बनासकांठा जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-Top 21 places to visit in Banaskantha District

मित्रांनो भारत भ्रमंतीमध्ये आपण भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे पाहत आहोत आता आपण पाहणार आहोत गुजरात राज्यातील बनासकांठा जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे,बनासकांठा जिल्हा, हा गुजरात राज्यातील एक महत्वाचा जिल्हा आहे. याचे प्रशासकीय मुख्यालय पालनपूर येथे आहे. या जिल्ह्याला राजस्थान, कच्छचे रण,साबरकांठा,महेसाणा,पाटण या जिल्ह्याच्या सीमा लाभलेल्या आहेत. या जिल्ह्यातून बनास नदी,सरस्वती नदी आणि सेपू या मुख्य नद्या वाहतात. तसेच या जिल्ह्याला बनास नदीवरून बनासकांठा हे नाव पडले असून गुजरात राज्यातील हा तिसरा सर्वात मोठा जिल्हा आहे. व या जिल्ह्यात अकरा तालुके आहेत.Top 21 places to visit in Banaskantha District

शैक्षणिक क्षेत्रात हा जिल्हा आघाडीवर असून येथे आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था), पॉलिटेक्निक आणि कुटीर उद्योग प्रशिक्षण संस्था आहेत. व ग्रॅनाइट टाइल्स काताई वस्त्र आणि खादीचे कातणे, विणकाम,हिरे प्रक्रिया,सिरेमिक उद्योग व सात एसएसआय क्लस्टर आहेत. याशिवाय या जिल्ह्यात अभियांत्रिकी, वस्त्रोद्योग आणि ऑटोमोबाईल यासारख्या तांत्रिक प्रशिक्षण संस्था आहेत. या जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषी उत्पादन,अन्न प्रक्रिया, पर्यटन, कापड आणि खनिज उद्योगांवर अवलंबून आहे. गुजरात राज्याच्या एकूण भाजीपाला उत्पादनात सुमारे 17.67 टक्के वाटा हा बनासकांठा जिल्ह्याचा आहे. या जिल्ह्यात बटाटे,इसबगुल (सायलियम भुसा) याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

तसेच शेती उत्पादनामध्ये या जिल्ह्यात गहू, बाजरी, हरभरा,तंबाखू, एरंडेल कापूस, शेंगदाणे, जिरे, आणि इसबगोल या पिकांचे उत्पादन घेतले जाते. या जिल्ह्यात अन्न प्रक्रिया आणि वनस्पती तेल हे उद्योग ही मोठ्या प्रमाणात आहेत. गुजरात राज्यातील तेलबियांचे उत्पादन करणारा हा तिसरा सर्वात मोठा जिल्ह्या आहे. तसेच या जिल्ह्यात चुनखडी, संगमरवरी, ग्रॅनाइट, इमारत दगड आणि चिनी माती या खनिजांचे विपुल प्रमाणात साठे आहेत. या निसर्गसमृद्ध जिल्ह्यातील अंबाजी माता हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून येथे अनेक ऐतिहासिक, सांस्कृतिक,सामाजिक आणि धार्मिक पर्यटन स्थळे आहेत.

Top 21 places to visit in Banaskantha District

बनासकांठा जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे

1) Ambaji Temple-

Top 21 places to visit in Banaskantha District


अंबाजी मंदिर हे गुजरात राज्यातील बनासकांठा जिल्ह्यातील डांटा तालुक्यात असलेले प्रसिद्ध तीर्थस्थान आहे. अंबाजी मातेचे हे मंदिर दुर्गा स्वरूप असून हे मंदिर देवीच्या 51 शक्तीपीठांपैकी एक आहे.या पवित्र ‘अरासुरी अंबाजी’ मंदिरात देवीची कोणतीही मूर्ती किंवा प्रतिमा नाही. येथे फक्त पवित्र ‘श्री विसा यंत्र’ हेच मुख्य देवस्थान असून, त्याची पूजा केली जाते. हे यंत्र उघड्या डोळ्यांनी पाहता येत नाही आणि त्याचे छायाचित्र घेणे निषिद्ध आहे.

