सुरत जिल्ह्यातील 27 प्रसिद्ध पर्यटन स्थळे- Top 27 places to visit in Surat District

मित्रांनो भारतभ्रमंतीमध्ये तुम्हाला भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळांची माहिती मिळणार आहे. आता तुम्ही पाहणार आहात गुजरात राज्यातील सुरत जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे. सुरत जिल्हा हा पश्चिम भारतातील गुजरात राज्यातील “तापी” नदीच्या तीरावर वसलेला समृद्ध जिल्हा आहे. आणि प्रमुख औद्योगिक, व्यापारी, स्वच्छतेसाठी आणि ऐतिहासिक बंदरासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे. तसेच सुरत हे गुजरातमधील दुसऱ्या क्रमांकाचे आणि भारतातील नवव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. Top 27 places to visit in Surat District

सुरत जिल्हा कापड आणि हिऱ्यांच्या व्यवसायासाठी प्रसिद्ध असून जगातील 90% हिरे सुरतमध्ये पॉलिशिंग केले जातात. व येथे मोठ्या प्रमाणावर सिंथेटिक कापड आणि सिल्कची निर्मिती होते. त्यामुळे हा जिल्हा ‘डायमंड सिटी’ आणि ‘सिल्क सिटी’ म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात दहा तालुके असून अनेक ऐतिहासिक सांस्कृतिक व सामाजिक पर्यटन स्थळे आहेत. आणि डुमास उभ्रत, व हाजिरा हे सुंदर समुद्रकिनारे या जिल्ह्यात आहेत. “डायमंड हब ऑफ द वर्ल्ड”, “टेक्स्टाइल सिटी ऑफ इंडिया”, “एम्ब्रॉयडरी कॅपिटल ऑफ इंडिया”, आणि “सिटी ऑफ फ्लायओव्हर्स” असे अनेक पुरस्कार सुरत शहराला मिळाले आहेत.

Top 27 places to visit in Surat District

सुरत जिल्ह्यातील 25 प्रसिद्ध पर्यटन स्थळे

1)BAPS Shri Swaminarayan Mandir Adajan-

Top 27 places to visit in Surat District

BAPS श्री स्वामीनारायण मंदिर हे गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील,अडाजन येथील अद्भुत वास्तुकलेसह विशाल परिसरात बांधलेले एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर लाल वाळूच्या दगडाने बांधलेले व अत्यंत सुंदर कोरीव काम केलेले घुमट आहेत. या मंदिरात भगवान स्वामीनारायण आणि इतर देवतांच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत. डिसेंबर 2016 रोजी या मंदिराचे उद्घाटन ब्रह्मस्वरूप पूज्य महंत स्वामी महाराज यांच्या हस्ते झाले.

या ठिकाणी बीएपीएस स्वामीनारायण विद्यामंदिर (शाळा), सुंदर बाग, सांस्कृतिक प्रदर्शन आणि रुग्णालय आहे. येथील शाळेत मुलांच्या सर्वांगीण विकासावर, शिक्षकांच्या टीमद्वारे विद्यार्थ्यांना सर्वोत्तम दर्जाचे शिक्षण दिले जाते. जगभरातील हजारो यात्रेकरू या मंदिरात दर्शनासाठी येतात.

2)Shri Swaminarayan Mandir Gurukul-

श्री स्वामीनारायण मंदिर गुरुकुल हे गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील, वेद रोड येथील प्रसिद्ध आध्यात्मिक आणि शैक्षणिक केंद्र आहे. या विशाल मंदिराची अप्रतिम वास्तुकला, अत्यंत सुंदर आणि गुंतागुंतीच्या कोरीव कामांसाठी प्रसिद्ध आहे. व येथील परिसर शांततापूर्ण वातावरण आणि मुलांसाठी विविध सुविधांसाठी ओळखला जातो.

