बुलढाणा जिल्हा हा महाराष्ट्रातील अमरावती विभागामध्ये येतो.या जिल्ह्यामध्ये 13 तालुके आहेत. श्री संत गजानन महाराज यांच्या पद स्पर्शाने पावन झालेली शेगाव नगरी बुलढाणा जिल्ह्यातच आहे.12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला होता.Top 14 places visit to in Buldhana District
राजमाता जिजाऊंचा जिथे जन्म झाला तो राजवाडा भव्य असून मुंबई नागपूर हायवे ला लागून आहे. या जिल्ह्यातील महत्त्वाची पिके कापूस,ज्वारी,सोयाबीन,सूर्यफूल,गहू, बाजरी ही आहेत. या जिल्ह्यातून बऱ्याच नद्या वाहतात. उन्हाळ्यामध्ये या जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे आहे. जिल्ह्यातील नळगंगा नदीवर मोताळा तालुक्यात नळगंगा धरण आहे.
तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक धार्मिक, नैसर्गिक, ऐतिहासिक पर्यटन स्थळे व अभयारन्ये आहेत. संपूर्ण जगात नाव मिळवलेले लोणार सरोवर हे बुलढाण्यातील खाऱ्या पाण्याचे एक प्रमुख अविश्वासनीय पर्यटन स्थळ आहे.
प्रशासकीय कार्यालय बुलढाणा जिल्ह्यात आहे. तसेच येथे 120 एकर जागेवर आनंद सागर हे पर्यटन स्थळ निर्माण केली आहे. तसेच या जिल्ह्यात अनेक हेमाडपंथी मंदिरे अभयारण्य आहेत. अंबाझरी व भिंगार ही बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेची ठिकाणे आहेत. बुलढाणा येथील सिंदखेड राजा येथे घोंगड्या बनवल्या जातात त्या खूप प्रसिद्ध आहेत. हा जिल्हा मुंबईपासून 500 किलोमीटर अंतरावर आहे.Top 14 places visit to in Buldhana District
Top 14 places visit to in Buldhana District
बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे
1) लोणार सरोवर-

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार हे सरोवर खाऱ्या पाण्याचे असून त्याची निर्मिती फार वर्षांपूर्वी उल्कापातामुळे झाली होती. सरोवराचे पाणी अल्कधर्मी आहे. बेसोल्ट खडकातील लोणार हे मोठे आघाती विवर आहे. या सरोवरच्या संवर्धनासाठी याला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या परिसरामध्ये साधारणता बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत.
या विवरामध्ये 15 मंदिरे असून लोणार सरोवराची निर्मिती 52 ते 60 हजार वर्षांपूर्वी झाली असावी असा अंदाज आहे. देश विदेशातील अनेक संस्थांनी या सरोवरावर संशोधन केले आहे. लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यापासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. प्राचीन ग्रंथांमध्ये देखील लोणार सरोवराचा उल्लेख केलेला आहे. लोणार हे महाराष्ट्रातील सात आश्चर्यांपैकी एक आहे.
2) आंबा बरवा अभयारण्य-

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील अंबाबरवा हे सातपुडा पर्वतरांगाच्या पायथ्याशी वसलेलेअभयारण्य नैसर्गिक व हिरवळीने नटलेले आहे.127 चौरस किलोमीटर परिसरात हे अभयारण्य विस्तारलेले आहे. या अभयारण्यामध्ये वाघ,बिबट्या , अस्वल, ससा, लांडगा,उदमांजर त्या अनेक जंगली प्राण्यांबरोबर 200 पेक्षा जास्त प्रकारच्या पक्षांच्या जाती आढळून येतात. बुलढाणा शहरापासून हे अभयारण्य 200 किलोमीटर अंतरावर आहे. हे अभयारण्य मेळघाट अभयारण्याचा एक भाग आहे.
3) गजानन महाराज मंदिर शेगाव-

श्री संत गजानन महाराज हे महाराष्ट्रातील थोर संत होऊन गेले. 23 फेब्रुवारी 1878 रोजी गजानन महाराज अचानक प्रकट झाले. ते मूळ कोणते हे याबद्दल कोणतीही माहिती नाही. भक्ती मार्गाने देवापर्यंत पोहोचता येते असा संदेश गजानन महाराजांनी दिला. त्यांना शेगावचे देव म्हणून ओळखले जाते. गजानन महाराज हे दत्तसंप्रदायाचे गुरु होते. महाराजांच्या प्रकटदिनी शेगाव मध्ये मोठा उत्सव साजरा केला जातो.
4) राजुर घाटातील बालाजी मंदिर-
Please visit our website:Allindiajourney.com

