अकोला जिल्हा हा महाराष्ट्राच्या पूर्व विभागात आहे. तसेच हा जिल्हा अमरावतीच्या प्रशासकीय विभागात येतो. 1998 साली अकोला जिल्ह्याचे विभाजन झाले आणि वाशिम जिल्ह्याचे निर्मिती केली गेली. त्यामुळे अकोला आणि वाशिम हे नवीन दोन जिल्हे निर्माण झाले.Top 12 places to visit in Akola District
अकोला जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे 5428 चौरस किलोमीटर आहे. अकोला जिल्ह्यामध्ये सात तालुके आहेत. या जिल्ह्यात काटेपूर्णा आणि वाण हे मोठे सिंचन प्रकल्प आहेत. येथील पारस औष्णिक विद्युत केंद्र बाळापुर तालुक्यात आहे.
या जिल्ह्यात तीन संशोधन संस्था आहेत. या जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक किल्ले असून नरनाळा हे अभयारण्य आहे. बार्शी, टाकळी तालुक्यातील काटेपूर्णा धरण आणि काटेपूर्णा अभयारण्य ही पर्यटन स्थळ या जिल्ह्यात आहेत.Top 12 places to visit in Akola
Top 12 places to visit in Akola District
अकोला जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन ठिकाणे-
1)महादेव गुफा-

अकोला जिल्ह्याच्या मेळघाट जंगलामध्ये mahadev cave हे शिव मंदिर आहे. येथे वर्षभर भाविक येत असतात परंतु श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी येथे खूपच गर्दी असते. येथील निसर्गरम्य परिसर खूप सुंदर आहे. अकोला शहरापासून हे ठिकाण 20 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत किंवा मित्रांबरोबर या ठिकाणाला भेट देऊ शकता.
2) बिर्ला राम मंदिर-

अकोला जिल्ह्यातील birla ram mandir हे एक प्रेक्षणीय ठिकाण आहे. अकोला शहरापासून हे मंदिर दहा मिनिटांच्या अंतरावर आहे. येथील गर्भगृह अतिशय सुंदर असून वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्ती मंदिरात बसविल्या आहेत. ह्या मंदिरात रामनवमीला खूप मोठा उत्सव असतो.
हे मंदिर शंभर वर्षे आधी बांधले आहे.बिर्ला फॅमिली ने या मंदिराची स्थापना केली. राम नवमीला या मंदिराला विद्युत रोषणाईने सजवलेले असते. तसेच या दिवशी महाप्रसाद देखील असतो. मंदिर परिसरातील वातावरण शांततामय असून या परिसरात वेगळीच अनुभूती येते.
3) कापशी तलाव-

अकोला जिल्ह्यातील kapshi lake एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. या तलावाची निर्मिती ब्रिटिश राजवटीत झाली असून अकोला शहरवासीयांना पाणी पाणीपुरवठा करण्यासाठी झाली आहे.
हा तलाव सातशे एकर मध्ये पसरलेला आहे. या तलावामुळे हजारो एकर शेती सिंचन केली जाते. येथे मासेमारी देखील केली जाते. कापशी तलाव परिसरात ब्रिटिशकालीन रेस्ट हाऊस, बगीचा इत्यादी ठिकाणी आहेत. तसेच या तलावात परदेशी पक्षी येतात.
4) गांधी जवाहर पार्क-

हे उद्यान अकोल्यातील सर्वात प्रसिद्ध उद्यान आहे. हे gandhi javahar park उद्यान सर्वात जुने असून एमजी रोडवर आहे. व शहराच्या मध्यभागी वसलेले आहे. उद्यानामध्ये विविध प्रकारची वनस्पती फुले आहेत. तसेच येथे लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी आहेत. सकाळी सहा पासून ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत हे उद्यान सर्वांसाठी खुले असते.
5) नेहरू पार्क-

हे उद्यान अतिशय रोमांचक असून याला बालो ध्यान असे देखील म्हटले जाते. nehru park येथे लहान मुलांसाठी रोलर कोस्टर,घोडा गाडी, रेल गाडी, झुला आहेत. तसेच येथील मजेची गोष्ट म्हणजे येथील भुलभुलय्या खूपच छान आहे.
भुलभुलय्यातून बाहेर पडता येत नाही तेव्हा येथील कर्मचारी मदत करतात. तुम्ही तुमच्या मुलांसोबत या उद्यानाला एकदा अवश्य भेट द्या.
Please visit our website: Allindiajourney.com
6) नरनाळा किल्ला-