या मंदिराच्या परिसरात श्री स्वामीनारायण गुरुकुल विद्यालयाची स्थापना सन 1992 मध्ये झाली असून हे विद्यालय खाजगी विनाअनुदानित व्यवस्थापनाअंतर्गत चालवले जाते. येथे मुलांसाठी प्रदर्शन आणि खेळाचे क्षेत्र असून समग्र शिक्षण प्रदान केले जाते. जगभरातून भाविक येथे दर्शनासाठी येतात.

3)Shri Ambika Niketan Mandir-

अंबिका निकेतन मंदिर, हे गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील तापी नदीच्या काठावर असलेले पवित्र तीर्थक्षेत्र आहे.
अंबिका माताजी ही देवी शक्तीचा अवतार असून हे मंदिर 1969 मध्ये मा अंबेच्या महान भक्त श्रीमती भारती मैया यांनी बांधले होते. या मुख्य मंदिराच्या मध्यभागी देवी अंबिकेची ‘अष्टभुजा’ म्हणजे आठ हात असलेली अत्यंत आकर्षक मूर्ती आहे.

याशिवाय येथे भगवान शिव, राम, सीता आणि लक्ष्मी नारायण यांना समर्पित इतर मंदिरे आहेत. या मंदिरात वर्षभर आणि नवरात्रात भाविकांची नेहमीच गर्दी असते. तसेच येथील मंदिर ट्रस्टद्वारे अनेक सामाजिक, आध्यात्मिक, आरोग्यसेवा आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जातात.

4)Dutch Garden Surat-

डच गार्डन हे गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील, नानपुरा येथील तापी नदीच्या काठावर वसलेले, आणि युरोपियन शैलीत डिझाइन केलेले उद्यान आहे. 1613 मध्ये, डच आणि इंग्रजी व्यापारी व्यवसायासाठी सुरतमध्ये आले आणि स्थायिक झाले. या चारशे वर्ष जुन्या ऐतिहासिक गार्डन मध्ये 16 व्या आणि 17 व्या शतकातील अनेक डच आणि ब्रिटीश व्यापारी व अधिकार्‍यांची थडगी आहेत.

आणि त्यामध्ये सर्वात प्रमुख बॅरन एड्रियन व्हॅन रीड यांची समाधी आहे. याशिवाय या गार्डनमध्ये अद्भुत कारंजे, हिरवळ, रंगीबेरंगी फुलांचे बेड आणि कार्पेट केलेले लॉन आहेत. हे गार्डन तापी नदीच्या काठावर असल्यामुळे येथे पर्यटकांना निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेता येतो.

Visit our website: allindiajourney.com

5)Hazira Village-

हाजिरा गाव हे गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील,चोर्यासी तालुक्यात तापी नदीच्या काठावर व अरबी समुद्राजवळ वसलेले आहे. हे गाव भारताचे एक मोठे औद्योगिक केंद्र असून येथे रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी गेल, एल अँड टी, एस्सार आणि शेल या मोठ्या कंपन्यांचे प्रकल्प आहेत. याशिवाय हाजिरा बंदर हे एक खोल समुद्रातील बंदर असून अदानी समूहाद्वारे चालवले जाते.

आणि येथून कोळसा, रसायने, पेट्रोलियम पदार्थ आणि कंडेन्सड गॅस यांची मोठी वाहतूक होते. तसेच येथील हाजिरा बीच हा समुद्रकिनारा पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असून हाजिरा गावात आशापुरी माता मंदिर व शिंगोतर मातेचि प्राचीन मंदिरे आहेत. हाजिरा गावातील लोक शिंगोतर मातेला ‘समुद्र देवी’ मानतात. तसेच
येथे नैसर्गिक गरम पाण्याचे झरे असल्याने हे ठिकाण पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

6)Dumas Beach-

डुमास बीच हा गुजरातच्या सुरत शहरापासून 22 किमी अंतरावर अरबी समुद्राच्या किनारी वसलेला लोकप्रिय पर्यटन आणि पिकनिक स्पॉट आहे. डुमास बीच हा काळ्या वाळूसाठी आणि ‘हॉन्टेड’ (भूताटकीच्या कथांसाठी) प्रसिद्ध आहे. या बीचचे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेल्या काळी वाळूमध्ये लोखंडाचे (Iron) प्रमाण जास्त असल्याने हा बीच इतर समुद्रकिनाऱ्यांपेक्षा वेगळा दिसतो. या बीच बद्दल अनेक रहस्यमयी व भीतीदायक कथा सांगितल्या जातात.

