मित्रांनो भारतभ्रमंतीमध्ये तुम्हाला भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळांची माहिती मिळणार आहे. आता तुम्ही पाहणार आहात गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे. वलसाड हा दक्षिण गुजरातमधील महत्त्वाचा जिल्हा आहे. 1 जून 1966 रोजी सुरत जिल्ह्याचे विभाजन करून वलसाड जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. या जिल्ह्याच्या दक्षिणेस पालघर जिल्हा,पश्चिमेस अरबी समुद्र तर इतर दिशांना गुजरातचे जिल्हे आहेत. दमण आणि दीव व दादरा आणि नगर-हवेली हे दोन केंद्रशासित प्रदेश वलसाड जिल्ह्याच्या जवळ आहेत. Top 23 places to visit in Valsad District
वलसाड हे या जिल्ह्याचे मुख्यालय तर वापी हे जिल्ह्यातील सर्वात मोठे औद्योगिक शहर आहे. आणि ‘अतुल’ येथील रासायनिक कारखान्यांसाठी हा जिल्हा ओळखला जातो. या जिल्ह्यात वलसाड, वापी, पारडी, उमरगाव, कपराडा आणि धरमपूर हे सहा तालुके असून, दमणगंगा, पार, औरंगा आणि कोलक या प्रमुख नद्या आहेत. इथे आदिवासी लोकसंख्या जास्त आहे आणि सुंदर धबधबे, सांस्कृतिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत, तसेच हा जिल्हा वलसाडी सागवान लाकडासाठी व आंबा उत्पादनासाठीही प्रसिद्ध आहे.
Top 23 places to visit in Valsad District
वलसाड जिल्ह्यातील 23 प्रसिद्ध पर्यटन स्थळे
1)Shri Bhav Bhaveshwar Mahadev Temple-


श्री भाव भावेश्वर महादेव मंदिर हे गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील, धरमपूर जवळील बरुमल गावात वसलेले प्रसिद्ध धार्मिक शिव मंदिर आहे. या मंदिरातील शिवलिंग अष्टधातूंचे असून , येथे 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती आणि इतर देवी-देवतांच्या राम, कृष्ण, हनुमान, दुर्गा, यांच्या मूर्ती आहेत.
तसेच येथे एक कृत्रिम गुहा आहे, जी पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. मंदिर परिसर शांत आणि स्वच्छ असून मंदिराच्या जवळ एक गोशाळा आणि गरीब मुलींसाठी वसतिगृह आहे.
2)BAPS Shree Swaminarayan Temple-


BAPS स्वामीनारायण मंदिर हे गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील,तिथल बीचच्या जवळ, समुद्रकिनाऱ्यावर वसलेले सुंदर वास्तुकला असलेले मंदिर आहे. हे मंदिर पूर्णपणे दगडात बांधलेले असून त्यावर उत्कृष्ट कोरीवकाम करण्यात आले आहे. या मंदिरात स्वामीनारायण यांच्या मूर्तीसोबतच,श्री घनश्याम महाराज श्री गुणातीतानंद स्वामी,श्री हरिकृष्ण महाराज, राम, सीता आणि हनुमान, राधाकृष्ण आणि शिव, पार्वती व गणेश यांच्या मूर्ती आहेत. हे मंदिर बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (BAPS) यांच्याद्वारे चालवले जाते.
3)Tithal Beach-

तिथल बीच हा गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील,अरबी समुद्राकिनारी असलेला एक लोकप्रिय समुद्रकिनारा आहे. हा समुद्रकिनारा काळी वाळू आणि शांत वातावरणासाठी ओळखला जातो. तसेच येथे साईबाबा मंदिर आणि स्वामी नारायण मंदिर ही धार्मिक स्थळे आहेत. याशिवाय येथे वॉटर स्पोर्ट्स, स्पीड बोट, जेट स्की आणि स्थानिक खाद्यपदार्थांची सोय आहे.पर्यटकांना येथे नारळाची झाडे, ताज्या हवेचा झोत आणि अरबी समुद्राचे विहंगम दृश्य अनुभवता येते.
4)Garud Gufa Waterfall-


