मंडळी भारत भ्रमंतीमध्ये आज आपण पाहणार आहोत जालना जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे जालना जिल्हा हा महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला मराठवाड्याचा महत्वाचा भाग असलेला जिल्हा आहे. परभणी आणि औरंगाबाद जिल्ह्याचे काही भाग विभाजित करून 1 मे 1981 मध्ये या जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. उद्योगधंद्याच्या बाबतीत हा जिल्हा आघाडीवर आहे. यामध्ये प्रामुख्याने कृषी उद्योगधंद्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक मोसंबी उत्पादक जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. Top 18 places visit to in Jalna District
या जिल्ह्यामध्ये आठ तालुके आहेत. गोदावरी आणि दूधना दोन महत्त्वाच्या नद्या असून अनेक उपनद्या या जिल्ह्यातून वाहतात. हा जिल्हा समुद्रसपाटीपासून 534 मीटर उंचीवर आहे. या जिल्ह्यामध्ये ज्वारी, गहू, कापूस, आणि इतर कडधान्यांचे उत्पादन घेतले जाते. जालना जिल्ह्यात हातमाग आणि यंत्र मागावर कापड बनवण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले जाते. तेच या ठिकाणी बिडी बनवण्याचे कारखाने आहेत. संत रामदास स्वामी यांचा जन्म जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जांब या ठिकाणी 1530 मध्ये झाला होता.
रामदास स्वामींच्या घरात राम मंदिर आहे. हे मंदिर रामदास स्वामींच्या आठवणीत बांधण्यात आले आहे. दरवर्षी या ठिकाणी राम नवमीला मोठी यात्रा भरते. तसेच या जिल्ह्यातील पिंपळगाव येथे मोहिते घराण्याचे पाच वाडे, तीन मोठ्या वास्तू आणि एक गढी आहे. या जिल्ह्यातील स्वतंत्र सेनानी श्री बद्रीनारायण बारवाले हे हायब्रीड सीड्स कंपनीचे संस्थापक होते. या जिल्ह्यात मोसंबी आणि कडधान्य संशोधन केंद्र आहे.जालना जिल्ह्याचे नाव त्यांनी जागतिक स्तरावर पोहोचवले. या जिल्ह्यात अनेक धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत. मराठवाडा मुक्ती संग्राममध्ये या जिल्ह्यातील लोकांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे.
Top 18 places visit to in Jalna District
जालना जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे-
1) गणपती मंदिर राजुर-

Ganpati Temple Rajur जालना जिल्ह्यातील एक प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळ आहे. राजुर येथील गणेश मंदिर हे पूर्ण पीठ पुराना मध्ये मानले आहे. चतुर्थी आणि अंगारकीला या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. जालना जिल्हा पासून हे ठिकाण 25 किलोमीटर अंतरावर आहे.
2)मत्स्योदरी देवी मंदिर-

Matsyodari Temple हे जालना जिल्ह्यातील अंबड येथील ऐतिहासिक व धार्मिक प्राचीन मंदिर आहे. या देवीचे मंदिर ज्या टेकडीवर आहे त्या टेकडीचा आकार मासोळी सारखा आहे म्हणून या देवीला ‘मत्स्योदरी देवी’ म्हणून ओळखले जाते. ऑक्टोबर महिन्यात नवरात्रीमध्ये या ठिकाणी मोठी यात्रा भरते. जालना शहरात असून हे ठिकाण 21 किलोमीटर अंतरावर आहे.
3)जाळीचादेव (श्री चक्रधर स्वामी), जयदेववाडी-

Jalicha Dev हे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सह्याद्री पर्वताच्या उंच डोंगरावरील तीर्थस्थान आहे. महानुभव पंथीयांसाठी हे ठिकाण अत्यंत पवित्र स्थान समजले जाते. चक्रधर स्वामी या ठिकाणी वास्तव केले होते म्हणून या ठिकाणाला ‘जाळीचा देव’ या नावाने ओळखले जाते.
चक्रधर स्वामी महाराष्ट्र भ्रमंती करत असताना करवंदीच्या झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले होते तिथे त्यांना वाघाची दोन पिल्ले नजरेस पडली त्या पिलांना त्यांनी आपल्या मांडीवर घेतले तेव्हा वाघीण पाळीव कुत्र्याप्रमाणे त्यांच्याशी वागू लागली ही घटना करवंदीच्या जाळी खाली घडल्यामुळे या ठिकाणाला जाळीचा देव म्हणून ओळखले जाते. प्रत्येक वर्षी दांडी पौर्णिमेला या ठिकाणी मोठी यात्रा भरते.
4)आनंदीस्वामी मंदीर-

