अमरावती हे महाराष्ट्रातील विदर्भ प्रदेशातील एक शहर असून त्याचे मूळ नाव उमरावती असे आहे. विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून अमरावतीची ओळख आहे. तसेच अमरावतीला शिक्षणाचे माहेरघर ही म्हटले जाते. प्रशासनाने अमरावतीचे दोन भाग केलेले असून एक म्हणजे नागपूर आणि दुसरे अमरावती.अमरावती हे महाराष्ट्रातील जास्त लोकसंख्या असलेल्या महानगरक्षेत्रामध्ये सातव्या क्रमांकावर आहे. अमरावती जिल्हा हा प्रशासकीय विभागाचे मुख्यालय आहे. अमरावती शहरात अनेक ऐतिहासिक मंदिरे आहेत.Top 12 places visit to in Amaravati.
महाराष्ट्राच्या पुर्व भागात अमरावती जिल्हा येतो अमरावती जिल्ह्याची सर्वात जास्त सीमा मध्यप्रदेशला लागून आहे. अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वत हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांचा सीमावरती प्रदेश आहे.
Top 12 places visit to in Amaravati
अमरावती जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन ठिकाणे-
1) अंबादेवी मंदिर-

Ambadevi temleहे मंदिर अमरावती मधील गांधी चौकात असून महाराष्ट्रातील सर्वात जुन्या मंदिरांमध्ये या मंदिराचा समावेश केला जातो. देशाच्या कानाकोपऱ्यातून या मंदिरात भाविक येत असतात. नवरात्रीमध्ये येथे खूप मोठा उत्सव असतो. काही भाविक अनवाणी पायाने देवीच्या दर्शनाला येतात. अमरावती स्थानकापासून हे मंदिर दीड किलोमीटर अंतरावर आहे. देवी ही विदर्भाची कुलदेवता आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील प्राचीन शक्तीपीठापैकी एक आहे. 90 तोळ्यांचा अंबामातेचा सोन्याचा मुलामा असलेला चांदीचा मुखवटा 1905 मध्ये बनवला गेला. आंबा मातेचे मंदिर जागृत देवस्थान मानले जाते.
2) भीमकुंड धबधबा-

Bhimkund dhabdhaba हा अमरावती शहरातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. मेळघाटातील हा सर्वात उंच व आकर्षक धबधबा असल्यामुळे येथे पर्यटक जास्त आकर्षित होतात. अमरावती जिल्ह्यातील हा धबधबा चिखलदरापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. हा धबधबा 3500 मीटर एवढ्या उंचीवरून दरीत कोसळतो. पावसाळ्यात या धबधब्यावर प्रचंड गर्दी असते. इतरवेळी संथपणे वाहणारा हा धबधबा पावसाळ्यात मात्र रौद्ररूप घेतो. जेथून धबधबा कोसळतो तेथून खालील मागील भागात काळाशार दगडात खोल कुंड आहे.
3) देवी पॉईंट-

devi point हे चिखलदऱ्याजवळील अत्यंत निसर्गरम्य ठिकाण आहे. तसेच हे ठिकाण अमरावती शहरापासून साधारणता 84 किलोमीटर अंतरावर आहे. टेकडीवर असलेले हे ठिकाण अत्यंत सुंदर व रमणीय आहे.
मेळघाटातील संपूर्ण अभयारण्य येथून पाहता येते. येथील डोंगरातून चंद्रभागा नदी वाहते. ही नदी बिंदू पर्वताजवळ आहे. हे ठिकाण उंच डोंगरावर असल्यामुळे याला देवी पॉईंट हे नाव देण्यात आले आहे. तसेच या मंदिरापासून अमरावतीचा पडका किल्ला दिसतो.
4)गुगामल राष्ट्रीय उद्यान-

gugamal national उद्यान हे महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात आहे. वाघांसाठी हे उद्यान आरक्षित करण्यात आले आहे. येथे असणारे हिरवेगार गवत धबधबे तलाव आणि येथील शांत व थंडगार वातावरण यामुळे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. येथील सुमारे 1700 वर्ग कि. मी. चे क्षेत्र वाघांसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये असणाऱ्या या उद्यानापासून मेळघाट,वाण, आंबा बरवा आणि नरनाळा
ही अभयारण्य काही किलोमीटर अंतरावर आहेत. गुगामल राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1974 मध्ये झाली. हे उद्यान मेळघाट राखीव जंगलाचा भाग असून येथे वाघाची संख्या खूप आहे. 1987 मध्ये या ठिकाणाला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. हे उद्यान सातपुडा डोंगरात आणि अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा या तालुक्यात पसरलेले आहे.
5)बांबू गार्डन-

अमरावतीतील जुन्या बायपास रोडवर वडाळी येथे असलेले Bambu garden हे प्रसिद्ध ठिकाण आहे. बांबू गार्डन ची स्थापना 2017 मध्ये केली. येथील आकर्षण म्हणजे येथे असलेले वेगवेगळे प्रकारचे बांबू. तसेच येथील निसर्ग रम्य वातावरण आणि हिरवळीने दाटलेला परिसर मनमोहून टाकतो.
येथे आपल्याला बांबूच्या विविध प्रजाती बघायला भेटतात. तसेच येथे आपल्याला बांबूच्या झोपड्या, बांबूचे पुल पहावयास भेटतात. आणि येथे मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी व रायडस आहेत. बांबू उद्यान हे ठिकाण अमरावती शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे.
6) चिखलदरा हिल स्टेशन-

