दाहोद जिल्ह्यातील 23 प्रसिद्ध पर्यटन स्थळे- Top 23 places to visit in Dahod District

मित्रांनो भारतभ्रमंतीमध्ये तुम्हाला भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळांची माहिती मिळणार आहे. आता तुम्ही पाहणार आहात गुजरात राज्यातील दाहोद जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे. दाहोद जिल्हा हा गुजरात राज्यातील दुधमती नदीच्या काठावर वसलेला एक आदिवासी बहुल जिल्हा आहे. या जिल्ह्याची निर्मिती 2 ऑक्टोबर 1997 रोजी पंचमहाल जिल्ह्यातून करण्यात आली. आणि दाहोद हे या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या जिल्ह्याच्या सीमा राजस्थान आणि मध्य प्रदेश या ‘दोन सीमा’ राज्यांना लागून असल्यामुळे आणि संत दधीचि यांच्या नावावरून याला दाहोद असे म्हटले जाते. Top 23 places to visit in Dahod District

या जिल्ह्यात सात तालुके असून येथील अर्थव्यवस्था मुख्यत्वे शेतीवर अवलंबून आहे. तसेच मुघल सम्राट औरंगजेबाचा जन्म 1618 मध्ये दाहोदच्या किल्ल्यात झाला होता. आणि स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे यांनी आपल्या शेवटच्या दिवसांत येथे आश्रय घेतल्याचे सांगितले जाते. हा जिल्हा जंगले आणि टेकड्यांनी व्यापलेला असून, येथे दाऊदी बोहरा समुदायाची मोठी वस्ती आहे. व ‘नजमी मशीद’ ही येथील प्रसिद्ध वास्तू आहे. सध्या हा जिल्हा शिक्षण, आरोग्य या सुविधांच्या बाबतीत ‘आकांक्षी जिल्हा’ म्हणून आणि स्मार्ट सिटी मिशन अंतर्गतही विकसित होत आहे. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक, सांस्कृतिक व नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत.

Top 23 places to visit in Dahod District

दाहोद जिल्ह्यातील 23 प्रसिद्ध पर्यटन स्थळे

1)Bavka Shiva Temple-

Top 23 places to visit in Dahod District

बावका शिव मंदिर हे गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील,बावका गावातील हिरलाव तलावाजवळ एका टेकडीवर वसलेले प्राचीन आणि ऐतिहासिक शिवमंदिर आहे. हे मंदिर 12 व्या शतकादरम्यान सोळंकी काळातील (चौुलुक्य राजवंश) राजा भीमदेव दुसरा यांनी बांधले गेल्याचे ऐतिहासिक पुरावे मिळतात. हे मंदिर एक ‘पंचायतन’ शैलीतील मंदिर संकुल असून यात मुख्य मंदिरासह चार उप-मंदिरे होती.

या मंदिराची मारु-गुर्जर वास्तुकला, मंदिराच्या भिंतींवर आणि खांबांवर अत्यंत सुबक आणि गुंतागुंतीचे कोरीव काम, त्यामध्ये अप्सरा, देवदेवता आणि भिंतींवरील कामुक शिल्पांसाठी प्रसिद्ध असल्याने याला ‘गुजरातचे खजुराहो’ असेही म्हटले जाते. आख्यायिकेनुसार, एका देवदासीने हे मंदिर एका रात्रीत बांधले होते. सध्या हे मंदिर उद्ध्वस्त अवस्थेत असून,भारतीय पुरातत्व सर्वेक्षणद्वारे राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून संरक्षित करण्यात आले आहे.

2)Ratanmahal Sloth Bear Sanctuary-

रतनमहाल स्लॉथ बेअर अभयारण्य हे गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील,मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेले एक संरक्षित क्षेत्र आहे. या अभयारण्यातील आकर्षणाचे केंद्र म्हणजे संपूर्ण राज्यात सर्वाधिक स्लॉथ अस्वल येथील जंगलात आढळतात.तसेच पाणम नदीचे उगमस्थान, ट्रेकिंग ट्रेल्स आणि धबधबे या अभयारण्यातच असून हे अभयारण्य सुमारे 55.65 चौरस किलोमीटर परिसरात विस्तारलेले आहे.

या क्षेत्राला मार्च 1982 मध्ये वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. स्लॉथ बेअर व्यतिरिक्त, येथे बिबट्या, सिंह, हरीण, पट्टेदार तरस, चार शिंगे असलेला काळवीट आणि विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी आढळून येतात.