हे मंदिर अरावली पर्वतरांगांतील गब्बर टेकडीच्या पायथ्याशी असून लाखो भक्ताचे व हिंदू धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे.
अंबाजी माताचे मूळ स्थान गावातील अरासुरी टेकडीवर असून येथे दर्शन घेतल्याशिवाय यात्रा पूर्ण झाल्याचे समाधान मिळत नाही.पालणपूरपासून हे मंदिर 65 किलोमीटर अंतरावर आहे.

2)Nadeshwari mata temple –


नाडेश्वरी माता मंदिर हे गुजरात राज्यातील बनासकांठा जिल्ह्याच्या सीमेवर अत्यंत निकट श्रद्धा असलेले नाडेश्वरी मातेचे मंदिर प्रसिद्ध मंदिर आहे.हे मंदिर सामान्य लोकांसह सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांचे अपार श्रद्धा आणि आदराचे मोठे केंद्र आहे. जेव्हा एखादा जवान बनासकांठा सीमेवर ड्युटीवर जातो, तेव्हा तो आधी मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात.

आणि मगच ड्युटीवर जातात. नाडेश्वरी माता स्वतः जवानाचे प्राण रक्षण करते अशी येथील लोकांचे आणि जवानांची अतूट श्रद्धा आहे.असे सांगितले जाते की 1971 च्या युद्धात नाडेश्वरी मातेने भरकटलेल्या जवानांच्या तुकडीला सुरक्षित पोहोचवलं होत. भक्ताच्या हाकेला उभा राहणाऱ्या या मातेचे महात्म्य एवढ मोठ आहे की डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाही.

3)Gabbar Hill Ambaji-


गब्बर पर्वत हा गुजरात राज्यातील बनासकांठा जिल्ह्यातील गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवरील एक लहानसी डोंगर टेकडी आहे. ही टेकडी प्रसिद्ध तीर्थ अम्बाजीपासून 5 किमी अंतरावर आहे.या ठिकाणी अरासुर पर्वतावर, व अरावली पर्वतरांगांमधून, पवित्र वैदिक सरस्वती नदीचा उगम होतो. हे पवित्र व प्राचीन ठिकाण 51 शक्तिपीठांपैकी एक आहे व अंबाजी मातेचे मूळ स्थान आहे.

पुराणातील माहितीनुसार येथे सतीचे हृदयभाग पडले होते, असा उल्लेख तंत्रचूडामणीमध्ये आढळतो. ही टेकडी खूप उंच आणि चढण्यासाठी अवघड असून टेकडीच्या पायथ्याशी 300 दगडी पायऱ्या आहेत आणि एक अरुंद पायवाट आहे. येथील पिंपळाच्या झाडाखाली देवीचे चरण चिन्ह आहेत त्याची पूजा केली जाते.

4)Dantiwada Dam-


दंतिवाडा धरण हे गुजरात राज्यातील बनासकांठा जिल्ह्यातील दंतिवाडा जवळ पश्चिम बनास नदीवर माती आणि दगडामध्ये बांधलेले धरण आहे. बनासकांठा जिल्ह्यातील हे एक महत्त्वाचे धरण असून हे धरण 1965 मध्ये मुख्यत्वे सिंचन आणि पूर नियंत्रणासाठी बांधण्यात आले होते. या धरणाची उंची 61 मीटर आणि लांबी 4832 मीटर एवढी आहे. तसेच इथे जवळपास बालाराम अंबाजी वन्यजीव अभयारण्य आहे.

