मित्रांनो भारतभ्रमंतीमध्ये तुम्हाला भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळांची माहिती मिळणार आहे. आता तुम्ही पाहणार आहात गुजरात राज्यातील पंचमहाल जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे, पंचमहाल जिल्हा हा गुजरातमधील एक महत्त्वाचा आदिवासी बहुल जिल्हा आहे. पंचमहाल म्हणजे पाच तहसील किंवा तालुके’ ग्वाल्हेरचे महाराजा जिवाजीराव सिंधिया यांनी ब्रिटिशांना हस्तांतरित केलेल्या गोधरा, दाहोद, हलोल, कलोल आणि झालोद , देवगड बारिया हे पाच उपविभागाने मिळून बनलेला हा पंचमहाल जिल्हा आहे.Top 31 places to visit in Panchmahal District
या जिल्ह्यात 11 तालुके असून, सर्वात मोठा तालुका गोधरा आहे. आणि या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकसंख्या असल्यामुळे दरवर्षी येथे आदिवासी दिन साजरा केला जातो. पंचमहालचा इतिहास चंपानेर शहराभोवती विणला असून शिलादित्य पाचव्याच्या राज्यकाळात वेलाभी लोकांचा या भागावर प्रभाव होता. हा जिल्हा समृद्ध इतिहास, आदिवासी संस्कृती आणि येथील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांसाठी ओळखला जातो.
Top 31 places to visit in Panchmahal District
पंचमहाल जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे
1)Kalika Mata Temple, Pavagadh-


महाकाली माता मंदिर हे तू गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील पावगड टेकडीच्या शिखरावर चंपनेर-पावगड पुरातत्व उद्यानात असलेले एक मंदिर संकुल आणि तीर्थक्षेत्र आहे. आणि हे मंदिर 51 महान पवित्र शक्तीपीठांपैकी एक आहे. हे मंदिर समुद्रसपाटीपासून 800 मीटर उंचीवर असून 11 व्या शतकातील आहे. या मंदिरात महाकाली मातेचि पूजा दुर्गा किंवा चंडीच्या रूपात केली जाते. आणि कालीयंत्राची पूजा केली जाते.
मंदिरात देवीच्या तीन प्रतिमा आहेत त्यामध्ये मध्यवर्ती महाकाली माता आहे, उजवीकडे काली आणि डावीकडे बहुचरमाता आहे.चैत्र शुक्र 8 रोजी मंदिरात मोठी यात्रा भरते त्यावेळी लाखो भाविक उपस्थित राहतात. हे मंदिर उंच डोंगरावर असून, येथे रोप-वेने जाता येते.
2)Champaner-Pavagadh Archaeological Park-

चंपानेर-पावागढ पुरातत्व उद्यान हे गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. हे वारसा स्थळ पावागडच्या टेकड्यांपासून सुरू होऊन चंपानेर शहरापर्यंत पसरले आहे. या ठिकाणी 8 ते 14 व्या शतकातील पुरातत्वीय, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा स्मारके आहेत. त्यामध्ये मशिदी, मंदिरे, तटबंदी, आणि पायऱ्यांच्या विहिरी आहेत. हे ठिकाण 8 व्या शतकातील राजा वनराज चावडा यांनी वसवले होते.
आणि त्यांच्या चंपा मित्राच्या नावावरून चंपानेर हे नाव दिले. तसेच येथे ताम्रपाषाण युगातील ठिकाणे, डोंगरी किल्ला, राजवाडे, प्रवेशद्वार, 16 व्या शतकातील राजधानीचे अवशेष, प्रवेशद्वार, राहण्याच्या वस्त्या आणि कृषी संरचना आहेत. आणि येथील पावागड टेकडीवर प्रसिद्ध कालिका माता मंदिर आहे.
3)Helical Stepwell-


हेलिकल स्टेपवेल ही गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील, चंपानेर येथील एक अद्वितीय वास्तुशिल्पीय चमत्कार असलेली वाव आहे. ही विहीर 16 व्या शतकात बांधली असून पावागड टेकडीजवळ आहे. या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे या विहिरीच्या पायऱ्या पाण्याच्या पातळीपर्यंत सर्पिल किंवा हेलिकल स्वरूपात आहेत.
यातील जिना विहिरीच्या भिंतीवरून वळणे घेत खाली उतरतो. त्यामुळे सामान्य पायऱ्यांच्या विहिरींपेक्षा ही विहिर वेगळी आहे. आणि त्यावेळच्या वास्तुकलेतील एक उत्तम उदाहरण आहे.
4)Jama Mosque, Champaner-