येथील स्थानिकांच्या मते, पूर्वी हा भाग हिंदू स्मशानभूमी म्हणून वापरला जात असे, त्यामुळे रात्रीच्या वेळी येथे विचित्र आवाज ऐकू येतात आणि सावल्या दिसतात असा दावा केला जातो. त्यामुळे डुमास बीच हे भारतातील सर्वात ‘हॉन्टेड’ (Haunted) किंवा भीतीदायक ठिकाणांपैकी एक मानले जाते. त्यामुळे रात्रीच्या वेळी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी या किनाऱ्यावर जाण्यास सक्त मनाई आहे.

7)Sardar Vallabhbhai Patel Museum-

सरदार वल्लभभाई पटेल संग्रहालय हे गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील, एक महत्त्वाचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक केंद्र आहे. या संग्रहालयाची स्थापना 1891 मध्ये सुरतचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री. विंचेस्टर यांनी केली होती. हे संग्रहालय ‘सायन्स सेंटर’ संकुलाचा भाग असून येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे ऐतिहासिक कलाकृती, दुर्मीळ चित्रे, प्लॅनेटेरियम,

काष्ठशिल्पे, धातूच्या वस्तू, हस्तिदंती, दगडी शिल्पे, जुनी तैलचित्रे, चंदन कोरीव काम आणि टेराकोटाच्या सुमारे 10,000 दुर्मिळ वस्तू जतन केल्या आहेत. याशिवाय येथे हिंदी, गुजराती आणि इंग्रजी भाषेत माहिती देणारी ऑडिओ-व्हिज्युअल थिएटर, आर्ट गॅलरी आणि 4000 लोकांची क्षमता असलेले खुले थिएटर आहे.

8)Sarthana Nature Park / Shyamaprasad Mukherji Zoo, Surat –

सारथाना नेचर पार्क हे हे गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील,महानगरपालिकेच्या मालकीचे एक प्राणीसंग्रहालय आहे. हे प्राणीसंग्रहालय 81 एकरमध्ये पसरलेले असून तापी नदीच्या काठावर आहे. सरथाना नेचर पार्कची स्थापना 1984 मध्ये झाली. या प्राणीसंग्रहालयात हिमालयीन अस्वल, रॉयल बंगाल टायगर्स, सिंह आणि पांढरे मोर यांचे प्रजनन केले जाते.

याशिवाय येथे सिंह, हरीण, वाघ आणि विविध प्रकारचे पक्षी व अनेक प्राण्यांच्या प्रजाती आहेत. हे प्राणीसंग्रहालय गुजरातमधील सुरतमधील सर्वात मोठे व जुने प्राणी संग्रहालय आहे.लोकांमध्ये वन्यजीव संवर्धन आणि जनजागृती करणे हा या उद्यानाचा मुख्य उद्देश आहे.

9)Surat Fort-

सुरत किल्ला, हा गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील तापी नदीच्या काठावरील एक ऐतिहासिक व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला ‘जुना किल्ला’ म्हणूनही ओळखला जातो. 16 व्या शतकात पोर्तुगीजांच्या आक्रमणापासून हा प्रदेश सुरक्षित ठेवण्यासाठी सुलतान महमूद तिसरा याने 1540 मध्ये हा किल्ला बांधला होता.