त्यामुळे देशभरातून अनेक पर्यटक येथील अद्वितीय निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद घेतात.दंतीवाडा धरण हे पाणी व्यवस्थापन आणि सिंचन क्षेत्रात महत्वाचे मानले जाते. या धरणामुळे अनेक गावाची शेती सुजलाम सुफलाम झालेले आहे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे.पालनपुर पासून हे धरण 23 किलोमीटर अंतरावर आहे.

Visit our website: allindiajourney.com

5)Jessore Sloth Bear Sanctuary-


जेसोर स्लॉथ भालू अभयारण्य हे गुजरात राज्यातील बनासकांठा जिल्ह्यातील, अरावली पर्वतरांगांच्या कुशीत कोरड्या पानगळीच्या जंगलाचा एक महत्त्वाचा भाग आहे.हे अभयारण्य 180 चौ.कि.मी. क्षेत्रफळात विस्तारलेले आहे.जेसोर टेकडी ही गुजरातमधील दुसऱ्या क्रमांकाची उंच टेकडी आहे. या अभयारण्यात स्लॉथ भालू व्यतिरिक्त बिबट्या, रीसस मकाक, लुचकार, साही, पट्टेरी कोल्हा, निळगाय, रानडुक्कर, जंगलमांजर, काराकल, लांडगा व विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी आढळतात. तसेच या अभयारण्यात 406 पेक्षा जास्त वनस्पतींच्या प्रजातींची नोंद करण्यात आली आहे.

आययूसीएनच्या वर्गीकरणानुसार या अभयारण्यात अनेक दुर्मिळ आणि संकटग्रस्त पक्ष्यांच्या प्रजाती मिळालेल्या आहेत. व या ठिकाणी विविध प्रकारचे साप, कासव, अजगर आणि पाल हे सरपटणारे प्राणी आढळले आहेत. हे अभयारण्य स्लॉथ भालूच्या संवर्धनासाठी ओळखले जाते.या अभयारण्यात केदारनाथ महादेवाचे एक मंदिर आहे. वन्यजीव आणि निसर्ग प्रेमींसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. पालनपुर पासून हे ठिकाण 45 किलोमीटर अंतरावर आहे.


6)Keerti Stambh Banaskantha-


‘कीर्ती स्तंभ’ हे गुजरात राज्यातील बनासकांठा जिल्ह्यातील पालनपुर येथे असलेले एक ऐतिहासिक ठिकाण आहे.हा उंच स्तंभ 1918 साली नवाब श्री ताले मोहम्मद खान यांनी श्री शेर मोहम्मद खान यांच्या शौर्याच्या स्मरणार्थ रेल्वे स्थानकाजवळ बांधला आहे. हा स्तंभ बांधण्यासाठी 40 हजार रुपये खर्च आला होता, व हा स्तंभ सय्यद गुलाब मियां अब्दुमिया यांच्या देखरेखीखाली बांधण्यात आला.

पालनपूरच्या नवाबांच्या कीर्तीला वंदन करण्यासाठी या ‘कीर्ती स्तंभ’ ची स्थापना करण्यात आली.या मनोऱ्याची रचना सुंदर मुघल शैलीत व ब्रिटिश वसाहती शैलीत केली आहे. व या स्तंभावर जालोर आणि पालनपूरच्या राजांच्या नावांची यादी कोरलेली आहे.हा स्तंभ पालनपुर शहराच्या वैभवाचा इतिहास सांगणारा दस्तऐवज आहे.

7)Kumbhariya Jain Mandir, Ambaji-


कुंभारिया जैन मंदिर हे गुजरात राज्यातील बनासकांठा जिल्ह्यातील अंबाजी शहरापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेले एक ऐतिहासिक श्री नेमिनाथ भगवानांचे 5 जैन मंदिराचे संकुल आहे. या ठिकाणी महावीर मंदिर,शांतीनाथ मंदिर,पार्श्वनाथ मंदिर,नेमिनाथ मंदिर आणि संभावनात मंदिर हे पाच मंदिरे आहेत. येथील मंदिराच्या भिंतीवरील सुंदर कोरीव काम व शिल्प हे मंदिराचे मुख्य आकर्षण असून गुजरातमधील हे एक वारसा केंद्र आहे.

