इडुक्की जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे- Top 27 places to visit in Idukki district 

भारतभ्रमंती या वेबसाईटवर तुम्ही इंग्लिश, हिंदी आणि मराठी भाषेत, भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे पाहू शकता. आता तुम्ही पाहणार आहात देवभूमी केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे. इडुक्की जिल्हा हा केरळमधील पश्चिम घाटात वसलेला निसर्गरम्य व सर्वात मोठा जिल्हा आहे. निसर्गप्रेमींसाठी नंदनवन असलेला हा जिल्हा घनदाट जंगले, उंच पर्वतरांगा, हिल स्टेशन, धबधबे आणि वन्यजीव अभयारण्य, मसाल्यांच्या बागा, आणि आशियातील सर्वात मोठ्या कमानी धरणासाठी व चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. 26 जानेवारी 1972 रोजी निर्मित या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र ‘पैनाव’ आहे. या जिल्ह्यात देविकुलम, उडुंबनचोला, थोडुपुझा, पीरुमाडे आणि इडुक्की हे 5 तालुके असून याला ‘केरळची मसाल्यांची बाग’ म्हणून ओळखले जाते. Top 27 places to visit in Idukki district 

केरळ राज्याच्या वीज गरजेपैकी सुमारे 66% वीज निर्मिती एकट्या इडुक्की जिल्ह्यातील पेरियार नदीवरील जलविद्युत प्रकल्पांतून होते. या जिल्ह्यातून पंबा नदीचा उगम झाला असून पेरियार, थलायर आणि थोडुपुझायर या मुख्य नद्या आहेत. केरळमधील चारी बाजूंनी पर्वतांनी वेढलेल्या या जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आहे. आणि येथील विशेष आकर्षण म्हणजे येथे 12 वर्षांनी फुलणारे प्रसिद्ध ‘नीलकुरंजी’ फूल आढळते. दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर अनामुडी (2,695 मीटर) याच जिल्ह्यात आहे. आणि येथील अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर (मिरी, वेलची, चहा, कॉफी) अवलंबून आहे. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक, अद्भुत व अद्वितीय पर्यटन स्थळे आहेत.

Top 27 places to visit in Idukki district 

इडुक्की जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे

1)Annamalai Temple-

Top 27 places to visit in Idukki district 

अन्नामलाई मंदिर हे केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील, कारिकोडे येथील भगवान शिवाचे प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आहे.हे मंदिर 1800 वर्षे जुने असून याचे बांधकाम चोल शैलीतील वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. येथे नऊ ग्रहांचे प्रतीक असलेली ‘नवग्रह जाळी खिडकी’ आणि पंचभूतांचे (पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश) प्रतीक असलेली पाच जाळ्यांची खिडकी हे या मंदिराचे मुख्य आकर्षण आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान शंकराची धातू आणि दगडापासून बनवलेली मूर्ती आहे. व मंदिराच्या आवारात असलेल्या पायविहीरीतील पाणी दुष्काळातही कधी आटत नाही असे सांगितले जाते. या मंदिराशी संबंधित अनेक जुनी शिल्पे आणि पितळी भांडी कोझिकोड आणि त्रिशूर येथील संग्रहालयांमध्ये जतन करून ठेवण्यात आली आहेत. सध्या हे मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाच्या अखत्यारीत आहे.

2)Ashley Bungalow-

एशले बंगलो हा केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील, कुट्टिक्कानम येथील निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. हा बंगला समुद्रसपाटीपासून 3500 फूट उंचीवर असून चहाच्या मळ्यांमध्ये आहे. 1868 मध्ये ‘बेकर’ कुटुंबाने हा बंगला बांधला होता. पीरमेडू परिसरातील हा बंगला सर्वात जुना बागायतदार बंगल्यांपैकी एक आहे. ब्रिटीश राजवटीतील उत्कृष्ट सुतारकामाचे उदाहरण असलेला हा बंगला स्थानिक शैली आणि ब्रिटीश वास्तुकलेचे मिश्रण आहे. यामध्ये पाच बेडरुम्स असून प्रत्येक खोलीत शेकोटी आहे. या बंगल्याच्या दक्षिणेला पाईन, सायकस आणि ब्ल्यू गमच्या झाडांनी वेढलेली एक मोठी बाग आहे. पर्यटकांना येथून दरीचे सुंदर दृश्य, पाइन, सायप्रस आणि निलगिरीची दाट झाडे व हिरवळ, पक्ष्यांचा किलबिलाट आणि संध्याकाळचा सूर्यास्त याचा आनंद घेता येतो.

