मुंबई शहर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे-Top 20 places visit to in Mumbai City

मंडळी भारत भ्रमंती मध्ये आज आपण पाहणार आहोत मुंबई शहर जिल्हा येथील संपूर्ण पर्यटन स्थळे मुंबई हे महाराष्ट्राची राजधानी असलेले मोठे धनाड्य शहर आहे.या शहराला मुंबादेवीच्या नावावरून मुंबई हे नाव पडले आहे. मुंबईला सात बेटांचे शहर म्हणून ही ओळखले जाते. हा जिल्हा भारताचा आर्थिक कणा आहे. या जिल्ह्याची राज्यभाषा मराठी आहे. याशिवाय या ठिकाणी गुजराती,मारवाडी, हिंदी,उर्दू या ही भाषा बोलल्या जातात.Top 20 places visit to in Mumbai City

हा जिल्हा अरबी समुद्राच्या काठावर असून कोलाबा, गिरगाव, माटुंगा, भायखळा, परळ, वरळी, माहीम हे भाग येतात. 2008 मध्ये मुंबईला अल्फा जागतिक शहर म्हणून संबोधले गेले. या जिल्हाचे क्षेत्रफळ अंदाजे 157 मीटर आहे. ब्रिटिश राजवटीत या ठिकाणी व्यापाराची मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ब्रिटिश राजवटीत मुंबई हा एकच जिल्हा होता परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे 1990 या जिल्ह्याचे विभाजन करून मुंबई शहर व मुंबई उपनगर असे दोन जिल्हे निर्माण करण्यात आले. ब्रिटिश राजवटीमध्ये या शहराचे नाव बॉम्बे होते परंतु 1995 मध्ये ते बदलले गेले व मुंबई असे करण्यात आले.

या ठिकाणी भारतातील आरबीआय, शेअर बाजार, अनेक बँका, मोठमोठ्या कंपन्या, आणि कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. 1854 मध्ये भारतातील पहिली सूतगिरणी मुंबईमध्ये सुरू करण्यात आली. तसेच 1853 मध्ये मुंबई ते ठाणे धावणारी रेल्वे मुंबई मध्ये सुरू झाली. मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव आहेत. आणि येथील हवामान उष्ण व दमट आहे. तसेच मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबईचा कारभार हा बृहन्मुंबई महापालिकेतर्फे चालवला जातो. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे या ठिकाणी आहे.

Table of Contents

Top 20 places visit to in Mumbai City

मुंबई शहर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे-


1) सिद्धिविनायक मंदिर-

Top 20 places visit to in Mumbai City


Siddhivinayak Temple हे मुंबईतील प्रभादेवी या ठिकाणी असलेले श्री गणेशाचे प्राचीन धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर 1801 मध्ये बांधण्यात आले. या गणपतीची काळ्या पाषाणातील मूर्ती अडीच फूट उंच व दोन फूट रुंद आहे. गणपतीची सोंड उजव्या बाजूला असून बाजूला रिद्धी सिद्धी आहेत.

या गणपतीला “महागणपती” म्हणून ही ओळखले जाते. 1980 मध्ये या मंदिरात सुवर्ण कलशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.मंदिरात रोज आरत्या आणि विविध पूजा केल्या जातात. नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची ओळख आहे. ‘श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास’ या विश्वस्त संस्थेद्वारे मंदिराचे कामकाज पाहिले जाते. सेलिब्रिटी सह लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतात.

2) छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय-


chhatrapati shivaji maharaj vastu sangrahalaya हे मुंबईमधील ऐतिहासिक केंद्र आहे. या संग्रहालयाची स्थापना 1905 मध्ये झालेली होती आणि या संग्रहालयाचे पूर्वीचे नाव”प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया” असे होते. नंतर 1998 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ हे नाव बदलण्यात आले.

या संग्रहालयाची इमारत इंडो-सरासेनिक शैलीत बांधलेली असून या ठिकाणी 50 हजार वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत. ठिकाणी शिल्पकला,लघुचित्रे,नेपाली आणि तिबेटी कला वस्तू, आणि या ठिकाणी एक प्राचीन ममी देखील पाहायला भेटते.

3)गेटवे ऑफ इंडिया-


Gateway Of India हे मुंबईमधील कुलाबा अपोलो बंदर आणि अरबी समुद्र या ठिकाणी असलेले ऐतिहासिक स्मारक आहे. हे स्मारक 1911 मध्ये जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ भारतीय आणि मुस्लिम स्थापत्य शैलीचा वापर करून बांधले गेले. ते 1924 मध्ये पूर्ण झाले.

