खेडा जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे- Top 23 places to visit in Kheda District

मित्रांनो भारतभ्रमंती ही अशी वेबसाईट आहे, जिथे तुम्हाला भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळांची माहिती मिळणार आहे. आता तुम्ही पाहणार आहात गुजरात राज्यातील खेडा जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे. खेडा जिल्हा हा गुजरातमधील सर्वात जुना जिल्हा असून चरोतर प्रदेशाचा भाग आहे. ब्रिटिश राजवटीत हा ‘कैरा’ जिल्हा म्हणून ओळखला जात होता. आणि 1918 मध्ये खेडा सत्याग्रह हे गांधीजींनी केलेले एक महत्त्वाचे शेतकरी आंदोलन होते. Top 23 places to visit in Kheda District

1998 मध्ये या जिल्ह्याचे विभाजन करून आनंद जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. आणि या जिल्ह्याचे मुख्यालय खेडाहून नडियाद येथे नेण्यात आले. आणि 2013 मध्ये खेड़ा जिल्ह्यातील बालासिनोर आणि वीरपूर हे दोन तालुके महिसागर जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले. तसेच नडियाद हे सरदार वल्लभभाई पटेल यांचे जन्मस्थान आहे व संत श्री संतराम महाराज आणि स्वातंत्र्यसैनिक इंदुलाल याज्ञिक या सुप्रसिद्ध व्यक्ती खेडा जिल्ह्यातील आहेत. या जिल्ह्यात दहा तालुके आहेत व साबरमती आणि महिसागर या 2 प्रमुख नद्या वाहतात. तर खेड़ा आणि आनंद हे ‘चरोटर – सुवर्ण पानांचे क्षेत्र’ म्हणून प्रसिद्ध आहे.

या जिल्ह्यात तांदूळ आणि कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. व उद्योगांमध्ये येथे वस्त्रनिर्मिती, कागद, विद्युत उपकरणे कापूस गिरणी,आणि अन्नप्रक्रिया उद्योग, सिमेंट आणि जिप्सम निर्मितीचे उद्योग, कोका-कोला आणि अमूल चीज प्लांट हे औद्योगिक केंद्र आहेत. तसेच या जिल्ह्यात माटर तालुक्यात नैसर्गिक वायूचे भरपूर साठे व शेल इंडिया कंपनीचे तेल आणि नैसर्गिक वायूचे बॉटलिंग व फिलिंग प्लांट आहेत.

Top 23 places to visit in Kheda District

खेडा जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे

1)Shri Ranchhodraiji Maharaj Mandir-

Top 23 places to visit in Kheda District

रणछोडराय मंदिर हे गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील डाकोरमध्ये असलेले भगवान विष्णूच्या कृष्णरूपाला (रणछोडराय) समर्पित एक पवित्र धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर 1772 मध्ये बांधले आहे. या ठिकाणी काळ्या टचस्टोन धातूमध्ये बनवलेली 1 मीटर उंच आणि 45 सेमी रुंदीची रणछोडरायची मूर्ती सोने, रत्ने, मौल्यवान दागिने आणि महागड्या कपड्यांनी सजवलेली आहे.

आणि या मंदिरातील चांदी आणि सोन्याने मढवलेल्या लाकडी कोरीव काम केलेले एक अलंकृत सिंहासन बडोद्याच्या गायकवाड यांनी भेट दिले होते. या मंदिराच्या जवळपास गोमती तलाव आणि श्री राधाजी मंदिर ही धार्मिक स्थळे आहेत. तसेच या मंदिराच्या गेटच्या वरच्या मजल्यावर एक संगीत कक्ष आहे, जिथे दररोज दर तीन तासांनी शहनाई आणि ढोल वाजवले जातात.

