गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे-Top 15 Places Visit to in Gondia District

मंडळी भारत भ्रमंतीमध्ये आज आपण पाहणार आहोत गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-
गोंदिया जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर पूर्वेला आहे. भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. या जिल्ह्याला छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या जिल्ह्यांच्या सीमा आहेत. हा जिल्हा विकासाच्या दृष्टीने मागासलेला आहे. कारण येथील बराचसा भाग हा जंगलाने व्यापलेला आहे. Top 15 Places Visit to in Gondia District

येथील शेतीमध्ये भात,ज्वारी,अळशी, गहू आणि तूर ही प्रामुख्याने पिके घेतली जातात. येथील बहुतांश भाग हा शेतीवरच अवलंबून आहे. आर्थिकदृष्टा हा जिल्हा मागासलेला असल्यामुळे येथे कोणतेही मोठे उद्योगधंदे नाहीत. उद्या जिल्ह्यामध्ये प्रमुख पीक भात असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राईस मिल्स आहेत. त्यामुळे या जिल्ह्याला ‘राईस सिटी’ म्हणून ओळखले जाते. तसेच या ठिकाणी तंबाखूचे काही छोटे उद्योगधंदे आहेत.या जिल्ह्यामध्ये आठ तालुके असून आठ पंचायत समिती आहेत.

वैनगंगा ही गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठी व महत्त्वाची नदी आहे. याशिवाय बाग, चुलबंद, गढवी व बावनथडी या नद्या वैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. गोंदिया जिल्हा मोरगांव तिरोडा,अर्जुनी, गोंदिया, आणि देवरी या चार उपविभागामध्ये विभागलेला आहे.
या जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक,धार्मिक अनेक पर्यटन स्थळे आहेत. या जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. येथील आदिवासी लोक त्यांच्या पारंपारिक व सांस्कृतिक परंपरा, नृत्यकला यांचे जतन करून आहेत. “पेरसा पेन” हे आदिवासी लोकांचे मुख्य आराध्य दैवत आहे.

Top 15 Places Visit to in Gondia District

गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे-


1) नागझिरा अभयारण्य-

Top 15 Places Visit to in Gondia District


Nagzira Wildlife Senctuary हिंगोली जिल्ह्यातील महत्वाचे अभयारण्य आहे. पूर्वी येथील जंगलात खूप हत्ती होते त्यामुळे त्यामुळे या अभयारण्याला नागझिरा हे नाव पडले. हे अभयारण्य 152.81 चौरस किलोमीटर अंतरावर पसरलेले आहे. हे अभयारण्य नैसर्गिक असून यामध्ये विद्युत पुरवठा केलेला नाही. येथील जंगलामध्ये वाघ,बिबळा, चितळ, सांबर, काकर रानकुत्रा, लांडगा, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, चौशिंगा, नीलगाय,गरुड, रानमांजर, ऊदमांजर, उडणखार, मत्स्य गरुड, टकाचोर, खाटीक, राखी धनेश, नवरंग, कोतवाल असे अनेक प्रकारचे प्राणी व पक्षी आढळून येतात.

नागझिरा अभयारण्य पासून तीस किलोमीटर अंतरावर नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे. वनसृष्टीने आणि निसर्गाने बहरलेल्या या अभयारण्याला 3 जून 1970 ‘नागझिरा वन्यजीव अभयारण्य’ म्हणून घोषित करण्यात आले. या अभयारण्यामध्ये पट्टेरी वाघांचे जास्त प्रमाण आहे. येथे असणारा नागझिरा तलाव खूप महत्त्वाचा आहे.


2)कचारगढ-


Kachargadh हे गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी 25000 वर्षांपूर्वीच्या प्राचीन गुहा आहेत. या ठिकाणी आदिवासी लोकांचे वास्तव्य असून त्यांचे संस्कृती आणि धार्मिकताआपल्याला पाहायला मिळते. दरवर्षी या ठिकाणी कोयापुनेम यात्रा असते त्यावेळी देशभरातून अनेक पर्यटक या ठिकाणी येतात. हे ठिकाण घनदाट जंगलांनी व्यापलेले असल्यामुळे या ठिकाणी वनौषधी आणि वन्यजीव पाहायला भेटतात. या भागात काही ठिकाणी पठार आणि खडक असल्यामुळे ट्रेकिंग प्रेमी साठी हे एक उत्तम ठिकाण आहे. गोंदिया शहरापासून हे ठिकाण 55 किलोमीटर अंतरावर आहे.

