वर्धा जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-Top 19 places to visit in Wardha District

मित्रांनो भारत भ्रमंतीमध्ये आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे, वर्धा जिल्हा हा महाराष्ट्रातील विदर्भातील महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव पालकपूर असे होते.या जिल्ह्याला यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, अमरावती या जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या असून या जिल्ह्यात आठ तालुके आहेत. तसेच या जिल्ह्यातील वर्धा ही महत्वाचे नदी आहे याशिवाय पूर्णा, यशोदा,अमरावती या नद्या वर्धा जिल्ह्यातून वाहतात. Top 19 places to visit in Wardha District

समुद्रसपाटीपासून हा जिल्हा 234 मीटर उंचीवर आहे. सेवाग्राम आश्रमसाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे. तसेच शेती उत्पादनामध्ये प्रामुख्याने या जिल्ह्यात ज्वारी,कापूस, गहू, भात, बाजरी, भुईमूग, हळद,मिरची, केळी, संत्री मोसंबी इ. पिके घेतली जातात. तसेच या जिल्ह्यात परधान आणि गौंड या आदिवासी जमाती आढळून येतात. महाराष्ट्रातील वर्धा जिल्हा हा पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा असून या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे.

Table of Contents

Top 19 places to visit in Wardha District


वर्धा जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे

1) सेवाग्राम आश्रम वर्धा-

Top 19 places to visit in Wardha District


Sevagram Ashram हे महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील महात्मास गांधीच्या पदस्पर्शाने पावन झालेले पवित्र, ऐतिहासिक ठिकाण आहे. महात्मा गांधी त्यांच्या वयाच्या 67 व्या वर्षी 30 एप्रिल 1936 च्या पहाटे वर्ध्या पासून आठ किलोमीटर अंतरावरील सध्याच्या सेवाग्राम या ठिकाणी पोचले होते.बापूजींच्या आयुष्यातील हा एक अत्यंत महत्वपूर्ण आश्रम हाेता. या आश्रमाचे आधीचे नाव सेगाव होते नंतर महात्मा गांधीने ते बदलून सेवाग्राम आश्रम हे नाव दिले.

हा आश्रम 300 एकर मध्ये पसरलेला असून महात्मा गांधींनी त्यांच्या आयुष्यातील बारा वर्षाचा काळ म्हणजे 1936 ते 1948 त्यांच्या सहकाऱ्यांसह या ठिकाणी घालवला आहे. हा आश्रम म्हणजे त्या वेळच्या भारताच्या स्वातंत्र्य संग्राम चळवळीचे केंद्र होते. वर्धा शहरापासून पासून हे ठिकाण पाच किलोमीटर अंतरावर आहे.

2) पवनार आश्रम-


Pavnar Ashram हे वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील धाम नदीच्या तीरावर पवनार गावी असलेला एक आश्रम आहे. 1938 मध्ये आचार्य विनोबा भावे यांनी या आश्रमाची स्थापना केली. या आश्रमाला ‘परमधाम आश्रम’ म्हणूनही ओळखले जाते. हा आश्रम निसर्गरम्य परिसरात असून हा परिसर जैवविविधतेने भरलेला आहे. आचार्य विनोबा भावे यांनी हा आश्रम महिलांसाठी सुरू केला होता. त्यांनी या आश्रमात ‘ब्रह्म विद्या मंदिर’ ची स्थापना केली होती.

हा आश्रम महिलांसाठी एक विशेष आकर्षण केंद्र होते. त्यामध्ये महिलांना आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यासाठी प्रशिक्षण दिले जात होते. आचार्य विनोबा भावे यांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात संपूर्ण भारतभर भूदान चळवळ उभारली होती. वर्धा शहरापासून हे ठिकाण सहा किलोमीटर अंतरावर आहे.

