अमरेली जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-Top 21 places to visit in Amreli District

मित्रांनो भारत भ्रमंतीमध्ये आपण पाहणार आहोत भारत देशातील गुजरात राज्यातील अमरेली जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे,अमरेली जिल्हा हा गुजरात राज्यातील सौराष्ट्राच्या दक्षिण भागातील एक महत्वाचा जिल्हा आहे.या जिल्ह्याचे मुख्यालय अमरेली येथे असून या जिल्ह्यात 11 तालुके. 10 शहरे आणि 616 गावे आहेत. अमरेली हे शहर इ. सन 534 पासून अस्तित्वात आहे. त्यावेळी हे शहर अनुमानजी नावाने ओळखले जात होते.Top 21 places to visit in Amreli District

व अमरेलीचे प्राचीन संस्कृत नाव अमरवल्ली होते. उद्योग आणि व्यवसायामध्ये हा जिल्हा आघाडीवर असून या जिल्ह्यामध्ये खादी, टॅनिंग, चांदीचे काम आणि कापूस जिनिंगचे उद्योग आहेत. या जिल्ह्याला राजकोट,बोटाड,जुनागढ,गिर, सोमनाथ आणि भावनगर या जिल्ह्यांच्या सीमा लाभलेले आहेत.

शेती उत्पादनामध्ये या जिल्ह्यात, गहू,डाळी,बाजरी, शेंगदाणे आणि कापूस ही उत्पादने घेतली जातात. निसर्ग समृद्ध असलेल्या या जिल्ह्यात अनेक धार्मिक सांस्कृतिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत.

Top 21 places to visit in Amreli District

अमरेली जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे

1) Nagnath Temple-

Top 21 places to visit in Amreli District


नागनाथ मंदिर हे गुजरात राज्यातील अमरेली जिल्ह्यातील अमरेली शहराच्या मध्यवर्ती असलेले प्रसिद्ध व धार्मिक शिव मंदिर आहे. हे शिव मंदिर सरसुभा श्री वित्रीलराव देवाजी यांनी 1802 मध्ये बांधले होते.श्री वित्रीलराव देवाजी हे सयाजीराव गायकवाड यांच्याकडे प्रतिनिधी होते.नागनाथ मंदिर हे अमरेली जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. भाविक मोठ्या आस्थेने या मंदिरात येतात.

2) Ambardi Safari park –


अंबर्डी सफारी पार्क हे अमरेली जिल्ह्यातील अंबर्डी गावातील शेत्रुंजी नदीच्या काठावर असलेल्या गीर संरक्षित क्षेत्रातील राखीव वन आहे.हे उद्यान 365 हेक्टरवर असून जलस्रोत, उतार असलेली जमीन आणि येथे मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. या ठिकाणी एक प्रसिद्ध खोडियार मंदिर आणि खोडियार धरण आहे. हे उद्यान 2017 मध्ये आशियाई सिंहांचे संरक्षण आणि संवर्धनाच्या हेतुने स्थापन करण्यात आले.

येथील गीर जंगलात 606 पेक्षा जास्त वनस्पतीच्या प्रजाती, 39 सस्तन प्राण्यांच्या प्रजाती, 300 पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती, 37 सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजाती आणि 2000 पेक्षा जास्त कीटकांच्या प्रजाती पाहायला मिळतात. तसेच येथील जंगलात आशियाई सिंह, बिबट्या, चिंकारा, ब्लूबुल, स्पॉटेड डी, पोर्क्युपिन यापेक्षा अधिक जातीचे वन्यजीव प्राणी आढळतात.धारी जिल्ह्यापासून हे ठिकाण 7 किलोमीटर अंतरावर आहे.

3) Shiyalbet,Jafrabad, Amreli-


शियालबेट गाव हे अमरेली जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेले एक प्रसिद्ध नैसर्गिक बेट आहे. अरबी समुद्राने वेढलेल्या या बेटावर अनेक प्राचीन, नैसर्गिक, भौतिक पर्यटन स्थळे आहेत. या ठिकाणी तुम्ही मच्छीमारांच्या गावाची संस्कृती आणि समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेऊ शकता. शियालबेटमध्ये थानवाव, चेलायांनो, खंडानियो, भेसलापीर, सवाई, पीर, रामजी मंदिर, दर्गा अशी अनेक प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळे आहेत.