Anandiswami Temple हे जालना जिल्ह्यातील धार्मिक व ऐतिहासिक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर जुना जालना मध्ये असून संत श्री आनंद स्वामी यांनी या ठिकाणी समाधी घेतली होती. हे मंदिर अडीचशे वर्षे पूर्वी बांधण्याचे सांगितले जाते. महादजी शिंदे यांनी या मंदिराची स्थापना केली होती. या मंदिराला ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखले जात असून आषाढी एकादशीला मोठा उत्सव साजरा केला जातो.
Please visit our website: allindiajourney.com
5)जांबसमर्थ-

Jambsamarth हे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक गाव आहे. श्री समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म शके 1530जांबसमर्थ या ठिकाणी झाला होता. रामदास स्वामींचा जन्मघरामध्ये त्यांच्या आठवणीत राम मंदिर उभारण्यात आले आहे.
दरवर्षी रामनवमी जा या ठिकाणी मोठी यात्रा भरते.1943 मध्ये नानासाहेब देव यांनी मंदिराची स्थापन केली.मंदिराचे व्यवस्थापन संस्थेमार्फत केले जाते. लांबून येणाऱ्या भाविकांसाठी या संस्थेमार्फत सुविधा केल्या आहेत. जालना शहरापासून हे ठिकाण 64 किलोमीटर अंतरावर आहे.
6)मम्मादेवी मंदीर-

Mammadevi Temple हे जुना जालना मस्तगड भागातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. या मंदिरातील मम्मादेवीला दुर्गा देवीचा अवतार मानले जाते. मी मंदिर दीडशे वर्षांपूर्वी बांधले गेल्याचे सांगितले जाते. नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची ओळख आहे. या ठिकाणी मुलं बाळ होण्यासाठी अनेक लोक नवस करतात.
परंतु नवस फेडण्यासाठी बाळाला पंधरा फुटांवरून फेकले जाते त्यावेळी बाळाला कोणतीही. दुखापत होत नाही अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. नवरात्री काळात या मंदिरात विशेष उत्सव साजरे केले जातात. जालना रेल्वे स्थानकापासून हे ठिकाण दीड किलोमीटर अंतरावर आहे.
7)कालीमस्जीद जालना-

Kalimasjid हे ठिकाण जुना जालना येथे असलेले ऐतिहासिक व धार्मिक ठिकाण आहे. ही मशीद “जुमा मशीद” या नावाने देखील ओळखली जाते. या मशिदीचे बांधकाम काळ्या दगडाचे असल्यामुळे या मशिदीला काळी मशीद देखील म्हटले जाते. ही मशीद 400 वर्ष जुनी असून मुस्लिम समाजातील लोक दररोज येथे नमाज पाडण्यासाठी येतात.
8)संभाजीउद्यान /मोती बाग-

Sambhaji Park हे जालना शहरातील प्रमुख उद्यान असून याला मोतीबाग म्हणून हे ओळखले जाते. या उद्यानाची निर्मिती 1974 ते 1978 या काळात करण्यात आली. या उद्यानात लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आणि उद्यानातील विविध फुलांची झाडे पर्यटकांना आकर्षित आकर्षित करतात. या उद्यानाच्या मागील बाजूस मोती तलाव आहे. तसेच काळी मशीद,हम्माम (स्नानगृह) ही ठिकाण उद्यानाजवळ आहेत. संगीत कारंजे हे या उद्यानातील मुख्य विशेषता आहे. जालना रेल्वे स्थानकापासून हे ठिकाण 1 किलोमीटर अंतरावर आहे.
9)गुरूगणेश भवन-

