मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण थंड हवेची ठिकाणे, महाराष्ट्र हे भारतातील एक समृद्ध राज्य आहे. महाराष्ट्र भारतातील क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. आणि महाराष्ट्र हे भारताच्या विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. या राज्याला गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा या राज्यांच्या सीमा लाभलेल्या आहेत. Top 21 places to visit in Maharashtra Hill Station
महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले त्यामुळे या राज्यांला ‘संतांची भूमी’ म्हणूनही ओळखले जाते.मुंबई हे महाराष्ट्रातील टॉप शहर असून या ठिकाणी अभिनेते, राजकारणी आणि क्रिकेट खेळाडू तयार झाले आहेत. आणि संपूर्ण जगात महाराष्ट्राचे नाव गाजविणारे सचिन तेंडुलकर हे क्रिकेट खेळाडू महाराष्ट्रातले आहेत. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचा जगभरात गौरव केला जातो ते या महाराष्ट्रातीलच आहेत.
1674 मध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर या राज्याची ‘अधिकृत’ सुरुवात झाली. महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक,सांस्कृतिक, सामाजिक आणि थंड हवेची ठिकाणे आहेत. ज्या ठिकाणांना जगभरातून पर्यटक भेट देतात.
Top 21 places to visit in Maharashtra Hill Station
महाराष्ट्रातील संपूर्ण थंड हवेची ठिकाणे
1) महाबळेश्वर-

Mahabaleshwar हे महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील निसर्गसौंदर्याने नटलेले एक अप्रतिम हिल स्टेशन आहे. हे ठिकाण सह्याद्रीच्या सपाटीवर समुद्रसपाटीपासून सुमारे 4500 फूट उंचीवर वसलेले असून हे महाराष्ट्राचे नंदनवन आहे.या ठिकाणी घनदाट जंगले, भव्य पर्वतशिखरे , शांत आणि मनमोहक तलाव, जैवविविधतेने समृद्ध परिसर, दुर्मीळ औषधी वनस्पती आणि येथे विविध ऋतूंमध्ये बहरणारी रंगीबेरंगी फुलं यामुळे जगभरातील पर्यटकांचे हे आकर्षणाचे ठिकाण आहे. तसेच महाबळेश्वरमधील घनदाट जंगलांमध्ये बिबट्या, हरीण, गवा हे प्राणी पाहायला मिळतात,
शिवाय येथे मलबार व्हिसलिंग थ्रश, हॉर्नबिल आणि विविध प्रकारचे दुर्मीळ पक्षी,धुक्याने वेढलेल्या पर्वतरांगा, वाहणारे निर्झर आणि शांत सरोवरे,शुद्ध हवा, हिरवीगार निसर्गसृष्टी आणि आल्हाददायक वातावरण पाहायला मिळते. महाबळेश्वर मध्ये मॅप्रो गार्डन, विल्सन पॉइंट, मुंबई पॉइंट, वेण्णा तलाव, प्रतापगड किल्ला, आर्थर्ससीट, महाबळेश्वर मंदिर, चायनामन फॉल्स, हत्तीचे डोके, लिंगमाला धबधबा, व्हेलोसिटी एंटरटेनमेंट, मेण संग्रहालय, कॅनॉट पीक,
कृष्णाबाई मंदिर धोबी धबधबा, लॉडविक पॉइंट, मोरारजी वाडा, टायगर स्प्रिंग,पंचगंगा मंदिर, केट पॉइंट, प्रतापसिंह पार्क, हेलेन्स पॉइंट, बॅबिंग्टन पॉइंट, कार्नॅक पॉइंट, पंचगणी, टेबल लँड, पारसी पॉइंट, राजपुरी लेणी, नगर बाजार, लक्ष्मी स्ट्रॉबेरी फार्म, ही पाहण्यासारखी पर्यटन स्थळे आहेत.महाराष्ट्रातील सातारा जिल्हा पासून महाबळेश्वर हे ठिकाण 45 किलोमीटर अंतरावर आहे.
2) भिंगारा, अंबाबारवा-


