लोणावळा या ठिकाणची संपूर्ण पर्यटन स्थळे- Top 20 places to visit in Lonavala Hill

मित्रांनो भारत भ्रमंतीमध्ये आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यातील लोणावळा येथील संपूर्ण पर्यटन स्थळे लोणावळा हे मुंबई-पुणे महामार्गावर समुद्रसपाटीपासून 625 मीटर उंचीवर असून सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पुणे जिल्ह्यात असलेले निसर्गरम्य प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणी विपुल वनराई, हिरवागार निसर्ग, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दऱ्या आणि पावसाळयात डोंगरावरून कोसळणारे धबधबे हे सर्व पाहून मनाला खूप प्रसन्नता मिळते. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते. तसेच लोणावळा या ठिकाणी भारतीय नौदलाचे सर्वोत्तम तांत्रिक प्रशिक्षण केंद्र व आयएनएस शिवाजीचे मुख्यालय आहे.Top 20 places to visit in Lonavala Hill

येथील सुप्रसिद्ध लोणावळा चिक्की सर्वांना परिचित आहे. या ठिकाणी अनेक लेण्या, धरणे, तलाव, गर्द हिरव्यागार वनराईने नटलेला परिसर,किल्ले आणि डोंगर रांगा आहेत. या ठिकाणी अनेक नैसर्गिक ऐतिहासिक व सांस्कृतिक पर्यटन स्थळे आहेत. वर्षातील प्रत्येक ऋतूत हे ठिकाण पर्यटकांसाठी अप्रतिमच आहे. लोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.

व हे ‘सह्याद्रीचे रत्न’ आणि ‘गुहांचे शहर’ म्हणून ओळखले जाते. पावसाळ्यात तर या ठिकाणी पर्यटकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. लोणावळा हे ठिकाण पुण्यापासून 64 किलोमीटर तर मुंबईपासून 96 किलोमीटर अंतरावर आहे.

Top 20 places to visit in Lonavala Hill

लोणावळा या ठिकाणची संपूर्ण पर्यटन स्थळे-

1) नारायणी धाम मंदिर-

Top 20 places to visit in Lonavala Hill


Narayni Dham Temple हे लोणावळ्यात मध्यभागी ठिकाणावर असलेले एक प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे. हे मंदिर 4.5 एकर वर असून या ठिकाणी एक सुंदर बाग आहे.हे पांढऱ्या संगमरवरी बांधकामातील मंदिर देवी नारायणी किंवा दुर्गा देवी म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराच्या बाजूला गणेश आणि सालासर हनुमान ची मंदिरे आहेत. तसेच या मंदिरात सकाळ आणि संध्याकाळचे जेवणाचे कुपन मिळते. हे मंदिर लोणावळ्यातील तुंगार्ली रोडवर असलेले प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दर्शनाला येतात.

2) भाजा लेणी-


Bhaja Cave ही लोणावळ्यातील मावळ तालुक्यात भाजा गावातील प्राचीन व प्रसिद्ध बौद्ध लेणी आहेत. या लेण्या दगडांमध्ये सुंदर कोरलेल्या असून या लेण्यांना राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळालेला आहे. या लेण्यांमध्ये सुमारे 22 लेणी आहेत, ज्यांमध्ये एक चैत्यगृह आणि 21 विहार आहेत. इ.स.पूर्व पहिल्या व दुसऱ्या शतकातील या बौद्ध शैलीतील लेण्या असून त्या हीनयान काळातील आहेत. तसेच या लेण्याजवळ काही धबधबे आहेत. भाजा गावातील पायथ्यापासून या लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी नागमोडी वळणाचा रस्ता आहे. भारत देशातील या लेण्या सर्वात प्राचीन लेण्या म्हणून ओळखल्या जातात.

3) कार्ला लेणी-


Karla Cave हे लोणावळ्याजवळील कार्ली येथील प्राचीन व प्रसिद्ध बौद्ध लेण्या आहेत. या लेण्या भाजा लेण्यापासून जवळच असून दगडात कोरलेल्या हीनयान बौद्ध लेण्या आहेत. या लेण्या दुसऱ्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. या लेण्यामध्ये देशातील सर्वात मोठे आणि जतन केलेले हीनयान बौद्ध चैत्य आहे. कार्ला लेण्यांमध्ये उत्कृष्ट नक्षीकाम, शिल्पे, शिलालेख, स्तूप, खांब आणि 37-स्तंभांचे मार्ग आहेत.

आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या ठिकाणी 2000 वर्षापूर्वीच्या जुन्या तुळया आहेत, त्यापैकी काही तुळया आजही पाहायला मिळतात. तसेच अलीकडेच या ठिकाणी असलेल्या प्रवेशद्वारावर बौद्ध काळातील खांब वापरून मंदिर बनवले आहे. कार्ला लेणी परिसरात भाजा लेणी ,पाटण बौद्ध लेणी , बेडसे लेणी आणि नाशिक लेणी आहेत. लोणावळ्यापासून हे ठिकाण दहा किलोमीटर अंतरावर आहे.

4) वाघांची झेप-

Visit our website: allindiajourney.com


Tiger’s Leap हे लोणावळ्यातील निसर्गाच्या कुशीत वसलेले एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून 650 मीटर उंचीवर आहे. या ठिकाणी वाघ दरीत झेप घेत असल्याचा भास होतो, त्यामुळे या ठिकाणाला टायगर लीप किंवा टायगर्स पॉइंट असेही म्हटले जाते.हे ठिकाण भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी प्रशिक्षण संस्थेच्या जवळ असून येथून आपल्याला हिरव्यागार दऱ्या, धुक्याच्या टेकड्या आणि धबधब्यांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. तसेच इथे असलेल्या इको पॉईंट दरीमध्ये आपला आवाज ऐकू येतो. ट्रेकिंग आणि हायकिंग प्रेमी व पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात भेट देतात.

5) भूशी धरण-


Bhushi Dam हे लोणावळ्यातील शिवाजी रोडवर असलेले एक निसर्गरम्य, प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे धरण दगडी बांधकामात इंद्रायणी नदीवर बांधलेले आहे. या धरणाची उंची 15 मीटर तर लांबी 201 मीटर आहे. या धरणात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत, जिथे तुम्ही बसून आजूबाजूच्या निसर्गरम्य परिसराचा आनंद घेऊ शकता. भुशी धरण पर्यटनासाठी एक सुंदर ठिकाण असले तरी पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज घेणे आणि सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. लोणावळा रेल्वे स्थानकापासून हे ठिकाण सहा किलोमीटर अंतरावर आहे.

6) ड्यूक नोज-


Dukes Nose हे लोणावळा जवळील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.हे नाव ड्यूक ऑफ वेलिंग्टन यांच्या नावावरून पडले आहे, कारण या ठिकाणाचा आकार त्यांच्या नाकासारखा दिसतो. याची उंची सुमारे 3,200 फूट असून स्थानिक भाषेत याला नागफणीही म्हटले जाते. तसेच ड्यूक्स नोज पठारावर एक शिव मंदिर आहे.
हे ठिकाण ट्रेकिंग रॅपलिंग, हायकिंग आणि रॉक क्लाइंबिंगसाठी प्रसिद्ध असून या ठिकाणी अनेक साहसी ट्रेकर ट्रेकिंग साठी येतात. या निसर्गरम्य पर्यटन स्थळाला पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देतात.

7) तिकोना किल्ला लोणावळा-


Tikona Fort हा लोणावळ्यातील पवना धरणाजवळ असलेला गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून जवळजवळ 3500 फूट उंचीवर असून या डोंगरी किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे याला तिकोना किल्ला हे नाव पडले आहे. या किल्ल्यावरून चार किलोमीटर अंतरावर असलेला तुंग किल्ला दिसतो. या किल्ल्याला वितंडगड म्हणूनही ओळखले जाते.तिकोना किल्ला पवन मावळ प्रांतात तिकोना पेठ गावाजवळ आहे.

मलिक अहमद निजाम शाह पहिला याने 1585 मध्ये हा किल्ला जिंकून निजाम प्रदेशात जोडला होता. नंतर 1657 मध्ये शिवाजी महाराजांनी पुन्हा निजामाकडून हा किल्ला जिंकून घेतला. या किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत व येथे मंदिरे आणि इतर वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

8) पवना तलाव-


Pavna Lake हा लोणावळ्यातील मावळ तालुक्यात पवना धरणाच्या बॅकवॉटरने तयार झालेला एक कृत्रिम जलाशय आहे. या तलावाच्या आजूबाजूला हिरव्यागार डोंगर रांगा आहेत. तसेच येथील शांत सुंदर व थंड वातावरण मनाला एक वेगळीच ऊर्जा देते. या तलावात कॅम्पिंग, वॉटर स्पोर्ट्स आणि निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेता येतो. पवना तलाव हे कॅम्पिंगसाठी एक उत्तम ठिकाण आहे.

