लातूर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे-Top 16 places visit to in Latur District

मंडळी भारत भ्रमंतीमध्ये आज आपण पाहणार आहोत लातूर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे लातूर जिल्हा हा महाराष्ट्रा राज्याच्या मराठवाडा विभागात येत असून कर्नाटकच्या सीमेवर वसलेला आहे. लातूर जिल्ह्याचे पूर्वीचे नाव “लत्तलूट” असे होते. आणि हे राष्ट्रकुट राजांचे मूळ निवासस्थान होते सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा एक भाग होते. राजा अमोघवर्ष याने हे शहर निर्माण केले. 16 ऑगस्ट 1982 ला हा जिल्हा उस्मानाबाद पासून वेगळा झाला.Top 16 places visit to in Latur District

बालाघाट डोंगर रांगानी व्यापलेला हा जिल्हा बालाघाटच्या 540 ते 638 मीटर उंचीवर आहे. 1993 मध्ये या जिल्ह्यात खूप मोठा भूकंप झाला होता. त्यामध्ये या जिल्ह्याची मोठ्या प्रमाणावर हानी झाली होती.तसेच या जिल्ह्यातून तावरजा, घारणी, मन्यार,मंजरा, तेरणा,तेरू आणि लेंडी या नद्या वाहतात. या नद्यांवर धरणे बांधण्यात आले आहेत. या जिल्ह्यात अनेक धार्मिक, ऐतिहासिक, आणि या जिल्ह्यामध्ये लेण्या तलाव आहेत. सांस्कृतिक पर्यटन स्थळे आहेत. शिक्षण क्षेत्रात”लातूर पॅटर्न” यासाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे.राजर्षी शाहू महाविद्यालय ही शिक्षण संस्था या ठिकाणी अग्रगण्य स्थानावर आहे.

आणि लातूर जिल्ह्याला मराठवाड्यातील ‘विद्येचे माहेरघर’ म्हटले जाते.या जिल्ह्यांमध्ये दहा तालुके असून या जिल्ह्याला वनक्षेत्र कमी प्रमाणात आहे. तसेच या जिल्ह्यामध्ये ऊस, ज्वारी, सोयाबीन,कापूस, तेलबिया ही पिके घेतली जातात. वनस्पती तुपाचा कारखाना या जिल्ह्यात आहे. तसेच या जिल्ह्यात 1952 पासून महात्मा गांधीच्या नावाने ‘गांधीबाबा यात्रा’ भरते.


लातूर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे-

1) उदगीरकिल्ला-

Top 16 places visit to in Latur District


Udgir Fort लातूर जिल्ह्यातील उदगीर या ठिकाणी असलेला एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण किल्ला आहे. हा किल्ला बाराव्या शतकात बांधलेला असून ऋषी उदयगिरी महाराज यांचे नाव या किल्ल्याला देण्यात आले आहे.ऋषी उदयगिरी महाराज यांची समाधी साठ फूट खोल जमिनीत या किल्ल्यामध्ये आहे.
1760 साली मराठी आणि हैदराबादचा निजाम यांच्यात युद्ध झाले आणि मराठ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. त्यावेळी “उदगीरचा तह” करण्यात आला. हा किल्ला चौरस आकारांमध्ये असून किल्ल्याच्या चारी बाजूला 40 फूट खोल खंदक आहेत. या किल्ल्यामध्ये मशिद, मंदिर, पाण्याचे टाके असून येथील भिंतींवर अरबी आणि फारसी भाषेतील शिलालेख पाहायला भेटतात. तसेच या किल्ल्यावर भालकी आणि बीदर पर्यंत जाणारा भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते. हा किल्ला लातूर पासून 65 किलोमीटर अंतरावर आहे.


2)वृंदावन पार्क, चाकूर-


Vrundavan Park हे लातूर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण लातूर-नांदेड महामार्गावर चाकूर या ठिकाणी आहे. या ठिकाणी शिवमंदिर, आणि साई नंदनवन पाहिला भेटते. आणि या ठिकाणी 120 एकरवर पसरलेल्या उद्यानामध्ये वृंदावन अ‍ॅम्युझमेंट आणि वॉटर पार्क झिपलाइन, वॉटर झॉर्बिंग, गो-कार्टिंग, एटीव्ही बाईक, बोट राइड, बंजी ट्रॅम्पोलिन, जंगल स्विंग या गोष्टी पाहायला मिळतात. लातूर पासून हे ठिकाण 35 किलोमीटर अंतरावर आहे.