Bhingara, Ambabarva ही महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील गाविलगडच्या डोंगरांमध्ये असलेले नयनरम्य आणि प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणे आहेत. भिंगारा येथील परिसर हा अत्यंत निसर्गरम्य आणि शांत वातावरणासाठी ओळखला जातो. आणि अंबाबारवा, हे गाविलगडच्या डोंगरांमध्ये असलेले एक अभयारण्य आणि निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण आहे. हे अभयारण्या समुद्रसपाटी पासून उंचीवर असून या अभयारण्यात अनेक प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्षी पाहायला मिळतात. अंबाबारवा हे बुलढाणा जिल्ह्यातील निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण असून येथे पर्यटकांना सुंदर सूर्यास्ताचे दृश्य पाहता येते.
3) इगतपुरी-

Igatpuri Hill Station हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात असलेले एक सुंदर, निसर्गसंपन्न थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक निसर्गरम्य दऱ्या, हिरवीगार वनराई आणि धबधबे आहेत. याशिवाय इगतपुरी मध्ये भातसा नदीचे खोरे, त्रिंगलवाडी किल्ला, विपश्यना केंद्र, त्रिंगलवाडी किल्ला, कॅमल व्हॅली,घाटना देवी मंदिर ही अत्यंत निसर्गरम्य व प्रेक्षणीय स्थळे आहेत. व कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिकारी,इगतपुरी या ठिकाणी आहे. इगतपुरी हे मुंबई-आग्रा महामार्गावर असलेले निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण आहे. वर्षभर या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात.
4) आंबोली-

Amboli हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगांमध्ये असलेले एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 690 मीटर उंचीवर असून निसर्गप्रेमी साठी हे स्वर्ग समजले जाते. पावसाळ्यात या ठिकाणी प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो त्यामुळे आंबोलीला “महाराष्ट्राचे चेरापुंजी” असेही म्हटले जाते. या ठिकाणी असणारे हिरवेगार पर्वत,घनदाट जंगल, धबधबे, धुके आणि येथील समृद्ध जैवविविधता यामुळे हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे.
तसेच या ठिकाणी असलेली नांगरतास धबधबा, हिरण्यकेशी मंदिर,कावळेसाद पॉईंट, नारायण गड किल्ला, ही अत्यंत निसर्ग संपन्न पर्यटन स्थळे आहेत. व या ठिकाणी निसर्गरम्य परिसरात असलेली अनेक ऐतिहासिक मंदिरे, विहंगम दऱ्या पाहायला मिळतात. सावंतवाडी, बेळगाव आणि कोल्हापूर पासून हे ठिकाण थोड्या अंतरावर आहे.
Visit our website: allindiajourney.com
5) कोयनानगर –

Koynanagar हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असलेले एक प्रसिद्ध सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे.हे ठिकाण कोयना नदीच्या काठी वसलेले असून या ठिकाणाला ‘सह्याद्रीची राणी’ म्हणूनही ओळखले जाते.कोयनानगर हे ठिकाण निसर्ग संपन्न असून हिरव्यागार डोंगरदर्यांनी वेढलेले आहे. त्यामुळे येथे वर्षभर अल्हाददायक आणि थंड वातावरण असते. तसेच या ठिकाणी असलेल्या कोयना धरणातून मिळणाऱ्या विजे मुळे संपूर्ण महाराष्ट्र प्रकाशमय झाला आहे.व येथील कोयना अभयारण्य हे या भागातील जैवविविधता, वनस्पती, प्राणी आणि पक्षांनी बहरलेले अभयारण्य आहे.
तसेच येथील कोयना जलाशयात पर्यटकांसाठी नौकाविहार आणि इतर जल क्रीडा करण्याच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. कोयना नगर परिसरात शिवाजी सागर जलाशय, ओझर्डे धबधबा, श्रीक्षेत्र धारेश्वर, वासोटा किल्ला, तापोळा व कोयना अभयारण्य ही प्रेक्षणीय स्थळे आहेत. तसेच येथील कोयना नगर परिसरात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मरणार्थ बांधलेले उद्यान आहे. कराडपासून हे ठिकाण थोड्या अंतरावर आहे.
6) खंडाळा-