Visit our website: allindiajourney.com

3)Munnar-

मुन्नार हे केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील, एक अत्यंत लोकप्रिय आणि निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 1800 मीटर उंचीवर वसलेले असून येथे चहाचे मळे, धुके भरलेली दरी, धबधबे आणि अल्हाददायक हवामान आहे. मुन्नार शहर हे मुथिरपुझा, नल्लाथन्नी आणि कुंडाला या तीन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे व येथे अनेक पाहण्यासारखी ठिकाणे आहेत, त्यामध्ये दुर्मिळ ‘निलगिरी तहर’ प्राणी असलेला एराविकुलम नॅशनल पार्क, चहाचे मळे आणि टाटा टी कडून चालवले जाणारे चहाचे संग्रहालय, सर्वोच्च शिखर ‘आनामुडी’, मट्टुपेट्टी धरण, इको पॉईंट आणि टॉप स्टेशन, अट्टुकल धबधबा आणि 12 वर्षातून एकदाच फुलणारी नीलकुरिंजी फुले ही पर्यटन स्थळे आहेत. निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी इडुक्की जिल्ह्यातील हे एक उत्तम ठिकाण आहे.

4)Thekkady-

थेक्कडी हे केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील,प्रसिद्ध हिल स्टेशन आणि वन्यजीव पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे ठिकाण पेरियार राष्ट्रीय उद्यान, ट्रेकिंग, विस्तीर्ण मसाल्याचे मळे आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. येथील पेरियार वन्यजीव अभयारण्य सांबर, जंगली डुक्कर, गवे, सिंह-पुच्छ मकाक, विविध प्रकारचे पक्षी, वाघ आणि हत्तींसाठी प्रसिद्ध आहे. आणि या अभयारण्याच्या मध्यावर असलेल्या पेरियार तलावात नौकाविहाराचा आनंद घेताना जंगली प्राणी पाहण्याची संधी मिळते. थेक्कडी येथे वेलची, मिरी, चहा आणि कॉफीचे विस्तीर्ण मळे आहेत. पर्यटकांसाठी येथे ‘स्पाइस टूर’, बांबू राफ्टिंग, ट्रेकिंग, नाईट सफारी आणि हत्तीवरून फेरफटका मारणे या लोकप्रिय सुविधा आहेत. हे निसर्गरम्य ठिकाण पर्यटकांसाठी स्वर्ग मानले जाते.

5)Vagamon-

वागमोन हे केरळच्या इडुक्की आणि कोट्टायम जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले एक अतिशय सुंदर आणि शांत हिल स्टेशन आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 1,100 मीटर उंचीवर असून पाइन जंगले, हिरवेगार कुरण आणि चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. व ‘आशियातील स्कॉटलंड’ म्हणूनही ओळखले जाते. येथे थंगल हिल, मुरुगन हिल आणि कुरीसुमाला या तीन प्रसिद्ध टेकड्या आहेत. ज्या मुस्लिम, हिंदू आणि ख्रिश्चन धर्माचे प्रतीक आहेत. व येथील उंच पाइन वृक्षांचे घनदाट जंगल पर्यटकांना फोटो आणि शांत फेरफटका मारण्यासाठी अत्यंत प्रिय आहे. तसेच येथील विस्तीर्ण पसरलेली हिरवीगार कुरणे आणि टेकड्यांचे नयनरम्य दृश्य पर्यटकांना भुरळ घातल्याशिवाय राहत नाही. पर्यटक येथे पॅराग्लायडिंग ट्रेकिंग आणि रॉक क्लाइंबिंगचा आनंद घेतात.

6)Peerumedu-

पीरुमेडू हे केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील, पश्चिम घाटात वसलेले एक सुंदर आणि थंड हवेचे ठिकाण आहे. हे ठिकाण चहा, कॉफी आणि मसाल्यांच्या बागांसाठी प्रसिद्ध. असून समुद्रसपाटीपासून सुमारे 915 मीटर उंचीवर आहे. आणि येथील हवामान वर्षभर आल्हादायक असते. या ठिकाणाचे नाव सुफी संत पीर मोहम्मद यांच्यावरून पडले आहे. पूर्वी हे ठिकाण त्रावणकोरच्या महाराजांचे उन्हाळी निवासस्थान होते. येथील ‘अम्माचिक्कोट्टारम’ हा राजवाडा आजही प्रसिद्ध आहे. पीरुमेडूमध्ये पाहण्यासारख्या ठिकाणांमध्ये पाइनची जंगले, थ्रिसंकू हिल्स, सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या मनमोहक दृश्य, पीरु हिल्स, पट्टुमला येथे सुंदर चहाचे मळे आणि एक प्रसिद्ध चर्च, वाघामोन हिल स्टेशन, आणि नल्लाथन्नी, मेलोरम व वलांजमकनम असे अनेक धबधबे येथे पाहता येतात. पर्यकांसाठी हे ट्रेकिंग आणि पिकनिकसाठी उत्तम ठिकाण आहे.