या ठिकाणाला मुंबईचे आयकॉनिक लँडमार्क म्हणून ओळखले जाते. या स्मारकाची उंची 26 मीटर उंच असून ते भारताचे प्रवेशद्वार आहे. एलिफंटा बेटला जाणाऱ्या बोटी इथूनच जातात. या ठिकाणी जवळच ताजमहाल पॅलेस हॉटेल आहे.


4)मणिभवन गांधी संग्रहालय-

Please visit our website: allindiajourney.com

Mani Bhavan Gandhi Sangrahalaya हे मुंबईमधील लेबर्नम रोडवर गावदेवी या ठिकाणी असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे.या ठिकाणी 1917 ते 1934 मध्ये महात्मा गांधी वास्तव्यास होते. त्यावेळी त्यांनी या इमारतीतून स्वदेशी, खादी, असहकार, सत्याग्रह,आणि खिलाफत चळवळींचे नेतृत्व केले होते.

तसेच या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गांधीजींनी वापरलेल्या चरखा, पुस्तकं आणि चटई या वस्तूंचे जतन करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी असलेल्या फोटो गॅलरी मध्ये गांधीजीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे सर्व कागदाचे चित्रण ठेवण्यात आले आहे. या संग्रहालयात 50 हजार पुस्तके असून डाक तिकिटांचे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे.

5) हाजी अली दर्गा-

Haji Ali Darga हे ठिकाण मुंबईतील अरबी समुद्रामध्ये छोट्या बेटावर आणि वरळीच्या किनाऱ्यावर असलेले पवित्र धार्मिक व अत्यंत प्रसिद्ध स्थळ आहे. हा दर्गा सुफी संत सय्यद पीर हाजी अली शाह बुखारी यांच्या स्मरणार्थ 1431 साली बांधण्यात आला होता.

या दर्ग्याचे बांधकाम इंडो-इस्लामिक स्थापत्यकलेत बांधलेले असून दर्गामध्ये अरबी भाषेतील अल्लाहची 99 नावे कोरलेली आहेत. 2016 मध्ये येथील गर्भगृहात महिलांना जाण्यास प्रवेश मिळाला. हे एक धार्मिक स्थळ नसून पर्यटन स्थळ देखील आहे.अनेक चित्रपटांच्या चित्रीकरण या ठिकाणी केले आहे.’फिजा’ या चित्रपटातील ‘पिया हाजी अली’ हे गाणे या ठिकाणी शूट करण्यात आले होते.


6)मरीन ड्राईव्ह-

Marine Drive हे मुंबईतील अरबी समुद्रकिनारी असलेले प्रसिद्ध रम्य ठिकाण आहे. हे ठिकाण म्हणजे मुंबईच हृदय असं म्हटलं जात.या ठिकाणाला “क्वीन्स नेकलेस” म्हणूनही ओळखले जाते. कारण रात्रीच्या वेळी या ठिकाणी असलेल्या लाईट्समुळे हे ठिकाण गळ्यातील हारा सारखे भासते.

हे ठिकाण म्हणजे नरिमन पॉईंट पासून ते गिरगाव चौपाटीपर्यंत चा 3.6 किलोमीटर समुद्रकिनाऱ्यालगतचा रस्ता आहे. मरीन ड्राईव्ह वरील शांतता आणि सौंदर्य पाहून मनाला भुरळ पडते. अनेक चित्रपट आणि मालिकांचे या ठिकाणी शूटिंग करण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. चर्चगेट स्टेशन पासून हे ठिकाण सर्वात जवळ आहे.

7)कन्हेरी गुंफा-

Kanheri Cave हे मुंबईतील बोरिवली या ठिकाणी असलेले प्राचीन बौद्ध लेण्यांच्या समूहाचे ठिकाण आहे. हे ठिकाण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात असून या ठिकाणी 109 गुंफा आहेत. प्राचीन काळात कान्हेरी लेणी या बौद्ध धर्माचे प्रमुख केंद्र होते. या लेण्या बेसाल्ट काळ्या खडकात कोरलेल्या आहेत. येथील लेणींमध्ये विहार,स्तूप, शिलालेख, चैत्यगृहआणि बुद्ध व अवलोकितेश्वर यांच्या मूर्ती पाहायला मिळतात.