महाराष्ट्रातील प्रमुख हिल स्टेशनमध्ये chikhaldara hill station हे ठिकाण येते. निसर्गाने आणि हिरवाईने नटलेले हे समृद्ध ठिकाण पाहण्यासारखे आहे. सातपुडा पर्वत रांगेतील हे अत्यंत थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणी आपल्याला उंच डोंगर,खोल दऱ्या, थंड हवा आणि हिरवीगार झाडे पहावयास भेटतात.
येथील हवामान नेहमी थंड आणि आरोग्यदायी असते. हे ठिकाण 1118 मीटर उंचीवर असून निसर्गाने बहरलेले आहे. तसेच महाराष्ट्रातील चिखलदरा हे कॉफी उत्पादनाचे एकमेव ठिकाण आहे.
इथे असणारे धबधबे, सरोवरे पर्यटकांना आकर्षित करतात. येथील विलोभनीय सौंदर्य पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येतात.
7)भक्तीधाम मंदिर-

अमरावती जिल्ह्यातील bhaktidham temple हे खूप भव्य असून राधा कृष्णाचे मंदिर आहे. अमरावती जिल्ह्यातील हे एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे. मंदिरामध्ये राधा आणि कृष्णाच्या संगमरवरी दगडामध्ये घडविलेल्या सुंदर मूर्ती आहेत. तसेच या मंदिराच्या पाठीमागे एक पार्क असून लहान मुलांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. या मंदिराला भेट देण्यासाठी हजारो भाविक वर्षभर येत असतात. अमरावती बस स्थानकापासून हे मंदिर 28 किलोमीटर अंतरावर आहे.
8) एकवीरा देवी मंदिर-

Ekvira devi temple अमरावती मधील अंबादेवी मंदिराजवळ आहे. एकवीरा देवीचे मंदिर खूप जुने असून या देवीला रेणुका मातेचे स्वरूप मानले जाते. 1907 मध्ये परमहंस जनार्दन स्वामी यांच्या मुलाने हे मंदिर बांधले. या देवीचे स्थान शक्ती स्वरूप आहे. बाराही महिने लाखो भाविक येथे श्रद्धेने येतात. अमरावती बस स्थानकापासून हे मंदिर दहा किलोमीटर अंतरावर आहे.
Please visit our website: Allindiajourney.com
9)गावील गड किल्ला-

अमरावती मधील Gavilgad fort हा किल्ला चिखलदरा हिल स्टेशन जवळ असून तो तीनशे वर्ष जुना आहे. तसेच या किल्ल्याच्या भिंतीवर उर्दू, हिंदी, व अरबी भाषेचे कोरीव काम केले
ले आहे. तसेच हत्ती, घोडा, उंट या प्राण्यांचे चित्र रेखाटण्यात आलेले आहे. हा किल्ला गिरीदुर्ग म्हणून संबोधला जातो. चिखलदऱ्यापासून हा किल्ला तीन किलोमीटर अंतरावर आहे.
10) मेळघाट अभयारण्य-

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पामधील Melghat abhayaranya हे एक महत्त्वाचे अभयारण्य आहे. हे अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध असून इथे भरपूर प्रमाणात सागाची झाडे आहेत. 1974 मध्ये या अभयारण्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले.
मेळघाटच्या या अभयारण्यामध्ये बिबटे, पट्टेवाले वाघ, गवे, रानडुक्कर, सांबर, अस्वल,कोल्हे, लांडगे असे अनेक प्रकारचे जंगली प्राणी पाहावयास भेटतात. हे अभयारण्य 788 एवढ्या विस्तृत प्रमाणात पसरलेले आहे. अमरावती शहरापासून हे ठिकाण शंभर किलोमीटर अंतरावर आहे.
11) पंचबोल पॉईंट-

सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेला panchbol point हे एक अद्भुत गोष्ट म्हणावी लागेल. कारण या पॉइंटवर आपण मोठ्याने आवाज दिला तर तो आपल्याला पाच वेळा प्रतिध्वनी ऐकायला येतो. त्यामुळे या पॉईंटला पंचगोल पॉईंट असे नाव दिले आहे. तसेच या पॉईंटला इको पॉइंट देखील म्हणतात. येथील निसर्ग अक्षरशः डोळ्याचे पारणे फेडणार आहे. या ठिकाणी आपल्याला कॉफीचे मळे आणि दूरवर पसरलेले जंगल पहायला मिळते.
12) छत्री तलाव-

अमरावती शहराजवळ मालखेड रोडवर ब्रिटिशकालीन chatri lake हा आजही अस्तित्वात आहे. येथील लोक या तलावाला शहराचे जलदेवता असे म्हणतात. या तलावामुळे आजूबाजूच्या परिसरातील पाण्याचे पातळी व्यवस्थित राखली गेली आहे. व लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. इ.सन 1888 पर्यंत अमरावती शहराला खाजगी आणि विहिरीतून पाणीपुरवठा होत होता. 1888 साली दोन लाख 36 हजार रुपये खर्च करून हा तलाव बांधण्यात आला.
या तलावाला पूर्वी लोक कालापाणी तलाव असे देखील म्हणत. तलाव बांधल्यानंतर काही वर्षांनी येथे छत्रीही बांधण्यात आली त्यामुळे या तलावाला छत्रीतलाव असे म्हटले जाऊ लागले. या तलावामध्ये अनेक जलचर प्राणी असून येथे विविध प्रकारचे पक्षीही पहावयास भेटतात. अमरावती मधील हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.

1)छत्री तलावाला कोणत्या नावाने संबोधले जाते ?
छत्री तलावाला जलदेवता या नावाने संबोधले जाते.
2)मेळघाट अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे ?
मेळघाट अभयारण्य पट्टेरी वाघांसाठी प्रसिद्ध आहे.
3)एकविरा देवी मंदिर कोणी बांधले ?
१९०७ मध्ये परमहंस जनार्दन स्वामी यांच्या मुलाने एकविरा देवी मंदिर बांधले.