चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे:Top 14 places visit to in Chandrapur District

भारतभ्रमंती या वेबसाईटवर पहा भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांमध्ये, महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे. चंद्रपूर जिल्हा हा विदर्भ विभागात आहे. गौंड राजाच्या काळात या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव चांदा होते. 1964 मध्ये या जिल्ह्याचे नाव चंद्रपूर करण्यात आले. 1982 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी आहेत. त्यामुळे या जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी असे म्हटले जाते. चंद्रपूरच्या दुर्गापुर मध्ये औष्णिक वीज प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे.Top 14 places visit to in Chandrapur District

चंद्रपूर मध्ये वैनगंगा, वर्धा,पैनगंगा आणि इरई या प्रमुख नद्या आहेत. तसेच या जिल्ह्यामध्ये तांदूळ,ज्वारी, गहू,कापूस, तूर,जवस, तंबाखू ही पिके घेतली जातात. महाराष्ट्रातील हा जिल्हा सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सिमेंटचे कारखाने आहेत. महाराष्ट्र राज्यातील पहिला पोलाद कारखाना या जिल्ह्यात निर्माण केला.

तसेच या जिल्ह्यात बल्लारपूर येथे देशातील सर्वात मोठा कागद कारखाना आहे. महाराष्ट्रातील मॅगनीज प्रकल्प याच जिल्ह्यात आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात आहेत.1948 साली बाबा आमटे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा गावामध्ये आनंदवन आश्रम कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी सुरू केला. या जिल्ह्यामध्ये अनेक आदिवासी जमाती आहेत. या जिल्ह्यामध्ये तांब्याचे साठे भरपूर प्रमाणात मिळतात.

Top 14 places visit to in Chandrapur District

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे:


1)Bhadrawati JainTemple-

भद्रावती जैन मंदिर हे भद्रावती गावातील जैन मंदिर आहे. हे मंदिर खूप जुने असून या मंदिरामध्ये अत्यंत सुंदर अशी रेखीव शिल्पे आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील हे प्रमुख पर्यटन स्थळ आहे या ठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भावीक भेट देतात. चंद्रपूर पासून हे ठिकाण 32 किलोमीटर अंतरावर आहे.

2)Ghodazari Lake-

घोडाझरी तलाव हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी सात तलावांचा मिळून एक तलाव बनवलेला आहे. नागपेठ तालुक्यात हा घोडाझरी प्रकल्प असून येथील परिसर अत्यंत रमणीय व निसर्गरम्य आहे. चंद्रपूर पासून हा घोडाझरी प्रकल्प 105 किलोमीटर अंतरावर आहे.

3)Manikgadh Fort-

माणिकगड किल्ला हा चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यामध्ये चांदूरच्या डोंगरावर आहे. 9 व्या शतकामध्ये नागराजांनी हा किल्ला बांधलेला असून समुद्रसपाटीपासून साधारणता 507 मीटर उंचीवर हा किल्ला आहे. किल्ल्याला तटबंदी आणि बुरुज आहेत. सध्या थोड्याफार प्रमाणात हा किल्ला भगनावस्थेत आहे. परंतु येथे पर्यटकांची खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी तुम्हाला दीड किलोमीटर पर्यंत चालत जावे लागते.चंद्रपूर पासून हा किल्ला 60 किलोमीटर अंतरावर आहे.

Visit our website:Allindiajourney.com

4)7 Sisters Hill / Perjagad –

सात बहिणींचा डोंगर या ठिकाणाला पेरजागड म्हणून ओळखले जाते. निसर्गाने बहरलेल्या ओढाझरी या अभयारण्यात हा ठिकाणी हा डोंगर आहे. या ठिकाणी ट्रेकिंग प्रेमी मोठ्या प्रमाणात येतात. डोंगरावर सात बहिणी (अंबाई, निंबाई, उमाई,गौराई, मुक्ताई, पवराई आणि भिवराई)रहात होत्या असे सांगितले जाते. त्यांच्या मूर्ती आजही येथे पाहायला भेटतात. या डोंगरावर धबधबा आणि मुक्ताई देवस्थान आहे. या ठिकाणी अनेक वन्यजीव प्राणी आढळतात.