7)Idukki Arch Dam-

इडुक्की आर्च धरण हे केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील, पेरियार नदीवर बांधलेले आशियातील पहिले आणि जगातील महत्त्वाच्या कमान धरणांपैकी एक आहे. हे एक ‘डबल कर्वेचर पॅराबोलिक’ कमान धरण आहे. या धरणाची उंची 168.91 मीटर असून ते भारतातील तिसरे सर्वात उंच धरण आहे. हे धरण इडुक्की जिल्ह्यातील कुरवनमाला आणि कुरथीमाला या दोन ग्रॅनाईट डोंगरांच्या दरम्यान बांधलेले आहे. या धरण प्रकल्पाचे उद्घाटन 17 फेब्रुवारी 1976 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केले होते. आणि या जागेचा शोध 1922 मध्ये आरया जमातीचे प्रमुख कोलंबन यांनी लावला होता, व त्यांनी या डोंगरांच्या मधून वाहणाऱ्या पाण्याचा मार्ग दाखवला होता. हे धरण केरळ राज्य विद्युत मंडळाच्या (KSEB) मालकीचे असून, याद्वारे 780 मेगावॅट जलविद्युत निर्मिती केली जाते.
आणि साठवलेले पाणी मूळमट्टम येथील भारतातील सर्वात मोठ्या भूमिगत पॉवर हाऊसमध्ये वीज निर्मितीसाठी वापरले जाते. इडुक्की, चेरुथोनी आणि कुलामावू या तीन धरणांमुळे 60 चौरस किमीचा एक विशाल कृत्रिम तलाव तयार झाला आहे.

8)Eravikulam National Park-

एराविकुलम राष्ट्रीय उद्यान हे केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील, मुन्नारजवळील अत्यंत निसर्गरम्य आणि महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. दक्षिण भारतातील हे ठिकाण लुप्तप्राय ‘निलगिरी ताहर’ या दुर्मिळ पर्वतीय शेळीच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य आहे. केरळमधील हे पहिले राष्ट्रीय उद्यान असून 97 चौ. किमी क्षेत्रात पसरलेले आहे. हे ठिकाण नीलकुरिंजीच्या निळ्या-जांभळ्या फुलांच्या चादरीने व्यापले जाते, आणि दक्षिण भारतातील ‘अनामुडी’ सर्वात उंच शिखर याच उद्यानाच्या परिसरात स्थित आहे. तसेच येथे चहाच्या मळ्यांचे आणि धुक्याने वेढलेल्या डोंगरांचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळते. सध्या हे ठिकाण युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे.

9)Mangala Devi Kannagi Temple-

मंगलादेवी कन्नगी मंदिर हे हे केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील, अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर पेरियार व्याघ्र प्रकल्पाच्या घनदाट जंगलात, समुद्रसपाटीपासून 1337 मीटर उंचीवर वसलेले असून 1000 वर्षे जुने आणि नैसर्गिक सौंदर्याचे एक पवित्र स्थान आहे. या मंदिराची वास्तुकला,पांड्य स्थापत्यशैलीत, दगडी शिल्पे आणि अवशेषांनी सुशोभित आहे. मंदिर संकुलात भगवान शिव आणि भगवान गणपती यांच्यासह विविध मूर्ती आहेत. ‘कन्नगी’ (मंगलादेवी) यांना समर्पित हे मंदिर न्याय आणि पतीव्रतेचे प्रतीक मानले जाते. आणि कन्नगी ही तमिळ महाकाव्य ‘सिलप्पतिकारम’मधील मुख्य नायिका आहे. हे मंदिर वर्षभर बंद असते आणि दरवर्षी एप्रिलमध्ये येणाऱ्या चित्रा पौर्णिमेच्या दिवशी, केरळ आणि तामिळनाडूच्या हजारो भक्तांसाठी हे मंदिर दर्शनासाठी उघडले जाते.

