नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-Top 16 places visit to in Nanded District

मंडळी भारत भ्रमंतीमध्ये आज आपण पाहणार आहोत नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे नांदेड हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा आहे. हा जिल्हा तेलंगणा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे. भगवान शंकराच्या नंदीच्या नावावरून या जिल्ह्याला नांदेड हे नाव पडले असे सांगण्यात येते. नांदेड हे शीख धर्मीयांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे.Top 16 places visit to in Nanded District

या जिल्ह्यात मराठी हे राज्यभाषा असून हिंदी आणि उर्दू या भाषाही बोलल्या जातात. तसेच या जिल्ह्यात 16 तालुके असून जिल्ह्याची लोकसंख्या अंदाजे 34 लाख एवढी आहे. या जिल्ह्यातून गोदावरी ही मुख्य नदी वाहते. आणि बऱ्याच उपनद्या आहेत. तसेच या जिल्ह्यात ज्वारी, तूर,कापूस, केळी, सोयाबीन ही पिके घेतली जातात.

या जिल्ह्यात अनेक धार्मिक, सांस्कृतिक, आणि नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत. या जिल्ह्यात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ असून अनेक महाविद्यालये, आयटीआय आणि शैक्षणिक संस्था आहेत.

Table of Contents

Top 16 places visit to in Nanded District


नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-

1) रेणुका देवी माहूरगड –

Top 16 places visit to in Nanded District


Renuka Devi हे नांदेड जिल्ह्यातील माहूरगड या ठिकाणी डोंगरावर असलेले प्राचीन व पवित्र धार्मिक स्थळ आहे. भारतातील साडेतीन शक्तीपीठापैकी रेणुका देवी माहूरगड हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. माहूर गडावरील रेणुका मातेचे हे मंदिर कमलाकार असून, यादवराजा देवगिरी यांनी सुमारे 800 ते 900 वर्षांपूर्वी बांधले होते.या ठिकाणी रेणुका मातेच्या पाच फूट उंच व चार फूट रुंद मुखाची पूजा केली जाते.

देवीने चांदीचा मुखवटा परिधान केलेला असून सुवर्ण अलंकार घातलेले आहेत.माहूरगड परिसरात अनेक धार्मिक स्थळे आहेत. जसे की जमदग्नी स्थान, परशुराम मंदिर, अनुसया शिखर,दत्त शिखर इ. याशिवाय माहूरगडावर प्राचीन वस्तूंचे संग्रहालय आहे. शारदीय नवरात्रोत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.नांदेड पासून माहूरगड हे ठिकाण 130 किलोमीटर अंतरावर आहे.


2)गुरुद्वारा हजूर साहिब –


Gurudwara Hujur Saheb हे नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर असलेले शीख तीर्थक्षेत्र आहे.हा गुरुद्वारा संगमरवरी दगडात बांधलेला असून गुरुद्वाराचा मुकुट सोनेरी आहे.हे स्थान म्हणजे शीख धर्मातील पाच प्रमुख तख्तांपैकी एक तख्त आहे. 1708 मध्ये गुरू गोविंद सिंगजीं यांनी या ठिकाणी त्यांच्या गादीची स्थापना केली होती.

गुरू गोविंद सिंगजींची समाधी आहे. तसेच गुरू पर्व, बैसाखी, होळा मोहल्ला या सणांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या ठिकाणी ग्रंथालय,संग्रहालय असून हजारो भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था केली जाते. देशातून आणि परदेशातून अनेक भावीक या ठिकाणाला भेट देतात.

3)कंधार किल्ला-

Kandhar Fort हा महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील कंधार गावात असलेला ऐतिहासिक किल्ला आहे. कंधार गाव हे प्राचीन काळातील व्यापाराचे केंद्र होते.हा किल्ला बाराव्या शतकात बांधलेला असून या किल्ल्याचा इतिहास सातवाहन, चालुक्य, यादव आणि बहमनी सुलतानांच्या काळाशी संबंधित आहे.