3)Aurangzeb Fort –

औरंगजेबचा किल्ला हा गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील, एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला ‘गढी किल्ला’ म्हणूनही ओळखला जातो. मुघल सम्राट औरंगजेबाचा जन्म 3 नोव्हेंबर 1628 रोजी याच किल्ल्यात झाला होता. हा किल्ला मुघल सम्राट शाहजहानने (औरंगजेबाचे वडील)औरंगजेबाच्या जन्माच्या स्मरणार्थ प्रवाशांसाठी ‘विश्रामगृह’ म्हणून बांधला होता.

औरंगजेबाला त्याच्या जन्मस्थानाबद्दल विशेष प्रेम असल्यामुळे त्याने 1704 मध्ये त्याचा मुलगा मुहम्मद आझमला लिहिलेल्या पत्रात दाहोदच्या लोकांवर दया दाखवण्याचे आदेश दिले होते. तसेच 1857 च्या उठावामध्ये प्रसिद्ध सेनानी तात्या टोपे यांनी या किल्ल्यावर काही काळ वास्तव्य केले होते. या
किल्ल्याच्या परिसरात काही दर्गे असून सध्या या किल्ल्याचा वापर सरकारी कार्यालयांसाठी केला जातो.

4)Ratanmahal Waterfall-

रतनमहल धबधबा हा गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील, मध्य प्रदेश सीमेवर, देवगड बारियाजवळ,घनदाट जंगल, पान्नाम नदी,आळशी अस्वल आणि गर्द वनराईसाठी प्रसिद्ध असलेल्या रतनमहल वन्यजीव अभयारण्यामधील एक नैसर्गिक आणि सुंदर धबधबा आहे. हा धबधबा ‘नालधरा धबधबा’ म्हणूनही ओळखला जातो. या ठिकाणी पोहोचण्यासाठी जंगलातून ट्रेकिंग करावे लागते. पावसाळ्यात तर येथील परिसर अत्यंत सुंदर व मंत्रमुग्ध करणारा असतो.

Visit our website: allindiajourney.com

5)Kali Dam-

काळी धरण हे गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील, एक महत्त्वाचे धरण आणि पर्यटन स्थळ आहे. हे धरण काळी नदीवर बांधलेले असून हे धरण ब्रिटिश काळात 1926 मध्ये रेल्वे वसाहतीला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आले होते, म्हणून याला ‘रेल्वे डॅम’ असेही म्हटले जाते.

येथील धरण परिसर अत्यंत निसर्गरम्य असून पर्यटकांना पिकनिकसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.तसेच धरणाजवळ एक छोटे विश्रामगृह, फिरण्यासाठी आणि हायकिंगसाठी जागा, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा आणि एक शिव मंदिर आहे.

6)Mangadh Hill-

मानगड टेकडी ही गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील आदिवासी बांधवांसाठी अत्यंत पवित्र श्रद्धास्थान आहे. या टेकडीला ‘आदिवासींचे जालियनवाला बाग’ म्हणून ओळखले जाते.कारण 17 नोव्हेंबर 1993 मध्ये क्रांतीकारक गोविंद गुरू यांच्या नेतृत्वाखाली हजारो भील आदिवासी येथे एकत्र जमले असताना ब्रिटीश सैन्याने या निशस्त्र आदिवासींवर बेछूट गोळीबार केला होता,

तेव्हा सुमारे 1,500आदिवासी शहीद झाले होते. गुजरात सरकारने येथे शहीद आदिवासींच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘गोविंद गुरू स्मृती वन’ विकसित केले आहे. व टेकडीवर एक भव्य शहीद स्मारकही उभारले आहे.या टेकडीच्या सभोवताली घनदाट जंगले आणि सुंदर डोंगररांगा आहेत, तसेच काडणा धरणाचे बॅकवॉटर (जलाशय) जवळ आहे.

7)Sidhraj Jaysinh Chhab Talav-

सिद्धराज जयसिंह छाब तलाव हा गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील, एक महत्त्वाचा ऐतिहासिक वारसास्थळ आहे. हा तलाव मध्ययुगीन काळात, गुजरातचा प्रतापी सोलंकी राजा सिद्धराज जयसिंह यांनी माळवा यात्रेदरम्यान आपल्या सैन्यासाठी बांधला होता.

