सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-Part-2-Top 16 places visit to in Solapur District

मंडळी भारत भ्रमंतीमध्ये आज आपण पाहणार आहोत सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागातील एक ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात महाराष्ट्राचे कुलदैवत व दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे पंढरपूर, अक्कलकोट सारखी प्रसिद्ध देवस्थान आहेत. हा जिल्हा 16 गावाने बनलेला आहे म्हणून या जिल्ह्याचे सोलापूर हे नाव पडले आहे. सोलापूर जिल्ह्याला सातारा, सांगली, धाराशिव, पुणे व कर्नाटक राज्याच्या सीमा लाभलेल्या आहेत. या जिल्ह्यात अकरा तालुके असून या जिल्ह्यातल्या टॉवेल व चादरी विशेष लोकप्रिय आहेत. Top 16 places visit to in Solapur District

या जिल्ह्यात भीमा नदी ही प्रमुख नदी असून बोरी, सीना,मान या नद्या वाहतात. शेती उत्पादनामध्ये हा जिल्हा अग्रेसर असून या जिल्ह्यामध्ये ज्वारी,बाजरी,कापूस,ऊस, भुईमुग ही पिके घेतली जातात. या जिल्ह्यात हुतात्म्याचे स्मारक आहे. व माळढोक पक्ष्यांचे अभयारण्य आहे. तसेच सोलापूरचे प्रसिद्ध डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म सोलापूरचा असून त्यांचे सोलापूर मध्ये स्मारक आहे. जपान चीन युद्धामध्ये घायाळ झालेल्या लोकांसाठी डॉक्टर कोटणीस यांनी चीनमध्ये जाऊन चार वर्षे रुग्ण सेवा केली होती.

तसेच लोकशाहीर राम जोशी हे सोलापूर जिल्ह्यातीलच आहेत. व प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा गावचे आहेत. सोलापूर शहर वेगवेगळ्या संस्कृती आणि भाषेचा संगम असल्यामुळे या जिल्ह्यात मराठी, तेलुगू आणि कन्नड भाषा बोलल्या जातात. सोलापूर जिल्ह्यात अनेक धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटन स्थळे आहेत.

Table of Contents

Top 16 places visit to in Solapur District

सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-

1) श्री प्रभाकर महाराज मंदिर-

Top 16 places visit to in Solapur District


Shree Prabhakar Maharaj Temple हे सोलापूर जिल्ह्यातील बुधवार पेठेतील सम्राट चौक या ठिकाणी आहे. हे एक भक्तीचे केंद्र असून या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात येतात. प्रभाकर महाराजांनी दिलेला शिकवणीचे पालन करण्याचे हे एक अध्यात्मिक केंद्र आहे. या मंदिराच्या नावाने एक ट्रस्ट कार्यान्वित आहे. तसेच फेब्रुवारी मार्च दरम्यान होळीच्या वेळी या ठिकाणी “गुलाल सोहळा” साजरा केला जातो. सोलापूर बस स्टॅन्ड वरून हे ठिकाण दीड किलोमीटर अंतरावर आहे.

2)श्री रेवनसिद्धेश्वर मंदिर-


Revansiddh Temple हे सोलापूर जिल्ह्यातील एक धार्मिक व प्राचीन मंदिर आहे.हे मंदिर रेवनसिद्धेश्वर या महान संताचे असून ते संभाजी तलाव आणि प्राणी संग्रहालयाच्या जवळ आहे. लिंगायत समाजाच्या धार्मिक परंपरा या मंदिरात पाहायला भेटतात. हा मंदिर परिसर अत्यंत रमणीय, शांत व सुंदर आहे. मंदिरातील तळघरात महान संताची मूर्ती आहे. हे मंदिर दगडामध्ये बांधलेले असून मकर संक्रातीला या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो. सोलापूर बस स्थानकापासून हे मंदिर पाच किलोमीटर अंतरावर आहे.

