तापी जिल्ह्यातील 14 प्रसिद्ध पर्यटन स्थळे- Top 14 places to visit in Tapi District

मित्रांनो भारतभ्रमंतीमध्ये तुम्हाला भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळांची माहिती मिळणार आहे. आता तुम्ही पाहणार आहात गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे. तापी जिल्ह्याची निर्मिती 2 ऑक्टोबर 2007 रोजी सुरत जिल्ह्याचे विभाजन करून करण्यात आली. या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय व्यारा येथे असून हा जिल्हा गुजरातच्या दक्षिण भागात आहे. Top 14 places to visit in Tapi District

तसेच तापी नदी या जिल्ह्याची मुख्य जीवनवाहिनी आहे.तापी जिल्ह्यात व्यारा, सोनगढ, उच्छल, निझर, वालोड, डोलवण आणि कुकरमुंडा हे 7 तालुके असून येथील ‘उकाई धरण’ हे तापी नदीवरील गुजरातमधील मोठ्या धरणांपैकी एक आहे. या जिल्ह्याची अर्थव्यवस्था मुख्यत्वे शेती आणि कृषी-आधारित उद्योगांवर अवलंबून आहे. या जिल्ह्यात अनेक सुंदर, निसर्गरम्य व ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत.

Top 14 places to visit in Tapi District

तापी जिल्ह्यातील 14 प्रसिद्ध पर्यटन स्थळे

1)Surya Tapeshwar Mahadev Mandir-

Top 14 places to visit in Tapi District

सूर्य तपेश्वर महादेव मंदिर हे गुजरातच्या तापी जिल्ह्यातील, सोनगढ तालुक्यात सिलटवेल गावातील प्रसिद्ध, जागृत शिव मंदिर आहे.या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे सूर्योदयाच्या वेळी सूर्याची पहिली किरणे थेट शिवलिंगावर पडतात, त्यामुळे याला ‘सूर्य तपेश्वर’ हे नाव पडले आहे. तसेच हे स्थान ऋषी शृंगी यांची तपोभूमी मानले जाते. आणि त्यांनीच या शिवलिंगाची स्थापना केली होती असे सांगण्यात येते. याशिवाय या मंदिराचा उल्लेख विविध पौराणिक ग्रंथ आणि तापी पुराणामध्ये आढळतो.

2)Gusmai Maadi Maa Temple-

गुसमाई माडी माता मंदिर हे गुजरातच्या तापी जिल्ह्यातील, व्यारा तालुक्यामधील पदमडुंगरी गावातील टेकडीच्या पायथ्याशी वसलेले आदिवासी समाजाचे कुलदैवत आणि प्रसिद्ध मंदिर आहे. आख्यायिकेनुसार त्रेता युगात गुस आणि घुस नावाच्या दोन राक्षसांचा वध करण्यासाठी या मातीने जगदंबेचा अवतार धारण केला होता.

पूर्वी देवीचे निवासस्थान टेकडीवर होते, परंतु एका गर्भवती महिलेच्या विनंतीवरून माता डोंगरावरून खाली आली आणि तेव्हापासून ग्रामस्थांनी टेकडीच्या पायथ्याशी एक छोटे मंदिर बांधून पूजा सुरू केली.या मातेच्या आशीर्वादाने पशुधनाची वाढ होते असा भक्तांचा दृढ विश्वास आहे.

3)Ukai Dam-

उकाई धरण हे गुजरातच्या तापी जिल्ह्यातील, महत्त्वाचे (नर्मदा धरणानंतर),दुसरे सर्वात मोठे धरण आहे. हे धरण इतके मोठे आहे की याची पाणी साठवण क्षमता भाक्रा नांगल धरणासारखीच आहे. हे धरण सिंचन, वीज निर्मिती आणि पूर नियंत्रणासाठी बांधण्यात आले असून या धरणाचे बांधकाम 1972 मध्ये पूर्ण झाले. या धरणावर 300 मेगावॅट क्षमतेचे जलविद्युत केंद्र आहे व याला ‘वल्लभ सागर’ या नावानेही ओळखले जाते. या धरणाचा जलाशय विशाल आहे आणि या निसर्गरम्य धरण परिसरात अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे पर्यटकांचे हे धरण लोकप्रिय ठिकाण आहे.