अकोला जिल्ह्यातील narnala fort हे महत्वपूर्ण प्रेक्षणीय स्थळ आहे. देशभरातून घ्या किल्ल्याला भेट देण्यासाठी पर्यटक येत असतात. नरनाळ सिंह स्वामी राजाच्या नावावरून या किल्ल्याला नरनाळा हे नाव देण्यात आले आहे.
हा किल्ला गिरीदुर्ग म्हणून ओळखला जातो. किल्ल्याचे क्षेत्र 362 एकर वर पसरलेले आहे. येथील परिसर रमणीय असून पर्यटकांसाठी उत्तम ठिकाण आहे.
7) काटेपूर्णा अभयारण्य-

Katepurna Abhayaranya हे एक विस्तृत जंगल असून पर्यटकांसाठी येथे नव्यानेच जंगल सफारी बस सुरू करण्यात आली आहे.अकोला शहरातील काटेपूर्णा अभयारण्य हे आकर्षक पर्यटन स्थळ आहे. या अभयारण्यात शंभर पेक्षा जास्त प्रजातीच्या वन्य प्राण्यांचा वावर आहे.
. तसेच येथील जंगलात वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत. तसेच अभयारण्यात फिरण्यासाठी जिप्सीची ही सोय करण्यात आली आहे. व पौर्णिमेच्या रात्री निरीक्षण करण्यासाठी मचान बसवण्यात आले आहेत.
8)बाळापूर किल्ला-

अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील Balapur Fort हा किल्ला ऐतिहासिक असून औरंगजेबच्या मुलगा आलम शहा याने हा किल्ला बांधला आहे. हा किल्ला मान आणि महेशी नदीच्या संगमाजवळ एका टेकडीवर आहे.
या किल्ल्याचे बांधकाम 1712 मध्ये सुरू झाले होते व 1757 मध्ये ते पूर्ण झाले. किल्ल्याला एकूण तीन दरवाजे आहेत. हा किल्ला अकोला पासून सर्विस किलोमीटर अंतरावर आहे.
9) अकोला किल्ला-

Akola Fort या भुईकोट किल्ल्याला असदगड नावाने देखील ओळखले जाते .हा किल्ला ख्वाजा अब्दुल लतीफ याने असदखानच्या देखरेखी खाली 1698 मध्ये बांधला होता. त्यानंतर 1843 मध्ये अगर वेस गोविंद आप्पाजींनी बांधली. तसेच बुरुजावरच हवा महल सारखी एक पडकी इमारत आहे. कदाचित तेथे असद खान राहत असावा असे लोकांना वाटते. हा किल्ला हिरवळीने वेढलेला असून मोरणा नदी जवळ आहे.
10). राज राजेश्वर मंदिर-

अकोल्यातील Rajrajeshwar Temple शिवाला समर्पित असून ते अकोला किल्ल्यापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर अकोल्यातील प्रसिद्ध मंदिरापैकी एक आहे या मंदिराची वास्तू कला खूप सुंदर आहे. मराठी राजवटीत बांधला गेलेल्या या मंदिराला ऐतिहासिक वारसा आहे.
मंदिरातील शांत वातावरण आपल्या मनाला प्रफुल्ल करते. या मंदिरातील कोरीव काम व नक्षीकाम अतुलनीय आहे. प्रत्येक वर्षी येथील महाशिवरात्रि उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथे भेट देतात. हे अकोल्याचे ग्रामदैवत आहे..
11) सुंदराबाई खंडेलवाल टावर-

अकोला जिल्ह्यातील Sundarbai Khandlval Tower प्रसिद्ध ठिकाण आहे. 12 फेब्रुवारी 1962 साली त्या वेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या टॉवरचे उद्घाटन झाले होते. खंडेलवाल टॉवरच्या बांधकामासाठी एका दानशूर व्यक्तीने मदत केली होती.
स्वर्गीय श्री हिरालालजी खंडेलवाल यांनी त्यांच्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ वीस हजार रुपयांची देणगी त्यावेळेस दिली होती. हा टॉवर पाच मजली असून त्याची उंची 87 फूट आहे. तसेच या टॉवरमध्ये पाच फूट व्यासाचे घड्याळ बसवले आहे. परंतु सध्या हे घड्याळ बंद आहे. स्थापत्य शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेला हा टॉवर दगडी बांधकामात आहे.
12) कालंका माता मंदिर-