3) श्रीलक्ष्मीनारायण मंदिर –


Shree Laxmi Narayan Temple हे वर्धा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. हे आतून संगमरवरी असलेले मंदिर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे असून 1905 मध्ये बांधले आहे. 1928 मध्ये जमनालाल बजाज यांनी दलितांसाठी हे मंदिर खुले केले आणि मंदिराच्या शेजारी गरीब लोकांसाठी एक औषधालय उघडले. दलितांसाठी खुले झालेले हे पहिले मंदिर होते.

महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन सुरू करण्यापूर्वी या मंदिराला भेट दिली होती. त्या मंदिरात वर्षभर सांस्कृतिक, भक्तीपर आणि विविध मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

4) विश्वशांती स्तूप-


Vishvshanti Stupa हे महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील गोपुरी या ठिकाणी गीताई मंदिराजवळ असलेले एक पांढऱ्या रंगाचे मोठे स्तूप आहे. या स्तूपाच्या चार बाजूंवर बुद्धमूर्ती बसवलेल्या आहेत.हा स्तूप मोठ्या पार्कमध्ये असून या ठिकाणी एक जपानी लहान बौद्ध विहार आहे. जगातील 80 शांती पॅगोड्यांपैकी हा एक स्तूप आहे. हा स्तूप 1993 मध्ये सर्वांसाठी खुला केला.या स्तूपाजवळ एक मंदिर असून तेथे सार्वत्रिक शांततेसाठी प्रार्थना केली जाते. 1935 मध्ये जपानहुन वर्ध्याला आलेले फुजी गुरुजी यांनी स्तूप बांधण्याबद्दल महात्मा गांधीना सांगितले. जपानच्या आण्विक बॉम्ब ची प्रतिक्रिया म्हणून हा स्तूप आहे.

Visit our Website: allindiajourney.com

5) बोर वन्यजीव अभयारण्य-


Bor Wildlife Sanctuary हे वर्धा जिल्ह्यातील हिंगणीजवळ असलेले एक महत्त्वाचे अभयारण्य आहे. या अभयारण्याची स्थापना 1970 मध्ये झाली असून 2014 मध्ये या अभयारण्याला अधिकृतपणे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे. हे अभयारण्य सुमारे 138.12 चौरस किलोमीटर मध्ये पसरलेले असून ते भारतातील 47 वा व्याघ्र प्रकल्प आहे. या अभयारण्यात बोर धरण असल्यामुळे अभयारण्याचा परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे. या अभयारण्यात काही धार्मिक स्थळे आहेत, ज्यामध्ये बौद्ध विहार, खोरी-खापा येथील शिवमंदिर, चौकी येथील बृहस्पती मंदिर, खडकी येथील हनुमान मंदिर आणि केळझर येथील गणेश मंदिर यांचा समावेश होतो.

तसेच या अभयारण्यामध्ये सागवान, ऐन, तेंदू आणि बांबू आढळून येतात. आणि वनौषधी मध्ये टेनेला, तरवार,वेलात्री,वाघोरी,गोखरू,विट, आणि वनभेंडी यांचा समावेश होतो. तसेच या अभयारण्यात बंगाल वाघ , बिबट्या,उंदीर हरण, माकड , रानडुक्कर बायसन,निळा बैल , चितळ , सांबर हरण , मोर , भुंकणारे हरण , रानडुक्कर , आळशी अस्वल आणि विविध प्रकारचे पक्षी आढळून येतात. निसर्ग प्रेमींसाठी हे एक अद्वितीय ठिकाण आहे.

6) मगन संग्रहालय-


Magan Museum हे वर्धा जिल्ह्यातील मगनवाडी येथे असलेले एक ऐतिहासिक संग्रहालय आहे. महात्मा गांधींनी 1938 मध्ये सुरू केलेले हे भारतातील एकमेव संग्रहालय आहे. या संग्रहालयात हाताने, पेडलने चालणाऱ्या चरख्यांपासून ते सौरऊर्जेवर चालणाऱ्या चरख्यांचा समावेश असून या ठिकाणी शुद्ध खादी, नैसर्गिक रंगवलेले रेशीम, कच्चे रेशीम आणि लोकर आणि ज्यूट तंतूंनी मिश्रित खादी बनवली जाते. या संग्रहालयात 30 पेक्षा जास्त ग्रामीण उद्योग आहेत. व एक निसर्गोपचार क्लिनिक आहे. या संग्रहालयामुळे ग्रामीण भागातील उपेक्षित लोकांना फायदा होत आहे.