10)Kalvari Mount Viewpoint-

कलवरी माउंट हे केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील,एक अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य व्ह्यूपॉइंट आहे. व ‘कल्याणथंडू’ म्हणूनही ओळखले जाते. हे ठिकाण प्रसिद्ध ख्रिश्चन तीर्थक्षेत्र आहे. ‘लेंट’ काळात येथे मोठ्या संख्येने भाविक डोंगरावरील क्रुसाच्या वाटेने जातात. येथून इडुक्की जलाशयाचे विहंगम दृश्य, आजूबाजूच्या हिरव्यागार टेकड्या, आणि कामक्षी व मरियापुरम ही गावे दिसतात. प्रसिद्ध मल्याळम चित्रपट ‘इडुक्की गोल्ड’चे चित्रीकरण येथेच झाले आहे. हे ठिकाण निसर्गप्रेमी, फोटोग्राफर आणि ट्रेकर्ससाठी एक उत्तम ठिकाण असून येथे शांतता हिरवळ आणि धुक्याची दरी पाहता येते. हे ठिकाण इडुक्की शहरापासून 10 किमी आणि मुन्नारपासून 55 किमी अंतरावर आहे.

11)Kulamavu Dam-

कुलमावू धरण हे केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील,पेरियार नदीच्या उपनदी किलिविल्लिथोड नदीवर बांधलेले एक महत्त्वाचे गुरुत्वाकर्षण धरण आहे. दगडी बांधकाम असलेले हे धरण प्रसिद्ध इडुक्की हायड्रो-इलेक्ट्रिक प्रकल्पाचा (IHEP) एक अविभाज्य भाग असून, इडुक्की आर्च डॅम आणि चेरुथोनी डॅम हा मिळून 33 चौ. किमीचा एक भव्य जलाशय आहे. याचे बांधकाम 1977 मध्ये पूर्ण झाले असून या जलाशयातील पाण्याचा वापर मूलमट्टम येथील भूमिगत वीज निर्मिती केंद्रात 780 मेगावॅट वीज तयार करण्यासाठी केला जातो. समुद्रसपाटीपासून 3’000 फूट उंचीवर असलेल्या या परिसरात चहा, कॉफी आणि वेलचीच्या बागा, पक्षी निरीक्षण, किल्लीवली व्ह्यू पॉइंट ही अत्यंत सुंदर, निसर्गरम्य व प्रेक्षणीय ठिकाणे आहेत.

12)Ganesha Temple Vandanmedu-

वंदनमेडू श्री महागणपती मंदिर हे केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील, थेक्कडी-मुन्नार रस्त्यावर, अयार जवळील दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या गणपती मूर्तीसाठी प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात गणपतीची 38 फूट उंच भव्य मूर्ती आहे. या भव्य मूर्तीचे शिल्पकार चेर्तला एरामल्लूर सदानंदन आहेत. त्यांनी ही मूर्ती सिमेंट आणि वायरचा वापर करून 6 वर्षांत तयार केली. 1960 मध्ये वनविभागाच्या एका कर्मचाऱ्याला या ठिकाणी ही मूर्ती दिसली होती. त्यानंतर येथे शेड उभारून मंदिराची विधिवत स्थापना करण्यात आली. वंदनमेडू हे उच्च दर्जाच्या वेलचीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेले गजबजलेले केंद्र आहे. आणि या मंदिरात देवाला वेलचीचे हार अर्पण करण्याची खास परंपरा आहे. भारतातील वेलची अर्पण केली जाणारे हे पहिले मंदिर आहे.

13)Idukki Wildlife Sanctuary-

इडुक्की वन्यजीव अभयारण्य हे केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील,थोडुपुझा आणि उदंपंचोला तालुक्यातील एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. घनदाट जंगल व जैवविविधतेने नटलेले हे अभयारण्य, इडुक्की आर्क धरण, कुलमावू धरण आणि चेरुथोनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राभोवती वसलेले असून हत्तींचे कळप आणि इतर वन्यजीव पाहण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे. थोडुपुझा पासून 58 किमी अंतरावर असलेले हे अभयारण्य समुद्रसपाटीपासून 748 मीटर उंचीवर आहे. व सुमारे 77 ते 105.36 चौरस किमी परिसरात पसरलेले आहे. येथे हत्ती, सांबर, रानडुक्कर, जंगली मांजर, अनेक प्रकारच्या माकडांच्या प्रजाती (नीलगिरी लंगूर), विविध प्रकारचे पक्षी आणि साप आढळतात. या अभयारण्यातील ‘वंजूर मेडू’ हे सर्वोच्च शिखर असून येथे ट्रेकिंग व नौकाविहाराची सोय आहे.