किल्ला परिसरात प्राचीन मंदिरे आणि तलाव आहेत. हा किल्ला दगडात बांधलेला असून किल्ल्याची तटबंदी मजबूत आहे.कंधार किल्ला हा इतिहासप्रेमी आणि निसर्गप्रेमी साठी उत्तम ठिकाण आहे. नांदेड पासून हे ठिकाण 50 किलोमीटर अंतरावर आहे.


4)सिद्धेश्वर मंदिर, होट्टल-


Siddheshwar Temple Hottle हे महाराष्ट्रतील नांदेड जिल्ह्यातीलहिमायतनगर तालुक्यातील होट्टल या गावांमध्ये असलेले प्राचीन पवित्र हिंदू शिवतीर्थस्थान आहे. मंदिर परिसर स्वच्छ, निसर्गरम्य, शांत आणि अध्यात्मिक वातावरणाने भरलेला आहे.हे मंदिर ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे असून मंदिरातील शिवलिंग प्राचीन आहे.

महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात या ठिकाणी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. तसेच मंदिराजवळ एक प्राचीन तलाव आहे. नांदेड शहरापासून हे ठिकाण 60 किलोमीटर अंतरावर आहे.

Please visit our website: allindiajourney.com

5)सहस्रकुंड धबधबा-


Sahsrakund Waterfall हे महाराष्ट्रातील नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले व पैनगंगा नदीवर वसलेले एक अत्यंत निसर्गरम्य ठिकाण आहे. पैनगंगा नदीवरील हा धबधबा 30 ते 40 फुट उंचीवरून कोसळतो. या धबधब्याजवळ सुंदर बगीचा असून पंचमुखी महादेवाचे मंदिर आहे.

सहस्रकुंड धबधब्याचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी असते. हा धबधबा उमरखेड तालुक्यातील ढाणकी गावापासून 25 किलोमीटर अंतरावर तर नांदेड पासून शंभर किलोमीटर अंतरावर आहे.

6)शंकतीर्थ-


Shanktirth हे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील मुदखेडतालुक्यात असलेल्या या निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळाला अत्यंत धार्मिक महत्त्व आहे. या ठिकाणी श्री लक्ष्मी नरसिंह यांचे मंदिर आहे.महाराष्ट्र राज्याच्या गॅझेटिअरनुसार शंकतीर्थ हे गोदावरी नदीच्या नाभीचे स्थान तर ब्रह्मगिरी हे गोदावरीचे शिर्षस्थान आहे असे मानले जाते.

हे मंदिर निसर्गरम्य आणि शांत वातावरणात असून भक्तांना या ठिकाणी अध्यात्मिक शांततेचा अनुभव येतो.शंकतीर्थ हे ठिकाण नांदेड शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे.

7)माळेगाव यात्रा मुर्ती-


Malegaon Yatra हे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक गाव आहे. दरवर्षी चैत्र महिन्यात या ठिकाणी धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टीकोनातून महत्वाची असलेली मोठी यात्रा भरते. माळेगाव येथील यात्रेच्या वेळी येथील मुख्य प्राचीन देवता श्री सिद्धेश्वर यांची पालखीतून मिरवणूक काढली जाते. व भंडारा आणि महाप्रसादाचे वाटप केले जाते.हे एक जागृत देवस्थान असून यात्रेच्या वेळी गावातील हजारो भाविक एकत्र येतात.

8)मस्जिदे बिलोली-


Jama Mashid हे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील बिलोलीया ठिकाणी काळा दगडात बांधलेली महत्त्वपूर्ण धार्मिक व ऐतिहासिक वास्तू आहे. या मशिदीचे बांधकाम इस्लामी व मध्ययुगीन भारतीय वास्तुकला स्थापत्य शैलीत झालेले आहे. ही मशीद चारशे वर्षांपूर्वी मुघल सम्राट शाहजहान यांच्या काळात बांधली असल्याचे सांगितले जाते. हे ऐतिहासिक आणी प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमी गर्दी असते.