ही मंदिरे इ.स. 1032 मध्ये विमलशा यांनी बांधलेल्या 360 मंदिरांच्या समूहातील अवशेषापासून बनवली आहेत. असे सांगितले जाते की चौथ्या शतकात या प्रदेशात 360 मंदिरे अस्तित्वात होती, परंतु बहुतेक ज्वालामुखीच्या क्रियेमुळे नष्ट झाली आणि आता फक्त पाचच शिल्लक आहेत.

8)Kamakshi Devi Temple-


कामाक्षी देवी मंदिर हे गुजरात राज्यातील बनासकांठा जिल्ह्यातील अंबाजी या ठिकाणी असलेले महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र आहे. या मंदिराची वास्तुकाला ही सुंदर व आधुनिक दक्षिण शैलीत डिझाईन केली आहे. कामाक्षी देवी मंदिर हे देवी पार्वती मातेचे रूप मानले जाते व हे मंदिर भक्ती आणि अध्यात्माचे प्रतीक आहे.

नवरात्र, पौर्णिमा आणि दिवाळीमध्ये या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. या ठिकाणी रस्ते आणि वाहतुकीच्या योग्य सुविधा असल्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात.कामाक्षी देवी मंदिर हे अंबाजी मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर आहे.

9)Mangalya van-

मांगल्य वन हे गुजरात राज्यातील बनासकांठा जिल्ह्यातील कैलास टेकडीवर असलेले एक अनोखे उद्यान आहे. पाण्याने वेढलेले हे उद्यान वन विभागाने विकसित केलेले आहे. आणि या उद्यानात पोहोचण्यासाठी पायऱ्या चढून जावे लागते. या उद्यानातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे इथे अद्वितीय राशी वन (ज्योतिषीय बाग) आणि वनस्पतींची बाग आहे, ज्याचा जीवनावर दगडांसारखाच परिणाम होतो असे ज्योतिषी सांगतात.मांगल्य वन मध्ये येणारे पर्यटक सूर्य राशींवर वनस्पतींचा काय परिणाम होतो याबद्दल जाणून घेतात,

आणि त्यांच्या राशीला अनुकूल असे रोप घरी घेऊन जातात. व ते रोप त्यांच्या अंगणात, शेतात किंवा त्यांच्या घराच्या परिसरात लावतात.या बागेत ही रोपे 18×18 मीटरमध्ये लावण्यात आली आहेत. या वनाला दररोज 700 ते 800 पेक्षा जास्त लोक भेट देण्यासाठी येत असतात. अंबाजी मंदिरापासून हे ठिकाण दीड किलोमीटर अंतरावर आहे.

10)Balaram Palace Resort-


बालाराम पॅलेस रिसॉर्ट हे गुजरात राज्यातील बनासकांठा जिल्ह्यातील चित्रासनी गावात बलराम नदीच्या काठावर वसलेला एक राजवाडा आहे.
या राजवाड्याचे बांधकाम पलनपूरच्या 29 व्या नवाब मुहम्मद खान राजाने इ.स. 1922 ते 1936 या कालावधीत केले.या राजवाड्याचे बांधकाम नव-शास्त्रीय आणि बरोक शैलीत केले असून हा राजवाडा 13 एकर क्षेत्रात पसरलेला आहे.

हा राजवाडा हिरवीगार जंगले आणि सुंदर फुलांनी बहरलेल्या बागांनी वेढलेला आहे. पूर्वी हा पॅलेस नवाबांचे शिकारीचे आणि विश्रांतीचे स्थान होता. सध्या हा पॅलेस रिसॉर्टमध्ये रूपांतरित झाला आहे. या पॅलेसमध्ये मेक्सिकन लॉन, विदेशी फुलांच्या बेड, आधुनिक कारंजे आणि एक सुव्यवस्थित संगीत प्रणालीसह लँडस्केप केलेले बाग आहे.