अकोला जिल्ह्यात बार्शीटाकळी या तालुक्यात येणारे
Kalanka मातेचे मंदिर जागृत देवस्थान आहे. हे मंदिर जवळजवळ 400 ते 500 वर्षे जुने असून बार्शी टाकळीचे ग्रामदैवत आहे. हे मंदिर हेमाडपंती शैलीच असून स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिरातील नक्षीकाम तसेच दगडावर काढलेली चित्र मंदिराच्या प्राचीन वैभवाची साक्ष देतात. वर्षभर येथे भाविक येत असतात परंतु मंगळवारी मंदिरात खूप गर्दी असते.
नवरात्रीमध्ये नऊ दिवस मंदिरामध्ये देवीचा वास असतो अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. कालंकादेवीने राक्षसांबरोबर युद्ध केल्यानंतर विश्रांतीसाठी हे ठिकाण निवडलं. आणि तिथेच देवी विराजमान झाली अशी आख्यायिका गावकरी सांगतात.
13) पातूर लेणी-
विदर्भातील अकोला जिल्ह्यातील Patur caves या जगप्रसिद्ध आहेत. वाकाटक राजाने याची निर्मिती केली.
रेणुका मातेच्या मंदिराच्या विरुद्ध दिशेला या लेण्या आहेत. पातुर येथील लेण्यांमध्ये दोन समूह आहेत. या लेण्यांच्या समोरच्या भागात प्रांगण, अंतर मंडप,बाह्य मंडप आणि चौरसाकृती पूजा ग्रह असे ह्या लेण्यांचे स्वरूप आहे. आज पाहिले तर पातूर येथील लेण्यांमध्ये कोणत्याही धर्माची प्रतीकाची अंकणे दिसून येत नाहीत.
त्यामुळे या लेण्या कोणी निर्माण केल्या याबद्दल अनेक विविध मत आहेत. पातूर येथील लेण्याजवळ टेकडीवर रेणुका मातेचे एक मंदिर आहे. पातुर येथील लेण्यांमध्ये अलीकडच्या निरीक्षणावरून असे लक्षात आले आहे की त्या शैव लेणी आहेत. पातुर लेण्यांमध्ये आजही देवीचे जागृत स्थान म्हणून ओळखले जाते.
पातूर लेण्यांमध्ये मिळालेल्या अनेक शिलालेखामध्ये मिळालेली लिपी ही वाकाटक कालीन आहे. इसवी सन 450 च्या सुमारास वाकाटक साम्राज्याच्या वेळी दीड हजार वर्षांपूर्वी ही लेणी कोरली असावीत असे महाराष्ट्र शासन कला व स्थापत्य गॅजेट भाग दोन मध्ये नमूद करण्यात आले आहे. अजिंठा लेण्यांच्या अगोदर पातूर येथील लेण्या तयार झाल्या आहेत असे तज्ञांचे मत आहे. विदर्भातील या लेण्या सर्वात आकाराने मोठ्या असलेल्या लेण्या आहेत. पातुर गावाने आज पर्यंत हा अमूल्य ठेवा जतन केला आहे.

14)सालासर बालाजी मंदिर-

Salasar Balaji मंदिराची स्थापना 2014 मध्ये गंगानगर येथे झाली. येथे श्रीराम दरबार, हनुमानजी, शिव परिवार आणि राधाकृष्ण यांच्या मुर्त्या स्थापित केल्या आहेत. मंदिर परिसर खूप मोठा असून त्याच्यामध्ये बगीचा आहे मंदिर परिसरातील वातावरण शांतता व प्रसन्नतेने भरलेले आहे.

नरनाळा किल्ल्याचे क्षेत्र किती एकरवर पसरले आहे ?
नरनाळा किल्ल्याचे क्षेत्र 362 एकरवर पसरले आहे.
बाळापूरचा किल्ला कोणी बांधला ?
बाळापूरचा किल्ला औरंगजेबाचा मुलगा आलम शहाने बांधला.
अकोला जिल्ह्यातील कालन्का मातेचे मंदिर कोणत्या तालुक्यात आहे ?
अकोला जिल्ह्यातील कालन्का मातेचे मंदिर बार्शी टाकळी तालुक्यात आहे.