पालघर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-Top 16 places visit to in Palghar District

मंडळी भारत भ्रमंतीमध्ये आज आपण पाहणार आहोत पालघर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे पालघर हा महाराष्ट्र राज्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक जिल्हा असून 2014 रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर हा महाराष्ट्रातील 36 वा जिल्हा निर्मित करण्यात आला. हा जिल्हा कोकण विभागात घनदाट जंगलामध्ये येत असून अरबी समुद्राच्या किनारपट्टी दरम्यान पसरलेला आहे. या जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके आहेत. या जिल्ह्यामध्ये 1000 गावे असून 3800 पेक्षा पाडे आहेत.Top 16 places visit to in Palghar District

या जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. या जिल्ह्यातील वारली पेंटिंग, तारपा नृत्य जगभर प्रसिद्ध असून या जिल्ह्याला ‘महाबळेश्वर’ म्हणूनही ओळखले जाते. या जिल्ह्यातील वसई तालुक्यावर पूर्वी पोर्तुगीजांचे राज्य होते परंतु पावणे तीनशे वर्षांपूर्वी चिमाजी आप्पांनी या पोर्तुगीजांच्या राज्याला सुरुंग लावत मराठी झेंडा फडकवला. तसेच 1942 च्या ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य लढ्यातील ‘चले जाओ’ आंदोलनामध्ये पालघर मधील पाच हुतात्मे शहीद झाले होते. या जिल्ह्यातून वैतरणा आणि उल्हास या प्रमुख नद्या वाहतात. याशिवाय अनेक उपनद्या ही आहेत.

या जिल्ह्यामध्ये भात शेती मुख्यत्वे केली जाते. त्याचबरोबर नाचणी,तूर, उडीद, भुईमूग, तीळ, वारईइ.पिके देखील येथे घेतली जातात. व काही तालुक्यांमध्ये मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प पालघर जिल्ह्यातील तारापूर या ठिकाणी सुरू करण्यात आला. या जिल्ह्यातील डहाणू तालुका चिकू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यामध्ये अनेक धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत.

Top 16 places visit to in Palghar District

पालघर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-

1) वसई किल्ला-

Top 16 places visit to in Palghar District


Vasai Fort हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यालगत युरोपीय पद्धतीत बांधलेला आणि वसई जवळ असलेला भुईकोट किल्ला आहे. हा किल्ला तिने बाजूने समुद्र आणि दलदलीने वेढलेला असून 1909 मध्ये महाराष्ट्र सरकारने या किल्ल्याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. या किल्ल्यावर दहा बुरुज असून काही तोफा पाहायला मिळतात.

या किल्ल्यामध्ये तीन चर्च, हॉस्पिटल, कारागृह, दारूचे कोठार,इमारतींचे अवशेष दिसून येतात. किल्ल्यात चोर वाटा आणि काळोखी चक्री जिने आहेत. तसेच महादेवाचे आणि वज्रेश्वरीचे मंदिर आहे. कोकणातला बंदरावर असलेला हा किल्ला त्यावेळच्या समुद्रावर आणि व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी कामी येत होता. पालघर पासून हा किल्ला 45 किलोमीटर अंतरावर आहे.

2) जव्हार राजवाडा-


Jawhar Palace हा पालघर जिल्ह्यातील जव्हार ठिकाणी असलेला 632 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक राजवाडा आहे. हा राजवाडा मुकणे घराण्याचा असून या राजवाड्याचे बांधकाम निओक्लासिकल शैलीत गुलाबी दगडांचा वापर करून बांधण्यात आले आहे. या राजवाड्यामध्ये 80 खोल्या असून मुख्य दरवाजा समोर तोफ आहे.

या राजवाड्याला ‘जय विलास पॅलेस’ या नावाने हे ओळखले जाते. या राजवाड्याच्या आसपास शिरपामाळ, सनसेट पॉइंट ही पर्यटन स्थळे आणि आदिवासी संस्कृती पाहायला मिळते. पावसाळ्यात जास्त प्रमाणात या ठिकाणी पर्यटक येतात. पालघर पासून हे ठिकाण 42 किलोमीटर अंतरावर आहे.

3) शिरपामाळ-


Shirpamal हे पालघर जिल्ह्यातील जव्हार शहराच्या जवळ ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेले व शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले प्रेक्षणीय ठिकाण आहे.जव्हार जवळच्या डोंगरावर हे माळरान असून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतला जाताना या ठिकाणी मुक्काम केला होता त्यावेळी जव्हारच्या राजाने त्यांचा शिरपेचाने सन्मान केला होता.

