नंदुरबार जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-Top 19 places visit to in Nandurbar District

मंडळी भारत भ्रमंतीमध्ये आज आपण पाहणार आहोत नंदुरबार जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे नंदुरबार हा महाराष्ट्र राज्यातील सातपुडा प्रदेशातील एक आदिवासी जिल्हा आहे. एक जुलै 1998 मध्ये धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 5035 चौरस किलोमीटर असून हा जिल्हा महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेजवळ आहे. हा जिल्हा निसर्गसंपन्न,वन्यजीव आणि जैवविविधतेने भरलेला असून या जिल्ह्यात आदिवासी लोकांचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे.’याहाकी देवमोगरा माता’ हे येथील आदिवासी लोकांचे मुख्य कलदैवत आहे.Top 19 places visit to in Nandurbar District

होळी हा येथील मुख्य सण आहे.या जिल्ह्यात मुख्य भाषा मराठी असून अहिरी, भिल्लोरी, गुजराती या भाषाही बोलल्या जातात. या जिल्ह्यातून महानदी, तापी नदी व पांजरा या मुख्य नद्या वाहतात. तसेच या ठिकाणी असलेले नैसर्गिक धबधबे घनदाट जंगले हिरवेगार डोंगर पर्यटकांना आकर्षित करतात. या जिल्ह्यात मुख्यत्वे ज्वारी, मका, कापूस, तूर, ऊस ही पिके घेतली जातात. या जिल्ह्यात अनेक नैसर्गिक,ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटन स्थळे आहेत.

Table of Contents


नंदुरबार जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-

1)उनपदेव – सुनपदेव –

Top 19 places visit to in Nandurbar District


Unapdev – सुनपदेव हे महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात असलेल्या या दोन्ही धार्मिक ठिकाणी निसर्गरम्य वातावरण आणि गरम पाण्याचे झरे आहेत. येथील परिसर डोंगराळ जंगलाचा असून सुनपदेव या ठिकाणी धबधबा आहे.या ठिकाणी असलेल्या झऱ्याचे पाणी गरम असून औषधी गुणधर्म असलेले आहे. भाविक लोक त्वचारोग मुक्तीसाठी या ठिकाणच्या झऱ्यातील पाण्याने अंघोळ करतात. व या ठिकाणी असलेल्या एका साधू महात्म्याच्या समाधीचे दर्शन घेतात. नंदुरबार पासून हे ठिकाण 60 किलोमीटर अंतरावर आहे.

2)तोरणमाळ-


Toranmal हे महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि हिरव्यागार डोंगर रांगांमध्ये वसलेले अल्हाददायक हिल स्टेशन आहे. सातपुडा पर्वत रांगेत असलेले हे ठिकाण 1461 मीटर उंचीवर आहे. या ठिकाणी प्राचीन मंदिरे, धबधबे आणि निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे या ठिकाणी बारमाही पर्यटकांची गर्दी असते.

या ठिकाणी यशवंत तलाव,गोरखगड मंदिर,माचिंद्रगड,सीता खाई,फॉरेस्ट व्ह्यू पॉइंट,शंकर मंदीर ही धार्मिक व नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत. तसेच या ठिकाणी तोरणमाळची गुढीपाडव्याला असणाऱ्या यात्रेत हजारो भावीक दर्शनाचा लाभ घेतात. नंदुरबार पासून हे ठिकाण 60 किलोमीटर अंतरावर आहे.

3)प्रकाशा-


Prakasha महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील हजारो वर्षाचा इतिहास असलेले ऐतिहासिक,पुरातत्वीय आणि धार्मिक गाव आहे. तापी नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या गावाला”प्रकाश क्षेत्र” म्हणून ही ओळखले जाते. धार्मिक महत्त्व असलेल्या या गावाचा इतिहास स्कंदपुरानातही आढळतो. या ठिकाणी हेमाडपंथी शैलीत बांधलेल्या मंदिरात भगवान विश्वेश्वर (शिव) ची पूजा केली जाते.

महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते तेव्हा हजारो भाविक येथे दर्शनाला येतात.या ठिकाणाला दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते.या ठिकाणी पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात अनेक प्राचीन अवशेष व महत्त्वाच्या वस्तु सापडले आहेत. नंदुरबार पासून हे ठिकाण 20 किलोमीटर अंतरावर आहे.

