धुळे जिल्हा माहिती-
धुळे जिल्हा हा एक महाराष्ट्रातील महत्वपूर्ण जिल्हा आहे.1998 मध्ये धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार जिल्हाची निर्मिती करण्यात आली. पूर्वी हा जिल्हा खानदेश म्हणून ओळखला जायचा. धुळे शहर हे धुळे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. शुद्ध दुधाचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. तसेच या जिल्ह्यामध्ये दौडाई या एकमेव ठिकाणी मक्यापासून ग्लुकोज साखर व खाद्यतेल बनवले जाते. धुळे जिल्ह्याची प्रमुख बोलीभाषा ही अहिराणी, खानदेशी आहे. या जिल्ह्याच्या वायव्य बाजूस गुजरातचे डांग, भडोच व सुरत हे जिल्हे आहेत. तर उत्तर बाजूला मध्यप्रदेशचा नेमाड जिल्हा आहे.Top 15 Places visit to in Dhule District
आणि पूर्वेला जळगाव व दक्षिणेला नाशिक जिल्ह्या आहेत. या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 8063 एवढे कि.मी. आहे. या जिल्ह्याचा बराचसा भाग हा डोंगराळ असून काही भाग हा तापी नदीच्या खोऱ्यामध्ये आहे. प्राचीन ग्रंथांमध्ये धुळे जिल्ह्याचा उल्लेख हा धुलीकापटनम असा केलेला आहे. या जिल्ह्यामध्ये काटकोनात एकमेकांना छेद देणारे उभे आणि आडवे रस्ते आणि उपरस्ते अशी येथील रस्त्यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण वाटते. जिल्ह्याचे तापमान उष्ण व कोरडे आहे.
या जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय शेती असून मिरची, ज्वारी,बाजरी, कापूस, ऊस,भात, केळी, द्राक्ष ही पिके घेतली जातात. या जिल्ह्याच्या वनांमध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती आढळून येतात. तसेच येथे येणाऱ्या गावता मध्ये ‘रोशा’ हे गवत औषधासाठी व सुगंधी मालासाठी वापरले जाते. या जिल्ह्याची प्रमुख नदी तापी असून अनेक उपनद्या आहेत. तसेच येथील जंगलांमध्ये मध, मेण, राळ, लाख, चारोळ्या अशा अनेक प्रकारचा रानमेवा मिळतो.
धुळे जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे-
1) लळिंग किल्ला-

धुळे जिल्ह्यातील लळिंग किल्ला हा गाळणा टेकडीवर असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून 593 मीटर उंचीवर हा किल्ला वसलेला आहे. तेराव्या शतकामध्ये फारुखी राजवटीत या किल्ल्याचे खूप महत्त्वाचे स्थान होते. या किल्ल्यावर मोगल,निजाम,मराठे,इंग्रज यांनी राज्य केलेले आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी लळींग गाव आहे तेथूनच किल्ल्याकडे पायवाट जाते.
या किल्ल्यावर मोगल शैलीचा वापर केलेला दिसून येतो. किल्ल्यावर पाण्याचे टाके आणि धान्य कोठारे आहेत. तसेच किल्ल्याच्या पायथ्याच्या जवळ एक घुमट आहे. तसेच किल्ल्याच्या जवळपास कुरण, लांडोर बंगला ही ठिकाणी आहेत. येथील लांडोर बंगल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1937 मध्ये काही दिवस वास्तव्य केले होते. सध्या ह्या किल्ल्याची थोड्या प्रमाणात पडझड झाली आहे. धुळे शहरापासून हा किल्ला नऊ किलोमीटर अंतरावर आहे.
2)थाळनेर किल्ला-

थाळनेर किल्ला हा धुळे जिल्ह्यातील तापी नदीच्या किनाऱ्यावर आहे. हा किल्ला पूर्वी व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी वापरला जात होता. मलिकवर खान यांनी 1370 मध्ये फिरोजशहा तुगलक यांच्याकडून हा किल्ला जिंकून घेतला. या किल्ल्याचा आकार हा त्रिकोणी असून एका बाजूला तापी नदी तर दुसऱ्या बाजूला बुरुज आणि तटबंदी आहे. मराठा, मोगल आणि इंग्रजांनी या किल्ल्यावर राज्य केले आहे. तसेच फारुकी घराण्यातील व्यक्तींच्या कबरी या ठिकाणी पहावयास भेटतात. शिरपूर -चोपडा मार्गावर थाळनेरचा किल्ला आहे. व येथून जवळच अनेर अभयारण्य आहे.
3) नकाने तलाव-