2) Tirthrajshree Swaminarayan Mandir, Vadtal-

तीर्थराजश्री स्वामीनारायण मंदिर हे गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील नडियाद तालुक्यातील वडतालमधील स्वामीनारायण संप्रदायाचे तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर 1881 मध्ये सहजानंद स्वामींनी बांधलेआहे. व लक्ष्मी नारायण देव गादीचे मुख्यालय,आणि स्वामीनारायण संप्रदायातील एक प्रमुख मंदिर आहे. या मंदिराची रचना कमळाच्या आकाराची आहे व त्यामध्ये नऊ घुमट आणि मंदिराच्या लाकडी खांबांवर रंगीत लाकडी कोरीवकाम असलेली तीन मुख्य मंदिरे आहेत.

त्यामध्ये मंदिराच्या मध्यवर्ती लक्ष्मी नारायण आणि रणछोडरायजी यांची मूर्ती, उजवीकडे हरिकृष्णाच्या रूपात स्वामीनारायणासह राधा कृष्णाची प्रतिमा आहे आणि डावीकडे वासुदेव, धर्म आणि भक्ती आहेत. तसेच या मंदिर परिसरात एक धर्मशाळा आहे. व मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वायव्येस एक ज्ञानबाग आहे ज्यामध्ये स्वामीनारायणांना समर्पित चार स्मारके आहेत.

3)Shree Siddhivinayak Mandir Mehmadabad-

श्री सिद्धिविनायक मंदिर हे गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील महेमदाबाद येथील एक अद्वितीय मंदिर आहे. हे मंदिर प्रभावी आकार आणि संरचनेसाठी वेगळे आहे. व भगवान गणपतीच्या चेहऱ्याच्या आकाराचे आशियातील सर्वात मोठे मंदिर आहे. हे मंदिर 22 बिघा क्षेत्रात पसरलेले एक विशाल धार्मिक संकुल आहे. तुलनेने नवीन असलेल्या या मंदिराचे बांधकाम 8 जानेवारी 2010 मध्ये सुरू झाले होते.

या मंदिराची लांबी 120.98 फूट, रुंदी 84.25 फूट आणि 71 फूट उंची,त्यामध्ये 8 फूट उंचीचे शिखर आहे. या मंदिराचा चेहरा आणि भगवान गणेशाची रचना हे एक अद्भुत दृश्य आहे. या मंदिराची पुष्टी 4 जून 2023 मध्ये आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने केली होती. दरवर्षी देश विदेशातून अनेक भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात.

4) Shree Santram Temple Nadiad-

श्री संतराम समाधी स्थान हे गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील नडियाद येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. संतराम महाराज हे अवधूत परंपरेतील एक महान पूजनीय संत होते. ते गिरनारवरून नडियाद येथे आले होते, त्यामुळे त्यांना गिरनार बावा, विधाय बावा किंवा सुख-सगजी म्हणूनही ओळखले जात होते. श्री संतराम महाराज 1872 मध्ये येथे आले आणि 15 वर्षे त्यांनी लोकांच्या अध्यात्मिक कल्याणासाठी घालवली.

व 1987 च्या माघ महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी जीवंत समाधी घेतली. ते ज्या रायनच्या झाडाच्या खोलीत राहत होते, त्या ठिकाणी आज त्यांची समाधी आहे. सध्या संतराम महाराज मंदिर ट्रस्टतर्फे गरजूंकरिता फिजिओथेरपी केंद्र, नेत्ररुग्णालय व इतर अनेक उपक्रम राबवले जातात.

Visit our website: allindiajourney.com

5)Galteshwar Mahadev Temple-

गालतेश्वर महादेव मंदिर हे गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील थासरा तालुक्यात असलेले एक ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटन स्थळ आहे. हे पवित्र स्थान माहीसागर आणि गालती या नद्यांच्या संगमावर वसलेले असून प्रसिद्ध डाकोरच्या ठाकोरजी मंदिरापासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे.

