राजवाड्याला भव्य रूप दिले. या पॅलेस मध्ये लाकडी जिने, संगमरवरी मंडप, इटालियन बॅलस्ट्रैड, ग्रीक मोगल शैलीचा मंडप, कलात्मक रचना, कोरीव काम, जाळीकाम आणि लाल विटांचा वापर केलेला आहे. सध्या हा दरबारगढ पॅलेस आणि संग्रहालय बंद आहे.
13) Birth place of Dayanad Saraswati, Tankara-

टंकारा हे गुजरात राज्यातील मोरबी जिल्ह्यातील डेमी नदीवरील एक शहर आहे. टंकारा ही पवित्र भूमी मानली जाते कारण ती 12 फेब्रुवारी 1824 रोजी जन्मलेल्या आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांचे जन्मस्थान आहे. त्यामुळे आर्य समाजासाठी हे एक पवित्र शहर मानले जाते. दरवर्षी महाशिवरात्रीला, या ठिकाणी आर्य समाजी टंकारा ट्रस्टद्वारे 2 दिवसांच्या मेळ्यात स्वामी दयानंद सरस्वती यांच्या ऋषी बोध उत्सवाचे स्मरण केले जाते व शोभा यात्रा आणि महायज्ञ आयोजित केला जातो.
14) Kheta Vav(stepwell), Halved –



खेटा वाव (stepwell) ही गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील हळवद येथील एक ऐतिहासिक विहीर आहे. पूर्वी हळवद हे ठिकाण सुरेंद्रनगर जिल्ह्यात होते.सध्या हळवद हे मोरबी जिल्ह्याच्या पाच तालुक्यांपैकी एक असून सिरामिक आणि घड्याळ उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. या तालुक्यातून कंकावती आणि ब्रह्माणी या दोन नद्या वाहतात. हलवड हे ब्राह्मणांचे गाव आहे. आणि वीर योद्ध्यांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी अनेक स्मारक आणि वीर-शिला आहेत.
तसेच हलवाडला भारताची छोटी काशी म्हटले जाते, कारण हलवाडमध्ये सर्व दिशांना शिव मंदिरे आहेत. या ठिकाणी ‘समतसर’ तलाव, शाही राजवाडे आणि मंदिरामध्ये भवानीभूतेश्वर, गौलोकेश्वर, शबलेश्वर, काशीविश्वनाथ, ढोलेश्वर, वैजनाथ, जागेश्वर,नकलंक गुरु धाम, शक्तीनगर, श्री सुंदरीभवानी मंदिर, श्री बुटभवानी मंदिर जेठवधर, माँ जन्म मंदिर सपकडा आणि छत्री ही सुंदर पर्यटन स्थळे आहेत.
15)BAPS Shri Swaminarayan Mandir-

श्री स्वामीनारायण मंदिर हे गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर 1822 ते 1828 या काळात स्वामीनारायण यांनी बांधलेल्या नऊ मंदिरांपैकी एक आहे. या भव्य मंदिराची वास्तुकाला अत्यंत सुंदर लाकडी कोरीवकाम, नक्षीकाम केलेली आहे. व त्यामध्ये भव्य मूर्ती, आणि शिल्पे आहेत. तसेच येथील मंदिर परिसर अत्यंत शांत व आध्यात्मिक आहे.
16)Royal Palace,Halvad-

रॉयल पॅलेस हा गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील हळवदच्या मध्यभागी असलेला एक ऐतिहासिक महाल आहे. हा पॅलेस राजपूत शैलीतील स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. या महालाचे बांधकाम वाळूच्या दगड आणि लाकडाचा कुशल संगम करून करण्यात आले आहे. या महालाचे लाकडी खांब, फ्रीझेस आणि जाळीदार कोरीवकाम महालाच्या भव्यतेत भर घालतात.
तसेच येथील अष्टकोनी मनोऱ्यामुळे हा महल ‘एक डांडिया महाल’ म्हणून ओळखला जातो. या महालाच्या भव्य दरवाजाच्या आतमधल्या चौकोनी अंगणाभोवती दोन मजली इमारत असून, तिची रचना सुंदर कोरलेल्या खांबांनी, जाळ्यांनी आणि मांडव्यांनी सजवलेली आहे. व मध्यभागी अष्टकोनी मनोरा आहे. तसेच येथे राजदरबार हॉल आणि राजघराण्याच्या कुलदैवताचे मंदिरही आहे. सध्या या पॅलेसमध्ये अनेक सरकारी कार्यालये आहेत.
17) Paliya Temple, halvad-

स्मृतिस्थंभ हे गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील हळवदच्या सीमेवर असलेले एका ऐतिहासिक ठिकाण आहे. या ठिकाणी राजेशाही काळात झालावाडातील सर्वाधिक युद्धे झाल्याचे पुरावे आढळतात. या युद्धांमध्ये शौर्याने प्राण अर्पण केलेल्या, आणि परकीय आक्रमकांपासून आपल्या मातृभूमीचे रक्षण करताना 375 पेक्षा जास्त योद्ध्यांच्या ,
स्मृती आजही हळवदमध्ये उभ्या असलेल्या पाळ्यांद्वारे जपल्या गेल्या आहेत. हे ठिकाण एकेकाळी रणांगण म्हणून ओळखले जात होते. स्मृतिस्थंभ हे ठिकाण स्थानिक पातळीवर ‘पळिया’ म्हणून ओळखले जाते. नवविवाहित जोडपी येथे येऊन आपले विवाहबंधन दृढ करतात.
18)Shree Sharneshwar Mahadev Mandir-