Khandala हे पुणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत व समुद्रसपाटीपासून 630 मीटर उंचीवर असलेले अत्यंत निसर्गसंपन्न व थंड हवेचे ठिकाण आहे. लोणावळा व खंडाळा हे जुळे हिल स्टेशन समजले जाते. प्रसिद्ध लेखक आणि संगीत दिग्दर्शक नितीन राईकवर यांनी हिंदी सिनेमात “आती क्या खंडाळा” या गाण्यांमध्ये खंडाळा शहराचे नाव उज्वल केले आहे. या ठिकाणी अनेक प्रेक्षणीय स्थळे असून येथे नैसर्गिक तळी, नयनरम्य निसर्ग, किल्ले, तलाव आणि विविध वनस्पतींनी समृद्ध असा हा भाग आहे.
या ठिकाणी तिकोना, लोहगड,विसापूर हे किल्ले आहेत. इतिहास प्रेमी आणि गिर्यारोहकांचे हे अत्यंत प्रेक्षणीय ठिकाण आहे.तसेच या ठिकाणी शिंग्रोबा मंदिर,राजमाची पॉईंट,सनसेट पॉईंट, थ्री टायर्ड,ताम्हिणी घाट,कुणे धबधबा,टायगर लीप /वाघदरी,अमृतांजन पॉइंट याशिवाय खंडाळ्यामध्ये पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेले कामशेत हे ठिकाण आहे. पुण्यापासून हे ठिकाण 150 किलोमीटर अंतरावर तर लोणावळ्यापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे.
7)चिखलदरा-

Chikhaldara हे महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात घनदाट जंगलाने वेढलेले एक निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 3564 फूट उंचीवर सातपुडा पर्वतरांगेतील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. त्यामुळे येथील हवामान नेहमी थंड व आरोग्यदायी असते. येथे वनविभागाचे वनपाल प्रशिक्षण केन्द्र आहे. चिखलदरा हे सातपुडा पर्वत रांगेतील मेळघाट या व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित केलेल्या ठिकाणी आहे. तसेच चिखलदऱ्याहून सेमाडोहला जाणाऱ्या मार्गावर आपल्याला वाघ,मोर, रानकोंबडा, अस्वले विविध प्रकारचे रंगबिरंगी पक्षी व इतर अनेक वन्यजीव प्राणी पाहायला मिळतात.
येथे कॉफीला लागणारे 70 ते 80 फॅरनहाइट तापमान असल्यामुळे या ठिकाणी कॉफीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. चिखलदरा हे ठिकाण विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. चिखलदरा परिसरात घनदाट हिरवाई, धबधबे, धुक्याने भरलेल्या दऱ्या,पंचबोल/ इको पॉईंट,देवी पॉईंट,नर्सरी गार्डन, प्रॉस्पेट पॉईंट,बेलाव्हिस्टा पॉईंट भिमकुंड, कॉफीचे मळे. पहायला मिळतात. अमरावती पासून चिखलदरा हे ठिकाणी 90 किलोमीटर अंतरावर आहे.
8) पन्हाळा-

Panhala हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध, निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणी पन्हाळगड हा ऐतिहासिक किल्ला असून येथील थंड हवामानामुळे हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. कोल्हापूर मधील पन्हाळगड किल्ला हा पन्हाळ्याच्या पायथ्यापासून 275 फूट उंचीवर आहे.पन्हाळगडाच्या उत्तरेस वारणा, दक्षिणेस कासारी व भोगावती या नद्या असल्यामुळे येथील परिसर निसर्गरम्य आहे. व येथे पाण्याच्या सोयी चांगले आहेत.
याशिवाय पन्हाळगडावर ‘सादोबा तलाव’ व ‘सोमाला तलाव’ ‘कर्पुर बाव’ ‘अंधार बाव’ संभाजी मंदिरातील विहीर अशा अनेक विहिरी आहेत. थंड आहे. पन्हाळा हे ठिकाण उंचीवर असल्यामुळे येथील हवामान थंड आहे. पन्हाळा किल्लाच्या परिसरात इतिहास,निसर्गरम्य दृश्य आणि थंड हवामान असल्यामुळे या ठिकाणी वर्षभर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला भेटते. कोल्हापूर रेल्वे स्थानकापासून हे ठिकाण 27 किलोमीटर अंतरावर आहे.
9) जव्हार-