9) विष्णुपुरी प्रकल्प-


Vishnupuri Water Project जय महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीवर कृषी क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला सिंचन प्रकल्प आहे. हे विदर्भातील एक महत्त्वाचे जलसंपत्ती धरण असून रोलर कम्पॅक्टेड काँक्रिट (RCC) तंत्रज्ञानाने बांधलेले भारतामधील हे पहिले धरण आहे. या धरणाद्वारे नांदेड शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि काही प्रमाणात वीज निर्मिती ही केली जाते.विष्णुपुरी धरणाचा परिसर निसर्गरम्य असल्यामुळे या ठिकाणी शैक्षणिक सहली व पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात.

10)उनकेश्वर मंदिर-


Unkeshwar Temple हे महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात असलेले निसर्गाने बहरलेले प्राचीन आणि धार्मिक तीर्थस्थळ आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले असून मंदिरात प्राचीन शिवलिंग आहे.या ठिकाणी असलेल्या महादेवाच्या पिंडीला ‘उपलिंग’ म्हणून ओळखले जाते. ज्यांना 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन शक्य नाही. त्यांनी या ठिकाणच्या उपलिंगाचे दर्शन घेतल्यास बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे पुण्य मिळते अशी आख्यायिका सांगितली जाते.

उनकेश्वर या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. या झऱ्यातील पाण्यामध्ये सल्फर व औषधी तत्वे आढळून येतात. हे पाणी त्वचारोगावर उपयुक्त मानले जाते. असे सांगितले जाते की या झऱ्यातील पाण्याने अंघोळ केल्यास सर्व त्वचारोग बरे होतात. नांदेड मधील माहूरगडापासून हे मंदिर 40 किलोमीटर अंतरावर आहे.

11) काळेश्वर मंदिर-


Kaleshwar Temple हे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी या ठिकाणी गोदावरी नदीच्या काठावर वसलेले 700 ते 800 वर्षापूर्वीचे प्राचीन, हिंदू, स्वयंभू शिवमंदिर आहे. या ठिकाणी एक उद्यान असून शंकर सागर नावाचे जलाशय आहे. हे मंदिर दक्षिण भारतीय आणि मराठी स्थापत्य शैलीचा एक उत्तम नमुना आहे.

मंदिरातील स्तंभांवर कोरीव नक्षीकाम केलेले असून मंदिरातील शिवलिंग काळ्या दगडामध्ये आहे. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात या ठिकाणी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. नांदेड शहरापासून हे मंदिर दहा किलोमीटर अंतरावर आहे.


12) नंदगिरी किल्ला-


Nandgiri Fort हा महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदी तीरावर असलेला ऐतिहासिक व प्राचीन भुईकोट किल्ला आहे. हा किल्ला 1188 फूट उंच असून या किल्ल्याला नांदेडचा किल्ला म्हणूनही ओळखले जाते. या किल्ल्याचा इतिहास सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा सांगितला जातो. किल्ल्यावर एक पाण्याचा तलाव आहे. तुमच्याकडे या किल्ल्यावर 24 बुरुज होते परंतु सध्या स्थितीत फक्त आठच शिल्लक आहेत. हा किल्ला नांदेड पासून चार किलोमीटर अंतरावर अरब गल्ली मध्ये आहे.

13) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ-


Swami Ramanand Teerth Marathwada University   हे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील राज्यस्तरीय अग्रगण्य विद्यापीठ आहे.या विद्यापीठाचे नाव मराठा मुक्तिसंग्रामाचे जनक स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. या विद्यापीठाची स्थापना 17 सप्टेंबर 1974 रोजी झाली. हे विद्यापीठ 595 एकर मध्ये असून ‘ज्ञानतीर्थ’ या नावाने ओळखले जाते. या विद्यापीठाशी नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यातील तीनशे महाविद्यालये संलग्न आहेत.

