गडचिरोली जिल्हा माहिती
26 ऑगस्ट 1982 साली चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा नक्षलग्रस्त के जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ प्रदेशात गडचिरोली जिल्हा येतो. या जिल्ह्यावर गोंड राजांचे राज्य होते.हा जिल्हा वैनगंगा नदीच्या काठावर वसलेला असून या ठिकाणी माओवाद्यांचा येथील लोकांना खूप त्रास होतो. हा जिल्हा निसर्ग समृद्धीने बहरलेला आहे.Top 14 Places visit to in Gadchiroli District
या जिल्ह्यातील शिरोंच्या गावापासून गोदावरी नदी वाहते. आर्थिक दृष्ट्या हा जिल्हा मागासलेला असला तरी येथे घनदाट जंगले व डोंगराळ भाग जास्त प्रमाणात आहे. या जिल्ह्यात विविध प्रकारच्या आदिवासी जमाती मोठ्या प्रमाणात आहेत.येथील जंगलांमध्ये बांबू आणि तेंदूच्या पानांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळते. गडचिरोली जिल्हा हा निसर्गप्रेमी आणि इतिहास प्रेमींसाठी एक समृद्ध जिल्हा आहे. या ठिकाणचे जीवनशैली आणि निसर्ग अनोखा आहे.
येथील प्रमुख पीक हे भात शेती आहे. या जिल्ह्यामध्ये बारा तालुके आहेत. या जिल्ह्याला तेलंगणा,छत्तीसगड, गोंदिया,भंडारा,चंद्रपूर या जिल्ह्यांच्या सीमारेषा लागलेल्या आहेत. तसेच या जिल्ह्यातून अनेक छोट्या मोठ्या नद्या वाहतात. लोखंड, तांबे, चुनखडी ही खनिजे या जिल्ह्यामधून मिळतात. या जिल्ह्यामध्ये अनेक मोठमोठी धरणे आहेत. तसेच या जिल्ह्यांमध्ये सिरोंचा तालुक्यातील प्राणहिता नदीवर दर बारा वर्षांनी पुष्कर कुंभमेळा भरतो.
या जिल्ह्यात चपराळा हे मुख्य अभयारण्य आहे. महाराष्ट्रातील या एकमेव जिल्ह्याचा 76 % भाग हा जंगलाने वेढलेला आहे. तसेच डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांचा धानोरा तालुक्यातील चातगाव या ठिकाणी “सर्च प्रकल्प’ आहे. यामध्ये आष्टी या ठिकाणी पेपर मिलचा कारखाना आहे. औद्योगिक दृष्ट्या हा जिल्हा मागासलेला आहे.
Top 12 Places visit to in Gadchiroli District
गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे-
1)चपराळा वन्यजीव अभयारण्य-

Chaprala Wildlife Sanctuary हे गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात असणारे महत्त्वाचे वन्यजीव अभयारण्य आहे. हे अभयारण्य वैनगंगा आणि वर्धा नदीच्या संगमाजवळ असून या ठिकाणी विविध प्रकारचे वन्यजीव, पक्षी आणि वनस्पती आढळून येतात. या अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ हे 1101.77 चौरस किलोमीटर एवढे आहे.
हे अभयारण्य उष्णकटिबंधीय असल्यामुळे या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात पान गळती होते. येथील जंगलांमध्ये मोह,साग आणि विविध प्रकारच्या वनस्पती आढळून येतात. तसेच या अभयारण्यात हिरण, सांबर,वाघ, बिबट्या, जंगली मांजर, अस्वल इ. वन्यजीव प्राणी आढळून येतात. प्रियटकांसाठी या अभयारण्यात अनेक सोयी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत.
2)मुतनूर हिल स्टेशन-

Mutnur Hill Station हे गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात असलेले पर्यटन स्थळ आहे. ठिकाणी निसर्ग सौंदर्याने बहरलेले आहे. या ठिकाणी गणेश, हनुमान दुर्गा, शंकर पार्वती यांच्या मूर्ती आहेत त्यामुळे हे एक धार्मिक स्थळ देखील आहे.मुतनूर हिल या ठिकाणी एक उंच टेकडी आहे. येथून आपल्याला निसर्ग सौंदर्याचा पुरेपूर आनंद घेता येतो.चामोर्शी तालुक्यापासून हे ठिकाण 45 किलोमीटर अंतरावर आहे.
3) प्रशांत धाम मंदिर-

