मित्रांनो भारतभ्रमंती ही अशी वेबसाईट आहे, जिथे तुम्हाला भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळांची माहिती मिळणार आहे. आता तुम्ही पाहणार आहात गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे.नर्मदा जिल्हा हा गुजरातच्या पूर्व भागातील निसर्गरम्य स्थळे आणि वनराई असलेला एक प्रमुख जिल्हा असून,या जिल्ह्यातून नर्मदा नदी वाहते त्यामुळे याचे नाव नर्मदा नदीवरून ठेवण्यात आले आहे. हा जिल्हा 1997 मध्ये भरूच आणि वडोदरा जिल्ह्यातून वेगळा करून तयार करण्यात आला. नर्मदा जिल्ह्याचे मुख्यालय राजपीपळा येथे आहे. Top 21 places to visit in Narmada District
या जिल्ह्याला वडोदरा, छोटा उदयपूर, महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा, सूरत,तापी, व भरूच या जिल्ह्यांच्या सीमा लाभल्या आहेत. या जिल्ह्यात चार तालुके असून,डांग आणि पोरबंदर नंतर हा गुजरातमधील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात शेती हा प्रमुख व्यवसाय असून येथे नर्मदा आणि कर्जन या दोन प्रमुख नद्या वाहतात. तसेच हा जिल्हा जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी, नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक महत्त्व आणि सांस्कृतिक वारसा यासाठी प्रसिद्ध आहे.
Top 21 places to visit in Narmada District
नर्मदा जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे
1)Nilkanth Dham Poicha –



नीलकंठ धाम स्वामीनारायण मंदिर हे गुजरात मधील नर्मदा नदीच्या काठावर, शाही महलासारखे सुंदर मंदिर पोईचा गावात आहे. 105 एकरवर विस्तारलेले हे मंदिर गुजरातमधील सर्वात आकर्षक तीर्थस्थळांपैकी एक असून ते 2013 मध्ये बांधण्यात आले. या मंदिराची वास्तुकला व शिल्पकाला पारंपारिक भारतीय पद्धतीची आहे व येथे हिरवळ आणि अनेक देवतांच्या मूर्ती आहेत.
हे मंदिर श्री धर्मवल्लभदासजी स्वामींच्या मार्गदर्शनाखाली स्वामीनारायण गुरुकुल राजकोट संस्थानने बांधले आहे. या मंदिरात गौ धाम,शेषनाग, भगवान गणेश, हनुमानजी, 108 गौमुख, सप्तर्षी आणि 12 विष्णू अवतार दर्शन आहे. तसेच इथे पर्यटकांसाठीकिड्स पार्क झोन, एक्झिबिशन झोन, फूड कोर्ट, पार्क झोन आहेत.
2)Shoolpaneshwar Mahadev Temple-

शूलपाणेश्वर महादेव मंदिर हे गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथील भगवान शिवाचे पवित्र तीर्थस्थळ आहे.हे मंदिर नर्मदा नदीच्या काठावर वसलेले असून येथून नर्मदा नदीचे विहंगम दृश्य,स्टॅच्यू ऑफ युनिटी, परिसरातील हिरवळीने नटलेले डोंगर आणि सरदार सरोवर धरण यांचे चित्तथरारक दृश्य अनुभवता येते. या मंदिर संकुलामध्ये लहान मंदिरे,ध्यानगृहे आणि वाचनालये आहेत. दरवर्षी महाशिवरात्रीला भाविकांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
3)Statue of Unity-