3)खरोसा लेणी-


Kharosa Cave हे लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात खरोसा गावात असलेल्या प्राचीन, ऐतिहासिक व धार्मिक लेण्या आहेत. ज्या की त्या काळातील बौद्ध, जैन व हिंदू संस्कृतीचे प्रतीक आहेत. या लेण्या बौद्ध पंथाशी संबंधित असून सहा ते आठव्या शतकामध्ये असल्याचे सांगितले जाते.या लेण्यांमध्ये सुंदर कोरीव मूर्ती, खांब, नैसर्गिक चित्र आणि बुद्ध मूर्ती आहेत. तसेच या ठिकाणी नैसर्गिक शिवलिंग असून भगवान बुद्ध, शिव, पार्वती, कार्तिकेय, गणपती यांच्या मूर्ती पाहायला भेटतात. तसेच येथील परिसरातील छोट्या गुहा ध्यानासाठी वापरल्या जातात.लातूर पासून हे ठिकाण 45 किलोमीटर अंतरावर आहे.


4)औसाचा किल्ला-


Ausa Fort लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यामध्ये आहे. हा किल्ला ऐतिहासिक असून या किल्ल्याला ‘औसाचा किल्ला’ म्हणून ओळखले जाते. प्राचीन काळामध्ये हा किल्ला लष्करी आणि प्रशासनिक केंद्र म्हणून वापरला जायचा. या किल्ल्याची तटबंदी मजबूत दगडामध्ये बांधलेली आहे. किल्ल्याचे दरवाजे आणि बुरुज चांगल्या स्थितीमध्ये आहेत. तसेच किल्ल्यावर पाण्याच्या सोयीसाठी बांधलेले तलाव ही आहेत.लष्करी रणनीती आणि व्यापार यामध्ये या किल्ल्याचे मोठे योगदान आहे.

Please visit our website: allindiajourney.com

5)सिद्धेश्वर मंदिर, रत्नेश्वर मंदिर-


Siddheshwar Temple, Ratneshwar Temple हे लातूर जिल्ह्याचे ग्रामदैवत असून या मंदिराची निर्मिती बारावा शतकामध्ये
राष्ट्रकूट राजा अमोघवर्ष याने हे मंदिर बांधले. हे मंदिर लातूरच्या हत्तेनगर भागात असून ऐतिहासिक व धार्मिक स्थळ आहे.या मंदिरातील शिलालेख 700 वर्ष जुनी असून मंदिराच्या डाव्या बाजूला बाराव आहे.

हे सप्तसुंदरीच्या मूर्ती आहेत. हे मंदिर दगडामध्ये बांधलेले असून त्यामध्ये कोरीव शिल्पे कोरलेली आहेत.मंदिराच्या भिंतींवर हत्ती,घोडे, देव-देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. महाशिवरात्रीला या ठिकाणी 17 ते 20 दिवस चालणारी मोठी यात्रा भरते. दरवर्षी लातूर सह कर्नाटक, आंध्र प्रदेश मधून लाखो भाविक या मंदिराला भेट देतात.


6)जगदंबामाता मंदिर-


Jagdamba Mata Temple हे लातूर जिल्ह्यातील गंजगोलाई या ठिकाणी असलेले धार्मिक व ऐतिहासिक स्थळ आहे. हे मंदिर राष्ट्रकूट राजवटीच्या काळामध्ये बांधलेले असून तुझ्या तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिराच्या एक भाग असल्याचे सांगितले जाते. त्या ठिकाणी असलेल्या श्री जय जगदंबा नवरात्र महोत्सव मंडळाने 6 ऑक्टोबर 1989 रोजी गंजगोलाईच्या मध्यभागी गोलाकार पद्धतीने मंदिर बांधले व देवीची प्राणप्रतिष्ठा केली.

महिषासुरमर्दिनी रूपातील देवीची मूर्ती 90 सेंटीमीटर उंचीची असून देवीने आठ आयुधे धारण केली आहेत व देवीचे मुख पश्चिमेकडे आहे. नवरात्रीमध्ये या मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. हे मंदिर लातूरच्या मुख्य बाजारपेठेत असल्यामुळे बारमाही येथे भाविकांची गर्दी असते.