श्री शरणेश्वर महादेवाचे मंदिर हे गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील हळवद येथील प्राचीन शिवमंदिर आहे. हळवदच्या परिसरात अनेक स्वतंत्र ऐतिहासिक महत्त्व असलेली शिवालये आहेत. शरणेश्वर मंदिराची स्थापना हळवदच्या राजाने सुमारे 700 वर्षांपूर्वी केली होती.
या मंदिरात अनेक यज्ञ आणि विविध सेवाभावी उपक्रम प्राचीन काळापासून केले जातात. तसेच हळवदला भूदेवांची ब्रह्मनगरी मानले जाते. कारण येथील भूदेव जगभर प्रसिद्ध आहेत. श्रावणातल्या सोमवारी या मंदिरात भक्तांची मोठी गर्दी असते.
19)Shri Dhakkavali Meldi Mataji Temple-

श्री धक्कावली मेलडी माताजी मंदिर हे गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील हळवद येथील,धक्कावली गावात वसलेले एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर भक्ती, श्रद्धा आणि नि:स्वार्थ सेवेसाठी समर्पित असलेले एक पवित्र केंद्र आहे. आणि येथील भक्त मेलडी माताजींना आदरपूर्वक ‘मोरबी नी सरकार’ म्हणून संबोधतात. हे मंदिर आज एक भव्य आणि आध्यात्मिक तीर्थस्थान म्हणून ओळखले जाते. आणि येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात.
20)Morbi Ceramic & Clock Museum-

मोरबी जिल्हा सिरेमिक उद्योगाचे केंद्र म्हणून ओळखला जातो. मोरबी सिरेमिक आणि घड्याळ संग्रहालय हे गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील शहराच्या समृद्ध औद्योगिक वारशाची आणि परंपरांची माहिती देतात.
तसेच मोरबीला भारताची ‘सिरेमिक राजधानी’ म्हटले जाते. मोरबी जिल्ह्यात जवळजवळ 390 सिरेमिक इंडस्ट्रीज आणि 150 घड्याळ उद्योग आहेत.
21)Brahmani Mata Mandir, Morbi-

ब्राह्मणी माता मंदिर हे गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील मच्छू नदीच्या काठी वसलेले प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर वांकानेर जवळील नाना जडेश्वर येथे अरण्यान्या नागदा दोशी यांनी बांधले आहे.येथील मंदिर परिसर अत्यंत शांत व अध्यात्मिक आहे. या मंदिरात भाविक मोठ्या श्रद्धेने ब्राह्मणी मातेचि पूजा करण्यासाठी येतात.
22)Suspension Bridge, Morbi-

झुलता पूल हा गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील मच्छू नदीवरील एक ऐतिहासिक पूल आहे. हा झुलता (सस्पेन्शन ब्रिज) पूल 140 वर्ष जुना असून मोरबीचे राजे वाघजी रावजी ठाकोर यांनी हा पूल बांधला होता. त्यावेळी मोरबीचे राजा याच पुलावरुन दरबारात जायचे.
या पुलाचे उद्घाटन 20 फेब्रुवारी 1879 रोजी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांनी केलं होतं. आणि हा पूल बांधण्यासाठी त्यावेळी 3 लाख 50 रूपये इतका खर्च आला होता. हा झुलता पूल गुजरातच्या मोरबीचा एक ऐतिहासिक वारसा आहे.
23)Navlakhi Port-


नवलखी बंदर हे गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील एक महत्त्वाचे बंदर आहे. हे एक मोठे व्यापारी बंदर असून, कोळशाची आयात आणि सिरेमिक उत्पादनांच्या निर्यातीसाठी ओळखले जाते. या बंदरावर दररोज 8,000 ते 9,000 मेट्रिक टन कोळसा उतरवला जातो.
व हे गुजरात मेरीटाईम बोर्डाद्वारे नियंत्रित केले जाते.मोरबी जिल्हा हा सिरेमिक उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे आणि नवलखी बंदरामुळे गुजरातमधील औद्योगिक विकासाला चालना व उत्पादनांच्या निर्यातीला मोठी मदत होते. हे बंदर मोरबीपासून 45 किमी अंतरावर आहे आणि कच्छच्या आखाताच्या नैऋत्येस आहे.
1)मोरबी जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे?
मोरबी जिल्हा हा सिरेमिक आणि वॉल क्लॉक उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे.
2)गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील वेलिंग्टन सचिवालय ही ऐतिहासिक इमारत कोणत्या साली बांधली?
गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील वेलिंग्टन सचिवालय ही ऐतिहासिक इमारत 1931 मध्ये बांधली.
3) गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील,मणि मंदिर कोणी बांधले?
गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील,मणि मंदिर हे राजा सर वाघजी ठाकोर यांनी 1935 मध्ये त्यांची पत्नी मणिबेन यांच्या स्मरणार्थ बांधले आहे.