जामा मशीद ही गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील, चंपानेर येथील एक ऐतिहासिक वास्तू आहे. ही मशीद चंपानेर-पावगड पुरातत्व उद्यानाचा एक भाग आहे, व 1513 मध्ये सुलतान महमूद बेगडा यांनी बांधली आहे. हे मशीद बांधण्यासाठी जवळजवळ पंचवीस वर्षाचा काळ लागला होता.
ही मशीद सुलतान महमूद बेगडा यांनी बांधलेल्या उल्लेखनीय स्मारकांपैकी एक असून या मशिदीचे बांधकाम जैन आणि मुस्लिम वास्तुकलेचे मिश्रण आहे. पूर्वीची ही शुक्रवारीची मशीद आहे व सध्या एक राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक व सुसंरक्षित वारसा स्थळ आहे.
Visit our website: allindiajourney.com
5)Kevada Mosque-

केवडा मशीद ही गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील, चंपानेर येथील एक प्राचीन मशीद आहे.आणि चंपानेर-पावगड पुरातत्व उद्यानाचा भाग व युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ आहे. ही मशीद महमूद बेगडा यांच्या काळात चंपानेरमध्ये बांधण्यात आली होती, त्यावेळी चंपानेर-पावागड पुरातत्व उद्यानात अनेक मशिदी बांधण्यात आल्या होत्या,
ज्यामध्ये बावामन , जामा , लीला गुंबज की, मिनार, खजुरी आणि शहर की मशिद आणि नगीना मशिदीचा समावेश होता. केवडा मशिदीच्या वास्तुकलेत मिनार, गोलाकार घुमट आणि अरुंद पायऱ्या आहेत. आणि तिच्या स्थापत्यशास्त्रात निसर्गाचा समावेश करण्यात आला आहे.
6)Sahar ki Masjid-

सहर की मशीद ही गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील, चंपनेर या प्राचीन शहरात असलेली एक प्रसिद्ध ऐतिहासिक मशीद आहे. ही मशीद 15 व्या शतकात सुलतान महमूद बेगडा यांनी बांधली होती. आणि ‘शहराची मशीद’ किंवा ‘स्थानिकांची मशीद’ म्हणून ओळखली जाणारी सहर की मशीद, आहे.
ही मशीद वास्तुकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. कारण त्यामध्ये इस्लामिक आणि भारतीय स्थापत्य शैलींच्या मिश्रण आहे. आणि मनोरंजक गोष्ट म्हणजे, येथील पश्चिमेकडील मक्काकडे तोंड असलेल्या इतर मशिदींपेक्षा सहार की मशीद पूर्वेकडे तोंड करून बांधलेली आहे.
7)saat kaman (Seven Arches) –

सात कमान (Seven Arches) हे गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील पावागढ येथील एक ऐतिहासिक ठिकाण आहे.हे एक ऐतिहासिक आणि वास्तुशास्त्रीय आकर्षण असून येथे एका मोठ्या तंबूत तयार केलेल्या सात कमानींमध्ये तत्कालीन राज्यकर्ते गुप्त बैठका घेत होते.
आणि राजे या जागेचा वापर मौजमजेसाठी करत असत. या सात कमानी डोंगराच्या रांगेत दूरवरून दिसतात. ‘सेव्हन आर्चेस’ म्हणून ओळखली जाणारी ही इमारत सुबक आणि सुंदर दगडांनी बांधलेली आहे. आणि येथे मोठ्या तंबूसारख्या रचनेत तयार केलेल्या या सात कमानी आहेत.
8)Bhim Ni Ghanti-