11)Balaram Ambaji Wildlife Sanctuary-


बलराम अंबाजी वन्यजीव अभयारण्य हे गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील एक महत्वाचे संरक्षित क्षेत्र आहे. हे अभयारण्य बनास आणि साबरमती नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात असून ते 542 किमी क्षेत्रात विस्तारलेले आहे. हे अभयारण्य खाथियार-गिर शुष्क पानझडी जंगल असून राजस्थानच्या सीमेजवळ आणि माउंट अबूजवळ आहे. या अभयारण्य स्लॉथ अस्वल ,

स्ट्रीप्ड तरस , बिबट्या , नीलगाय, साळू आणि कोल्हा हे वन्यजीव प्राणी आढळतात. तर साप,तारा कासव, अजगर आणि मॉनिटर सरडे हे सरपटणारे प्राणी आढळतात. तसेच या अभयारण्यात विविध प्रकारच्या औषधी वनस्पती,झाडे, पक्षी, स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतात.

12)108 Shri Pallaviya Parshwanath Shwetambar Jain Derasar Tirth-


पल्लवीया पार्श्वनाथ मंदिर हे गुजरात मधील बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर शहराच्या मध्यभागी असलेले मोटू देरासर म्हणून प्रसिद्ध जैन मंदिर आहे. या मंदिरात भगवान पल्लविया पार्श्वनाथ यांची 45 सें.मी.उंच, पांढरी रंगाची पद्मासन मुद्रामधील बसलेली सुंदर व आकर्षक मूर्ती आहे. जैन धर्मियांचे हे ऐतिहासिक उत्कृष्ट वास्तुकला, ऐतिहासिक कथा व सांस्कृतिक महत्व असलेले मंदिर आहे.

पालनपूर हे एक हजार वर्षापूर्वीचा इतिहास असलेले प्राचीन शहर आहे.राजा प्रहलादन याने त्याचा रोग बरा झाल्यानंतर हे पल्लवीय पार्श्वनाथ मंदिर बांधले. हे मंदिर 108 पार्श्वनाथांच्या मंदिरांच्या मालिकेत 63 वे मंदिर आहे.

13)Shri Balaram Mahadev Temple-


बलराम महादेव मंदिर हे गुजरात राज्यातील बनासकांठा जिल्ह्यातील पालनपुर शहराजवळ असलेले प्रसिद्ध व धार्मिक शिवमंदिर आहे.हे शिवमंदिर सुमारे 5,000 वर्षे जुने असून महाभारत काळातील असल्याचे सांगितले जाते. या ठिकाणी वनवास काळात पांडवांनी वास्तव केले होते. हे मंदिर निसर्गरम्य परिसरात असून मंदिराच्या भोवती हिरवळ आहे. तसेच मंदिराच्या बाजूने एक छोटी नदी वाहते. मंदिर परिसर अत्यंत शांत व रमणीय आहे. पालनपुर पासून हे मंदिर 12 किलोमीटर अंतरावर आहे.

14) Paniyari Ashram/Paniyari Waterfall-


पाणीयारी आश्रम हे गुजरात मधील बनासकांठा जिल्ह्यातील वडगाम तालुक्‍यातील मुमनवास,पावथी या गावाजवळ असलेले प्रसिद्ध निसर्गरम्य आणि धार्मिक ठिकाण आहे. या आश्रम परिसरात पाणीयारी हा सुंदर धबधबा आहे.या आश्रमाच्या परिसरात छोटेखानी ट्रेकिंगसाठी किंवा निसर्ग दर्शनासाठी चांगले आहे. हे ठिकाण एक हिंदू धार्मिक मंदिर/आश्रम आहे, व एक शांत,सुंदर, निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात भेट देतात.