या मंदिराची स्थापत्य कला चालुक्य शैलीतील आहे व राजा चंद्रहास व ऋषी गालव यांच्या पौराणिक कथांसाठी ओळखले जाते. आणि विशेष म्हणजे या मंदिराचे अपूर्ण शिखर पूर्ण करण्याचे अनेकदा प्रयत्न केले परंतु हे मंदिर आजही शिखराशिवायच उभे आहे. दरवर्षी 25 लाखापेक्षा जास्त भाविक या मंदिराला भेट देतात.

6)Kund Vav (stepwell)-

कुंडवाव ही गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील कापडवंज येथील एक ऐतिहासिक पायरी विहीर आहे. ही विहीर राजा सिद्धराज जयसिंग यांनी 1142 मध्ये बांधली होती.असे सांगितले जाते की, सिद्धराजांचे पंडित सोमदत्त यांना कुष्ठरोग झाला होता. आणि ज्या ठिकाणी ‘कुंडवाव’ आहे, त्या ठिकाणी पूर्वी पाण्याचा एक डबका होता. त्या डबक्यात ते घसरले आणि त्या पाण्याच्या स्पर्शाने त्यांचा रोग बरा झाला.

हा चमत्कार पाहून धर्मनिष्ठ राजाने त्या ठिकाणी ‘कुंडवाव’ बांधली. पूर्वी या विहिरीला 32 कोठ्या होत्या परंतु सध्या येथे फक्त एकच कोठी पाहता येते. उर्वरित 31 कोठ्या नष्ट झाल्या आहेत. तसेच येथे उत्खनन करताना नारायण देव आणि महालक्ष्मी यांच्या सापडलेल्या मूर्ती आजही कापडवंज येथे आहेत.

7)Gopaldas’s Haveli, Vaso-

गोपालदास हवेली ही गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील वासो गावातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक हवेली आहे.ही हवेली सुमारे दीड बीघा परिसरात विस्तारलेली आहे.व 250 वर्षे जुनी आहे. या हवेलीच्या प्रत्येक भागामध्ये लाकडावर केलेली कलाकुसर, सुंदर नक्षीकाम व कोरीव काम पाहायला मिळते. या हवेलीच्या प्रत्येक खोलीचे छत हे पूर्णतः सागवान लाकडाने बनलेले आहे.

ही हवेली दोन शतकाहून जुनी असली तरी अजूनही मजबूत व सुंदर आहे. तसेच या हवेलीत नैसर्गिक रंगांनी तयार केलेल्या फ्रेस्को चित्रकला पाहायला मिळते.वासो गाव हे दरबार गोपालदास आणि महेंद्रशिभाई यांच्या हवेल्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे.

8) Natural beauty paradise, Pariej-

गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील नडियाद येथील परिजमध्ये एक मोठे तलाव, एक लहान तलाव आणि रतादेवर तलाव आहे. खांभात आखाताच्या परिसरात असलेल्या या तलावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचे पक्षी आढळून येतात. या तलाव परिसरात कॉमन, पायवर आणि आयवर हे पक्षी आहेत.

आणि सारसबेल्डी हा या भागातील प्रसिद्ध पक्षी आहे. परिज तलावाचे क्षेत्रफळ 12 चौरस किलोमीटर आहे. आणि खोली 8 फूट आणि कमाल खोली 10.5 फूट आहे. हा तलाव अहिंकल आणि नर्मदा कालव्यांमधून येणाऱ्या पाण्याने भरतो. विविध प्रकारच्या पक्षांचे निवासस्थान असलेल्या या ठिकाणाला पर्यटक आणि पक्षीप्रेमीं नेहमी भेट देत असतात.