भीम की चक्की ही गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील जांबुघोडा येथे असलेली प्रसिद्ध महाभारत कालीन एक पारंपारिक दगडी चक्की आहे. हे ठिकाण झंड हनुमान मंदिराजवळ असून या ठिकाणी पाच पांडवांनी वास्तव केल्याचे सांगितले जाते. या दगडी चक्की बद्दल महाभारत काळातील अनेक दंतकथा सांगितल्या जातात.
ही चक्की दाट जंगलात असून येथे भिमाने दळण दळण्याचे सांगितले जाते. या परिसरात भिमाचे पाऊलखुणा, तुवा गरम पाण्याचे झरे आणि कडाणा धरण आहे.
9)Jambughoda Wildlife Sanctuary-


जांबुघोडा वन्यजीव अभयारण्य हे गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील अभयारण्य आहे. हे अभयारण्य 130.38 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर विस्तारलेले असून ते 1990 मध्ये अभयारण्य म्हणून घोषित केले. या अभयारण्य विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि वनस्पती आहेत. या ठिकाणी 17 प्रजातींचे सस्तन प्राणी आढळतात, त्यामध्ये उडत्या वटवाघुळांच्या मोठ्या प्रमाणात समावेश आहे. तसेच येथे घनदाट जंगल, बांबूची झाडे, साग, सदाद, शिशम खैर,महुदा, तिमरू, आणि टिकची झाडे आहेत.
आणि प्राण्यांमध्ये बिबट्या, आळशी अस्वल, कोल्हे, निळे बैल, रानडुक्कर आणि चार शिंगे असलेले काळवीट, सरपटणारे प्राणी आहेत. तसेच या अभयारण्यातील कडा आणि तारगोल या दोन जलाशयांमध्ये स्थलांतरित पक्षी भरपूर प्रमाणात आढळतात.आणि पर्यटकांसाठी येथे धनपूरी इको-टूरिझम साइट, जंगल विश्रामगृहे या सुविधा आहेत.
10)Jhand Hanuman Temple-

झंड हनुमान मंदिर हे गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील जांबुघोडाजवळ असलेले एक प्राचीन हनुमान मंदिर आहे. हे मंदिर महाभारत काळात पांडवांनी वनवासात बांधले असल्याचे सांगितले जाते.या मंदिरात डोंगराच्या दगडातून कोरलेली भगवान हनुमानाची 18 फूट उंचीची स्वयंभू मूर्ती आहे. आणि मूर्तीच्या पायाखाली शनिदेव आहेत.
स्थानिक आख्यायिकेनुसार, पांडव राजपुत्र भीमाने येथे हनुमानाला विशेष शक्तींसाठी प्रार्थना केली होती. येथील मंदिर परिसर शांत आणि आध्यात्मिक वातावरणामुळे हे एक महत्त्वाचे धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे. पावगडला जाताना अनेक पर्यटक येथे भेट देतात.
11)Nagina Masjid-



नगीना मशीद ही गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील चंपानेर येथील एक ऐतिहासिक मशीद आहे. ही मशीद 15 व्या शतकात सुलतान महमूद बेगडा यांच्या काळात बांधली गेली. नगीना मशीद म्हणजे ‘रत्नजडित मशीद’ या मशीदीमध्ये मिनार, गोलाकार घुमट आणि अरुंद पायऱ्या आहेत. पावगड पुरातत्व उद्यानाचा भाग असलेली ही मशीद राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक व युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे.
आणि बडोदा हेरिटेज ट्रस्टने सूचीबद्ध केलेल्या 114 स्मारकांपैकी एक आहे. या मशिदीच्या संकुलात काही विटांच्या रचना आणि विहीर आहे.महमूद बेगडा यांच्या काळात चंपानेर-पावगड पुरातत्व उद्यानात बावामान , जामा , केवडा, लीला गुंबज की मशिद,एक मिनार, खजुरी आणि शहर की मशिद अशा अनेक मशिदी बांधण्यात आल्या होत्या.
12)Tuva Timba Hot Springs-