सध्या दाहोद स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत या तलावाचे नूतनीकरण करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023’मध्ये या पुनर्विकसित तलावाचे लोकार्पण केले आहे. पर्यटकांसाठी येथे वॉकिंग आणि सायकलिंग ट्रॅक, नयनरम्य बागा आणि मुलांसाठी खेळाची सुविधा आहेत.

8)Tribal Museum, Dahod –

आदिवासी संग्रहालय हे गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील,इंदूर-अहमदाबाद हायवेवर असलेले आदिवासी लोकांची समृद्ध संस्कृती, कला आणि वारसा जतन करणारे एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. या संग्रहालयात आदिवासींचा इतिहास, परंपरा, आणि त्यांच्या बलिदानाची माहिती दिली जाते. तसेच येथे आदिवासींची पारंपरिक मातीची आणि लाकडाची घरे (नलिया आणि थापडा) हुबेहूब तयार करण्यात आली आहेत.

याशिवाय येथे बांबूच्या टोपल्या, आदिवासी सण, जीवन, कला आणि परंपरा दर्शवणारी मोठी छायाचित्रे, जीवन-आकाराची शिल्पे, शेतीची अवजारे, मातीची भांडी आणि पारंपरिक वाद्ये प्रदर्शनात मांडली आहेत.

9)Najmi Masjid-

नजमी मशीद ही गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील,महात्मा गांधी रोडवरील नाझमी मोहल्ला परिसरात असलेली दाऊदी बोहरा मुस्लिम समुदायासाठी एक महत्त्वपूर्ण धार्मिक केंद्र आहे. या मशिदीची वास्तुकला आधुनिक व सुंदर असून ही मशीद दाऊदी बोहरा समुदायातील सर्वात मोठ्या मशिदींपैकी एक आहे.

या मशिदीमध्ये सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांनी अनेक प्रसंगी प्रवचने दिली आहेत. तसेच मुहर्रमच्या दहा दिवसांच्या काळात येथे धार्मिक कार्यक्रम आणि जलसे आयोजित केले जातात, तेव्हा (आशुरा), समुदायाचे सदस्य कर्बला येथील इमाम हुसेन यांच्या बलिदानाचे स्मरण केले जाते.

10)Bhamrechi Mata Temple-

भमरेची माता मंदिर हे गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील,रंधीकपूर गावानजीक कबूतरी नदीच्या तीरावर वसलेले एक ऐतिहासिक आणि धार्मिक मंदिर आहे. या मंदिरातील भमरेची मातेची मूर्ती स्वयंभू आहे. हे मंदिर डोंगरदऱ्यांच्या आणि घनदाट जंगलाच्या कुशीत असून पावसाळ्यात येथील परिसर अतिशय सुंदर आणि नयनरम्य असतो. तसेच हे माताजींचे मंदिर एका पहाडातील गुहेत असून स्थानिकांच्या मते या गुहेत माता आजही वास्तव्यास आहे.

11)Shri Kedarnath Mahadev Mandir-

श्री केदारनाथ महादेव मंदिर हे गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील,चोसला गावाजवळील एक प्राचीन,धार्मिक आणि दिव्य शिवमंदिर आहे. हे मंदिर चोसाला काली धरणाच्या परिसरात असून एका नैसर्गिक दगडाच्या लांब गुहेत बांधलेले आहे. तसेच या मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू आहे.

आणि मंदिराच्या ‘गोमुखातून’ अखंड पाण्याची धारा वाहत असते. आख्यायिकेनुसार महाभारतातील पांडवांनी त्यांच्या वनवासादरम्यान येथे वास्तव्य आणि तपश्चर्या केली होती. तसेच येथील गुहा थेट उज्जैनपर्यंत जाते असेही सांगितले जाते.

12)Patadungri Dam-

पाटाडुंगरी धरण हे गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील, गरबाडा तालुक्यातील एक महत्त्वाचे धरण आहे. या धरणाला ‘ठक्करबाप्पा सरोवर’ या नावानेही ओळखले जाते. धरण परिसर अत्यंत निसर्गसंपन्न व हिरवळीने बहरलेला असल्यामुळे पर्यटकांचे हे लोकप्रिय ठिकाण आहे. या धरणातुन गरबाडा तालुक्यातील सुमारे 42 गावांना पिण्याच्या पाणी व सिंचनासाठी पुरवठा केला जातो. पर्यटक आणि फोटोग्राफी प्रेमींसाठी हे एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे.