15) Kedarnath Mahdev temple –


श्री केदारनाथ महादेव मंदिर हे गुजरात मधील बनासकांठा जिल्ह्यातील अरावली पर्वतरांगातील जेसोर टेकडीच्या शिखरावर वसलेले धार्मिक व प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर स्लॉथ बेअर अभयारण्यात असल्याने पर्यटकांना जंगल आणि बनास नदीचा आनंद घेता येतो. तसेच येथे पोहोचण्यासाठी सुमारे 300 पायऱ्या चढाव्या लागतात. महाशिवरात्रीला हजारो भक्त या महाभारतकालीन प्राचीन मंदिराला भेट देतात.

समुद्रसपाटीपासून हे मंदिर 1500 मीटर उंच शिखरावर असल्यामुळे, येथे जाताना पिण्याचे पाणी आणि खाऊ सोबत नेणे आवश्यक आहे. पालनपुर पासून हे मंदिर 32 किलोमीटर अंतरावर आहे.

16)Mithi Vav / stepwell –


मिठी वाव ही गुजरात राज्यातील बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर शहरात असलेली एक पायरी विहीर आहे. ही विहीर मध्ययुगीन काळाच्या उत्तरार्धात आठव्या शतकात बांधली असून ती परमार राजवटीचे एकमेव जिवंत स्मारक मानले जाते. ही विहीर पाच मजली पायऱ्यांची विहीर आहे. या विहिरीतील शिल्पांमध्ये गणेश , शिव , अप्सरा , नृत्य करणाऱ्या आकृत्या, पूजा करणाऱ्या जोडप्यांचे आणि फुलांच्या नमुन्यांचा समावेश आहे. या ठिकाणाला पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात.

17)Varai Dham Golden Temple-


वराई धाम गोल्डन टेम्पल हे गुजरात मधील बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर येथे वराई मातेचे प्रसिद्ध मंदिर आहे. येथील मंदिर परिसर शांत व निसर्गरम्य आहे. या मंदिरात विविध देवतांच्या 14 आकर्षक मूर्ती आहेत, आणि येथील जवळच्या छोट्याशा मंदिरात आणखी तीन मूर्ती आहेत.मंदिर परिसर सुरक्षित, स्वच्छ आणि शांतीपूर्ण असल्यामुळे भक्तांना येथे ध्यान, अध्यात्म आणि प्रार्थनेचा अनुभव घेता येतो.

18)Nadabet Seema Darshan-


नडाबेट सीमा दर्शन हे ठिकाण गुजरात मधील बनासकांठा जिल्ह्यात एक सीमा पर्यटन स्थळ आहे. नाडाबेट येथे सीमा दर्शनाची संकल्पना पंजाबमधील वाघा बॉर्डरच्या धर्तीवर विकसित करण्यात आली आहे. या ठिकाणी ‘सीमा दर्शन’ प्रकल्प उभारण्यात आला असून,येथे भारत-पाकिस्तान सीमेवर जाऊन सीमा पाहता येते व येथील झिरो पॉईंट वर जाऊन देशाच्या सीमा रेषेचे प्रत्यक्ष दर्शन होते.

तसेच या ठिकाणी पर्यटकांना बीएसएफ (BSF) जवानांचे शौर्य,अजय प्रहरी,झिरो पॉईंट,बीएसएफ स्तंभ,सरहद गाथा (संग्रहालय),रिट्रीट सेरेमनी- यामध्ये दोन्ही देशांचे सैनिक त्यांचे ध्वज खाली घेतात. ही ठिकाणे पाहता येतात.नडाबेट हे सकाळी 9 ते संध्याकाळी 7.30 पर्यंत खुले असते. व सोमवार बंद असते. पालनपुर पासून हे ठिकाण 80 किलोमीटर अंतरावर आहे.