तुवा गरम पाण्याचे झरे हे गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील तूवा गावात प्रसिद्ध असलेले गरम पाण्याचे कुंड आणि प्राचीन शिव मंदिर आहे. हे गरम पाण्याचे कुंड महाभारत आणि रामायण काळापासून अस्तित्वात असून येथे प्रभू श्रीरामांनी येथे भेट दिली होती. या कुंडातील गरम पाण्याचे तापमान साधारणत: 54°C ते 65°C दरम्यान असते.
गंधकाने समृद्ध असलेले हे नैसर्गिक गरम पाण्याचे झरे डोंगराळ परिसरात आहेत आणि औषधी गुणधर्मांमुळे विशेष प्रसिद्ध आहेत.या झऱ्यांचे पाणी अनेक त्वचा रोग, संधिवात आणि इतर आरोग्य समस्यांवर उपयुक्त मानले जाते.
13)Jain Tirth Temples,Pavagarh-

पावागढ जैन तीर्थ हे गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील पावागढ येथील एक ऐतिहासिक व धार्मिक तीर्थस्थळ आहे. या ठिकाणी अनेक जैन मंदिरे आहेत. त्यामध्ये श्री पावागड दिगंबर जैन सिद्ध क्षेत्र, कोटी आणि श्वेतांबर जैन मंदिर आहेत. पावगड येथे तीन जैन मंदिर संकुल आहेत,
ज्यामध्ये डोंगरावर सात मंदिरे, पायथ्याशी 3 मंदिरे आणि एक धर्मशाळा आहे. परंतु सध्या येथील अनेक लहान जैन मंदिरे उध्वस्त झाली आहेत. पावगढ हे एक महत्त्वाचे पवित्र जैन तीर्थ असून येथे मोक्ष मिळवता येतो अशी लोकांची श्रद्धा आहे.
14)Hill Fortress Of Pavagadh-

पावागढचा डोंगरी किल्ला हा गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील पावगड टेकड्यांवर असलेला प्राचीन किल्ल्यांपैकी सर्वात अजिंक्य मानला जातो. हा किल्ला पावगड टेकडीवरील सपाट जमिनीच्या मध्यभागी आहे. पावगड टेकडी ही किल्ल्यासाठी एक आदर्श स्थान होती.
या ठिकाणाहून वेगवेगळ्या स्तरांच्या सुरक्षिततेची खात्री असणाऱ्या सलग मजबूत बुरुजांच्या तटबंदीच्या रांगा होत्या. आणि त्यामध्ये तोफा, कॅटपल्ट आणि इतर शस्त्रे होती. सध्या या किल्ल्याच्या भिंतींचे अवशेष, प्रवेशद्वार, बुरुज, निवासी राजवाडे, मंदिरे, समाधीस्थळे आणि मशिदी आहेत.
15)Lakulish Temple, Pavagadh-

लकुलिश मंदिर हे गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील चंपानेर जवळील पावगड येथील सर्वात प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर 10 व्या शतकातील असून भगवान शिवांच्या 28 व्या अवतार भगवान लाकुलीश यांना समर्पित आहे. या मंदिरात खडकांमधून कोरलेली अत्यंत दुर्मिळ आणि सुंदर शिल्पे आहेत.
सध्या हे मंदिर भग्नावस्थेत आहे.मंदिर परिसरात ब्रह्मा, विष्णू, महेश, गणपती, दिव्य देवता आणि कल्याणसुंदरा यांच्या अनेक प्राचीन मूर्ती पाहायला मिळतात.तसेच या हिरव्यागार जंगलांनी वेढलेल्या मंदिर परिसरात डोंगर, दुधिया तलाव अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत.
16)Navalakha kothar-

नवलाखा कोठार हे गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील चांपानेर येथे असलेले एक ऐतिहासिक ठिकाण आहे.
नवलाखा कोठार हे मकई कोठार म्हणून ही ओळखले जाते. नवलाखा कोठार ही प्राचीन वास्तू मुघल वास्तुकलेची झलक आहे. ही इमारत टी-आकाराची आणि मोठ्या घुमटाने आच्छादित सात भागांची आहे.
व नवलाखी खोर्याच्या काठावर वसलेली आहे.पूर्वी धान्य साठवण्यासाठी याचा वापर केला जात असे. हे ठिकाण युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा एक भाग आहे आणि पूर्वी धान्याची साठवण करण्यासाठी व राजांसाठी एक संरक्षण आणि गुप्त ठिकाण होते.
17) Khuneshwar Mahadev Temple & Khuniya Mahadev Waterfall –

