मित्रांनो भारत भ्रमंतीमध्ये आम्ही भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळाची माहिती देत आहोत, आता आपण गुजरात मधील बोटाड जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे पाहणार आहोत.बोटाड जिल्हा हा गुजरात मधील सौराष्ट्रामध्ये आहे.हा जिल्हा 15 ऑगस्ट 2013 रोजी भावनगर व अहमदाबाद जिल्ह्यामधून निर्माण करण्यात आला. या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय बोटाड येथे असून, हा जिल्हा भावनगरपासून सुमारे 92 किमी अंतरावर आहे. Top 14 places to visit in Botad District
बोटाड जिल्ह्याला राजकोट, भावनगर, अमरेली आणि पूर्वेस अहमदाबाद या जिल्ह्यांच्या सीमा लाभलेल्या आहेत. या जिल्ह्यात चार तालुके आहेत, व कळुभार, सुखभदर, घेलो, ऊतावली, गोमा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत. हा जिल्हा सौराष्ट्राच्या मध्यावर असल्यामुळे वाहतुकीस सोयीस्कर आहे. तसेच हा जिल्हा कृषिप्रधान असून येथे कापूस, ज्वारी, गहू, शेंगदाणे इत्यादी पिके घेतली जातात.
या जिल्ह्यातील गढडा येथे स्वामीनारायण मंदिर असल्यामुळे हे ठिकाण धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. बोटाड जिल्ह्यात अनेक धार्मिक ऐतिहासिक व सांस्कृतिक पर्यटन स्थळे आहेत.
Top 14 places to visit in Botad District
बोटाड जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे
1)Swaminarayan Mandir, Gadhada-

श्री स्वामीनारायण मंदिर हे गुजरात मधील बोटाड जिल्ह्यातील गढडा या ठिकाणी असलेले प्रसिद्ध धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. जे गोपीनाथजी मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर श्री भगवान स्वामीनारायण यांनी स्वतः देखरेखेखाली बांधलेल्या सहा मंदिरांपैकी एक आहे. राधा कृष्णाचे हे मंदिर स्वामीनारायण संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी दादा खाचर यांनी त्यांचे जमीन दान केली होती.
या मंदिरात कोरीवकामाने सजवलेले दोन मजली आणि तीन घुमट आहेत. व हे मंदिर उंच प्लिंथवर असून, एक प्रशस्त चौक आणि त्यात मोठ्या धर्मशाळा आणि तपस्वी व यात्रेकरूंसाठी स्वयंपाकघरांसह एक सभामंडप आहे. 9 ऑक्टोबर 1828 रोजी स्वामीनारायणांनी स्वतः या मंदिरात गोपीनाथ राधा, हरेकृष्ण यांच्या मूर्तींची स्थापना केली होती.
2)Shri Hanuman Mandir, Sarangpur-


श्री हनुमान मंदिर हे गुजरात मधील बोटाड जिल्ह्यातील सारंगपूर येथे असलेले प्रसिद्ध धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर कष्टभंजन हनुमान मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर स्वामिनारायण संप्रदायातील वडताल गादीच्या अंतर्गत आहे व हे एकमेव स्वामिनारायण मंदिर आहे ज्यामध्ये मुख्य देवता म्हणून स्वामिनारायण किंवा कृष्ण यांच्या मूर्ती नाहीत. तर येथे हनुमानजींची कष्टभंजन (दुःखांचा नाश करणारे) या रूपातील मूर्ती आहे.
या मंदिरातील हनुमानजींची मूर्ती सद्गुरु गोपाळानंद स्वामींनी प्रतिष्ठापित केली असून हे मंदिर स्वामिनारायण संप्रदायातील महत्वाचे मंदिर आहे. या मंदिरातील हनुमानजींची मूर्ती अत्यंत मजबूत शरीरयष्टी व मिशा असलेली आहे. आणि या मूर्तीच्या पायाखाली एका राक्षसीला तुडवत, दात दाखवत उभे आहेत व आजूबाजूला फळांनी भरलेल्या झाडांमध्ये वानर सेवक कोरलेले आहेत.
3)clock tower-

श्री दामोदरदार जगजीवन शाह क्लॉक टॉवर हे गुजरात मधील बोटाड जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित खुणा आहे. हा घड्याळ टॉवर शहराच्या मध्यावर असून, ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वाचा आहे.हा घड्याळ मनोरा श्री. दामोदरदार जगजीवन (शहा) यांनी बांधला असून तो गुजराती कॅलेंडरनुसार संवत 1993 मध्ये उभारण्यात आला आहे.
महाराजा कृष्णकुमारसिंहजी आणि तख्तसिंहजी यांच्या राज्यकालात या क्लॉक टॉवरचे महत्त्व वाढले.आज हा ‘टॉवर चौक’ शहराचे मध्यवर्ती व्यापारी केंद्र असून या इमारतीत त्यांच्या नावाने एक लायब्ररी आहे.
4)saint Pir Hamir Khan Tomb –