स्टॅच्यू ऑफ युनिटी हा गुजरात मधील नर्मदा जिल्ह्यात केवडिया जवळ सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान होते.आणि अहिंसक भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान महात्मा गांधींचे अनुयायी होते. या पुतळ्याचे उद्घाटन ऑक्टोबर 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
हा पुतळा 182 मीटर (597 फूट)उंच असून तो नर्मदा नदीच्या खोऱ्यात, सरदार सरोवर धरणासमोर आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या राजकीय एकात्मतेत अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या पुतळ्याजवळील परिसरात व्हॅली ऑफ फ्लॉवर्स,आणि कॅक्टस गार्डन ही सुंदर ठिकाणे आहेत. तसेच येथे पुतळ्यावर दररोज लेझर लाईट आणि साऊंड शो सादर केला जातो.
4)Cactus Garden-

कॅक्टस गार्डन हे गुजरात मधील नर्मदा नदीच्या काठावर, फ्लॉवर ऑफ व्हॅलीच्या बाजूला असलेले, देशातील सर्वात मोठ्या कॅक्टस गार्डनपैकी एक आहे.या विस्तीर्ण बागेत, एक भव्य आर्किटेक्चरल ग्रीनहाउस असून येथे अमेरिका, आफ्रिका आणि विविध खंडातून वेगवेगळ्या आकारांचे कॅक्टस आणले आहेत.
हे उद्यान 25 एकरमध्ये विस्तारलेले असून येथील बागेत कॅक्टसची 430 प्रजातींची 6 लाख रोपे आहेत. कॅक्टस हे मुख्यत्वे वाळवंटी प्रदेशात आढळतात. या उद्यानाचे उद्दिष्ट वाळवंटी परिसराचा अनुभव देण्यासाठी आणि संपूर्ण जगातील कॅक्टस वनस्पतींच्या विविध प्रजातींचे संरक्षण करणे हा आहे.
5)Zarwani Waterfall-

झरवाणी धबधबा हा गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यामध्ये शूलपाणेश्वर अभयारण्यामध्ये, निसर्गरम्य ठिकाणी असलेला एक सुंदर धबधबा आहे. हा धबधबा सातपुडा पर्वतरांगामध्ये,राजपीपळापासून सुमारे 28 किमी अंतरावर आहे. हा धबधबा परिसर शूलपाणेश्वरच्या घनदाट जंगलात असल्यामुळे येथे विविध वनस्पती आणि वन्यजीव प्राण्यांमध्ये अस्वल, तरस, विविध प्रजातींचे हरण, रीसस, आणि माकड पाहायला मिळतात. तसेच वन विभागाच्या मदतीने येथे पर्यटकांसाठी काही सुविधा देण्यात आल्या आहेत. निसर्ग प्रेमी आणि ट्रेकिंगसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
Visit our website: allindiajourney.com
6)Unity Glow Garden-

युनिटी ग्लो गार्डन हे गुजरात मधील नर्मदा जिल्ह्यातील स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ असलेला एक प्रकाशित थीम पार्क आहे. हे ग्लो गार्डन रात्रीच्या आकाशाला तेजस्वी सौंदर्याने उजळवणारे व मंत्रमुग्ध करणारे उद्यान आहे. या बागेत नर्मदा नदीवर सूर्यास्त होताच ग्लो गार्डन तेजस्वी प्रकाशाने उजळून निघते. या उद्यानात LED लाइट्सने उजळलेली विविध प्राणी, पक्षी आणि वनस्पतींची प्रकाशमान शिल्पे उभारलेली आहेत.
तसेच येथे पाणी, संगीत आणि प्रकाशाचा अनोखा संगम असलेले एक संगीतमय कारंजे आहे. आणि अनेक प्रकाशाचे खेळ आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी ही बाग एका जादुई ठिकाण वाटते. या ठिकाणी मंद तेजस्वी प्रकाशांनी सजवलेल्या विदेशी वनस्पती आहेत, त्यामुळे गूढ वातावरण बनते. रात्रीच्या वेळी या उद्यानाचे सौंदर्य अनुभवण्यासाठी जगभरातून पर्यटक भेट देतात.
7)Sardar Sarovar Dam-