बुलढाणा जिल्ह्यातील बालाजी मंदिर हे एक धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर राजुर घाटामध्ये टेकडीवर असलेल्या तिरुपतीच्या धरतीवर बांधले आहे. दाक्षिणात्य पद्धतीने बांधलेले भगवान बालाजीचे हे मंदिर नयनरम्य व खूप भव्य असून मंदिरात बालाजी ची मूर्ती बसवण्यात आली आहे. राजुर घाटातील विलोभनीय निसर्ग सौंदर्य आणि तेथील विविध मंदिरे पर्यटकांना आकर्षित करतात.
5) सैलानी बाबा दर्गा-

बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई गावातील सैलानी बाबा दर्गा आहे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी मानसिक रोग बरे होतात अशी या ठिकाणाची ख्याती आहे. महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माचे लोक येथे दर्शनाला येतात. हा दर्गा बुलढाण्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. विशेष म्हणजे होळी धहणाच्या कार्यक्रमाच्या वेळी येथे कपड्यावर रोशनाई
केल्याने काळी जादू, मानसिक रोग, भूतबाधा यापासून मुक्ती मिळते असे मानले जाते. हा दर्गा म्हणजे सर्वधर्मसमभावतेचे प्रतीक आहे.
6) ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य-

ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य हे बुलढाण्यातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. या अभयारण्यातून ज्ञानगंगा नदी वाहत असल्यामुळे या अभयारण्याला ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य हे नाव देण्यात आले आहे. हे अभयारण्य 205 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे.
या अभयारण्यामध्ये निलगाय, हरीण, बिबट्या, काळवीट, सरपटणारे प्राणी आणि 150 पेक्षा जास्त विविध प्रकारच्या पक्षांच्या जाती आढळून येतात. या अभयारण्याची निर्मिती 9 मे 1997 रोजी झाली. हे अभयारण्य खामगाव, मोताळा आणि चिखली तालुक्यात आहे. बुलढाणा शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य आहे.
7)रेणुका देवी मंदिर-

रेणुका मातेचे हे मंदिर बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे आहे. व चिखली तालुक्याचे हे आराध्य दैवत आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून या रेणुका मातेची ख्याती आहे. हनुमान जयंतीला दरवर्षी येथे यात्रा भरते. हे मंदिर शहराच्या मध्यभागी असून बुलढाणा पासून 23 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिरातील रेणुका मातेचा मुखवटा सुमारे 5 फूट उंच व 4 फूट रुंद आहे. भारतातील 51 शक्तिपीठांपैकी हे एक शक्तिपीठ आहे.
8) सिंदखेड राजा-

सिंदखेड राजा हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्वाचे प्रमुख पर्यटन स्थळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई राजमाता जिजाऊ यांचे हे माहेर असून जन्मगाव आहे. या ठिकाणाला खूप मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. या ठिकाणी जिजाबाईंचे वडील श्रीमंत लखोजीराजे यांचा राजवाडा, काळाकोट,पुतळा बारव, लखोजी राजांची समाधी यापेक्षा अनेक ऐतिहासिक गोष्टी आहेत. येथील राजवाड्यामध्ये राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजींचे मूर्ती आहे. बुलढाणा पासून हे ठिकाण साधारणता 80 किलोमीटर अंतरावर आहे.
9) हनुमान मूर्ती नांदुरा-

बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे असलेली 105 फूट उंचीची हनुमानाची मूर्ती असून जगातील सर्वात उंच हनुमान मूर्तीपैकी एक आहे. या मूर्तीमुळे नांदुरा शहराला ‘हनुमान नगरी’ म्हणून ओळखले जाते. सन 2000 मध्ये या मूर्तीची स्थापना करण्यात आली. 2003 मध्ये लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या मूर्तीची नोंद करण्यात आली आहे. हनुमान जयंतीला या मूर्तीवर पाच क्विंटल फुलांचा हार चढवला होता. हनुमानाच्या या भव्य मूर्तीच्या बाजूला बालाजीचे मंदिर बांधण्यात आले आहे. जगभरातून ही विशाल काय मूर्ती पाहण्यासाठी पर्यटक दरवर्षी लाखोच्या संख्येने नांदुरा येथे येत असतात
10) आनंद सागर शेगाव-