19)Shri Pataleshwar Mahadev Mandir-


श्री पाताळेश्वर महादेव मंदिर हे गुजरात मधील बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर या ठिकाणी असलेले प्रसिद्ध, पौराणिक शिव मंदिर आहे.या मंदिरातील शिवलिंग जमिनीपासून सुमारे 100 फूट खाली पाताळात आहे, तर मंदिराचा शिखर भाग जमिनीपासून 51 फूट उंचीवर आहे. या मंदिराची स्थापना 12 ते 13 व्या शतकात झाली आहे. हे ठिकाण सिद्धराज जयसिंग यांचे जन्मस्थान आहे.

जयसिंहच्या जन्माच्या आनंदात त्यांची आई मीनलदेवी यांनी एक विहीर बांधण्याचा निर्णय घेतला आणि ते करताना त्यांना येथे एक शिवलिंग सापडले आणि मग त्यांनी एक प्रचंड शिवालय बांधण्याचा निर्णय घेतला. या मंदिरातील शिवलिंग पाताळातून मिळाल्यामुळे या मंदिराचे नाव पाताळेश्वर महादेव मंदिर आहे.पवित्र हिंदू श्रावण महिन्यात या ठिकाणी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

20)Bhagyabhumi Nabhashchandra Parshwadham-


भाग्यभूमी नभाषचंद्र पार्श्वधाम हे गुजरात मधील बनासकांठा जिल्ह्यातील पालनपुर तालुक्यातील जगाणा गावात असलेले प्रसिद्ध धार्मिक तीर्थस्थळ आहे. या मंदिरात श्वेताम्बर जैन तीर्थ (derasar) असून येथे श्री शंकरेश्वर पार्श्वनाथ मूर्ती मुख्य देवतत्त्व म्हणून प्रतिष्ठित आहे. याशिवाय या मंदिरात सहा देवकुळिका वंगणात आणि इतर जैन तत्त्वांचे देखील दर्शन आहे. तसेच जैन अनुयायांसाठी येथे धर्मशाळा उपलब्ध आहेत. येथील मंदिर परिसर स्वच्छ,सुंदर व शांत आहे. पालनपुर पासून हे ठिकाण सात किलोमीटर अंतरावर आहे.

21)Kailash Tekari Mahadev Temple-


कैलाश टेकडी ही गुजरात मधील बनासकांठा जिल्ह्यातील अंबाजी मंदिरापासून जवळ असलेले एक अत्यंत धार्मिक आणि रमणीय ठिकाण आहे. ही टेकडी अंबाजी–खेड़ब्रह्मा मार्गावर असून या टेकडीच्या शिखरावर एक सुंदर शिवालय /महादेव मंदिर आहे. या मंदिरात जाण्यासाठी शंभर दगडी पायऱ्या चढून जावे लागते.

या ठिकाणी सनसेट पॉईंट, मांगल्य वन,श्री अरसुरी अंबाजी माता देवस्थान हे अत्यंत सुंदर निसर्गरम्य पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे पर्यटकांचे हे आकर्षणाचे ठिकाण आहे. अंबाजी पासून हे ठिकाण दोन किलोमीटर अंतरावर आहे.

Visit the travel blog

1) बनासकांठा जिल्ह्यातील पाणीयारी आश्रम हे कोणत्या तालुक्यात आहे ?

बनासकांठा जिल्ह्यातील पाणीयारी आश्रम हे वडगाम तालुक्यात आहे .

2) बनासकांठा जिल्ह्यातील मिठी वाव कोणत्या शहरात आहे ?

बनासकांठा जिल्ह्यातील मिठी वाव पालनपूर शहरात असलेली एक पायरी विहीर आहे.

3)बनासकांठा जिल्ह्यातील अंबाजी मंदिर हे कोणत्या तालुक्यात आहे ?

बनासकांठा जिल्ह्यातील अंबाजी मंदिर हे डांटा तालुक्यात आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top