9) Hot Water Pools-

गरम पाण्याचे कुंड हे गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील कथलाल तालुक्यातील लुसुंदर गावातील एक विशेष प्रकारचे गरम पाण्याचे कुंड आहे. या ठिकाणी सोमनाथ महादेवांचे एक भव्य मंदिर आहे व मंदिराच्या शेजारी हा तलाव आहे. या निसर्गरम्य ठिकाणी नदीचे पाणी महादेवांच्या विखुरलेल्या मूर्तीभोवती वाहते. आणि मंदिरासमोर गरम आणि थंड पाण्याचे कुंड आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कुंडातील पाणी कधीच खराब होत नाही.

10)Utkantheshwar Mahadev Temple –

उत्कंठेश्वर महादेव मंदिर हे गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील कापडवंज तालुक्यातील अतरसुंबा गावाजवळ, वात्रक नदीच्या काठी वसलेले अति प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर 2000 वर्षे जुने असून असे सांगितले जाते की हे मंदिर पूर्वी जाबाली ऋषींचे आश्रम होते व त्यांनी कठोर तपश्चर्येने भगवान शिव यांना प्रसन्न केले होते.

18 व्या शतकातील अली मुहम्मद खान यांनी त्यांच्या पर्शियन ग्रंथ, मिरात-ए-अहमदी मध्ये या मंदिराचे वर्णन केले आहे. या मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू आहे व या मंदिराला ‘उतंडिया महादेव’ म्हणूनही ओळखले जाते. श्रावण महिन्यात या मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

11)Gomti Lake-

गोमती तलाव हा गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील वडताळ गावातील एक पवित्र स्थळ व गावातील सर्वात मोठा तलाव आहे. हा तलाव डाकोर मंदिरासमोर असून 230 हेक्टर क्षेत्रफळात पसरलेला आहे. व त्याचे नाव द्वारकेतील गोमती नदीवरून ठेवले आहे. महाभारतातील आख्यायिकेनुसार, भगवान श्रीकृष्णासोबत प्रवास करताना भीमसेनने हा तलाव खोदण्याचे सांगितले जाते.

हा तलाव परिसर गर्द झाडी व अत्यंत निसर्गरम्य असून संध्याकाळच्या वेळी येथे रंगीबेरंगी दिव्यांनी सजावट केली जाते. तलाव संकुलात प्रसिद्ध रणछोड राय मंदिरही आहे. तसेच इथे पर्यटकांसाठी नौकाविहाराची सोय आहे. व या तलावात कासवांचे संगोपन केले जाते. या तलावाच्या पाण्यात स्नान केल्याने पाप नाहीशी होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.

12)Ramji Mandir-

रामजी मंदिर हे गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील एक अत्यंत आकर्षक व धार्मिक मंदिर आहे. हे मंदिर शांत परिसरात असून येथील परिसर अत्यंत मनमोहक व आध्यात्मिक आहे. शहराच्या सीमेवरील हे मंदिर भगवान राम, लक्ष्मण आणि सीता माई यांचे एक सुंदर मंदिर आहे. या मंदिरात भाविका मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात.

13) Meldi Mata Mandir, Marida-

मेलडी माता मंदिर हे गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील नडियादजवळ मरिडा गावातील प्राचीन,पवित्र व धार्मिक मंदिर आहे. या ठिकाणी मेलडी माता ही केरच्या झाडाखाली प्रकट झाल्याचे मानले जाते. हे एक अनोखे मंदिर आहे कारण इथे भक्त अशा प्रकारचे मन्नत ( नवस) मागतात की, मंदिरात कचरा काढायचा व लादी पोशा मारायचा त्यामुळे या मंदिरात गेल्यानंतर कोणीतरी लादी पुसताना भेटतेच. या मातेचे महात्म्य खूप महान आहे. भक्तांमध्येही ही माता सुरक्षा, शक्ती व इच्छापूर्ती देणारी देवी म्हणून पूजनीय आहे.