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव बाळापुर रोडवर शेगाव पासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेले ‘आनंद सागर’ हे ठिकाण शेगाव संस्थानने निर्माण केले आहे. 350 एकर जागे पैकी 120 एकर जागेवर हे आनंद सागर सर्व सोयी सुविधानी युक्त असलेली इमारत निर्माण केली आहे. त्या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यातून संत महात्मे येतात. तसेच राज्यातील व देशातील अनेक संतांचे पुतळे येथे उभारण्यात आले आहेत.
11) जटाशंकर धबधबा-

जटाशंकर धबधबा हे बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगाच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळ आहे. तून्की गावातून पंधरा ते वीस किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी जाता येते. शिवशंकर महादेवावर या धबधब्यातून सतत जल वर्षाव होतो. म्हणून या धबधब्याला जटाशंकर धबधबा असे नाव पडले आहे. संग्रामपूर तालुक्यापासून हे ठिकाण 25 किलोमीटर अंतरावर आहे.
12) श्री क्षेत्र गिरडा-

श्री क्षेत्र गिरडा हे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाचे निसर्गरम्य व धार्मिक पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी श्रीनाथ महादेवाचे मंदिर व स्वयंप्रकाश बाबा यांची समाधी आहे. या स्थळाबद्दल एक अशी अध्यायिका सांगितला जाते कि पांडव वनवासात होते त्यावेळी अर्जुनाने बाण मारून इथे पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. तेच पाणी पाच झऱ्यातून गोमुखातून आजपर्यंत वाहत आहे. म्हणून या ठिकाणाला प्रांचीझरा देखील म्हटले जाते. गजानन महाराज संस्थानाच्या वतीने येथे मोठ्या प्रमाणात विकास केला जात आहे. तसेच इथून जवळच पैनगंगा नदीचे उगम स्थान व व बुधनेश्वर महादेवाचे मंदिर आहे. येथील काळीभिंत ही दरी प्रसिद्ध आहे.
13) गोंधणापूर किल्ला-

गोंधणापूर किल्ला हा खामगाव तालुक्यातील गोधनापूर गावामधील एक भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्यामध्ये अनेक भुयारी खोल्या असून किल्ल्याचे बांधकाम हे दगड व विटांमध्ये आहे. सन 1791 मध्ये लातूरचे रघोजीराव भोसले दुसरे यांनी दिवाण वैद्य यांच्या देखरेखी खाली हा किल्ला बांधला. या किल्ल्यापासून जवळच गराडगाव येथे बुद्ध विहार व किनी येथे महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. खामगाव पासून हा किल्ला आठ किलोमीटर अंतरावर आहे.
14) हिवरा आश्रम-

हिवरा आश्रम हे एक तीर्थक्षेत्र असून पर्यटन क्षेत्र देखील आहे. या ठिकाणी विवेकानंद आश्रम संस्थेने शिवमंदिर व बालाजी परिसरात हरिहर क्षेत्र या ठिकाणी सुंदर व रमणीय उद्यानाचे निर्मिती केली आहे. येथे वीस फूट उंचीची स्वामी विवेकानंदाची तेजस्वी मूर्ती आहे.
येथील पेढा खूप प्रसिद्ध आहे. तसेच येथे बोटीचाही आनंद घेता येतो. त्यामुळे हे ठिकाण प्रेक्षणीय पर्यटन स्थळ बनले आहे. साखर खर्डा हे ऐतिहासिक गाव येथून जवळच आहे. मेहकर पासून 16 किलोमीटर अंतरावर हिवरा आश्रम हे ठिकाण आहे.

1)गोंधनापूर किल्ला कोणत्या तालुक्यात आहे ?
गोंधनापूर किल्ला खामगाव तालुक्यात आहे .
2)जटाशंकर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे?
जटाशंकर धबधबा बुलढाणा जिल्ह्यात आहे.
3)लोणार सरोवराची निर्मिती कशी झाली आहे?
लोणार सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झाली आहे.