या किल्ल्याची तटबंदी अतिशय मजबूत असून या अभेद्य किल्ल्याच्या बांधकामात लोखंडी पट्ट्या आणि वितळलेल्या शिशाचा वापर केला आहे. तसेच किल्ल्यामध्ये पाणी साठवण्यासाठी भूमिगत टाक्यांची सोय आहे. पर्यटकांना या किल्ल्यातून शहर आणि अरबी समुद्राच्या दृश्यांचा आनंद घेता येतो.

10)Jagdish Chandra Bose Aquarium-

जगदीश चंद्र बोस मत्स्यालय हे गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील, पाल येथील जलतरण मत्स्यालय आहे. या मत्स्यालयचे नाव प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. हे वातानुकूलित मत्स्यालय 2 मजली असून याची स्थापना 2014 मध्ये करण्यात आली.

येथील मत्स्यालयात 52 टँक्समध्ये 100 पेक्षा जास्त जलचर प्राण्यांच्या प्रजाती, मासे, शार्क, कासव, अमेरिकन लॉबस्टर, स्नोफ्लेक ईल, लायनफिश, अ‍ॅलिगेटर गार, स्टिंगरे, सिचलिड, मानवभक्षक पिरान्हा, घोस्ट, जेलीफिश आणि डॉलफिन टनेल आहेत.

11)Chintamani Jain Temple Surat-

चिंतामणि जैन मंदिर हे गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील,मोराजी नगर भागात असलेले प्राचीन मंदिर आहे.
हे मंदिर 1699 मध्ये औरंगजेबाच्या काळात बांधलेले व 400 वर्षे जुने ऐतिहासिक मंदिर आहे. या मंदिराचे गुंतागुंतीचे लाकडी कोरीवकाम आणि छतावर नैसर्गिक वनस्पती रंगापासून बनवलेली चित्रे आहेत.

चित्रांमध्ये आचार्य हेमचंद्रजी, राजा कुमापाल आणि इतर सोलंकी राजांचे चित्रण आहे. आणि वनस्पतिच्या रंगांची चित्रे अप्रतिम आहेत. भारतीय प्राचीन कलेचा नमुना आणि सुव्यवस्थित व शांत असलेले हे मंदिर प्रामुख्याने भगवान पार्श्वनाथ आणि आदिनाथांना समर्पित आहे.

12)Science Centre Surat-

विज्ञान केंद्र हे गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील,2009 मध्ये बहु-सुविधा संकुल म्हणून विज्ञान केंद्र बांधण्यात आले. हे विज्ञान केंद्र सिटीलाईट रोडवरील एक प्रमुख शैक्षणिक आणि पर्यटन स्थळ आहे. या संकुलात आर्ट गॅलरी, फन सायन्स गॅलरी, सरदार वल्लभभाई पटेल संग्रहालय, तारांगण, अँफी-थिएटर, संग्रहालय आणि एक सभागृह आहे. तसेच संकुलाच्या छतावर 1.14 किलोवॅट वीज निर्माण करणारा एक सौर ऊर्जा प्रकल्प आहे.

विज्ञान केंद्राच्या दुसऱ्या मजल्यावर डायमंड गॅलरी प्रदर्शित केली आहे. ज्यामध्ये हिरा उद्योगाची माहिती, हिरे कसे कापले जातात आणि पॉलिश केले जातात याची माहिती दिली जाते. या विज्ञान केंद्रात विद्यार्थी आणि प्रौढांसाठी मनोरंजक पद्धतीने विज्ञानाची माहिती दिली जाते.

13)Iskcon Temple Surat-

इस्कॉन मंदिर हे गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील, तापी नदीच्या काठावर वसलेले एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. हे मंदिर ‘श्री श्री’ राधा दामोदर मंदिर’ म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराची स्थापना इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रीला प्रभुपाद यांनी 1978 मध्ये केली होती.

मंदिरात प्रामुख्याने भगवान श्रीकृष्ण (राधा-दामोदर) आणि भगवान राम यांच्या सुंदर मूर्ती आहेत. हा मंदिर परिसर अध्यात्मिक,शांत आणि स्वच्छ असून येथे सकाळ व संध्याकाळ आरती, भजन गायले जातात. हे मंदिर भक्तांमध्ये खूप लोकप्रिय असून 13,600 चौरस फूटमध्ये विस्तारलेले आहे.