7) गीताई मंदिर-


Gitai Mandir हे वर्धा जिल्ह्यातील गोपुरी या ठिकाणी असलेले प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. गीताई मंदिर हे 27.8 एकर जागेवर बांधलेले असून या ठिकाणी गर्भगृह, छत किंवा देवी-देवतांच्या मूर्ती नाहीत. तर या ठिकाणी आचार्य विनोबा भावे यांचा ‘गीताई’ हा 18 अध्यायांचा ग्रंथ लाल आणि काळ्या दगडी शिळांवर कोरण्यात आलेला आहे. हा मंदिर परिसर अत्यंत शांत व रमणीय आहे. या ठिकाणाला देश-विदेशातून पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात.

8) शेख फरीद बाबा दर्गा गिरड-


Sheikh Farid Baba Darga हा वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील गिरड या गावात असलेला एक महत्त्वपूर्ण दर्गा आहे. या दर्ग्याजवळ एक तलाव आहे. हा दर्गा म्हणजे हिंदू- मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे. या ठिकाणी शेख फरीद बाबांची समाधी असून दर्ग्याजवळच प्रभू श्रीरामाचे मंदिर आहे. राम नवमीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. ज्यामध्ये हिंदू- मुस्लिम भाविक मोठ्या संख्येने एकत्र येतात. गिरड हे गाव सर्वधर्म समभावासाठी ओळखले जात असून या ठिकाणी दर्ग्यातील उर्स आणि रामनवमी हे उत्सव हिंदू- मुस्लिम एकत्रितपणे गुण्यागोविंदाने साजरे करतात. गिरड गाव वर्धा शहरापासून 59 किलोमीटर अंतरावर आहे.

9) पोथरा धरण-


Pothra Dam हे वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात हिंगणघाट तहसील मध्ये असलेले एक महत्त्वाचे धरण आहे. हे धरण 1979 ते 1981 दरम्यान बांधले आहे. पूर्वी या धरणाचा उपयोग स्थानिक शेतीसाठी केला जात होता परंतु सध्या या धरणाचा उपयोग चंद्रपूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करण्यासाठी वापरले जाते.त्यामुळे येथील लोकांमध्ये खूप नाराजी आहे. कारण या धरणासाठी त्यांनी त्यांच्या शेतजमिनी दिले आहेत.

पोथरा धरण हे वर्धा जिल्ह्यातील एक महत्वाचे जलस्त्रोत आहे, परंतु पाण्याच्या वाटपावरून सध्या या ठिकाणी वाद सुरू आहेत.पोथरा धरणावर येणाऱ्या विविध प्रकारच्या पक्षांमुळे हे एक महत्त्वाचे पक्षी क्षेत्र म्हणून ओळखले जाते. पर्यटकांसाठी हे ठिकाण महत्त्वाचे आकर्षण आहे. वर्धा शहरापासून हे धरण साठ किलोमीटर अंतरावर आहे.

10) गांधी टेकडी –


Gandhi Hill हे वर्धा जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये डोंगरामध्ये आहे. या ठिकाणी महात्मा गांधीजींचा पुतळा, चरखा, घड्याळ, चष्मा आणि गांधीजींची तीन हुशार माकडे पाहायला मिळतात. तसेच या ठिकाणी असलेला निसर्गरम्य परिसर आणि शांतता योगधारण्यासाठी उपयुक्त मानला जातो. पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात भेट देतात. वर्धा शहरापासून हे ठिकाण पाच किलोमीटर अंतरावर आहे.