5)Butterfly Garden-

चंद्रपूर जिल्ह्यातील बटरफ्लाय गार्डन हे ताडोबा बटरफ्लाय गार्डन किंवा आगरझरी बटरफ्लाय गार्डन म्हणून ही ओळखले जाते.10 फेब्रुवारी2018 मध्ये या उद्यानाची निर्मिती करण्यात आली. विदर्भातील हे पहिलेच गार्डन असून त्यामध्ये असंख्य प्रकारची रंगीबेरंगी फुलपाखरे आपल्याला पाहायला भेटतात. हे उद्यान ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बर्फर झोन मध्ये असून चंद्रपूर -मोहर्ली रोडवर आहे. चंद्रपूर पासून हे उद्यान 13 किलोमीटर अंतरावर आहे.

6)Bijasan Cave-

बिजासन लेणी ह्या बौद्ध बांधवांच्या श्रद्धा स्थान असून या लेण्या चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात आहेत. या लेण्या दहा एकर मध्ये असून त्या ऐतिहासिक व सांस्कृतिक आहेत.या लेण्यांबद्दल असे सांगितले जाते की या लेण्या 2000 वर्षापूर्वीच्या असून अजिंठा वेरूळ लेण्यापेक्षा जुन्या आहेत. गडद आणि रहस्यमय लेण्यांमध्ये विस्तीर्ण मार्ग आहेत. या लेण्यांची गुढता एक अविस्मरणीय अनुभव देतात. चंद्रपूर पासून या लेण्या 28 किलोमीटर अंतरावर आहेत.

7)Muktai Waterfall-

मुक्ताई धबधबा हा महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यामध्ये डोमा गावच्या जंगलामध्ये आहे. महाराष्ट्रातील अनेक लोकप्रिय धबधब्यांपैकी हा एक धबधबा आहे. या ठिकाणी मुक्ताई मातेचे मंदिर आहे. त्यामुळे या ठिकाणाला मुक्ताई मातेच्या नावावरून ओळखले जाते. डोंगरातून जवळजवळ 57 फोटो उंचीवरून हा धबधबा कोसळतो. हिरव्यागार वनराईने नटलेला हा धबधबा पाहण्यासाठी असंख्य पर्यटक येथे भेट देतात. चंद्रपूर पासून हे ठिकाण 120 किलोमीटर अंतरावर आहे.

8)Dr. A P J Abdul Kalam Garden

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम गार्डन चंद्रपूर जिल्ह्यातील एक नवनिर्मित गार्डन असून या ठिकाणी हजारो पर्यटक भेट देतात. या गार्डनमध्ये मुलांसाठी प्लेग्राउंड तलाव,बांबू गार्डन, सर्व प्रकारच्या वन्य प्राण्याच्या मुर्त्या पहावयास भेटतात. तसेच या गार्डनमध्ये राजहंस आणि वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. उद्यानामध्ये एपीजे अब्दुल कलाम यांचा पुतळा बसवलेला आहे. 15 जानेवारी म्हणजे अब्दुल कलाम यांच्या वाढदिवसा दिवशी या गार्डनमध्ये मोफत प्रवेश दिला जातो. चंद्रपूर पासून हे ठिकाण आठ किलोमीटर अंतरावर आहे.

9)mahakali mandir-

महाकाली मंदिर हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक महत्वपूर्ण धार्मिक स्थळ आहे. महाकालीचे हे मंदिर काली मातेला समर्पित असून ते चंद्रपूर शहराच्या मध्यावर आहे. एप्रिल महिन्यामध्ये दरवर्षी या ठिकाणी देवीची खूप मोठी यात्रा भरते. मंदिरामध्ये महाकाली देवीच्या दोन मूर्ती आहेत. येथील भिंतीवर विविध शिल्प चित्रे पाहायला भेटतात. मंगळवारी देवीच्या मंदिरात भाविकांची जास्तच गर्दी असते.