14)Gavier Lake-

गॅव्हियर तलाव हा गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील,गॅव्हियर गावातील एक प्रसिद्ध सुंदर तलाव,नैसर्गिक पर्यटन स्थळ आणि पक्षी निरीक्षकांसाठी नंदनवन आहे. या तलावातून आजूबाजूच्या सुमारे 7 गावांसाठी पाणीपुरवठा होतो. या तलावाच्या पृष्ठभागावर रंगीबेरंगी कमळे आणि जलपर्णी पसरलेली असून आजूबाजूचा परिसर गर्द झाडे व हिरवाळीने नटलेला आहे.

त्याचबरोबर येथे निवासी आणि स्थलांतरित पक्ष्यांचा 57 पेक्षा जास्त प्रजाती, विविध प्रकारची फुलपाखरे आणि माशांच्या प्रजातीही आढळतात. नेचर क्लब सुरतने येथे हजारो झाडे लावून हा परिसरा ‘इकोलॉजिकल झोन’ म्हणून विकसित केला आहे. निसर्गप्रेमी व पर्यटकांना फोटोग्राफी आणि पक्षी निरीक्षणासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

15)Sneh Rashmi Botanical Garden –

स्नेह रश्मी बोटॅनिकल गार्डन हे गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील, जहांगीरपुरा येथील तापी नदीच्या काठावर वसलेले एक विस्तीर्ण आणि शांत उद्यान व पर्यटन स्थळ आहे. या उद्यानात 1000 पेक्षा जास्त दुर्मिळ वनस्पतीच्या प्रजाती, त्यामध्ये फुले, ग्रीनहाऊस, एक तलाव, देशी व विदेशी वनस्पती आणि औषधी वनस्पतींचा संग्रह आहे, ज्यात निवडुंग घर आणि बांबूचा विभाग समाविष्ट आहे.

तसेच हे ठिकाण शिक्षण आणि वनस्पतींच्या विविधतेबद्दल आणि विविध मनोरंजक उपक्रमांसाठी ओळखले जाते. या ठिकाणी पर्यटकांना बागेची सैर करण्यासाठी टॉय ट्रेन, नयनरम्य सुरतचा आनंद घेण्यासाठी हॉट एअर बलून, कोलंबस,अडव्हेंचर राईड्स, अम्युझमेंट राईड्स, सायकल चालवण्याचे मार्ग, बार्बेक्यू ग्रिल, खेळाचे मैदान आणि फूड स्टॉल्सच्या सुविधा आहेत.

16)Bardoli City-

बारडोली हे गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील,एक महत्त्वाचे ऐतिहासिक शहर आणि तालुका आहे. हे शहर बारडोली सत्याग्रहाची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. येथे 1928 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली, ब्रिटिश सरकारने शेतकऱ्यांवर लादलेल्या 22% करवाढीविरुद्ध प्रसिद्ध ‘बारडोली सत्याग्रह’ झाला.

या आंदोलनाच्या यशामुळेच वल्लभभाई पटेल यांना ‘सरदार’ ही पदवी मिळाली. बारडोली शहरात सरदार पटेलांच्या आठवणी जतन केल्या आहेत. तसेच बारडोली येथे स्वराज आश्रम, गल्तेश्वर मंदिर, केदारेश्वर, जलाराम मंदिर आणि स्वामीनारायण मंदिर ही प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत.

17)Gopi Talav-

गोपी तलाव हा गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील, गोपीपुरा भागातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक पर्यटन स्थळ आणि मानवनिर्मित तलाव आहे. या तलावाचे बांधकाम 1510 मध्ये सुरतचे श्रीमंत व्यापारी मलिक गोपी यांनी केले होते. मलिक गोपी हे एक श्रीमंत व्यापारी आणि गुजरात सल्तनत दरम्यान सुरतचे राज्यपाल होते.