Prashant Dham Temple हे गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी प्रमाणहिता नदीच्या काठावर कार्तिक स्वामींचे मंदिर आहे. 1935 च्या सुमारास हे मंदिर बांधण्यात आले. महा शिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. मंदिरापासून जवळच वर्धा आणि पैनगंगा नदीचा संगम आहे.पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात भेट देतात.
4) दिना सिंचन प्रकल्प-

Dina Irrigation project हा गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील रेगडी गावामध्ये आहे. गडचिरोली जिल्ह्यातील हा सर्वात मोठा प्रकल्प आहे.या धरणातील पाणी रेगडी गावातील शेतीसाठी वापरले जाते. पर्यटक या ठिकाणाला आवर्जून भेट देतात. गडचिरोली पासून हे ठिकाण 70 किलोमीटर अंतरावर आहे.
Please Visit ourwebsite: Allindiajourney.com
5) कमलापूर हत्ती कॅम्प-

Kamlapur Elephant Camp हे महाराष्ट्रातील एकमेव गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील शासकीय हत्ती कॅम्प आहे. या ठिकाणी आठ हत्ती आहेत. येथील हत्तींना पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात.
6) बिनागुंडा धबधबा-

Binagunda Waterfall हा गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यामध्ये आहे. हा धबधबा शांत व सुंदर म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी अनेक आदिवासी जमाती वास्तव्यास आहेत. गडचिरोली पासून हे ठिकाण 40 किलोमीटर अंतरावर आहे.
7) वनवैभव अल्लापल्ली-

Glory of Alapalli हे गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. या ठिकानाचे क्षेत्रफळ सहा हेक्टर मध्ये आहे. वनविभागाच्या कंपार्टमेंट नं. 76 मध्ये वसलेले हे कायमस्वरूपी संरक्षण प्लॉट आहे. 1953 मध्ये या ठिकाणाची स्थापना करण्यात आली. या ठिकाणी विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आढळून येतात. अल्लापल्ली पासून हे ठिकाण 16 किलोमीटर अंतरावर आहे.
8) लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा-

Lok Biradari prakalp Hemalkasa हा प्रकल्प सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे त्यांनी 23 डिसेंबर 1973 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यामधील हेमलकसा या गावामध्ये चालू केला. येथील गौंड आणि इतर आदिवासी जमातीच्या विकासासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला.
या प्रकल्पामध्ये दवाखाना,आश्रम शाळा तसेच प्राण्यांसाठी अनाथालय चालवले जाते. बाबा आमटे व त्यांच्या मुलगा डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांनी अनंत अडचणींवर मात करत हा प्रकल्प पंचवीस वर्षे अविरत चालू ठेवला आहे. गडचिरोली पासून हा प्रकल्प 175 किलोमीटर अंतरावर आहे.
9) वैरागड किल्ला-

Vairagad Fort हा गडचिरोली जिल्ह्यातील आरमारा तालुक्यातील सतनाळा आणि खोब्रागडी या नद्याच्या संगमावर आहे. या किल्ल्याचे क्षेत्र दहा एकर मध्ये पसरलेले आहे. तसेच किल्ल्यामध्ये अनेक विहिरी आहेत.या ठिकाणी हिऱ्यांच्या खानी होत्या असे स्थानिक लोकांकडून सांगितले जाते. राज्यातून अनेक पर्यटक या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात.
10) मार्कंडा देव मंदिर-

Markanda dev Temple हे गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीच्या काठावर असलेले धार्मिक स्थळ आहे. हे हेमाडपंती शैलीतील मंदिर शीवाला समर्पित असून विदर्भातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिर परिसरात राष्ट्रकूट राजघराण्याने बांधलेली अनेक प्राचीन मंदिरे आहेत. महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. या मंदिरातील शिल्पकला पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून भेट देतात.गडचिरोली पासून हे मंदिर 42 किलोमीटर अंतरावर आहे.
11) वडदम जीवाश्म पार्क-