14)Thommankuthu Waterfalls-

थोम्मनकुथू धबधबा हा केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील, थोडुपुझा शहराजवळील निसर्गरम्य परिसरातील एक मोहक धबधबा आहे. जंगलाच्या मध्यभागी असलेला हा धबधबा सात वेगवेगळ्या पातळ्यांवरून खाली पडतो. त्यामुळे हा “सात पायऱ्यांच्या धबधबा” म्हणून ओळखला जातो. या धबधब्याच्या पायथ्याशी एक नैसर्गिक कुंड तयार झाले आहे जिथे पर्यटक पोहण्याचा आनंद घेऊ शकतात. हे ठिकाण कन्नडियार नदीचा भाग असून चोहोबाजूंनी हिरवेगार समृद्ध जंगल, गुहा आणि वन्यजीवांनी वेढलेले आहे. पर्यकांसाठी येथे रॉक क्लाइंबिंग, मासेमारी आणि बोटिंग या सुविधा उपलब्ध आहेत.

15)Chillithodu-

चिल्लीथोडू हे केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील,देविकुलम तालुक्यात वसलेले एक निसर्गरम्य आणि शांत गाव आहे. हे ठिकाण सुंदर धबधबे, हिरवेगार घनदाट जंगल, दालचिनी आणि मसाल्यांच्या बागा व पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. येथे मुन्नारच्या मार्गावर चियाप्पारा आणि वालापारा धबधबे हे येथील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहेत. तसेच येथील घनदाट जंगलात असलेला वालापारा धबधबा, एलिफंट व्ह्यू पॉइंट, पोर्टास फार्म वर्ल्ड आणि दालचिनी व इतर मसाल्यांच्या बागांना पर्यटकांना भेट देता येते.येथील चियाप्पारा धबधबा हे एक लोकप्रिय ट्रेकिंग आणि प्रेक्षणीय ठिकाण आहे.

16)Ramakkalmedu-

रामक्कलमेडू हे केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील, अत्यंत सुंदर निसर्गरम आणि वाऱ्याचा जास्त वेग असलेले हिल स्टेशन आहे.आख्यायिकेनुसार, प्रभू श्रीराम आपली पत्नी सीता यांचा शोध घेत असताना येथे एका मोठ्या दगडावर त्यांनी पाऊल ठेवले होते. त्यामुळे रामक्कलमेडूचा अर्थ ‘रामाच्या पावलांची भूमी’ असा होतो. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 3,500 फूट उंचीवर असून आशियातील सर्वाधिक वाऱ्याच्या ठिकाणांपैकी एक आहे. येथे वर्षभर ताशी सरासरी 35 किमी वेगाने वारे वाहतात, आणि कधीकधी ताशी 100 किमी पर्यंत पोहोचू शकतात.जोरदार वाऱ्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर विशाल पवनचक्क्या बसवल्या आहेत. आणि या टेकडीच्या माथ्यावर ‘कुरुवन’ आणि ‘कुरुवत्ती’ या स्थानिक आदिवासी जोडप्याचा भव्य पुतळा आहे, जो पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. येथून कंबम, थेनी, बोडीनायकन्नूर या तामिळनाडूतील शहरांचे आणि चहाच्या मळ्यांचे विहंगम दृश्य दिसते.

17)Panchalimedu-.

पंचलिमेडू हे केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील,एक लोकप्रिय आणि नयनरम्य हिल स्टेशन आहे. पौराणिक कथेनुसार, अज्ञातवासादरम्यान पांडव आणि त्यांची पत्नी द्रौपदी (पांचाली) येथे राहिले होते, त्यामुळे या ठिकाणाला ‘पांचालीमेडू’ असे नाव पडले. येथे ‘पांचालीकुळम’ तलाव आणि पाच टेकड्या आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशी येथील सबरीमाला मंदिरातील मकरविलक्कू (पवित्र ज्योत) पाहण्यासाठी अनेक भाविक येथे येतात. तसेच येथे एका टेकडीवर हिंदू मंदिर आहे, तर दुसऱ्या टेकडीवर ख्रिस्ती धर्मीयांसाठी क्रॉसेस लावलेले आहेत. समुद्रसपाटीपासून 3500 फूट उंचीवर असलेले व दाट धुक्याने वेढलेले हे ठिकाण, चहूबाजूंनी हिरव्यागार टेकड्या थंड हवामान आणि महाभारतकालीन पौराणिक कथांसाठी प्रसिद्ध आहे. ट्रेकिंग प्रेमींसाठी हे उत्तम ठिकाण असून येथे पर्यटकांसाठी झिपलाईन आणि स्काय सायकल हे साहसी उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.