या माळरान परिसरात दाभोसा धबधबा, जव्हारचा किल्ला ही पर्यटन स्थळे आहेत. जव्हार तालुक्यापासून हे ठिकाण पाच किलोमीटर अंतरावर आहे.

4)शिरगाव किल्ला-


Shirgaon Fort हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामधील शिरगाव गावामध्ये समुद्राच्या काठी असलेला प्राचीन व ऐतिहासिक किल्ला आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या शत्रूंवरती नजर ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचा उपयोग केला होता. हा किल्ला 200 फूट उंच व दीडशे फुट लांब आहे. या किल्ल्याची तटबंदी आजही सुस्थितीत आहे.

या ठिकाणीची स्वच्छता आणि रम्य परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. तसेच या ठिकाणी सात आठ फांद्या असलेले एक पाम वृक्षाचे झाड आहे. या किल्ल्याच्या बाहेरील भिंती, पायऱ्या, कठडे, बुरुज इत्यादी भक्कम दगडामध्ये बांधलेले आहेत. पालघर पासून हा किल्ला सहा ते सात किलोमीटर अंतरावर आहे.

5)केळवा बीच –


Kelva Beach महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील केळवे किंवा केळवा या नावाने ओळखले जाणारे गाव आहे. या ठिकाणी असलेल्या केळीच्या भागामुळे या ठिकाणालाकेळवे हे नाव पडले आहे. तसेच समुद्रकिनाऱ्यावर असलेले हे ठिकाण आहे. या समुद्रकिनाऱ्याची स्वच्छ किनारपट्टी, सोनेरी वाळू आणि शांत वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. या ठिकाणी अनेक मालिका आणि चित्रपटांचे देखील शूटिंग केले जाते.

येथील केळवा बीच परिसरात केळवा किल्ला, शिरगाव किल्ला, माहीम बीच, शीतला देवी मंदिर. ही पर्यटन स्थळे आहेत. तसेच या ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या सुरुंच्या बागेमध्ये एक भुईकोट किल्ला आहे. पालघर पासून हे ठिकाण बारा किलोमीटर अंतरावर आहे.

Visit our website: allindiajourney.com

6) अर्नाळा किल्ला-


Arnala Fort हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील जलदुर्ग आहे. हा किल्ला चौकोनी आकाराचा असून किल्ल्याच्या चारही बाजूला पाणी आहे. या किल्ल्याला जंजिरे अर्नाळा किल्ला म्हणूनही ओळखले जाते.किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे 4 हेक्टर असून दहा मीटर उंच असलेली मजबूत तटबंदी आहे. तसेच या किल्ल्याचे बुरुज आजही चांगल्या स्थितीत आहेत.

या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर अत्यंत सुंदर कोरीव नक्षीकाम केलेले आहे.या दरवाजावर ‘बाजीराव अमात्य सुमती आज्ञापिले शंकर! पाश्चात्त्यासि वधूनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा!!’ असा शिलालेख लिहिलेला आहे.या किल्ल्याच्या आतमध्ये त्र्यंबकेश्वर व भवानीमातेची मंदिरे आहेत. आणि किल्ल्यामध्ये एक अष्टकोनी तळे आहे. याशिवाय किल्ल्यात गोड पाण्याच्या पाच-सहा विहिरीसुद्धा आहेत. आणि किल्ल्यावर तीन-चार हजार कोळी लोकांची वस्ती व शेतीही आहे.

किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर कालिका मातेचे मंदिर आहे. 1909 मध्ये महाराष्ट्र सरकारने हे ठिकाण राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. वसई पासून हा किल्ला दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे.

7) शितलाई देवी मंदिर-


Shitlai Devi Temple हे मंदिर पालघर जिल्ह्यातील केळवे गावात असलेले प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. शितलाई देवी ही या ठिकाणच्या सोमवंशी आणि इतर कुटुंबांची कुलस्वामिनी आहे. शितलादेवी मंदराजवळ केळवे बीच, माहीम बीच, शिरगाव बीच ही पर्यटन स्थळे आहेत. नवरात्री काळात या मंदिरात मुंबई आणि इतर जिल्ह्यातून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पालघर पासून हे ठिकाण अकरा किलोमीटर अंतरावर आहे.

8) तारापूर किल्ला-


Tarapur Fort हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तारापूर तालुक्यात असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. सोळाव्या शतकात हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधलेला असल्याचे सांगितले जाते. पूर्वी या किल्ल्याचे नाव सँतो एस्टेव्होचा किल्ला असे होते. हा किल्ला टेकडीवर बांधलेला असून किल्ल्याला चार बुरुज आहेत.