3)हाजरा धबधबा-


Hajara Waterfall हा गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात मध्ये निसर्गरम्य आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. धबधब्याच्या बाजूला हिरवाईने नटलेला परिसर आणि डोंगर आहेत. या ठिकाणी महाराष्ट्रातून शिबिर आणि ट्रेकिंग प्रेमी मोठ्या प्रमाणात भेट देतात.हे ठिकाण दरेकसा रेलवे स्टेशन पासून 1 कि.मी. अंतरावर आहे.


4)पांगडी गड-


Pangadi Gadhहे गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे. या किल्ल्याच्या परिसरात पांगडी तलाव व 1917 मध्ये बांधलेले पांगडी धरण आहे. येथील किल्ल्याच्या शिखरावर एक शिवमंदिर व देवीचे मंदिर आहे. तसेच येथील किल्ल्याच्या परिसरात पांगोली नदी आणि पांगडी तलाव असल्यामुळे पर्यटकांना जलक्रीडेचा अनुभव घेता येतो. ट्रेकिंग प्रेमी साठी हे एक उत्तम ठिकाण आहे. येथील निसर्गरम्य परिसर आणि शांतता पर्यटकांना आकर्षित करते. गोंदिया शहरापासून हा किल्ला 11 किलोमीटर अंतरावर आहे.

Please visit our website: allindiajourney.com

5)चुलबंध धरण-


Chulbandh Dam हे गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात चुलबंध नदीवर बांधलेले प्रमुख धरण आहे.चुलबंध नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे. या धरणातील पाणी गोंदिया आणि आसपासच्या परिसरातील शेतीच्या सिंचनासाठी वापरले जाते. या धरणाला दुर्गाबाई डोह या नावाने देखील ओळखले जाते. पर्यटक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणाला भेट देतात गोंदिया शहरापासून हे धरण 25 किलोमीटर अंतरावर आहे.


6) पदमपुर-


Padampur हे गोंदिया जिल्ह्यातील अमगाव तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पदमपुर हे प्रसिद्ध संस्कृत लेखक भवभूती यांच्या जन्मस्थान आहे. त्यांनी उत्तर रामचरित, मालती माधवा, महावीर चरीत्र लिहिले आहे. पदमपुरा गावात अनेक प्राचीन मूर्ती आढळून आल्या आहेत. गोंदिया शहरापासून हे ठिकाण 28 किलोमीटर अंतरावर आहे.

7) नागरा शिवमंदिर-

Nagra Shiv Temple हे गोंदिया जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. नागरा गावामध्ये पंधराव्या शतकात हेमाडपंथी शैलीत बांधलेले हे शिव मंदिर आहे. या मंदिराला नागराज शिवमंदिर म्हणून ही ओळखले जाते. या ठिकाणी दररोज भाविक मोठ्या प्रमाणात येतात.गोंदिया शहरापासून हे मंदिर पाच किलोमीटर अंतरावर आहे.


8) प्रतापगड-


Pratapgadh हे ठिकाण गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात असलेले प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी भगवान शंकराची तीस फूट उंचीची मूर्ती बसवण्यात आली आहे. प्रतापगड हे ठिकाण घनदाट जंगलात असल्यामुळे निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंग प्रेमी या ठिकाणी भरपूर प्रमाणात येत असतात. या ठिकाणी असलेले छोटे मोठे धबधबे हिरवेगार वनराई पर्यटकांना आकर्षित करते. प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. गोंदिया शहरापासून हे ठिकाण 86 किलोमीटर अंतरावर आहे.

9)इटियाडोह धरण-


Itiadoh Dam हे गोंदिया जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये बांधलेले आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता 81.587 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. धरणाचे पाणी सिंचनासाठी आणि पिण्यासाठी वापरले जाते. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याला या धरणातील पाण्याचा उपयोग होतो. येथील धरण परिसर निसर्ग संपन्न आहे. बरेच पर्यटक या ठिकाणी धरण पाहण्यासाठी येत असतात.


10) सूर्यदेव मांडव देवी मंदिर-


Suryadev Mandvdevi Temple गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यामध्ये आहे. हे मंदिर एका टेकडीवर असून या ठिकाणी सूर्यदेव, देवी मांडोबाई आणि भगवान शंकराचे मंदिर आहे. या मंदिरा भोवतालचा परिसर अत्यंत निसर्गसंपन्न आहे. हे मंदिर जागृत देवस्थान असून या ठिकाणी मकर संक्राती, चैत्र नवरात्रि आणि महाशिवरात्रीला यात्रा भरते. हे मंदिर काळा पाषाणात बांधलेले असून सकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत आपण या मंदिरात भेट देऊ शकता.गोंदिया शहरापासून हे ठिकाण 37 किलोमीटर अंतरावर आहे.