14) Dasha Mata Mandir Minavada-

दशा माता मंदिर हे गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील मीनावाडा येथील महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. या मंदिराची वास्तुकाला अत्यंत सुंदर व कोरीव कामाने समृद्ध आहे. असे सांगितले जाते की मीनावाडा हे शहर पूर्वी सातशे वर्षांपूर्वी मीनल नावाने ओळखत होते, त्यावेळी खूप मोठा पूर आला आणि हे गाव पूर्ण नष्ट झाले. त्यानंतर पुराच्या पाण्यातून एक दगडाची मूर्ती वाहत आली ती दशा मातेचि दगडाची मूर्ती मीनावाडा येथे स्थापन करण्यात आली . तसेच या मातेची महती खूप मोठे असून या ठिकाणी अजून एक गोष्ट सांगितली जाते की,

शारदा नावाच्या मुलींने दशा मातेचे व्रत केले होते, आणि ती जंगलात गुरे राखायला गेले असताना चिखलाच्या दलदलीत फसली होती तिला बाहेर येता येत नव्हते, तेव्हा तिने दशा मातेची धावा केला त्यावेळी साक्षात दशामातेने येऊन शारदाला दलदलीतून बाहेर काढले व दर्शन दिले. ही गोष्ट लोकांना समजल्यानंतर लोक देवीच्या दर्शनासाठी आणि शारदाला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात येऊ लागले.

15)Hari Om Ashram , Nadiad-

हरी ओम आश्रम हे गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील नडियाद, येथील एक प्रसिद्ध आध्यात्मिक केंद्र आहे, हा आश्रम पूज्य श्री मोटा यांनी स्थापन केला आहे. त्यांचा जन्म 4 सप्टेंबर 1898 रोजी झाला. या आश्रमातील वातावरण अत्यंत आध्यात्मिक शांत व मंगलमय आहे. श्री मोटा यांनी हरिजन सेवेचे कार्य आपल्या साधनेचा एक भाग म्हणून स्वीकारले आणि लोक कल्याणासाठी आपले आयुष्य खर्च केले.

तसेच हा आश्रम अभ्यास आणि मौनव्रत साठी प्रसिद्ध आहे, या ठिकाणी लोक काही काळ एकांतात ध्यान व मौनव्रत करतात. या आश्रमात भाविक पूज्य श्री मोटा यांची सीडी, पुस्तके आणि फोटोग्राफ्स खरेदी करू शकतात.

16)Bhammaria Vav (stepwell) –

भामरिया वाव ही गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील मेहमदाबादजवळ सोजाली गावात असलेली एक ऐतिहासिक आणि अद्वितीय पायरी विहीर आहे. ही विहीर 15 व्या शतकात बांधली गेली होती. ही भव्य रचना असलेली पायऱ्यांची विहीर सुमारे 14 फूट लांबीच्या अष्टकोनी आकारात डिझाइन केली आहे. आणि या विहिरीचे प्रवेशद्वार एका अरुंद जिन्यातून विहिरीच्या तळापर्यंत पोहोचते.

या विहिरीत चार गोलाकार खोल्या आहेत ज्यांच्या उत्तर आणि दक्षिण प्रवेशद्वाराला कुंड आहेत. चार पायऱ्या विहिरीच्या खांबाच्या खालच्या भागात जातात ज्याभोवती आठ खोल्या बांधलेल्या आहेत आणि विहिरीच्या खंबासमोर सुंदर सजवलेल्या बाल्कनी आहेत. ही विहीर आणि परिसर भग्नावस्थेत असल्यामुळे या ठिकाणी सध्या वटवाघुळचे साम्राज्य आहे.

17)Shri Mai Mandir-

श्री माई मंदिर हे गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील नडियाद शहरातील एक अत्यंत विशाल धार्मिक मंदिर आहे. या मंदिरात शिवाची सर्वात मोठी मूर्ती आहे. व या मंदिरात 50 पेक्षा जास्त देव-प्रतिमा आहेत आणि 108 शिखरपात्र असलेली रचना आहे.हे अधिपीठ व मंदिर 1999 मध्ये स्थापन झाले आहे. तसेच या मंदिरात एक 1.2 मीटर उंचीचे आणि 261 किलो वजनाचे चांदी आणि सोन्याने मडवलेले श्री यंत्र आहे. हे मंदिर सर्व धर्मांचा आदर, समता आणि बंधुता ह्या तत्वांवर कार्य करते.