10)Tadoba Andhari Tiger Reserve-

ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील एक प्रमुख व्याघ्र पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाघांची संख्या आहे. या ठिकाणी अंधारी आणि ताडोबा हे दोन अभयारण्य व्याघ्र संरक्षित म्हणून केली आहेत. तुम्हाला येथे जाण्यासाठी 70 दिवस आधी बुकिंग करावे लागते. या उद्यानाचा परिसर हा 1734 किलोमीटर अंतरावर पसरलेला आहे. या उद्यानामध्ये वाघांबरोबर अनेक प्रकारचे वन्यजीव प्राणी आढळतात. चंद्रपूर पासून हे अभयारण्य 34 किलोमीटर अंतरावर आहे.

11)Asolamendha Dam

हे चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यामध्ये पाथरी गावाजवळ आहे. आसोला मेंढा हे धरण ब्रिटिश काळामध्ये बांधलेले असून या धरण परिसरातील निसर्गरम्य वातावरण आणि घनदाट जंगलांनी वेढलेला भाग मंत्रमुग्ध करतो. या धरणाचे बांधकाम 1902 मध्ये सुरू झाले होते आणि 1918 मध्ये ब्रिटिश राजवटीत ते पूर्ण झाले.या धरणाची लांबी 1376 मीटर इतकी आहे. या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 67 एम सी एम एवढी आहे. पर्यटक या धरणावर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.चंद्रपूर शहरापासून हे धरण साधारणता 51 किलोमीटर अंतरावर आहे.

12)Anchaleswar Mahadev Temple-

चंद्रपूर शहरातील गोंड किल्ल्याजवळ अंचलेश्वर महादेव मंदिर हे धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर शिवाला समर्पित असून मंदिरासमोर 5 वेगवेगळ्या धातूंपासून बनवलेली चार टन वजनाची नंदीची मूर्ती आहे. हे मंदिर 9 व्या शतकातील आहे. येथील मंदिर परिसर अत्यंत शांत व रम्य आहे. या मंदिरामध्ये भगवान शिवाच्या पायाच्या अंगठ्याच पूजा केली जाते. हे मंदिर अचलगड किल्ल्याच्या आत मध्ये आहे.

13)Ballarpur Fort-

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बल्लारपूर किल्ला हा किल्ला गोंड नदीच्या काठावर असलेला एक प्राचीन व ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला राजा गोंड शहाने बांधला. या किल्ल्याला बल्लाळशाह किल्ला म्हणून देखील ओळखले जाते या किल्ल्याची तटबंदी मजबूत असली तरी किल्ल्याचा काही भाग जीर्ण झाला आहे. हा किल्ला चंद्रपूर पासून 16 किलोमीटर अंतरावर बल्लारपूर शहरात आहे.

14)Chandrapur Fort-


महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर किल्ला हा सोळावा शतकाच्या दरम्यान गोंड राजाने बांधलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. त्याकाळी संरक्षणाच्या हेतूने हा किल्ला बांधला होता. या किल्ल्याला अचलेश्वर,बिनबा,जटपुरा व पठाणपुरा हे मुख्य दरवाजे आहेत. चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेला हा किल्ला इराई आणि झरपट नद्यांच्या संगमावर आहे. या किल्ल्याला पंधरा ते वीस फूट उंचीच्या मजबूत भिंती आहेत.

15)Anandavan-

आनंदवन हे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील एक जागतिक दर्जाचे, स्वावलंबी आणि सामाजिक प्रकल्प केंद्र आहे. प्रख्यात समाजसेवक बाबा आमटे यांनी कुष्ठरोगी आणि दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी निर्माण केलेले हे एक सेवाभावी केंद्र आहे. 1949 मध्ये बाबा आमटे यांनी केवळ दोन झोपड्या आणि 14 रुपयांच्या भांडवलातून या आश्रमाची सुरुवात केली. हा प्रकल्प ‘महारोगी सेवा समिती’च्या अंतर्गत चालवला जातो.