4)अस्तंबा पर्वत-


Asthamba Hill हे नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यात असलेले व सातपुडा पर्वतरांगेत वसलेले धार्मिक, पवित्र व प्राचीन स्थळ आहे. हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाणांपैकी एक आहे. दिवाळीमध्ये या ठिकाणी दहा ते पंधरा दिवस“ऋषी यात्रा” उत्सव भरवला जातो. या यात्रेमध्ये बऱ्याच राज्यांमधले आदिवासी बांधव सामील होतात. या पर्वतावर गुहा,लेण्या आणि विविध पर्यटन ठिकाणे आहेत.अश्वस्थमा हे महाभारतातील द्रोणाचार्यांचे पुत्र आहेत त्यांचा या पर्वताशी संबंध आहे. नंदुरबार पासून हे ठिकाण 71 किलोमीटर अंतरावर आहे.

Visit our website: allindiajourney.com

5) एकमुखी दत्त मंदिर सारंगखेडा-


Sarangkheda हे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील तापी नदीच्या काठावर वसलेले घोड्यांच्या बाजारासाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध गाव आहे. या ठिकाणी असलेल्या एकमुखी दत्त मंदिराच्या परिसरात हा घोडेबाजार भरला जातो.महाराष्ट्रातील प्रसिद्ध घोडेबाजारांपैकी हा एक घोडेबाजार आहे. नोव्हेंबर – डिसेंबर पासून या ठिकाणी घोडेबाजार भरतो.

देशभरातून व्यापारी या ठिकाणी विविध जातींचे घोडे विक्रीसाठी आणतात. मराठी घोड्यांना विशेष जास्त मागणी असते.तसेच या ठिकाणी”सरपटदौड”,घोड्यांचे शो, आणि मिरवणूक असे कार्यक्रम होतात. राज्य सरकारने नुकतेच या ठिकाणी “घोडा महोत्सव” सारखे उपक्रम चालू केले आहेत. देशभरातून घोडा बाजार पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक या ठिकाणी येतात.नंदुरबार पासून हे ठिकाण 65 किलोमीटर अंतरावर आहे.

6)हिडिंबा जंगल-


Hidimba Temple हे महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा परिसरात असलेले निसर्गरम्य आणि
आदिवासी बहुल जंगल आहे.‘हिडिंबा जंगल’ हे अक्राणी आणि तळोदा तालुक्यातील पर्वतीय भागात आहे. या ठिकाणी लांबट कडा,सीताखाईची दरी,हिरवीगार जंगले, धबधबा आणि विशेष म्हणजे ‘फॉरेस्ट ऑउलेट’ हे दुर्मिळ पक्षी पाहायला मिळतात.हिडिंबा जंगल’ परिसरात अनेक पर्यटन स्थळे असून हे नंदुरबार जिल्ह्यातील एक नैसर्गिक आणि जैवविविधतेने बहरलेले ठिकाण आहे.

7)कोचरमाता मंदिर-


Kocharmata Temple हे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कोचर गावातील प्राचीन व धार्मिक मंदिर आहे.देवी कोचरमाता ही या गावची ग्रामदेवता आहे. कोचरमाता माता हे गावचे रक्षण करते व संकटापासून वाचवते अशी येथील लोकांची गाढ श्रद्धा आहे. मंदिर परिसर निसर्गरम्य व शांत वातावरणाने बहरलेला आहे. नवरात्रीमध्ये या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो. त्यावेळी लाखो भावकी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतात. शहादा तालुक्यापासून हे ठिकाण काही अंतरावर आहे.


8) शिरीष कुमार स्मारक-


Shirish Kumar Smarak हे नंदुरबार जिल्ह्यातील मंगळबाजार परिसरात असलेले ऐतिहासिक स्मारक आहे. महात्मा गांधी यांनी 1942 मध्ये भारत छोडो हे आंदोलन सुरू केले होते त्यावेळी अनेक लहान थोर व्यक्तींनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी शिरीष कुमार हे पंधरा वर्षांचे होते.ते ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’ अशा मोठ्या जल्लोषात घोषणा देत होते.

त्यांचा जल्लोष पाहून ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना गोळी घातली आणि ते शहीद झाले. त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी स्मारक बांधण्यात आले देशभरातून अनेक पर्यटक या स्मारकाला भेट देण्यासाठी येत असतात.नंदुरबार बस स्थानकापासून हे ठिकाण दोन किलोमीटर अंतरावर आहे.