Jawhar हे पालघर जिल्ह्यातील एक सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे. हे ठिकाण पालघर जिल्ह्याचे ’महाबळेश्वर’ म्हणूनही ओळखले जाते.जव्हार हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 518 मीटर उंचीवर असून येथील परिसर डोंगर, दऱ्या आणि घनदाट जंगलांनी वेढलेले आहे. येथे हिरवीगार निसर्गरम्य दृश्ये, धबधबे, वारली पेंटिंग आणि आदिवासी संस्कृती पाहायला मिळते.
या ठिकाणाला 632 वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ठिकाणी शिरपामाळ, दाभोसा धबधबा, हनुमान पॉइंट,काळमांडवी धबधबा,भूपतगड किल्ला, वारली आर्ट व्हिलेज,सेंट पीटर चर्च, सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य, महालक्ष्मी मंदिर, जुना राजवाडा आणि येथील आदिवासी संस्कृती जवळून पाहायला मिळते. ठाणे शहरापासून हे ठिकाण 100 किलोमीटर अंतरावर आहे.
10) तोरणमाळ –

Toranmal हे नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे. सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेले तोरणमाळ हे ठिकाण महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांपैकी हे 2 नंबरचे थंड हवेचे ठिकाण आहे. हे ठिकाण शहरापासून दूर सातपुडा पर्वतरांगेत वसलेले असल्यामुळे येथील हिरवीगार निसर्गरम्य स्थळे, शांत तलाव आणि ऐतिहासिक स्थळे याशिवाय शांतता ही अनुभवायला मिळते. या ठिकाणी अनेक ऐतिहासिक पर्यटन स्थळे व तलाव आहेत.
तोरणमाळ परिसरात यशवंत तलाव, सीता-खाई दरी, गोरखनाथ मंदिर, कमळ तलाव ही पर्यटन स्थळे असून येथे असणाऱ्या तलावांमध्ये बोटिंगचा आनंद घेता येतो.तोरणमाळला पूर्वी ‘तोरणा’ म्हणून ओळखले जात होते.येथे अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळे आहेत.नंदुरबार रेल्वे स्टेशन पासून हे ठिकाण थोड्या अंतरावर आहे.
11) पाचगणी-

Pachgani हे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर एवढेच उंच व डोंगराळ प्रदेशात असलेले प्रसिद्ध थंड हवेचे रमणीय व शांत ठिकाण आहे. पाचगणी हे महाबळेश्वर पासून 20 किलोमीटर अंतरावर असून निसर्गरम्य ठिकाण आहे. तसेच या ठिकाणी असलेले जुन्या काळातील पारशी लोकांचे बंगले व येथील प्रसिद्ध पब्लिक स्कूल आजही पाहायला भेटते. पाचगणी हे समुद्रसपाटीपासून सुमारे 4,242 फूट उंचीवर असून पूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकाने ज्वाला रस बाहेर येऊन हे डोंगर तयार झाले असल्याचे सांगितले जाते. तसेच या ठिकाणी असलेल्या पाच डोंगराच्या समूहामुळे या ठिकाणाला पाचगणी हे नाव पडले आहे.
लोणावळा-खंडाळा सारखी पाचगणी आणि महाबळेश्वर ही ठिकाणं एकमेकापासून जवळ आहेत. पाचगणी हे उत्कृष्ट हवामान आणि समृद्ध निसर्ग म्हणून ओळखले जाते. पाचगणी मध्ये खोल दऱ्या, धबधबे, कमलगड, टेबल लँड, किडीज पार्क, पाचगणीच्या गुंफा ही प्रसिद्ध व प्रेक्षणीय स्थळे आहेत. याशिवाय पाचगणीमध्ये ‘टेबल लॅन्ड’ नावाचे एक सपाट पठार आणि ‘पारशी पॉईंट’ ही प्रेक्षणीय स्थळे आहेत. महाबळेश्वर पासून हे ठिकाण 20 किलोमीटर अंतरावर आहे.
12) पाल –