सरदार सरोवर धरण हे गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील केवडिया गावाजवळ,नर्मदा नदीवर बांधलेले एक मोठे गुरुत्वाकर्षण धरण आहे. हे धरण गुजरात , मध्य प्रदेश , महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांना पाणी आणि वीज पुरवण्यासाठी बांधण्यात आले आहे. हे धरण 1210 मीटर लांब आणि 163 मीटर उंच असून या सरोवर जलाशयाची एकूण क्षमता 0.95 दशलक्ष हेक्टर मीटर एवढी आहे.
या धरणाचा उपयोग वीज निर्मिती,सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो. सरदार सरोवर प्रकल्प हे भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वप्न होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीनी त्यांच्या 67 व्या वाढदिवसाच्या दिवशी सरदार सरोवर धरणाचे उद्घाटन केले.
8)Ninai Waterfalls-

निनाई धबधबा हा गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील देडियापाडा तालुक्यात निसर्गरम्य परिसरात असलेला एक सुंदर व नयनरम्य धबधबा आहे. हा धबधबा देडियापाडाच्या सुंदर वनरांगांमध्ये वसलेला असून 30 फूट उंचीवरून कोसळतो. हा धबधबा गुजरात राज्य महामार्ग 163 वर असून येथील परिसरात शूलपानेश्वर वन्यजीव अभयारण्य,सरदार सरोवर धरण,स्टॅच्यू ऑफ युनिटी,कबीरवाद ही पर्यटन स्थळे आहेत.देडियापाडा पासून हे ठिकाण 35 किमी अंतरावर आहे.
9)Shoolpaneshwar Wildlife Sanctuary-

शूलपानेश्वर वन्यजीव अभयारण्य हे गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेले एक संरक्षित क्षेत्र आहे. हे अभयारण्य सुमारे 607.7 चौरस किलोमीटर क्षेत्रावर विस्तारलेले असून येथे वेगवेगळ्या, दुर्मिळ वनस्पती आणि विविध प्रकारचे वन्यजीव प्राणी व पक्षी आहेत.1982 मध्ये या अभयारण्याला संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले.
या जंगलात सागवान झाडांचा काही भाग व दोन जलसाठे आहेत. तसेच येथे बिबटे, आळशी अस्वल, खवले, हरण हे वन्यजीव प्राणी आणि अनेक पक्षी व सरपटणारे प्राणी आढळतात. याशिवाय या जंगलात असंख्य प्रकारचे प्राणी आणि पक्षी आढळून येतात. पर्यटक या निसर्गाने बहरलेल्या ठिकाणी उंच झाडे, रंगीबेरंगी पक्षी, वन्यजीव सफारी आणि ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकतात.
10)Arogya Van-

आरोग्य वन हे गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ,औषधी व आयुर्वेदिक वनस्पतींचे सर्वांगीण कल्याणासाठीचे वन आहे. हे वन 17 एकर क्षेत्रात विस्तारलेले असून येथे विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. या वनातील मुख्य आकर्षण म्हणजे येथील प्रवेशद्वारावर निरोगी जीवनासाठी महत्वाचे असलेली मानवी आकाराचे सूर्यनमस्काराचे 12 आसने आहेत. या आरोग्य वनमध्ये गार्डन ऑफ कलर्स, अरोमा गार्डन, योगा गार्डन, अल्बा गार्डन आणि ल्युटिया गार्डन या पाच बागा आहेत.
आणि येथील आकर्षण म्हणजे ‘औषध मानव’ हा मानव विश्रांतीच्या स्थितीत, एक विशाल त्रिमितीय मांडणी असून या मानवी शरीराचा प्रत्येक अवयव एका औषधी वनस्पतीने दर्शविला आहे. त्यामुळे लोकांना अवयवाच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट वनस्पती समजतात. तसेच या बागेत सुंदर रंगबिरंगी मंत्रमुग्ध करणारी फुलपाखरे पाहता येतात. हे मंदिर पोईचा स्वामीनारायण मंदिर म्हणूनही ओळखले जाते.
11)Junaraj Eco Tourism –