या तलावाच्या मध्यभागी एक सुंदर ‘कोहिनूर कारंजे’ असून सुरत महानगरपालिकेने या तलावाचे नूतनीकरण केले आहे व पर्यटकांसाठी येथे बोटींग, झिपलाईन, वॉल क्लायंबिंग, पेंटबॉल आणि बुल राईड यांसारखे खेळ, लहान मुलांसाठी मिनी ट्रेन, बंपर कार, थीम पार्क, ओपन एअर थिएटर या सुविधा दिलेल्या आहेत.

18)Snow Park-

स्नो पार्क हे गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील, राहुलराज मॉलमधील एक लोकप्रिय इनडोअर थिम पार्क आहे. या स्नो पार्कमध्ये पर्यटकांना खऱ्या बर्फाळ प्रदेशात असल्याचा अनुभव येण्यासाठी तापमान साधारणपणे -5° सेल्सिअस राखले जाते. याशिवाय पर्यटक येथे स्नो स्लाइडिंग (घसरगुंडी), स्लेजिंग कार, इग्लू (Igloos), हिममानव (Snowmen) बनवणे.

आईस शिल्पे, लेझर शो आणि डीजे म्युझिकसह स्नो डान्सचा आनंद घेऊ शकतात. या पार्कमध्ये बर्फासाठी आवश्यक असलेले जॅकेट, बूट आणि हातमोजे पुरवले जातात.

19)Rammadhi Temple-

राममढी हे गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील,झांगिरपूरा परिसरात, तापी नदीच्या काठावर असलेले भगवान श्रीरामांचे एक प्रसिद्ध तीर्थस्थान आहे. येथील परिसर अत्यंत शांत, आध्यात्मिक व रम्य हिरवळीने नटलेला आहे. या मंदिरात 24 तास ‘राम धुन’ (राम नामाचा जप) अखंड चालू असल्यामुळे येथील वातावरण अत्यंत प्रसन्न आहे.

याशिवाय येथे मुख्य राम मंदिरासोबतच जवळच नवग्रह मंदिर आणि शनि देवाचे मंदिर आहे.’श्री रामदेव चॅरिटेबल ट्रस्ट’ द्वारे येथे गौशाळा, वृक्षारोपण आणि गरजूंची सेवा यांसारखी सामाजिक कार्ये केली जातात.

20)Roza of Khudawand Khan-

खुदावंद खानची समाधी हे गुजरातच्या सुरत शहरातील सैयदपूरा भागातील 500 वर्ष जुने एक ऐतिहासिक स्थळ आहे. ही समाधी 16 व्या शतकात सुरतचे राज्यपाल असलेल्या खुदावंद खान यांच्या दफनस्थळावर उभारलेली आहे. खुदावंद खान हे 1546 मध्ये पोर्तुगीजांच्या आक्रमणांपासून सुरत शहराचे संरक्षण केल्याबद्दल ओळखले जातात.

ही वास्तू इंडो-इस्लामिक स्थापत्यशैलीचा एक उत्कृष्ट नमुना असून यामध्ये नक्षीदार दगडी जाळीकाम, कोरीव नक्षीकाम, आकर्षक घुमट आणि सुबक अलंकरण आहेत. तसेच या समाधीजवळ खुदावंद खान यांच्या जीवनकार्याचा एक माहिती फलकही आहे.

21)Parth Waterfall-

पार्थ धबधबा हा गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील एक सुंदर धबधबा आणि नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे. हा धबधबा निसर्गप्रेमींसाठी एक मनोहारी पिकनिक स्थळ असून येथील शांत वातावरण आणि धबधब्यातून वाहणाऱ्या पाण्याचा मधुर आवाज तुमच्या मनाला अपार शांती आणि समाधान देतो. हे ठिकाण चहुबाजूंनी हिरवाईने वेढलेले आहे. व निसर्गप्रेमी, कौटुंबिक एक दिवसाच्या सहलीसाठी आणि फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी हे उत्तम ठिकाण आहे.