या विद्यापीठात कला, विज्ञान, वाणिज्य, शिक्षण, व्यवसाय प्रशासन, पर्यावरणशास्त्र, विधीशास्त्र, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान,औषधनिर्माणशास्त्र आणि याच्या व्यतिरिक्तही अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. समाजशास्त्र, तसेच या विद्यापीठाने श्रीलंका, कोरिया, फिलिपीन्स, कंबोडिया, इझ्राएल, इंडोनेशिया, या देशांबरोबर सामंजस्य करार केले आहेत. तसेच या विद्यापीठाने ‘डिसोपोल’ हे मुतखड्यावरील औषध विकसित केले आहे.नांदेड पासून हे विद्यापीठ वीस किलोमीटर अंतरावर आहे.

14)श्रृंगऋषी देवस्थान –


shrungrushi Devsthan हे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील रेणापुर या गावात असलेले पवित्र व धार्मिक स्थान आहे. या ठिकाणी श्रृंगऋषीची मूर्ती आहे.श्रृंगऋषी हे एक महाभारत व रामायण काळातील महान तपस्वी ऋषी होते. हा देवस्थान परिसर निसर्गरम्य असून शांततापूर्ण आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात व गुरुपौर्णिमेला या ठिकाणी यात्रा व उत्सवाचे आयोजन केले जाते. या ठिकाणी भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात. नांदेड पासून हे ठिकाण 20 किलोमीटर अंतरावर आहे.

15)श्री गुरु गोबिंद सिंग जी म्युझियम-



Shree Guru Govindsing Ji Museam हे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील शीख धर्माच्या इतिहासाशी निगडित असलेले ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटन स्थळ आहे. या म्युझियम मध्ये विविध प्रकारची शस्त्रास्त्रे, कलाकृती, आणि ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह करण्यात आला आहे. या म्युझियम परिसरात सुंदर बाग असून या ठिकाणी फ्रेस्को, चित्रकला, हस्तकला, आणि ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांद्वारे शीख धर्मीयांचा इतिहास सांगितला जातो.



16)श्री दत्त शिखर मंदिर-


Shri Datta Shikhar Mandir हे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात माहूर तालुक्यात व माहूरगडावर असलेले भगवान दत्तात्रयाचे प्रसिद्ध तीर्थस्थळ आहे. हे मंदिर डोंगराच्या शिखरावर असल्यामुळे पायऱ्या चढून वरती जावे लागते. मंदिर परिसर अत्यंत निसर्ग संपन्न व शांत आहे. या ठिकाणी दत्त महाराजांनी तपश्चर्या केली होती असे सांगितले जाते.

मंदिर परिसरात रेणुका माता मंदिर,प्राचीन पायऱ्या, गुहा आणि निसर्गाचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळते. दत्त जयंतीला या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो. नांदेड पासून हे ठिकाण 130 किलोमीटर अंतरावर आहे.

visit the travel blog

1)श्री गुरु गोबिंद सिंग जी म्युझियम हे नांदेड जिल्ह्यातील ठिकाण कोणत्या धर्माच्या इतिहासाशी निगडित आहे?

श्री गुरु गोबिंद सिंग जी म्युझियम हे नांदेड जिल्ह्यातील शीख धर्माच्या इतिहासाशी निगडित आहे.

2)विष्णुपुरी प्रकल्प कोणत्या रोलर कम्पॅक्टेड काँक्रिट (RCC) तंत्रज्ञानाने बांधलेले आहे?

विष्णुपुरी प्रकल्प रोलर कम्पॅक्टेड काँक्रिट (RCC) तंत्रज्ञानाने बांधलेले आहे.

3)स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा या विद्यापीठची स्थापना कधी झाली?

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा या विद्यापीठची स्थापना 17 सप्टेंबर 1974 रोजी झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top