7)हत्तीबेट-देवर्जन


Hattibet Devrjan हे लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेले पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी प्राचीन काळातील मंदिरे, गुहा आणि कोरीवकाम केलेली शिल्प पाहायला मिळतात. या ठिकाणाला प्रादेशिक पर्यटनाचा दर्जा मिळालेला आहे. तसेच या ठिकाणी श्रीदत्त संप्रदायाचे मंदिर, आणि श्री गंगागिरी महाराज यांची समाधी आहे.

पूर्वी हे ठिकाण बंजर आणि खडकाळ होते परंतु स्थानिक लोकांच्या मदतीने या ठिकाणी वृक्षारोपण करून हे ठिकाण हरित झाले आहे.उदगीर पासून हे ठिकाण 16 किलोमीटर अंतरावर आहे. प्रत्येक पौर्णिमेच्या वेळी या ठिकाणी भजन कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.


8)सूरत शावली दर्गा लातूर –


Surat Shavli Darga लातूर जिल्ह्यातील मध्यावर असलेले प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळ आहे.हा दर्गा पटेल चौक, राम गली येथे असून 1939 मध्ये हजरत सैफ उल्ला शाह सरदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधण्यात आला. या ठिकाणी दरवर्षी होणाऱ्या वार्षिक मेळाव्यामध्ये अनेक भक्तगण सहभागी होतात. या दर्ग्याचा परिसर शांत आणि भक्तिमय वातावरणाने भरलेला असतो.

9) श्री केशव बालाजी मंदिर-


Shree Keshav Balaji Temple हे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील टेकडीवर वसलेले पवित्र तीर्थक्षेत्र आहे.हे मंदिर तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर बांधले गेलेले असून “धर्म व संस्कार नगरी” प्रकल्पाचा भाग आहे.तसेच या मंदिर परिसरात श्री वीरनाथ महाराजांचे तीनशे वर्षे जुने मंदिर,केशवानंद बापू यांची समाधी,श्री गणेश, विठ्ठल-रुक्मिणी, शिव मंदिर ही ठिकाणे पाहायला भेटतात. श्री केशव बालाजी हे विष्णू चे रूप आहे. या मंदिरातील पूजा तिरुमला येथील तिरुपती बालाजी सारखी केली जाते.औसा बस स्थानकापासून हे ठिकाण 3.5 किलोमीटर अंतरावर आहे.


10)श्री विराट हनुमान मंदिर-


Shree Virat Hanuman Temple हे लातूर जिल्ह्यातील औसा रोडवरील परिवार हाउसिंग सोसायटी मध्ये असलेले एक धार्मिक पवित्र तीर्थस्थान आहे. या ठिकाणी श्री भगवान हनुमानाची शेंदूर लावलेली 25 फूट उंच भव्य मूर्ती आहे.
हे मंदिर दोन स्तरावर बांधलेले असून खालच्या स्तरामध्ये छोटी हनुमान मूर्ती आहे तर वरच्या स्तरामध्ये भव्य हनुमानाची मूर्ती आहे.

सध्या या ठिकाणी एक कृत्रिम धबधबा तयार केलेला आहे. त्याचे पाणी तिथे असलेल्या छोट्या तलावात पडते. मंदिर परिसर हरित व शांत आहे. त्यामुळे भक्तगण या ठिकाणी ध्यानधारणा करतात.लातूर रेल्वे स्थानकापासून हे ठिकाण पाच किलोमीटर अंतरावर आहे.

11)बुद्ध गार्डन मंदिर-


Buddha Garden मंदिर हे लातूर जिल्ह्यातील कनेरी रोडवर असलेले नारायण नगर मधील हरितसृष्टीने नटलेले शांत व सुंदर उद्यान आहे. या उद्यानाच्या मध्यभागी भगवान बुद्धांची भव्य मूर्ती आहे. येथील निसर्गरम्य आणि शांत वातावरण ध्यानधारणेसाठी उपयुक्त समजले जाते. या ठिकाणाला भेट देण्यासाठी बरेच पर्यटक या ठिकाणी येत असतात.


12) वडवळ नागनाथ बेट –


Vadval Nagnath Plants हे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील एक प्रसिद्ध गाव आहे. या गावाच्या मध्यभागी नागनाथाचे मंदिर असल्यामुळे या गावाचे नाव वडवळ नागनाथ असे पडले आहे.या बेटाला संजीवन बेट म्हणूनही ओळखले जाते. कारण या ठिकाणी 177 पेक्षा जास्त प्रकारच्या दुर्मिळ औषधी वनस्पती सापडले आहेत.