या ठिकाणी अनेक कॅम्पिंग साइट्स आहेत, जिथे तुम्ही तंबूमध्ये राहून रात्रीचा अनुभव घेऊ शकता. तसेच या तलावात बोटिंग, कयाकिंग आणि इतर जल क्रीडा आणि इतर ऍक्टिव्हिटीजच्या सुविधा आहेत.या पवना तलाव परिसरात ट्रेकिंग साठी प्रसिद्ध असलेले लोहगड, विसापूर आणि तिकोना हे ऐतिहासिक किल्ले आहेत. लोणावळ्यापासून हे ठिकाण 25 किलोमीटर अंतरावर आहे.

9) लोहगड किल्ला-


Lohgad Fort हा लोणावळ्यातील मळवली गावाजवळ असलेला एक ऐतिहासिक प्रसिद्ध किल्ला आहे. हा किल्ला पवना धरणाजवळ असून सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये निसर्गरम परिसरात असलेला गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे.हा किल्ला समुद्रसपाटीपासून 3,389 फूट उंचीवर असून या किल्ल्याची अत्यंत मजबूत तटबंदी, भव्य दरवाजे आणि येथील विहंगम दृश्य प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा एक महत्त्वाचा किल्ला होता.

हा किल्ला ‘लोखंडी किल्ला’ नावाने ही ओळखला जातो. 1909 मध्ये हा किल्ला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे. ट्रेकिंग प्रेमी आणि इतिहास प्रेमींसाठी हा किल्ला म्हणजे एक स्वर्गच आहे. या किल्ल्याच्या जवळपास विसापूर किल्ला, भाजे आणि बेडसे लेणी ही ठिकाणे आहेत.लोणावळा पासून हा किल्ला दहा ते बारा किलोमीटर अंतरावर आहे.

10)वलवण धरण-


Valvan Dam हे लोणावळ्यातील खोपोली पॉवर प्लांटजवळ असलेले निसर्गरम्य महत्त्वाचे गुरुत्वाकर्षण धरण आहे. हे धरण टाटा कंपनीने बांधलेले असून कुंडली नदीच्या पलीकडे 26.4 मीटर उंच आणि 1356 मीटर लांब पसरलेले आहे. व हे धरण इंद्रायणी नदीवर बांधलेले असून या धरणाचा उपयोग खोपोली येथील वीज निर्मिती केंद्रासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी केला जातो.तसेच येथील लोणावळा आणि खंडाळा आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी या धरणाचा उपयोग होतो. हा धरण परिसर अत्यंत निसर्गरम्य असल्यामुळे पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेट देतात.

11) राजमाची किल्ला –


Rajmachi Fort हा लोणावळ्यातील उधेवाडी गावापासून जवळ असलेला ऐतिहासिक गिरीदुर्ग किल्ला आहे. हा किल्ला सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये असून 833 मीटर उंचीवर आहे.राजमाची किल्ल्यावर श्रीवर्धन आणि मनरंजन हे दोन उपकिल्ले आहेत ज्यामध्ये एक राहण्यायोग्य गुहा आहे. तसेच या किल्ल्यावर भैरवनाथाचे एक प्राचीन मंदिर आहे. त्या मंदिरात काही खोल्या आहेत, जिथे तुम्ही राहू शकता.

भारत सरकारने हा किल्ला दिनांक 26 एप्रिल, इ.स. 1909 मध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे. पावसाळ्यात पर्यटक या किल्ल्यावर धबधबे आणि काजवे पाहण्यासाठी येतात. या किल्ल्याच्या जवळपास लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, कार्ला लेणी ही प्रेक्षणीय स्थळे आहेत. राजमाची किल्ला हा ट्रेकर्स आणि पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. लोणावळ्यापासून हा किल्ला पंधरा किलोमीटर अंतरावर आहे.

12) सुनीलचे सेलिब्रिटी मेण संग्रहालय-


Sunil’s Celebrity Wax museum हे लोणावळ्यातील 2010 मध्ये केरळमधील 38 वर्षीय मेण कलाकार सुनील कंदलूर यांनी स्थापन केलेले एक लोकप्रिय,आकर्षक, प्रसिद्ध संग्रहालयआहे. हे भारतातील पहिले व सर्वात मोठे संग्रहालय आहे.या संग्रहालयात महात्मा गांधी, जॅकी चॅन, राजीव गांधी, बेनझीर भुट्टो, मायकेल जॅक्सन, कपिल देव, अ‍ॅडॉल्फ हिटलर, ए.आर. रहमान,चार्ली चॅप्लिन, नरेंद्र मोदी,सुभाषचंद्र बोस, विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि बिग बी सारखे 100 पेक्षा जास्त खरी दिसणारी शिल्पे आहेत.