11) केळझर सिद्धिविनायक मंदिर-


Kelzar Siddhivinayak Temple हे वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. या केळझर गावाच्या टेकडीवर विदर्भातील अष्टविनायकापैकी एक असलेले महाभारत कालीन श्री सिद्धिविनायकाचे पुरातन मंदिर आहे. या गणपती देवस्थानला एकचक्रा गणेश म्हणून ही ओळखले जाते. या गणेशाची मूर्ती चार फूट उंच असून उजव्या सोंडेची आहे.केळझर हे ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध गाव असून या ठिकाणी खोदकाम करताना अनेक मूर्ती सापडले आहेत. केळझर या गावात अनेक बौद्ध मूर्ती सापडल्या असून येथे मत्स्यबीज उत्पादन केंद्र आहे. पर्यटकांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. वर्धा पासून हे ठिकाण 24 किलोमीटर अंतरावर आहे.

12) महाकाली देवी मंदिर-


Mahakali Temple हे वर्धा जिल्ह्यातील धाम नदीवर बांधलेल्या धरणाच्या पायथ्याशी गर्द झाडीत व निसर्गरम्य परिसरात असलेले महाकाली देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे.महाकाली देवीचे मूळ मंदिर पाण्याखाली गेले आहे. परंतु पाणी कमी झाल्यानंतर या मंदिरातील महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी यांच्या मूर्ती दिसून येतात. पर्यटकांसाठी या ठिकाणी विश्रामगृह, बगीचा, बोटिंग या सुविधा देण्यात आल्या आहेत. वर्धा शहरापासून हे ठिकाण 35 किलोमीटर अंतरावर आहे.

13) हनुमान मंदिर-


Hanuman Temple हे वर्धा जिल्ह्यातील खडकी या ठिकाणी असलेले हनुमानाचे एक पुरातन मंदिर आहे. हे मंदिर दीडशे वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. मंदिरात संकट मोचन हनुमानाची मूर्ती असून या ठिकाणी असलेले चिंचेचे झाड ही दीडशे वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. तसेच या मंदिरात महिलांनाही दर्शन घेता येते. या मंदिरात हनुमाना जवळ केलेली प्रार्थना तो ऐकतो अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे.

तसेच भक्त या ठिकाणी स्वयंपाक देखील करतात. शनिवारी आणि मंगळवारी भक्त या ठिकाणी देवाला रोडगे अर्पण करतात. या मंदिराच्या मागे श्री संत गजानन महाराज आणि प्रभू श्रीरामाचे मंदिर आहे. तसेच या मंदिर परिसरात एक प्राचीन विहीर असून त्यामध्ये आंघोळ केल्यास रोगराई जाते अशी भाविकांची श्रद्धा आहे.

14) गांधी ज्ञान मंदिर-


Gandhi Gyaan Temple हे वर्धा जिल्ह्यातील बजाजवाडी या ठिकाणी असलेले सार्वजनिक ग्रंथालय आहे. 1950 मध्ये डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी या मंदिराची पायाभरणी केली तर 1954 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या ग्रंथालयाचे उद्घाटन झाले.या ठिकाणी महात्मा गांधींनी लिहिलेली पुस्तके आणि त्यांच्या जीवनावर आधारित असलेली पुस्तके वाचायला मिळतात. तसेच या संग्रहालयात विविध भाषांमधील गांधीवादी साहित्य उपलब्ध आहे. महात्मा गांधीच्या कार्याची आणि विचारांची माहिती घेण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

15) पंचधारा धबधबा-


Panchdhara Waterfall हा वर्धा जिल्ह्यातील रिधोरा गावाजवळ असलेला एक सुंदर धबधबा आहे. या धबधब्या जवळचे वातावरण हिरवेगार आणि निसर्गरम्य असून येथील भूभाग हा खडकाळ असल्यामुळे पर्यटकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच या धबधब्याजवळ पंचधारा नदीवर बांधलेले रिधोरा धरण आहे. वर्धा शहरापासून हा धबधबा 25 किलोमीटर अंतरावर आहे.