13)Shree Tekri Hanuman Mandir-

श्री टेकरी हनुमान मंदिर हे गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील,झालोड तालुक्यातील, लिमडी येथील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान आहे. या मंदिरात दक्षिणमुखी हनुमानजींची स्वयंभू मूर्ती असून ती भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते, असे मानले जाते. शनिवार आणि मंगळवारी या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. येथील मंदिर परिसर अत्यंत निसर्गरम्य असून उंचावर असल्यामुळे भाविकांना आसपासच्या परिसराचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळते.

14)Bharat Tower-

भारत टॉवर हा गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील, स्टेशन रोड, वद बाजार’ भागात असलेले झालोड येथील महत्वाचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हा टॉवर ‘झालोद टॉवर’ म्हणूनही ओळखला जातो.या टॉवरच्या आसपास ऐतिहासिक बाजारपेठ आणि शहरातील इतर महत्त्वाची ठिकाणे आहेत. दाहोद जिल्हा दुधमती नदीच्या काठी वसलेला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा असून येथे मोगल सम्राट औरंगजेबचा जन्म झाला होता.

15)Ghughardev Mahadev Temple-

घुगरदेव महादेव मंदिर हे गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील, झालोड तालुक्यात, चाकलिया येथील नैसर्गिक परिसरातील धार्मिक मंदिर आहे. हे शिव मंदिर खूप प्राचीन असून ते एका लांब गुहेत आहे. येथील स्थानिक लोक सांगतात की या ठिकाणी शिव महादेव पायात घुंगरू बांधून नर्तन करायचे,

त्यामुळे या मंदिराला घुगरदेव महादेव मंदिर हे नाव पडले आहे. दरवर्षी या मंदिरात मोठी यात्रा भरते. मंदिर परिसर अत्यंत निसर्गरम्य, हिरव्यागार टेकड्या आणि गर्द वनराईने बहरलेला आहे. त्यामुळे पर्यटन आणि भाविकांचे हे आकर्षणाचे ठिकाण आहे.

16)Devzari Mahadev Mandir-

देवझरी महादेव मंदिर हे गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील,एक प्राचीन आणि निसर्गरम्य धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर निसर्ग संपन्न डोंगराळ भागात व गर्द झाडांमध्ये असून, दाहोद शहरापासून साधारणपणे 15 किमी अंतरावर रोझम गावाजवळ आहे. या मंदिरात पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासादरम्यान काही काळ वास्तव्य केल्याचे सांगितले जाते. तसेच या मंदिर परिसरात एक सुंदर धबधबा आहे.

आणि अनेक नैसर्गिक पाण्याचे झरे वाहत असल्याने या ठिकाणाला ‘देवझरी’ असे नाव पडले आहे. येथील भगवान शिवाच्या मंदिरात भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात येथे मोठी गर्दी असते.

17)Rajmahal-

राजमहाल हा गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील, देवगड बारिया येथील प्राचीन, ऐतिहासिक व अत्यंत सुंदर राजमहाल आहे. हा राजवाडा 19 व्या शतकातील युरोपियन व इटालियन वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना असून तो लेफ्टनंट कर्नल महाराज श्री नहारसिंहजी चौहान यांनी बांधला होता आणि तो खिची चौहान राजघराण्याचा एक भाग आहे. सध्या हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून विकसित आहे.

18)Royal Lal Bungalow Palace –

रॉयल लाल बंगलो पॅलेस रिसॉर्ट हे गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील,देवगड बारिया येथील पॅलेस व लक्झरी हेरिटेज प्रॉपर्टी आहे. या रिसॉर्टमध्ये राजेशाही निवास अनुभव, स्विमिंग पूल, जिम्न, एडवेंचर गेम्स, लायब्ररी, म्युझियम, डिस्क डान्स, पूल टेबल, नेचर ट्रेल, योग आणि मेडिटेशन,

ॲडव्हेंचर गेम्स, सेल्फी पॉईंट, इनडोअर-आउटडोअर गेम्स, हेरिटेज वॉक, आलिशान खोल्या आणि शाही भोजन उपलब्ध आहे. तसेच येथे डेस्टिनेशन वेडिंग्स आणि कॉर्पोरेट इव्हेंट्ससाठीही शाही निवास, प्रीमियम रेस्टॉरंट्स उपलब्ध आहेत.