Guruganesh Bhavan हे जालना जिल्ह्यातील जैन बांधवांचे पवित्र धार्मिक स्थान आहे. या ठिकाणाला कर्नाटकचे केसरी म्हणूनही ओळखले जाते. श्री वर्धमान स्थानकवासी श्री जैन श्रावक संघ या जैन ट्रस्टमार्फत या धार्मीक स्थळाची देखरेख केली जाते. तसेच या ट्रस्ट कडून शाळा, महाविद्यालये, अंध विद्यालये, ग्रंथालये आणि गोशाळा चालविल्या जातात. मराठवाड्यातील सर्वात मोठी गोशाला या संस्थानाची आहे. हे ठिकाण गुरु गणेश महाराज यांचे पवित्र स्मारक आहे.
10श्रीजगदंबा देवी मंदीर-

Shree Jagdamba Devi Temple हे जालना जिल्ह्यातील मंठा गावापासून दोन किलोमीटर अंतरावर उंच टेकडीवर हे मंदिर आहे. हे मंदिर तीनशे वर्ष जुने असल्याचे सांगितले जाते. येथील लोकांचे हे पवित्र धार्मिक स्थान आहे. नवरात्रीमध्ये या ठिकाणी विशेष पूजा आणि धार्मिक कार्यक्रम केले जातात. नवरात्री आणि चैत्र पौर्णिमेला या ठिकाणी दरवर्षी यात्रा भरते.
11) श्री बालाजी मंदिर-

Shree Balaji Temple हे जालना शहरातील कचेरी रोड या ठिकाणी 200 वर्ष जुने पुरातन धार्मिक मंदिर आहे.या मंदिरातील श्री बालाजी, लक्ष्मी माता व पद्मावती माता यांच्या पंचधातूच्या मूर्ती असून मंदीर विश्वस्तांच्या पुर्वजांनी तिरुपती बालाजी येथून या मूर्ती आणल्या आहेत.या मंदिरामध्ये नवरात्र, रामनवमी, चैत्र पौर्णिमा आणि विजयादशमी हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दसऱ्याच्या वेळी श्री बालाजींची पालखी मिरवणूक काढली जाते. मंदिरातील वातावरण हे शांत व भक्तीपूर्ण आहे.
12)मझर-इ-मौलया नुरुद्दीन साहेब दर्गा शरीफ-

Moulya Nuruddin Saheb Darga Sharif हे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील डोणगाव येथील ऐतिहासिक इस्लामिक धार्मिक ठिकाण आहे. हे ठिकाण म्हणजे मझर दाऊदी बोहरा या समुदायाचे धार्मिक स्थळ आहे. मौलया नुरुद्दीन साहेब त्यांची या ठिकाणी समाधी आहे.मौलया नुरुद्दीन साहेब दाऊदी बोहरा दावतचे भारतातील “वली अल-हिंद” म्हणून नियुक्त झाले होते. ते शिक्षणासाठी कैरो / इजिप्त ला गेले होते. आणि 467 हिजरी साली भारतात परत येऊन डेक्कनमध्ये स्थायिक झाले.
13)जालना किल्ला –

Jalna Fort हा महाराष्ट्रातील जालना शहरातील एक ऐतिहासिक किल्लाआहे. हा किल्ला कुंडलिका नदीच्या काठावर असून दोन एकर क्षेत्रावर पसरलेला आहे.या किल्ल्याला मस्तगड म्हणून मी ओळखले जाते. 1725 मध्ये खानने हा किल्ला बांधला. या किल्ल्यात जुनी विहीर, अन्नसाठा आणि देखरेख टॉवर आहे. तसेच किल्ल्यामध्ये मशिद आणि सुफी संतांची समाधी आहे. किल्ल्याची वास्तुकला ही निजाम कालीन आहे. जालना शहरापासून हा किल्ला 3 किलोमीटर अंतरावर आहे.
14) रेणुका माता मंदिर-

