मित्रांनो भारतभ्रमंती ही अशी वेबसाईट आहे, जिथे तुम्हाला भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळांची माहिती मिळणार आहे. आता तुम्ही पाहणार आहात गुजरात राज्यातील महिसागर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे. महिसागर हा गुजरात राज्यातील प्रमुख आणि ऐतिहासिक जिल्हा आहे. हा जिल्हा 2013 मध्ये पंचमहल जिल्हा आणि खेडा जिल्हा वेगळे करून तयार करण्यात आलेला गुजरात राज्यातील 28 वा जिल्हा आहे. Top 19 places to visit in Mahisagar District
हा जिल्हा ‘माही नदीच्या’ काठावर असल्यामुळे या जिल्ह्याला महिसागर हे नाव देण्यात आले. आणि लुणावाडा हे महिसागरचे जिल्हा मुख्यालय आहे. महिसागर जिल्ह्यात 6 तालुके असून या जिल्ह्याला,आरवली जिल्हा राजस्थानचा जालोर जिल्हा, शिरोही,पंचमहाल,खेडा, वडोदरा आणि दाहोद जिल्ह्याच्या सीमा लाभल्या आहेत. तसेच लुणावाडा येथील काळेश्वरी हे ऐतिहासिक महत्त्वाचे प्रसिद्ध ठिकाण आहे.
या जिल्ह्यात तिरुपती ऑइल इंडस्ट्रीज, बालाजी फूड इंडस्ट्रीज आणि शेंगदाणा तेल उद्योग आहेत. त्यामुळे वडोदरा, साबरकांठा आणि पंचमहाल जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच महिसागर जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक व सांस्कृतिक पर्यटन स्थळे आहेत. पूर्वी हा जिल्हा ‘वसुधानगरी’ म्हणून ओळखला जात होता.
Top 19 places to visit in Mahisagar District
महिसागर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे
1)Balasinor Dinosaur Fossil Park & Museum-


बालासिनोर डायनासोर संग्रहालय हे गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील रायोली गावात असलेले जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे डायनासोर जीवाश्म उद्यान आहे. हे संग्रहालय 25,000 चौरस फूटांपेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेले असून येथील तळमजल्यावर विविध प्रकारचे प्रदर्शन दर्शविणाऱ्या 10 गॅलरी आहेत. हे जगातील सर्वात महत्त्वाचे डायनासोर पुरातत्व उत्खनन स्थळ आहे, आणि 1980 च्या दशकात येथील रायोली गावात लाखो वर्षांपूर्वीचे डायनासोरचे अंडी, हाडे व जीवाश्म सापडले आहेत.
या ठिकाणी राजसौरस नर्मडेन्सिस या नवीन डायनासोर प्रजातीचा शोध लागला आहे,आणि त्याच्यावर एक विशेष 3-डी चित्रपट तयार करण्यात आला आहे. हे ठिकाण भारताचे ‘जुरासिक पार्क’ म्हणून ओळखले जाते. या जीवाश्म उद्यानात त्या विशाल प्राण्यांचे प्रत्यक्ष आकाराचे पुतळे असून पर्यटकांना डायनासोरच्या अवशेषांना स्पर्श करण्याची संधी मिळते.
2)Kaleshwari Group of Monuments –


कालेश्वरी समूह स्मारके हे गुजरातमधील महिसागर जिल्ह्यातील खानपुर तालुक्यातील लवाणा गावाजवळील एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे. ही स्थळे लुनावाडा आणि हिडिंबा वन जंगलातील एका ओढ्याजवळ आहेत. या ठिकाणी सुंदर नक्षीकाम व कोरीवकाम केलेले मंदिराचे अवशेष,
दोन बावड्या एक जलाशय, आणि सर्वत्र पसरलेल्या मूर्तींचा समावेश आहे. हे अवशेष डोंगराच्या पायथ्याशी आणि टेकडीवर आहेत. ही स्मारके 10 व्या आणि 16 व्या शतकाच्या दरम्यान बांधले होती. हे ठिकाण राज्य संरक्षित स्मारके असून काळेश्वरी-नी नाळ म्हणूनही ओळखले जाते.
3)Todiya Rocks-