4) Pipavav Port-


पिपावाव बंदर हे गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशातील अमरेली जिल्ह्यातील राजुला या ठिकाणी असलेले एक खाजगी बंदर आहे. या बंदराला गुजरात पिपावाव पोर्ट लिमिटेड म्हणूनही ओळखले जाते. या बंदरामुळे भारताला अमेरिका, युरोप, आफ्रिका, मध्य पूर्व आणि विविध जागतिक स्थळांशी जोडणाऱ्या एका प्रमुख पूर्वेशी जोडणाऱ्या आंतरराष्ट्रीय सागरी व्यापार मार्गावर फायदा होतो.

पिपावाव बंदर हे खाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत विकसित केलेले भारतातील पहिले खाजगी बंदर आहे. या बंदरावरून आंतरराष्ट्रीय कार्गो हाताळणी, कंटेनर स्टोरेज, रीफर प्लग पॉइंट्स, ऑन-डॉक रेल साइडिंग, कस्टम क्लिअरन्स आणि उपकरणे ही कामे केली जातात. हे बंदर राजुला शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे.

5) Kalapi Tirth-


कलापी तीर्थ हे गुजरात मधील अमरेली जिल्ह्यातील लाठी शहराजवळील धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेले एक ठिकाण आहे. या ठिकाणी प्रसिद्ध कवी कान्हजी /कलापी यांची समाधी आणि त्यांच्या स्मरणार्थ एक उद्यान आहे. कलापी यांचे मूळ नाव सुरसिंहजी तख्तसिंहजी गोहिल हे असून ते एक प्रसिद्ध गुजराती कवी आणि लेखक होते. कलापी यांना अल्पायुष्य लाभले असूनही त्यांचे कार्यक्षेत्र खूप मोठे आहे.

त्यांनी त्यांच्या छोट्याशा कारकिर्दीत 1500 पद्यांचा समावेश असलेल्या 250 कविता, अनेक गद्यलेखन,आणि पत्नी व मित्रांना मिळून 900 पत्र लिहिले आहेत. तसेच त्यांनी त्यांचे विचार मांडण्यासाठी गुजराती भाषे शिवाय चार इंग्रजी कादंबऱ्याचे गुजराती मध्ये भाषांतर केले आहे.कलापी तीर्थ, हे अमरेली जिल्ह्यातील एक महत्वाचे ठिकाण असून येथे कलापी यांच्या स्मृती जतन केल्या आहेत.

Visit our website: allindiajourney.com

6) BhojalDham – Fatehpur


भोजलधाम हे अमरेली जिल्ह्याजवळ फतेहपुर या ठिकाणी असलेले धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणचे भोज भगत हे गुजरात मधील एक प्रसिद्ध हिंदू कवी होते. त्यांचा जन्म 1785 मध्ये सौराष्ट्र मधील जेतपुर जवळील देवकीगालोल गावामध्ये लेउवा पाटीदार जातीमध्ये झाला होता. त्यांना भोजलाराम या नावाने हे ओळखले जाते. ते बारा वर्षाचे असताना गिरणार येथील त्यांचे गुरु जे संन्यासी होते यांच्याशी त्यांची ओळख झाली.

ते अशिक्षित होते परंतु गुरूंच्या आशीर्वादाने त्यांनी अनेक आरती , भजन , ढोल , कविता, कीर्तन , महीना लिहिले.’भोज भगत ना चबखा’ हा त्यांनी लिहिलेला कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. भोज भगत यांचे निधन ते 65 वर्षाचे असताना त्यांच्या शिष्याला वीरपुर या ठिकाणी भेटायला गेलेले असताना झाले.वीरपुर या ठिकाणी त्यांचे स्मारक मंदिर आहे.

7) Clock Tower, Amreli-


क्लॉक टॉवर (घड्याळ मनोरा) हे गुजरात मधील अमरेली जिल्ह्यातील ब्रिटिश कालखंडात बांधलेले एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचे स्थापत्यशिल्प आहे. हे टॉवर अमरेली शहराच्या मध्यावर असून या ठिकाणाला ‘घड्याळ टॉवर’ किंवा ‘घड्याळ मनोरा’ म्हणूनही ओळखले जाते. या टॉवरवरमध्ये लावलेले मोठे घड्याळ चारही बाजूंनी दिसते. व हे घड्याळ सार्वजनिक वेळ दाखवण्याचे कार्य करते.