4)Songadh Fort-

सोनगढ किल्ला हा गुजरातच्या तापी जिल्ह्यातील, 16 व्या शतकातील एक महत्त्वाचा ऐतिहासिक गिरीदुर्ग आहे. हा किल्ला तापी जिल्ह्यात उकाई धरणाजवळ, एका टेकडीवर, समुद्रसपाटीपासून 112 मीटर उंचीवर आहे. बडोदा संस्थानाचे संस्थापक पिलाजीराव गायकवाड यांनी 16 व्या शतकात या किल्ल्याची निर्मिती केली आणि 1721 ते 1766 दरम्यान तो गायकवाड घराण्याचा मुख्य तळ होता.

या किल्ल्याचे बांधकाम मराठा आणि मुघल अशा दोन्ही वास्तुशैलीमध्ये केलेले असून किल्ल्यावर कालिका माता, अंबा माता मंदिर आणि एक दर्गा आहे. सध्या किल्ल्याचा काही भाग पडझड झालेला आहे परंतु मुख्य दरवाजा जवळील बुरूज अजूनही सुस्थितीत आहे.

Visit our website: allindiajourney.com

5)Chimer waterfall-

चिमेर धबधबा हा गुजरातच्या तापी जिल्ह्यातील, सोनगढ तालुक्यात,चिमेर गावाजवळील घनदाट जंगलातील एक नयनरम्य व अद्भुत निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. हा धबधबा ‘चिचकुंद’ धबधबा म्हणूनही ओळखला जातो. हा धबधबा गुजरात राज्यातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक असून 327 फूट उंचीवरून कोसळतो. येथील परिसर अत्यंत स्वच्छ व निसर्गरम्य असून येथे एकाच ठिकाणी 3 ते 4 छोटे-मोठे धबधबे पाहायला मिळतात.पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) मध्ये हा धबधबा पूर्ण वेगाने वाहत असतो, त्यामुळे ही वेळ पर्यटनासाठी सर्वोत्तम आहे.

6)Gomukh mahadev mandir & Waterfall-

गौमुख महादेव मंदिर आणि धबधबा हा गुजरातच्या तापी जिल्ह्यातील,सोनगड तालुक्यातील डोन गावाजवळील हिरव्यागार जंगलांच्या कुशीत वसलेले, एक निसर्गरम्य आणि धार्मिक स्थळ आहे. हे एक प्राचीन शिव मंदिर असून येथे स्वयंभू शिवलिंग आहे. तसेच येथे एका खडकातून गायीच्या मुखासारखा (गौमुख) आकार तयार झाला आहे व तिथून नैसर्गिक पाण्याचा प्रवाह सतत वाहत असतो.

आणि हे पाणी 15 फूट खाली गेल्यानंतर जमिनीत गुप्त होते, हे एक रहस्यच आहे. त्यामुळे याला ‘गुप्त गंगा’ असेही म्हणतात. तसेच ऋषी गौतम यांनी येथे तपश्चर्या केली होतीआणि त्यांच्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी येथे गंगेला प्रकट केले होते अशी अख्याइका सांगितली जाते. या मंदिराच्या जवळच एक सुंदर हंगामी धबधबाआहे.

7)Thuti Nature Point-

थुटी नेचर पॉइंट हे गुजरातच्या तापी जिल्ह्यातील, व्यारा येथील सोनगड जवळील एक सुंदर, निसर्गरम्य आणि शांत पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण उकाई धरणाच्या जवळ असल्याने लोकप्रिय आहे, तसेच येथील हिरवीगार वनराई आणि शांत वातावरण या ठिकाणाच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालते. थुटी हे पर्यटकांना एक दिवसाच्या पिकनिकसाठी व निसर्गाचा आनंद घेण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे.