टोडिया रॉक्स हे गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील बालसिनोर जवळ, माही नदीच्या काठावर वसलेले एक एकांत असलेले लोकप्रिय नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे. आणि शांत पिकनिक स्पॉट आहे. तसेच या ठिकाणी एक देवीचे मंदिर आहे. पर्यटक या ठिकाणी सहलीचा आनंद घेण्यासाठी येत असतात.
4)Kadana Dam-

कडणा धरण हे गुजरातमधील महिसागर जिल्ह्यातील माही नदीवरील एक महत्त्वाचे धरण आहे. हे एकमाती आणि दगडी बांधकाम असलेले धरण 1979 ते 1989 दरम्यान बांधले गेले.या धरणावर पंप-संचालित जलविद्युत केंद्र आहे. आणि हे धरण या भागातील सिंचन व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावते. या धरणावर पहिल्या दोन जनरेटर यंत्रणा 1990 साली कार्यान्वित करण्यात आल्या,
तर दुसरे दोन 1998 साली सुरू करण्यात आल्या. हे धरण प्रसिद्ध गिरधरभाई घेलाभाई मिस्त्री अभियंता यांनी बांधले. या धरणावर कपलान टर्बाइन आहेत जे वीज केंद्राला उच्च मागणीच्या वेळेत वीज निर्माण करते आणि कमी मागणीच्या वेळेत पाणी परत साठवण्यासाठी तेच टर्बाईन वापरले जातात.
Visit our website: allindiajourney.com
5)Panam Dam-

पनाम धरण हे गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील संतारामपूर तालुक्यातील पनाम नदीवर बांधलेले एक महत्त्वाचे धरण आहे. पनाम नदी ही माही नदीची उपनदी असून ती दाहोद जिल्ह्यातील देवगड बारिया तालुक्यातून उगम पावते. आणि पनाम धरणाच्या 25 किलोमीटर खाली माही नदीत विलीन होते. पानम कालवा हा 99.73 किलोमीटर लांबीचा कालवा आहे,
आणि त्याची क्षमता 21 घनमीटर एवढी आहे. या कालव्यावर 1994 मध्ये 2 मेगावॅट क्षमतेचा एक लघु जलविद्युत प्रकल्प बांधण्यात आला. व या कालव्याचे बांधकाम 1999 मध्ये पूर्ण झाले. हे धरण सिंचन आणि पाणीपुरवठ्यासाठी वापरले जाते.
6)Luneshwar Mahadev Temple-

लुणेश्वर महादेव मंदिर हे गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील लुनावाडा येथील एक प्राचीन धार्मिक शिवमंदिर आहे. लुनावाडा शहर हे 15 व्या शतकात ते एका संस्थानाची राजधानी होते. लुनावाडा शहराचे नाव हे ‘लुणेश्वर’ या पवित्र मंदिरामुळे मिळाले आहे.
लुणेश्वर महादेव मंदिर पॅलेस रोड आणि सोमनाथ मंदिराच्या जवळ आहे. या मंदिराची स्थापत्यकला अत्यंत सुंदर कोरीवकाम व नक्षीकाम केलेली आहे. स्थानिक लोकांचे हे मंदिर धार्मिक स्थळ नसून, लुनावाडा शहराच्या समृद्ध इतिहासाचे प्रतीक आहे.
7)Malekpur Hanumanji Temple-

मलेकपूर हनुमानजी मंदिर हे गुजरातच्या महिसागर जिल्ह्यात असलेले एक पवित्र, धार्मिक स्थळ व पूजनीय मंदिर आहे. हे मंदिर भक्तांसाठी एक आध्यात्मिक केंद्र असून, पूजा आणि ध्यानासाठी मंदिरातील वातावरण शांत आहे. या मंदिराची वास्तूकला सुंदर असून येथील परिसर अध्यात्मिक आहे. या हनुमानजी मंदिरात भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात. विशेषतः शनिवारी येथे भाविकांची जास्त गर्दी पाहायला मिळते.
8)Mahisagar sangam tirth –

महिसागर संगम तीर्थ हे गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील एक पवित्र, धार्मिक स्थळ आहे. हे ठिकाण खंभातच्या आखाताजवळ असून मही नदीच्या काठावर वसलेले एक पवित्र स्थळ आहे. या ठिकाणी मही नदी अरबी समुद्राला मिळते, व या संगमावर महिसागर माता मंदिर आहे.
याचा उल्लेख स्कंद पुराणातील कौमारिका खंडाशी केलेला आहे. आणि हे तीर्थक्षेत्र आनंद आणि भरूच जिल्ह्यांच्या सीमेवर पसरलेले आहे. महिसागर माताजी मंदिर हे बालासिनोर शहराच्या जवळ असून, डायनासोर जीवाश्म पार्कसाठी प्रसिद्ध असलेल्या भागामध्ये आहे.
9)Rajmahal Palace-