9) सय्यद अल्लाउद्दीन उर्फ इमाम साहेब दर्गा-


Syed Allaudin urf Imam Saheb’s Dargah हे नंदुरबार शहरातील मुस्लिम आणि सर्व धर्मीय समाजातील लोकांचे पवित्र श्रद्धास्थान आहे.इमाम साहेब हे एक सिद्ध पीर होते त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन लोककल्याणकरिता आणि अध्यात्मिक साधनेत घालवले तसेच त्यांनी केलेल्या चमत्कारांची ख्याती सर्व दूर पसरलेली आहे. दरवर्षी या ठिकाणी भरणाऱ्या उरु सामध्ये सर्वधर्मीय लोक मोठ्या भक्ती भावाने सामील होतात. नंदुरबार रेल्वे स्थानकापासून हे ठिकाण काही किलोमीटर अंतरावर आहे.


10) दहेल धबधबा-


Dahel Waterfall हे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील दहेल गावामध्ये सातपुड्याच्या पर्वतीय भागात असलेले अप्रतिम नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे. हा धबधबा दहेल नदी आणि देव नदी यांच्या संगमावर आहे. दहेल धबधबा म्हणजे एक नैसर्गिक आश्चर्यच आहे. या ठिकाणी महादेवाची पिंड असून मकर संक्राती आणि महाशिवरात्रीला या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावर येतात.नंदुरबार बस स्थानकापासून हे ठिकाण 77 किलोमीटर अंतरावर आहे.

11) रावलापाणी –


Ravlapani हे महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेलेनिसर्गरम्य आदिवासी बहुल गाव आहे. दोन मार्च 1943 रोजी ब्रिटिशांनी या ठिकाणी गोळीबार केला होता. त्यावेळी 15 आदिवासी बांधव यामध्ये शहीद झाले होते. म्हणून या ठिकाणाला स्वातंत्र्यसंग्रामातील शहीद भूमी म्हणून ओळखले जाते. दरवर्षी दोन मार्चला या ठिकाणी शहिदांना श्रद्धांजली वाहिली जाते.

या ठिकाणी असणारे निसर्गसौंदर्य अप्रतिम आहे. या ठिकाणी असलेली घनदाट जंगले, डोंगर रांगा तसेच आदिवासी लोकांची जीवनशैली आणि त्यांचे सण उत्सव नृत्य शैली हे पर्यटकांचे आकर्षण आहे. आदिवासी संस्कृतीची माहिती घेण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. नंदुरबार शहरापासून हे ठिकाण 60 किलोमीटर अंतरावर आहे.

12) बाराधारा धबधबा-


Baradhara Waterfall नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात सातपुडा पर्वत रांगेत असणारे अतिशय निसर्गरम्य वातावरण आणि शांतता असणारे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी 12 धारांमधून एकाच ठिकाणी धबधब्याचे पाणी पडते त्यामुळे या धबधब्याला ‘बाराधारा धबधबा’ असे नाव पडले आहे. लहान मोठ्या धारांनी तयार झालेला हा धबधबा 150 ते 200 फुटावरून कोसळत असून नेत्र सुखद अनुभव देतो.

धबधब्याचा परिसर हा घनदाट जंगलाचा असून धबधब्याच्या पायथ्याला तलाव आहे.बाराधारा धबधबा म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील लपलेलं रत्न आहे. तसेच पक्षी निरीक्षणासाठी ही हे उत्तम ठिकाण आहे. नंदुरबार पासून हे ठिकाण 95 किलोमीटर अंतरावर आहे.

13)याहामोगीमाता –


Yahamogimata Temple ही नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा या ठिकाणी उंच डोंगरावर असलेली आदिवासी समाजाची कुलदेवी आहे.याहामोगीमातेला देवमोगरामाता या नावाने देखील ओळखले जाते.हे ठिकाण पायथ्यापासून 2640 मीटर अंतर पार करून दर्शनासाठी जावं लागतं. गुजरात मधील तापी जिल्ह्यातील देव मोगरा मातेचे ही प्रतिकृती बर्डीपाडा या ठिकाणी आहे.

या ठिकाणी पारंपारिक आदिवासी पद्धतीने देवीची पूजा केली जाते. त्यामध्ये देवीला कच्चे धान्य, फुले, चिकन किंवा बकरी, सुपारी अशा गोष्टी अर्पण केल्या जातात. महाशिवरात्रीच्या यात्रेच्या वेळी लाखोंच्या संख्येने गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश येथून भावीक येतात.