16) श्री खंडोबा मल्हारी मार्तंड मंदिर-


Shree Malhari Martand Khandoba Temple हे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातील तळेगाव येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर भोसले घराण्याचे सरदार दादोबा बोरकर यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ 1792 ते 1805 मध्ये बांधले होते. या मंदिराचे बांधकाम इंडो-आर्यन शैलीत केलेले असून ते राजस्थानी शिल्पकारांनी बांधले आहे.

या मंदिरात मल्हारी मार्तंड देवाची देवीसोबतची घोड्यावर बसलेली भव्य संगमरवरी मूर्ती आहे. तसेच या मंदिरात राम-रावण युद्ध, रुक्मिणी स्वयंवर, द्रौपदी स्वयंवर, अमृतमंथन, गणपती, महाकाली,लंकादहन, वानरसेना यांची शिल्पे आहेत.

17) केळझर किल्ला-

Kelzar Fort हा वर्धा जिल्ह्यातील केळझर गावात असलेला एक गिरीदुर्ग प्रकारातील डोंगरी किल्ला आहे. केळझर गाव हे सम्राट अशोकाच्या काळापासून प्रसिद्ध आहे. केळझर किल्ला हा एका लहान टेकडीवर असून नागपूर -वर्धा महामार्गावर आहे. या किल्ल्याशिवाय केळझर गावामध्ये अनेक पर्यटन स्थळ आहेत त्यामध्ये गणपती मंदिर,शिव मंदिर, पांडवकालीन गणेश कुंड आणि हनुमान मंदिर या प्रसिद्ध ठिकाणांचा समावेश आहे.केळझर हे एक प्राचीन गाव असून पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे.

18) श्री दिगंबर जैन मंदिर –


Shree Digambar Jain Temple हे वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील माईबाई वार्ड हिंगणघाट या ठिकाणी असलेले काचेचे आकर्षक पवित्र जैन तीर्थस्थळ आहे. विदर्भामध्ये हे मंदिर काचेच्या कामासाठी प्रसिद्ध असून बन्सीलाल कोचर यांनी 1955 मध्ये हे मंदिर विकसित केले. हे मंदिर तीनशे वर्ष जुने असून या मंदिराला ‘काचवाला’ दिगंबर जैन मंदिर म्हणूनही ओळखले जाते.

या मंदिरात काचेच्या विविध प्रकाराने विशिष्ट पूर्ण काम केलेले आहे. हे मंदिर जैन धर्मियांचे हे धार्मिक स्थळ असून काचेच्या उत्कृष्ट कामासाठी ओळखले जाते. दरवर्षी वेणा नदी किनारी 28 डिसेंबरला संत गाडगेबाबांच्या स्मृतीत या ठिकाणी यात्रा भरते.

19) महाकाली धरण-


Mahakali Dam हे वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात महाकाली गावालगत असलेले एक महत्त्वाचे धरण आहे.हे धरण धाम नदीवर बांधलेले असून या धरणाला ‘धाम धरण’ किंवा महाकाली धरण म्हणून ही ओळखले जाते. या धरणाचा उपयोग सिंचनासाठी केला जातो. या धरण परिसरात महाकाली देवीचे मंदिर आहे. तसेच धरण परिसर अत्यंत निसर्गरम्य असल्यामुळे पर्यटकांची या ठिकाणी नेहमी गर्दी असते.

Visit the travel blog

1) वर्धा जिल्ह्यातील महाकाली धरण कोणत्या नदीवर कोणत्या बांधले आहे?

वर्धा जिल्ह्यातील महाकाली धरण धाम नदीवर बांधले आहे.

2) वर्धा जिल्ह्यातील श्रीलक्ष्मीनारायण मंदिर दलितांसाठी कोणत्या साली खुले केले?

वर्धा जिल्ह्यातील श्रीलक्ष्मीनारायण मंदिर 1928 साली दलितांसाठी खुले केले.

3) वर्धा जिल्ह्यातील पंचधारा धबधबा कोणत्या गावाजवळ आहे?

वर्धा जिल्ह्यातील पंचधारा धबधबा रिधोरा गावाजवळ आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top