18)Marayoor Sandalwood Forest-

मरायूर हे ठिकाण केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील, नैसर्गिक चंदनाच्या जंगलांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. मरायूरमध्ये चंदनाची नैसर्गिक जंगले असून ती केरळ वनविभागाच्या संरक्षणाखाली आहेत. येथे झाडांची गणना केली जाते आणि प्रत्येक झाडाला क्रमांक देऊन त्यांचे कुंपणाने संरक्षण केले जाते. मरायूर येथे कमी पाऊस पडत असल्यामुळे चंदनाच्या झाडांच्या उत्तम वाढीसाठी आणि त्यातील सुगंधी तेलासाठी पोषक ठरतो. याशिवाय येथे पाषाण युगातील ‘मुनियारा’ किंवा दगडांच्या गुहा आणि रॉक पेंटिंग्स पाहायला मिळतात. तसेच येथे वनविभागाद्वारे चालवला जाणारा चंदनाचा कारखाना आहे.
हे ठिकाण विस्तीर्ण उसाची शेती, चिन्नार वन्यजीव अभयारण्य आणि येथील जंगलातून वाहणारी पांबर नदी ही परिसराचे नैसर्गिक सौंदर्य अधिक वाढवते. सुगंधी वातावरण असलेले हे जंगल केरळ वन विभागाच्या अंतर्गत अत्यंत संरक्षित क्षेत्र आहे. मुन्नारपासून हे ठिकाण 40 किमी अंतरावर आहे.

19)Anchuruli Tunnel-

अंचुरुली बोगदा हा केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील, कांचियार पंचायतीमध्ये वसलेले एक सुंदर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण तिथल्या 5.5 किमी लांब गोलाकार, अद्भुत बोगद्यासाठी आणि नयनरम्य निसर्गासाठी ओळखले जाते. अंचुरुली बोगदा हा एक अभियांत्रिकी चमत्कार मानला जातो, जो कल्लनाथांडू टेकडीतून जातो. पावसाळ्यात या बोगद्यातून मोठ्या वेगाने पाणी वाहते. इडुक्की जलाशयातील पाण्याची पातळी खाली गेल्यानंतर येथील पाच लहान टेकड्या पालथ्या पात्रांसारख्या दिसतात. म्हणून याला ‘अंचुरली’ म्हणतात. हे ठिकाण त्याच्या अद्भूत सौंदर्यामुळे चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. ‘इयोबिंते पुस्तकम’ या प्रसिद्ध मल्याळम चित्रपटाचा क्लायमॅक्स याच बोगद्याजवळ चित्रित करण्यात आला होता.

20)Parunthumpara-

परुंथुमपारा किंवा ईगल रॉक हे केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील,पीरुमेडू जवळील एक अत्यंत सुंदर हिल स्टेशन, गाव आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 4,700 फूट उंचीवर आहे. येथून खोल दऱ्या, चहाचे मळे, हिरवेगार डोंगर आणि अझुथा नदीचे विहंगम दृश्य दिसते. येथील एका खडकाचा आकार गरूडाच्या डोक्यासारखा दिसतो, म्हणून याला ‘ईगल रॉक’ असे म्हणतात. आणि येथील अजून एका खडकाचा आकार प्रसिद्ध कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या चेहऱ्यासारखा दिसतो, म्हणून त्याला ‘टॅगोर पारा’ म्हणून ओळखले जाते. येथील प्रसिद्ध शबरीमाला यात्रेच्या काळात भाविक येथे मकरज्योती दर्शनासाठी मोठी गर्दी करतात.