खुनेश्वर महादेव मंदिर हे गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील चंपाणेर प्रदेशात, निसर्गरम्य ठिकाणी असलेले प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिराला अत्यंत धार्मिक महत्त्व असल्यामुळे भाविक या मंदिराला मोठ्या प्रमाणात भेट देतात. तसेच या मंदिराच्या जवळच मागच्या बाजूला,नेत्रदीपक निसर्ग आणि अद्भुत धबधबा आहे. पावसाळ्यात या धबधब्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.
18)Hathni Mata Waterfall-


हथनी माता धबधबा हा गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील जांबुघोडा शहरापासून 5 किमी अंतरावरअसलेला प्रसिद्ध धबधबा आहे. हा धबधबा गुजरातमधील सर्वात सुंदर आणि शांत ठिकाणांपैकी एक नैसर्गिक आश्चर्य आहे. या धबधब्याचे नाव येथे असलेल्या हथनी माता मंदिरावरून ठेवण्यात आले आहे.
हा धबधबा सुमारे 100 मीटर उंचीवरून कोसळतो. आणि येथील निसर्गरम्य परिसर दाट धुके,घनदाट जंगल आणि खडकाळ टेकड्यांनी वेढलेला आहे. त्यामुळे येथील वातावरण शांत आहे. पर्यटक या धबधब्यावर हायकिंग, पोहणे, छायाचित्रण, कॅम्पिंग यासारख्या गोष्टीचा आनंद घेतात.
19)Arjuna’s Well-

अर्जुनाची विहीर ही गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील एक ऐतिहासिक, महाभारत कालीन विहीर आहे. पौराणिक आख्यायिकेनुसार, पांडवांची पत्नी द्रौपदी जंगलात फिरत असताना तिला तहान लागली होती, त्यावेळी तिथे कुठेही पाणी नव्हते हे पाहून अर्जुनाने त्याच्या भात्यातून बाण काढून जमिनीवर मारला. आणि त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह बाहेर पडला.
हे पाणी पिऊन द्रौपदीने तिची तहान भागवली.अर्जुनाने द्रौपदीसाठी निर्माण केलेला तो प्राण्याचा प्रवाह आजही चालू आहे. सध्या ही विहीर सर्व बाजूंनी लोखंडी जाळीने बंदिस्त केली आहे. विहिरीमध्ये प्रवेश करण्यासाठी एक लहान दरवाजा असून, विहिरीचे महत्त्व लिहिलेला गुजराती भाषेत एक बोर्ड आहे.
20)Kabutarkhana Pavilion-


कबुतरखाना मंडप, हे गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील,खजुरी मशिदीजवळ, बडा तलावाच्या उत्तर तीरावर असलेले एक महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे, आणि ते युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा भाग आहे. हिरव्यागार निसर्गाने वेढलेल्या शांत ठिकाणी व मुघल काळात बांधण्यात आलेली,
ही सुंदर अलंकारिक वास्तू एक उत्कृष्ट कारागिरीचे उदाहरण आहे. कबुतरखाना हे चंपानेरच्या पुरातत्वीय स्थळांमधील एक ऐतिहासिक रचना असून, त्या काळातील वास्तुकला आणि स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे.
21)Lila Gumbaj Ki Mosque-

लीला गुंबज की मशीद ही गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील चंपानेर-पावागड पुरातत्व उद्यानातील एक ऐतिहासिक व प्राचीन मशीद आहे.ही मशीद एका उंच व्यासपीठावर बांधली गेली होती आणि या मशिदीच्या मध्यभागी एक कमानदार प्रवेशद्वार व दोन बाजूंच्या कमानी आहेत.
तसेच सुशोभित मिनार आणि नक्षीकाम केलेल्या मिहराबा आहेत. ही मशीद 114 स्मारकांपैकी राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक असून युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे.
22)Satkunda Waterfall-

सातकुंडा धबधबा हा गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील गोध्रापासून 45 किलोमीटरवर अंतरावर असलेला एक नैसर्गिक, सुंदर धबधबा आहे. हा धबधबा परिसर अत्यंत निसर्गरम्य व शांत आहे. धबधब्याकडे जाताना अनेक छोटी छोटी मातीची घरे व शेती पाहायला मिळते.
तसेच या धबधब्याजवळ एका छोट्या गुहेत एक शिवमंदिर आहे.पावसाळ्यात तर या धबधब्याचे सौंदर्य अप्रतिम असते. त्यामुळे पर्यटक या धबधब्यावर बारमाही भेट देत असतात.
23) Khapra Zaveri Palace-