जुनाराज इको-टुरिझम हे गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील शूलपानेश्वर वन्यजीव अभयारण्यात, सातपुडा पर्वतरांगेत व कर्जन धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वसलेले सुंदर, निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. या निसर्गरम्य ठिकाणी ऐतिहासिक निलकंठेश्वर महादेव मंदिर, आकाशदेवी आणि देवछात्रा(गोहिल राजवंशाची जुनी राजधानी) ही प्राचीन स्थळे आहेत.
तसेच हे ठिकाण वन्यजीव अभयारण्याचा भाग असल्यामुळे, येथे विविध वन्यजीव प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात. येथील कॅम्पसाईटवरून पर्यटकांना जुनराजच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कलाकृतीचे दर्शन घडते.जुनराज हे पर्यटकांसाठी एक आदर्श ठिकाण आहे.
12)Devmogra temple-

देव मोगरा माता मंदिर हे गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील सागबारा तालुक्यात, देव मोगरा गावात,सातपुडा पर्वतातील पवित्र तीर्थस्थान आहे. ही माता आदिवासी लोकांची आराध्य,कुलदेवी ‘पंडोरी माताजी’ म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिराची स्थापना हिरोजी चौहान यांनी 1500 वर्षांपूर्वी केली होती, असे मानले जाते.
दरवर्षी महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते त्यावेळी गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांतील तसेच देशभरातील इतर आदिवासी लोक येथे दर्शनासाठी येतात.हे मंदिर केवळ आदिवासींसाठीच नाही तर इतर लोकांसाठी ही पवित्र तीर्थक्षेत्र आहे.
13)Karjan Dam-

कर्जन धरण हे गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील जितगढ गावाजवळ, असलेले एक महत्वाचे धरण आहे. हे धरणा नर्मदा नदीची उपनदी कर्जन नदीवर बांधले आहे. या नदीचा संगम सरदार सरोवर प्रकल्पाच्या खालील भागात नर्मदा नदीशी होतो.या धरणाचे नर्मदा जिल्ह्याच्या जल व्यवस्थापनात मोठे योगदान आहे. कर्जन धरण सरदार सरोवर प्रकल्पाचा भाग आहे. या धरणामुळे येथील शेतीचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. व येथील परिसर सुजलाम सुफलाम झालेला आहे.
14)Butterfly Garden-

बटरफ्लाय गार्डन हे गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील फुलपाखरांचे एक आकर्षक उद्यान आहे. हे उद्यान 10 एकर परिसरात विस्तारलेले असून नर्मदा नदीच्या काठावर केवडिया या ठिकाणी आहे. या उद्यानात 70 पेक्षा जास्त प्रजातीची फुलपाखरे आढळतात. आणि या फुलपाखरांना अन्न पुरवणारे 150 पेक्षा जास्त प्रकारच्या फुलांची झाडे,अमृत वनस्पती आणि लार्व्हा यजमान वनस्पती आहेत.
आणि कॅटरपिलरसाठी होस्ट प्लांट्स लावण्यात आले आहेत. या उद्यानात फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांच्या वाढण्यासाठी हे फुलपाखरू उद्यान विकसित केले आहे. पर्यटकांना येथे फुलपाखरांना जवळून पाहता येते.
15) Sardar Patel Zoological Park-