3) हजरत शाह जहूर दर्गा –


Hajrat Shah Jahur Darga सोलापूर जिल्ह्यातील हिंदू व मुस्लिम यांचे एक धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे हा दर्गा धार्मिक एकतेचे प्रतीक मानले जातो.या दर्ग्याची वास्तुकला इंडो-इस्लामिक शैलीचे सूचक असून ज्यामध्ये घुमट आहे आणि ते शांती आणि अध्यात्माचे दीपस्तंभ म्हणून ओळखले जाते. हा दर्गा म्हणजे धार्मिक एकता आणि आध्यात्मिक योगदानाबद्दल ओळखला जातो. या दर्ग्याचे ठिकाण शांत असून देशाच्या विविध भागातून भाविक या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी येतात. सोलापूर बस स्टँड वरून हे ठिकाण दोन किलोमीटर अंतरावर आहे.



4) सोलापूर जिल्ह्यातील चादरी-


Solapur District Blanket या टिकाऊ, आकर्षक डिझाईन, उत्कृष्ट गुणवत्ता यामुळे जगप्रसिद्ध आहेत.सोलापूरची पहिली चादर 1956 मध्ये किसनराव क्षीरसागर यांनी तयार केली. सोलापूर शहरात या चादरी मोठ्या प्रमाणात तयार केल्या जात असून या चादरी हातमागावर विणल्या जातात आणि पूर्णत: सुती कापडापासून बनवल्या जातात. या चादरी उच्च प्रतीच्या सुती धाग्यांपासून बनविल्यामुळे त्या टिकाऊ आणि मऊ असतात.

तसेच येथील चादरीवर असंख्य प्रकारच्या आकर्षक डिझाईन असल्यामुळे या चादरीना देशात आणि विदेशातूनही मोठ्या प्रमाणात मागणी आहे.या चादर व्यवसायात सोलापूर मधील पद्मशाली समाजातील लोकांचा मोठा सहभाग दिसून येतो. सोलापूर मध्ये या चादरी होलसेल आणि रिटेल मध्ये विकत मिळतात.

Visit our website: allindiajourney.com

5) शस्त्रागार संग्रहालय न्यू पॅलेस अक्कलकोट-


Armoury Museum New Palace हे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे नवीन राजवाडा या ठिकाणी असलेले शस्त्रागार संग्रहालय आहे.अक्कलकोट संस्थानचे राजे फत्तेसिंह भोसले यांचा हा खाजगी संग्रह असून यामध्ये बंदुकी, तोफा,भाले, धनुष्यबाण,तलवारी,शस्त्रे, वन्यप्राण्यांचे टॅक्सीडर्म केलेले नमुने व इतर दुर्मिळ वस्तूंचा प्रचंड संग्रह आहे. आशिया खंडामधील हे सर्वात मोठे शस्त्रांचा संग्रह असलेले संग्रहालय आहे. अक्कलकोटच्या इतिहासातील हे महत्वाचे संग्रहालय असून अक्कलकोट ला येणारे भाविक, विद्यार्थी, संशोधक या संग्रहालयाला भेट देतात.

6) संत सावता महाराज समाधी मंदिर –


Sant Savta Mali हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण गावचे थोर संत होते. त्यांचा जन्म इ.स. 1250 मध्ये झाला होता व ते एक मराठी संत कवी होते.अरण या गावी संत सावता महाराजांच्या राहत्या घराच्या जागेवर त्यांचे मंदिर आहे. तर त्यांचा ज्या ठिकाणी मळा होता त्या ठिकाणी त्यांचे समाधी मंदिर आहे. व समाधी मंदिराशेजारी त्यांच्या वापरातील त्या काळातील विहीर आहे. 1295 मध्ये त्यांनी समाधी घेतली होती.

संत सावतामाळी हे पंढरपूरच्या पांडुरंगाचे निसिम भक्त होते.आषाढ वद्य चतुर्दशीला संत सावता माळी यांची पुण्यतिथी अरण या ठिकाणी साजरी केली जाते.संत सावता माळी कधीही पंढरपूरला गेले नाहीत पांडुरंगच त्यांना भेटायला अरण येथे यायचे असे सांगितले जाते. पंढरपूर पासून हे ठिकाण काही किलोमीटर अंतरावर आहे.

7) हुतात्मा चौक-


Hutatma Chouk हे सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहराच्या मध्यावर असलेले एका ऐतिहासिक ठिकाण आहे. 1931 मध्ये ब्रिटिशांनी चार स्वातंत्र्यसैनिकांना फाशी दिली होती.त्यांच्या स्मरणार्थ हा चौक उभारण्यात आला आहे. हुतात्मा बागेच्या जवळच असलेल्या हुतात्मा चौकामध्ये कुर्बान हुसेन,जगन्नाथ शिंदे,मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा या हुतात्म्यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी असलेल्या बागेला हुतात्मा बाग असे नाव देण्यात आले आहे. पर्यटन या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात भेट देतात.