19)Rentiya Lake-

रेंटीया तलाव हा गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील, खरोद येथील एक नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे.रेंटीया तलाव परिसरातील वातावरण शांत आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी स्थानिक लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. या ठिकाणाला भेट देण्यासाठी अनेक शैक्षणिक सहलींही येथे येत असतात.या ठिकाणी ‘रेंटीया टुरिझम’ नावाने पर्यटन उपक्रम चालवले जातात. आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

20) Smart City Dahod-

दाहोद स्मार्ट सिटी ही गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील,आधुनिक आणि शाश्वत शहर म्हणून विकसित होत आहे. भारत सरकारच्या स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत, दाहोदची निवड झाली आहे. त्यामध्ये 121 कोटी रुपये खर्चून इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर केंद्र उभारले आहे. हे शहराचे ‘आयटी हब’ असून येथून सीसीटीव्हीद्वारे संपूर्ण शहरावर 24/7 देखरेख ठेवली जाते.

तसेच ऐतिहासिक छाब तलावाचे 120.87कोटी रुपये खर्चून नूतनीकरण केले आहे. याशिवाय स्मार्ट वाहतूक व्यवस्था,आदिवासी संग्रहालय विकास, पर्यावरण आणि ऊर्जा, ‘वॉटर स्काडा’ प्रकल्पांतर्गत पाणी पुरवठा व सांडपाणी व्यवस्थापन यांचा समावेश आहे.

21)Udhal Mahuda-

उधाल महुडा हे गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील, धनपुर तालुक्यातील एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आणि इको-कॅम्पसाइट आहे. हे ठिकाण रतनमहल अस्वल अभयारण्याचा भाग असून अस्वलांच्या दर्शनासाठी प्रसिद्ध आहे. पर्यटकांच्या निवासासाठी येथे इको कॅम्पसाइटची आहे. त्यामध्ये राहण्यासाठी ट्री हाऊस आणि तंबूंची व्यवस्था आहे.

तसेच येथे असलेल्या वॉच टॉवरवरून पर्यटकांना निसर्गाचे आणि अभयारण्यातील वन्यजीवांचे निरीक्षण करता येते. हे ठिकाण निसर्गरम्य डोंगराळ भागात असून येथील तलाव आणि वनराईमुळे पावसाळ्यात हे अतिशय सुंदर दिसते.

22)panch krishna Temple, therka-

पंचकृष्ण मंदिर हे गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील,थेरका येथील एक प्राचीन व धार्मिक मंदिर आहे. महाभारत काळातील पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासाच्या काळात या ठिकाणी वास्तव्य केले होते आणि श्रीकृष्णांनी त्यांना भेट दिली होती, म्हणून तेराव्या शतकात या मंदिराची निर्मिती झाली.

येथे देवतांच्या अतिशय प्राचीन मूर्ती आहेत. या मंदिराला ‘पाच देवो के ग्यारह समूह मंदिर’ असेही म्हणतात. येथील मंदिर परिसर अत्यंत निसर्गरम्य व शांत आहे.

23)Rabdal Park-

रबदल पार्क हे गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील,एक निसर्गरम्य परिसरातील सार्वजनिक उद्यान आहे. हा उद्यान परिसर अत्यंत सुंदर, गर्द झाडी आणि हिरवळीने नटलेला आहे. स्थानिक लोकांसाठी हे मनोरंजनाचे ठिकाण असून येथे मुलांसाठी खेळण्याची जागा, चालण्याचे मार्ग, बसण्यासाठी बाकडी, हिरवळ व शांत परिसर उपलब्ध आहे. कौटुंबिक सहलीसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

Visit the travel blog

1)दाहोद जिल्ह्यात कोणता आदिवासी समुदाय आहे?

दाहोद जिल्ह्यात भिल्ल आणि पटेलिया यांचा बहुसंख्य आदिवासी समाज एकट्या दाहोद जिल्ह्यात आढळतो.


2)गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील बावका शिव मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे?

गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील बावका शिव मंदिर हे बावका गावातील हिरलाव तलावाजवळ एका टेकडीवर वसलेले प्राचीन आणि ऐतिहासिक शिवमंदिर आहे.


3)गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील, राजमहाल कोणी बांधला होता?

गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील, राजमहाल हा 19 व्या शतकात लेफ्टनंट कर्नल महाराज श्री नहारसिंहजी चौहान यांनी बांधला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top