या लेण्यांमध्ये त्या काळातील भिक्षूंच्या पाण्याच्या सोयीसाठी डोंगर माथ्यावरून येणाऱ्या पाण्याचे खडकांमध्ये पाट व पाण्याच्या टाक्या कोरलेल्या आहेत.हे त्या वेळचे एक आश्चर्य समजले जाते. मुंबईच्या जंगलात वसलेले हे ठिकाण समृद्ध भारताच्या प्राचीन वारशाचे ठिकाण असून इतिहास प्रेमी, निसर्गप्रेमी आणि बौद्ध संस्कृतीच्या अभ्यासकांचे पर्यटन स्थळ आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापासून हे ठिकाण6 किलोमीटर अंतरावर आहे.


8)छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस –

Chhatrapati Shivaji Maharaj Terminus हे भारत देशातील आणि मुंबईतील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा असलेले रेल्वे स्थानक आहे. या स्थानकाचे पूर्वीचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस असे होते. १९९६ मध्ये हे नाव बदलण्यात आले. व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नाव देण्यात आले.

1887 मध्ये हे ठिकाण व्हिक्टोरियन गोथिक स्थापत्यशैली आणि भारतीय प्राचीन स्थापत्य कला या शैलीमध्ये फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स या ब्रिटिश डिझायनरच्या देखरेखी खाली बांधण्यात आले. या ठिकाणी 18 प्लॅटफॉर्म, घड्याळ, सुंदर शिल्पकाम असून बाहेरच्या बाजूने ही इमारत राजमहाला सारखी दिसते. 2004 साली युनोस्कोने हे स्थळ जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.लाखो प्रवासी दररोज या ठिकाणाहून प्रवास करतात.

9)जुहू बीच-


Juhu Beach हे मुंबईतील अरबी समुद्रकिनाऱ्यावर सर्वात लांब समुद्रकिनारा असलेले पर्यटकांचे आवडते प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.सांताक्रूझ, अंधेरी आणि विलेपार्ले हे या बीच च्या जवळची रेल्वे स्थानके आहेत. वर्सोवा पर्यंत पसरलेला हा किनारा सहा किलोमीटर लांब आहे. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्त पहाण्यासाठी लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.

तसेच या ठिकाणी वरील स्ट्रीट फूड प्रसिद्ध आहे. गणेश चतुर्थीच्या वेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन केले जाते. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चित्रपटाचे शूटिंग होत असल्याने या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. या परिसरात इस्कॉन मंदिर,सेंट जोसेफ चर्च ही ऐतिहासिक पर्यटन स्थळे पाहायला मिळतात.


10)एलिफंटा गुंफा-


Elephanta Cave ही मुंबईजवळच्या अरबी समुद्रातील एलिफंटा बेटावर असलेले एक प्राचीन ऐतिहासिक स्थळ आहे.या लेण्या पाच ते आठव्या शतकामध्ये मध्ये बनवलेल्या असून या लेण्यांना”घारापुरी लेणी” म्हणूनही ओळखले जाते.या लेण्यांमध्ये प्राचीन हिंदू धर्मातील शिल्पकला आणि बुद्धकालीन प्रभाव पाहायला मिळतो.

या ठिकाणी महादेवाची वीस फूट उंचीची भव्य मूर्ती असून 7 लेण्या आहेत.एलिफंटा लेण्यांना 1987 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. गेटवे इंडिया पासून बोटीने एक तासाच्या अंतरावर या लेण्या आहेत.

11)छोटा काश्मीर-


Chota Kashmir हे गोरेगावच्या पूर्वेला मुंबईसारख्या गजबजलेल्या ठिकाणी आरे कॉलनी मध्ये असलेले निसर्गरम्य ठिकाण आहे. या ठिकाणाला आरे गार्डन,आरे लेक म्हणूनही ओळखले जाते. या ठिकाणी असलेले थंड हवामान, शांतता आणि हिरवळ यामुळे या ठिकाणाला “छोटा काश्मीर” म्हणून ओळखले जाते.

या ठिकाणी असलेल्या तलावामध्ये बोटिंगची सुविधा आहे. तसेच पक्षी निरीक्षण ही करता येते. व हिंदी आणि मराठी चित्रपटाचे शूटिंग या ठिकाणी केले जाते. गोरेगाव रेल्वे स्थानकापासून हे ठिकाण जवळ आहे.


12)नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट-


National Gallery of Modern Art हे मुंबईमधील महात्मा गांधी रोडवर सर कावसजी जहांगीर पब्लिक हॉल, या ठिकाणी असलेले प्रमुख कला संग्रहालय आहे.हे संग्रहालय सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिपत्याखालील असून 1996 मध्ये सार्वजनिक वापरासाठी खुले करण्यात आले.