18) Pariyej Lake – Bird Watch Tower-

परीज तलाव हा गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील एक नैसर्गिक ठिकाण व सुंदर पर्यटनस्थळ आहे.परीज तलाव खूप मोठा असून पक्षीनिरीक्षणासाठी प्रसिद्ध आहे. या तलावात विविध प्रकारचे स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला भेटतात. त्यामध्ये सारस क्रौंच, फ्लेमिंगो, बया विव्हर याशिवाय विविध पक्षांच्या प्रजाती पाहायला भेटतात.

हा अप्रतिम तलाव परिसर, निसर्गरम्य व गर्द झाडीने वेढलेला आहे. आणि तलावाच्या काठावर पक्षी निरीक्षणासाठी एक उंच वॉच टॉवर आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी हे छायाचित्रणासाठी उत्कृष्ट ठिकाण आहे. तसेच येथे विश्रांतीगृहाची ही सोय आहे.

19)Bhatiji Maharaj Temple,fagvel-

भाटीजी महाराज मंदिर हे गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील काठलाल तालुक्यातील फागवेल गावातील प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर 500 वर्षांपूर्वी बांधले असून सध्या हे मंदिर जीर्ण झाल्याने मोठ्या प्रमाणावर नूतनीकरण करण्यात आले आहे. आणि नवीन मंदिर भव्य आणि पांढऱ्या संगमरवरात बांधले आहे. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या वेळी फागवेल येथे दोन दिवसाची मोठी यात्रा भरते.

त्यावेळी हजारो लोक या यात्रेत सहभागी होतात. तसेच खेडा जिल्ह्यातील देवडा गावात, प्रत्येक शुक्रवारी हिंदू आणि मुस्लिम मोठ्या संख्येने एकत्र येऊन मद्यत्यागाची प्रतिज्ञा घेतात आणि भाटीजी महाराजांच्या मंदिरात दर्शन घेतात.

20)Shree Kamnath Mahadev Mandir-

कामनाथ महादेव मंदिर हे गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील राधू गावातील अत्यंत पवित्र आणि प्राचीन भगवान शिव मंदिर आहे. या मंदिरातील आश्चर्य किंवा चमत्कार म्हणजे येथे शंभर वर्ष पूर्वीचे जुने तूप आहे व या ठिकाणी 1200 मडके तुफानी भरलेले आहेत. परंतु हे शंभर वर्षांपूर्वीचे तूप ना वितळते ना खराब होते.एवढे वर्षे लोटली पण जुने तूप अजून का खराब झाले नाही हे जाणून घेण्यासाठी अनेक लोक येथे संशोधनासाठी आले. पण काहीही निष्पन्न झाले नाही.

हे मंदिर वात्रक नदीच्या काठावर आणि राधू गावात पाच नद्यांच्या संगमाजवळ आहे. हे मंदिर 1379 मध्ये बांधले गेले आणि येथील पवित्र ज्योत भगवान शिवाचे महान भक्त पटेल जेसंगभाई हिराभाई यांनी आणली. आणि तेव्हापासून आजपर्यंत या मंदिरात ही अखंड ज्योत चालू आहे. येथे भक्तांकडून तुपाचा ‘चारू’ अर्पण करण्याची परंपरा आहे आणि नवस पूर्ण झाल्यावर आपल्या इच्छेने कितीही प्रमाणात तूप दिले जाते. राधू गावातील लोक या महादेवाला ‘दादा’ म्हणतात.