गरुड गुंफा धबधबा हा गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील धरमपूर तालुक्यातील, निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक शांत व प्रसिद्ध ठिकाण आहे. हे ठिकाण घनदाट जंगलात असून या धबधब्याच्या वरच्या बाजूला एक लहान नैसर्गिक गुंफा आहे, त्यामुळे याला ‘गरुड गुंफा’ असे नाव पडले आहे. पावसाळ्यात येथील हिरवळ शांतता आणि निसर्गरम्य वातावरण ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी व पर्यटकांसाठी उत्तम ठिकाण आहे.या गुंफेपर्यंत पोहोचण्यासाठी मुख्य रस्त्यापासून सुमारे एक किलोमीटरचा छोटा ट्रेक करावा लागतो.
Visit our website: allindiajourney.com
5)Wilson Hills-




विल्सन हिल्स हे गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील धरमपूर तालुक्यातील एक निसर्गरम्य, घनदाट जंगलांनी वेढलेले थंड हवेचे ठिकाण आहे. विल्सन हिल्स हे नाव मुंबईचे गव्हर्नर लेस्ली विल्सन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. आणि त्यांच्या स्मृतीचे स्मारक शिखरावर आहे. वर्षभर अल्हाददायक असणारे हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 2,500 फूट उंचीवर असून,
समुद्रकिनारा दिसणारे हे एकमेव हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हे ठिकाण धुक्याने वेढल्यामुळे याला ‘गुजरातचे महाबळेश्वर’ असेही म्हटले जाते. येथे ओझोन व्हॅली, सनराईज आणि सनसेट पॉईंट, शंकर धबधबा आणि लेडी विल्सन संग्रहालय ही प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
6)Parnera Hill-




पारनेरा डोंगर हा गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील,एक निसर्गरम्य, प्रसिद्ध, धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे. या डोंगरावर हिंदू राजाने 15 व्या शतकात एक ऐतिहासिक किल्ला बांधला आहे. आणि या डोंगरावर श्री महाकाली माता मंदिर,श्री चंडिका, श्री अंबिका, श्री नवदुर्गा, श्री शीतला माता, हनुमानजी मंदिर स्वयंभू रामेश्वर महादेव मंदिर,श्री महाकाली मातेचे मंदिर आणि ‘चांद पीर बाबा’ यांचा दर्गादेखीलआहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला दोनदा भेट दिल्याचे ऐतिहासिक संदर्भ आहेत. या हिरव्यागार डोंगरावरून वल्साड शहर आणि आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य आणि किल्ल्यावरील जुन्या वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. दरवर्षी नवरात्रीत येथे मोठी यात्रा भरते, त्यावेळी हजारो भाविक दर्शनासाठी येतात.
7)Bilpudi Mavli Mata Waterfall-


बिलपुडी मावळी माता धबधबा हा गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील धरमपूर तालुक्यातील एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी पाण्याचे दोन मुख्य प्रवाह खाली कोसळतात त्यामुळे याला ‘जोडिया धबधबा’ असेही म्हणतात. हे ठिकाण हिरव्यागार डोंगररांगांनी वेढलेले असून, येथे मावली मातेचे मंदिर आहे. जे भाविकांसाठी अत्यंत श्रद्धेचे ठिकाण आहे. या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी मुख्य रस्त्यापासून 2 किमी चालत जावे लागते.
8)Shree Tadkeshwar Mahadev Mandir-


श्री ताडकेश्वर महादेव मंदिर हे गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील, अब्रामा गावात वांकी नदीच्या काठावर वसलेले एक प्रसिद्ध, अद्भुत आणि प्राचीन शिव मंदिर आहे. हे मंदिर 800 वर्षांपेक्षा जुने असून, छत आणि शिखर नसलेले मंदिर आहे. येथील शिवलिंग हे 6 ते 8 फूट लांब आणि अर्ध-वर्तुळाकार असून हे भारतातील काही ‘झोपलेल्या’ लिंगांपैकी एक आहे.
या मंदिरावर भक्तांनी अनेक वेळा छत किंवा शिखर बांधण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी ते काही कारणांमुळे कोसळले. त्याबद्दल अशी आख्यायिका अशी आहे की प्रत्यक्ष भगवान शिवाने एका भक्ताच्या स्वप्नात येऊन त्यांना सूर्यकिरणे हवी असल्याचे सांगितले त्यामुळे या मंदिराचे शिखर खुले ठेवण्यात आले आहे.
9)Shree Sai Baba Mandir Valsad-