या संग्रहालयात शिल्पकला आणि ग्राफिक्सचे संग्रह,भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या चित्रकला यांचा समावेश आहे. या ठिकाणी विविध कला प्रदर्शन, कार्यशाळा, नृत्य आणि संगीत कार्यक्रम यांचे आयोजन केले जाते.

13)विहार तलाव-


Vihar Lake हा मुंबईमधील 1860 मध्ये बांधलेला सर्वात जुना कृत्रिम तलाव आहे.हा तलाव मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा असून बोरीवली कडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जवळ आहे. हा तलाव परिसर निसर्गरम्य असून हिरवळीने बहरलेला आहे. या तलावात बोटिंग आणी पोहायला परवानगी नाही. या तलावाचे क्षेत्रफळ सुमारे 27 चौ.किमी असून पाणी साठवण क्षमता 27,000 कोटी लिटर एवढी आहे.अनेक पक्षी प्रेमी आणि निसर्गप्रेमी या ठिकाणाला भेट देण्यासाठी येतात.


14) पवई तलाव-


Pawai Lake हा मुंबईतील 1890 मध्ये बांधण्यात आलेला पवई उपनगरात असलेला महत्त्वाचा कृत्रिम तलाव आहे. या तलावाची पाणी साठवण क्षमता सुमारे 545 कोटी लिटर एवढी आहे. परंतु या तलावाचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने औद्योगिक वापरासाठी व आरे दुग्ध वसाहतीतील इतर गोष्टींसाठी वापरले जाते. हा तलाव 6.61 चौरस किलोमीटर मध्ये पसरलेला असून तलावाच्या बाजूला हिरवीगार झाडे व आंबेडकर उद्यान आहे.

या तलावाच्या आसपास आयआयटी मुंबई, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग आणि हिरानंदानीच्या इमारती आहेत. तसेच या ठिकाणी असलेल्या’पवई निसर्ग उद्यान’ मध्ये संध्याकाळच्या वेळी संगीत कारंजाचे आयोजन केले जाते. निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफर या ठिकाणाला मोठ्या प्रमाणावर भेट देतात. या तलावात मगरी असल्यामुळे पाण्यात उतरण्यास मनाई आहे.

15) महालक्ष्मी मंदिर-


Mahalaxmi Temple हे मुंबईमधील अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर व भुलाबाई देसाई मार्गावर असलेले अत्यंत पवित्र धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर 1831 मध्ये धाकजी दादाजी या हिंदू व्यापाऱ्याने बांधले. या मंदिरात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांच्या सोने, हिरे,मोती या दागिन्यांनी सुंदर मूर्ती आहेत.

नवरात्र, दीपावली आणि गुढी पाडवा यांसारख्या सणांमध्ये मंदिरात भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.महालक्ष्मी मंदिर हे मुंबईतील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे ठिकाण आहे.मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकापासून हे ठिकाण वीस मिनिटांच्या अंतरावर आहे.

16) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान-

Sanjay Gandhi National Park मुंबईतील बोरीवली या ठिकाणी असलेले शांततेचा अनुभव देणारे निसर्गरम्य ठिकाण आहे. या उद्यानाची निर्मिती 1969 मध्ये करण्यात आली असून उद्यानाचे क्षेत्रफळ 104 चौरस किलोमीटर एवढे आहे. या ठिकाणी बिबट्या, सांबर, चितळ, माकड, तरस, 250 पेक्षा जास्त प्रकारचे पक्षी आणि 50 पेक्षा जास्त सरपटणारे प्राणी पाहायला भेटतात.

तसेच या उद्यानामध्ये कान्हेरी लेणी आणि बुद्ध लेणी पाहायला मिळतात. हा भाग घनदाट जंगलाचा असल्यामुळे या ठिकाणी औषधी वनस्पती आणि मोठी झाडे पाहायला मिळतात. पर्यटक या ठिकाणी बंद वाहनातून जंगल सफारीचा आनंद घेतात. तसेच शाळा आणि महाविद्यालयीन सहली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येतात.


17)जहांगीर कला दालन –


Jahangir Art Gallery हे मुंबईतील फोर्ट परिसरातील काळा घोडा भागात असलेले प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक कलादालन आहे.1952 मध्ये सर कावसजी जहांगीर यांनी त्यांच्या मुलाचा स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन केली.ही गॅलरी छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या मागे असून गॅलरीमध्ये चार प्रमुख प्रदर्शनी हॉल्स आहेत.