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा हे संग्रहालयाचे मुख्य आकर्षण आहे. हे संग्रहालय प्रसिद्ध मादाम तुसाद मेण संग्रहालयाच्या धर्तीवर स्थापित करण्यात आले आहे. मुंबईपासून हे ठिकाण 85 किलोमीटर तर लोणावळ्यापासून एक किलोमीटर अंतरावर आहे.

13) कॅन्यन व्हॅली-


Canyon Valley हे लोणावळा आणि खंडाळा दरम्यान असलेली एक निसर्गरम्य, मनमोहक आणि नयनरम्य दरी आहे. या दरीतून उल्हास नदी वाहत असून महाराष्ट्राच्या नयनरम्य टेकड्यांच्या मध्यभागी हे एक लपलेले रत्नच आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगातील हे निसर्गरम्य ठिकाण साहसी आणि निसर्ग प्रेमींसाठी मेजवानीच आहे. या ठिकाणी तुम्ही वॉटरफॉल रॅपलिंग,फ्लाइंग फॉक्स करण्याचा आनंद घेऊ शकता.कॅन्यन व्हॅलीला टायगर व्हॅली म्हणूनही ओळखले जाते. येथे 350 फूट धबधब्यातून आपण रॅपलिंग करू शकतो आणि 450 फूट झिप लाईनवर उड्डाण करू शकतो. कॅन्यन व्हॅली हे एक सुंदर, अप्रतिम पर्यटन स्थळ असून पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणावर भेट देतात.

14) विसापूर किल्ला-


Visapur Fort हा लोणावळ्यातील मावळ तालुक्यात डोंगर रांगेत असलेला एक महत्त्वाचा किल्ला आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून 3500 फूट उंचीवर असलेला गिरीदुर्ग किल्ला आहे. हा किल्ला पवनामावळ परिसरात असून लोणावळा बोर घाटाचे संरक्षण कर्ता आहे. या किल्ल्यावर पायऱ्याच्या साह्याने सहज पोहोचता येते. या किल्ल्यावर जाताना एक मारुतीचे मंदिर व त्याच्या बाजूलाच दोन गुहा आहेत. या गुहांमध्ये 30 ते 40 लोक राहू शकतात.

परंतु पावसाळ्यात या गुहांमध्ये पाणी साठते. तसेच विसापूर किल्ल्यावर लांबवर पसरलेली तटबंदी आणि पाण्याची तळी आहेत. या गडावर एक प्राचीन शिवमंदिर आहे व मंदिराच्या समोर एक तलाव आहे. आणि येथे एक मोठे त्या काळातील जातेही आहे. लोहगड – विसापूर या किल्ल्यांना जुळे किल्ले म्हणून ओळखले जाते.

15) भैरवनाथ मंदिर –


Bhairavnath Temple हे लोणावळ्याच्या घनदाट जंगलात ढाक (राजमाची) या ठिकाणी असलेले एक प्राचीन, जागृत व सोनेरी रंगाचे मंदिर आहे. या मंदिराची रचना कोकणात असलेल्या मंदिरासारखीच आहे. हे मंदिर भगवान शिवाचा अवतार कालभैरवला समर्पित आहे. तसेच या मंदिराचा परिसर घनदाट जंगलाचा व निसर्गरम्य आहे. महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो. या मंदिरापासून जवळच श्रीवर्धन किल्ला, झेनिथ फॉल्स, तुंगार्ली तलाव आणि कोंडाणा, बहिरी गंभीरनाथ ही पर्यटन स्थळे आहेत.शिवभक्तांमध्ये हे मंदिर अत्यंत लोकप्रिय असून भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दर्शनाला येतात.

16) ॲम्बी व्हॅली-


Aamby Valley City हे लोणावळ्यातील 10,600 एकरमध्ये पसरलेले एक आलिशान हिल स्टेशन रिसॉर्ट आहे.ॲम्बी व्हॅली ही लोणावळ्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये आहे. अ‍ॅम्बी व्हॅली हे एक लोणावळ्या जवळील मोठे आणि आलिशान हिल स्टेशन आहे आणि ते सहारा इंडिया परिवाराने विकसित केलेली एक टाउनशिप आहे . या शहराची स्थापना 2006 मध्ये करण्यात आली. या ठिकाणी 600 ते 800 बंगले आहेत. याशिवाय या ठिकाणी धरणे बांधून तीन मोठे मानवनिर्मित तलाव तयार केले आहेत आणि त्यात एक हवाई पट्टी, हेलिपॅड, शॉपिंग कॉम्प्लेक्स, गोल्फ कोर्स इ. समावेश आहे. लोणावळ्यापासून हे ठिकाण ते वीस किलोमीटर अंतरावर आहे.

