संभाजीनगरमधील(औरंगाबाद) भेट देण्याची महत्त्वाची प्रमुख ठिकाणे: Top 14 places visit to in Sambhajinagar

छत्रपती संभाजी नगर( औरंगाबाद) हा जिल्हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातील मोठे शहर आहे. जिल्ह्यामध्ये नऊ तालुके असून महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांपैकी पाचव्या क्रमांकाचे हे शहर आहे. या जिल्ह्याला कलात्मक रेशीम उत्पादक आणि कापूस उत्पादक केंद्र समजले जाते.Top 14 places visit to in Sambhajinagar

येथील अजिंठा आणि वेरूळ लेण्या 1983 मध्ये युनोस्कोच्या जागतिक वारसा स्थळ मध्ये नोंद केले आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने हा जिल्हा खूप समृद्धशाली आहे. पूर्वी या शहरात महत्वाचे 52 दरवाजे होते म्हणून संभाजीनगर शहराला ‘दरवाजाचे शहर’ असेही संबोधले जाते. तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. हे शहर खाम नदीच्या तीरावर वसलेले असून पूर्वी मलिक अंबरने या शहराचे फतेहपुर असे नामकरण केले होते. या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Top 14 places visit to in Sambhajinagar

संभाजीनगरमधील(औरंगाबाद) भेट देण्याची महत्त्वाची प्रमुख ठिकाणे:

1)जायकवाडी धरण-

Top 14 places visit to in Sambhajinagar


Jayakvadi dam हे संभाजीनगर मधील गोदावरी नदीवर बांधले आहे. संभाजीनगर मधील हे प्रमुख धरण असून संभाजीनगरच्या विकासामध्ये या धरणाचा खूप मोठा वाटा आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे हे मातीचे धरण आहे. पैठण येथे असलेल्या या धरणाला नाथ सागर असेही म्हणतात. या धरणामुळे मराठवाड्यातील 2.40 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलेले आहे. या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 102 टी एम सी इतकी आहे. या धरणामुळे जवळजवळ 400 गावांची पाण्याची तहान भागवली जाते.

2) पीतळखोरा लेणी-


औरंगाबाद शहरात कन्नड जवळ चांदोरा टेकडीवर Pitalkhora Cave या 14 लेण्यांचा समूह आहे. भारतातील या सर्वात जुन्या लेण्या असून यातील काही लेण्या दुमजली आहेत. औरंगाबाद मधून येथे जाण्यासाठी बसची सोयही करण्यात आली आहे.

3) गौताळा अभयारण्य-


Goutala Sanctuary हे औरंगाबाद मधील मराठवाड्यातील सर्वात मोठे अभयारण्य आहे. औरंगबाद मधील चाळीसगाव पासून काही अंतरावरच हे अभयारण्य आहे. या अभयारण्यात बुलबुल, मोर,पोपट, सुगरण आणि इतर विविध प्रकारचे पक्षी पाहावयास भेटतात. तसेच सर्व प्रकारचे जंगली प्राणी या अभयारण्यात आढळून येतात. पूर्वी या ठिकाणी गवळी लोकं आपल्या गाई चारत असत त्यामुळे या अभयारानाला गवताळा असे नाव पडले असावे.

4- म्हैसमाळ


वेरूळ खुलताबाद या थंड हवेच्या ठिकाणी असलेले Mhaismal हे संभाजीनगर शहरापासून खूप जवळ आहे. पावसाळ्यात येथील विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. सह्याद्री पर्वत रांगांमध्ये 1067 उंचीवर वसलेले म्हैसमाळ हे महाराष्ट्रातील एक हिल स्टेशन आहे. तसेच या ठिकाणी एक वनस्पती कार्यशाळा देखील आहे. च्या मध्ये वेगवेगळ्या वनस्पतींचा प्रदर्शन आपल्याला पाहायला भेटते. निसर्गाने समृद्ध असलेल्या या ठिकाणी एकदा अवश्य भेट द्या.