Pal Hill Station हे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेतील पाल गावामध्ये असलेले निसर्गरम्य ठिकाण आहे. हे थंड हवेचे ठिकाण निसर्ग सौंदर्याने बहरलेले असून ते सातपुडा पर्वत रांगांमध्ये आहे. हे हिल स्टेशन यावल अभयारण्य जवळ आहे. व या हिल स्टेशन कडे जाताना सुकी नदीवरील गर्भाडी धरण पहायला भेटते. हा हिल स्टेशन परिसर घनदाट जंगलाचा असून या ठिकाणी वनस्पती संग्रहालय, वन उत्पादनाच्या संग्रहालय, वन्यजीव अनाथालय पाहिला भेटतात.रावेर पासून हे ठिकाण 22 किलोमीटर अंतरावर आहे.
13)भीमाशंकर –

Bhimashankar हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सह्याद्रीच्या कुशीत घनदाट जंगलांनी वेढलेले एक सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे. तसेच या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगातील एक ज्योतिर्लिंग आहे. भीमाशंकर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 3454 फूट उंचीवर असल्यामुळे या ठिकाणी वर्षभर थंड व आल्हादायक वातावरण असते. या ठिकाणी घनदाट जंगल, उंच डोंगर, धबधबे, निसर्गरम्य परिसर आहे. भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा उगम झाला असून हे भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, त्यामुळे येथे वर्षभर भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात.
तसेच इथे असलेल्या भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या आणि पक्षी पाहायला मिळतात. भीमाशंकर हे सह्याद्री पर्वत रांगेतील घनदाट जंगलांनी व्यापलेले अभयारण्य असून 1984 मध्ये या अभयारण्याला अधिकृत अभयारण्याचा दर्जा मिळालेला आहे. येथील आकर्षक गोष्ट म्हणजे येथे आढळणारे शेकरू हे फक्त याच अभयारण्यात पाहायला मिळते. वर्षभर या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पुणे पासून हे ठिकाण 120 किलोमीटर अंतरावर आहे.
14) माथेरान –

Matheran हे Matheran हे रायगड जिल्ह्यातील निसर्गरम्य, थंड आणि अल्हाददायक हवेचे ठिकाण आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 800 मीटर उंच पठारावर आहे. हा परिसर घनदाट झाडे आणि लाल पायवाटांनी बहरलेला आहे. पर्यटकांसाठी या ठिकाणी टॉय ट्रेन व घोड्यांची सवारी उपलब्ध आहे. तसेच या ठिकाणी तुम्ही अलेक्झांडर पॉईंट, लुईओसा, पॉइंट,पॅनोरामा पॉईंट, किंग जॉर्ज पॉईंट, लॉर्ड पॉईंट, वन ट्री हिल पॉईंट, इको पॉईंट,रामबाग पॉईंट,ही पिकनिक स्थळे पाहू शकता.
या ठिकाणी शिवाजी महाराज्यांच्या जीवानावर आधारित वस्तू-संग्रहालय आहे. माथेरान परिसरात कोणत्याही वाहनास प्रवेश नाही त्यामुळे हे ठिकाण सुंदर व शांत आहे. येथील मुख्य बाजारात आपण विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करू शकतो.माथेरान हे ठिकाण मुंबईपासून 90 किलोमीटर अंतरावर तर पुणे पासून 120 किलोमीटर अंतरावर आहे.
15) सुर्यमाळ-