सरदार पटेल प्राणी संग्रहालय हे गुजरातच्या नर्मदा नदी काठावर एकता नगर येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ जवळील एक मोठे प्राणी उद्यान आहे. हे उद्यान 375 एकर क्षेत्रावर विस्तारलेले असून येथे 29 मीटर ते 180 मीटर उंचीच्या सात भागांमध्ये विविध प्राण्यांच्या प्रजातींसाठी वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागलेले आहे.
या उद्यानात स्थानिक आणि विदेशी (आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, आशिया) खंडांतील 186 पेक्षा जास्त प्रजातींचे प्राणी व पक्षी आहेत. या उद्यानात जिराफ, झेब्रा,रॉयल बंगाल, गेंडे, बिबट्या, गेंडे आणि इतर अनेक विदेशी प्राणी आहेत. तसेच येथे विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठी मोठे पक्षीगृह आहे. हे उद्यान निसर्गरम्य डोंगरात,सरदार सरोवर धरणाजवळ असून हे उद्यान ‘जंगल सफारी’ म्हणूनही ओळखले जाते.
16)Shri Narmadeshwar Shri Laxmi Yantra Mandir-


श्री नर्मदेश्वर श्री लक्ष्मी यंत्र मंदिर हे गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यामध्ये राजपीपळा येथे नर्मदा घाटावर असलेले एक धार्मिक स्थळ आहे. या मंदिरामध्ये नर्मदा देवी व लक्ष्मी देवी श्री यंत्राच्या स्वरूपात विराजमान आहेत. त्यामुळे त्यांना “नर्मदा लक्ष्मी देवी” असेही म्हणतात.या मंदिरातील सिद्ध श्री यंत्र, संत श्री विष्णुपंत चैतन्य महाराज यांनी नर्मदा नदीत शोधून स्थापलेले आहे.
त्यामुळे हे स्वयंभू श्री यंत्र मानले जाते. भाविक या मंदिरात श्री लक्ष्मी यंत्राची पूजा करतात. या पौराणिक मंदिराचा इतिहास नर्मदा नदीशी जोडलेला असून राजपिपळा पासून हे मंदिर 16 किलोमीटर अंतरावर आहे.
17)Vishwa Van-

विश्व वन हे गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरातील एक निसर्गरम्य उद्यान आहे. या उद्यानात जगातील सात खंडांतील वनस्पती आहेत.हे ठिकाण अत्यंत निसर्गरम्य असून येथे विपुल प्रमाणात जैवविविधता आढळते.हे उद्यान निसर्गप्रेमी, पर्यटक आणि वनस्पतीशास्त्रज्ञांसाठी एक आदर्श ठिकाण आहे.
18)Valley Of Flowers-

फुलांची दरी हे गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील नर्मदा स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ नदीच्या काठावर असलेल्या रंगीबेरंगी फुलांच्या वनस्पतींसाठी एक सुंदर ठिकाण आहे. फुलांची दरी हे ठिकाण 24 एकर जमिनीवर पसरलेले असून ते ‘भारत वन’ म्हणूनही ओळखले जाते. या ठिकाणी 2016 मध्ये 48,000 रंगीबेरंगी फुलांची आणि वनस्पतींची लागवड केली होती,
सध्या ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर’ची संख्या 22,00,000 पर्यंत पोहोचली आहे. या हिरव्यागार निसर्गरम्य बागेत 300 पेक्षा जास्त प्रकारची फुले, शोभिवंत फुले, झाडे, झुडुपे, औषधी वनस्पती, आणि वेली यांचा समावेश आहे. तसेच पर्यटकांसाठी या ठिकाणी सेल्फी आणि फोटो बूथ घेण्यासाठी सुविधा आहेत.
19)Khalwani Eco-Tourism-

खलवानी इको-टुरिझम हे गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि सरदार सरोवर धरणाजवळील एकता नगर (केवडिया) येथे आहे. येथील संपूर्ण परिसर पानझडी झाडांनी, जंगलांनी व्यापलेल्या व निसर्गरम्य टेकड्यांनी वेढलेला आहे.येथे पर्यटकांना घनदाट जंगल, नर्मदा नदीचे सुंदर किनारे,
डोंगराळ भाग व हिरवळ, नैसर्गिक सौंदर्य, वन्यजीव,पक्ष्यांचा किलबिलाट, सायकलिंग, पक्षी निरीक्षण, जंगलात स्नान, कॅम्पिंग व तंबू निवास, आणि बरेच साहसी उपक्रमांचा आनंद घेता येतो. येथील परिसरात झरवानी धबधबा, विश्व वन,सरदार पटेल प्राणी संग्रहालय ही पर्यटन स्थळे आहेत.
20)Rajvant Palace Resort-