नकाने तलाव हा धुळे जिल्ह्यातील महत्वपूर्ण तलाव आहे. या तलावातून अर्ध्या धुळे शहराला पाणीपुरवठा केला जातो.या तलाव परिसरात निसर्गरम्य वातावरण आणि शांततेचा अनुभव मिळतो. पर्यटकांसाठी या ठिकाणी विश्रांतीगृह आणि येथे वनश्रीने नटलेला परिसराचा आनंद घेण्यासाठी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. या तलावाच्या ठिकाणी अनेक धार्मिक मंदिरे व स्थळे आहेत. या तलावावर अनेक प्रकारचे पक्षी पहावयास भेटतात. डोंगर रांगातून येणारे पाणी या तलावात जमा होते. या तलावावर बोटिंग आणि मासेमारी देखील केली जाते.
Please visit our website: Allindiajourney.com
4)सोनगीर किल्ला-

धुळे जिल्ह्यातील सोनगीर किल्ला हा सुभेदार अहमद फारुकी याने बांधला होता. आग्रा महामार्गावर सोनगीर गावाजवळच हा किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी अनेक घरे आहेत. तेथूनच दहा किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे.याची तटबंदी रचिव दगडामध्ये बांधलेले असून त्या ठिकाणी जमिनीखालील हौद बांधलेले आहेत. त्यामध्ये पूर्वी तेल व तूप साठवले जायचे. या हौदांना ‘तेल टाके’ आणि ‘तूप टाके’ असे म्हणतात. या किल्ल्यावर पिण्याच्या पाण्यासाठी खडकामध्ये एक खोल टाके खोदलेले आहे. या किल्ल्यावर गुप्तधन असल्याची चर्चा आजही होत असते. तसेच या किल्ल्यावर शत्रूपासून बचावासाठी बांधलेले 17 किलोमीटर लांबीचे एक भुयार आहे. हा किल्ला धुळे शहरापासून 19 किलोमीटर अंतरावर आहे.
5) अहिल्यापुर-

अहिल्यापूर हे शिरपूर तालुक्यातील एक गाव आहे. या ठिकाणी राणी अहिल्याबाई होळकर यांनी एक मोठी विहीर बांधली होती. जी आपणास आजही पाहावयास भेटते. त्यामुळे या ठिकाणाला एक ऐतिहासिक महत्त्व आहे.अहिल्यापूर हे ठिकाण धुळे शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे.
6) गुरुद्वारा-

गुरुद्वारा हे शीख बांधवांचे असलेले प्रार्थनास्थळ नांदेड येथे आहे. तसेच मुंबई आग्रा महामार्गावर धुळे शहरात हे सर्वात मोठे गुरुद्वारा आहे.इ. स. 1963 मध्ये संत बाबासाधूसिंग मोनी यांनी या गुरुद्वाराची स्थापना केली होती.या गुरुद्वाराला भेट देण्यासाठी देशभरातून अनेक पर्यटक येत असतात.हे ठिकाण धुळे बस स्थानकपासून 4 कि. मी. अंतरावर आहे.
7)श्री समर्थ वाग्देवता मंदिर –

श्री समर्थ वाग्देवता मंदिरची स्थापना 1932 मध्ये नानासाहेब देव यांनी केली. समर्थ रामदास स्वामींच्या साहित्याचे संशोधन व जतन करण्याच्या उद्देशाने या मंदिराची स्थापना करण्यात आली. या ठिकाणी 800 वर्षांपूर्वी चे जुनी कागदपत्रे पाहावयास भेटतात. हे भव्य मंदिर धुळे मालेगाव रोडवर आहे. या संस्थेमध्ये अस्सल कागदपत्रांचा खजिनाच आहे. धुळे पासून हे मंदिर दोन किलोमीटर अंतरावर आहे.
8) अनेर धरण अभयारण्य-

