मित्रांनो भारत भ्रमंती मध्ये आज आपण पाहणार आहोत यवतमाळ जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा व विदर्भातील सर्वात मोठा जिल्हा आहे. पूर्वी या जिल्ह्याला ‘यवती’ म्हणून ओळखले जात होते. ब्रिटिश काळात हा जिल्हा वनी जिल्ह्याचे प्रमुख विभाग होता. 1905 मध्ये वनी चे नाव बदलून यवतमाळ असे ठेवण्यात आले.यवतमाळ जिल्हा हा अमरावती प्रशासकीय विभागात येत असून या जिल्ह्याला वाशिम, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, तेलंगणा राज्य,नांदेड, व हिंगोली या जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. तसेच या जिल्ह्यात 16 तालुके आहेत.Top 11 places to visit in Yavatmal District
या जिल्ह्यातील आर्णी येथील उत्खननात बृहदाश्मयुग – मौर्य काळातील वस्ती असल्याचे अवशेष मिळाले आहेत. या जिल्ह्यातून वर्धा,पैनगंगा, निरगुडा, पुस. आडन ,अरुणावती, रामगंगा,बेंबळा या नद्या वाहतात. शेती उत्पादनामध्ये या जिल्ह्यामध्ये ज्वारी, गहू, ऊस, आवळा, तूर, भुईमूग, कापूस, विड्याची पाने ही पिके घेतली जातात. या जिल्ह्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल्यामुळे या जिल्ह्याला ‘पांढरे सोने’ पिकवणारा जिल्हा म्हणूनही ओळखले जाते.
तसेच या जिल्ह्यातून दगडी कोळसा, चुनखडी,डोलोमाईट ही खनिजे सापडतात. या जिल्ह्यात अनेक ठिकाणी घोंगड्या व सतरंज्या विणण्याचे काम केले जाते. या जिल्ह्यात धरणे अभयारण्य आणि अनेक सांस्कृतिक, धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत.
Part-1-Top 11 places to visit in Yavatmal District
यवतमाळ जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-
1) चिंतामणी गणेश मंदिर-

Chintamani Ganesh Temple हे यवतमाळ जिल्ह्यातील महाराष्ट्रातील 21 गणेश पिठामधील एक आणि विदर्भातील अष्टविनायकापैकी एक असलेले प्राचीन व जागृत देवस्थान आहे. हे मंदिर यवतमाळ मधील कळंब या गावात असून गावाच्या सामान्य भूपाताळीपेक्षा सुमारे 35 फूट खोल आहे. या मंदिरातील गणपतीची मूर्ती ही साक्षात इंद्रदेवाने स्थापन केलेली आहे असे सांगितले जाते.
हे मंदिर चक्रवती नदीच्या काठावर असून मंदिराच्या प्रवेश द्वारातून 29 पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर समोर एक चिरेबंदी अष्टकोनी गणेश कुंड दिसते. या कुंडातून दर 12 वर्षांनी आपोआप पाणी वर येते. येथील मुख्य गाभाऱ्यातील श्री गणेशाची दक्षिणाभीमुखी मूर्ती ही साडेचार फूट उंच असून नयनरम्य आहे. यवतमाळ शहरापासून हे ठिकाण 23 किलोमीटर अंतरावर आहे.
2) श्री जगदंबा देवी मंदिर-

Shree Jagdamba Devi Temple हे यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर गावी असलेले जागृत देवस्थान आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले असून देवीची मूर्ती स्वयंभू आहे. या देवीची कुंतलापुरची भवानी म्हणूनही पुराणात उल्लेख आहे. जगदंबा मातेचे मंदिर खुनी नदीच्या काठावर, आणि वनसंपदेने बहरलेल्या परिसरात आहे. हे मंदिर आंध्र-महाराष्ट्र सीमेपासून 20 किमी अंतरावर असून जगदंबा मातेवर विदर्भ,आंध्र व तेलंगणातील भक्तांची प्रचंड श्रद्धा आहे. देवीच्या दर्शनाला भाविक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येतात. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथून 4 किमी अंतरावर केळापूर या ठिकाणी जगदंबा मातेचे मंदिर आहे.
3) हजरत कंबलपोश बाबा दर्गा-