17) कुणे धबधबा-


Kune Waterfalls हा लोणावळ्यातील एक नयनरम्य प्रसिद्ध धबधबा आहे. हा धबधबा 200 मिटर उंचीवरून कोसळतो. महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधब्यापैकी हा एक असून हा धबधबा तीन टप्प्यांत खाली कोसळतो.पावसाळ्यात या धबधब्याचे दृश्य नयनरम्य असते. त्यावेळी येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. लोणावळा रेल्वे स्टेशनपासून हा धबधबा 3.5 किमी अंतरावर आहे.

18)डेला अ‍ॅडव्हेंचर पार्क-


Della Adventure Park हे लोणावळ्यातील एक मनोरंजन उद्यान आहे. हे 36 एकरमध्ये पसरलेले उद्यान डेला ग्रुपने 2013 मध्ये सुरू केले आहे. हे भारतातील सर्वात मोठे एक्स्ट्रीम अ‍ॅडव्हेंचर पार्क मनोरंजन उद्यान आहे. या ठिकाणी 50 हून अधिक मनोरंजक क्रियाकल्प आहेत. तसेच येथे उडता कोल्हा,स्वूप स्विंग, स्काय सायकलिंग, एटीव्ही राईड्स, पेंटबॉल, झॉर्बिंग, आर्चरी, रॅपलिंग साहसी खेळ,ग्लॅम्पिंग व्हिला, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट आहेत. लोणावळ्यातील हिरव्यागार टेकड्यांच्या मध्ये वसलेल्या डेला अ‍ॅडव्हेंचर पार्कमध्ये प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी काहीतरी आहे. लोणावळ्यापासून हे ठिकाण तीन किलोमीटर अंतरावर आहे.

19) उलटा धबधबा-


Reverse Waterfall हा लोणावळ्यातील एक प्रसिद्ध धबधबा आहे. हा धबधबा उलट दिशेने वाहत असल्यामुळे हे एक नैसर्गिक आश्चर्य समजले जाते. या धबधब्याचे पाणी खाली पडणे ऐवजी हवेच्या जोरदार प्रवाहामुळे वरच्या दिशेने वाहते. हा असा उलटा धबधबा दिसतो, जिथे पावसाळ्यात पाणी हवेच्या जोरामुळे वरच्या दिशेने वाहते. हा धबधबा लोणावळ्याजवळील नाणेघाट परिसरात आहे. हा धबधबा भारतातील सर्वात लोकप्रिय रिव्हर्स वॉटरफॉलपैकी एक आहे. पावसाळ्यात या धबधब्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. लोणावळ्यापासून हा धबधबा 40 किलोमीटर अंतरावर आहे.

20) शिरोटा तलाव –


Shirota Lake हे लोणावळ्यातील एक प्रसिद्ध जलाशय आहे. राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला हा तलाव हिरव्यागार डोंगररांगांनी वेढलेला असून हा तलाव शांत व रमणीय दृश्यासाठी ओळखला जातो. या तलावावर कॅम्पिंग स्पॉट आहे ज्यामध्ये तारे नक्षत्र पाहणे, तलावावर खडक उड्या मारणे, शेकोटी बांधणे आणि स्वतः बार्बेक्यू करणे या गोष्टीचा तुम्ही आनंद घेऊ शकता. लोणावळ्यापासून हा तलाव 18 किलोमीटर अंतरावर आहे.

हिवाळ्यामध्ये नोव्हेंबर ते मार्च मध्ये शिरोटा तलावाजवळील कॅम्पिंगसाठी वातावरण खूप आल्हाददायक असते. त्यावेळी रात्रीचे तापमान 12 ते 15 अंश सेल्सियसपर्यंत असते.शिरोटा तलाव कॅम्पिंगसाठी खूप प्रसिद्ध ठिकाण असून मुंबई पुणे आणि इतर ठिकाणावरून अनेक पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात.

Visit the travel blog

1) लोणावळ्यातील डेला अ‍ॅडव्हेंचर पार्क किती एकर मध्ये आहे?

लोणावळ्यातील डेला अ‍ॅडव्हेंचर पार्क 36 एकर मध्ये आहे .

2) उलटा धबधबा लोणावळ्या पासून किती किलोमीटर अंतरावर आहे ?

2) उलटा धबधबा लोणावळ्या पासून 40 किलोमीटर अंतरावर आहे .

3) लोणावळ्यातील कुणे धबधबा किती मीटर उंचीवरून कोसळतो ?

3) लोणावळ्यातील कुणे धबधबा 200 मीटर उंचीवरून कोसळतो .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top