14) काळमदेव मंदिर-


Kalamdev Temple हे नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार,साखरी शिंदखेडा या तीन तालुक्यांच्या सीमेवर असलेले टेकडीवर उंचावर आहे. या ठिकाणी भाविकांना दर्शनासाठी 105 पायऱ्या वरती चढून जावे लागते. डिसेंबर महिन्याचा नागपंचमीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते त्यावेळी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यासह अनेक ठिकाणाहून भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात. नवसाला पावणारा देव म्हणून या देवाची ख्याती आहे.नंदुरबार पासून हे ठिकाण 27 किलोमीटर अंतरावर आहे.

15) चांद शैली घाट-


Chandshaili Ghat हे नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत वसलेले सुंदर व आकर्षक पर्यटन स्थळ आहे. या घाटामध्ये आकर्षक वळणे, नागमोडी रस्ते, दऱ्या आणि डोंगरावर टेकलेले ढग पर्यटकांना आकर्षित केल्याशिवाय राहत नाही. या निसर्गरम्य ठिकानाला अश्वत्थाम्याचे शिखर असे पौराणिक महत्त्व आहे.

या ठिकाणी असलेल्या निसर्गरम्य वातावरणात कोसळणारे धबधबे मनमोहून टाकतात. या ठिकाणी असलेले देवीचे मंदिर हे इथले आकर्षण आहे. नंदुरबार पासून हे ठिकाण 46 किलोमीटर अंतरावर आहे.

16)अक्राणी किल्ला-


Akrani Fort हा नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या किल्ल्याला राणी काजल मंदिर किंवा अक्राणी महाल म्हणून ही ओळखले जाते. स्थानिक लोकांच्या माहितीतून असे सांगितले जाते की महाराणा प्रताप चा हलदी घाटामध्ये पराभव झाल्यानंतर त्यांची बहीण आकाराणी व काही राजपुतांनी सातपुड्यातील पर्वतरांगांमध्ये आश्रय घेतला होता.

त्यावेळी महाराणा प्रताप यांची बहीण आकारानी यांनी हा महाल बांधला. असे सांगितले जाते. आज या ठिकाणी किल्ल्याचे अवशेष पाहायला मिळतात. नंदुरबार पासून हा किल्ला 83 किलोमीटर अंतरावर आहे.

17)तीर्थंकर लेणी-


Tirthnkar Cave नंदुरबार जिल्ह्यातील शहादा जवळ गोमती नदीच्या काठावर खडकात कोरलेली दिगंबर जैन समाजाची प्राचीन लेणी आहेत. या ठिकाणी 56 श्री तीर्थंकरांच्या पुतळ्यांसह ही गुफा आश्चर्यकारक रीतीने रचलेली दिसून येते. या लेण्या पांडवलेणी म्हणून ही प्रसिद्ध आहेत. याठिकाणी कोरलेल्या लेण्यावरून पाणी वाहते. या गुफांमधील मुर्त्यांचे कोरीव काम दिगंबर शैलीमध्ये केलेले आहे.हे ठिकाण रम्य व शांततापूर्ण आहे. जैन बांधव या ठिकाणाला नेहमी भेट देत असतात.


18)वाल्हेरी धबधबा-


Walheri Waterfall हे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगाच्या पायथ्याशी असलेले निसर्गरम्य व पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे.देशभरातून पर्यटक हा धबधबा पाहण्यासाठी येतात. तळोदा शहरापासून हे ठिकाण 20 किलोमीटर अंतरावर आहे.

19)विरचक धरण-


Virchak Dam हे नंदुरबार तालुक्यातील विरचक गावाजवळील धरण आहे. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणारे हे धरण शिवण नदीवर असून नंदुरबार जिल्ह्यातील हे सर्वात मोठे धरण आहे. याशिवाय शेतीच्या सिंचनासाठी या धरणाचा उपयोग होतो. अनेक पर्यटक या धरणाला भेट देण्यासाठी येतात.नंदुरबार पासून हे ठिकाण सात किलोमीटर अंतरावर आहे.

Visit the travel blog

1) नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा शहर कशासाठी ओळखले जाते?

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा शहर घोड्यांच्या बाजारासाठी ओळखले जाते.

2)तीर्थंकर लेणी नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्या नदीच्या काठावर खडकात कोरलेली आहेत?

तीर्थंकर लेणी नंदुरबार जिल्ह्यातील गोमती नदीच्या काठावर खडकात कोरलेली आहेत.

3)नंदुरबार जिल्ह्यातील चांद शैली घाट कोणत्या पर्वतरांगेत आहे?

नंदुरबार जिल्ह्यातील चांद शैली घाट सातपुडा पर्वतरांगेत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top