श्री साईबाबा मंदिर हे गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील,तीथल समुद्रकिनाऱ्याजवळ असलेले एक अत्यंत शांत आणि धार्मिक स्थळ आहे. या मंदिराची स्थापना 1982 मध्ये करण्यात आली असून 2007 मध्ये त्याचे नूतनीकरण करण्यात आले. हे मंदिर पांढऱ्या संगमवरवरी दगडांनी बांधलेले आहे. व मंदिराच्या भिंतींवर बाबांचा “श्रद्धा” आणि “सबुरी” हा महामंत्र लिहिलेला आहे. या मंदिरातील साईबाबांची मूर्ती ही अत्यंत सुंदर व हुबेहुब शिर्डीच्या साईबाबांच्या मूर्तीसारखी आहे. या मंदिर परिसरात स्वामीनारायण मंदिर, तीथल बीच आणि शांतीधाम आराधना केंद्र आहे.
10)Iranshah / Udwada Atash Behram-

इराणशाह/ उदवाडा अतश बेहराम हे गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील,पारशी धर्मियांचे सर्वात पवित्र धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर पारशी धर्माच्या आठ पवित्र अग्निमंदिरांपैकी एक असून, या मंदिराची रचना 1742 मध्ये मोतीबाई वाडिया यांनी केली होती. हे जगातील सर्वात जुन्या ‘अतश बेहराम’ (पवित्र अग्नी) पैकी एक असून पर्शियाहून भारतात आलेल्या पारशी समुदायाने हा पवित्र अग्नी,
विविध स्थलांतरानंतर 18 व्या शतकात तो उदवाडा येथे आणण्यात आला. या पवित्र अग्नीला ‘इराणशाह’ असे म्हटले जाते. आणि हा अग्नी गेल्या 1200 वर्षांपासून अखंडपणे प्रज्वलित ठेवण्यात आला आहे. या मंदिरात फक्त पारशी आणि इराणी झोराष्ट्रीयन व्यक्तींनाच प्रवेश दिला जातो. इतर पर्यटकांना बाहेरून इमारतीचे दर्शन घेता येते.
11)Lady Wilson Museum-


लेडी विल्सन संग्रहालय हे गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील, एक ऐतिहासिक व सांस्कृतिक ठिकाण आहे. या संग्रहालयाची स्थापना 1928 मध्ये धरमपूरचे राजे विजयदेवजी यांनी केली होती. आणि त्याचे नाव बॉम्बे गव्हर्नरच्या पत्नी लेडी विल्सन यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. या संग्रहालयात भारतीय आणि पाश्चात्य कलाकृतींचा मोठा संग्रह आहे.
त्यामध्ये मानवांशशास्त्र, कला आणि हस्तकला, लाकडी आणि दगडी कोरीव काम, चित्रे,खेळणी, आदिवासी संस्कृती, त्यांची वाद्ये, दागिने आणि जीवनशैली दर्शवणारे स्वतंत्र दालन, वन्यप्राण्यांचे नमुने, जुन्या काळातील नाणी आणि जागतिक स्तरावरील विविध देशांतील दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन आहे.
12)Shrimad Rajchandra Ashram, Dharampur-



श्रीमद राजचंद्र आश्रम हे गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील, धरमपूरचे आंतरराष्ट्रीय मुख्यालय आणि आध्यात्मिक समाजसेवेसाठी एक जागतिक चळवळ आहे. हे आश्रम मोहंगढच्या टेकडीवर निसर्गाच्या सानिध्यात, साधकांना शांती, पवित्रता आणि ज्ञानाचा अनुभव घेण्यासाठी 223 एकर जागेत पसरलेले आहे.येथील जिनमंदिरात भगवान महावीरांची मूर्ती आहे.आणि गुरुमंदिरात श्रीमद राजचंद्रजींची 72 इंची कमळासनात बसलेली मूर्ती आहे. याशिवाय राज दरबार येथे श्रीमद राजचंद्रजींची जगातील सर्वात उंच, 34 फूट भव्य मूर्ती आहे. तसेच येथे राज सभागृह आणि सुंदर बागा आहेत.
13)Dharampur Haveli-


धरमपूर हवेली ही गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील,नानी वहियल गावातील एक ऐतिहासिक व प्राचीन महाल आहे. हा महाल राजा मोहन देव जी यांनी त्यांच्या राजकन्येसाठी बांधला होता. हा महाल अत्यंत सुंदर असून त्यामध्ये सागवानी लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला आहे. पूर्वी या महालात एक स्कूल चालवले जात होते. सध्या येथे फोटोग्राफी आणि प्री वेडिंग साठी लोक येत असतात.
14)Morarji Desai Museum-