आयताकृती आकार असलेला हा किल्ला सुमारे 10 मीटर उंच भिंतीने वेढलेला आहे. तसेच किल्ल्यामध्ये चर्च, मठ,रुग्णालय, इमारती आणि अनेक विहिरी आहेत. वाणगाव रेल्वे स्थानकापासून हा किल्ला पाच किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून हा किल्ला शंभर किलोमीटर अंतरावर आहे.

9) कालदुर्ग किल्ला-

Kaldurg Fort हा महाराष्ट्राचे पालघर जिल्ह्यामध्ये वैतरणा व सूर्य नदीच्या संगमावर वसलेला गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. पालघर मध्ये अनेक डोंगराळ किल्ले असून त्यापैकी कालदुर्ग हा एक किल्ला आहे.हा किल्ला आयताकृती असून किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची 1550 फूट उंच एवढी आहे. ट्रेकर्सच्या दृष्टीने हा किल्ला मध्यम आकाराचा आहे.

हा किल्ला जंगलामध्ये असून या ठिकाणी आदिवासी लोकांचे खूप मोठे प्रमाण आहे. या किल्ल्यापासून जवळच वाघोबा खिंड आहे. मुंबई पासून हा किल्ला शंभर किलोमीटर अंतरावर आहे तर पालघर पासून सात किलोमीटर अंतरावर आहे.

10) हनुमान पॉईंट-


Hanuman Point हे पालघर जिल्ह्यातील जव्हार जवळ असलेले निसर्गरम्य ऐतिहासिक,सांस्कृतिक व धार्मिक पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी असलेली हिरवीगार निसर्गरम्य देवकोबाचा कडा म्हणून ओळखले जाणारे 500 फूट खोल दरी पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. हा हनुमान मंदिर परिसर निसर्गरम्य असून डोंगरांनी वेढलेला आहे.

या मंदिराला कात्या मारुती मंदिर या नावानेही ओळखले जाते. या मंदिर परिसरातून महोलीचा ऐतिहासिक किल्ला, आणि जय विलास पॅलेस पाहायला मिळतो.हनुमान पॉइंट हे पालघर जिल्ह्यातील अत्यंत निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणापासून जवळच सनसेट पॉइंट, दाभोसा धबधबा आणि काळमांडवी धबधबा ही पर्यटन स्थळे आहेत.

11) दाभोसा धबधबा-


Dhabosa Waterfall हा पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील बारमाही वाहणारा धबधबा आहे. हा धबधबा लेंडी नदीवर असून 300 फुट उंचीवरून कोसळतो धबधबा परिसर अत्यंत हिरवागार आणि निसर्गरम्य असून ट्रेकिंग आणि ऍडव्हेंचरसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. हिरव्यागार डोंगराच्या कुशीत उसळणाऱ्या या धबधब्याच्या पांढरा शुभ्र धारा पाहून मन मोहून जाते.

पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. या धबधबा परिसरात जव्हारचा किल्ला, हनुमान पॉइंट, सनसेट पॉइंट हे पर्यटन स्थळे आहेत. हे ठिकाण मुंबई पासून दीडशे किलोमीटर तर जव्हार पासून वीस किलोमीटर अंतरावर आहे.

12) आशापुरी देवी मंदिर-


Ashapuri Devi Temple हे पालघर जिल्ह्यातील निसर्गरम्य वातावरणात समुद्रकिनारी एडवण या ठिकाणी छोट्या डोंगरावर आशापुरी आईचं ऐतिहासिक आणि पौराणिक मंदिर आहे.आशापुरी मंदिर अतिशय जागृत देवस्थान आहे. आगरी कोळी बांधव देवीची मनोभावे पूजाकरतात. नवसाला पावणारी देवी अशी या देवीची ख्याती आहे.

या मंदिराच्या आसपास नैसर्गिकरित्या तयार झालेल्या दगडांचा समूह आहे. आशापुरी मातेचे स्थान डोंगराच्या गुहा कपारी मध्ये आहे त्यामुळे या ठिकाणी उभे राहून दर्शन घेता येत नाही बसूनच घ्यावे लागते. या ठिकाणचे समुद्राचे विहंगम दृश्य आणि निसर्गरम्य वातावरण मनमोहून टाकते. नवरात्रीमध्ये या ठिकाणी भाविकांची अलोट गर्दी असते.