8)Ekva Golan Waterfall-

एकवा गोलण धबधबा हा गुजरातच्या तापी जिल्ह्यातील सोनगड तालुक्यात, एकवा गोलण गावाजवळील एक निसर्गरम्य आणि “हिडन जेम” धबधबा आहे. हा धबधबा घनदाट जंगलात असून येथे पोहचण्यासाठी सुमारे 3 किलोमीटर ट्रेकिंग करावे लागते. पावसाळ्यात या धबधब्याचे दोन प्रवाह अत्यंत वेगाने वाहत असतात. त्यावेळी निसर्गाचे हे अद्भुत दृश्य पाहण्यासारखे असते. येथील परिसर अत्यंत निसर्गरम्य व मंत्रमुग्ध करणारा आहे. त्यामुळे हे पर्यटकांचे लोकप्रिय ठिकाण आहे.

9)Devalimadi Mata Temple –

देवली माडी मंदिर हे गुजरातच्या तापी जिल्ह्यातील,सोनगड तालुक्यातील देवलपाडा गावातील एक पवित्र धार्मिक स्थळ आहे. देवली माडी माता ही मध्य प्रदेशातील ‘गामित’ आदिवासी समाजाची कुलदेवी मानली जाते व धान्याची देवी (कणी-कणसरी) म्हणूनही पूजली जाते. येथे देवीची दोन मुख्य मंदिरे आहेत त्यामध्ये मूळ मंदिर टेकडीच्या शिखरावर आणि दुसरे टेकडीच्या पायथ्याशी देवलपाडा गावात आहे.

या मंदिरात जाण्यासाठी खडकांमधील एका गुहेसारख्या मार्गातून जावे लागते, जे एक विशेष आकर्षण आहे. हे मंदिर निसर्गरम्य परिसरात, डोसवाडा धरणाजवळ असूनदरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते त्यावेळी हजारो भाविक दर्शनासाठी येतात.

10)Dhareshwar Mahadev Temple-

धारेश्वर महादेव मंदिर हे गुजरातच्या तापी जिल्ह्यातील,उच्छल तालुक्यातील गव्हाण गावाजवळ, नेसू पूर्व वनपरिक्षेत्रातील घनदाट जंगलात वसलेले एक प्राचीन आणि पवित्र शिवमंदिर आहे. चारही बाजूंनी हिरव्यागार जंगलाने वेढलेले व 5,000 वर्षे जुने असलेल्या या मंदिराची स्थापना महाभारतातील युधिष्ठिराने केल्याची सांगितले जाते. वैशाख कृष्ण अष्टमीला येथील शिवलिंगाचे दर्शन घेतल्यास आजार दूर होतात आणि अकाली मृत्यूची भीती टळते, असे मानले जाते.वैशाख कृष्ण अष्टमीला येथील शिवलिंगाचे दर्शन घेतल्यास आजार दूर होतात आणि अकाली मृत्यूची भीती टळते, असे मानले जाते.

11)Shree Valmiki Parshwanath Jain Derasar, Valod-

श्री वाल्मीकी पार्श्वनाथ जैन देरासर हे गुजरातच्या तापी जिल्ह्यातील,वालोड येथील प्रसिद्ध धार्मिक जैन मंदिर आहे. हे मंदिर ‘वाल्मीकी’ नदीच्या काठी असल्याने येथील पार्श्वनाथ भगवान ‘वाल्मीकी पार्श्वनाथ’ या नावाने प्रसिद्ध आहेत. लाल दगडात बांधलेल्या या देरासरमध्ये अत्यंत सुंदर कोरिव काम केलेले आहे. व मूळनायक भगवान पार्श्वनाथांची अत्यंत सुंदर आणि प्राचीन पांढऱ्या रंगाची मूर्ती ‘पद्मासन’ मुद्रेत विराजमान आहे. याशिवाय या मंदिरात भगवान संभवनाथ, श्री पद्मावती माता, महालक्ष्मी माता आणि श्री मणिभद्र देव यांच्याही मूर्ती आहेत.