राजवंत पॅलेस रिसॉर्ट हे गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील राजपिपला येथील पॅलेस रिसॉर्ट आहे. या ठिकाणी 1915 मध्ये महाराजा विजय सिंहजींसाठी 7 एकर जागेवर बांधलेल्या विजयराज पॅलेस कॉम्प्लेक्सचा एक भाग आहे.हा पॅलेस अत्यंत सुंदर असून युरोपियन हवेलीसारखा दिसतो. या पॅलेस मध्ये रोमनेस्क घुमट, ग्रीक राजधान्या,शास्त्रीय स्तंभ, आणि व्हेनेशियन दरवाजे, गॉथिक कमानी आहेत. तसेच या पॅलेसचा आतील भाग जुन्या काळातील फर्निचरने सजवलेला आहे.
आणि या राजवाड्यातील काही खोल्या ट्रॉफी, प्राणी, आरसे, पोर्ट्रेट, कापड, काच आणि मातीच्या वस्तूंच्या संग्रहालयासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सध्या पॅलेसचे रिसॉर्ट मध्ये रूपांतर केले असून येथे पर्यटकांसाठी 24 तास गरम आणि थंड पाणी, 24 तास रूम सर्व्हिस, स्विमिंग पूल, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स,कपडे धुण्याची सेवा,कार भाड्याने देणे. या सुविधा आहेत.
21) Narmada Parikrama-

नर्मदा परिक्रमा ही गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील ही नदी देवी नर्मदेच्या सन्मानार्थ आयोजित केलेली एक अद्वितीय आध्यात्मिक यात्रा व पूर्ण प्रदक्षिणा आहे.नर्मदा परिक्रमा पवित्र यात्रा असून ते पूर्ण करण्यासाठी नर्मदा नदीच्या दोन्ही तीरांवर प्रदक्षिणा घातली जाते. ही परिक्रमा सर्वप्रथम पूज्य ऋषी मार्कंडेय यांनी केली होती अशी आख्यायिका आहे.नर्मदा जिल्ह्यामधील राजपीपळा आणि टिळकवाडा ही महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत, या ठिकाणी उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा अनवाणी प्रदक्षिणा घालण्यात येते.
ही परिक्रमा साधारणपणे 14 किमी लांब असून, दरवर्षी चैत्र महिन्यात आयोजित केली जाते. या पवित्र यात्रेची एकूण लांबी 3,500 किलोमीटर आहे, जी पूर्ण होण्यासाठी साधारणपणे 200 ते 250 दिवस लागतात. ही परिक्रमा करणाऱ्या भक्तांना विशेष पुण्य मिळते. स्कंद पुराणातील रेवाखंड अध्यायातून या तीर्थयात्रेचे आध्यात्मिक महत्त्व सांगितले आहे.
1) नर्मदा जिल्ह्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळे कोणती आहेत?
नर्मदा जिल्ह्यात सरदार सरोवर धरण, शूलपानेश्वर वन्यजीव अभयारण्य, राजपिपला वन्यजीव अभयारण्य आणि होशांग शाहची कबर ही लोकप्रिय पर्यटन स्थळ आहेत.
2)स्टॅच्यू ऑफ युनिटी येथील कॅक्टस गार्डन म्हणजे काय आहे?
कॅक्टस गार्डन हे विविध प्रकारच्या कॅक्टस आणि रसाळ वनस्पतींचे एक उद्यान आहे.
3)नर्मदा जिल्ह्यातील झरवानी धबधबा कुठे आहे?
नर्मदा जिल्ह्यातील झरवानी धबधबा शूलपानेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या रमणीय परिसरात आहे.