5) सोनेरी महल-


संभाजीनगर मधील Soneri mahal ही ऐतिहासिक वास्तु
सातमाळा पर्वत रांगाच्या पायथ्याशी आहे. या महालाच्या मागे लहान लहान पर्वतरांगा आहेत. त्यामुळे या महलाचे दृश्य एखाद्या चित्राप्रमाणे भासते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या सोनेरी महला पासून जवळच आहे. तसेच महालाच्या परिसरात असलेली विविध प्रकारचे झाडे, गवताळ भाग, बहरलेली शेती महालाच्या सौंदर्यात भर टाकतात. तुझ्या महालाच्या तळमजल्यावरील दरबार महालात असलेली चित्रे खऱ्या सोन्याच्या पाण्याने रंगवलेली आहेत. म्हणून या महालाला सोनेरी महाल असे म्हणतात.


6)डॉ.सलीम अली सरोवर-


Dr. Salim Ali lake म्हणजे संभाजीनगर शहराला लाभलेली निसर्गाचे अद्भुत देणगीच आहे. अत्यंत हिरवाईने नटलेले हे सरोवर शहराच्या मध्यभागी असून
महाराष्ट्रातील ते एकमेव सरोवर आहे. हिवाळ्यामध्ये परदेशी पक्षी मोठ्या प्रमाणात या सरोवारावर येतात. तसेच येथे जवळच पक्षी निरीक्षण केंद्र असून पक्षी तज्ञ असलेले डॉ.सलीम अली यांचे नाव या सरोवराला देण्यात आले आहे. या सरोवराच्या आजूबाजूचा परिसर जैवविविधतेने परिपूर्ण आहे. या परिसरामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती,पक्षी,प्राणी आढळून येतात.

7) बीबी का मकबरा-


Bibi ka Makbara हा मुघल सम्राट औरंगजेब याचा मुलगा अजम शहा यांनी त्याच्या आईच्या स्मरणार्थ बांधला आहे. औरंगजेबाची पत्नी रबिया दुरानी हीची समाधी येथे आहे. ही वास्तु ताजमहालचे अनुकरण असल्याने मराठवाड्यातील या मकबऱ्याला येथील लोक सन्मानाने ताजमहल म्हणतात. बीबी का मकबरा हे संभाजीनगर मधील ऐतिहासिक स्मारक आहे. हा मकबरा खाम नदीजवळ बांधलेला असून औरंगाबाद शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. देश विदेशातून येथे पर्यटक भेट देत असतात.

8 सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालय –


संभाजीनगर मधील Siddharth Animal museum या उद्यानाची निर्मिती 1985 मध्ये करण्यात आली. हे उद्यान मराठवाड्यातील एकमेव प्राणी संग्रहालय असून ते शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाजवळ आहे.200 पेक्षा जास्त प्रकारचे प्राणी आणि पक्षी या संग्रहालयात आहेत. या प्राणी संग्रहालयात गौतम बुद्धांचा भव्य पुतळा बसवलेला असून बुद्धांच्या नावावरून ‘सिद्धार्थ’ असे या संग्रहालयाला नाव देण्यात आले आहे. आठवड्यातील हे प्रेक्षणीय स्थळ असून वर्षी येथे लाखो पर्यटक भेट देत असतात आणि विद्यार्थ्यांच्या सहली येथे येतात.

9) छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम-


संभाजीनगर महानगरपालिकेने निर्माण केलेल्या छत्रपती Shivaji Maharaj Museum संग्रहालय नेहरू बाल उद्यानाजवळ आहे. पूर्वीच्या काळातील मराठा शासकांची युद्धशस्त्रे, पुरातन वस्तू, 400 वर्षांपूर्वीची जुनी पैठणी साडी तसेच पाचशे वर्ष जुना पोशाख या संग्रहालयात पहावयास भेटते. हे संग्रहालय आठवड्याचे सातही दिवस सकाळी 10:30ते संध्याकाळी6 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असते. औरंगाबाद स्टेशन पासून काही अंतरावर हे संग्रहालय आहे.