21)Roza Rozi Maqbara-

रोजा आणि रोजी हा मकबरा गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील सोजाली गावातील, वर्तक नदीच्या काठावर असलेला प्रसिद्ध मकबरा आहे. हा मकबरा 1560 मध्ये सय्यद मीरान बुभारी यांनी बांधला होता. आणि त्यामध्ये रोजा हा मुबारक सय्यदचा मकबरा आहे व रोजी हा मुबारक सय्यदच्या पत्नी सैफुद्दीन आणि निजामुद्दीनचा भाऊ यांचा मकबरा आहे. हा मकबरा घुमट, कमानी, स्तंभ आणि नाजूक नक्काशीदार दगडी जाळ्यांनी सजवलेला आहे.

अद्वितीय स्थापत्यकला असलेल्या या मकबराच्या स्तंभांची संख्या मोजणे कठीण आहे आणि स्तंभ आणि कमानींमधून पाहिल्यास येथे कधीही न संपणाऱ्या रेषेची अनुभूती मिळते. रोजा ही विटांनी बनलेली एक सोपी रचना आहे. रोजा रोजा हे मुस्लिमांसाठी एक पवित्र स्थान असून दरवर्षी या ठिकाणी ईद-उल-फित्राच्या 10 व्या दिवसानंतर उरस मोठ्या आनंदात साजरा केला जातो. हा मकबरा मेहेमदाबाद शहरापासून 4 किलोमीटर अंतरावर आहे.

22)Khedia Hanuman Temple-

खेडिया हनुमान मंदिर हे गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील खेडा गावातील एक प्रसिद्ध मंदिर आहे. हे प्राचीन मंदिर हनुमान टेकरा नावाच्या डोंगरावर वसलेले असून राजा मयूरध्वज यांनी हे मंदिर बांधले होते. या मंदिरातील हनुमानाची मूर्ती ही स्वयंभू आहे. व हे एक अतिशय जुने, सुंदर, स्वच्छ आणि शांत परिसर असलेले मंदिर आहे. दर शनिवारी खेड्याच्या सर्व भागांतून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.

23)shri atmasiddhishastra rachnabhoomi-

श्री आत्मसिद्धी शास्त्र रचना भूमी हे गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील नडियाद येथील शांतता आणि प्रसन्नतेचा अनुभव देणारे ठिकाण आहे. 1952 मध्ये श्रीमद् राजचंद्रजींनी लोकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी “श्री आत्मसिद्धि शास्त्र” हे पौराणिक प्रवचन लिहिले. हे सुंदर स्मारक नडियाद येथे श्री आत्मसिद्धी शास्त्राच्या रचनेच्या पवित्र स्थळी उभारण्यात आले आहे.

आणि या स्थळाची त्या काळातील दरवाजे आणि भिंतीवरील सजावट मूळ स्वरूपत ठेवली आहे. या ठिकाणी श्री आत्मसिद्धी शास्त्राच्या पॅनेल्सची श्रीमद् राजचंद्रजींच्या स्वतःच्या हस्ताक्षरात कोरलेली एक सुंदर मालिका आहे.

Visit the travel blog

1) खेडा जिल्ह्यातील वडतालमधील तीर्थराजश्री स्वामीनारायण मंदिर हे कोणत्या साली बांधण्यात आले?

खेडा जिल्ह्यातील वडतालमधील तीर्थराजश्री स्वामीनारायण मंदिर हे 1881 साली बांधण्यात आले.

2)खेडा जिल्ह्यातील श्री सिद्धिविनायक मंदिर कोणत्या तालुक्यात आहे?

खेडा जिल्ह्यातील श्री सिद्धिविनायक मंदिर महेमदाबाद तालुक्यात आहे.


3))खेडा जिल्ह्यातील गरम पाण्याचे कुंड कोणत्या गावात आहेत?

खेडा जिल्ह्यातील गरम पाण्याचे कुंड कथलाल तालुक्यातील लुसुंदर गावात आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top