13) स्वयंभू शिवमंदिर-


Swayambhu Shiv Temple हे पालघर जिल्ह्यातील एडवण या ठिकाणी समुद्रकिनारी असलेले जागृत व स्वयंभू देवस्थान आहे. या मंदिराच्या तिन्ही बाजूला समुद्र, नारळी पोफळीच्या बागा आणि केतकीच्या बनांनी वेढलेला आहे. हे शिव मंदिर म्हणजे प्रति रामेश्वर समजले जाते. शिवशंकर येथील मच्छीमारांचे रक्षण करतो अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे. घनदाट जंगलामध्ये असणाऱ्या या मंदिरासमोर एक भव्य तलाव आहे.

श्रावणातील सोमवारी मुंबई पुणे वरून येणाऱ्या लोकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच महाशिवरात्रीला या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो. मंदिराच्या जवळपास आशापुरी देवी मंदिर आणि अर्नाळा किल्ला आहे. सफाळे स्थानकापासून हे ठिकाण थोड्या अंतरावर आहे.

14) जीवदानी माता मंदिर-


Jivdani Mata Temple हे पालघर जिल्ह्यातील विरार या ठिकाणी डोंगरावर असलेले जागृत देवस्थान आहे. या मातेबद्दल असे सांगितले जाते की यज्ञात आहुती दिलेल्या सतीच्या कलेवराचे श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने 51 तुकडे केले ज्या ज्या ठिकाणी हे तुकडे पडले त्या त्या ठिकाणी शक्तीपीठे तयार झाली. ही शक्ती पीठ बाहेरच्या देशांमध्येही नेपाळ आणि बलुचिस्तान मध्ये आहेत.

महाराष्ट्रात असलेल्या 18 शक्तीपीठांपैकी जीवदानी माता हे एक शक्तिपीठ आहे. या डोंगरावर सतराव्या शतकाच्या सुमारास जिवधन किल्ला होता त्याचे अवशेष आजही पाहायला मिळतात. तसेच या डोंगरावर पांडव कालीन दगडात कोरलेल्या गुफा ही आहेत. विरार रेल्वे स्थानकापासून हे ठिकाण थोड्या अंतरावर आहे.

15) केळवे किल्ला-


Kelve Fort हा पालघर जिल्ह्यातील केळवे या ठिकाणी समुद्रात असलेला ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला जहाजच्या आकाराचा सुंदर असून पोर्तुगीजांनी हा पाणकोट बांधला होता. या किल्ल्याला केळवे पाणकोट किंवा केळवे जंजिरा या नावाने ही ओळखले जाते. या किल्ल्याचे प्रवेशद्वार जमिनीपासून आठ फूट उंचीवर आहे कारण भरतीच्या वेळी समुद्राच्या पाण्याने हा किल्ला वेढला जातो तेव्हा बोटीने प्रवेश करता येतो.

तर ओहोटीच्या वेळी किल्ल्याच्या उघड्या पडलेल्या जमिनीवरून आठ फूट उंचीवरून चढून जावे लागते. किल्ल्यामध्ये जंग्या व तोफा ठेवण्यासाठी झरोके आहेत. तसेच किल्ल्यामध्ये पाण्याची बुजलेली विहीर पाहायला मिळते. केळवे रेल्वे स्थानकापासून हे ठिकाण आठ किलोमीटर अंतरावर आहे.

16) श्रीसुंदरनारायण गणेश मंदिर-

Shree Sunder Narayan Ganesh Temple हे पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील देवबांध या ठिकाणी देवबांध नदीकाठी निसर्गरम्य परिसरात असलेले धार्मिक स्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती पंचधातूची असून या मंदिराची स्थापना 1986 मध्ये करण्यात आली. निसर्गाच्या कुशीत असलेले हे मंदिर देवबांध नदीच्या काठी असल्यामुळे या ठिकाणाला देवबांध गणपती म्हणून ही ओळखले जाते.

येथील मंदिर परिसर निसर्गरम्य आणि शांत असून देवबांध नदी मंदिराच्या बाजूने नागमोडी वळण घेत वाहत असते. मुंबई इतर ठिकाणचे पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणावर भेट देतात.जव्हार तालुका पासून हे ठिकाण 45 किलोमीटर अंतरावर आहे.

Visit the travel blog

1)आशापुरी देवी मंदिर हे पालघर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे?

आशापुरी देवी मंदिर हे पालघर जिल्ह्यातील एडवण या ठिकाणी आहे.

2)दाभोसा धबधबा हा पालघर जिल्ह्यातील कोणत्या नदीवर आहे?

दाभोसा धबधबा हा पालघर जिल्ह्यातील लेंडी नदीवर आहे.

3)जव्हार राजवाडा हा पालघर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे?

जव्हार राजवाडा हा पालघर जिल्ह्यातील जव्हार या ठिकाणी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top