राजमहल पॅलेस हा गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील लुणावाडा येथील फुवारा चौक मध्ये असलेला एक ऐतिहासिक राजवाडा आहे. हा राजवाडा लुणावाडा येथील मुख्य चौकात असून या राजवाड्याची वास्तूकला अत्यंत सुंदर व आकर्षक आहे. हा ऐतिहासिक राजवाडा एक अप्रतिम वास्तु असून पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे.
10)Bhadar River Water Fall-

भादर नदी धबधबा हा गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील वावकुवा गावातील एक सुंदर धबधबा आहे. हा धबधबा भादर नदीवर असून निसर्गरम्य परिसरात आहे. येथील परिसर अत्यंत शांत व नयनरम्य आहे. तसेच निसर्ग प्रेमी आणि पर्यटक येथे फोटोशूट आणि शांततेचा अनुभव घेऊ शकतात.
11)Vasiya Talav-

वासिया तलाव हे गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील लुनावाडा येथे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. येथील परिसर अत्यंत निसर्ग समृद्ध असून येथे विविध प्रकारचे पक्षी, वनस्पती, वेगवेगळे वृक्ष आणि जलचर प्राणी पाहायला भेटतात. तसेच या तलाव परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यामुळे पर्यटक या ठिकाणी पिकनिक साठी येत असतात.
12)wanakbori dam-

वनाकबोरी धरण हे गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील माही नदीवर असलेले एक संयुक्त धरण आहे. हे धरण सिंचन आणि जलविद्युतसाठी वापरले जाते. आणि या धरणावर माही नदीच्या काठावर वानकबोरी औष्णिक वीज केंद्र असून हे गुजरातमधील कोळशावर चालणारे वीज केंद्र आहे. या ठिकाणी आठ युनिट असून त्यापैकी सात 210 मेगावॅट क्षमतेचे आणि एक 800 मेगावॅट क्षमतेचे आहे.
13)Bhim Bhameda Mahadev Temple-


भीम भामेडा महादेव मंदिर हे गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे.
जेव्हा पांडव त्यांच्या वनवासात होते, त्यावेळी ते या ठिकाणी वास्तव्यास होते आणि त्यांनी या शिव मंदिराची निर्मिती भीमाने केली होती, असे मानले जाते. या मंदिराची वास्तू करा अत्यंत अद्भुत व सुंदर आहे.
येथील मंदिर परिसर अत्यंत निसर्गरम्य व शांततामय आहे. या मंदिरा संबंधित अनेक स्थानिक कथा आणि इतिहास जोडल्यामुळे त्याचे अध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्व अधिक आहे. भाविक आणि पर्यटक या मंदिरात मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात.
14)Satkunda Waterfall-

सतकुंडा धबधबा हा गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील खाणपुर तालुका परिसरात असलेला एक मोहक,सुंदर नैसर्गिक पर्यटनस्थळ आहे. हा धबधबा डोंगराळ भागात, हिरव्यागार जंगलाच्या सान्निध्यात वसलेला आहे. हा धबधबा मोठ्या उंचीवरून कोसळतो. आणि या धबधब्याच्या सभोवती दाट जंगल, निसर्गरम्य परिसर व शांत वातावरण असल्यामुळे निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्यात या धबधब्याचे मनमोहक दृश्य हे मंत्रमुग्ध करणारे आणि अद्भुत असते.
15)Hidimba Van-

हिडिंबा वन हे गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील लुणावाडा येथील एक लोकप्रिय उद्यान आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. या उद्यानाचे नाव हिंदू पौराणिक कथांमधील एक राक्षसी हिडिंबा याच्या नावावरून ठेवण्यात आले आहे, जी या परिसरात राहत होती असे सांगितले जाते.
येथील परिसर अत्यंत निसर्गरम्य असून या ठिकाणी विविध प्रकारची झाडे, वनस्पती आणि वन्यजीव आढळतात. त्यामुळे हे उद्यान पर्यटक आणि निसर्गप्रेमींसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे.
16)Mahisagar Van-