Suryamal हे पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात कोकणात असलेले एक निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण आहे. निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेले ठिकाण म्हणजे सूर्यमाळ! या ठिकाणी पावसाळ्यात धुक्यानी वेढलेले हिरवेगार गर्द डोंगर, विहंगम दऱ्या आणि आसपासच्या परिसरातील निसर्गरम्य पर्यटन स्थळे पाहायला मिळतात. येथे वर्षभर थंड व अल्हाददायक वातावरण असल्यामुळे पर्यटकांचे हे आकर्षण स्थळ आहे.
तसेच मोखाडा तालुका डोंगराळ भाग असल्यामुळे या ठिकाणी भात, नागली, वरई, तुर, उडीद आणि खुरासणी, मोगरा, फुलशेती, काजू, आंबा, तुती आणि स्टॉबेरीची शेती पाहायला मिळते. सूर्यमाळ परिसरात वैतरणा धरण आणि सिद्धिविनायक मंदिर ही पर्यटन स्थळे आहेत. पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणावर भेट देतात. पालघर शहरापासून हे ठिकाण 80 किलोमीटर अंतरावर आहे.
16) म्हैसमाळ –

Mhaismal हे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील एक निसर्ग संपन्न थंड हवेचे ठिकाण आहे. हे ठिकाण सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले असून समुद्रसपाटीपासून 1067 मीटर उंचीवर आहे.म्हैसमाळ येथे गर्द हिरव्यागार झाडांनी बहरलेले डोंगर आणि दऱ्या यांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. व या ठिकाणी असलेले शांत व सुंदर वातावरण मनाला एक वेगळीच ऊर्जा देते. या ठिकाणाला मराठवाड्याचे महाबळेश्वर म्हणूनही ओळखले जाते.
तसेच या ठिकाणी अनेक प्रकारच्या वनस्पती,प्राणी आणि पक्षी पाहायला भेटतात.म्हैसमाळ परिसरात एलोरा लेणी, घृष्णेश्वर मंदिर आणि दौलताबाद किल्ला ही प्रसिद्ध पर्यटन स्थळे तुम्ही पाहू शकता.छत्रपती संभाजीनगर शहरापासून म्हैसमाळ हिल स्टेशन 30 किमी अंतरावर आहे.
17) लोणावळा-

Lonavla हे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक अत्यंत निसर्गरम्य व थंड हवेचे ठिकाण आहे. लोणावळा हे मुंबई-पुणे महामार्गावर समुद्रसपाटीपासून 625 मीटर उंचीवर असून सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पुणे जिल्ह्यात असलेले निसर्गरम्य प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणी विपुल वनराई, हिरवागार निसर्ग, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दऱ्या आणि पावसाळयात डोंगरावरून कोसळणारे धबधबे हे सर्व पाहून मनाला खूप प्रसन्नता मिळते.
म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते. तसेच लोणावळा या ठिकाणी भारतीय नौदलाचे सर्वोत्तम तांत्रिक प्रशिक्षण केंद्र व आयएनएस शिवाजीचे मुख्यालय आहे. तसेच लोणावळ्याच्या जवळच खंडाळा आहे एक थंड हवेचे ठिकाण आहे. लोणावळा परिसरात भुशी धरण,लोणावळा तलाव टायगर पॉईंट, कार्ला आणि भाजे लेणी याशिवाय अनेक सुंदर पर्यटन स्थळे आहेत. पुणे जिल्ह्यापासून हे ठिकाण 150 किलोमीटर अंतरावर आहे.
18) येडशी –

Yedshi हे उस्मानाबाद ( धाराशिव)जिल्ह्यातील एक निसर्गरम्य प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. हे ठिकाण मराठवाड्याच्या पठारावर असून येथील निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. या ठिकाणी असलेली गर्द हिरवीगार झाडे हिरवाईने नटलेले डोंगर, शांत आणि अल्लादायक वातावरण आणि दऱ्या पाहून मनमोहीत होते.येडशी या थंड हवेच्या परिसरात तुळजाभवानी मंदिर, नळदुर्ग किल्ला आणि काही प्राचीन व धार्मिक मंदिरे आहेत. ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमी साठी हे एक अद्भुत ठिकाण आहे.येडशी हे उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असून पर्यटक येथे मोठ्या प्रमाणावर भेट देतात.
19) रामटेक-