अनेर धरण अभयारण्य हे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये असून अनेर नदीच्या धरणाजवळ आहे. अनेर नदी ही तापी नदीची उपनदी आहे.83 चौरस किलोमीटर क्षेत्रात हे अभयारण्य पसरलेले आहे.हे अभयारण्य नाशिकच्या प्रशासकीय विभागात येते. या धरणाचा परिसर निसर्ग समृद्धीने बहरलेला आहे. 1986 मध्ये अनेर धरणाचा परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला.
सातपुडा पर्वतीच्या पायथ्याशी हे अभयारण्य असून हा परिसर निसर्गाने आणि वनश्रीने नटलेला आहे. या ठिकाणी अनेक आदिवासी जमाती वास्तव्य करून आहेत. या धरणाला दहा दरवाजे असून धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 0.36 टीएमसी इतकी आहे. या अभयारण्यामध्ये खूप प्रकारचे पक्षी, वन्यजीव प्राणी पहावयास भेटतात. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक तसेच शैक्षणिक सहली येतात.
शिरपूर तालुक्यापासून हे ठिकाण आठ किलोमीटर अंतरावर आहे.
9) भामेर किल्ला-

भामेर किल्ला हा गिरीदुर्ग प्रकारतील असून समुद्र सपाटीपासून 2500 मीटर उंचीवर आहे. हा किल्ला धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील भामेर या गावाजवळ आहे. भामेर किल्ला हा आहेर राजाची राजधानी होता. या किल्ल्याच्या तीन बाजू गावाला वेढलेल्या आहेत तर चौथ्या बाजूला तटबंदी व प्रवेशद्वार आहे. किल्ल्यावर 184 गुफा असून त्यातील काही गुफा आपल्याला पाहायला भेटतात. किल्ल्यावर पाण्याचे टाके व छोटेसे मंदिर आहे. किल्ल्यापासून थोड्या अंतराव बळसाने येथे जैन धर्मियांचे प्रसिद्ध असे धार्मिक स्थळ आहे.साक्री शहरापासून हा किल्ला 13 किलोमीटर अंतरावर आहे.
10) राजवाडे संशोधन मंडळ संग्रहालय-

राजवाडे संशोधन मंडळ संग्रहालय ही संस्था धुळे शहराच्या मध्यभागी आहे. वि. का. राजवाडे यांनी या ग्रंथालयाची निर्मिती 1927 मध्ये केली.या वस्तू संग्रहालयामध्ये वी.का.राजवाडे यांनी जमा करून ठेवलेले ऐतिहासिक दस्तऐवज व ग्रंथसंपदा संशोधकांना उपलब्ध करून दिले जाते. तसेच या ठिकाणी संस्कृत, मोडी, मराठी, हिंदी भाषेतील कागदपत्रे,दुर्मिळ ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह आणि शिलालेख राजवाडे संशोधन मंडळात पहावयास भेटतात. या ठिकाणी एक ग्रंथालय देखील आहे त्यामध्ये 25 हजारापेक्षा जास्त ग्रंथ आहेत. देशातीलच नाही तर विदेशातीलही संशोधक येथे संशोधनासाठी येतात. धुळे बस स्थानकापासून हे ग्रंथालय एक किलोमीटर अंतरावर आहे.
11) एकविरा माता मंदिर-

एकविरा माता मंदिर हे धुळे जिल्ह्यातील पांझरा नदीच्या काठावर देवापुर भागात आहे. या देवीला खानदेश ची कुलस्वामिनी म्हणून ओळखले जाते. हे मंदिर पूर्वाभीमुखी असून हेमाडपंती शैलीचे आहे.देवीची मूर्ती ही शेंदूर लिपीत असून पद्मासनात बसलेली स्वयंभू मूर्ती आहे. या मंदिरात साडेचार फुटाच्या दोन समयामध्ये नंदादीप सतत तेवत असतो. आदिमाया एकवीरा देवीचे हे स्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. ही देवी अनेक राज्यातील म्हणजे राजस्थान,कर्नाटक, गुजरात येथील भाविक लोकांची कुलदेवता आहे. धुळे बस स्थानकापासून हे मंदिर 35 किलोमीटर अंतरावर आहे.
12)स्वामीनारायण मंदिर –