Hajrat Kambalposh Baba Darga हा यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील अरुणावती नदीच्या किनाऱ्यावर असलेला प्रसिद्ध दर्गा आहे.दरवर्षी या ठिकाणी 5 ते 10 फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसाचा मोठा उर्स भरवला जातो. त्यावेळी विविध कार्यक्रम साजरे केले जातात. या यात्रेमध्ये हिंदू मुस्लिम आणि इतर धर्मीय सहभागी होतात.ही दर्गा सर्वधर्मीयांसाठी एक महत्वाचे ठिकाण असल्यामुळे या दर्ग्याला एक वेगळे महत्व आहे. तसेच आर्णी शहराला बाबा कंबलपोष नावानेही ओळखले जाते.
4) टिपेश्वर अभयारण्य-

Tipeshwar Sanctuary हे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात असलेले एक महत्त्वाचे वन्यजीव अभयारण्य आहे. हिरव्यागार वनराईत हे अभयारण्य 148.63 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले असून विविध प्रकारच्या वनस्पती आणि जैवविविधतेने बहरलेले आहे. हे अभयारण्य निसर्गरम्य आणि शांत असून येथे वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
तसेच या अभयारण्यात लांडगा, तरस, रानडुक्कर,नीलगाय, सांबर, चितळ, भेकर,वाघ, बिबट्या, अस्वल, रानगवा, सरपटणारे प्राणी, विविध प्रकारचे पक्षी आढळून येतात. तसेच येते पर्यटकांसाठी जंगल सफारीची सुविधा आहे.टिपेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे जैवविविधतेने समृद्ध संरक्षित क्षेत्र आहे. यवतमाळ शहरापासून हे अभयारण्य 61 किलोमीटर अंतरावर आहे.
5) सहस्रकुंड धबधबा-

Sahastrakund Waterfall हा यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीवर निसर्गरम्य परिसरात असलेला एक धबधबा आहे. हा धबधबा मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असून या धबधब्याचे पाणी 30-40 फूट उंचीवरून खाली पडते, त्यामुळे उडणारे तुषार आणि कोसळणाऱ्या धबधब्याचा एकसूरी आवाज पर्यटकांना आकर्षित करतो. या धबधब्याचा अलीकडचा भाग उमरखेड तालुक्यात येतो तर पलीकडचा भाग नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात येतो. तसेच या धबधब्याजवळ एक महादेवाचे मंदिर आहे. हा धबधबा उमरखेड पासून 70 किलोमीटर अंतरावर आहे.
Visit our website: allindiajourney.com
6) रंगनाथ स्वामी मंदिर-

Rangnath Swami Temple हे यवतमाळ जिल्ह्यातील निरगुडा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या वणी या ठिकाणी असलेले प्रसिद्ध मंदिर आहे. लाखो भाविक या ठिकाणी फाल्गुन ते चैत्रशुद्ध 15 च्या दरम्यान दर्शनासाठी येतात. येथील मंदिर परिसर अत्यंत रमणीय व शांत आहे. या मंदिरात श्री रंगनाथ स्वामी म्हणजेच श्री विष्णूची मूर्ती आहे. याशिवाय या मंदिरामध्ये अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. यवतमाळ पासून हे ठिकाण 110 किलोमीटर अंतरावर आहे.
7) श्री घंटी बाबा मंदिर-

Shree Ghantibaba Temple हे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यात असणारे एक प्रेक्षणीय तीर्थस्थळ आहे. घंटी बाबा हे दिग्रस गावचे ग्रामदैवत असून घंटी बाबा चे मूळ कोणते हे कोणालाच माहीत नाही. ते पंजाब वरून भ्रमण करीत या ठिकाणी आले असे सांगितले जाते. ते गावातील पिंपळाच्या झाडाखाली बसून तपश्चर्या करत असत. पूजाअर्चा करताना त्यांना घंटी वाजवण्याची सवय होती. त्यावरून त्यांना ‘घंटीवाले बाबा’ असे नाव पडले.
भक्तांच्या अडचणी दूर करणारे अशी ओळख बाबांची असल्याने भक्त इथे दर्शनासाठी आवर्जून येतात. बाबांनी समाधी घेतलेल्या ठिकाणी भक्ताने मोठे मंदिर बांधले आहेत. दर गुरुवारी या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. तसेच वर्षभर या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
8) बेंबळा धरण-