खाप्रा झवेरी महल हा गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील पावागड येथील एक अद्भुत, गुप्त महाल आहे. हा महल कोणत्याही राजाचा किंवा राणीचा नसून तो दोन चोरांचा एक खुपीया महाल आहे.खाप्रा आणि झवेरी हे दोन शातीर चोर होते, त्यावेळी पावागढ वर मुस्लिम राजा मोहम्मद बेगडाचे राज्य होते.
खाप्रा आणि झवेरी हे काली मातेचे मोठे भक्त होते ते ज्यावेळी चोरी करायचे त्यावेळी काही हिस्सा खाली मातेला अर्पण करायचे. ते चोरी करण्यात एवढे माहीर होते की कधीही कोणाला सापडत नसत. त्यांच्या चतुराईला बक्षीस म्हणून मोहम्मद बेगडाने त्यांना सात मंजीला महाल बक्षीस म्हणून दिला. तेव्हापासून ते त्या महलात शांततेने राहिले.
24)Sadanshah Pir Dargah-

सदानशाह पीर दरगाह हा गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील काली मंदिराच्या वरती असलेला एक ऐतिहासिक दर्गा आहे. हा दर्गा हिंदू आणि मुस्लीम दोन्ही धर्मांच्या भाविकांचे महत्वाचे ठिकाण आहे. असे सांगितले जाते की सदानशाह फकीर यांचे खरे नाव सहदेव जोशी होते व ते हिंदू ब्राह्मण होते.
आणि ते मोहम्मद शाह यांच्या दरबारातील एक दरबारी होते. त्यांनी नंतर इस्लाम धर्म स्वीकारला. तसेच पावागडच्या देवतेचे मूळ मूर्तीभंजनापासून वाचविण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.
25)Godhra Trimandir-

गोध्रा त्रिमंदिर हे गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील एक प्रसिद्ध आध्यात्मिक ठिकाण आहे. हे मंदिर परम पूज्य दादाश्री यांनी जैन, शैव आणि वैष्णव व इतर धर्मातील देव-देवता यांना एकाच व्यासपीठावर स्थापित केलेल्या आहेत. त्यामुळे त्रिमंदिरात येणाऱ्या भाविकांना निष्पक्ष, दर्शन मिळते.
आणि त्यांच्या मनातील धर्मीय भेदभाव आपोआप नाहीसा होतो. हे मंदिर 22,569 फूट क्षेत्रफळावर विस्तारलेले असून मंदिराची वास्तूकला व नक्षीकाम अप्रतिम केलेले आहे. तसेच मंदिराच्या मध्यभागी सीमंधर स्वामींची 151 इंच विशाल मूर्ति आहे. आणि मंदिर परिसर निसर्गरम्य व फुलांच्या बागांनी बहरलेला आहे.
26)Vada Talav-

वडा तलाव हा गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील हलोल तालुक्यात असलेले एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. या निसर्गरम्य व शांत ठिकाणाहून पावागढ टेकडी आणि आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसते. पर्यटक या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात.गोध्रा पासून हे ठिकाण 37 किलोमीटर अंतरावर आहे तर हलोल पासून सात किलोमीटर अंतरावर आहे.
27)Dudhiya Talao-

दुधिया तलाव हा गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील,पावागडच्या डोंगरावर, माऊली पठारवर, निसर्गरम्य परिसरात असलेला एक शांत आणि नयनरम्य तलाव आहे. या तलावाचे पाणी अत्यंत स्वच्छ असल्यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. तसेच हा पवित्र व धार्मिकदृष्ट्या महत्वपूर्ण असलेला तलाव कालिका मंदिराच्या जवळ असल्यामुळे पर्यटक या ठिकाणाला आवर्जून भेट देतात.
28)Tomb of Sikander Shah-