पूर्वी समाजाने बहिष्कृत केलेल्या रुग्णांना येथे निवारा, औषधोपचार आणि सन्मानाचे जीवन मिळाले. आज हे एक 5 हजार लोकांचे स्वयंपूर्ण गाव आहे. आनंदवनात रुग्णालय, अनाथालय, शाळा, महाविद्यालय, अंध व मूकबधिरांची शाळा, कृषी महाविद्यालय आणि तांत्रिक विभाग आहेत. बाबा आमटे यांचा “दया नको, संधी हवी” या विचारावर विश्वास होता. त्यामुळे आनंदवनातील रहिवासी शेती, वस्त्रोद्योग, हस्तकला आणि गृहउद्योगांच्या माध्यमातून स्वतःचे अन्न आणि गरजा स्वतःच भागवतात.

16)Junona Lake-
जुनोना तलाव हा महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील एक अत्यंत निसर्गरम्य, शांत आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.
500 वर्षांपूर्वी बल्लारपूरचे गोंडराजे खांडक्या बल्लाळशाह यांच्या कार्यकाळात या तलावाची निर्मिती झाली. राजाची प्रकृती सुधारण्यासाठी राणी हिताराणी हिने जुनोनाच्या घनदाट जंगलात हा तलाव बांधला आणि त्याच्या काठावर एक ‘जलमहल’ उभारला. गोंडराजे वर्षातील काही महिने या जलमहालात राहून शिकारीचा आनंद घेत असत. हा महाल आजही आकर्षणाचा भाग आहे. जुनोना तलाव हा एक मानवनिर्मित तलाव असून तो चारही बाजूंनी घनदाट जुनोना जंगल आणि हिरवाईने वेढलेला आहे. तसेच येथे शांत वातावरण आणि जलसाठ्यामुळे विविध प्रजातींचे स्थानिक व स्थलांतरित पक्षी येतात. पर्यटकांसाठी तलावाच्या शांत पाण्यात बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे.

17)Ramdegi Devsthan –
रामदेगी (वरोरा/चिमूर) हे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर-वरोरा मार्गावर, निसर्गरम्य घनदाट जंगलात वसलेले एक अतिशय सुंदर आणि धार्मिक पर्यटन स्थळ आहे. प्रभू श्रीराम आणि सीता मातेच्या वनवास काळातील वास्तव्यामुळे हे ठिकाण पावन झाले आहे. येथे डोंगराच्या पायथ्याशी घनदाट वनराईमध्ये प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर आणि राम मंदिर आहे. व मंदिरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर ‘बुद्ध विहार’ असून तिथे भगवान बुद्धांच्या अत्यंत विलोभनीय मूर्ती आहेत. येथील डोंगरावर नैसर्गिकरीत्या तयार झालेली पाण्याचे सात कुंडे (बारमाही पाणी असणारे पाण्याचे स्त्रोत) आहेत. आणि पावसाळ्यात येथील डोंगरावरून वाहणारा धबधबा पर्यटकांना विशेष आकर्षित करतो. रामदेगी हे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येत असल्याने येथे विविध प्रकारच्या वन्यजीवांचा वावर असतो. येथील समृद्ध निसर्गामुळे अनेक प्रकारचे दुर्मिळ पक्षी आणि फुलपाखरे पाहायला मिळतात.