12) Ambapani Eco Tourism Site –

आंबापाणी इको टुरिझम साइट हे गुजरातच्या तापी जिल्ह्यातील,दोलवण तालुक्यात अमोनिया गावाजवळ पूर्णा नदीच्या काठावर वसलेले एक निसर्गरम्य ठिकाण आहे. हे ठिकाण घनदाट जंगल, बांबूची झाडे आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध असून हिरवाईने नटलेले आहे. पर्यटकांना येथे ट्री हाऊस आणि तंबू व कॅम्पसाईटच्या आसपास मोर आणि माकडे पाहायला मिळतात. तसेच हे ठिकाण नदीच्या काठावर असल्याने, पर्यटक बोटिंग व नदीकाठचा दृश्याचा आनंद घेऊ शकतात.

13)Kakrapar Atomic Power Station-

काकरापार अणुऊर्जा केंद्र हे गुजरातच्या मांडवी, सुरत आणि तापी नदीच्या सान्निध्यात एक महत्त्वाचा अणुऊर्जा प्रकल्प आहे. हा अणुऊर्जा प्रकल्प 1993 मध्ये सुरू झाला आणि त्यामध्ये 220 मेगावॉट क्षमतेच्या 2 अणुभट्ट्या आहेत. या प्रकल्पाचे संचालन न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) द्वारे केले जाते. तसेच 2021 रोजी येथे 700 मेगावॅट क्षमतेचे पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे युनिट ग्रीडला जोडण्यात आले. ते अणुऊर्जा तंत्रज्ञानातील एक मोठे यश मानले जाते.

14)Padam Dungri Eco Tourism-

पदम डुंगरी हे गुजरातच्या तापी जिल्ह्यातील,डोलवन तालुक्यात, अंबिका नदीच्या काठावर वसलेले एक निसर्गरम्य इको-टुरिझम स्थळ आहे.सह्याद्रीच्या रांगांमध्ये घनदाट जंगलामध्ये असलेले हे ठिकाण वन्यजीव, ट्रेकिंग आणि नदीकाठच्या छावणीसाठी (camping) प्रसिद्ध आहे. पर्यटकांना येथे नदीकाठची सफारी,निसर्ग भ्रमंती, पक्षी निरीक्षण, आणि कॅम्पफायर औषधी वृक्ष या गोष्टी अनुभवायला मिळतात.पदम डोंगरी हे निसर्गप्रेमींसाठी एक उत्तम पर्यटन स्थळ आहे.

Visit the travel blog

1)गुजरातच्या तापी जिल्ह्यातील,सूर्य तपेश्वर महादेव मंदिर कोणत्या ठिकाणी आहे?

गुजरातच्या तापी जिल्ह्यातील,सूर्य तपेश्वर महादेव मंदिर हे सोनगढ तालुक्यात सिलटवेल गावातील प्रसिद्ध, जागृत शिव मंदिर आहे.


2) तापी जिल्ह्यातील,पदम डुंगरी हे ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर आहे?

तापी जिल्ह्यातील,पदम डुंगरी हे ठिकाण अंबिका नदीच्या काठावर वसलेले एक निसर्गरम्य इको-टुरिझम स्थळ आहे.


3)गुजरातच्या तापी जिल्ह्यातील ‘एकवा गोलण धबधबा’ कोणत्या तालुक्यात आहे?

3)गुजरातच्या तापी जिल्ह्यातील ‘एकवा गोलण धबधबा’ हा सोनगड तालुक्यात, एकवा गोलण गावाजवळील एक निसर्गरम्य धबधबा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top