Renuka Mata Temple हे जालना जिल्ह्यातील मंठा शहरातील डोंगरावर आहे. या मंदिरातील गाभाऱ्यात रेणुका माता आणि तुळजाभवानी या दोन मूर्ती आहेत. मंदिर परिसर हा निसर्गाने बहरलेलाअसून चैत्र पौर्णिमा आणि नवरात्रीला येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. दर्शनासाठी भाविकांना डोंगर चढून जावे लागते. मंठा शहरापासून हे ठिकाण दोन किलोमीटर अंतरावर आहे.
15) जांबुवंत महाराज मंदिर-

Jambuvant Maharaj Temple हे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जामखेड येथील डोंगरावर असलेले महाराष्ट्रातील जांबुवंत महाराजांचे एकमेव मंदिर आहे.
जांबुवंत हे प्रभू श्रीरामांचे निस्सीम भक्त होते. गुहेत कोरलेल्या या मंदिरात जांबुवंत, गणपती,महादेवाची पिंड
आणि नल दमयंतीच्या मूर्ती आहेत. जालना जिल्ह्यातील 13 गावांमध्ये श्री हनुमानाची मंदिरे नाहीत. या तेरा गावांमध्ये हनुमान जयंती साजरी केली जात नाही. येथे जांबुवंत महाराजांची पूजा केली जाते.
येथील गावकरी सांगतात की जांबुवंत हे श्रीराम आणि हनुमानाचे मार्गदर्शक होते. त्यामुळे येथे जांभुवंतांची पूजा केली जाते. आषाढी एकादशी,कार्तिकी एकादशी, गुढीपाडवाआणि महाशिवरात्रीला या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो. जामखेड पासून हे ठिकाण दोन किलोमीटर अंतरावर आहे.
16) रोहीलागड-

Rohilagad Fort हा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात आहे. हा किल्ला ऐतिहासिक असून समुद्रसपाटीपासून 750 मीटर उंचीवर आहे. गडाच्या पायथ्याशी रोहिलागड हे गाव आहे. या गडावर काही खोदलेली लेणी आणि पाण्याचे टाके पाहावयास मिळते. तसेच गडावर जाताना छोट्या मोठ्या लेण्या पाहायला भेटतात. अंबड तालुका पासून हा किल्ला चाळीस किलोमीटर अंतरावर आहे.
17)घाणेवाडी धरण-

Ghanewadi Dam हे महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील
जालकाळा जवळ कुंडलिका नदीवरील मातीचे धरण आहे. हे धरण हैदराबादचा सुलतान मीर उस्मान अली खान याच्या काळात बांधले गेले होते. 1935 मध्ये या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. जालना शहराला पाणीपुरवठा करणारे हे महत्वाचे धरण आहे. या धरणाची उंची 15 मीटर तर लांबी 836 मीटर एवढी आहे.”घाणेवाडी जलसुरक्षण मंच” या स्थानिक संस्थेने धरणातील गाळ काढण्यासाठी डीसिल्टिंग मोहिम सुरू केली आहे. धरण परिसरात अनेक नैसर्गिक दृश्य पाहायला भेटतात. हे धरण जालना जिल्ह्याची जीवन वाहिनी आहे.
18) सीडी घाट धबधबा –

Sidighat Waterfall हा जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा गावाजवळ आहे.हा धबधबा म्हणजे निसर्गाचा अद्भुत अविष्कारच आहे. या धबधब्याला ‘सीडीघाट धबधबा’ किंवा ‘धावडा धबधबा’ असेही म्हटले जाते.हा धबधबा 30 ते 40 फूट उंचीवरून कोसळतो. येथील धबधब्याचा परिसर हिरवेगार जंगलाने व्यापलेला आहे. ट्रेकिंग प्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. धावडा गावापासून हा धबधबा पाच ते सात किलोमीटर अंतरावर आहे.

1)सीडीघाट धबधबा हा जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
सीडीघाट धबधबा हा जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा गावाजवळ आहे.
2)जांबुवंत महाराज मंदिर हे जालना जिल्ह्यातील कोणत्या डोंगरावर आहे?
जांबुवंत महाराज मंदिर हे जालना जिल्ह्यातील जामखेड डोंगरावर आहे.
3)जाळीचा देव हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध स्थान आहे ?
जाळीचा देव हे ठिकाण महानुभव पंथीयांसाठी अत्यंत पवित्र स्थान समजले जाते.