21)Ayyappancoil Sastha Temple & Hanging Bridge-

अय्यप्पनकोविल किंवा अय्यप्पनकोइल हे केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील, पेरियार नदीच्या काठी वसलेले प्राचीन आणि निसर्गरम्य धार्मिक स्थळ आहे. हे ठिकाण ऐतिहासिक शास्ता (अय्यप्पन) मंदिर आणि पेरियार नदीवरील झुलत्या पुलासाठी प्रसिद्ध आहे. या प्राचीन मंदिराची स्थापना ऋषी परशुरामांनी केली होती. 1960 च्या दशकात इडुक्की धरणाच्या बांधकामामुळे मूळ मंदिर क्षेत्र पाण्याखाली गेले. पावसाळ्यात धरणाची पाणीपातळी वाढल्यानंतर हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जाते. व पाणी कमी झाल्यावर भाविक पुन्हा येथे दर्शन घेतात. येथे पेरियार नदीवर 200 मीटर लांबीचा एक भव्य झुलता पूल आहे. हा पूल अय्यप्पनकोविल आणि कांचियार या दोन पंचायतींना जोडतो. हे ठिकाण चहूबाजूंनी हिरवेगार डोंगर, कुरणे आणि पेरियार नदीच्या पात्राने वेढलेले असल्यामुळे उत्तम पर्यटन स्थळ आहे.

22)Sahyadri Ayurvedic Centre-

सह्याद्री आयुर्वेदिक केंद्र हे केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील, पीरमेडू जवळील पल्लिकुन्नू येथील प्रसिद्ध आयुर्वेदिक उपचार केंद्र आहे. हे केंद्र पीरमेड डेव्हलपमेंट सोसायटी (PDS) द्वारे चालवले जाते. आणि याची स्थापना 1986 मध्ये मार मॅथ्यू अराकल यांनी केली होती. येथे पंचकर्म, हर्बल औषधे, पिळिचल, नवर किळी आणि विविध प्रकारचे आयुर्वेदिक मसाज व उपचार केले जातात.या केंद्राच्या आवारात एक सह्याद्री संग्रहालय आहे, जिथे आयुर्वेदाचा इतिहास, दुर्मिळ औषधी वनस्पती, मसाल्यांचे पदार्थ आणि प्राचीन आदिवासी वस्तूंचा संग्रह आहे. तसेच येथे मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदिक औषधांची निर्मिती आणि विक्री केली जाते. निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या केंद्रात आयुर्वेदिक औषध निर्मिती युनिट आणि संशोधन सुविधा आहेत.

23)Malayil Kallan Guha-

मलयिल कल्लन गुहा ही केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील, मुन्नार जवळील एक प्रसिद्ध नैसर्गिक गुहा आहे. मल्याळम भाषेत ‘मलयिल कल्लन’ याचा अर्थ ‘डोंगावरील चोर’ असा होतो. ही एक नैसर्गिक खडकाची गुहा असून 15 फूट उंच आहे. या अरुंद गुहेत एकावेळी एक व्यक्ती आत जाऊ शकते. दंतकथेनुसार अनेक वर्षांपूर्वी या गुहेत ‘थंकय्यन’ नावाचा एक प्रसिद्ध चोर लपून बसायचा व तो या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना लुटत असे आणि लुटलेले धन गरिबांना वाटत असे, अशी लोककथा सांगितली जाते. त्यामुळे याला “पर्वतावरील चोराची गुहा” असेही म्हणतात. ही गुहा मुन्नार-थेक्कडी गॅप रोडवर आहे. व गुहेत जाण्यासाठी स्थानिक प्रशासनाने सिमेंटच्या पायऱ्या बांधल्या आहेत. या गुहेच्या समोरून लॉकहार्ट गॅप चे विहंगम दृश्य दिसते, जिथे निसर्गरम्य परिसर, धुक्यात हरवलेले डोंगर आणि दऱ्यांचा आनंद घेता येतो.

24)Mattupetty Dam –

मट्टुपेट्टी हे केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील, मुन्नारजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथे मट्टुपेट्टी धरण हे एक काँक्रीट गुरुत्वाकर्षण धरण आहे.आणि धरणाच्या साठवलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या तलावात बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. या धरणाच्या आजूबाजूला घनदाट चहाचे मळे, हिरवे डोंगर आणि ट्रेकिंगचे मार्ग आहेत. तसेच येथे इंडो-स्विस फार्म हे एक विशिष्ट शेती आणि पशुधन संशोधन केंद्र आहे, ज्याला ‘कॅटल व्हिलेज’ असेही म्हटले जाते. येथे उच्च जातीच्या गायींचे संगोपन केले जाते. आणि ते पर्यटकांना पाहता येते. पर्यटक येथे बोटिंग, ट्रेकिंग, इको पॉइंट, चहाच्या बागेत फिरणे, निसर्ग छायाचित्रण आणि पिकनिचा आनंद घेऊ शकतात.