18)Ramala Lake-
रामाळा तलाव हा महाराष्ट्रातील चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेला एक ऐतिहासिक तलाव आहे. 500 वर्षांपेक्षा जास्त इतिहास असलेला हा तलाव चंद्रपूर शहराचे ऐतिहासिक वैभव आणि जलव्यवस्थापनाचा एक उत्तम नमुना आहे. हा तलाव ऐतिहासिक गोंड राजांच्या काळात केवळ दगडांचा वापर करून बांधण्यात आला होता. चंद्रपूर शहराला ऐतिहासिक तटबंदी (परकोट) आहे. या परकोटाची भिंत या तलावाच्या ईशान्य कोपऱ्याला लागून आहे, ज्यामुळे या परिसराला एक वेगळाच ऐतिहासिक लुक मिळतो. चंद्रपूरला पूर्वी त्या काळातील प्रमुख 5 तलावांपैकी आज केवळ रामाळा तलावच मुख्य स्वरूपात शिल्लक राहिला आहे. आजूबाजूला असलेल्या कोळसा खाणींमुळे चंद्रपूर भागातील भूगर्भातील पाण्याची पातळी खालावते, त्यावेळी या तलावाची पाण्याची पातळी वाढवण्यास मदत होते. या शांत तलाव परिसरात विविध प्रजातींचे स्थानिक व स्थलांतरित पक्षी पाहायला मिळतात.

19)Thermal Power Station-
सुपर थर्मल पॉवर स्टेशन (औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प) हा चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर (उर्जानगर) येथील महाराष्ट्र शासनाच्या महानिर्मिती कंपनीच्या मालकीचा आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प आहे. हा प्रकल्प राज्याच्या एकूण विजेच्या गरजेपैकी सुमारे 25 % जास्त वीज पुरवतो. या प्रकल्पाची एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमता 2,920 मेगावॅट (MW) आहे. यामध्ये प्रत्येकी 210 मेगावॅटचे 2 संच आणि 500 मेगावॅटचे 5 संच कार्यरत आहेत. आणि या प्रकल्पाला लागणारा कोळसा वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या (WCL) जवळच असलेल्या दुर्गापूर आणि पद्मपूर कोळसा खाणींमधून उपलब्ध केला जातो. तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले पाणी ईराई धरणातून पुरवले जाते. जानेवारी 2026 मध्ये या केंद्राने 2,739 मेगावॅट वीजनिर्मिती करून सर्वोच्च कामगिरीचा विक्रम नोंदवला आहे.

20)Dakshitabhoomi Chandrapur-
दीक्षाभूमी हे महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील, बौद्ध धर्मीयांचे अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र तीर्थस्थळ मानले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 16 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या 3 लाखांहून अधिक अनुयायांसह या पवित्र स्थळी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे दीक्षा घेतल्यानंतर, बाबासाहेब 16 ऑक्टोबर 1956 रोजी चंद्रपूरला आले. त्यांनी येथे अडीच ते तीन लाख लोकांना धम्म दीक्षा दिली. बाबासाहेबांनी ज्या जागेवर दीक्षा दिली, तिथे आता ‘डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय’ सुरू आहे. चंद्रपूर दीक्षाभूमीचा सर्वांगीण विकास आणि सुशोभीकरण करण्यासाठी राज्य शासनाकडून मोठ्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. दरवर्षी 14, 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी येथे ‘धम्मचक्र अनुवर्तन दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

21)Neelpani-
नीलपाणी हे महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील एक अतिशय शांत आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण चंद्रपूर जवळील सिनला गावाजवळ आणि दुर्गापूर माइन परिसरामध्ये आहे. वनराई आणि घनदाट जंगलाने वेढलेले हे ठिकाण अतिशय शांत आणि निसर्गरम्य इराई नदी परिसरातील नैसर्गिक सौंदर्य आणि खळाळत्या पाण्यासाठी ओळखले जाते.
निसर्गप्रेमी आणि पर्यटकांचे हे लोकप्रिय ठिकाण आहे.

Visit the travel blog

1)बल्लारपूर किल्ला कोणत्या नदीच्या काठावर आहे ?

बल्लारपूर किल्ला गोंड नदीच्या काठावर आहे .

2)मुक्ताई धबधबा कोणत्या तालुक्यात आहे ?

मुक्ताई धबधबा चिमूर तालुक्यात आहे .

3)चंद्रपूर जिल्ह्यातील फुलपाखरू उद्यानयाची निर्मिती कधी करण्यात आली ?

चंद्रपूर जिल्ह्यातील फुलपाखरू उद्यानयाची निर्मिती 10 फेब्रुवारी2018 मध्ये करण्यात आली .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top