11) नवेगाव राष्ट्रीय उद्यान-


Navegaon National Park गोंदिया जिल्ह्यातील 18 व्या शतकापासून अस्तित्वात असलेले निसर्गरम्य आणि वन्यजीव समृद्धीने बहरलेले अभयारण्य आहे. हे अभयारण्य 134 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे.गोंदिया जिल्ह्याचे हे अभयारण्य नंदनवन म्हणून ओळखले जाते. या अभयारण्यात अनेक प्रकारची जैवविविधता,हिरवेगार गर्द जंगल, निरव शांतता, वन्यजीव प्राणी आणि पक्षांच्या अनेक प्रजाती आढळून येतात. या अभयारण्यात वाघ, बिबट्या, आळशी अस्वल, कोल्हे, रानडुक्कर,मोर, राखाडी डोक्याचे मासे असलेले गरुड आणि 200 पेक्षा अधिक पक्ष्यांच्या जाती आढळून आले आहेत. तसेच या ठिकाणी साप, मगरी, अजगर यासारखे सरपटणारे प्राणी दिसून येतात. हे ठिकाण जिल्ह्याच्या दक्षिणेला 65 किलोमीटर अंतरावर आहे.

12) धम्मगिरी-


Dhammagiri गोंदिया जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात डोंगराळ भागात आहे. या ठिकाणी बुध्दाची शंभर फूट उंचीची मूर्ती असून मकर संक्राती दिवशी या ठिकाणी बौद्ध धम्म मेळावा असतो. अमगाव पासून हे ठिकाण दोन किलोमीटर अंतरावर आहे.


13) डाकराम सुकळी –


Dakaram Sukli हे गोंदिया जिल्ह्यातील तिरोरा तालुक्या मध्ये येणारे ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर चक्रधर स्वामींचे असून मंदिर परिसरामध्ये बोदलकसा धरण आणि टेकड्या आहेत. येथील परिसर हा अत्यंत निसर्गरम्य असून रमणीय आहे. चैत्र पौर्णिमेला या ठिकाणी महानुभव पंथाची पाच दिवसाची यात्रा असते. या मंदिरात तीन पवित्र स्थाने आहेत. ज्यामध्ये ‘निद्रा स्थान’ आणि ‘सिंहनाद करणे स्थान’ यांचा समावेश आहे. त्या ठिकाणाला पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देतात.

14)बोधलकसा धरण-

Bhodalkasa Dam हे गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यामध्ये येणारे डाकराम सुकळी मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर आहे. हे धरण भागदेवगोती नदीवर
बांधले असून या धरणाची उंची19.2 तर लांबी 510 मीटर एवढी आहे. विदर्भातील हे धरण 100 वर्षाहून अधिक जुने असून शेती शेतीच्या सिंचनासाठी महत्त्वाचे आहे. या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे विश्राम गृहे आहेत. धरण परिसर नैसर्गिक आणि शांत असल्यामुळे या ठिकाणी शाळेच्या सहली आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. गोंदिया शहरापासून हे ठिकाण 30 किलोमीटर अंतरावर आहे.

15 तिबेटियन कॅम्प-


Tibetian Camp हे गोंदिया जिल्ह्यातील गोठांगाव या ठिकाणी नॉरगेयलिंग तिबेटियन सेटलमेंट ही महाराष्ट्रातील एकमेव तिबेटियन निर्वासीत वसाहत आहे.
1972 मध्ये या वसाहतीची स्थापना करण्यात आली. यामध्ये 100 कुटुंबे राहत असून 400 ते 500 लोकांचा समुदाय आहे. या वसाहतीमध्ये एक बौद्ध मठ आहे. येथील तिबेटियन स्कूल मधून तिबेटीयन भाषा शिकवली जाते. दलाई लामा यांनी 2014 मध्ये या वसाहतीला भेट दिली होती. या ठिकाणी तिबेटियन बौद्ध धर्म,संस्कृती आणि कला याची माहिती मिळते.

1)नवेगाव राष्ट्रीय उद्यान नागझिरा अभयारण्य पासून किलोमीटर अंतरावर किती आहे?

नवेगाव राष्ट्रीय उद्यान नागझिरा अभयारण्य पासून तीस किलोमीटर अंतरावरआहे.

2)डाकराम सुकळीमध्ये कोणते धार्मिक स्थळ आहे?

डाकराम सुकळीमध्ये चक्रधर स्वामींचे धार्मिक स्थळ आहे.

3)बोधलकसा धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?

बोधलकसा धरण भागदेवगोती नदीवर बांधले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top