Bembla Dam हे यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यात खडक सावंगा गावात बेंबळा नदीवर आहे. यवतमाळ जिल्ह्यातील हे सर्वात मोठे धरण असून या धरणाला 16 दरवाजे आहेत. हे धरण 2007 साली बांधले असून हे धरण 113 किलोमीटर मध्ये पसरलेले आहे. या धरणाची उंची 117 फूट उंच आहे तर या धरणाची लांबी 974 फूट एवढी आहे. हा धरण परिसर निसर्गरम्य आहे. या धरणाचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी आणि सिंचनासाठी केला जातो. यवतमाळ शहरापासून हे ठिकाण 27 किलोमीटर अंतरावर आहे.
9) ऑक्सीजन पार्क-

Oxygen Park हे यवतमाळ जिल्ह्यातील निसर्गाच्या सानिध्यात असलेले सुंदर पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्यायाम योग धारणा करू शकतात. आपल्या आयुष्यात वन मोठे की धन मोठे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. जगातील संपूर्ण संपत्ती गोळा केली तरी सहा महिन्यांचा ऑक्सीजन आपण विकत घेऊ शकत नाही. मात्र झाडे आपल्याला आयुष्यभर मोफत ऑक्सीजन देतात. त्यामुळे जगण्यासाठी धनापेक्षा वनसंपत्ती महत्वाची आहे या दृष्टिकोनातून वनविभागाने या ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली आहे.
10) श्री मनदेव देवस्थान-

Shree Mandev Devsthan हे यवतमाळ जिल्ह्यातील मनपूर या ठिकाणी असलेले प्राचीन, जागृत, धार्मिक शिवालय आहे. हे मंदिर निसर्गरम्य परिसरात असून हेमाडपंती शैलीत बांधलेले आहे. हे मंदिर 900 वर्षापूर्वीचे असून 1155 मध्ये रामदेव राय यादव यांच्या काळात बांधल्याचे सांगितले जाते.या मंदिराच्या बांधकामात यादव घराण्याचे पंतप्रधान हेमाद्री पंत यांनी मदत केली होती. तसेच हे मंदिर महादेवाच्या साडेतीन पीठांपैकी मनदेव हे एक पीठ आहे. या मंदिर परिसरात साईबाबा आणि मारुतीचे मंदिर आहे. यवतमाळ पासून हे मंदिर 15 किलोमीटर अंतरावर आहे.
11) श्रीराम मंदिर पुसद-

Shreeram Temple हे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात हटकेश्वर वार्डमध्ये असलेल्या प्राचीन तीर्थस्थळ आहे. हे मंदिर तीनशे वर्षे जुने आहे. हे मंदिरा ज्या ठिकाणी आहे त्या जागेचे मालक रामचंद्र पंडित पुसद यांनी तुकाराम बाळंभट रा.निंबी पारडी यांना ही 700 चौरस फूट जागा 1916 मध्ये दान केली होती. या मंदिरात प्राचीन काळापासून राम जन्मोत्सव साजरे करण्याचे परंपरा आजपर्यंत चालू आहे. या मंदिरात प्राचीन काळातील रामलल्ला जानकी आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. भाविक या मंदिरात मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात.
1) यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा धरण कोणत्या नदीवर आहे?
यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा धरण बेंबळा नदीवर आहे.
2)यवतमाळ जिल्ह्यातील घंटी बाबा मंदिर कोणत्या तालुक्यात आहे?
यवतमाळ जिल्ह्यातील घंटी बाबा मंदिर दिग्रस तालुक्यात आहे.
3)यवतमाळ जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे?
यवतमाळ जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा पैनगंगा नदीवर आहे.