मोरारजी देसाई संग्रहालय हे गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील,बेचर रोड येथील एक ऐतिहासिक संग्रहालय आहे. वलसाड नगरपालिकेने 4 कोटी रुपये खर्चून हे संग्रहालय विकसित केले आहे. भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या जीवनशैली, आणि कार्यावर आधारित एक अद्वितीय संग्रहालय असून येथे त्यांनी वापरलेला चरखा,
प्रार्थनेची माळ, त्यांचे चष्मे, तसेच परदेश दौऱ्यांमध्ये मिळालेले बुद्धांची मूर्ती नागालँडकडून मिळालेल्या कलाकृती, भारतीय नाणी आणि बुडापेस्टची नाणी. व इतर देशांकडून मिळालेले सन्मानपत्र आहेत. याशिवाय महात्मा गांधींच्या विचारांचा त्यांच्या जीवनावर झालेला प्रभाव दर्शवणारे प्रदर्शन येथे आहे.
15)Kalyan Bagh-

कल्याण बाग हे गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील,एक ऐतिहासिक आणि लोकप्रिय शहरी उद्यान आहे.1929 मध्ये श्री मोतीलाल कल्याणजी यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ वलसाड नगरपालिकेला उद्यानासाठी जमीन दान दिली होती.आणि त्याचे उद्घाटन 1931 मध्ये झाले. हे उद्यान वलसाडच्या मध्यभागी असून पर्यटकांसाठी एक शांत आणि सुंदर ठिकाण आहे. या उद्यानात स्थानिक लोक आणि पर्यटक सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी आणि निसर्गाची अनुभूती घेण्यासाठी येत असतात.
16) District Science center,Dharampur-

जिल्हा विज्ञान केंद्र हे गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील,विज्ञानप्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण व विज्ञानाच्या प्रसाराचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. हे विज्ञान केंद्र 1984 मध्ये सुरू झाले असून 4.3 एकर क्षेत्रात पसरलेले आहे. येथे प्रदर्शन हॉल, तारांगण, सायन्स पार्क, 3-डी सायन्स शो -त्यामध्ये हाय-डेफिनिशन प्रोजेक्शन आणि डॉल्बी डिजिटल साउंडसह विज्ञानविषयक चित्रपट पाहता येतात. याशिवाय येथे मुलांसाठी विज्ञानावर आधारित खेळणी आणि मॉडेल्स, डायनासोर पार्क, आरशांचा भूलभुलैया आणि छोटे प्राणी संग्रहालय आहे. आदिवासी लोकांना विज्ञानाचे शिक्षण आणि माहिती मिळावी हा या संग्रहालयाचा उद्देश आहे.
17)Shri Simandharswami Jain Tirth –

श्री सीमंधर स्वामी जैन देरासर हे गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील, भिलाडजवळील नंदीग्राम गावातील एक प्रसिद्ध आधुनिक जैन मंदिर आहे. हे मंदिर ‘जिवंत तीर्थंकर’ मानल्या जाणाऱ्या श्री सीमंधर स्वामींना समर्पित असून 10 मे 1989 मध्ये स्थापित झाले आहे. हे मंदिर भव्य वास्तुकला, शांत वातावरण, आणि जिवंत तीर्थंकराच्या मूर्तीसाठी ओळखले जाते. तसेच हे मंदिर ‘नंदीग्राम देरासर’ म्हणूनही ओळखले जाते. दरवर्षी येथे होणाऱ्या ध्वजारोहण आणि वर्धापन दीनाला मोठ्या संख्येने भाविक येतात.
18)Maa Vishvambhari TirthYatra Dham-


मां विश्वंभरी तीर्थयात्रा धाम हे गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील,राबडा येथील एक शांत आणि पवित्र तीर्थधाम आहे. हे मंदिर निसर्गरम्य परिसरात सह्याद्रीच्या हिरव्यागार टेकड्यांजवळ आणि पश्चिम बाजूला अरबी समुद्राजवळ वसलेले असून जगदंबेच्या विश्वंभरी स्वरूपाला समर्पित आहे. मंदिर परिसर अत्यंत स्वच्छ आहे व येथे गौशाळा, अनेक देवी-देवतांच्या आणि प्राणी-पक्ष्यांच्या सुंदर प्रतिमा आहेत. याशिवाय येथे शिव गुंफा, गोवर्धन पर्वत, नंद बाबांची झोपडी, आणि श्री राम कुटीर आहे.
19)Mata Vaishno Devi Temple-