महिसागर वन हे गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातीलहिरवाईने नटलेला आणि जैवविविधतेने बहरलेला प्रदेश आहे. हा वनप्रदेश माही नदीच्या काठावर व आसपासच्या डोंगराळ भागात पसरलेला आहे. महिसागर वनाचे नाव माही नदीवरून पडले असून,हे वन प्रामुख्याने लुनावाडा, काडाणा, सान्तरामपूर आणि खनपूर तालुक्यांच्या परिसरात आढळते.
तर काही भाग माही नदीच्या दरीत आणि काडाणा धरणाजवळ पसरलेला आहे. महिसागर वनात विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि वृक्ष आढळून येतात. आणि येथील पर्वतरांगा, दऱ्या दाट गर्द झाडीने वेढलेल्या आहेत. महिसागर वन हे जिल्ह्याच्या पर्जन्यसंवर्धनाचे महत्वाचे वन आहे.
17)Nadinath mahadev mandir-



नन्दिनाथ महादेव मंदिर हे गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील घोडियार येथील कडाणा धरणा जवळ असलेले प्रसिद्ध धार्मिक शिवमंदिर आहे. हे मंदिर माता दुर्गा आणि शिव भगवान यांना समर्पित आहे. या मंदिरातील गर्भगृहात एक शिवलिंग व माता दुर्गाची सुंदर मूर्ती आहे. हा मंदिर परिसर अत्यंत सुंदर व निसर्गरम्य असून येथील सूर्यास्ताचे दृश्य विलोभनीय आणि नयनरम्य आहे.
18)Mangadh Hill-


मानगड टेकडी ही गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील सान्तरामपूर तालुक्याजवळ आणि राजस्थानच्या सीमेवर, वसलेली एक ऐतिहासिक आणि पवित्र स्थळ आहे. या ठिकाणाला ‘आदिवासींचे जिना पर्वत’ म्हणूनही ओळखले जाते. हे ठिकाण आदिवासी लोकांसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. कारण 1913 मध्ये येथे झालेल्या मानगड हत्याकांडासाठी हे स्थळ ओळखले जाते. या घटनेत आदिवासी समुदायातील संत गोविंदगिरी यांनी आदिवासी समाजाच्या अधिकारांसाठी आंदोलन सुरू केले होते.
त्यावेळी ब्रिटिशांनी गोळीबार करून शेकडो आदिवासींचा बळी घेतला होता. या हत्याकांडाच्या स्मरणार्थ येथे गोविंदगिरी यांचे स्मारक मंदिर आणि शहीद स्तंभ बांधण्यात आले आहेत. या टेकडीवरून वनराईने नटलेले हिरवेगार डोंगर आणि निसर्गाचे अप्रतिम, मनमोहक दृश्य दिसते, त्यामुळे हे एक सुंदर पर्यटन स्थळही बनले आहे.
19)Kedareshwar Mahadev Temple-

केदारेश्वर महादेव मंदिर हे गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील लुणावडा तालुक्यात, धामोड येथे घनदाट जंगलात वसलेले एक प्राचीन धार्मिक स्थळ आहे.आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. या शिवमंदिरात भोलेनाथाच्या दर्शनासाठी दररोज भाविक येतात. हे मंदिर 1200 जुने असल्याचे सांगितले जाते. येथील मंदिर परिसर निसर्गरम्य व हिरव्यागार वनराईने बहरलेलाआहे.
1) कालेश्वरी समूह स्मारके ही महिसागर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहेत ?
कालेश्वरी समूह स्मारके ही महिसागर जिल्ह्यातील खानपुर तालुक्यातील लवाणा गावाजवळील एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहेत .
2) महिसागर जिल्ह्यातील बालासिनोर डायनासोर संग्रहालय किती फूट क्षेत्रात विस्तारलेले आहे ?
महिसागर जिल्ह्यातील बालासिनोर डायनासोर संग्रहालय 25,000 चौरस फूटांपेक्षा जास्त क्षेत्रात विस्तारलेले आहे.
3)महिसागर जिल्ह्यातील महिसागर वन कोणत्या ठिकाणी आहे?
महिसागर जिल्ह्यातील महिसागर वन हे माही नदीच्या काठावर व आसपासच्या डोंगराळ भागात पसरलेला आहे.