Wadadham Fossil park हे गडचिरोली जिल्ह्यातील सीरोंच्या तालुक्यामध्ये वडादम गावाजवळ असरअल्ली मार्गावर आहे. या ठिकाणी पुरातत्त्व विभागाच्या लोकांनी वडदम गावाजवळ पुरातन अवशेषांचा शोध लावला आहे. त्यामध्ये डायनासोर प्राण्याचे अवशेष सापडले आहेत. जे की लाखो वर्षांपूर्वीच्या आहेत असे समजले जाते. येथे सापडलेले जीवाश्म कलकत्त्यामधील संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यापासून हे ठिकाण 19 किलोमीटर अंतरावर आहे.
12)सोमनूर संगम-

Somnur sangam हे गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटन स्थळ आहे. सिरोंचा तालुक्यामध्ये असलेले हे ठिकाण गोदावरी आणि इंद्रावती नदीच्या संगमावर आहे. येथील निसर्गाने बहरलेला परिसर आणि निरव शांतता मनाला एक वेगळीच अनुभूती देते. सोमनूर संगमाचा परिसर वनश्रीने, डोंगरदऱ्यानी आणि विविध प्रकारच्या वनस्पतींनी नटलेला आहे. या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात.
13) टिपागड-

Tipagadh हा गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील किल्ला आहे. देसाईगंज पासून हा किल्ला 100 किलोमीटर अंतरावर सावरगाव या गावाजवळ आहे. टिपागड किल्ल्यावर गुरुबाबा देवस्थान हे आदिवासी लोकांचे स्थानिक दैवत आहे. येथील सर्व भाग घनदाट जंगलाने व्यापलेला असल्यामुळे या किल्ल्यांना वनदुर्ग म्हणावे की गिरीदुर्ग म्हणावे असा प्रश्न पडतो. येथील जंगले एवढी घनदाट आहेत की दुपारच्या वेळी फिरताना संध्याकाळचा भास होतो.हा भाग नक्षलग्रस्त असल्यामुळे ठिकाणी पर्यटकांचे येण्याचे प्रमाण खूपच कमी आहे.
14) सुरजागड किल्ला-

Surjagadh fort हा गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात सह्याद्री पर्वत रांगेतील ऐतिहासिक आणि नैसर्गिक समृद्धीने बहरलेला एक महत्त्वपूर्ण किल्ला आहे. सुरजागड हे एक छोटेसे गाव असून गावाच्या कुशीत हा किल्ला वसलेला आहे.किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज हे आजही मजबूत अवस्थेत आहेत. हा किल्ला राजा सुरजत बडवाईक याने बांधला असावा असे सांगितले जाते. किल्ल्याच्या अवतीभवती निसर्गरम्य जंगले असून या ठिकाणी आदिवासी लोकांचे वास्तव्य जास्त प्रमाणात आहे. हे लोक ठाकूर देवाचे पूजन करतात. तसेच सुरजागडच्या डोंगरामध्ये लोह खानी ही सापडले आहेत.

सुरजागड डोंगरामध्ये कोणत्या खनिज खाणी सापडल्या
आहेत?
सुरजागड डोंगरामध्ये लोह खाणी सापडल्या आहेत.
सोमनूर संगम कोणत्या नदीच्या संगमावर आहे?
सोमनूर संगम कोणत्या नदीच्या संगमावर आहे?
हेमलकसा मधील लोक बिरादरी प्रकल्प कोणी सुरू केला?
सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांनी 1973 मध्ये लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा गावात सुरू केला
1)सुरजागड डोंगरामध्ये कोणत्या खनिज खाणी सापडल्या
आहेत?
सुरजागड डोंगरामध्ये लोह खाणी सापडल्या आहेत.
2)सोमनूर संगम कोणत्या नदीच्या संगमावर आहे?
सोमनूर संगम गोदावरी आणि इंद्रावती नदीच्या संगमावर आहे.
3)हेमलकसा मधील लोक बिरादरी प्रकल्प कोणी सुरू केला?
सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांनी 1973 मध्ये लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा गावात सुरू केला.