10) अजंठा लेणी-


संभाजीनगर मधील Ajintha cave अजिंठा येथे असलेल्या 30 बौद्ध लेण्या असून ह्या लेण्या बौद्ध धर्माच्या हीनयान व महायान पंथांना समर्पित आहेत. येथील प्रत्येक लेण्यांमध्ये असलेले विलक्षण कोरीव काम,उत्कृष्ट स्थापत्य शैली पाहण्यासारखे आहे. या लेण्या आठवडातील सोमवार सोडून प्रत्येक दिवशी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खुले असतात युनोस्कोने 1983 मध्ये अजिंठा लेण्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. या लेण्यांमध्ये भीत्तीचित्रे व गुंतागुंतीचे कोरीव काम आहे.

11) वेरूळ लेण्या-


Verul cave हया दोन किलोमीटर पेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेल्या आहेत. चरणंद्री टेकड्यांवर हा 34 लेण्यांचा समूह आहे. युनोसकोने या लेण्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा दिला आहे. या बहुधर्मीय लेण्या वेरूळ लेण्या म्हणून ओळखल्या जातात. येथील लेण्यांमधील कोरीव काम अपवादात्मक चित्रे विविध प्रकारचे शिल्पे आणि हस्तकला पाहणाऱ्याला आश्चर्यचकित करतात. या लेण्या हिंदू बौद्ध आणि जैन धर्माशी संबंधित आहेत.

please visit our website:Allindiajourney.com

12) घृष्णेश्वर मंदिर-


बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले Ghrushneshwar Temple हे मंदिर संभाजीनगर मधील वेरूळ या गावात आहे भगवान शिवाला हे मंदिर समर्पित असून वेरूळ लेण्यापासून एक किलोमीटर पेक्षा कमी अंतरावर हे मंदिर आहे. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांनी सोळाव्या शतकामध्ये या मंदिराची पुनर्बांधणी केली होती. तसेच अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिर परिसरात गर्भगृह आणि सभा मंडप आहे

13) दौलताबाद किल्ला-

यादव राजा भिल्ल यांनी 1187 मध्ये Doulatabad Fort हा किल्ला बांधला. त्यानंतर विविध राजवटीमध्ये या किल्ल्याचा जीर्णोद्धार व पुनर्बांधणी करण्यात आली. दौलताबाद मधील टेकडीवर असलेल्या या किल्ल्याला देवगिरी म्हणून देखील ओळखले जाते. या किल्ल्याचा आकार शंकू सारखा आहे. या किल्ल्यामध्ये भारत माता मंदिर, चांद मिनार, रंग महाल, चिनी महाल, सरस्वती बावडी अशा वास्तू आहेत. या किल्ल्याचे संरक्षण व्यवस्था अत्यंत अत्यंत मजबूत असल्यामुळे इथे कोणालाही प्रवेश करणे अशक्य होते

14) हिमायत बाग-


Himayat Garden ही 400 एकर क्षेत्रावर पसरलेली असून सतराव्या शतकात औरंगजेबाने ही बाग बांधली होती. या ठिकाणी दुर्मिळ अशा वनस्पती झाडे विविध फुले आणि पक्षांनी बहरलेले असते. हे उद्यान खूप वेगळ्या पद्धतीने सजवले आहे. येथील बारादरी हे ठिकाण इवाज खानने बांधले असून ते प्रेक्षणीय आहे. येथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात.

1)संभाजीनगरमधील हिमायत बाग किती एकरवर पसरली आहे?

संभाजीनगरमधील हिमायत बाग 400 एकरवर पसरली आहे.

2)बीबी का मकबरा कोणी बांधला ?

बीबी का मकबरा औरंगजेबाचा मुलगा आजम शहाणे आईच्या स्मरणार्थ बांधला.

3)जायकवाडी धारण कोणत्या नदीवर आहे ?

जायकवाडी धारण गोदावरी नदीवर आहे ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top