हे टॉवर अमरेलीचे एक महत्त्वाचे लँडमार्क असून एके काळी हे शहरातील प्रमुख वेळ दर्शक म्हणून वापरले जात होते.हे टॉवर ब्रिटिश आणि स्थानिक स्थापत्य कलेचे एक उत्तम नमुना आहे. हे ठिकाण अमरेली शहरातील बाजारपेठेच्या जवळ आहे.

8) Khodiyar Dam, Amreli-


खोडियार धरण हे गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील धारी या ठिकाणी शेत्रुंजी नदीवर बांधलेले एक महत्वाचे धरण आहे. या धरणाचे बांधकाम 1967 मध्ये पूर्ण झाले असून या धरणाचे नाव येथील पूजनीय देवी खोडियार मातेच्या नावावरून देण्यात आले आहे. या धरणाजवळच खोडियार माता मंदिर आणि सुंदर धबधबा आहे.खोडियार धरण हे अमरेली जिल्ह्यातील महत्त्वाचे धरण असून या धरणाचा उपयोग प्रामुख्याने सिंचनासाठी केला जातो.

9) Shree Bhurakhiya Hanuman Temple –


श्री भुरखिया हनुमान मंदिर हे अमरेली जिल्ह्यातील लाठी गावातील अत्यंत जागृत देवस्थान आहे. हे मंदिर श्री दामोदरदासजींनी 400 वर्षांपूर्वी स्थापन केले होते. या मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगितले जाते ती अशी की श्री दामोदरदासजी यांच्या स्वप्नात भगवान हनुमान त्यांच्याकडे आले होते आणि त्यांनी सांगितले की चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या रात्री मध्यरात्री मी प्रकट होईल .

आणि त्यांनी हे ही सांगितले की मी सभड आणि लाठी या दोन गावांच्या अंतरावर असलेल्या जंगलातील एका लहान टेकडीवरील बाबुलच्या झाडावर असेन. आणि श्री दामोदरदासजी यांच्या स्वप्नानुसार, खरोखरच भगवान एका दिव्य प्रभावळात आले. अशी आख्यायिका सांगितली जाते.

10) Trimandir Amreli-


त्रिमंदिर हे गुजरात राज्यातील अमरेली जिल्ह्यातील खरवडी जवळ लिलिया रोड बायपास चोकडी येथे असलेले एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. या मंदिराचे क्षेत्रफळ 9027 चौरस फूट असून मंदिराचे व्यासपीठ 4219 मीटर एवढे आहे.या मंदिरात, एकाच व्यासपीठावर जैन, शैव आणि वैष्णव धर्माच्या देवतांच्या मूर्ती इतर धर्मातील देवदेवतांच्या मूर्ती आहेत. आणि मंदिराच्या मध्यभागी भगवान श्री सीमंधर स्वामींची 111 इंच उंचीची मूर्ती आहे. या मंदिराला 20000 पेक्षा जास्त भाविक महिन्याला भेट देतात.

11) Maruti Dham-


मारुति धाम हे गुजरात राज्यातील अमरेली जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे.हे मंदिर राजुला तालुक्यात असून कुंभनाथ-सुखनाथ मंदिर जवळच्या परिसरात आहे. या मंदिराला चारी बाजूंनी पाणी आहे. तसेच या मंदिरात वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दर्शनाला येत असतात.

12)Galdhara khodiyar mandir-


खोडियार माताजी मंदिर हे गुजरात राज्यातील अमरेली जिल्ह्यातील धारी तालुक्यातील शेत्रुंजी नदीच्या काठी गालधरा गावात वसलेले प्रसिद्ध धार्मिक मंदिर आहे. सौराष्ट्रातील हे मंदिर अकराव्या शतकात बांधलेले असून या मंदिरात खोडियार मातेचे भक्तिभावाने पूजन केले जाते.

हा मंदिर परिसरात अत्यंत निसर्गरम्य व शांततापूर्ण आहे. या मंदिर परिसरामध्ये खोडियार बाँध, गिर राष्ट्रीय उद्यान आणि आम्बरडी सफारी पार्क असल्यामुळे, संध्याकाळी सिंहांच्या गर्जना ऐकता येतात.या मंदिराजवळ एक 1600 वर्षापूर्वीचा जुना वृक्ष आहे, ज्याखाली देवीची मूर्ती आहे. पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात भेट देतात.