22)Galteshwar Mahadev Temple-

गलतेश्वर महादेव मंदिर हे गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील,कामरेज जवळ तापी नदीच्या काठावर वसलेले पवित्र धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी भगवान शिवाची विशाल आणि भव्य मूर्ती आहे. आणि मूर्तीच्या आत एक गुंफेसारखी रचना असून त्यामध्ये भारतातील 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती आहेत.

तसेच मंदिराच्या परिसरात स्विमिंग पूल, त्रिवेणी संगम आणि तापी नदीत स्नान करण्याची सुविधा आहे. निसर्गरम्य, शांत वातावरणातील हे ठिकाण धार्मिक व एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे.

23)Mughal Sarai-

मुघल सराई ही गुजरातच्या सुरत शहरातील एक ऐतिहासिक वास्तू आहे. ही वास्तु मुघल सम्राट शाहजहानच्या काळात 1644 मध्ये बांधली होती. ही वास्तू इंडो-इस्लामिक शैलीत बांधलेली असून या इमारतीला भव्य कमानदार प्रवेशद्वार,जुन्या काळातील बागा व कारंजे, आणि मध्यभागी प्रशस्त अंगण आहे व ब्रिटिश काळातील घड्याळाचा मनोरा आहे.

ही इमारत मक्केला जाणाऱ्या हज यात्रेकरूंसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी एक विश्रामगृह ‘सराई'(धर्मशाळा) म्हणून बांधण्यात आली होती. ही वास्तू, नंतर 18 व्या शतकात तुरुंग आणि शस्त्रे साठवण्यासाठी वापरली गेली. आणि सध्या सुरत महानगरपालिकेचे कार्यालय म्हणून वापरली जाते.

24)Dutch Cemetery & British/English Cemetery-

डच, आर्मेनियन आणि ब्रिटिश (इंग्रजी) स्मशानभूमी ही गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील कतारगाम दरवाजा’ जवळ ‘गुलाम फलिया’ या परिसरात स्थित, वसाहतकालीन समाधी व शहरातील ऐतिहासिक स्मारक आहेत. त्यावेळी सुरतमध्ये डच आणि इंग्रज यांच्यात एवढी स्पर्धा होती, की त्यांनी सामान्य कबरींच्या दगडांऐवजी स्वतःची श्रीमंती आणि सत्ता दाखवण्यासाठी भव्य समाधी उभारल्या.

या समाधी एवढ्या प्रचंड व सुंदर आहेत की सामान्य कबरींपेक्षा मुस्लिम स्थापत्यशैलीतील मकबर्‍यांसारख्या अधिक भासतात. येथील सर्वात भव्य समाधी ‘बॅरन एड्रियन व्हॅन रीड’ यांची आहे. सरकारने या स्मशानभूमींना संरक्षित स्मारके म्हणून घोषित केले आहे.

25)Shri 1008 Vighnahar Parshwanath Digambar Jain Mandir, Mahuva –

श्री 1008 विघ्नहर पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, हे गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील एक अत्यंत प्राचीन, आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर 1000 वर्ष जुने असून पूर्णा नदीच्या काठावर महुवा गावात आहे.महुवाचे प्राचीन नाव ‘मधुपुरी’ होते. येथील मुख्य मूर्ती (मूलनायक) 23 वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांची असून ती वाळूपासून तयार झालेली आहे आणि अत्यंत चमत्कारिक मानली जाते.

लोकांच्या संकटांचे निवारण करणारी म्हणून या मूर्तीला ‘विघ्नहर पार्श्वनाथ’ असे नाव पडले आहे. पार्श्वनाथांच्या मूर्तीसोबतच येथे भगवान चंद्रप्रभ आणि भगवान शांतिनाथ यांच्याही मूर्ती आहेत. या मंदिरातील लाकडी खांबांवरील कोरीव काम हे अत्यंत सुंदर व प्राचीन कलेचा एक उत्तम नमुना आहे. 1970 मध्ये या मंदिराचे पूर आणि आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्यानंतर त्याचे नूतनीकरण करण्यात आले.