मुस्लिम संत पीर हमीर खान यांचे दर्गा आणि कबर ही गुजरात मधील बोटाड जिल्ह्यात असलेली एक मजार आहे.संत पीर हमीर खान रानपूरचे ठाणेदार होते व असे सांगितले जाते की ते गढडाजवळील उगामेडी येथे खुमान आणि वाला काठींशी झालेल्या युद्धात मरण पावले. ही मजार स्थानिक माहितीनुसार पूर्वीच्या मंदिराच्या जागेवर झाली आहे असे सांगितले जाते.
5)BAPS Sri Swaminarayan Mandir-

Visit our website: allindiajourney.com
BAPS स्वामीनारायण मंदिर हे गुजरात मधील बोटाड जिल्ह्यातील सारंगपूर या ठिकाणी असलेले एक प्रसिद्ध तीर्थस्थळ आहे.सारंगपूर हे ठिकाण श्री कष्टभंजन हनुमानजी मंदिर आणि गावात असलेल्या BAPS श्री स्वामीनारायण मंदिरासाठी ओळखले जाते. हे मंदिर स्वामीनारायण संप्रदायाच्या वडताल गादी अंतर्गत येते. हे मंदिर स्वामीनारायण किंवा कृष्णाच्या मूर्तींची पूजा होत नसलेले एकमेव मंदिर आहे.
सारंगपूर मधील हे BAPS श्री स्वामीनारायण मंदिर हे शास्त्री यज्ञपुरुषदास यांनी 1916 मध्ये बांधले होते, व ते शिखरबद्ध मंदिरासाठी देखील ओळखले जाते. हे मंदिर 108 फूट उंचीवर असलेले गुजरातमधील दुसरे सर्वात उंच मंदिर आहे.
6)Bhimnath Mahadev Temple –

भिमनाथ महादेव मंदिर हे गुजरात मधील बोटाड जिल्ह्यातील वडाच्या झाडाखाली असलेले 5,000 वर्षे जुने महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की भीमनाथ महादेवाची स्थापना स्वतः भीमाने केली होती. त्याबद्दल अशी माहिती सांगितली जाते की अर्जुनाची भगवान शंकरावर अपार श्रद्धा होती अर्जुनाने शंकराची पूजा न करता अन्न न खाण्याचा व्रत घेतले होते. परंतु अज्ञातवासादरम्यान एका दिवशी अर्जुनाला शिवलिंग मिळाले नाही आणि त्याला उपाशी राहावे लागले.
त्यामुळे सर्व पांडवही उपाशी राहिले. अखेरीस भुक न सहन झाल्यामुळे भीमाने एक मोठा दगड आणला व त्याची शिवलिंग म्हणून पूजा केली,आणि त्यावर जंगलातील फुले अर्पण केली. नंतर अर्जुन व माता कुंतीला हेच शिवलिंग असल्याचे सांगितले. येथे असलेले पाच हजार वर्षांपूर्वीचे वडाचे झाड आजही जिवंत पाहायला मिळते.
7)shanidev temple kundal –


शनिदेव मंदिर हे गुजरात मधील बोटाड जिल्ह्यातील सारंगपूर जवळ कुंडल धाम येथे असलेले प्राचीन व प्रसिद्ध तीर्थस्थळ आहे.हे ठिकाण सारंगपूर हनुमानजी मंदिरापासून जवळ असून येथे अनेक भक्त एकत्रितपणे दोन्ही ठिकाणचे दर्शन घेतात. आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी भाविक शनि देवाला तेल,अभिषेक, अर्पण करतात.येथील मंदिर परिसर शांत व पवित्र भक्तिमय वातावरणाने भरलेला आहे. भाविक येथे शनिदेवाच्या मूर्तीची पूजा करून आपल्या दुःख, संकट, अडचणी दूर करण्यासाठी दर्शन घेतात.
8)Botad Krishna Sagar Lake –

कृष्णसागर तलाव हा गुजरात मधील बोटाड जिल्ह्यातील भावनगर संस्थानचे शासक कृष्णकुमारसिंहजी यांनी बांधलेला एक महत्त्वाचा तलाव आहे. हा तलाव 130 हेक्टरमध्ये पसरलेला असून बोटाडमधील सुमारे 1.13 लाख लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा स्रोत राहिला आहे. सुमारे 106 दशलक्ष घनमीटर क्षमता असलेला हा जलाशय 1938 मध्ये बोटाड शहराच्या अपस्ट्रीम भागात तयार करण्यात आला. कृष्णसागर तलावामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच आसपासच्या भागातील भूजल पातळीदेखील वाढली आहे.
9)veer ranaji fort ranpur-