13) Hari Krishna Sarovar-


हरे कृष्णा सरोवर हे आमरेली जिल्हातील सनोसरा/ दुधाळा गावाजवळ गगाडिया नदीच्या तीरावर तयार झालेले एक सरोवर आहे.हे सरोवर 150 एकर क्षेत्रफळावर पसरलेले असून श्री सवजी ढोलकिया, ‘हरि कृष्णा एक्सपोर्ट्स’ संस्थापक, यांनी ते 120 दिवसांत स्वतःच्या निधीतुन तयार केले आहे. या सरोवरामुळे 22 गावच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून कृषी क्षेत्रातही याचा मोठा फायदा झाला आहे.25 सप्टेंबर 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दूरदर्शनद्वारे या सरोवराचे उद्‌घाटन केले. आमरेली शहरापासून हे ठिकाण 20–25 किलोमीटर अंतरावर आहे.

14)Jafrabad fort-


जाफराबादचा किल्ला हा गुजरात राज्यातील अमरेली जिल्ह्यातील जाफराबादच्या अरबी समुद्राजवळ आहे. हा किल्ला मुस्लीम सुलतानांद्वारे सोळाव्या शतकात बांधण्यात आला.जाफराबाद हे एक व्यापारी बंदर होते, सागरी आक्रमणांपासून संरक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. किल्ल्याभोवती मजबूत दगडी तटबंदी असून किल्ल्यामध्ये प्राचीन दरवाजे, बुरुज,मशिदी, जुनी वास्तुशिल्पे, आणि किल्ल्याचा इतिहास सांगणाऱ्या गोष्टींचे अवशेष पाहायला मिळतात.

व काही ठिकाणी तोफांचे अवशेष आढळतात. तसेच या किल्ल्याजवळील समुद्र किनारा पर्यटकांना आकर्षित करतो. अमरेली शहरापासून हा किल्ला 80 किलोमीटर अंतरावर आहे.

15)Tulsishyam Mandir-


तुलशीश्याम मंदिर हे 700 वर्ष जुने असून गुजरात राज्यातील गीर राष्ट्रीय उद्यानात अमरेली, जुनागढ जिल्हा आणि गीर सोमनाथ जिल्ह्याच्या सीमेवर आहे. व अमरेली जिल्ह्यातील धारीपासून 45 किमी अंतरावर आहे. तुळशीश्याम मंदिर हे निसर्गरम्य परिसरात असून या मंदिरात सुंदर गरम पाण्याचे झरे आहेत ज्यांना पुराणांमध्ये ‘तप्तोडक’ असे म्हटले आहे.

या मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते की भगवान श्रीकृष्णाने तुल नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून या ठिकाणाला तुलसीश्याम मंदिर असे म्हणतात. या मंदिरात नयनरम्य तुलसीश्यामची मूर्ती असून मंदिरात पोहोचण्यासाठी शंभर पायऱ्या चढून जावे लागते.उना येथून हे मंदिर 35 किमी अंतरावर आहे.

16) Shree Swaminarayan Mahila Mandir-


श्री स्वामीनारायण मंदिर व महिला संस्कार केंद्र हे गुजरात राज्यातील अमरेली जिल्ह्यातील एक अत्यंत पवित्र धार्मिक,सांस्कृतिक महत्त्वपूर्ण स्थळ आहे. या ठिकाणी स्त्रियांना आध्यात्मिक,नैतिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्कार दिले जातात. या मंदिरात श्री स्वामीनारायण भगवानाची सुंदर मूर्ती आहे. तसेच येथे योग, प्रवचन, शास्त्राध्ययन, हस्तकला, शिवणकाम यांसारख्या उपक्रमांचे आयोजन केले जाते.व महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले जातात. येथील मंदिर परिसर शांत, भक्तीमय आणि स्वच्छ आहे.

17) Shree Girdharbhai Sangrahalaya-


श्री गिरधरभाई संग्रहालय हे गुजरात राज्यातीलअमरेली जिल्ह्यातील एक महत्त्वाचे संग्रहालय आहे. या संग्रहालयाचे स्थापना 1958 मध्ये करण्यात आली. या संग्रहालयात शिक्षण, आरोग्य, कला आणि संस्कृती, पाणी, बाल आणि युवा विकास आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात काम केले जाते. या संग्रहालयाचे प्राथमिक कार्यालय गुजरातमधील अमरेली येथे आहे.