25)Sun Moon Valley Boating Centre-

सन मून व्हॅली बोटिंग सेंटर हे केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील, मुन्नारजवळील मट्टुपेट्टी धरण परिसरात असलेले लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. हे ठिकाण चहाचे मळे, घनदाट जंगले आणि हिरव्यागार टेकड्यांनी वेढले आहे. पर्यटकांना या ठिकाणी स्पीड बोटिंग, शिकारा आणि पॉन्टून बोट राईड्सचा आनंद घेता येतो. आणि येथील आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे मट्टुपेट्टी धरणात शांत पाणी, ज्यात आजूबाजूच्या चहाच्या बागांचे प्रतिबिंब दिसते. पर्यटकांसाठी हा एक शांत आणि थरारक अनुभव आहे. तसेच येथील केंद्राच्या परिसरात काउबॉय पार्क हे अ‍ॅम्युझमेंट पार्क आहे. जिथे मुलांसाठी विविध खेळ आणि 12-डी रायडर थिएटर उपलब्ध आहे.

26)Anayirankal Dam –

अनायिरंकल धरण हे केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील मुन्नार जवळ चिन्नकनाल येथील एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. हे मातीचे धरण 1960 च्या दशकात पन्नियार नदीवर बांधलेले असून या धरणाचा उपयोग जलविद्युत निर्मिती आणि जलसिंचनासाठी केला जातो. हा धरण परिसर चहाच्या मळ्यांनी आणि सदाहरित जंगलांनी वेढलेले असून, येथे हत्तींचा कळप पाणी पिण्यासाठी येतो, म्हणून याला ‘अनायिरंकल’ (हत्ती उतरण्याची जागा) असे म्हणतात. पर्यटकांना येथील एलिफंट अबोड बोटिंग सेंटर जलाशयात नौकाविहाराचा, निसर्ग भ्रमंती, पक्षी निरीक्षण आणि आजूबाजूच्या विहंगम परिसराचा आनंद घेता येतो.p हे धरण मुन्नारपासून 22 किमी अंतरावर चिन्नाकनाल आणि संथनपारा पंचायतींमध्ये आहे.

27)Kundala Lake-

कुंडला तलाव हा केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील, मुन्नारजवळील एक नयनरम्य जलाशय आहे. हा तलाव समुद्रसपाटीपासून 1700 मीटर उंचीवर असून अत्यंत सुंदर, निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. हा तलाव नौकाविहारासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. येथे पेडल बोट्स, रो बोट्स आणि काश्मिरी स्टाईल ‘शिकारा’ बोटी आहेत. हा तलाव 1946 मध्ये ‘पल्लीवासल जलविद्युत प्रकल्पा’साठी बांधण्यात आलेल्या कुंडला धरणामुळे तयार झालेला जलाशय आहे. या तलाव परिसरात डोंगररांगांमध्ये दर 12 वर्षांनी एकदा फुलणारी प्रसिद्ध नीलकुरिंजी फुले पाहायला मिळतात. आणि वर्षातून दोनदा येथे चेरी ब्लॉझम्सची फुले फुलतात, त्यामुळे हा परिसर अधिकच सुंदर दिसतो. तसेच येथे जवळच टाटा टी कंपनीचे गोल्फ कोर्स आणि अरुविक्काड धबधबा आहे.

Visit the travel blog

1) केरळ मधील इडुक्की जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे?

इडुक्की जिल्हा हा नैसर्गिक सौंदर्य, नयनरम्य दृश्ये, आशियातील पहिले आणि जगातील दुसरे कमानी धरण, धबधबे आणि वन्यजीवांसाठी प्रसिद्ध आहे.


2)इडुक्की जिल्ह्यातील, मुन्नार शहर कशासाठी ओळखले जाते?

मुन्नार शहर हे थंड हवेचे ठिकाण, ब्रिटिशांचे उन्हाळी सुट्टीचे ठिकाण, चहाचे मळे आणि नयनरम्य शहर यामुळे सुट्ट्यांमध्ये हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.


3) इडुक्की जिल्ह्यातील कुंडला तलाव कोणत्या धरणाने तयार झाला आहे?

कुंडला तलाव हा 1946 मध्ये बांधलेल्या कुंडला धरणामुळे तयार झालेला जलाशय आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top