राणाजी गोहिल गढ हा गुजरात मधील बोटाड जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे.सौराष्ट्रातील गुहिल राजवांशातील राणाजी गोहिल हे एक वीर योद्धा होते त्यांनी 13व्या शतकात रणपुर या गावाचे राजकीय केंद्र स्थापन केले. राणाजी गोहिल यांचे वडील सेजकजी, हे मेवाड (मारवाड) प्रदेशातून सौराष्ट्रात आले होते. रणपुर हा भव्य किल्ला असून किल्ल्याच्या बाजूने सुकभदर व गोमा या नद्या वाहतात.
तसेच या किल्ला परिसरात एक ‘जौहर कुण्ड’ आहे जिथे काही राण्यांनी जौहर केले होते, असे सांगितले जाते. या किल्ल्याची वास्तुकला मनमोहक आणि समृद्ध राजसी जीवनशैलीची आहे.
10)Tajio –

ताजियो हे गुजरात मधील बोटाड जिल्ह्यातील एक सुंदर महत्त्वाची आणि प्रसिद्ध इमारत आहे. ही इमारत तुलसी मिस्त्री या सिव्हिल इंजिनिअर आणि उद्योजक यांनी बांधली. ही वास्तू भारतीय आणि विक्टोरियन शैलीमध्ये एक प्रकारचा क्लॉक टावर म्हणून बांधण्यात आला. परंतु त्यांना या भव्य वास्तूमध्ये घड्याळ बसवण्याची परवानगी प्राप्त न झाल्यामुळे त्यांनी स्वतंत्रपणे ही रचना उभारली.
11)Kariyani Swaminarayan Mandir-

करीयाणी स्वामिनारायण मंदिर हे गुजरात मधील बोटाड जिल्ह्यातील लाठीदाद गावाजवळ असलेले प्रसिद्ध धार्मिक तीर्थस्थळ आहे. हे मंदिर गढडा येथील स्वामीनारायण मंदिरापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. करीयाणी स्वामिनारायण मंदिर हे स्वामीनारायण संप्रदायाच्या पवित्र आणि महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक मानले जाते. पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात भेट देतात.
12)Yagnapurush Smruti Mandir-

यज्ञपुरुष स्मृति मंदिर हे गुजरात मधील बोटाड जिल्ह्यातील सारंगपूर या ठिकाणी असलेले एक अत्यंत महत्वाचे स्मारक मंदिर आहे. हे स्मृति मंदिर ब्रह्मस्वरूप शास्त्रीजी महाराज यांची समाधीस्थळावर उभारलेले असून या ठिकाणी त्यांचावर 10 मे 1951 रोजी अंत्यसंस्कार झाले होते. या मंदिरामध्ये शास्त्री जगन्नाथदास (यज्ञपुरुष) यांचे एक सुंदर मार्बलचे प्रतिमा आहे, ती स्मारकामध्ये पूजेसाठी ठेवण्यात आलेली आहे. या मंदिरासमोर प्रमुख स्वामी स्मृति मंदिर आहेत.
13)Virateshvar Mahadev Temple-


विराटेश्वर महादेव मंदिर हे गुजरात मधील बोटाड जिल्ह्यातील सारंगपुर मार्गावर असलेले स्वयंभू शिवमंदिर आहे. असे सांगितले जाते की हे शिवलिंग एकदा मजुरांनी खोदकाम करताना सापडले होते. आणि हे शिवलिंग दररोज एक तांदळाच्या दाण्याएवढे मोठे होत आहे. अशी या मंदिराची महती आहे. श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दर्शनाला येतात.
14)Bird Sanctuary –

पक्षी विहार क्षेत्र हे गुजरात मधील बोटाड जिल्ह्यातील
अरनकुई गाव, शेरथळी, या ठिकाणी असलेले पक्षी निरीक्षण केंद्र आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी पाहण्यासाठी उत्तम आहेत. येथे पक्षीनिरीक्षकांना दुर्बिणी आणि कॅमेऱ्यांचा वापर करून या पक्ष्यांच्या प्रजातींचा अभ्यास करण्याची सोय आहे.पक्षी निरीक्षणातून जीवविज्ञानाच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक ज्ञानात भर पडते. या ठिकाणाला अनेक पक्षीप्रेमी भेट देतात.
1) बोटाड जिल्ह्यातील विराटेश्वर महादेव मंदिर कोणत्या ठिकाणी आहे ?
बोटाड जिल्ह्यातील विराटेश्वर महादेव मंदिर सारंगपूर मार्गावर आहे .
2) बोटाड जिल्ह्यातील कृष्ण सागर तलाव कोणी बांधला ?
बोटाड जिल्ह्यातील कृष्ण सागर तलाव कृष्णकुमारसिंहजी यांनी बांधला .
3) बोटाड जिल्ह्यातील यज्ञपुरुष स्मृति मंदिर कोणत्या ठिकाणी आहे ?
बोटाड जिल्ह्यातील यज्ञपुरुष स्मृति मंदिर सारंगपूर ठिकाणी आहे .