18) Gravity Hill-


गुरुत्वाकर्षण टेकडी ही गुजरात राज्यातील अमरेली जिल्ह्यातील तुळशीश्यामजवळ असलेले एक मनोरंजक आणि रहस्यमय ठिकाण आहे. या ठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्तीचा भ्रम निर्माण होतो. व येथे उतार नसतानाही गाड्या चढावर जाताना दिसतात किंवा पाणी उताराच्या दिशेने न जाता वरच्या दिशेने वाहते, असा भास होतो. गुरुत्वाकर्षण टेकडी म्हणजे जिथे आजूबाजूच्या जमिनीच्या रचनेमुळे गुरुत्वाकर्षण शक्तीचा भ्रम निर्माण होतो.

त्यामुळे उतार नसतानाही उतार असल्याचा भास होतो. हे असे का घडते याचे नेमके कारण अजून कोणालाही समजलेले नाही. काही जणांच्या मते चुंबकीय शक्ती किंवा इतर काही नैसर्गिक शक्तीमुळे असे भास होतात. पर्यटक या रहस्यमय घटनेचा अनुभव घेतात. अमरेली शहरापासून हे ठिकाण 75 किलोमीटर अंतरावर आहे.

19) Kamnath MahadevTemple –


कामनाथ महादेव मंदिर हे गुजरात राज्यातील अमरेली जिल्ह्यातील जेसिंगपारा परिसरात वाडी–थेबी नदीच्या काठावर असलेले प्रसिद्ध व प्राचीन धार्मिक स्थळ आहे.या मंदिराच्या आवारात एक सुंदर बाग आहे. व येथे मुलांसाठी एक खेळायला जागा आहे. आणि या मंदिराच्या आवारात भगवान शिवाची सुंदर मूर्ती आहे. हे मंदिर अमरेली जिल्ह्यातील एक महत्वाचे धार्मिक स्थळ असून पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात भेट देतात.

20) Gandhi Baag-


गांधीबाग हे गुजरात राज्यातील अमरेली जिल्ह्यातील एक निसर्गरम्य व सुंदर उद्यान आहे. या उद्यानात मुलांसाठी खेळायला जागा, बाक, आणि हिरवळ असून
या ठिकाणी लोक फिरायला, विश्रांती घ्यायला आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी येतात.गांधीबाग,हे अमरेली जिल्ह्यातील निसर्ग प्रेमींसाठी एक शांत आणि सुंदर ठिकाण आहे.

21) Khodiyar Dhara Waterfall-


खोडियार धारा धबधबा हा गुजरात राज्यातील अमरेली जिल्ह्यातील धारी या ठिकाणी असलेला एक प्रसिद्ध व नयनरम्य सुंदर धबधबा आहे. हे ठिकाण निसर्गाच्या सानिध्यात असून या ठिकाणी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले खोडियार मातेचे मंदिर आहे. हा धबधबा परिसर अत्यंत सुंदर निसर्ग संपन्न व शांत असल्यामुळे पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात भेट देतात. या धबधबा परिसरात अंबारी सफारी पार्क, लायन शो पॉईंट, गौमुखी महादेव मंदिर, एशियन लायन्स क्रॉसिंग एरिया, टॉवर क्लॉक, हिरपारा पॅलेस ही पर्यटन स्थळे आहेत.

Visit the travel blog

1) अमरेली जिल्ह्यातील श्री भुरखिया हनुमान मंदिर कोणत्या गावातील देवस्थान आहे?

अमरेली जिल्ह्यातील श्री भुरखिया हनुमान मंदिर लाठी गावातील देवस्थान आहे .

2) गुजरात राज्यातील खोडियार धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?

गुजरात राज्यातील खोडियार धबधबा अमरेली जिल्ह्यात आहे .

3) अमरेली जिल्ह्यातील कामनाथ महादेव मंदिर कोणत्या नदीच्या काठी आहे ?

अमरेली जिल्ह्यातील कामनाथ महादेव मंदिर वाडी–थेबी नदीच्या काठी आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top