26)Kadmi Atash Behram &Modi Atash Bahram-

कदमी आतश बेहराम हे गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील,शहापूरच्या वकील स्ट्रीटवर असलेले पारशी अग्निमंदिर हे झोरोस्ट्रियन धर्माच्या अनुयायांसाठी एक अत्यंत पवित्र आणि जुने अग्नीमंदिर आहे. या अग्निमंदिराची स्थापना 1824 मध्ये झाली असून तेथील पवित्र अग्नी पारशी लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या अग्नि मंदिराची वास्तू कला सुंदर आहे. जागतिक स्तरावर आठ पवित्र आतश बेहरामांपैकी हे एक पारशी लोकांसाठी व झोरोस्ट्रियन धर्माच्या अनुयायांसाठी मध्यवर्ती प्रार्थनास्थळ आहे.

मोदी आतश बेहराम हे गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील,सैयदपूरा भागातील हे भारतातील झरथोस्ती (पारशी) धर्मातील अत्यंत महत्त्वाचे अग्निमंदिर आहे. या अतश बेहरामचे पवित्रीकरण 1823 रोजी, करण्यात आले.हे बेहराम जगभरातील नऊ अतश बेहरामपैकी एक आहे. मोदी अतश बह्रामचे पवित्रीकरण हे पारशी समाजासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक प्रसंग होता. आणि अतश बेहरामचे पवित्रीकरण ही अत्यंत जटिल व विधीप्रधान प्रक्रिया असते. आणि या प्रक्रियेत सोळा वेगवेगळ्या स्रोतांमधून अग्नी एकत्र केला जातो. हे स्रोत दैनंदिन जीवनातील विविध पैलू व व्यवसायांचे प्रतीक मानले जातात.

27)Ek Khamba Mosque, Rander-

एक खंबा मशीद हे गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील, रांदेर येथील एक ऐतिहासिक मशिद आहे. ही मस्जिद ‘मस्जिद-ए-कुव्वत-ए-इस्लाम’, ‘हरी मशीद’ या नावानेही ओळखली जाते. ही मस्जिद स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना असून ती एकाच मध्यवर्ती खांबावर उभी आहे. आणि भूकंप व पुराचा या वास्तूवर कोणताही परिणाम होत नाही.

1800 च्या दशकात बांधलेल्या या दोन मजली मशिदीला तीन मिनार, सुबक कोरीवकाम,व घुमट आहेत. तसेच मशिदीची वास्तुशैली व्हर्नाक्युलर, वसाहतवादी बारोक आणि अरबी शैलींचा एक अनोखा संगम आहे. ही मशिद अरबी, मुघल, पोर्तुगीज आणि डच अशा विविध शैलीत बांधलेली एक उत्कृष्ट रचना आहे.

Visit the travel blog

1) सुरत जिल्ह्यातील राममढी हे ठिकाण कोणत्या भागात आहे?

सुरत जिल्ह्यातील राममढी हे ठिकाण झांगिरपूरा परिसरात, तापी नदीच्या काठावर असलेले भगवान श्रीरामांचे एक प्रसिद्ध तीर्थस्थान आहे.


2) सुरत जिल्ह्यातील वेद रोड वरील श्री स्वामीनारायण गुरुकुल कशासाठी प्रसिद्ध आहे?

सुरत जिल्ह्यातील वेद रोड वरील श्री स्वामीनारायण गुरुकुल हे, प्रसिद्ध आध्यात्मिक आणि शैक्षणिक केंद्र आहे.

3)सुरत जिल्ह्यातील बारडोलीचे महत्व काय आहे?

सुरत जिल्ह्यातील बारडोलीचे,एक महत्त्वाचे ऐतिहासिक शहर आणि तालुका आहे. व हे शहर बारडोली सत्याग्रहाची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top