सिकंदर शाहचा मकबरा हा गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील हलोल येथे सुलतान बहादूर शाहने 1527 मध्ये सिकंदर शाहसह त्याच्या भावांच्या व पूर्वजांच्या सन्मानार्थ बांधलेला एक मकबरा आहे. हा मकबरा इस्लामिक वास्तुकलेवर बांधलेला, एकमजली वाळूच्या दगडी मकबरा आहे.
त्यामध्ये दोन मध्यवर्ती आणि पाच लहान घुमट व एक मोठे कमानीदार प्रवेशद्वार आहे. व सुंदर संगमरवरी कोरीव काम केलेले आहे. हे ठिकाण चंपानेर-पावागड युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा भाग आहे.
29)Pithora Painting-

पिठोरा भिंतीवरील चित्रकला ही गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील रथवा जमातीची एक प्रसिद्ध धार्मिक भित्तिचित्रकला आहे. पिठोरा चित्रकला ही रथवा लोकांसाठी त्यांच्या प्रमुख देव बाबा पिठोरा यांच्या विधीचा एक अविभाज्य भाग आहे. ही चित्रकला रथवा जमातीचे पुरुष देव पिठोरा बाबांना अर्पण म्हणून काढतात.
व त्यामध्ये सात घोडे आणि विविध नैसर्गिक रंगांचा वापर असतो. आणि विशेष शुभ प्रसंगी म्हणजे लग्न किंवा मुलाच्या जन्मासारख्या शुभ प्रसंगी काढले जातात आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात.
30)Champaner Fort-


चंपानेर किल्ला हा गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील, पावागढ डोंगरावर वसलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा भाग आहे. 15 व्या शतकात गुजरातच्या आजूबाजूच्या पुरातत्व उद्यानासह सुलतान महमूद बेगडा यांनी हा किल्ला बांधला होता. किल्ल्याची स्थापत्य शैली हिंदू आणि इस्लामिक पद्धतीचे एक अद्वितीय मिश्रण आहे.
या किल्ल्याच्या संकुलात कोरीव काम केलेले खांब, घुमट, कमानी, मिनार, पायऱ्यांच्या विहिरी, राजवाडे, मशिदी, थडगे आणि मंदिरे आहेत. महमूद बेगडा यांच्या कारकिर्दीत, चंपानेर हे राजधानी होते, त्यामुळे हा किल्ला एक महत्त्वाचा प्रशासकीय ठिकाण होते.
31) Babadev Temple,Chelavada –


बाबादेव मंदिर हे गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील,घोघम्बा तालुक्यातील पावागढ जवळ असलेले एक धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर महाभारत कालीन, पांडवांच्या काळातले असल्याचे सांगितले जाते. निसर्गरम्य डोंगरावर असलेल्या या मंदिरात दर रविवारी भाविकांची खूप गर्दी असते. तसेच या डोंगरावर बाबा देव यांच्या पावलाचे निशान आहे.
व मंदिराच्या बाजूला असलेल्या गुफेमध्ये बाबादेव यांची मूर्ती व पलंग आहे.भाविक या ठिकाणी बाबा देव यांना नारळ, मातीचे घोड्यामध्ये नवस लिहून अर्पण करतात. बाबा देव यांच्या पत्नीचे नाव चेलावती असल्यामुळे या गावाला चेलावाडा हे नाव पडले आहे. या मंदिरात भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात.
1)चंपानेर-पावागढ पुरातत्व उद्यान हे गुजरातच्या कोणत्या जिल्ह्यातील आहे?
1)चंपानेर-पावागढ पुरातत्व उद्यान हे गुजरातच्या पंचमहाल
जिल्ह्यातील युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे.
2) पंचमहाल जिल्ह्यातील तुवा गाव हे कशासाठी प्रसिद्ध आहे?
पंचमहाल जिल्ह्यातील तुवा गाव हे गरम पाण्याच्या झर्यासाठी साठी प्रसिद्ध आहे.
3)गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील महाकाली माता मंदिर कोणत्या ठिकाणी आहे?
3)गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील महाकाली माता मंदिर हे पावगड टेकडीच्या शिखरावर चंपनेर-पावगड पुरातत्व उद्यानात असलेले एक मंदिर संकुल आणि तीर्थक्षेत्र आहे.