जहांगीर आर्ट गॅलरी ही मुंबईतील कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील अनमोल ठेवाच आहे.या ठिकाणी वर्षभरात शिल्पकला, छायाचित्रण, कॅलिग्राफी आणि हस्तकला यांचे तीनशे पेक्षा जास्त प्रदर्शन आयोजित केली जातात. चर्चगेट रेल्वे स्थानकापासून हे ठिकाण पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावर आहे.

18)ग्लोबल विपश्यना पॅगोडा-


Global Vipassana Pagoda हे मुंबईमधील भायंदर पश्चिमेला गोराई परिसरात असलेले विपश्यना ध्यानपद्धतीचे भव्य आणि शांततापूर्ण स्थळ आहे. श्री एस. एन. गोयंका यांनी या पॅगोड्याची स्थापना केली.हा जगातील सर्वात मोठा दगडात आणि बर्मीज स्थापत्यशैलीत बांधलेला स्तूप असून यामध्ये एकही स्तंभ नाही. 2009 मध्ये या पॅगोडाचे उद्घाटन करण्यात आले.

या ठिकाणी भगवान बुद्धाच्या अवशेषांचा संग्रह गुमट्यात ठेवण्यात आलेला आहे. या ठिकाणी दहा दिवसाचे बुद्ध धर्माविषयी माहिती देणारे विपश्यना कोर्स मोफत शिकवले जातात. तसेच येथील ध्यानगृहात एकावेळी 8000 लोक ध्यान करू शकतात. या निसर्गरम्य ठिकाणी अंतर्मनाला शांती मिळते.

19)तारापोरवाला मत्स्यालय-

Taraporevala Aquarium हे मुंबईमधील चर्नी रोड,मरीन ड्राईव्ह या ठिकाणी असलेले भारतातील सर्वात जुने व ऐतिहासिक मत्स्यालय आहे. या मत्स्यालयाची स्थापना 1951 मध्ये केली गेली. त्यावेळी डी. बी. तारापोरवाला या पारशी उद्योजकाने दोन लाख रुपयांची मदत केली होती. या मत्स्यालयात 400 पेक्षा जास्त प्रजातीचे मासे पाहायला भेटतात.

या ठिकाणी 16 समुद्री पाण्याच्या टाक्या, नऊ गोड्या पाण्याच्या टाक्या आणि 32 उष्णकटिबंधीय टाक्यांमध्ये 2000 पेक्षा जास्त मासे ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणी 12 फूट लांब आणि 180 अंशाच्या अक्रेलिक काचेच्या बोगद्यातून मासे पाहता येतात.व “टच पूल” मध्ये कासव आणि माशांना स्पर्श करता येतो.हे मत्स्यालय समुद्री जीवसृष्टीची विविधता पाहण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.


20) नेहरू तारांगण-


Nehru Planetarium हे मुंबईतील वरळी या ठिकाणी असून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृती प्रित्यर्थ बांधण्यात आले आहे. या ठिकाणी विज्ञान,खगोलशास्त्र, तारे, ग्रह, सूर्य, चंद्र या गोष्टींची माहिती देणारे शो दाखवले जातात.तसेच या तारांगणात दुर्बिणीद्वारे सूर्यग्रहण, चंद्रग्रहण यांचे खगोलीय निरीक्षण करता येते.

तसेच विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी विज्ञान प्रदर्शने, क्विझ असे उपक्रम राबवले जातात. हिंदी,इंग्रजी आणि मराठी भाषेतून या ठिकाणी दिवसातून तीन ते चार वेळा शो दाखवले जातात. नेहरू तारांगण हे ठिकाण एलफिन्स्टन रोड पासून थोड्या अंतरावर आहे.

visit the Travel Bloghttps://theworldtravelguy.com/


1)नेहरू तारांगण हे मुंबईतील कोणत्या ठिकाणी आहे?

नेहरू तारांगण हे मुंबईतील वरळी या ठिकाणी आहे.

2)
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती कधी करण्यात आली.

संजय गांधी राष्ट्रीय या उद्यानाची निर्मिती 1969 मध्ये करण्यात आली.

3)
सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील कोणत्या ठिकाणी आहे?

सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील प्रभादेवी या ठिकाणी असलेले श्री गणेशाचे प्राचीन धार्मिक स्थळ आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top