स्वामीनारायण मंदिर हे धुळे शहरातील देवपूर येथे असलेले अत्यंत सुंदर रमणीय व कलात्मक मंदिर आहे. मंदिरातील रेखीव काम आणि मंदिर परिसर अतिशय शांत व स्वच्छ आहे. ज्येष्ठ चित्रकार श्री वासुदेव कामत यांनी श्री स्वामीनारायण यांच्या जीवनपटावर आधारित जिवंत चित्रे या मंदिरात रेखाटलेली आहेत. देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. धुळे शहरापासून हे मंदिर चार किलोमीटर अंतरावर आहे.
13) कालिका देवी मंदिर-

कालिका देवी मंदिर हे धुळे जिल्ह्यातील शिरूड मध्ये आहे. हे मंदिर हेमाडपंती शैलीत बांधलेले असून कालीका देवी ही 53 कुळांची कुलदेवी आहे. राज्य शासनाने या मंदिराला संरक्षित स्मारकाचा दर्जा दिलेला आहे. हे मंदिर बाराव्या शतकामध्ये बांधलेले आहे.येथील मंदिर परिसर नैसर्गिक व शांत आहे. नवरात्रीमध्ये नऊ दिवस या ठिकाणी मोठा उत्सव भरतो. धुळे शहरापासून हे ठिकाण एक किलोमीटर अंतरावर आहे.
14) अक्कलपाडा धरण-

अक्कलपाडा हे पांझरा नदीच्या काठावर वसलेले शहर धुळे जिल्ह्यातील धरण आहे. पांझरा आणि कान नदीवर बांधलेल्या अक्कलपाडा धरणामुळे अक्कलपाडा शहराची ओळख आहे. संपूर्ण धुळे जिल्ह्यातील शेती सिंचनासाठी या धरणातील पाण्याचा वापर केला जातो. या धरणामुळे धुळे जिल्ह्यातील बराचसा शेतीचा भाग ओलीताखाली आलेला आहे. येथील धरण परिसर निसर्गरम्य असून येथे वेगवेगळे प्रकारचे पक्षी आणि प्राणी पहावयास भेटतात. धुळे शहरापासून हे ठिकाण 36 किलोमीटर अंतरावर आहे.
15) कपिलेश्वर महादेव मंदिर-

कपिलेश्वर महादेव मंदिर हे धुळे व जळगाव जिल्ह्यातील सीमारेषेवर निंब मुडावद या ठिकाणी आहे. तसेच हे पवित्र तीर्थक्षेत्र शिरपूर, शिंदखेडा, आणि अमळनेर तालुक्याच्या सीमारेषेवर येते.
हे मंदिर 1000 वर्षांपूर्वीचे असून पांझरा व तापी नदीच्या संगमावर आहे. कपिल मुनीनी या ठिकाणी तपश्चर्या करून महादेवाच्या पिंडीची स्थापना केली होती. नंतर राणी अहिल्याबाई होळकर यांनी 17 व्या शतकामध्ये हे मंदिर बांधले. धुळे शहरापासून हे मंदिर 52 किलोमीटर अंतरावर आहे.

1)लळिंग किल्ला कोणत्या टेकडीवर आहे?
लळिंग किल्ला गाळणा टेकडीवर आहे.
2)कपिलेश्वर मंदिर कोणत्या नदीच्या संगमावर आहे?
कपिलेश्वर मंदिर पांझरा व तापी नदीच्या संगमावर आहे.
3)धुळे जिल्ह्यातील स्वामीनारायण मंदिर कोणत्या ठिकाणी आहे?
धुळे जिल्ह्यातील स्वामीनारायण मंदिर देवपूर या ठिकाणी आहे.
1)लळिंग किल्ला कोणत्या टेकडीवर आहे?
लळिंग किल्ला कोणत्या टेकडीवर आहे.
2)कपिलेश्वर मंदिर कोणत्या नदीच्या संगमावर आहे?
कपिलेश्वर मंदिर पांझरा व तापी नदीच्या संगमावर आहे.