वेगवेगळ्या आजारांवर या वनस्पतींचा औषधासाठी उपयोग केला जातो. यामध्ये बेल, पळस, पुनर्नवा,तुळस, रुई, बहावा, बेल, पळस आणि यापेक्षाही अनेक प्रकारच्या वनस्पती या ठिकाणी आढळून आले आहेत. तसेच वडवळ नागनाथ हे गाव टोमॅटो शेतीसाठी देखील प्रसिद्ध आहे. लातूर शहरापासून हे ठिकाण 39 किलोमीटर अंतरावर आहे.

13) नाना नानी पार्क –


Nana Nani Park हे लातूर जिल्ह्यातील लातूर महानगरपालिकेजवळ असलेले प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि पार्क आहे. या ठिकाणाला विलासराव देशमुख पार्क म्हणूनही ओळखले जाते. हे पार्क शांत आणि सुखद वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. या पार्कमध्ये वॉकिंग ट्रॅक, सामुदायिक बैठकांची जागा आणि मुक्त रंगमंच,सामुदायिक कार्यक्रमांसाठी जागा, आणि मुक्त रंगमंच उपलब्ध करून दिलेले आहेत. तसेच या पार्कमध्ये एक जलसंधारण तलाव असून पार्क शेजारी एक शिवमंदिर आहे.


14) अष्टविनायक मंदिर –


Ashtavinayak Temple हे लातूर जिल्ह्यातील शिवाजीनगर भागात असलेले एक ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन स्थळ आहे. या मंदिराची संरचना दक्षिण भारतातील स्थापत्यशैलीमध्ये केलेले असून मंदिराची स्थापना 1989 मध्ये केली आहे. या मंदिरामध्ये सभा मंडपात श्री गणेशाची चार फूट उंच मूर्ती असून मंदिरातील गाभाऱ्याच्या भिंतीवर श्री गणेशाच्या आठ रूपातील मूर्ती म्हणजेच अष्टविनायक मूर्ती स्थापित केल्या आहेत.

तसेच या मंदिरासमोरील बागेमध्ये शिव शंकराची आठ ते दहा फूट उंचीची मूर्ती आहे. आणि मंदिरात शेषनाग, देवी सरस्वती,नवग्रह, मारुती, विठ्ठल यांच्या ही मूर्ती स्थापित केले आहेत. मंदिर परिसरात सुंदर बागा आणि कृत्रिम कारंजा तयार केली आहेत.

15)नामानंद महाराज आश्रम-


Namand Maharaj Ashram लातूर जिल्ह्यातील महापूर गावांमध्ये निसर्गरम्य आणि शांत वातावरणात अंबाजोगाई रस्त्या ठिकाणी आहे. हे एक आध्यात्मिक साधना केंद्र असून संत नामानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी भजन, सत्संग, कीर्तन,
ध्यान,व योग अशा प्रकारचे उपक्रम दररोज राबविण्यात येतात.या आश्रम पासून मांजरा नदी वाहत असल्यामुळे येथील परिसरातील वातावरण निसर्गरम्य असून धानधारण्यासाठी शांतता प्रिय आहे. या ठिकाणी गुरुपौर्णिमा आणि इतर अध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पाडले जातात. लातूर शहरापासून हे ठिकाण आठ किलोमीटर अंतरावर आहे.

16)मसलगा धरण –


Maslaga Dam हे लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यामध्ये असलेले मातीचे धरण आहे. शेतीच्या सिंचनासाठी हे धरण 1996 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या मदतीने बांधण्यात आले. या धरणाची उंची 10.26 मीटर असून लांबी 2023 मीटर एवढी आहे. यादेर धरणामुळे लातूर जिल्ह्यातील शेतीचे क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.

1)नामानंद महाराज आश्रम लातूर जिल्ह्यातील कोणत्या गावांमध्ये आहे?

नामानंद महाराज आश्रम लातूर जिल्ह्यातील महापूर गावांमध्ये आहे .

2)खरोसा लेणी हे लातूर जिल्ह्यातील कोणत्या गावामध्ये आहेत?

खरोसा लेणी हे लातूर जिल्ह्यातील खरोसा गावामध्ये आहेत.

3)जगदंबामाता मंदिर हे लातूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे?

जगदंबामाता मंदिर हे लातूर जिल्ह्यातील गंजगोलाई या ठिकाणी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top