Ramtek हे नागपूर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असून हे एक अत्यंत धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी गर्द झाडे आणि हिरवाईने नटलेला रामगिरी नावाचा डोंगर आहे, व या डोंगरावर एक किल्ला आणि अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यामध्ये प्रभू श्रीरामांचे सुमारे 600 वर्षे जुने मंदिर आहे. तसेच या ठिकाणी एक विशाल नंदी व श्री गणेशाचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या वास्तव्यासाठी प्रसिद्ध मंदिर आहे. व येथील आजूबाजूचा परिसर अत्यंत निसर्गरम्य असून या ठिकाणी जैन मंदिरे व मूर्ती आहेत. या ठिकाणी अनेक प्रकारच्या वनस्पती पक्षी आणि प्राणी पाहायला भेटतात. नागपूर शहरापासून हे ठिकाण 50 किलोमीटर अंतरावर आहे.
20) माळशेज घाट-

Malshej Ghat हे पुणे जिल्ह्यातील पर्वत रांगेतील एक निसर्गरम्य सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे. तसेच हे माळशेज घाट हा समुद्रसपाटीपासून 700 मीटर उंचीवर असून माळशेजचा घाटमाथ्यावरील भाग हा पुणे जिल्ह्यात तर घाटातील काही भाग ठाणे जिल्ह्यात येतो.माळशेज घाट हे महाराष्ट्रातील एक सुंदर आणि थंड हवेचे ठिकाण असून या ठिकाणी हिरवेगार गर्द झाडीने वेढलेले डोंगर, दऱ्या, धबधबे आणि हिरवीगार निसर्ग रम्य वनराई पाहायला भेटते.
तसेच येथे अनेक प्रकारच्या वनस्पती, प्राणी व पक्षी पाहायला मिळतात. पावसाळ्यात येथे अनेक धबधबे प्रवाहित झालेले दिसतात. तसेच माळशेज परिसरात हरिश्चंद्रगड, पिंपळगाव धरण,MTDC रिसॉर्ट असून येथे पर्यटकांसाठी निवास आणि सुविधा उपलब्ध आहेत. या ठिकाणाला निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्स मोठ्या प्रमाणात भेट देतात. मुरबाड रेल्वे स्टेशन पासून हे ठिकाण थोडे अंतरावर आहे.
21) दापोली-

Dapoli हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणाला महाराष्ट्राचे ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणूनही ओळखले जाते. आणि ब्रिटिश काळात ब्रिटिशांचे या ठिकाणी तळ होते त्यामुळे हे ठिकाण त्यावेळी ‘कॅम्प दापोली’ म्हणून ओळखले जात होते.दापोलीमध्ये अनेक समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, गरम पाण्याचे झरे,निसर्गरम्य स्थळे आणि धार्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक मंदिरे आहेत.
तसेच येथे कृषी पर्यटन केंद्र, ऐतिहासिक किल्ले, हॉटेल्स, रिसॉर्ट व सुंदर समुद्रकिनारे आहेत. वर्षभर या ठिकाणी थंड व अल्हाददायक वातावरण असल्यामुळे पर्यटकांची या ठिकाणी मोठी वर्दळ असते. दापोली हे मुंबईपासून 215 किलोमीटर अंतरावर आहे.
1) महाराष्ट्रातील दापोली शहर कोणत्या नावाने ओळखले जाते ?
महाराष्ट्रातील दापोली शहर मिनी महाबळेश्वर नावाने ओळखले जाते.
2) येडशी हे कोणत्या जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे?
येडशी हे उस्मानाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे .
3) पालघर जिल्ह्यातील सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे ?
पालघर जिल्ह्यातील सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण मोखाडा तालुक्यात आहे .