8) महात्मा गांधी प्राणी संग्रहालय-


Mahatma Gandhi Prani Sangrahalay हे सोलापूर जिल्ह्यातील विजापूर रोडवर रेवणसिद्धेश्वर मंदिराजवळ असलेले महत्वाचे प्राणी संग्रहालय आहे. या प्राणी संग्रहालयाला ‘राणीचा बाग’ म्हणून हे ओळखले जाते.या संग्रहालयाची स्थापना 1977 मध्ये माजी आयुक्त सुंदरम यांनी केली असून हे संग्रहालय 23 एकर मध्ये पसरलेले आहे. या प्राणी संग्रहालयात 139 प्रकारचे प्राणी व पक्षी आहेत. त्यामध्ये चितळ, काळविट, सिंह, किंग कोब्रा, मगर, सांबर, आणि वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. पर्यटकांचे हे आकर्षणाचे ठिकाण आहे.

9) अकलाई देवी मंदिर-

Aklai Devi Temple हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज या ठिकाणी नीरा नदीच्या काठावर असलेले प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. या मंदिरातील अकलाई देवीची मूर्ती प्राचीन व सुंदर आहे. हे मंदिर खूप वर्षापूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. मंदिर परिसर शांत व रमणीय आहे. नवसाला पावणारे देवी म्हणून या देवीची ख्याती आहे. या मंदिरात वर्षभर भाविकांची वर्दळ असून नवरात्रीमध्ये या ठिकाणी मोठी यात्रा भरते त्यावेळी लाखोच्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात.

10) माळढोक अभयारण्य-


Maldhok Sanctuary हे सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे अभयारण्य आहे. या अभयारण्याला नान्नज अभयारण्य म्हणून मी ओळखले जाते. या अभयारण्याची स्थापना 1979 ते 80 च्या दरम्यान माळढोक पक्षाच्या संरक्षणासाठी झाली. हे अभयारण्य 1229 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेले असून या अभयारण्यात काळवीट, लांडगा, भारतीय कोल्हा, तरस हे वन्यजीव प्राणी आढळतात. माळढोक हा जगातील सर्वात वजनदार उडणारा पक्षी आहे.हे अभयारण्य सोलापूर जिल्ह्यातील महत्वाचे पर्यटन स्थळ आणि वन्यजीव संवर्धन केंद्र आहे.

11) श्री अर्धनारी नटेश्वर मंदिर-


Shree Ardhanarinateshwar Temple हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वेळापूर या ठिकाणी असलेले प्राचीन मंदिर आहे. हे यादवकालीन मंदिर बाराव्या शतकातील असून हेमाडपती स्थापत्य शैलीत बांधलेले आहे.या मंदिरात अर्धा शिव आणि अर्धा पार्वतीची एकत्रित मूर्ती आहे, जी अर्धनारी नटेश्वराचे स्वरूप दर्शवते. विशेष म्हणजे या मंदिरासमोर एक कुंड असून त्यात बाराही महिने पाणी असते. तसेच या मंदिर परिसरात गणेश, नागदेवता यांची लहान मंदिरे आणि पिंडी आहेत. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला या ठिकाणी मोठी यात्रा भरते, त्यावेळी देवाचे हळदी, लग्न, वरात व सोळावी असे विविध विधी पार पडतात.

12) नागनाथ मंदिर-

Nagnath Temple हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वडवळ या ठिकाणी असलेले अत्यंत पवित्र धार्मिक तीर्थस्थळ आहे. हे मंदिर बाराव्या शतकातील असून हेमाडपंती स्थापत्य शैलीत बांधलेले आहे.नागनाथ महाराज हे शंकराचा स्वयंभू अवतार असून मोहोळ तालुक्याचे हे ग्रामदैवत आहे. विशेष म्हणजे महिला भक्तांसाठी नागनाथ महाराज हे संकट काळातील ‘भाऊ’ आणि ‘आधार’आहेत अशी महिलांची अपार श्रद्धा आहे त्यामुळे नागपंचमीला महिला उपवास करतात. या मंदिरासमोर एक मशीद असून हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे.दरवर्षी चैत्र महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. सोलापूर पासून हे ठिकाण 30 किलोमीटर अंतरावर आहे.