वैष्णो माता मंदिर हे गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील,धामडाची येथील जम्मू आणि काश्मीरमधील मूळ वैष्णो देवी मंदिराची प्रतिकृती आहे. आणि हे मंदिर कटरा येथील मूळ मंदिराला जाऊ न शकणाऱ्या भक्तांसाठी एक महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराचा परिसर शांत, सुंदर आणि स्वच्छ असून या मंदिरात नैसर्गिक गुहेसारखी रचना तयार करण्यात आली आहे. भाविकांना येथे माताजींच्या दर्शनासाठी जाण्यापूर्वी भगवान शिवाचे मंदिर आणि नंतर वरच्या बाजूला भैरो बाबाचे मंदिर लागते.
20)Arjungad Fort-

अर्जुनगड किल्ला हा गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील,वापी जवळ, बागवाडा येथील पेशवेकालीन, ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला पेशवाई काळात चिमाजी आप्पांनी बांधला होता.आणि काही काळ पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. एका दंतकथेनुसार, महाभारतातील अर्जुनाने सुभद्रेचे या ठिकाणाहून अपहरण केले होते,म्हणून या किल्ल्याला अर्जुनगड असे नाव पडले. तसेच किल्ल्यावर मध्यभागी महालक्ष्मी देवीचे मंदिर व दगडांनी बांधलेली एक मोठी पाण्याची टाकी आहे. येथून कोलक नदी आणि परिसराचे विहंगम दृश्य दिसते.
21)Shantidham Aradhana Kendra-


शांतिधाम आराधना केंद्र हे गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील,तिथल समुद्रकिनाऱ्याजवळील एक प्रसिद्ध जैन मंदिर आणि आध्यात्मिक केंद्र आहे. येथे श्री पार्श्वनाथ भगवान यांचे सुंदर जैन मंदिर असून येथील वातावरण शांत व आध्यात्मिक आहे. तसेच जगभरातून येणाऱ्या भाविकांसाठी येथे राहण्याची सोय, धर्मशाळा, भोजन आणि धार्मिक पुस्तके उपलब्ध आहेत. हे मंदिर विश्वप्रसिद्ध जैन गुरु श्री जिचंद्रजी महाराज यांच्या प्रेरणेतून स्थापन केले आहे.
22)Matsya Mata Mandir-


मत्स्य माता मंदिर हे गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील, मगोद डुंगरी गावातील एक अनोखे मंदिर आहे. या 300 वर्षा जुन्या मंदिरात कोणत्याही देव देवतेची पूजा नाहीतर व्हेल माशाच्या (देवमाशाच्या) हाडांची पूजा केली जाते.
येथील मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात जाण्यापूर्वी या मंदिरात मत्स्य मातेला प्रार्थना करून मगच मासेमारी करायला जातात. मत्स्य माता त्यांच्यावर कोणतेही संकट येऊ देत नाही अशी येथील मच्छीमारांची श्रद्धा आहे.
23)Pangarbari Wildlife Sanctuary & Shankar Falls-


पांगारबारी वन्यजीव अभयारण्य हे गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील, धरमपूर तालुक्यात, वाघवळ गावाजवळील निसर्गरम्य घनदाट जंगल आहे. या अभयारण्यात विविध प्रकारचे वन्यजीव प्राणी आणि पक्षी आढळून येतात. तसेच या अभयारण्यातील 150 फूट उंचीवरून कोसळणारा शंकर धबधबा हे येथील मुख्य आकर्षण आहे. या धबधब्याचे दृश्य अत्यंत विलोभनीय असून हे ठिकाण विल्सन हिल पासून 6 किमी अंतरावर आहे. निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
1)वलसाड जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे?
वलसाड जिल्हा हा आंबे, अतुल येथील जगप्रसिद्ध रासायनिक कारखाने, वापी येथील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आणि प्रसिद्ध वलसाडी सागवान लाकडासाठी प्रसिद्ध आहे.
2) वलसाड जिल्ह्यातील शंकर धबधबा कोणत्या ठिकाणी आहे?
2) वलसाड जिल्ह्यातील शंकर धबधबा हा धरमपूर तालुक्यात,पांगारबारी वन्यजीव अभयारण्यात आहे.
3) वलसाड जिल्ह्यातील,अर्जुनगड किल्ला कोणी बांधला होता?
वलसाड जिल्ह्यातील,अर्जुनगड किल्ला पेशवाई काळात चिमाजी आप्पांनी बांधला होता.