13) श्री संगमेश्वर मंदिर-


Shree Sangmeshwar Temple हे सोलापूर जिल्ह्यातील कुडल या ठिकाणी भीमा आणि सीना नद्यांच्या संगमावर निसर्गरम्य परिसरात असलेले शिवाचे प्राचीन व पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या मंदिराला तीन गाभारे असून हे मंदिर चालुक्यकालीन असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या मुख्य गर्भगृहात श्री संगमेश्वराची भव्य पिंड आहे. तसेच हे मंदिर दोन नद्यांच्या संगमावर असल्यामुळे या मंदिराला संगमेश्वर हे नाव पडले आहे. या मंदिराचा अनेक वेळा जिर्णोद्धार झालेला असून हे मंदिर स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिरात भाविकांची बारमाही वर्दळ असते.

14) अकलूज किल्ला-


Akluj Fort हा सोलापूर जिल्ह्यातील नीरा नदीच्या काठावर असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला 487 मीटर उंच असून तेराव्या शतकात राजा सिंघन याने बांधला. संभाजी महाराजांना त्यांच्या 26 साथीदारासह या किल्ल्यात कैदेत ठेवले होते असे सांगण्यात येते. तसेच ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड डलहौसी यांनीही या किल्ल्यात वास्तव्य केलेचा उल्लेख आहे.

सध्या या किल्ल्यामध्ये स्थानिक लोकांच्या मदतीने किल्ल्याचा जीर्णोद्धार करून किल्ल्यामध्ये एका ‘शिवसृष्टी’ ची स्थापना करण्यात आली आहे. या किल्ल्यातील विशेष आकर्षण म्हणजे सायंकाळी लाईट व साऊंड शो,शिवजी महाराजांच्या जीवनाचे फायबर पुतळे आणि म्युरल्स याशिवाय अनेक गोष्टी पाहायला मिळतात. सोलापूर पासून हा किल्ला 115 किलोमीटर अंतरावर आहे.

15) करमाळा किल्ला-


Karmala Fort हा सोलापूर जिल्ह्यातील भक्कम बांधणीचा एक ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे. हा करमाळ्याचा किल्ला रावरंभा निंबाळकर यांनी इ. स. 1727 मध्ये बांधला. या किल्ल्याचे प्रवेशद्वारा भव्य असून किल्ल्याला 21 बुरुज आहेत. तसेच किल्ल्याच्या बाहेरील बाजूने खंदक आहेत पण सध्या ते काही प्रमाणात बुजलेले आहेत. तसेच या किल्ल्याचे वेगवेगळ्या पद्धतीने बांधलेले बांधकाम आजही पाहायला मिळते. सध्या या किल्ल्यामध्ये लोकं वस्ती करून राहत असून किल्ल्याजवळ श्री कमला भवानी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे.

16) सोलापूर विज्ञान केंद्र-


Solapur Science Centre हे सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर विद्यापीठाजवळ असलेले एक विज्ञान केंद्र आहे. या विज्ञान केंद्रात सायन्स पार्क,विज्ञान गॅलरी आणि थ्रीडी थिएटर आहे. तसेच या ठिकाणी दुर्बिनेद्वारे आकाश निरीक्षण केले जाते.विज्ञान शाखेसाठी मनोरंजक असलेले हे महाराष्ट्रातील तिसरे सायन्स सेंटर आहे. विज्ञान प्रेमी आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी हे एक माहितीपूर्ण ठिकाण आहे.

Visit the travel blog

1)सोलापूर जिल्ह्यातील श्री अर्धनारी नटेश्वर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे?

सोलापूर जिल्ह्यातील श्री अर्धनारी नटेश्वर मंदिर माळशिरस तालुक्यात आहे.

2) सोलापूर जिल्ह्यातील श्री प्रभाकर महाराज मंदिर कोणत्या ठिकाणी आहे?

सोलापूर जिल्ह्यातील श्री प्रभाकर महाराज मंदिर बुधवार पेठेत आहे.

3) सोलापूर जिल्ह्यातील अकलूज किल्ला कोणत्या नदीच्या काठावर आहे?

सोलापूर जिल्ह्यातील अकलूज किल्ला नीरा नदीच्या काठावर असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top